बेवफा... एक वेगळी मिश्र गझल ( हिंदी - मराठी )

उमेश__'s picture
उमेश__ in जे न देखे रवी...
3 May 2009 - 12:42 pm

आ गयी वो आज आखिर, हाल मेरा देखने...
मी तिला धाडीत होतो, सारखी आमंत्रणे...

देख लू इकबार तुझको, ये तमन्ना थी मेरी;
पाहुनी तुजला सखे, हे श्वास माझे स्पंदले...

आज भी मेरे लबोंसे, कुछ बयाँ ना हो सका;
आसवांना पूर आला, शब्द माझे संपले...

बेवफा से पूछता हू, क्या खता मुझसे हुई?
का सखे तू टाळले, माझ्या मनाचे चांदणे...

तू जफा दे या जहर दे, ये तुझे हक़ है सनम;
शक्य नाही हे तुला, या भावनांना जाळणे...

गझल

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

3 May 2009 - 1:10 pm | मराठमोळा

काय बी मजा नाय आली बॉ वाचताना. पण भावना पोहोचत आहेत. :)
हे प्रकार मला वाटतं अवधूत गुप्तेंनाच चांगले जमतात. ;)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

नितिन थत्ते's picture

3 May 2009 - 1:59 pm | नितिन थत्ते

सुंदर. विशेषतः मराठी ओळीत उर्दू ओळीचाच अर्थ असे नसल्याने जास्त छान.
चांगले जमले आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्रान्ति's picture

3 May 2009 - 7:58 pm | क्रान्ति

वरच्या हिन्दी ओळीचं उत्तर खालच्या मराठी ओळीत आलंय असं वाटतं. एकंद्रीत दोन्ही भाषांचा मेळ छान साधला गेला आहे. आवडला हा अंदाज.
क्रान्ति

{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

3 May 2009 - 8:22 pm | प्राजु

मस्त जमले आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बहुभाषिक कवी असे करत असत. रामजोशांच्या संस्कृत-मराठी आणि संस्कृत-कन्नड-मराठी लावण्या उपलब्ध आहेत.

तोच प्रयोग उर्दू-मराठीत करण्याचा प्रयोग आवडला.

मल्लिनाथी : "स्पंदले" ऐवजी "स्पंदने" असे यमक बसवणारी ओळ असती, तर गझल अधिक यमक-शुद्ध झाली असती
> वेगावती तुजला पहाता काळजाची स्पंदने
(किंवा असे काही. कल्पना तुमच्या कल्पनेइतकी चांगली नाही... पण स्फूर्तीसुद्धा तुम्हाला झाली आहे, मला नाही :-) )

बेसनलाडू's picture

4 May 2009 - 12:48 am | बेसनलाडू

द्वैभाषिक ओळी छान, सहज जमून आल्या आहेत. प्रयोग आवडला. आमंत्रणे आणि आसवांचे पूर खास आवडले.
आस्वाद घेण्याच्या दॄष्टीने थोडे जड जाते, हे खरे. पण पूर्ण कविता शक्यतो एकाच भाषेत असावी, असे सध्यातरी व्यक्तिशः वाटते.
(आस्वादक)बेसनलाडू

विवेक काजरेकर's picture

4 May 2009 - 1:32 pm | विवेक काजरेकर

उमेश,

प्रयत्न चांगला आहे. गझलेच्या व्याकरणाकडे मात्र दुर्लक्ष झालंय असं वाटतंय. एकदा रचनेला "गझल" म्हटलं की त्याचं व्याकरण पाळण्याचं बंधन येतंच :)

पुढील लेखनासाठी शुभेच्छा

यावरुन ईलाही जमादार यांची अशीच एक गझल आठवली. त्यांनीही एक ओळ हिंदी व दुसरी मराठीत असा प्रयोग केला होता

ऎ सनम आंखोंको मेरी खूबसूरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे

आहटोंसे दिलकी बेचैनी मेरी बढने लगी
ऎक आभासा मला थोडा तरी अंदाज दे

लज्जते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया
वेदनांनी बहरलेली एक सुंदर सांज दे

ऎ खुदा ! मैं चाहता हूं हर कोई चाहे मुझे
गंध दे मजला फुलांचा, हासणे निर्व्याज दे