संक्रात/रथसप्तमी करिता तिळा-साखरेच्या वड्या.
साहित्य:
एक वाटी साखर, एक मोठा चमचा तीळ, एक चमचा तुप, वेलचीपुड इ.
कृती :
एकीकडे तिळ हलके भाजुन घ्या, नॉनस्टिक पॅनमधे साखर घालून मंद आचेवर पाक होईपर्यंत सतत ढवळत रहा (पाणी न घालता) तयार पाकात भाजलेले तिळ, वेलचीपुड आणि तुप घाला. तयार मिश्रण लगेच तुप लावलेल्या थाळ्यात किंवा पोळपाटावर ओता. मिश्रण थंड होण्यापुर्वी वड्या पाडा.
तिळ आणि गुळाने उष्णता वाढते, गुळाला पर्याय म्हणुन साखरेच्या या वड्या छान लागतात.
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 9:38 am | अवलिया
फोटो?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Jan 2009 - 10:15 am | सुनील
पाकृ तशी सोपी आणि चांगली वाटतेय. पण खरं म्हणजे, तीळाबरोबर गुळाचा संबंध इतका जोडला गेलाय की, साखर पटत नाही. अर्थात करून पहायला हरकत नाही.
फोटोही टाकायचात की!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jan 2009 - 12:14 am | आर्य
अरे वा !
या वड्या पण मला फार आवडतात, नेहमीच्या खुसखुशीत तिळगुळ वड्यां बरोबर या कडक वड्या छान लागतात.
आपला
आर्य
20 Jan 2009 - 11:52 pm | पक्या
थंडीच्या दिवसात तिळ आणि गूळ हे कॉम्बिनेशन चांगले वाटते. साखर काय एरवीही वर्षभर आपण अनेक गोड पदार्थात वापरत असतो.
21 Jan 2009 - 12:14 am | अनामिक
याला आम्ही तिळाची चिक्की म्हणतो.
अनामिक