मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
6 Apr 2009 - 4:29 pm
गाभा: 

कुणी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा चित्रपट बघीतलाय का? त्याचे परीक्षण द्या जरा.
मी एकलेय की पब्लीक जाम खुष आहे या चित्रपटावर. थेटरात महाराजांना मुजरे होतात. जय भवानी जय शिवाजी च्या नार्‍यांनी थेटर डोक्यावर घेतले जातेय.
महाराष्ट्राच्या दैवताबद्द्ल एकूणच छान चित्रपट दिसतोय. महाराजांचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात तसे प्रसंग या चित्रपटात आहे काय? सचिन खेडेकर ने नेहमीसारखे यशस्वी कलाकाराचे काम केले असे समजले.

जय भवानी ! जय शिवाजी !!

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

6 Apr 2009 - 4:40 pm | निखिल देशपांडे

चित्रपट बघितला....
पब्लीक जाम खुष आहे .... शिट्ट्या टाळ्या जाम धमाल करत आहे पब्लीक...
परिक्षण टाकायला वेळ नाही सध्या पण चित्रपट बघावा असाच आहे...

अजुन एक ठाण्यातल्या मल्टिप्लेक्स ला शनिवारी रात्री तिकिटे उपलब्ध नव्हती.... मराठी चित्रपटाला असा प्रतिसाद बघितला नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Apr 2009 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्रपट कसा आहे हे माहित नाही. ट्रेलर्स बघून तरी अपेक्षा उंचावल्या आहेत. छत्रपति हा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय. वादंग उद्भवू शकतात. पण महेश मांजरेकरने ज्या ज्या दिशेने वादंग होऊ शकतो त्या सगळ्या बाजूंनी भक्कम तहनामे केले आहेत असे ऐकतो. त्यामुळे वादंग व्हायची शक्यता कमी वाटते आहे.

मी एकलेय की पब्लीक जाम खुष आहे या चित्रपटावर. थेटरात महाराजांना मुजरे होतात. जय भवानी जय शिवाजी च्या नार्‍यांनी थेटर डोक्यावर घेतले जातेय.

असे असेल तर मात्र खरोखर चिंता वाटते आहे. नेहमी प्रमाणे महाराजांचे नाव काढले की आपला गळा भरून येणार, छाती अभिमानाने वगैरे फुलून येणार, आपण मुजराच काय साष्टांग वगैरे नमस्कार करणार. चित्रपट बघताना १०० रूपयाचे कोक + पॉपकॉर्न खाणार, पॉपकॉर्नच्या काउंटरवर "भय्या, २ कोक और पॉपकॉर्न दे दो." असं म्हणणार, बाहेर येणार, रिक्षात बसून... "*** चलो, फ्लायओव्हरके नीचेसे ले लो" असं सांगणार, घरी येऊन मित्रांना "काय पिक्चर आहे यार. जबरदस्त. महाराज नसते तर आज आपण सगळे ***** असतो" वगैरे सांगणार, शांतपणे झोपी जाणार. दुसर्‍या दिवशी रहाटगाडगं आजपर्यंत जसं सुरू आहे तसंच सुरू.

बोला छत्रपति शिवाजी महाराज की.............

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Apr 2009 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि हो, महेश मांजरेकर आणि अमराठी मल्टीप्लेक्सवाले यातून प्रचंड पैसा/नफा छापणार.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

निखिल देशपांडे's picture

6 Apr 2009 - 4:57 pm | निखिल देशपांडे

चित्रपट बघताना १०० रूपयाचे कोक + पॉपकॉर्न खाणार, पॉपकॉर्नच्या काउंटरवर "भय्या, २ कोक और पॉपकॉर्न दे दो." असं म्हणणार, बाहेर येणार, रिक्षात बसून... "*** चलो, फ्लायओव्हरके नीचेसे ले लो" असं सांगणार, घरी येऊन मित्रांना "काय पिक्चर आहे यार. जबरदस्त. महाराज नसते तर आज आपण सगळे ***** असतो" वगैरे सांगणार, शांतपणे झोपी जाणार. दुसर्‍या दिवशी रहाटगाडगं आजपर्यंत जसं सुरू आहे तसंच सुरू.

बिपिनदा चित्रपटा मधे, मराठी माणसाचे असे वागणे हाच मुख्य विषय आहे.....कुठल्याही परप्रांतिया पेक्षा मराठी माणुसच स्वःताच्या परीस्थीति साठी जवाबदार आहे असे दाखवले आहे. आणी मग मराठी माणुस ठरवले तर काय करु शकतो ते दाखवले आहे.

भय्या, २ कोक और पॉपकॉर्न दे दो नाही हो काल चक्क सगळे मराठी मधे बोलत होते. सिनेमॅक्स वंडर मॉल ठाणे चे कर्मचारी सुध्धा...

पण तुम्ही म्हणल्या प्रमाणे "दुसर्‍या दिवशी रहाटगाडगं आजपर्यंत जसं सुरू आहे तसंच सुरू." असेच रहाणार

विशाल कुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 5:02 pm | विशाल कुलकर्णी

अगदी माझ्या मनातले बोललात बिपीनदा, हे कधी आपल्या लक्षात येणार आहे कोण जाणे.
तोपर्यंत असे कितीही चित्रपट येवो ...
हम नही सुधरेंगे :-(

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

घासू's picture

6 Apr 2009 - 6:33 pm | घासू

बिपीनजी मी अजिबात सहमत नाही तुमच्याशी.

"नेहमी प्रमाणे महाराजांचे नाव काढले की आपला गळा भरून येणार, छाती अभिमानाने वगैरे फुलून येणार, आपण मुजराच काय साष्टांग वगैरे नमस्कार करणार. चित्रपट बघताना १०० रूपयाचे कोक + पॉपकॉर्न खाणार, पॉपकॉर्नच्या काउंटरवर "भाऊ, २ कोक आणि पॉपकॉर्न दे." असं म्हणणार, बाहेर येणार, रिक्षात बसून... "*** चला, पुलाखालून घ्या" असं सांगणार, घरी येऊन मित्रांना "काय पिक्चर आहे. जबरदस्त. महाराज नसते तर आज आपण सगळे ***** असतो" वगैरे सांगणार, शांतपणे झोपी जाणार..................दुसर्‍या दिवसापासून सगळकाही मराठीत होणार........ सकाळी येणार्‍या दुधवाल्यापासून ते रात्री जाण्यारा पानवाल्यापर्यंत.

बोला छत्रपति शिवाजी महाराज की.............जय!

जय भवानी! जय शिवाजी!

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Apr 2009 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते

इन्शाल्लाह!!!

:)

बिपिन कार्यकर्ते

आपला अभिजित's picture

6 Apr 2009 - 5:23 pm | आपला अभिजित

छत्रपती शिवरायांनी मराठी मातीला दिलेला स्वाभिमान कुठे गेला? त्यांचा पराक्रम मराठी माणूस विसरून गेला का? परप्रांतीयांनी केलेल्या अन्यायाचे तुणतुणे वाजवत किती दिवस जगायचं? सध्याच्या काळाशी सुसंगत असे प्रश्‍न "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' उपस्थित करतो. मात्र, केवळ ते मांडून पळून न जाता, प्रेक्षकांना रुचणारी-भावणारी, लोकप्रिय का होईना, उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो.
घरात, ऑफिसात, बाजारात "मराठी' म्हणून सातत्याने अवहेलना वाट्याला येणारा दिनकर भोसले (सचिन खेडेकर) हताश आयुष्य जगतोय. त्यातच एक अमराठी उद्योजक (विद्याधर जोशी) त्याचा राहता बंगला गिळंकृत करण्याचा डाव खेळतो. "मराठीपणा'ची लाज वाटू लागलेल्या भोसलेच्या स्वप्नातून साक्षात शिवाजी महाराज त्याच्या आयुष्यात येतात. अपमानावर, अन्यायावर मात करण्यासाठी त्याला नवं बळ देतात. मग नव्यानं सापडलेल्या स्वाभिमानाच्या जोरावर हा दिनकर भोसले आपली मान आणि शान परत मिळवतो, अशी ही कथा.
"मुन्नाभाई'मध्ये महात्मा गांधी मुन्नाच्या आयुष्यात येतात आणि त्याला सत्याचा मार्ग दाखवतात. इथे चित्रपटाचा नायक सत्यानेच चालणारा आहे, पण परिस्थितीच्या रेट्यात पिचलेला आणि गैरफायदा घेणाऱ्यांच्या दबावाखाली झुकलेला. 1हा दबाव, दहशत झुगारण्याची हिंमत त्याला शिवराय देतात. प्रसंगी स्वतः हजर होऊन त्याच्या कुटुंबीयांना मदत करतात.
"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देणारा असला, तरी तो केवळ प्रबोधनपट नाही किंवा भावनांना हात घालून अश्रूंचे कढ काढणाराही. मराठी स्वराज्य उभारणारे शिवराय इथेही मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहायला, परप्रांतीयांशी बुद्धीच्या, हिमतीच्या बळावर लढण्याचा सल्ला देतात. स्वतःच्या चुकांमुळेच मागे राहिल्याबद्दल कानउघाडणी करतात. नायक केवळ सगळ्यांना खलनायक ठरवून मारत न सुटता, स्वतः धंद्यात, राजकारणातही उतरण्याची तयारी दाखवतो. हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे.
हुशारीनं रचलेल्या या कथेत सर्वसामान्य प्रेक्षकाला भावणारे, भिडणारे प्रसंग आणि संवाद टप्प्याटप्प्यानं पेरले आहेत आणि ते अर्थातच प्रचंड हशा-शिट्ट्या-टाळ्या मिळवतात. हे यश महेश मांजरेकर (कथा), अभिजित देशपांडे (पटकथा), संजय पवार (संवाद) आणि दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं.
भव्य सादरीकरण आणि उच्च तंत्रज्ञानाच्या वापरातून पहिल्या दृश्‍यातून चित्रपट प्रेक्षकांची पकड घेतो आणि शेवटपर्यंत ती कायम राहते. शिवरायांचे कर्तृत्व पार पडल्यानंतर चित्रपट सरधोपट होणार की काय, असं वाटत असतानाच पुन्हा रुळावर येतो.
एवढं असलं, तरी कथा-पटकथा काही बाबतीत भाबडी आहे. लाचेच्या पैशावरच पोसलेला महापालिका अधिकारी एका भाषणात बदलतो, एका भ्रष्ट मंत्र्याला काढल्यावर अख्खं सरकार "पवित्र' होतं, सराईत गुंडालाही एका भाषणात जिंकता येतं, हे पटत नाही. मात्र, या ढोबळ चुका चित्रपटाच्या एकूण परिणामाच्या दृष्टीनं चटकन झाकून जाणाऱ्या. नायकाचं शेवटचं भाषणही कुण्या स्वाभिमानी राजकीय नेत्याच्या "मनातलं स्क्रिप्ट' आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे. एक कोटी रुपये खर्चून केलेला पोवाडाही प्रभावी आहे. मात्र, प्रत्यक्ष अफजलखान वधाच्या तयारीचा परिणाम काहीसा उणा.
इथे नायकाला "मी मराठी असल्याचा गर्व आहे,' असा उल्लेखही येतो. मराठीत त्याला "अभिमान' म्हणतात. "गर्व' नव्हे. "नजर "मिळवायला' लाज वाटते काय,' असे हिंदीप्रचुर संवादही खड्यासारखे टोचतात.
सचिन खेडेकर यांच्या वकुबाला, क्षमतेला साजेशी सखोल भूमिका साकारण्याची अपवादात्मक संधी मिळाली आहे. ते अख्खा चित्रपट व्यापून राहतात. शिवरायांवरील प्रसंग मर्यादित असल्याने महेश मांजरेकरांनी ती भूमिका साकारण्यातल्या उणिवा लपून जातात. सुचित्रा बांदेकरची मध्यमवर्गीय गृहिणी झोकदार. अभिजित केळकर, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे सरस.
"मी शिवाजीराजे...'नं इतर विषयांसह सादरीकरणाच्या बाबतीतही मराठी चित्रपटाची आणि माणसाची मान उंचावली आहे, हे निश्‍चित!

मराठमोळा's picture

6 Apr 2009 - 5:43 pm | मराठमोळा

तुम्ही सकाळ मधे लिहिले होते तेव्हाच वाचले होते हे समीक्षण.
छान आहे. आवडले.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु's picture

6 Apr 2009 - 10:01 pm | प्राजु

मस्त लिहिलं आहेस परिक्षण.
हा चित्रपट मिळवून बघेनच... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टायबेरीअस's picture

6 Apr 2009 - 10:51 pm | टायबेरीअस

भालजी, वी. शांताराम आणि राजा परांजपे गेले आणि माझ्या दृष्टीने 'प्रबोधन' चित्रपट संपले. आता शिवाजी च्या नावाने उरलाय फक्त धंदा.. दाऊद च्या माणसाचे लांगुल्चालन करताना 'शिवरायाना' मी ऐकले आहे ध्वनीफितीत.. .. बाकी यांच्याकडून प्रेरणा घ्यायची म्हणजे तळीरामाने शाळेत 'दारुस स्पर्श नका करू.' शिकवण्यासारखे आहे.. असो.. पर्सनल मत आहे.. !

शैलेन्द्र's picture

7 Apr 2009 - 10:23 am | शैलेन्द्र

कोणत्याही मार्गाने आधी मोठ व्हायचं, कंपुमधे शिरायच, मग स्वताचा कंपु तयार करयचा... हल्ली यशस्वी व्हायचा हा मंत्र आहे... मराठी सिनेमातला हा पडेल नट आज बराच मोठा झालाय..

दाउदच लांगुलचालन आणि औरंगजेबाची मदत मागणे यात गुणात्मक फरक किती?

मराठी_माणूस's picture

7 Apr 2009 - 7:46 am | मराठी_माणूस

...उरलाय फक्त धंदा..

हे बाकी खरे

मिसंदीप's picture

7 Apr 2009 - 12:09 pm | मिसंदीप

अतिशय उत्तम परिक्षण...

मुळात ह्या चित्रपटाने नेमकी वेळ साधली आहे. बाकी सर्व बाबी अभिजितनी मांडल्या आहेतच...
पण.. महेश मांजरेकरने निर्माता म्हणुन अगदी जेव्हा हवे तेव्हाच हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.
निवडणुका तोंडावर येउन ठेपल्या आहेत.परप्रांतीयाचे वाढते लोंढे व मराठी माणसाची कुचंबणा हे मुद्दे धरुन काही राजकीय पक्ष आमले मत मांडण्याचा प्रयत्न करत असतानाच, ह्या चित्रपटामुळे त्यांची आयती सोय झाली आहे.

निखिल देशपांडे's picture

7 Apr 2009 - 12:12 pm | निखिल देशपांडे

ह्या चित्रपटामुळे त्यांची आयती सोय झाली आहे.
आप्ण चित्रपट पाहिला आहे का??? चित्रपट पाहील्यावर असे वाटत नाही

मिसंदीप's picture

7 Apr 2009 - 2:06 pm | मिसंदीप

अर्थातच.. त्या शिवाय अभिजित ने लिहिलेल्या परिक्षणावर भाष्य केले नसते. :)
या चित्रपटातील नायकाचे आपण मतदान का करायला हवे यावरील भाषण ओढुनताणुन चित्रपटामध्ये घातल्यासारखे वाटते.

कर्वे,फुले यासारख्या महान लोकांबरोबर आजच्या पिढितल्या काही लोकांच्या शिक्षण संस्थांचा पण प्रचार या चित्रपटातुन केला आहे ते देखील खटकते.

सनविवि's picture

9 Apr 2009 - 11:59 am | सनविवि

कालच पाहिला मी हा चित्रपट. अजूनही houseful चालू आहे!

मला मनापासून आवडला. मराठी लोकांना कोणी किंमत देत नाही म्हणून उगीच रडत बसण्यापेक्षा स्वत:ही काही तरी करून दाखवायला प्रव्रुत्त करतॊ. सगळ्यांचा अभिनय झक्कास. अफझलखानाच्या वधाचा प्रसंग फारच सुरेख दाखवला आहे. बघताना अंगावर काटा येतो! Technically पण खूपच चांगला आहे.

हं आता थोडया त्रुटी जरूर आहेत पण सिनेमा म्हणून तेवढी सूट द्यायला हरकत नाही. चित्रपटाचा संदेश लक्षात घ्या म्हणजे झालं!