साहीत्यः
१ वाटि शेंगदाणे
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
कोथिंबीर
मीठ
क्रुती:
शेंगदाणे खरपुस भाजुन घ्यावेत (जाळु नये) त्यानंतर त्यांची साले हाताने चोळुन कढुन पाखडुन घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या भाजुन त्यात भाजलेले शेंगदाणे ३-४ पाकळ्या लसुण थोडी कोथिंबीर, मीठ आणि थोडे पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवुन घ्या. पाट्यावर वाटल्यास अति उत्तम.
चटणी तयार
हि चटणी खान्देशात उडीद आणी ज्वारी च्या भाकरी सोबत खातात.
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 3:20 pm | नरेन
आमच्याकडे सोलापुरात शेन्गाचि चटणी खुप फेमस आहे करण्याची पध्द्त पण वेगळी आहे
19 Feb 2009 - 4:42 pm | अनमिका
अशिच कोथिम्बिर चटनि करते फक्त शेन्गादने नहि टा़कायचे
19 Feb 2009 - 4:45 pm | त्रास
बाप्पा तुम्ही माझे बालपणीचे रम्य आणि सुखी दिवस ह्य्या चटणीच्या आठवणींने जागृत केलेत.
ती चटणी आणि ती भाकरी आजही मी जळगावला गेलो की मित्राच्या आईला आवर्जुन करायला सांगतो त्याशिवाय जळगाव गेल्याचे सुख मिळत नाही.
19 Feb 2009 - 7:06 pm | बाप्पा
त्रास भाउ अजुन बर्याच खान्देशी पाक्रु येनार आहेत....