विवरण: हि पाकृ. खूप पौष्टिक आहे कारण कळण हे मटकी शिजवलेल्या पाण्या पासुन केले जाते आणि मटकी शिजवल्यावर त्यातिल सत्व पाण्यात राहते. विशेषतः लहान मुलांना हे पचण्यास हलके आहे.
साहित्य:
भिजवलेली मटकी पाव किलो
ओले खोबरे १/२ वाटी
ताक १/२ वाटी (ताक आंबट नसावे)
लसुण ४पाकळ्या
तुप १ चमचा
जिरे १/२ चमचा
हिंग १/४ चमचा
मिरचि १
कडिलिंब
मीठ ,साखर चविनुसार
कोथिंबीर
कृति:
भिजवलेली मटकी कुकर मध्ये शिजवुन घ्यावी
मटकीतील पाणी काढुन घ्यावे (उरलेल्या मटकीची उसळ /मिसळ करावी )
त्या पाण्यात ताक मिसळावे
नंतर त्यात खोबरे मिसळावे
मीठ ,साखर घालावे
नंतर त्यावर तुपाचि जिरे,हिंग, मिरचि,कडिलिंब,लसुण घालुन फोडणी करुन घालावी.
मग कणळ उकळावे. वरुन कोथिंबीर घालावी .
गरमा गरम प्यावे. अथवा भाता बरोबर खावे.
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 11:41 pm | प्रभाकर पेठकर
कळण हे भारतीय सुपच म्हणावे लागेल. मटकीचे कळण चवदार तर होईलच पण असेच कांहीसे मुगाचे, मसुराचेही करतात. तेही मस्त लागते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
14 Jan 2009 - 12:10 am | llपुण्याचे पेशवेll
कुळथाचेही कळण करतात कोकणात. L)
पुण्याचे पेशवे
Since 1984
13 Jan 2009 - 11:48 pm | वल्लरी
फारचं छान नि पौष्टिक आहे......
---वल्लरी
14 Jan 2009 - 12:05 am | प्राजु
बीट/लाल भोपळा... कुकरला शिजवून.. त्याचे पाणी घ्यायचे फक्त आणि वरील प्रमाणे ताक, फोडणी घालून तयार करायचे
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jan 2009 - 11:25 am | वृषाली
वाह! सुंदर कल्पना.अशा तर्हेने न आवडणार्या भाज्याही खाल्या जातील.
A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others.
14 Jan 2009 - 12:07 am | धनंजय
पौष्टिक आणि सोपे.
(प्राजु - ताक घालून भाज्यांच्या साराचीही कल्पना मस्त आहे.)
14 Jan 2009 - 12:33 am | समिधा
मी कुळथाचे पिठल करते.आता कळण करुन बघेन. प्राजु तुझी कल्पना ही आवडली.
14 Jan 2009 - 12:47 am | व्यंकु
कुळथाचं कळण खरंच अप्रतिम लागतं. आणि पोष्टीक तर असतंच.
आपला,
केवळ
कुळथाचं कळण खाणारा
(कोकणातला) व्यंकु
14 Jan 2009 - 12:23 pm | पर्नल नेने मराठे
तोन्दाला पानी सुतल्येय्.....राजापुरात चला...
चुचु
14 Jan 2009 - 2:26 pm | साक्षी
सहमत
14 Jan 2009 - 12:56 am | विसोबा खेचर
वा र लो..!
14 Jan 2009 - 1:46 am | पिवळा डांबिस
मी सुद्धा वा र लो!!!
=))
(स्वगतः काकूपासून दडवल्या पाहिजेत ह्या व्हेरियस कळणांच्या पाककृती!!!! तात्या, असा एखादा पेरेन्ट्रल कंन्ट्रोलप्रमाणेच "हजबंड्रल कंट्रोल" शोधून काढायला सांगा ना नीलकांताला!!!!)
14 Jan 2009 - 1:54 am | विसोबा खेचर
ओक्के बॉस! नील मला उद्याच भेटायला येणार आहे ठाण्यात. तेव्हा सांगेन! :)
14 Jan 2009 - 9:54 am | सहज
सही प्रकार आहे.
धन्यु
15 Jan 2009 - 6:29 am | चकली
कळणाची पाकृ मस्त!
मला कुळथाचे पिठले, कळण, उसळ! सगळच आवडते! कोकणात घरी भाजलेल्या पिठाचे पिठले कसले बेस्ट होते!
चकली
http://chakali.blogspot.com