पावसाळी भटकंती - खोपोली

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
27 Jun 2025 - 6:19 pm

पावसाळी भटकंती - खोपोली.
पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला, सगळा परिसर हिरवा होतो, झरे धावू लागतात आणि आपली सॅक भरण्याची गडबड सुरू होते.
खोपोली हे गाव खंडाळा घाटाच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पावसाळा सुरू झाला की डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसू लागतात. मुंबई लोकल ट्रेनस दर दोन तासांनी खोपोलीला येतात. तिकिट फक्त वीस रुपये. दोन तासांच्या प्रवासानंतर निसर्गात. तर इकडे
१. KP waterfall.
२. झेनिथ धबधबा.इथल्या झेनिथ कंपनीने काही सोयी पुरवल्या होत्या म्हणून ते नाव पडले.
३.याच्या उजवीकडे आणखी एक धबधबा,
४. टाटा पावर ही बारमाही वाहणारी नदी व त्यात आणखी एक धबधबा मिसळून जोरदार प्रवाह वाहतो. याच्याच काठावर गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.
कसे जावे
खोपोली रेल्वे स्टेशन - गगनगिरी मठ- टाटा पावर नदी- झेनिथ - खोपोली स्टेशन असा पाच किलोमीटरचा फेरा आहे. सहज शक्य आहे. किंवा स्टेशनवर ओटोरिक्षा मिळतात.
जुना मुंबई पुणे रस्ता स्टेशनपासून एक किमी अंतरावर आहे. आपले वाहन असल्यास बरेच सोयीचे ठरेल.
केपी वॉटर फॉल हा मात्र तीनशे मिटर्स उंचीवर आहे. तिथेच मुंबई - पुणे लोहमार्गाच्या पूल आहे. ही सर्वात खास जागा आहे परंतू जोखमीची वाट आहे.( यूट्यूब विडिओ पाहा.)
इतर माहितीसाठी
1. https://youtu.be/_3PJfsA8Iyo?si=TNgkm1x72cBnVjta
2. https://youtu.be/v1IxdVdelyI?si=dVd3tVQl5nT-g07S
3. https://youtu.be/rhOlaj8YCpM?si=2hFzELzg-fqVHJQF
4. https://youtu.be/Ej4UYMvPM2M?si=ZKOh_nxRCRICI7G3
खावे कुठे ... स्टेशन रोडला बरीच हॉटेल्स आहेत. वडा-उसळ इथला लोकप्रिय नाश्ता.

मी केपीफॉलसोडून बाकीच्या ठिकाणी फिरलो. आदल्या रात्री डोंगरात बराच पाऊस पडल्याने झेनिथने रौद्र रूप घेतले होते. थोडा दुरूनच पाहावा लागला. तरी काही उत्साही मुले त्याखाली भिजत होती. टाटा पावरचे पाणीही धोकादायक वेगात होते. काठावरूनच पाहिले.
मागील तीन वर्षे पोलिसांनी झेनिथकडे जाऊ दिले नव्हते. कृष्णा वॅलीपाशीच अडवत होते.( भूशी डॅम अपघातामुळे अधिकच सावध झाले होते) पण त्या दिवशी पोलिसांनीच सांगितले "या वाटेने जा!"
झेनिथ धबधबा, खोपोली 2025_06_24
https://youtu.be/DdF3V_do3jc?si=WCozHAWmSVorj3hW

Tata power
https://youtube.com/shorts/dQzYIvaoLOU?si=PL-9PrZ-2IB8dy_K

धबधब्याकडे जाताना
https://youtube.com/shorts/zzTYKtwzRZc?si=AKlbZyjNULT1boUC
वाटेवरचा झरा
https://youtu.be/XMNMDIOdtIM?si=IHtFzAshF4wXTFZD
___________________________

खोपोली स्टेशनहून मठाकडे निघालो की ...
फोटो १
धबधबे खुणावतात.

फोटो २
खोपोली स्टेशनकडून आपण झेनीथ धबधब्याकडे चालू लागतो तेव्हा घाटातले डोंगर असे दिसतात.

फोटो ३
वाटेतला सुंदर झरा

फोटो ४
आता तिकडे इमारती संकुले वाढत आहेत. हे संकूल आहे कृष्णा वॅली प्रोजेक्ट.

फोटो ५
झेनिथ धबधबा

फोटो ६
खोपोली स्टेशन ते मठ (१ किमी)

फोटो ७
गगनगिरी मठ ते झेनिथ धबधबा परत मठ आणि टाटा पावर रूट (४किमी)

या मोसमाची सुरुवात तर चांगली झाली.

प्रतिक्रिया

सुंदर भटकंती सुंदर फोटोज्
विशेषतः झरा फारा आवडला

रानझरा ओळखीचा तहानेची बोली
कात टाकलेला साप पाचोळ्याच्या खाली
आठवली

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2025 - 8:19 pm | कर्नलतपस्वी

बघा,प्रेक्षणीयच.

फोटो नंबर एक,असे वाटत आहे की कुणी साधू महाराज गळ्यात स्फटिकाच्या माळा घालून सुखासना मधे साधनेला बसले आहेत.

मस्तच.

Bhakti's picture

27 Jun 2025 - 9:52 pm | Bhakti

सुंदरच आहे.फोटो १ ... निसर्गाची लय मोहक!!

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 3:56 pm | श्वेता व्यास

+१

प्रचेतस's picture

29 Jun 2025 - 6:35 am | प्रचेतस

मस्त भटकंती. जावे कसे, यावे कसे याचे तपशीलवार वर्णन आवडले. केपीला जाणे अडचणीचेच आहे.

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2025 - 2:57 pm | चौथा कोनाडा

अ ति शय सुंदर भटकंती ... प्रचि सुद्धा प्रचंड भुऱळ घालणारे ... सोबतीला माहितीपुर्ण व्हिडिओ.
एक नंबर, कंजू सर !

गोरगावलेकर's picture

1 Jul 2025 - 1:07 pm | गोरगावलेकर

फोटोही आवडले. बऱ्याचवेळा दूरवरचे फिरणे होते पण जवळची ठिकाणे राहून जातात .

विअर्ड विक्स's picture

2 Jul 2025 - 12:56 pm | विअर्ड विक्स

मस्त भटकंती. प्रकाशचित्रे मस्त . स्वस्तात मस्त भटकंती ... तरी यावेळी खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले का ? वारंवारता कमी आहे त्यामुळे टाकले तर बरे होईल. कर्जतहून खोपोलीला जाण्याचा काही इतर पर्याय असल्यास पण कळवा ....

>> खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले>>
मुंबईतील पर्यटकच इथे अधिक जातात आणि त्या सर्वांना m indicator app माहीत असते त्यामुळे त्या वेळापत्रकाची देण्याची गरज वाटली नाही. किंवा पनवेल ते खोपोली रस्ता आहेच.

सिंहगड कर्जत ला 8:05 ला आल्यास 8:36 ची खोपोली ट्रेन आहे. UTS APP ने तिकिट काढता येईल.
प्रगती एक्सप्रेस साठी (९:१८) ०९:४०ची खोपोली आहे.

A.पण पुण्याहून( रेल्वेने )येणारे असतील तर त्यासाठी देतो. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या आहेत तसेच लोकल ट्रेनसही आहेत त्याने लोणावळ्याला येता येते. लोणावळ्याला बाहेर पडून एसटीबस डेपोकडे जाताना अगोदरच डावीकडे एका गल्लीत " लोणावळा ते खोपोली" जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या बसेस उभ्या असतात. ( विचारा, सापडेल) साधारणपणे अर्धा ते एक तासाने बस असतात. त्यात बसून शेवटच्या खोपोली डेपोत उतरावे. येथून पाचशे मिटर्सवर खोपोली रेल्वे स्टेशन आहे. तिथे वेगवेगळे ओटो रिक्षा स्टँड आहेत.
१.खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज मठ ( एक किलोमीटर) १५/प्रती सीट
२.खोपोली रेल्वे स्टेशन ते झेनिथ वाटरफालसाठी /KP WATERFALLS नाका दत्तमंदिर आहे ( अंदाजे दोन किलोमिटर) २०रु/सीट आहे.
३. गगनगिरी मठ ते दत्तमंदिर झेनिथ वाटरफालसाठी ४०/- सीट.

खोपोली ते कर्जत रस्त्याने कुणी जात नाही. लोकल ट्रेनच सोयीची आहे. वाटेत पळसधरी स्टेशनला उतरून तलाव, अक्कलकोट स्वामी मंदिर मठ आणि एक धबधबा आहे ते पाहता येईल. शिवाय सोनगिरी ट्रेकही आहे.
B. पुण्याहून वाहनाने रस्त्याने येणार असाल तर घाटातले "खोपोली डायवर्शन" पकडून खाली "खालापूर" नाक्या पर्यंत यावे. तिथून राईट टर्न घेऊन बाजार रस्त्याने खोपोली स्टेशन गाठता येईल.

शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते . शक्यतो टाळावे.
तिकडे तीन चार तास खूप होतात.

विअर्ड विक्स's picture

3 Jul 2025 - 10:47 am | विअर्ड विक्स

धन्यवाद. विचारणारच होतो कारण पळसदरी पुणे मुंबई प्रवासात पास होतांना दिसते पण तिथे असणारी प्रेक्षणीय स्थळांची माहिती नव्हती.

भाविकांसाठी पळसदरीच्या अक्कलकोट स्वामी मठात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला प्रसादाचे जेवण दुपारी असते. खोपोलीच्या गगनगिरी मठातही दुपारी अकरा ते दीड भोजन प्रसाद ( रु वीस फक्त) रोजच असतो. इथे मात्र विकांत नसला तरी दोनशे भाविक प्रसादाला असतात.

श्वेता व्यास's picture

3 Jul 2025 - 12:38 pm | श्वेता व्यास

एकदिवसीय भटकंतीसाठी चांगला पर्याय दिसतोय, माहितीसाठी धन्यवाद.

कंजूस's picture

3 Jul 2025 - 3:36 pm | कंजूस

आपल्या वाहनाने जर का माथेरानला जाणार असाल तर तिकडून हॉटेलातून सकाळी चेकाऊट केल्यावर भिवपुरी येथील धरण पाहता येईल. किंवा भिवपुरी फॉल्स ( पूर्वीचं नाव अशाणे धबधबा) पाहता येईल. कुटुंबासह जाण्यासाठी हा उत्तम आहे. तसेच पुढे खोपोलीला जाऊन झेनिथ धबधबा पाहता येईल. परतताना पुणे किंवा मुंबई महामार्ग आहेच. म्हणजे तो दिवसही मजेत जाईल.

श्वेता व्यास's picture

3 Jul 2025 - 5:10 pm | श्वेता व्यास

होय, आपल्या वाहनानेच प्रवासाचा बेत असतो, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा दिवसही सत्कारणी लागेल. यापैकी फक्त गगनगिरी मठ पाहिलेला आहे आधी. पावसाळा नसतानाही निसर्गरम्य परिसर असतो, आता तर तुमच्या प्रचिंप्रमाणे नक्कीच सुंदर दिसेल.

कंजूस's picture

3 Jul 2025 - 10:18 pm | कंजूस

गगनगिरी मठ

मठाच्या बाजूला टाटा पावरचे पाणी (पाताळगंगा नदी)

नूतन's picture

17 Jul 2025 - 2:50 am | नूतन

निसर्गरम्य ठिकाण आहे. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना म्हणजे 75/76 साली गेल्याचं आठवतंय. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे झेनिथ कंपनीची वसाहत होती. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक तिथे रहात होते. म्हणून मैत्रिणी मैत्रीणी गेलो होतो.

नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर आणि जाण्यासाठी योग्य आहे. स्टेशनपासून शेअर रिक्षा मिळतात.( ५०/- सीट). बाजारातून महावीर चौकातून रिक्षा घेतल्यास २०/- सीट आहे. हा चौक जवळच आहे. शनिवार रविवारी मात्र जाऊ नका.