मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.

रेझर रेमॉन's picture
रेझर रेमॉन in काथ्याकूट
10 Jan 2009 - 1:55 am
गाभा: 

सत्यम चा घोटाळा... ८५ % फ्री - फॉल.
सेन्सेक्स गोईंग स्टीपर डाऊन...
म्युच्युअल फंडस् किरकोळीत गेलेले...
मराठी माणसाचा टक्का बाजारात जरा कुठे दिसतोय न दिसतोय तोवर एक महाघोटाळा होतोच... मग आपण बाजारातून पळून जाणार का?
शेअर्स चे भाव गडगडतात हे आपलं लाडकं मत... धोका आहेच...
ब्लू चिप.. मेगा-जायंट कॉर्पोरेट अशी चालवली जाते तर विश्वास कुणावर ठेवायचा? असे धोके आपल्याला बाजारा पासून दूर नेतील का?
सत्यम् च्या धक्क्याचा तुमच्या आर्थिक धोरणावर बदल झाला का? आणि कसा?
नसल्यास का झाला नाही?
बिट कन्फ्युज बावत ऑल.
-रेझर

प्रतिक्रिया

चाचा चौधरी's picture

12 Jan 2009 - 12:27 pm | चाचा चौधरी

वर्मावर बोट ठेवलेत...पण असे धक्के हेच मराठी माणसासाठी शिकवणी ठरावेत!!!

स॑क्या's picture

12 Jan 2009 - 6:16 pm | स॑क्या

मोडेन पण वाकनार नाहि.....मारठि बाणा आहे ना......
"दिल ना उम्मिद हि सहि....ना काम हि तो है॑ !
लमब्बि है॑ गम कि शाम्...मगर शाम हि तो है॑ !!"

हि॑मत सोडायचि नहि...... परत बाग फुलेल.....फिर से चमन मे॑ बहार आयेगि !
परत मार्कट २१००० होणार्...........नाक्किच.........
(मराठि माणुस "senti" झाला कि हि॑दि फाड्तो :O) )

आमच्या ठाण्यात स्टॉक मार्केटचे धडे खास मराटी माणसांसाठी भरविले जातात
ज्यांना त्यात रस आहे त्यानी जरुर संपर्क करावा
मो. ह. विद्यालय
तलावपाळी जव ळ
ठाणे पष्चीम (वेस्ट)

मला वाट्ते बहुतेक शनीवार - र वीवार संध्या काळी
मला अधीक माहीती मीळाली की जरुर मि.पा. वर देईन ... स द्या मात्र एतकेच माहीत आहे .
~ वाहीदा

संजय अभ्यंकर's picture

12 Jan 2009 - 3:19 pm | संजय अभ्यंकर

माझ्या धोरणात बदल नाही झाला.

आय. टी. कंपन्यांपासून मी काही हात दूरच रहातो.
आय. टी. कंपन्यांच्या मालमत्ता काय असतात ह्याची कोणाला कल्पना आहे काय?
मी सहसा मालमत्ता धारक व उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांत पैसे गुंतवतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

आय टी कंपन्यांची मुख्य मालमत्ता म्हणजे हातात असलेले विदेशी क्लायंट्स , त्यांना देण्यात येणारी उत्कृष्ट दर्जाची सेवा आणि त्यांच्यापासून मिळणारे डॉलर्स मधे उत्पन्न.
सत्यमच्या हातात असे खूप क्लायंट्स आहेत. तेव्हा माझ्यामते तरी सत्यम लवकरच पुन्हा गेलेली पत मिळवण्यात यशस्वी होईन. त्याकरिता सरकारने उचललेले पाऊल अतिशय योग्य आहे. कर्णिक, पारिख आणि अच्युतन हे तीन दिग्गज सत्यमला या संकटातून नक्की बाहेर काढतील याचा विश्वास आहे.

वास्तविक अमेरिकेत सत्यमच्या या घोटाळ्याला गुंतवणुकदार आता आपण बुडालो या नजरेने घेत नाहियेत. अशा गोष्टी धंद्यात होतच राहतात. अमेरिकेत याहीपेक्षा मोठ्या गोष्टी झालेल्या कंपन्या त्यांचा धंदा टिकवून आहेत.