उत्तर.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
9 Jun 2024 - 1:44 pm

उत्तर.
द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली.
नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता. छप्पन अब्ज ग्रहांच्या -- सुपर सर्किटना एका सुपरकॅल्क्युलेटरमध्ये जोडेल, एक सायबरनेटिक्स मशीन जे सर्व आकाशगंगांचे सर्व ज्ञान एकत्र करेल अशी त्याची क्षमता होती.
द्वार रेनने कार्यक्रम पहाणाऱ्या अब्जावधी मानवांना प्रयोगाची थोडक्यात माहिती दिली. मग काही क्षणाच्या शांततेनंतर तो म्हणाला, "आता, द्वान ईव, आता तुझी पाळी."
द्वान ईव्हने स्विच क्लोज केला, छप्पन अब्ज ग्रहांवरून उर्ज्वेची एक लाट आली. मैल-लांब पॅनेलवर दिवे चमकले आणि शांत झाले.
द्वान ईव मागे सरकली आणि एक दीर्घ श्वास घेउन म्हणाली, “नाही द्वान रेन, पहिला प्रश्न विचारण्याचा मान तुझा आहे."
"धन्यवाद," द्वान रेन म्हणाला. "माझा प्रश्न असा आहे कि ज्याचे उत्तर आजपर्यंत कोणतेही सायबरनेटिक्स मशीन देऊ शकलेले नाही."
तो यंत्राकडे वळला आणि त्याने प्रश्न केला, "देव आहे का?"
एकाही रिलेवर क्लिक न करता, किंचितही संकोच न बाळगता अमानुषी आवाजाने उत्तर दिले,
"हो, इतके दिवस नव्हता पण आता देव आहे."
द्वार ईवच्या चेहऱ्यावर अचानक भीती पसरली. तिने स्विच उघडण्यासाठी उडी मारली.
निळ्या आकाशातून विजेचा एक लोळ तिच्यावर येऊन आदळला

कथा

प्रतिक्रिया

आणि स्वीच वितळून बंद झाला तो कायमचाच!
(फ्रेडरिक ब्राऊन ह्यांच्या “Answer” नावाच्या कथेचा स्वैर मनःपूतम् अनुवाद)
हे लिहायचे राहिले होते.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2024 - 1:10 pm | चौथा कोनाडा

भारी ..... वेगळ्याच वातावरणात घेऊन गेली ही कथा !
स्वैर मनःपूतम् अनुवाद ... छान जमलाय !

आंदेव और ऐसाही !