गाभा:
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywoo...
प्रतिक्रिया
30 Apr 2025 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली
युद्ध व्हायची शक्यता वर्तवली जात असतानाही शेअर मार्किट स्थिर कसे? हा प्रश्न मला पडललाय!
30 Apr 2025 - 8:58 pm | मुक्त विहारि
भारतात इतके फितूर असताना कोण युद्धाच्या भानगडीत पडणार?
चार दोन जोरदार जीवघेणे ठोसे नक्कीच मारतील आणि ते पण मुके.... ह्या देशात फितूर भरपूर, त्यामुळे मुका मार देणेच योग्य.(IP Man तंत्र ज्ञान)
पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत जनतेला, युद्धाची सवय नाही.... त्यामुळे सगळ्या देशांच्या नेत्यांचा कल, गोरिला युद्धाकडेच आहे.
तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करा...
30 Apr 2025 - 9:20 pm | मुक्त विहारि
पलवाशा खान, ह्या पाकिस्तानी नेत्या म्हणतात की...२५ कोटी पाकिस्तानी जनता, आमच्या पाठीशी... थोडक्यात, पाकिस्तानी जनतेने हे मान्य केले आहे की पहलगाम हल्ला पाकिस्तानी सैन्याने केला... ह्याला एकजूट म्हणतात...
आणि आपलीच जनता इथे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देते....
युद्धाच्या झळा सोसायला तिथली जनता मानसिक रित्या तरी तयार आहे... आपली जनता, रात्रीचे दोन तास दिवे बंद केले तरी बोंबलत बसेल....
1 May 2025 - 8:46 am | मुक्त विहारि
अलीगढ़ में मुस्लिम स्कूली छात्र से पाकिस्तान झंडे पर ठुकवाई कील, सरेआम सड़क पर करवाई पेशाब
https://www.abplive.com/states/up-uk/aligarh-hindu-organization-forced-m...
----
जाता जाता..
पाकिस्तानी लोकसंख्या २५ कोटी आणि एकाने देखील "भारत जिंदाबाद' अशी घोषणा केली नाही.
आणि ह्या देशांत मात्र, "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा ऐकायला मिळतात..
---
असो,
आनंद आहे...
1 May 2025 - 9:09 am | मुक्त विहारि
युद्ध के डर से औंधे मुंह गिरा पाकिस्तान का शेयर बाजार; निवेशकों में मची अफरातफरी
https://www.jagran.com/world/pakistan-pahalgam-attack-pakistan-stock-mar...
-----
ये नया भारत हैं....
एक पाऊल पण नाही उचलले.... पाकिस्तानी घाबरले...
30 Apr 2025 - 9:07 pm | अमरेंद्र बाहुबली
*BREAKING केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार:* मूळ जनगणनेसह केले जाईल, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय... https://link.divyamarathi.com/cHllkX1dZSb
पहलगाम हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्याचा मोदी सरकारचा डाव?
30 Apr 2025 - 9:13 pm | मुक्त विहारि
याचे उत्तम उदाहरण...
आरक्षण नसते दिले तर म्हणाले असते की आरक्षण का नाही दिले? काँग्रेस तर कधीपासून जाती आधारित जन गणना करण्याची मागणी करत आहे...
आता
मागणी मान्य केली तर म्हणतात की आत्ताच का?
-----
असो,
तुमची पंचतंत्र वाचायची वेळ अद्याप गेलेली नाही....
30 Apr 2025 - 9:48 pm | सुक्या
अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट धोतराला हात घातलात ? आता ते कुठे पळतील ?
30 Apr 2025 - 10:32 pm | मुक्त विहारि
मोदींना शिव्या घालण्यासाठी, काही लोकांना पगार मिळतो.
आणि काही लोकांना परमपूज्य राहुल गांधी यांची तळी उचलण्यासाठी पगार मिळतो.
(एक विनोद....
तर्क शास्त्र, बहू बाजूंनी चालते....
ह्यांनी जे तर्क लावले ते तर्क लावून उद्या कुणी असेही म्हणू शकतो की "नॅशनल हेरॉल्ड स्कँडल" लपविण्यासाठी कुणीतरी पहलगामचा हल्ला केला असेल.कारण , ह्या दोन्ही प्रकरणा नंतर, परमपूज्य राहुल गांधी एकदम शांत झाले आहेत आणि वरून सुप्रीम कोर्टाचा सावरकर प्रकरणी आदेश...काँग्रेस आणि त्यांचे नेते, इतक्या खालच्या थराला जाणार नाहीत, इतपत तारतम्यता मला आहे...
सांगायचा मतलब असा की, स्वतःची बुद्धी वापरायची असते. बोळ्याने दूध किती दिवस पिणार?)
1 May 2025 - 9:02 am | मुक्त विहारि
पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा- इंडिया में किसी ने मोदी का साथ नहीं दिया...
https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/lucknow-pakistan-parliament-...
---
.... काय बोलावं ते सुचेना ...
1 May 2025 - 9:07 am | श्रीगुरुजी
मुळात जात्याधारीत जनगणना, राखीव जागा प्रमाण वृद्धी या मुद्द्यांना बहुसंख्य जनतेचा पाठिंबा असल्याचे आजपर्यंत दिसले नाही. पप्पूने कंठशोष करून मागणी करूनही कॉंग्रेसला तसेच ही मागणी करणाऱ्या अन्य पक्षांना निवडणुकीत किरकोळ लाभ सुद्धा झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही.
तरीही अचानक हा निर्णय घेण्याचा गंभीर अश्वप्रमाद करण्याचे कारण काय? इतके दिवस हा निर्णय घेण्यास भाजप, संघ यांचा विरोध होता. आता हा निर्णय घेतल्यानंतर मागे फिरणे शक्य नाही. यातून प्रचंड सामाजिक तणाव निर्माण होईल. जातीजातीत यादवी माजू शकते.
एकदा जात्याधारीत जनगणना सुरू झाली की त्यात अजून नवीन मागण्या पुढे येतील व जनगणना समाप्तीनंतर आकडेवारी प्रसिद्ध करणे सरकारसाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकेल. महाराष्ट्रात मराठा जातीची टक्केवारी ३२-२४% नसून १६-१८% आहे किंवा देशभर इतर मागासवर्गीय ५२-५४% नसून ३५-३६% इतकेच आहेत असे निष्कर्ष आले तर सरकार ते प्रसिद्ध करण्याची टाळाटाळ करेल व केल्यास हे समाजगट ही आकडेवारी मान्यच करणार नाही आणि इतर समाजगट या आकडेवारीचा आधार घेऊन आपल्या मागण्या पुढे रेटतील.
राखीव जागा प्रमाण वृद्धी ही मागणी अत्यंत जोराने पुढे येईल व त्यासाठी सरकारला संसदेत घटनाबदल करून हे प्रमाण ७५-८०% पर्यंत न्यावे लागेल. यामुळे अराखीव गट संतापेलच, पण सर्वोच्च न्यायालय यावर स्थगिती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील सामाजिक वातावरण पूर्णपणे विषारी होईल.
केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल.
पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही.
1 May 2025 - 9:45 am | मुक्त विहारि
पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही.
----
ह्या वाक्याला सहमत आहे...
आरक्षण ही दुधारी तलवार आहे आणि दुर्दैवाने ती भारतासाठी नेहमीच घातक ठरत आली आहे. उदा. नष्ट झालेले नंद साम्राज्य ते नष्ट झालेले मराठा साम्राज्य....
----
आपण इतिहासातून काहीच शिकत नाही...
1 May 2025 - 9:34 am | आग्या१९९०
केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल.
हा प्रकार कधी झाला?
1 May 2025 - 10:03 am | मुक्त विहारि
मां भारतीय, पिता पाकिस्तानी… अब कहां जाएंगे बच्चे? पुलिस कंफ्यूज; MP में फंसा पेंच
https://www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/jabalpur-mother-is-indian-...
----
त्यात विचार काय करायचा? ह्याचे उत्तर फार आधीच, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिले आहे.
"शत्रू राष्ट्राच्या मुलांना थारा देऊ नये. विषवल्लीच्या बिया, विषारीच वेली तयार करतात."
1 May 2025 - 11:24 am | मुक्त विहारि
भोपाळ मध्ये "नराधम फरहान गँग" बद्दल लेख लिहीत असताना खालील बातमी मिळाली....
"भोपाल में नया कांड, 17 साल की दलित लड़की बोली- जोया भाभी भाई शाहरुख से करवाती.."
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/bhopal-dalit-girl-alleges-r...
-------
1 May 2025 - 11:35 am | धर्मराजमुटके
कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही.
भारतातून जात जाणार नाही, राजकारणी जातीपातीचा वापर करुन घेणारच मात्र त्याला आपण किती बळी पडायचे हे वास्तव स्वीकारुन जात आधारीत जणगणणेचा स्वीकार केला गेला पाहिजे. आर्थिक सुबत्ता वाढली की जननदर कमी होतो असा एक सर्वसाधारण सिद्धांत आहे तो खरा आहे की खोटा ते ही या निमित्त पडताळून पाहता येईल. शिवाय जनगणनेच्या सुधारीत आकड्यामुळे सरकारी विभागांना जुन्या कार्यक्रमांमधे नव्याने बदल करावे लागू शकतात (ते चांगले की वाईट हा कळीचा मुद्दा)
बाकी आरक्षणाच्या मुद्यावर न बोललेले बरेच (विशेषतः सवर्णांनी).
ब्राह्मणाच मुलगा ब्राह्मण राहणार आणि शुद्राचा मुलगा शुद्रच राहणार ही व्यवस्था बदलायची म्हणून आणि सामाजिकदृष्ट्या मागास जनांना पुढे आणायचे म्हणून आरक्षणव्यवस्था चालू केली मात्र कोणत्याही चांगल्या गोष्टीचे वाट्टोळे करण्यात आपण भारतीय हुशार आहोत. (निदान ह्या दृष्टीने तरी आपणा सर्वांचा डीएनए एकच आहे ही म्हण लागू होते). आज ७० वर्षे झाली तरी बहुधा सगळ्या जातींचे लोक त्यांच्या जुनाट बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर प्डू शकले नाहीत. जे बाहेर पडले त्यांनी आपले कल्याण साधले. ज्यांनी आरक्षणाचा लाभ दोन तीन पिढ्या घेतला तेही मानसिक गुलामगिरीतून / मागासपणातून बाहेर पडलेले नाही किंवा आपले आरक्षण आपल्याच जातीतल्या गरजुला देण्याइतपत दाते होऊ शकले नाहीत.
जातीय जनगणनेने काही तणाव निर्माण होतील म्हणून ती करायचीच नाही म्हणजे शहामृगासारखे वाळूत तोंड खूपसून बसण्यासारखे आहे. कोण जाणे, कदाचित एखादी चांगली गोष्ट देखील पुढे येऊ शकेल. उम्मीद पर दुनिया कायम है !
अवांतर-१ : जातीय जनगणनेत जात बाह्य / धर्मबाह्य विवाह करणार्यांची पण शिरगणती व्हावी म्हणजे सामाजिक अभिसरण रोटी बेटी व्यवहारात किती पुढे सरकले आहे तेही तपासून पाहता येईल.
अवांतर-२ : जनगणनेच्या वेळी जात न सांगण्याचा पर्याय असावा व जातीला महत्व नसेल तर जात न सांगणारे किती जण निघतात ते देखील पाहणे रोचक ठरेल.
1 May 2025 - 12:12 pm | मुक्त विहारि
प्रतिसाद आवडला...
1 May 2025 - 11:38 am | धर्मराजमुटके
तमाम मराठी जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
खरे तर मिपा ने आज बॅनर लावावयास हवे होते. असो !
1 May 2025 - 11:49 am | श्रीगुरुजी
पाकिस्तानशी चर्चा करा या विरोधकांच्या मागणीचा अनावश्यक ताण घेऊन वाजपेयी-अडवाणींनी मुशर्रफला भारतात बोलावून भारताचे तोंड काळे करून घेतले.
तसेच जात्याधारीत जनगणनेच्या अनावश्यक मागणीचा दबाव घेऊन मोदींनी जात्याधारीत जनगणनेचा निर्णय घेतलेला दिसतो.
वाजपेयींनी मुशर्रफला दिलेले आमंत्रण काढून घेतले असते तरी खूप काही वेगळे झाले नसते. परंतु जात्याधारीत जनगणनेच्या निर्णयावर माघार घेणे शक्य नाही.
1 May 2025 - 12:20 pm | मुक्त विहारि
सहमत आहे..
सत्तेपुढे आणि एकगठ्ठा मतदारांपुढे, कुणाचेच काही चालत नाही... कधी तरी आपण एकत्र भेटू आणि शांत पणे बियर पिऊ...
बाय द वे,
आरक्षण ह्या जगात अनादी अनंत काळापासून सगळीकडे आहे आणि कमी अधिक प्रमाणात ते राहणारच आहे...
पृथ्वीराज कपूर यांची चौथी पिढी, स्वतः च्या तोंडाला रंग फासून पैसे कमवत आहे. हे एक उदाहरण...
1 May 2025 - 12:21 pm | वामन देशमुख
जात्याधारित आरक्षण या गोष्टीने हिंदू समाजाचे जे अपिरिमित नुकसान झाले आहे त्यास तोड नाही.
हिंदुत्ववादी असल्याचा दावा करून हिंदूंची मते मिळवून सत्तेत आलेल्या संघप्रणीत मोदींनी मागच्या दहा बारा वर्षांत -
- हिंदुहिताचा एकही नवीन निर्णय घेतला नाही
- हिंदुअहिताचा एकही जुना निर्णय रद्द केला नाही
---
काँग्रेस ही हिंदूंची थेट शत्रू आहे तर भाजप हा हिंदूंचा छुपा शत्रू आहे.
कोणीही मित्र नसलेला व सर्वच शत्रू असलेला हिंदू समाज म्हणजे पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप!
1 May 2025 - 12:30 pm | आग्या१९९०
कळप सोडा.
1 May 2025 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली
चला भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष नाही इथपर्यंततरी काही लोकांची प्रगती झाली!
1 May 2025 - 2:19 pm | अमरेंद्र बाहुबली
राहुल गांधींपुढे मोदी झुकले, शेवटी सत्य जिंकले!
सत्यमेव जयते! माझा भारत महान!
1 May 2025 - 5:48 pm | अमरेंद्र बाहुबली
नरेंद्र मोदींनी एका रात्रीत २८ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली, आणि पाकिस्तानात जणू भूकंपच आला! रस्त्यापासून संसदेपर्यंत, लष्करापासून गल्लीपर्यंत, सगळीकडे हलकल्लोळ माजलाय.
- इस्लामाबादेत पाकिस्तानच्या संसदेवर दगडफेक!
- पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
-युट्युब चॅनल बंदीमुळे पालिस्तानी लष्कराची सप्लाय चेन कोसळली.
-पाकिस्तानात मटण महागले, बोकडचोरीच्या घटना वाढल्या.
- कराचीत लोक उंच बिल्डिंगवर चढून उड्या टाकताहेत कारण खायला काही नाही.
- सिंधू नदीत उड्या टाकून अनेकांची आत्महत्या, कारण मोदींचा मास्टरस्ट्रोक!
-पाकिस्तानचे नेते मिळेल ती फ्लाईट पकडून देश सोडताहेत.
-अतिरेकी गुफेतून बाहेर येऊन स्वतावर गोळ्या झाडताहेत.
- अनेक मुल्ला मौलवींचे पाकिस्तान सोडून पलायन!
- “28 चॅनल बंदीचा मास्टरस्ट्रोक मागे घ्या” पाकी पंतप्रधानांची मोदींकडे भीक!
- युट्यूब चॅनल बंदीने पाकी पंजाबातील गहू उत्पादनावर परिणाम. पाकी शेतकरी हवालदिल!
- पाकी परिवहन यंत्रणा कोलमडली!
- गहू पाकी सीमांवर अडलेला, युट्युब चॅनल चालू झाल्याशिवाय गहू देशाबाहेर निघणे कठीण!
- पाकव्याप्त काश्मीरात बर्फ वितळण्यास सुरुवात, ह्यामागे मोदींची २८ युट्युब चॅनलवरील बंदी कारणीभूत, जागतिक हवाईसुंदरी असोसिएशन च्या प्रमुखांचे मत!
- हे सगळे पाहून मोदी, डोभाल नी शहा ह्यांनी पार्टी केल्याची बातमी.
1 May 2025 - 6:04 pm | मुक्त विहारि
महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या.
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/5054074/inflation-at-peak...
----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही...
1 May 2025 - 8:23 pm | धर्मराजमुटके
Meritocracy vs. Social Justice एक जरुर पहावी अशी चित्रफीत
1 May 2025 - 10:01 pm | मारवा
यातील सुटी सुटी मते माहीत होती. परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे. तरी ते थोडे. एकांगी आहेत. या द्वैत वरील ही खालील निष्कर्ष मला फारच मार्मिक व अचूक व अचूक काटेकोर संतुलन साधलेली वाटली बघा तुम्हाला काय वाटते.
The debate over the 50% ceiling on reservations reflects a dynamic tension between the principles of equality and social justice.
While maintaining the ceiling ensures a balanced approach to merit and representation, the socio-economic realities necessitate a flexible, context-sensitive application.
Moving forward, a comprehensive policy review, informed by empirical data and societal needs, is essential to create a reservation system that is both equitable and effective in addressing the aspirations of all communities.
1 May 2025 - 10:08 pm | मारवा
हा गोळा केला जात होता /आहे सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही. पण तुम्ही बघा सरसकट हे द्या सरसकट सगे सोयरे टाका इत्यादी जन दबावापुढे झुकून जेव्हा काम होते तेंव्हा कसला empirical data आणि कसला policy review
असे कठोर वास्तव आहे अशी आपली राजकीय व्यवस्था आहे.
1 May 2025 - 10:40 pm | श्रीगुरुजी
सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही.
खटला अत्यंत संथ वेगाने सुरू होऊन अर्धवट अवस्थेत असताना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या राज्यात केल्याने आतापर्यंतची सुनावणी पूर्णपणे रद्द झाली आहे. खटल्याची नव्याने सुनावणी होण्यासाठी तिसऱ्या न्यायाधीशाची जागा भरणे आवश्यक आहे व अनेक महिन्यांनतरही ती जागा भरली जात नाही.
हा तथाकथित इंपिरिकल डेटा हा पूर्णपणे फार्स होता हे माहिती असल्याने आणि नीट सुनावणी झाल्यास राखीव जागा तिसऱ्यांदा रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असल्याने खटलाच अनेक वर्षे लोंबकळत ठेवणे हा उपाय शोधलेला आहे. यात राज्य सरकार व न्यायव्यवस्थेचे साटंलोटं असणार.
मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी शिंदेंनी सर्वेक्षणाचे पूर्वीप्रमाणेच नाटक करून सर्व खोटा डेटा दाखवून प्रगत मराठा जातीला अत्यंत मागास ठरवून राखीव जागा दिल्या. परंतु मुख्यमंत्रीपद टिकले नाही. मधल्या मध्ये अराखीव गटाचे नुकसान करून टाकले.
1 May 2025 - 10:30 pm | वामन देशमुख
जर typo नसेल तर फारच + मार्मिक == फार्मिक हा शब्द आवडला.