स्वप्न

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
9 Apr 2009 - 3:58 pm

अशी काजळली रात
चंद्र ढगात लपला
जीवनाचा सारा प्रकाश
प्रिये कोठे ग लोपला

कसे विझले अकाश
नाही चांदनी पेटत
झोप गेली दुर देशी
नाही पापनी मिटत

अशी एकटीचा वाट
का केंव्हाची सरेना
लाख जपल्या जखमा
त्याला काळीज पुरेना

झाला श्रावण पाहुणा
अता ग्रीष्मात जगणे
खडे फेकत नदीत
गोल तरंग बघणे

झाले ओसाड जीवन
वांझ मनाचीया आशा
गांव मोडला स्वप्नांचा
फक्त ऊरला नकाशा

कविता

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Apr 2009 - 6:56 am | चन्द्रशेखर गोखले

छान ! अवडली, लिहीणे चालु ठेवा..!

आनंदयात्री's picture

14 Apr 2009 - 7:13 am | आनंदयात्री

शेवटचे कडवे मस्त जमले आहे ..

>>गांव मोडला स्वप्नांचा
>>फक्त ऊरला नकाशा

फक्त उरला नकाशा ही कल्पना छान आहे .. नविन आहे. लिहित रहा.

क्रान्ति's picture

14 Apr 2009 - 2:07 pm | क्रान्ति

सुन्दर कल्पना. शेवटची दोन्ही कडवी तर अप्रतिम! कविता खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

क्रान्ति's picture

14 Apr 2009 - 2:07 pm | क्रान्ति

सुन्दर कल्पना. शेवटची दोन्ही कडवी तर अप्रतिम! कविता खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com