II बुद्ध वंदना II

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
9 May 2009 - 10:16 am

आज बुद्धपोर्णिमा , महाकारुणी भगवान गौतमबुद्धांचा जन्मदिवस त्या महान तत्ववेत्त्यास त्रिवार वंदन...!!

तणाने नष्ट होते शेत
तशी द्वेषाने मानव जात
प्रेमानेच प्रेम वाढते
हाच अमृतपाथ

कामासारखा नाही अग्नि
घृणा लक्ष्यविहीन
लोभ कारण दु:खाचे
करे जीवन अपुले कठीण

गौतम म्हणे बा मानवा
हो जरासा स्मृतिमान
सद् धम्माचे मर्म जाणुनी
कर जीवन प्रज्ञावान....!!

कविता

प्रतिक्रिया

सूहास's picture

9 May 2009 - 10:36 am | सूहास (not verified)

अत्त दिप भव..

सुहास
कसे दिवस जातात कोण जाणे...

राम दादा's picture

9 May 2009 - 10:41 am | राम दादा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे...

राम दादा..

क्रान्ति's picture

9 May 2009 - 10:50 am | क्रान्ति

तणाने नष्ट होते शेत
तशी द्वेषाने मानव जात
प्रेमानेच प्रेम वाढते
हाच अमृतपाथ

१००% सहमत.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

सँडी's picture

9 May 2009 - 11:32 pm | सँडी

सुंदर काव्य!

भगवान गौतमबुद्धांना त्रिवार वंदन...!!

-संदीप.
काय'द्याच बोला.

प्राजु's picture

12 May 2009 - 3:12 am | प्राजु

कामासारखा नाही अग्नी
घृणा लक्षविहीन
लोभ कारण दु:खाचे
करे जीवन अपुले कठीण

आवडल्या या ओळी.
सुरेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/