मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चटपटीत तवा फ्राईड कोळंबी

कोलबेर · · पाककृती
माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर साहित्य : कोळंबी (श्रिंप/प्रॉन्स) अर्धा किलो चवी पुरते मीठ लाल तिखट १ चमचा हळद चिमुटभर आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट अर्धी वाटी रवा १ लिंबु अर्धी वाटी तेल / तेलाचा (पॅम) स्प्रे कृती : प्रथम कोळंबी व्यवस्थीत साफ करुन त्यावर लिंबु पिळावे. कोळंबी साफ केल्यावर त्यातील पाणी निघाले आहे ना ह्याची खात्री करावी. त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट हिरवी पेस्ट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे. त्यानंतर एक मोठा तवा तापल्यावर एक एक कोळंबी रव्यात घोळुन त्यावर अलगद ठेवावी. कोळंबीच्या बाजुने चमच्याने हळू तेल सोडावे किंवा तेलाचा स्प्रे असल्यास तो वापरावा. तव्यावर मावतील तितकी कोळंबी ठेवावीत. दोन कोळंब्यांच्या मध्ये थोडे अंतर सोडावे जास्त गर्दी करु नये. एका बाजुने खरपुस भाजुन झाल्यावर चिमट्याने दुसरी बाजु पलटवी. जरुर असल्यास आणखी तेल सोडावे. तवा मध्यम आचेवरच ठेवावा त्यामुळे कुरकुरीत बनते. दोन्हीकडुन भाजुन झाल्यावर डिश मध्ये काढुन वरुन कोथिंबीर टाकुन सजवावी. अधिक टिपा : आवडत्या पेया बरोबर आवडत्या स्त्री सोबत आणि आवडत्या कोळीणीकडुन आणल्यास ही कोळंबी गरमा गरम अप्रतिम लागतात. :) फॅटफ्री तेलाचा स्प्रे वापरल्यास पौष्टीक आणि चवीष्ट पाककृती बनते

वाचन 14980 प्रतिक्रिया 0