आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे
जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे ||
उंच पर्वत, खोल दरी
हळू जोरात वाहणारी नदी
हे म्हणती, मानवा शिका रे
जितके श्रम तिथेच यश सारे ||
पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक
ते शिकवती, आयुष्य बिकट
चिकाटीने पुढती जाता
होते सगळे सरळ सुलभ ||
हे सगळे मनुष्याचे गुरू
जन्मास येता होई शिक्षण सुरू
बालक असो वा वृद्ध जर्जर
शिकणे त्याचे न संपते खरेतर ||
त्या शिक्षणा देती मूर्त आकार
ते आपले गुरू साकार ||
अ पासून शिकवता बाराखडी
कधी वापरावी लागते छडी ||
तसेच शिकता जीवन कळते
तेव्हा उमगते परी नंतर वळते ||
मोठे झाल्यावर कळतो तो पाढा
तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा ||
कधीही न विसरू अश्या गुरूंना
चला आज करूया मानाने वंदना ||
प्रतिक्रिया
20 Jul 2025 - 9:55 am | प्रसाद गोडबोले
वंदना नको, पण कविता आवर =))))