मदत हवीये

रम्या's picture
रम्या in काथ्याकूट
26 Feb 2009 - 1:01 pm
गाभा: 

मंडळी काही प्रश्न आहेत.

मागच्याच वर्षी घेतलेल्या घराच्या दुरुस्तीचं काम काढलं आहे. दुरूस्तीच्या वेळेस घराची एक खिडकी साधारणशी मोठी केली आहे आणि याला सोसायटीचा विरोध आहे. सोसायटी खिडकीचे अर्धवट बांधकाम पुन्हा तोडून खिडकी पुन्हा लहान करावी म्हणून सोसायटीच्या सभासदांनी कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले.

या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. कोणताही नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत लिखित स्वरूपात मंजूर झाला असेल आणि असा नियम एखाद्याने मोडला तर सोसायटी अशा वेळी काय कायदेशीर कारवाई करू शकते?
२. असा नियम फक्त तोंडी असेल आणी नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत मंजूर झाला नसेल तर सोसायटीने अशा वेळी केलेली कारवाई बेकायदा आहे का? कोणत्या वेगळ्या नियमानुसार सोसायटी बांधकाम पुन्हा तोडू शकते?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

26 Feb 2009 - 1:28 pm | सखाराम_गटणे™

१. कोणताही नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत लिखित स्वरूपात मंजूर झाला असेल आणि असा नियम एखाद्याने मोडला तर सोसायटी अशा वेळी काय कायदेशीर कारवाई करू शकते?
>>हो
२. असा नियम फक्त तोंडी असेल आणी नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत मंजूर झाला नसेल तर सोसायटीने अशा वेळी केलेली कारवाई बेकायदा आहे का? कोणत्या वेगळ्या नियमानुसार सोसायटी बांधकाम पुन्हा तोडू शकते?
>>नाही.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

घराच्या बांधकामाच्या रचनेत कोणताही बदल करावयाचा असल्यास त्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते
जे काही करायचे ते सोसायटीच्या परवानगीने करा...

घराच्या आत तुम्ही हवा तो धुमाकुळ घालू शकता :)

त्याआधी महापालिकेची परवानगी घ्या !

नरेश_'s picture

26 Feb 2009 - 1:38 pm | नरेश_

सकाळ पेपरात ' सुरक्षित माझे घर ' या सदरात Advocate महाबळेश्वर मोरजे अशा प्रश्नांची उत्तरे देतात.
खाली त्यांचा फोन नं. असतो. तेव्हा कामाला लागा.

प्रश्न दातांच्या खिडकीबद्दल असता तर थोडीफार मदत करता असती !

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

ब्रिटिश's picture

26 Feb 2009 - 1:44 pm | ब्रिटिश

सोसायटीवाल्यांना फाट्याव मारून काम करुन झ्या. आवाज चडवा. आवाज नाय केला त मांजर बी आंगाव येतय. क बोल्तो दादूस ?

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

रम्या's picture

26 Feb 2009 - 2:36 pm | रम्या

घर सिडकोचं आहे (नवी मुंबई). वास्तविक घराचं काम सुरू करण्याआगोदर सोसायटीमधील एका पदाधिकार्‍याशी या संदर्भात बोललो होतो. सोसायटी आणि सिडकोची अशी दोन्हींची परवानगी घ्यावी लागते का अशी चौकशी केली होती. त्यावेळेस सिडकोची परवानगी घ्यायची गरज नाही आणि खिडकी मोठी करू शकता असं तोंडी उत्तर मिळालं होतं. त्यासाठी सोसायटीची परवानगी नाही पण एक काम सुरू असल्याची माहीती म्हणून एक पत्र द्या असं पदाधिकार्‍याने सांगितलं. शिवाय इमारतीमधील माझ्याव्यतिरिक्त इतर काही सभासदांनी सुद्धा अशा प्रकारचं काम केलेलं आहे. त्यामुळे वरकरणी फारच क्षुल्लक बाब वाटते. हाच पदाधिकारी आता "खिडकी एवढी मोठी करणार हे माहीत नव्हतं" असं गुळमुळीत उत्तर देत आहे.
सोसायटीमधील इतर काही खिडक्या मोठ्या केल्याचे निदर्शनास आणून दिले असता, त्यावेळी आम्ही सोयसायटी मध्ये नव्हतो आणि त्या कामाबद्दल काही माहीती नाही, त्याबद्दल काही बोलू नका, तुमच्या कामाबद्दल बोला असं ठोकळेबाज सरकारी उत्तर मिळालं.
मुळात खिडक्यांचं तोडकाम सुरू झाल्यानंतर आणि इतर सामानाचे पैसे देऊन ते तयार झाल्यानंतर सोसायटीचा आक्षेप सुरू झाला.
त्यामुळे हे माझ्याकडून पैसे काढून घेण्याचा तर काही प्रकार नाही ना अशी शंका येत आहे.

प्रश्न एकच सोसायटीला दमदाटी करून काम थांबवण्याचा अधिकार आहे का?
सगळ्यात वाईट परिस्थितीत सोसायटी माझ्यावर काय कारवाई करू शकते.
आम्ही येथे पडीक असतो!

प्रश्न एकच सोसायटीला दमदाटी करून काम थांबवण्याचा अधिकार आहे का?

कोणालाही दमदाटी करायचा अधिकार नाही

यासाठी तुम्ही ग्राहक कोर्टात जाऊ शकता... फक्त सिद्ध करता आले पाहिजे तुम्हाला एवढे बघा :)

किरण जोशी's picture

26 Feb 2009 - 2:50 pm | किरण जोशी

सोसायटीमध्ये राहता म्हटल्यावर त्यांचे नियम पाळलेच गेले पाहिजेत त्यामुळे तुम्ही सोसायटीला विश्वासात घेऊन हे काम करण्याची गरज होती . असो...
हवा, उजेड ही प्रत्येकाची गरज आहे. छोट्या खिडकीतून खरोखरीच हवा, उजेड कमी मिळत असेल तर सोसायटीने माणूसकीच्या दृष्टीने त्यांना परवानगी द्यावी.... म्हणजे वादही मिटेल आणि दोघांचेही समाधान होईल....