धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

वडगावकर's picture
वडगावकर in जनातलं, मनातलं
2 May 2024 - 3:55 pm

लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )

वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.

गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...

कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत

रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात.

पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले
आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे
हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया

तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की...
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी

ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है

और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है

जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"

साहित्यिक

प्रतिक्रिया

जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा">>>

First they came for the Communists
And I did not speak out
Because I was not a Communist

Then they came for the Socialists
And I did not speak out
Because I was not a Socialist

Then they came for the trade unionists
And I did not speak out
Because I was not a trade unionist

Then they came for the Jews
And I did not speak out
Because I was not a Jew

Then they came for me
And there was no one left
To speak out for me

चंद्रसूर्यकुमार's picture

2 May 2024 - 5:34 pm | चंद्रसूर्यकुमार

देशद्रोही कारवाया करणार्‍यांना रॉ ने देशाबाहेर जाऊन गोळ्या घातल्यास त्याबद्दल ही कविता उधृत करणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखा प्रकार झाला.

असो.

सुबोध खरे's picture

2 May 2024 - 6:35 pm | सुबोध खरे

@भागो

तुम्ही पण भुजबळांच्या नादाला लागून असंबद्ध प्रतिसाद द्यायला लागलात काय?

तुमचा लेखन बरं असायचं

अहिरावण's picture

2 May 2024 - 7:06 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====

सहमत आहे.

विवेकपटाईत's picture

2 May 2024 - 5:11 pm | विवेकपटाईत

दहा वर्षांत भारताचा दणका वाढतो आहे.

हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!

कांदा लिंबू's picture

2 May 2024 - 5:44 pm | कांदा लिंबू

हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!

भागो, अबा यांसारखे ID कोणत्या ही धाग्याचे काश्मीर करण्यात प्रवीण आहेत.

अहिरावण's picture

2 May 2024 - 7:06 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====

सहमत आहे.

अमर विश्वास's picture

2 May 2024 - 6:50 pm | अमर विश्वास

पतंजली आणि या धाग्याचा काय संबंध ?

हे प्रतिसाद वाचून यांनाही चार जूनला बर्नोलची गरज पडेल असे वाटते

अहिरावण's picture

2 May 2024 - 7:06 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====

सहमत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

4 May 2024 - 2:20 pm | प्रसाद गोडबोले

पतंजली

पतंजली हे थोर हिंदू आचार्य होते. सहा दर्शनांपैकी जे योग दर्शन त्याचे प्रणेते.

ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत.
चांगलं आहे , ह्या मुळे मवाळ पंथी हिंदूंना लक्षात येईल की केवळ मोदी, RSS, सावरकर वगैरे काँग्रेसचे टार्गेट आहेत असे नव्हे तर समस्त सनातन धर्म हा काँग्रेस चे टार्गेट आहे , अन् त्याला येनकेन प्रकारेण बदनाम करणे हाच ह्या लोकांचा उद्देश आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2024 - 5:58 pm | अमरेंद्र बाहुबली

सनातन मनुवादी धर्म टार्गेट असावाच. विज्ञानवादी, पुरोगामी हिंदुधर्म टार्गेट असू नये. ह्या निमित्ताने भाजप आणी संघाला पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची असेल तर हिंदू आणी दलितानी सावध रहावे.

सर टोबी's picture

4 May 2024 - 7:37 pm | सर टोबी

साचेबंद तर्क सोडून पटवून देऊ शकता का? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला आहे. आता साचेबंद तर्क म्हणजे काय ते समजावून सांगतो.

  • प्रदूषण काय फक्त हिंदू सणांमुळेच होतं का?
  • हिंदूंना आपल्याच देशात, आपल्याच चालीरीती पाळण्याची नामुष्की कशी असू शकते?
  • मान्य आहे “काही मूठभर" लोक समाज विघातक कृत्य करतात, पण संपूर्ण धर्मालाच नकोसं म्हणणे कितपत बरोबर आहे?

वरील प्रश्न केवळ प्रातिनिधिक आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंचं सामाजिक जीवन अतिशय कर्कश्य आणि आक्रस्ताळं बनलेलं आहे आणि कोणताही सनातनी याची जबाबदारी टाळून सनातन धर्माची भलामण करू शकणार नाही. तसेच यापूर्वी सनातन धर्मावरील चर्चेत आपण जातींची उतरंड आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबतीत काही बेधडक पण संविधानाला मान्य नसणारी मतं व्यक्त केली होती अशी माझी समजूत झालेली आहे. आपण आजही त्या मतांच्या बाबतीत ठाम असाल तर तसे सांगावे म्हणजे आम्ही देखील ”होय. लिब्राडूंच!” असे म्हणायला मोकळे.

वामन देशमुख's picture

4 May 2024 - 8:00 pm | वामन देशमुख

ज्या प्रकारे भक्त ह्या शब्दाचे हे काँग्रेसी लोक विद्रुपीकरण करत आहेत तसेच पतंजली ह्यांचेही प्रतिमा भंजन करत आहेत.

दुर्दैवाने सहमत आहे.

पतंजली सारख्या ऋषीमुल्य ऋषितुल्य व्यक्तींचा अकारण, अप्रस्तुत, हेटाळणीपूर्वक उल्लेख करणे, हे हिंदूविरोधी, डाव्या, सेक्युलर कुविचारसरणीचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Patanjali

सुबोध खरे's picture

2 May 2024 - 6:55 pm | सुबोध खरे

त्यांना इतका कडक माल कुठून मिळतो?.

अहिरावण's picture

2 May 2024 - 7:07 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====

सहमत आहे.

भागो's picture

2 May 2024 - 7:42 pm | भागो

मंडळीहो रागावू नका.
सगळ्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आमुचा राम राम घ्यावा.
सब कुछ सिखा हमने
ना सिखी...
हम किस गलीमे आ गये है आपण कोई ठिकाना नही.
Long live, Prosper and Be Happy.
Salutation!

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली

:)

वडगावकर,

रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.

हे एका अर्थी बरोबर आहे. एका अर्थी यासाठी म्हंटलं की रॉ आधीपासून सक्षम होतीच. १९७१ साली तिने अत्यंत वेगवान हालचाली करून / करवून बांगलादेश निर्माण केला. ही गुप्तहेरांच्या जगातली एक दैदिप्यमान कामगिरी मानली जाते.

हेनरी किसिंजर अत्युच्च पातळीचा हेर होता. त्याला चकवणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. तरीपण रॉने बरोब्बर प्यादी हलवली. म्हणून किसिंजर इंदिरा गांधींना दॅट बिच ( = ती कुत्री ) म्हणायचा.

इंदिरा गांधींच्या नंतर कणखरपणाचं दुर्भिक्ष्य उत्पन्न झालं. ते आत्ता दूर होतंय. रॉ परत फॉर्मात येणार हे नक्की. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. ती भारताच्या सांप्रत नेतृत्वाकडे भरपूर आहे.

बाकी, एमाय-६, मोसाद, सीआये, एफेसबी वगैरे गुप्तचर संस्था क्षमतेच्या दृष्टीने साधारणत: एकसारख्याच असतात. त्यांच्या डोक्यावर कोण नेता बसून आहे यावर त्यांचं यशापयश जगाला दिसतं.

-नाठाळ नठ्या

सर टोबी's picture

3 May 2024 - 9:02 pm | सर टोबी

च्या चाहत्यांचं हे नविन टुलकिट दिसतंय. बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय. आदरणीय प्रधानसेवक बाकी कुठल्या बाबतीत विश्वगुरु असोत वा नसोत, टुलकीटच्या बाबतीत त्यांची सर कुणाला येणं शक्य नाही.

तर येऊ आपल्या मूळ मुद्याकडे. आज काल सगळं काही धडाकेबाज पद्धतीने घडतंय. मग तो विकास असो, सर्जिकल स्ट्राइक असो की भारत विरोधी शक्तींचा खात्मा असो. इथे वाहवा करणाऱ्या सदस्यांची अशी समजूत दिसतीय की इस्राईल किंवा अमेरिका दुसऱ्या देशात हत्त्या घडवतात आणि आपल्या दादागिरीच्या जोरावर सगळं काही मिटवतात. हे कदाचित पॅलेस्टाइन किंवा पाकिस्तानच्या बाबतीत होईल देखील. पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे असे निदान पूर्वीच्या “लेच्यापेच्या आणि लांगूलचालन” करणाऱ्या सरकारकडून झालेलं नाही अशी माझी समजूत आहे. थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. हेच जर वारंवार व्हायला लागलं तर काही सुचक घटना नजीकच्या भूतकाळात घडल्या आहेत (कतारने भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मुत्युदंडाची शिक्षा देणं, कॅनडाबरोबरचे परराष्ट्र संबंध बंद होणे) त्यांच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. यात तंत्रज्ञान अदान प्रदान, परकीय गुंतवणूक, पर्यटकांना धोक्याची सूचना देणं, आणि शेवटी काळ्या यादीत टाकणं.

जाता जाता: काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल.

कांदा लिंबू's picture

3 May 2024 - 9:43 pm | कांदा लिंबू

बाकी टुलकिट असणं ही काही फक्त डाव्या विचारसरणीची मक्तेदारी नाहीय.

सहमत आहे. डाव्यांकडून आप पक्षानेही हे कौशल्य घेतलंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 May 2024 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली

थोडक्यात भारतीय गुप्तहेर संस्थांच्या कारवाया जर उघड होत असतील तर कौशल्याच्या बाबतीत आपण कमी पडतो आहोत. तो गावठी जेम्स बाँड आल्या पासून सगळं उघड होऊ लागलंय. म्हणे हा गावठी जेम्स बॉंड अमुक वर्षे पाकिस्तानात राह आलाय कुठलाही गुप्तहेर हे उघड करत नाही तसेच देशही अश्या बातम्या उघड करत नाही. मग अंधभक्ताना कुठून कळतात ह्या?? गुप्तहेर संघटनेत “गुप्त” शब्द का असतो? हे कळण्याइतके भक्त प्रगल्भ नाहीत.

आग्या१९९०'s picture

3 May 2024 - 10:49 pm | आग्या१९९०

आयुष्यात प्रगल्भ होणार नाहीत, गर्भसंस्कार जसे झालेत तसेच वागणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2024 - 12:06 am | अमरेंद्र बाहुबली

हहाहा. खरंय. :)

पण भारतात भारतीय नागरिकांची हत्या करणे आणि नैसर्गिक न्याय झाला म्हणून भारत सरकारने गप्प बसणे
हे सध्याच्या सरकारच्या काळात चालू आहे असा तुमचा दावा आहे काय? काही उदाहरणे ?

सर टोबी's picture

6 May 2024 - 10:24 am | सर टोबी

प्रगती, देशाचा सन्मान, नागरिकांचं जीवनमान उंचावणं याबाबतीत मागची सरकारे आणि खास करून काँग्रेसची सरकारे सपशेल अपयशी असतांनादेखिल त्या लेच्यापेच्या सरकारांकडून असलं पातक घडलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो.

तुमच्या बाबतीत कसं असतं कि पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं मनमोहन सिंग वगैरेंचं कौतुक करायचं. असू द्या.

"पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडं"
सर टोबी हि तुम्ची गैरसमजूत , मोदी आज आहेत उद्या नाहीत , प्रेम वैगरे काही नाही , त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस आणि दवयांपेक्षा सध्या तरी जास्त योग्य वाटतो ,,,
आणि काय हो जगातील सर्वात मोठया लोकशाहीत जर निदान २ तरी सक्षम पक्ष नसावेत का? त्या दृष्टीतें पाहता काँग्रेस चा पण जरा जीर्णोद्धार व्हावा पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा, अर्थात तुम्हीं .म्हणणार उगाच दाखवयाचा म्हणून काँग्रेस बद्दल लिहितोय !

गेली दहा वर्ष आम्ही मोदी आणि भाजप यांची लक्तरे वेशीवर टांगतोय. एवढं करूनही तुम्हाला मोदी आणि भाजपच योग्य वाटत असेल तर हिम्मत करा ना ”होय आम्हाला मोदी प्रिय आहेच" हे सांगण्याचे. काही तरी भलामण करायची आणि मग असले तळ्यात मळ्यात करायचं.

घराणेशाहीबद्दल म्हणायचं तर मी यापुर्वीदेखील म्हणालो आहे. त्या पक्षाच्या सहा पंतप्रधानांमध्ये निम्म्याहून जास्त एका घराण्याचे पंतप्रधान होते. भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? आणि कोणतीही शासन व्यवस्था मूलतः चांगली अथवा वाईट नसते. चांगली किंवा वाईट सत्ता राबवणाऱ्यांची नियत असते. आता बोला भाजप आणि मोदींची काय नियत आहे याबद्दल.

सर टोबी's picture

8 May 2024 - 7:08 am | सर टोबी

निम्म्याहून जास्त एका घराण्याच्या बाहेरचे होते असे वाचावे.

चौकस२१२'s picture

8 May 2024 - 7:50 am | चौकस२१२

निम्म्याहून जास्त एका घराण्याच्या बाहेरचे होते असे वाचावे.
अरे पण निम्मे तर होते ना? आणि रिमोट कोणाकडे? ( शशी थरूरांनां विचारा )
हायला ह्याला म्हणतात "मिया गिरे तो भी टांग उपर ",
जय नेहरू चाचा नमोस्तुते
जय इंदिरा "इज इंडिया" नमोस्तुते
जय राजपूत्र राजीव नमोस्तुते
जय राणी सोनिया नमोस्तुते
जय शहाजादे राहुल नमोस्तुते
जय राजकन्या प्रियांका नमोस्तुते

याउलट
हे पहा भाजप अध्यक्ष
https://en.wikipedia.org/wiki/List_of_presidents_of_the_Bharatiya_Janata...
हे पहा जन संघ अध्यक्ष
https://en.wikipedia.org/wiki/Bharatiya_Jana_Sangh

सर टोबी's picture

8 May 2024 - 8:41 am | सर टोबी

जे होते त्यांचा पंतप्रधान असण्याचा ठसा आजही दिसतो. तसा तो मोदींचाही दिसेल. जळके अवशेष, भळभळनाऱ्या जखमांच्या स्वरूपात आणि ऊठसूठ हयात नसणाऱ्या पंतप्रधानाचे वाभाडे काढायला. बाकी रिमोटचं म्हणाल तर तथाकथित दुर्बळ पंतप्रधानांनी जेवढं करुन ठेवलंय ते देखील यांना भारी पडतंय.

असू द्या. तोल ढळला आहे आणि संपादक डुलक्या घेत आहेत.

तळ्यात मळ्यात कसले आहे स्पष्ट सांगतो कि भाजप + मोदी हे गणित नेहरू घराण्याची मालकी असलेला काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांचे कडबोळे यापेकशा अनेकांना मान्य आहे त्यातला मी पण म्हणून २०१४ आणि १९ वर्षी निवडून आले ... २४ वर्षी काय होईल ते होईल
अनेकांना मान्य आहे हे तुम्हाला मान्य दिसत नाही .. नसो तुम्ची मर्जी
भाजप ची भलावण केली कि लागेचच अंधालेपणा आणि एका घराण्याची काँग्रेस चालते ?
भाजप चा समर्थक म्हणजे अंधभक्त नव्हे ते हि चुकतात ( आता असे म्हणले कि लगेच कुम्पणवर बसणारे ! अरे हे काय

तुम्ही विचारता भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची? सध्या कशाला सांगतील असे? हुकुमी एक्का आहे त्यांचा आणि मुळात ते सुद्धा काय "कोणत्या घराण्यात जन्मले " म्हणून नाही झाले पंतप्रधानांचे उमेदवार , त्यांनी घासली गुजरात मध्ये प्रथम
आणि काय हो कांग्रेस मध्ये जी पक्श प्रमुखाची " लुटू पुटुची " निवडणूक झाली ती काय अंतर्गत लोकशाही चा नमुना होता? या उलट भाजप आणि त्यामागचा संघ यात नेते बदलत असतात .. त्यांची अंतर्गत व्यवस्ताह जी असेल ती असेल घराणेशाही तर नाही ४ पिढ्यांची

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2024 - 10:20 am | चंद्रसूर्यकुमार

पण त्यांनी घराणेशाही ची गुलामगिरी संपवावी अशी इच्छा

आपल्या बाजूने घराणेशाहीचा मुद्दा नेहमी लाऊन धरला जातो. मात्र तो मुद्दा तितकासा योग्य नाही असे मला वाटते. आपला नेता म्हणून कोणाला नेमावे हा काँग्रेसचा प्रश्न झाला. तो आपला प्रश्न नाही. जर लोकांनी त्या नेत्याला निवडून दिले तर मग तो नेता कोणीही असू दे- घराणेशाहीतून आलेला किंवा न आलेला, त्याने फार फरक पडू नये. राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ दोन वेळा घेतली- ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? निवडणुकीच्या वेळेस लोकांसमोर वेगळा नेत्याचा चेहरा ठेवायचा आणि निवडणुक झाल्यावर मात्र इंदिरा पुत्र म्हणून राजीव गांधींना नेता निवडायचे असे तर झाले नव्हते ना?

काँग्रेसला लक्ष्य करायला इतर कित्येक मुद्दे आहेत. त्यावर टीका जरूर करावी. नेहरूंनी आय.आय.टी ची स्थापना केली म्हणून नेहमी कौतुक केले जाते पण नेहरूंच्या काळात ५ आय.आय.टी- मुंबई, खरगपूर, मद्रास, दिल्ली आणि कानपूर यांची स्थापना झाली होती. त्यापूर्वी भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण दिले जात नव्हते का? तर तसे अजिबात नाही. पुण्याचे इंजिनिअरींग कॉलेज, मुंबईचे व्ही.जे.टी.आय अगदी १९ व्या शतकातच सुरू झाले होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत इंजिनिअरींगचे शिक्षण १९२० च्या दशकात सुरू झाले होते. धनबादच्या कॉलेजमध्ये मायनिंग इंजिनिअरींगचे शिक्षण सुरू झाले त्याला आता जवळपास १०० वर्षे झाली आहेत. रूरकीचे कॉलेज तर पुण्याच्या इंजिनिअरींग कॉलेजपेक्षा जुने आहे. आमचे सांगलीचे वालचंद कॉलेज सुध्दा १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस सुरू झाले होते. ते सुरू करण्यात नेहरूंचा काहीही हात नव्हता. अहमदाबादचे एल.डी.कॉलेज सुरू करण्यात पुढाकार होता कस्तुरभाई लालभाई या उद्योगपतींचा. बिट्स पिलानी कोणी सुरू केले? ते पण नेहरूंनी का? तेव्हा सांगायचा मुद्दा हा की भारतात इंजिनिअरींगचे शिक्षण नेहरूंनी सुरू केले अशाप्रकारच्या आविर्भावात काँग्रेसचे गुलाम बोलत असतात त्यात कितपत तथ्य आहे? मी तर म्हणतो उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करून भारतीय उद्योगांचा गळा नेहरू-इंदिरा गांधींनी घोटला नसता तर भारतात इंजिनिअरींग आणि टेकॉनॉलॉजीचे शिक्षण बरेच जास्त वाढले असते. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने नाक न खुपसता उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर आपले उद्योग पुढे वाढवायचे असतील तर कुशल मनुष्यबळ आपल्याला लागेल हे उद्योगपतींना कळत नव्हते का? त्यांनीच पुढाकार घेऊन कॉलेज सुरू केली असती. बिर्लांनी बिट्स पिलानी सुरू केले, कस्तुरभाई लालभाईंनी अहमदाबादमध्ये एल.डी.कॉलेज, आय.आय.एम किंवा धोंडुमामा साठेंनी वालचंद कॉलेज अशा संस्थांची स्थापना केली ते जाळे न्हेरूंनी केले त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक वाढले असते. तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते.

बाकी नेहरूंनी काश्मीर प्रश्नात एक धड निती न ठेऊन अपरंपार घाण घालून ठेवली ती निस्तरायला इतकी दशके गेली. शेख अब्दुल्ला देशविरोधी कारवाया करत आहे हे सरळ सरळ समोर दिसत असूनही त्याच्याविरोधात ४-५ वर्षे काहीही कारवाई न करता मोकळे रान दिले. काश्मीरच्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये आणायला काहीही केले नाही उलट तुम्ही कोणीतरी वेगळे आहात ही भावना दृढमूल करणारे कलम ३७० माथी मारून ठेवले. चीन युध्द होईपर्यंत आपल्या सैनिकी सज्जतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. हिमालयात चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांकडे लढायला शस्त्रे पण नव्हती. आणि हे आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहतींच्या लोकांच्या ब्रिटिश-फ्रेंचांविरोधी लढ्याला नैतिक पाठबळ द्यायला फिरत होते. चीनने हल्ला केल्यावर हे खडबडून जागे झाले आणि ज्या इस्राएलकडे १९४८ पासून दुर्लक्ष करत होतो त्याच इस्राएलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिऑन यांना पत्र लिहून आम्हाला शस्त्र द्या अशी विनंती केली. नुसते तेवढेच नाही तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली. मदत मागणारे वर उलट्या अटी घालत आहेत हे बघून डेव्हिड बेन गुरिऑनना काय वाटले असेल? जसे काही इस्राएलने दिलेली शस्त्रे घेऊन आपण त्यांच्यावर मोठे उपकारच करणार होतो. इंदिरा परराष्ट्रधोरणाच्या बाबतीत नेहरूंपेक्षा लाखो पटींनी अधिक चांगल्या होत्या. पण देशांतर्गत धोरणात नेहरूंनीही न केलेले प्रकार त्यांनी केले होते. कोर्ट, आर.बी.आय वगैरे 'इन्स्टिट्यूशन्स' शी खेळ त्यांनी केला होता. भ्रष्टाचार, नेपोटेझिम या गोष्टींना राजाश्रय दिला.

असो. तर काँग्रेसवर टीका करायला इतर अनेक मुद्दे असताना उजव्या बाजूचे लोक घराणेशाही या निरूपयोगी मुद्द्यावर टीका करत असतात. ते बंद करायला हवे असे वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2024 - 10:39 am | अमरेंद्र बाहुबली

+१ अभ्यासू प्रतिसाद.
आणी घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिकअधिकारही भाजप्यांना नाही. आमदारपुत्र, मंत्री काकूचे भाचे देवेंद्र फडणवीसही घराणेशाहीतूनच आलेत. आहेका हिंमत त्यांना बाजूला करायची?

चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार यांनी केलेली काँग्रेस वरील मुद्देसूद टीका "अ बां णा मान्य आहे तर ! हाःहाःहाःअह्हा

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2024 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली

व्हय

स्वरुपसुमित's picture

10 May 2024 - 7:02 pm | स्वरुपसुमित

तर शस्त्रे घेऊन येणार्‍या जहाजांवर तुमच्या देशाचा झेंडा नसेल तर मग आम्ही तुमची शस्त्रे स्विकारू अशी अट घातली.

राज नै तीक कारण असेल

सर टोबी's picture

8 May 2024 - 11:26 am | सर टोबी

आयआयटीची स्थापना आणि तत्सम प्रतिवाद हा एक दृष्टिकोन आणि प्राथमिकता तसेच देशाचा सामाजिक पोत कसा असावा याचा एक विचार या अर्थाने केला जातो. मोदींनी भजे तळायचा सल्ला दिल्यावर “कुठे आहेत खाऊ गल्ल्या?” असा प्रश्न जितका बालिश तितकाच नेहरूंच्या अगोदर असलेल्या शैक्षणिक संस्थांची जंत्री देणं हे बालिश.

सरकारने जिथे तिथे उद्योग स्थापन केले हे आजच्या काळात नक्कीच वावगं वाटू शकते. पण आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो. खेडोपाडी पोहोचलेली टपाल सेवा, बस आणि रेल्वे सेवा, बँकिंग, आरोग्य आणि शिक्षण अशा गोष्टी खाजगी गुंतवणूकदारांच्या भरवशावर ठेवता आल्या नसत्या. निळकंठ कल्याणी, बी जी शिर्के यांसारखे उद्योजक हे लहान शहरातून आलेले उद्योजक होते. म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा जेमतेम चार बूकं शिकलेली जनता तयार करीत नव्हत्या.

बाकी काश्मिर प्रश्नावर इतर बऱ्याच तज्ज्ञांकडून मते ऐकली आहेत आणि त्यातल्या कोणीही काश्मिरींचे अतिरिक्त लाड किंवा तत्सम प्रकारे ३७० व्या कलमाची संभावना केली नाही.

कांदा लिंबू's picture

8 May 2024 - 12:49 pm | कांदा लिंबू

आज जेव्हा सणासुदीच्या काळात खाजगी वाहन चालक अवाच्या सवा किमती वाढवतात तेव्हा सरकारी सेवा असण्याचा फायदा कळतो.

सणासुदीच्या काळात, केवळ खाजगीच नव्हे, सरकारी वाहन सेवादेखील किमती वाढवतात.

बाकी बाबींवर चंसुकु यांनी याआधीही अनेकदा लिहिलंय, आत्ता, वरही थोडक्यात लिहिलंय.

----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

चौकस२१२'s picture

8 May 2024 - 1:26 pm | चौकस२१२

१९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी निवडणुक जिंकल्यानंतर. समजा ३१ ऑक्टोबरला त्यांनी घेतलेली शपथ घराणेशाहीतून घेतली होती असे समजले तरी ३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय? ती शपथ त्यांनी निवडणुक जिंकल्यावरच घेतली होती ना? मग त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले? तिथेच तर गेम आहे मूळच्या काँग्रेस मध्ये घराणे नवहते , नेहरूंच्या नंतर ते सुरु झाले
३१ डिसेंबरला घेतलेल्या शपथेचे काय?
अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम

आता म्हणाल सध्याच्या भाजपात घराणेशाची डोकावत नाही का.. तर उत्तर दुर्दैवाने स्थानिक पातळीवर ते होते आहे, ते फार पुढे जाऊ नये असेही वाटते
कारण त्या मागे असलेल्या संघात तरी हि घराणे शाही दिसत नाही
पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता
आज सुद्धा राहुल चाय पणतूला पण निवडून देऊ कारण तो त्या घराण्यातील आहे अशी खानची मानसिकता आहे
सदृढ लोकशाहीत एवढी घराणेशाही इतर कुठे असावि असे वाटत नाही ( कृपया सिंगापुर चे उदाहरण देऊ नये )

तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते.
मी केला हा दावा? त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे
आणि सहमत आह एकी फार नाक खुपसले गेले
असो आता तरी बदल होत आहे
नवीन विडिओ भारत डायनॅमिकस https://www.youtube.com/watch?v=I0WlWrKP97o

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2024 - 1:57 pm | चंद्रसूर्यकुमार

आक्षेप घेण्यासारखे हेच कि मुळात राजीव गांधिंचा राजकारणाशी काहहीहि संबंध नव्हता त्याना "केवळ मुलगा" म्हणून गादीवर बसवले?

तेच म्हणत आहे. ३१ ऑक्टोबरला शपथ घेतली ती समजा "केवळ मुलगा" म्हणून घेतली. पण ३१ डिसेंबरला लोकांचा जनादेश मिळवूनच शपथ घेतली होती ना?

अनुकंपा मतदान , देशभर इंदिरा अम्मा चे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम

कोणत्याही कारणाने का असेना लोकशाहीत एकदा लोकांचा जनादेश मिळाला की तो अंतिम असतो. एन.टी.रामारावांचा, केजरीवालांचा तरी राजकारणाशी कुठे संबंध होता? पण त्यांना जनादेश मिळाला ना? एकदा जनादेश मिळाला की पाच वर्षांसाठी सत्तेत राहायचा अधिकार मिळतो. कारण कोणतेही असेना.

इंदिरांचे अस्थिकलश फिरवले त्याचा परिणाम १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाला असे तुम्हाला वाटते. पण काही लोक म्हणतात की राजीव गांधी हा नवा चेहरा आश्वासक वाटला म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. या दोन मतप्रवाहांमध्ये कोणाचे खरे? कोणाचेही खरे आणि कोणाचेही खोटे असले तरी राजीव गांधींना जनादेश मिळाला होता म्हणून ते ३१ डिसेंबरला परत पंतप्रधान झाले हे कसे नाकारणार?

पण कांग्रेस नि याचा अतिरेक नाही का केलेला? ४ पिढ्या??? अन्ग्रेस्स मध्ये चांगली माणसे नाहीतच जणू .. हि नाही का विश्चरीक दारिद्र्यता

परत तेच लिहित आहे- आपला नेता म्हणून कोणला निवडावे हा काँग्रेसवाल्यांचा प्रश्न झाला. त्यात इतरांनी ढवळाढवळ का करावी? तुम्हाला लाख वाटत असेल की काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी इतर लोक पात्र आहेत पण काँग्रेसवाले राहुल गांधींनाच आपला नेता मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न झाला. ते आपल्याला काय करायचे आहे?

तरी आपले न्हेरूंनी आय.आय.टी स्थापन केली हे तुणतुणे कायमच चालू असते.
मी केला हा दावा?

मी कधी म्हटले की तुम्ही हा दावा केला? माझा म्हणण्याचा अर्थ हा की काँग्रेसवर घराणेशाहीवरून टीका करण्यापेक्षा त्याहून कितीतरी जास्त महत्वाचे मुद्दे टीका करण्यायोग्य आहेत. त्यासाठी नेहरूंनी आय.आय.टीची स्थापना केली त्याचे कौतुक होते पण जी कॉलेज सुरू झाली असती ती नेहरूंच्या धोरणांमुळे सुरू झाली नाहीत त्याकडे दुर्लक्ष होते हा दावा केला. याविषयी खाली अधिक.

त्यांनी काही राष्ट्रीय संस्था / उद्योग उभारण्यात पुढाकार घेतला काहीच केले नाही असे हि म्हणणे बरोबर नाही एवढेच म्हणणे

हे मी पण कधी म्हटलेले नाही. माझा मुद्दा हा की नेहरूंनी समजा ५ आय.आय.टी स्थापन केल्या असतील पण त्यांनी आणि इंदिरांनी समाजवादी आर्थिक धोरणे राबवून अनेक उद्योगांमधून खाजगी क्षेत्राला हाकलून दिले आणि तिथे केवळ सरकारी मक्तेदारी ठेवली. ते समजा केले नसते आणि खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर त्या ५ आय.आय.टी पेक्षा जास्त कॉलेज (त्या दर्जाची- कदाचित वेगळ्या नावाने) खाजगी क्षेत्राने काढली असती कारण भविष्यात कुशल मनुष्यबळाची गरज पडेल हे त्यांना कळत नव्हते असे नाही. बिट्स पिलानी नाही का बिर्लांनी काढले? समजा खाजगी उद्योगांना वाढायला वाव दिला असता तर बिट्स पिलानीसारखी इतर कॉलेज का आली नसती? त्यामुळे नेहरूंनी आय.आय.टी स्थापन केली याचे कौतुक करताना त्यांच्या इतर धोरणांमुळे असे नुकसान झाले त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. तेव्हा सांगायचा उद्देश हा की काँग्रेसवाल्यांनी जे असे इतर नुकसान केले आहे त्यावर त्यांच्यावर जरूर टीका करा. ते अधिक प्रभावी मुद्दे आहेत. पण उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही.

चौकस२१२'s picture

8 May 2024 - 2:18 pm | चौकस२१२

बहुतेक गोष्टींशी सहमत पण " उजव्या बाजूचे लोक नेहमी घराणेशाही हा मुद्दा पुढे आणतात तो तितका प्रबळ मुद्दा आहे असे वाटत नाही."
हे पटत नाही कारण त्याचा अतिरेक, तुम्ही केजरीवाल यांचे उदाहरण दिलेत तसेच जणू राजीव .. तुलना बरोबर नाही
दोन्ही जरी "नवे" चेहरे असले तरी राजीव केवळ नेहरू घराण्याचे पुत्र म्हणून तिथे आले! केजरीवालांचे तसे नाही
आता एकदा आल्यावर काहीतरी लायक काम राजीवजींनी केलं , राजीव एक सिद्धहस्त पायलट होते म्हणजे काही बिनडोक नवहते पण मुळात त्यानं या पदावर " बसण्याचाच काय अधिकार? काँग्रेस मध्ये त्यांनी त्याआधी काय काम केलं होते , " कॉन्ग्रेस ला हरकत नसेल तर बाकीच्यांना काय त्याचे" हे तांत्रिक दृष्ट्या बरोबर असले तरी
लोकशाहीत घराणेशाही असली तर मग त्याचे उत्तर कोरिया होउ शकते ,,
असो तत्वाचा प्रश्न आहे , या बाबतीत सहमत होऊयात कि आपण असहमत आहोत !

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2024 - 2:44 pm | चंद्रसूर्यकुमार

हा वेगळा मुद्दा झाला. असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी व्हायला घराणेशाहीच असली पाहिजे असे नाही.

उदाहरणार्थः
१. २००८ ते २०१२ या काळात रशियात व्लादिमीर पुतीननी डिमीट्री मेडवेडेवना अध्यक्ष केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून पुतीनच हलवत होते.
२. २००१-०२ मध्ये आणि २०१४-१५ मध्ये जयललितांनी ओ.पन्नीरसेल्वमना मुख्यमंत्री केले होते पण सगळी सूत्रं पडद्याआडून जयललिताच हलवत होत्या.

हरकत नाही. तुम्ही घराणेशाहीचे वावडे नाही इतपत माहिती पुरेशी आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2024 - 3:01 pm | चंद्रसूर्यकुमार

तुम्ही घराणेशाहीचे वावडे नाही

बरोबर. मतदारांकडून जनादेश घेऊन कोणी सत्तेत येत असेल तर घराणेशाहीतून जरी कोणी पुढे आला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी वाटत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2024 - 3:10 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

चौकस२१२'s picture

8 May 2024 - 3:04 pm | चौकस२१२

हो हे असे "खुर्ची उबवणे" होत असते पण तरी त्यात आणि "केवळ कुटुंबातील म्हणून हक्क असल्यासारखे गादीवर बसवणे" यात फरक आहे हे तरी मान्य करा
आणि ते सुद्धा विषतः लोकशाही असलेलया देशात ( हुक्मशाहीत ते चालते हे तर गृहीतच आहे ) !

घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे नसलेल्या कार्यकर्त्याने व्यक्तीने मतदाराने करणे स्वतःचे अवमुल्यन आहे हे लक्षात घेतले पाहीजे. घराणेशाही कोणत्याही पक्षातील असॉ, शुद्ध लोकशाहीतील कार्यकर्त्यांसाठी समान संधी तत्वांचे समा-दाम-दंड-भेदाने मोडण्या योग्य शुद्ध अस्विकारणीय उल्लंघन आहे.

मला माहित नाही बाबा साहेब आंबेडकरांना घराणेशाही मंजूर होती का? पण भारतातील राजकीय जातीयवादासही घराणेशाहीने टिकवून ठेवले आहे. १४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली त्यांना दक्षिण आशियात घराणेशाहीला शरण जावे लागते असे विरोधाभासही विचीत्रच म्हणण्या लायक आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली नक्की? काही अभ्यास आहे की ठोकून दिले?

माहितगार's picture

10 May 2024 - 10:33 pm | माहितगार

प्रकाश आंबेडकर काही वेळा चुकतात नाही असे नाही तरी त्यांचा प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न बर्‍याचदा जाणवतो. स्वतः घराणेशाहीचे प्रतीक असतानाही प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या कोणतेही राजकीय घराणे मागे नसताना मुख्यमंत्री होण्याचे कौतुक केले तसे शिंदेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे केले तर टिका करेन असेही म्हटले असते तर बरे झाले असते पण त्यांनी शिंदेंवर अशी टिका का केली नसेल? शिंदेचा मुलगा राजकीय तिकीटासाठी सहज स्विकारला तर राजकीय वारसा नसलेला एक मेहनती सामान्य कार्यकर्ता नाकारला जात असतो. जे शिंदे बद्दल खरे असते तेच अमीत शहांबद्दल खरे असू शकते संगमा घराण्या बद्दलही खरे असू शकते काश्मिरच्या मुफ्ति आणि अब्दुला घराण्याबद्दलही खरे असू शकते गांधी घराण्याबद्दल खरे असू शकते राबडी देवी तेजस्वी यादवांबद्दल खरे असू शकते पटनाईकांबद्दल खरे असू शकते रेड्डींबद्दल खरे असू शकते करूणानिधी बद्दल खरे असू शकते देवगौडांबद्दल खरे असू शकते या सर्वांनी आणि मूर्ख मतदारांनी असंख्य मेहनती पण वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांचे नुकसान आणि भारतीय लोकशाहीचे अनन्यसाधारण नुकसान गेली ७५ वर्षे चालवले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 10:45 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस फॅमिली सुटली की.

माहितगार's picture

10 May 2024 - 10:59 pm | माहितगार

त्यांच्या बॉसची घराणेशाही नाकारल्यावर त्यांची कोण स्विकारतो? आरंगजेबाच्या घराणेवादाने आणि घराणेशाहीला कुर्नीसात करण्याच्या भारतीय मनोवृत्तीने केवळ मोगलाई संपली पेशवाईची वस्त्रे वंश परंपरागत असावीत या आग्रहाने केवळ पेशवाई संपली असे नाही भारतीयांचे स्वातंत्र्यही लयाला गेले

घराणेशाहीपायी कॉग्रेस पक्षाचा चुथडा झाला

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2024 - 10:15 am | अमरेंद्र बाहुबली

जसा आता महाराष्ट्र भाजपचा होतोय.

स्वरुपसुमित's picture

10 May 2024 - 7:04 pm | स्वरुपसुमित

एकाच घरात अस्ल्याने काहि तरी माहिति असेल
सम्भाळायला लोक होतेच

बाकी त्या वेळी कोन कोन होते परि वारात?

माहितगार's picture

10 May 2024 - 9:25 pm | माहितगार

कम्युनिस्ट आणि आम आदमी पक्ष घराणे शाहीचे समर्थन करतात का? डाव्या उजव्यांचा काय संबंध ?

सुबोध खरे's picture

7 May 2024 - 11:08 pm | सुबोध खरे

काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल.
हायला

वार वर्मी लागलेला दिसतोय

जळजळ फार होते आहे का?

नाही अगदी खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरलाय म्हणून?

उगी उगी

चान्गल्या वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घ्या एखादा युनानीवाला असेल तर अजून बरं

सर टोबी's picture

8 May 2024 - 8:44 am | सर टोबी

बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?

बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?

प्रतिसाद द्या कि कोण नको म्हणतोय?

आणि सार्वजनिक न्यासावर प्रतिसाद दिला कि त्याला उत्तर येणार हे गृहीत धरलेले आहेच.

त्याला खिडकीत बसल्याचा माझाच प्रतिसाद आठवायचे कारणही नाही.

पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.

बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत हि वस्तुस्थिती बदलता येत नाही म्हणून जळजळ होते त्याला उपाय काहीच नाही.

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती झाली आहे तुमची म्हणून असे खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरला आहात हे लोकांना समजून येते.

बाकी चालू द्या वैचारिक बद्धकोष्ठ

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 12:38 pm | अमरेंद्र बाहुबली

पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.
उगाच खांद्याखाली बळकट प्रतिसाद आठवले.

सुबोध खरे's picture

9 May 2024 - 6:34 pm | सुबोध खरे

भुजबळ बुवा

तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी पातळी खाली आणत नाही

तेंव्हा स्वत: वर जितकं खुश व्हायचंय तितकं व्हा !

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 6:47 pm | अमरेंद्र बाहुबली

पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.
असं एक मिपावरील साधू महात्मा बोललाय.

सुबोध खरे's picture

9 May 2024 - 7:45 pm | सुबोध खरे

छे छे

तुमच्या सारख्या महापुरुषांच्या वैयक्तिक पातळीवर उतरण्याची आमच्या सारख्या पामरांची काय बिशाद?

तुम्ही डोकं उडवलेल्या बाजीप्रभुंसारखे चौफेर थैमान घालत असता.

कोणताही धागा असो त्यात आपला भरभक्कम सहभाग असल्याशिवाय धागा पुढे सरकतच नाही.

त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं.

तेंव्हा तुमच्या पातळीवर येण्याची आम्ही हिंमतच करत नाही.

बाजीप्रभुंचा अपमान करु नका.

मुक्त विहारि's picture

9 May 2024 - 8:02 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 8:05 pm | अमरेंद्र बाहुबली

आपण वयक्तिक उतरायचं पण इतराना वयक्तिक उतरू नका सांगायचं. व्वा.

अगदी अगदी....

मला तरी, ह्या बाबतीत तुमचा उत्तम अनुभव आला आहे..

यात मोदींचा सन्मान नाहीय. भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे.

सुबोध खरे's picture

9 May 2024 - 7:50 pm | सुबोध खरे

भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे.

भारतीय जनतेच्या अकलेची काळजी तुम्ही कशाला करताय?

बाकी अकलेचा मक्ता फक्त आपल्याकडेच असतो आणि आपल्यालाच काय ती अक्कल आहे असे समजणारे लोक डाव्या पिलावळीत भरभरून आहेत.

पण त्यांची स्थिती आजकाल केविलवाणी झाली आहे.

भारतीय जनतेने त्यांना कालबाह्य केल्यामुळे केवळ जळफळाट सोडून दुसरं काहीच करता येत नाही.

अवघड जागी दुखणं आहे ते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

चालायचंच

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 1:29 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत दक्षिणेतील मतदार सुशिक्षित असल्याने तिथे मोदी आणी भाजपला कुत्र विचारत नाही. येडीअप्पाच्या जातीय राजकारणामुळे कर्नाटकात भाजप आहे. शेणपट्टयातील अशिक्षित मतदारात मोदी हीट आहेत म्हणजे मोदी भारतातील सुप्रसिद्ध नेते होत नाहीत.

चौकस२१२'s picture

9 May 2024 - 1:53 pm | चौकस२१२

गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय? (तुमच्याच तर्काप्रमाणे ) बाप रे बाप
स्वतःसाठी किती खोल खड्डा खणताय !

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 2:59 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या मागे मोदींची प्रसिद्धी नव्हती तर ईडी लावुन, घोटाळे मॅनेज करुन, तोडीपाणी करुन, पक्षफोडी करुन स्थानिक प्रबळ नेते पक्षात घेतले हे कारण होते. असे नेते स्वतःच्या नावावर जिंकले होते ना की मोदींच्या. शिवाय १०५ मिळवायला शिवसेनेचीही साथ होती. नाहीतर कसबा झाला असता. त्यामुळे शेणपत्त्यामुळे १०५ मिळाल्या हे म्हणू शकत नाही.

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 4:52 pm | कांदा लिंबू

त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!

गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय?

फक्त महाराष्ट्रच नाही; भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे; म्हणून त्यांच्या तर्काने, अख्खा भारत देश म्हणजे शेण पट्टा!

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 4:57 pm | कांदा लिंबू

त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!

आपल्या पक्षाच्या समर्थनाच्या प्रयत्नात कुठे थांबावे हे कळले नाही की माणूस किती रसातळाला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे!

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 4:57 pm | अमरेंद्र बाहुबली

भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे भारताच्या एकूण एक मतदाराने?? भाजपचे मतदार म्हणजे संपूर्ण भारत नाही.

मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा! >>>>>>>
शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 5:25 pm | कांदा लिंबू

शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.

I rest my case!

गवि's picture

9 May 2024 - 7:53 pm | गवि

I rest my case!

अहो हेच शब्द मी आत्ताच ख फ वर वापरले.

म्हणजे आपण आता डू आयडी किंवा कसे? ;-)

अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि. मिपावरील एक जण सोडल्यास सारे डु आयडी. मज्जाच मजा !!

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 9:40 pm | कांदा लिंबू

अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि.

हे असं काहीसं, नाही का?

misalpav

अहिरावण's picture

10 May 2024 - 12:52 pm | अहिरावण

१ नंबर.
कंपाईल होईल पण एक्क्जीकुशनला रनटाईम एरर नको यायला... सेम इन्स्टन्स आलरेडी रनिंग...

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 9:24 pm | कांदा लिंबू

अहो हेच शब्द मी आत्ताच ख फ वर वापरले.

Great minds think alike... or may be, fools seldom differ!

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू अहिरावण.
अहो रूपम.. अहो ध्वनी… :)

कांदा लिंबू's picture

9 May 2024 - 9:43 pm | कांदा लिंबू

दिसला एखादा लग्न समारंभ वगैरे, की आलेच पैसे मागायला, टाळ्या वाजवत!

मुक्त विहारि's picture

9 May 2024 - 9:51 pm | मुक्त विहारि

अब्दुल्ला दिवाना...

हे गाणे आठवले

अहिरावण's picture

10 May 2024 - 12:53 pm | अहिरावण

काय गडबड आहे रे मुलांनो !! किती छळाल एखाद्याला !! शोभतं का तुम्हाला हे? चला जा अभ्यास करा नीट क्लास आणि इनहेरीटन्सचा...