माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर
साहित्य :
कोळंबी (श्रिंप/प्रॉन्स) अर्धा किलो
चवी पुरते मीठ
लाल तिखट १ चमचा
हळद चिमुटभर
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट
अर्धी वाटी रवा
१ लिंबु
अर्धी वाटी तेल / तेलाचा (पॅम) स्प्रे
कृती :
प्रथम कोळंबी व्यवस्थीत साफ करुन त्यावर लिंबु पिळावे. कोळंबी साफ केल्यावर त्यातील पाणी निघाले आहे ना ह्याची खात्री करावी. त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट हिरवी पेस्ट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे. त्यानंतर एक मोठा तवा तापल्यावर एक एक कोळंबी रव्यात घोळुन त्यावर अलगद ठेवावी. कोळंबीच्या बाजुने चमच्याने हळू तेल सोडावे किंवा तेलाचा स्प्रे असल्यास तो वापरावा. तव्यावर मावतील तितकी कोळंबी ठेवावीत. दोन कोळंब्यांच्या मध्ये थोडे अंतर सोडावे जास्त गर्दी करु नये. एका बाजुने खरपुस भाजुन झाल्यावर चिमट्याने दुसरी बाजु पलटवी. जरुर असल्यास आणखी तेल सोडावे. तवा मध्यम आचेवरच ठेवावा त्यामुळे कुरकुरीत बनते. दोन्हीकडुन भाजुन झाल्यावर डिश मध्ये काढुन वरुन कोथिंबीर टाकुन सजवावी.
अधिक टिपा : आवडत्या पेया बरोबर आवडत्या स्त्री सोबत आणि आवडत्या कोळीणीकडुन आणल्यास ही कोळंबी गरमा गरम अप्रतिम लागतात. :)
फॅटफ्री तेलाचा स्प्रे वापरल्यास पौष्टीक आणि चवीष्ट पाककृती बनते
प्रतिक्रिया
7 Jan 2009 - 8:48 am | घाटावरचे भट
मस्त!!!
7 Jan 2009 - 9:05 am | अवलिया
सहमत
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
7 Jan 2009 - 9:46 am | वल्लरी
सहमत
---वल्लरी
7 Jan 2009 - 8:50 am | विसोबा खेचर
अधिक टिपा : आवडत्या पेया बरोबर ही कोळंबी गरमा गरम वाढल्यास अप्रतिम लागतात.
खल्लास..!
साला आज बुधवार आहे! आज सायंकाळी आवडत्या स्त्रीच्या घरी मद्य पिण्यास जाईन तेव्हा जातांना कोलंब्या घेऊनच जाईन आणि तिला बनवायला सांगेन..:)
आणि "दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिये.." हे गाणं ऐकता ऐकता जीवनातल्या अंमळ दोन घटका सुखाने घालवीन! :)
आपला,
(जॅक डॅनियल्स व प्रॉन्स प्रेमी) तात्या.
7 Jan 2009 - 9:03 am | विसोबा खेचर
आवडत्या पेया बरोबर आवडत्या स्त्री सोबत आणि आवडत्या कोळीणीकडुन आणल्यास ही कोळंबी गरमा गरम अप्रतिम लागतात.
संपादन आवडले! :)
आपला,
(साधना कोळणीचा लाडका!) तात्या तांडेल.
7 Jan 2009 - 9:30 am | लवंगी
आपले आभार.. आज काय करावं जेवायला हा पेच सोडवला. पांथस्तांच्या कोलंबी खिचडीसोबत कुरकुरीत तवा फ्राय कोलंबी चा बेत आज रात्री. चला नवरोबा देखील तुम्हाला दुवा देणार आज.
7 Jan 2009 - 9:31 am | लवंगी
आपले आभार.. आज काय करावं जेवायला हा पेच सोडवला. पांथस्तांच्या कोलंबी खिचडीसोबत कुरकुरीत तवा फ्राय कोलंबी चा बेत आज रात्री. चला नवरोबा देखील तुम्हाला दुवा देणार आज.
7 Jan 2009 - 9:26 am | भाग्यश्री
वा हे नक्की करून पाहणार!
सहीये चित्र तर..
http://bhagyashreee.blogspot.com/
7 Jan 2009 - 9:35 am | सुनील
मस्त पाकृ.
आवडत्या पेया बरोबर आवडत्या स्त्री सोबत आणि आवडत्या कोळीणीकडुन आणल्यास ही कोळंबी गरमा गरम अप्रतिम लागतात
हम्म. आवडते पेय आणि स्त्री हे ठीक. कोळणीबद्दल आपला काही प्रेफरन्स नाही बॉ! (प्रॉन्स से हम को मतलब, कोळीण से क्या लेना?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Jan 2009 - 3:44 pm | प्रभाकर पेठकर
वा! वा! वा! फाइनेस्ट स्कॉचचे दोन पेग, चरचरीत तळलेली चटपटीत कोलंबी, बाकी आपापल्या प्रकृतीला झेपेल असे वातावरण असल्यावर आणखीन काय हवे? 'स्वर्ग..स्वर्ग म्हणतात तो हाच...'.
7 Jan 2009 - 5:18 pm | विसोबा खेचर
बाकी आपापल्या प्रकृतीला झेपेल असे वातावरण
हा हा हा! :)
(स्वगत : हा प्रभाकर काही सुधरायचा नाही. बदनाम मात्र एकटा तात्या होतो..!) :)
7 Jan 2009 - 5:22 pm | प्रभाकर पेठकर
'जो जे वांछिल तो ते लाहो (कि लाभो?) प्राणिजात...'
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
7 Jan 2009 - 8:30 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो पेठकर काका ते समर्थांचे नाही ज्ञानेश्वमाऊलींचे बोल आहेत. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
7 Jan 2009 - 11:19 pm | प्रभाकर पेठकर
माफी मागतो. चूक झाली.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
7 Jan 2009 - 5:24 pm | लिखाळ
चित्रातली प्रकाश योजना आणि रंगसंगती फारच मस्त आहे.
मी मासे खायचो त्या काळी कोळंबी मला सर्वांत जास्त आवडायची. :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
7 Jan 2009 - 8:54 pm | संदीप चित्रे
>> मी मासे खायचो त्या काळी
लिखाळ मित्रा.... काही गोष्टींना भूतकाळ नसावा रे ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
7 Jan 2009 - 9:47 pm | लिखाळ
कालाय तस्मै नमः ।
-- लिखाळ.
7 Jan 2009 - 8:27 pm | प्राजु
कोलबेर पंत, ही कोलंबी साफ करायची म्हणजे नक्की कशी करायची? मी आज पर्यंत या प्रकाराला हातही नाही लावलेला. म्हणून विचारते आहे.
त्यात इतर फिश सारखे काटे असतात का?
पाकृ मस्त दिसते आहे. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jan 2009 - 8:53 pm | संदीप चित्रे
कोलंबीला अजिबात काटे नसतात !!!
एकदा घरी फोन कर... कोलंबी साफ कशी करायची ते माझी बायकोच काय मीही सांगू शकेन ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
7 Jan 2009 - 8:57 pm | प्राजु
एकदा घरी फोन कर... कोलंबी साफ कशी करायची ते माझी बायकोच काय मीही सांगू शकेन
या पेक्षा...
माझ्या घरी ये... अगदी अश्शीच कोलंबी फ्राय खायला घालतो असं म्हण ना. :D
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jan 2009 - 9:44 pm | पांथस्थ
कोळंबी साफ करायची पध्द्तः
* कोळंबीचे शेल डोक्यासकट काढुन टाकणे
* कोळंबीच्या पोटात एक धागा असतो तो काढुन टाकणे
* कोळंबी कॉकटेल(स्टार्टर चा एक प्रकार), इतर स्टार्टर्स (विशेषता पेयांसोबत खाण्यासाठि) करायची असेल तर शेपटि ठेवावी अथवा काढुन टाकावी
कालच अर्धा किलो कोळंबी साफ केली! इथे साफ कोळंबीचे फोटू बघा.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
7 Jan 2009 - 9:54 pm | सुनील
बंगाली लोकं कोळंबीचे डोकेदेखिल खातात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Jan 2009 - 10:00 pm | पांथस्थ
ह्या डोक्यांची आमटि छान होते (किंवा फिश स्टॉक करायला वापर करता येतो)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
7 Jan 2009 - 10:00 pm | लिखाळ
चार बंगाली एकत्र आले की ते बंगाली नसलेल्याचेही डोके खातात ;) (बंगाल्यांनी आणि त्यांच्या डोके शिल्लक राहिलेल्या मित्रांनी ह.घ्या.)
--(अनुभवी) लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
7 Jan 2009 - 10:21 pm | पांथस्थ
सहमत. एकदम कलकल करतात. चॉलबे - नॉचॉलबे करत बसतात.
स्वातंत्र्य आणि थोडा स्वातंत्रपुर्व काळ सोडला तर आता बंगालची रया गेली आहे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
7 Jan 2009 - 8:57 pm | संदीप चित्रे
भरून राहिलाय.... सकाळी गाडीत संजीव अभ्यंकरांची 'मेघ' ही नितांतसुंदर सीडी ऐकलीये... आणि आता हा फोटो !!!
( बायकोने संध्याकाळी अशी कोलंबी केली तर बहारच होईल !!)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
8 Jan 2009 - 1:45 am | घाटावरचे भट
'मेघ' मधला अहिर भैरव विशेष छान आहे. आणि मेघ रागातली चीज अभ्यंकरांनी स्वतः बांधलेली आहे म्हणतात.
8 Jan 2009 - 2:38 am | संदीप चित्रे
मलाही खूप आवडतो : ... 'मेघ' रागातल्या चीजेच्या माहितीबद्दल धन्यवाद
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
8 Jan 2009 - 5:04 am | आजानुकर्ण
छळू नका मज गडे
लाळ तोंडातून पडे
अशी झकास पाककृती आणि चित्रे देऊन त्रास देऊ नका बुवा. डोळ्याला त्रास आणि पोटाला उपास अशी गत होत आहे.
आपला
(अतृप्त) आजानुकर्ण