tomato सूप

मानसी मनोजजोशी's picture
मानसी मनोजजोशी in पाककृती
26 Jan 2009 - 12:36 pm

मी मला माहित असलेली पद्धत इथे लिहित आहे . या पद्धतीनेहि सूप छान होते.try करुन बघावे.

१. ४/५ tomato चिरुन कुकरला वाफवावेत.
२. गार झाल्यावर मिक्सरला लावुन पेस्ट करावी.
३. पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेली पेस्ट मन्द Gas वर ठेवून चमच्याने मधुन मधुन हलवत रहावे .
४. उकळत असताना त्यात २/३ चमचे साखर , चविनुसार salt, चिमूट्भर लाल तिखट घालवे.
५. १ चमचा cornflour घेउन त्याची पेस्ट बनवून त्यात घालावी व एकजीव करावे.
६. दाट झाल्यावर Gas बन्द करावा.
७.serve करताना फ्रेश क्रिम व तळलेले ब्रेडचे तुकडेघालुन serve करावे .

{tomato बरोबर थोडे गाजर व बीट घालूनही हे सूप छान लगते.}

»

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Jan 2009 - 12:41 pm | दशानन

छान !
उपयोगी आहे कधीच काही करायला काही नसले तर करुन पाहीन हा प्रयोग.

* बाकी पाककृती लेखकांना विनंती.. एक सुचना लिहीत चला.. की जो करुन पाहील व खाईल तोच सर्वस्वी जिम्मेदार.

****
ओ ताई / माई / काकु / बाई / अक्का ,
पण इग्रजी मराठीची भेसळ का ?
काय तुम्हाल salt ला मीठ म्हणात हे माहीत नाही ?
Gas .. गॅस असा पण लिहला जाऊ शकतोच की !

बरं तुम्हाला मराठी लिहता येत नाही हे समजावे तर तुम्ही मराठी छानच लिहले आहे की !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

अवलिया's picture

26 Jan 2009 - 2:11 pm | अवलिया

कटंम पेस्टंम करोतु देखम असेल
सोपे सोपे मराठीत केले
टमाटा की टामट याचा निर्णय न झाल्याने सोडुन दिले

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

अवलिया's picture

26 Jan 2009 - 2:12 pm | अवलिया

अरे हो... पाकृ छान आहे. करुन पहातो आणि सांगतो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

गौरिसन्जय's picture

26 Jan 2009 - 10:28 pm | गौरिसन्जय

छानच आहे. करायला सोपी आणि चवीला पन छान!

मी करुन बघितले... सुप....मस्त ! मानसी....मस्त!!

शुभान्गी's picture

26 Jan 2009 - 11:17 pm | शुभान्गी

४/५ tomato चिरुन कुकरला वाफवावेत.

कुकरला कसे वाफवायचे हो??????