दिल्ली प्रदूषण: फटाके पराली इत्यादी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
8 Nov 2023 - 8:45 am
गाभा: 

फार पूर्वी एक गोष्ट वाचली होती. लेखकाचे नाव लक्षात नाही. पण गोष्ट अशी होती, एकदा वन विभागाच्या खर्चाची बचत करण्यासाठी वन खात्याचे मंत्री जंगलाच्या दौऱ्यावर आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था वन खात्याच्या गेस्ट हाऊस मध्ये गेली. मंत्री महोदयांना जंगल फिरविण्यासाठी एक हत्ती आणला. अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना पटवून दिले की हत्ती खात्याच्या कामांसाठी किती गरजेचा आहे. मंत्री महोदयांनी हत्ती, माहूत आणि हत्तीच्या चाऱ्यासाठी मोठे बजेट मंजूर केले. रात्री जेवल्यानंतर मंत्री महोदय शतपावली करत होते, त्यांना एक कर्मचारी एका वाटीत दूध घेऊन जाताना दिसला. मंत्री महोदयांनी त्याला विचारले, हे दूध कुणासाठी घेऊन जात आहे. तो म्हणाला या बंगल्यात उंदिरांचा त्रास आहे, त्यासाठी मांजर पाळली आहे. त्या मांजरीसाठी हे दूध. मंत्री महोदय, त्याच्यावर ओरडले, मांजरीला दूध द्याल तर ती उंदीर पकडेल का? बंद करा हा व्यर्थचा खर्च. त्या रात्री मंत्री महोदयांना शांत झोप लागली. अखेर, खात्याच्या खर्च कमी करण्याचा त्यांच्या उद्देश्य पूर्ण झाला होता.

दिल्लीत ऑक्टोबरपासून धुकं पडू लागते. वारे चालत नसेल तर धुकं, धूर आणि धूळ यांच्या मिलाप म्हणजे गंभीर प्रदूषण. सूर्य देवाची किरणे ही दुपारी तीन-चार वाजेपर्यंत जमीनी पर्यंत पोहचत नाही. बाहेरून येणाऱ्या वाटते की आकाशात ढग असावे. ही परिस्थिती संक्रांतीचे वारे सुरू होण्यापर्यंत राहणारच. चुकून पाऊस पडला तर एखाद दिवस प्रदूषण कमी होईल. उन्हाळ्यात तर धूळ आकाशात राहतेच. त्यामुळे पावसाळा आणि फेब्रुवारी - मार्च सोडला तर वर्षभर गंभीर स्वरूपाच्या प्रदूषणापासून दिल्लीकरांना मुक्ती नाही.

दिल्लीत दिवाळीच्या फटाक्यांवर प्रतिबंध ही वरील गोष्टी सारखा असाच उपाय आहे. हे वेगळे, दिवाळीच्या दिवशीही फटाक्यांच्या हिस्सा प्रदूषण वाढविण्यात पाच टक्के ही असण्यावर शंका आहे. तरीही प्रदूषण साठी दिवाळीचे फटाके दोषी ठरविले जातात. फटाक्यांवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रतिबंध असतो. डिसेंबर शेवटी दाट धुक्यामुळे प्रदूषण भयंकर असते पण फटाक्यांवर प्रतिबंध नसते. दिवाळीचे फटाके दोन - तीन दिवस मोठ्या प्रमाणात जळतात. फटाके विकून हजारो छोट्या दुकानदारांची दिवाळी साजरी होते. प्रदूषणाच्या नावावर गल्ली बोळ्यातील हजारो दुकानदारांचा, पटरी वर फटाके विकणाऱ्यांचा रोजगार बुडतो. त्यांची दिवाळी काळीच राहते. लोक उत्तरप्रदेश, हरियाणातून मागवितात. दिल्ली बॉर्डर वर कमाईचा एक नवीन मार्ग.

पराली ही फक्त तीन ते चार महिने जळते. प्रदूषण दहा महिने राहते. उन्हाळयात जूनमध्ये पाऊस झाला की प्रदूषण आटोक्यात येते. पण उत्तर पश्चिम भारतात सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबर पाऊस क्वचित पडतो. त्यामुळे पराली धूर आकाशात जास्त काळ टिकतो. या वर्षी उत्तर प्रदेश हरियाणात पराली कमी जळाली. पण पंजाब मध्ये मात्र पराली जाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सहा नोव्हेंबरच्या उपग्रह फोटोत पूर्ण पंजाब लाल दिसत आहे. व्होटबँक साठी किंवा दिल्लीला धडा शिकविण्यासाठी तिथली सरकार काहीही करत नाही. कदाचित् , हम तो डूबेंगे सनम पर आपको भी साथ ले डूबंगे, मानसिकता.

दिल्लीत 70 टक्के लोक अनधिकृत कॉलनीत राहतात. इथे ग्राउंड फ्लोअर 15X60 (100 टक्के कवर, प्रथम माला 15X 64/66 ही राहू शकतो). घरात आणि गल्लीत झाडे लावण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या उत्तम नगर भागात दूर-दूर एक ही झाड दिसणार नाही. या शिवाय इथल्या गल्ली - बोळ्यांत कधीच झाडू लागत नाही. आमच्या गल्लीत तर कधीच लागलेली बघितली नाही. प्रत्येक घरमालक घरा समोरचा भाग स्वतः स्वच्छ करतो. मोठ्या गल्यांत तर रस्त्यावर नेहमीच धूळ उडत राहते. रस्त्यांची साफ -सफाई म्हणा, तर आमच्या भागातील पंखा रोड वर जर तुम्ही दहा वर्ष आधी रस्त्याच्या मधल्या डीवाईडर मध्ये लागलेल्या झाडांच्या बाजूला कचरा फेकला असेल तर तो आज ही तिथेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंखा रोड वर एका बाजूला मोठा नाला आहे, नाल्या शेजारच्या रोड वर गूगल करून बघा, तिथे कचऱ्याचे मोठे-मोठे ढिगारे दिसतील. दिल्लीत पावसाळ्यात एक दोन सेंटीमीटर पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते त्याचे हेच मुख्य कारण. जरी वारे सुटलेले असेल तरी ही धूळ, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर उडत राहतात. दिल्लीत साफ सफाईचे कार्य निजी संस्थांना दिले तर गल्ली-बोळ्यात रोज झाडू लागू शकतो. गरिबांना खात्यात सबसिडी दिली जाऊ शकते. मोठ्या रस्त्यांच्या स्वच्छते साठी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. रस्त्याची स्वच्छ्ता कशी ठेवावी हे इंदौर कडून शिकता येते.

वाहने प्रदूषणसाठी सर्वाधिक जिम्मेवार आहेत. आज NCR मध्ये 70 लाखाच्या जवळ लोक मेट्रोने प्रवास करतात. मा.शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तेंव्हा मेट्रोचे सर्व प्रोजेक्ट्स वेळे आधीच पूर्ण होत होते. पण दुर्भाग्य सरकार गेली, मेट्रोच्या कामात उशीर होऊ लागला. जे प्रोजेक्ट्स 2024 मध्ये पूर्ण होणार होते दोन वर्ष उशिरा पूर्ण होतील. दिल्ली सरकारने दिल्ली-मेरठ RRTS ची मंजूरी ही उशिराने दिली. परिणाम उत्तर प्रदेश मध्ये काम पूर्ण होत आहे. पण दिल्ली भागात दोन वर्ष आणिक लागतील. इतर RRTS प्रोजेक्ट्स ही थंड्या बस्त्यात आहे.

२०१३ मध्ये डीटीसी बसेसची संख्या १५००० करण्याची घोषणा केल्या होत्या. पण झाले विपरीत बसेसची संख्या २०१३ पेक्षाही कमी झालेली आहे. हे वेगळे डीटीसीचा वार्षिक तोटा २०१३ला ६०० कोटी वार्षिक पासून २०२२-२३ मध्ये ३००० कोटींपेक्षा जास्त आहे. फक्त ईमानदार व्यक्तीच याचे कारण सांगू शकते. वाढती जनसंख्या आणि कमी होणाऱ्या बसेस मुळे बाईक, स्कूटी इत्यादी गरजेची झाली आहे कारण मेट्रो सर्व रस्त्यांवर नाही.

दिल्ली शहरातून अधिकांश भागातून मोठे कल-कारखाने आधीच बाहेर हलविल्या गेलेले आहेत. तरीही दिल्लीच्या 500हून जास्त गांवात लाल डोरा क्षेत्रांत, हजारो लहान छोटे - मध्यम कारखाने चालतात. त्यांच्यावर कायद्यांच्या पालन करण्याचे कोणतेही निर्बंध नाही. नोएडा, गाझियाबाद, साहिबाबाद , वल्लभ गढ, बहादुर गढ, सोनीपत पर्यंत हजारो कारखाने आहेत. कारखान्यांच्या चिमन्या धूर हवेत फेकणारच. त्यावर पर्यावरण दृष्टीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीची मंत्री महोदय म्हणाली, दिल्ली सरकारपाशी विभिन्न कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा डाटा नाही. त्यामुळे ठोस उपाय करणे शक्य नाही. काही वर्षांपूर्वी दिल्लीत दोन ठिकाणी प्रदूषण टॉवर प्रायोगिक स्वरुपात लावले होते. पण देखरेख अभावी तेही बंद पडलेले आहे.

शेवटी, दिल्लीला राज्य सरकारचा दर्जा दिला नसता तर कदाचित दिल्लीत प्रदूषण समस्या एवढी गंभीर झाली नसती, असे माझे व्यक्तिगत मत आहे. दिल्लीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांचे विचार आवडतील.

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Nov 2023 - 11:14 am | राजेंद्र मेहेंदळे

प्रदूषण ही समस्या सगळ्याच शहरांत उग्र होत चालली आहे. दिल्ली नेहमीच चर्चेत असते, पण कदाचित मुंबई, पुणे त्याहुन जास्त प्रदूषित असेल, फक्त वाहत्या वार्‍यामुळे तितके जाणवत नाही.
खालील गोष्टींवर कमीत कमी १००० रुपये किवा त्याहुन जास्त दंड आकारणी केली पाहीजे, निदान पैशाच्या भितीने तरी लोक कायदा पाळतील
१. रात्री चुपचाप कचरा रस्त्यावर किवा हायवेच्या आजुबाजुला आणुन टाकणे, कचरा जाळणे
२. अंधाराचा फायदा घेउन दारु प्यायला बसणे आणि रिकाम्या बाटल्या कुठेही टाकणे
३. तंबाखु,गुटखे खाउन पिचकार्‍या मारणे (कधी कधी तर चालत्या बसमधुन)
४. उघड्यावर शौच्,लघवी करणे

बाकी सार्वजनिक वाहतुक सक्षम करणे, ईव्हन्/ऑड नियम वगैरे सुद्धा उपयोगी पडतील असे वाटते. जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

या नागरिकांनीच स्वयंशिस्तीने पाळायच्या गोष्टी झाल्या. याच्या जोडीला फटाके, केरकचरा न जाळणे, रस्त्यावर शेकोट्या (त्याही नेमके हे प्रदूषण वाढते त्या थंडीच्याच काळात) न पेटवले हेही पाळले गेले पाहिजे. आणि लेखात उल्लेख केल्याप्रमाणे धुळीला अटकाव करणाऱ्या झाडी-हिरवळीचा अभाव. मुळात या भागातल्या आणि या वर्गातल्या लोकांकडून एवढेसुद्धा स्वयंशिस्तीचे पालन होणे अशक्य वाटते.
दुर्दैवाने अशीच परिस्थिती इतरत्रही निर्माण होत आहे.

कंजूस's picture

8 Nov 2023 - 11:38 am | कंजूस

एकूण दिल्लीची व्यवस्था उल्हासनगरपेक्षा वाईट आहे.

जो तो आपलं बघतो. सार्वजनिक ठिकाणी घाण करतो.

_________________
रेल्वे तोट्यात होती २००१ मध्ये. २००४ मध्ये लालुजी आले. कंदिलाच्या उजेडात त्यांनी सगळा कारभार पाहिला. कर्मचारी वर्ग आपले भत्ते,रिटायरमेंट यांच्या फिकिरात. कोणी तरी हुशार मनुष्य पाहिजे हे त्यांनी ओळखले. बिहारमधून सुधीर कुमारना आणून सर्व अधिकार दिले. त्यांनी महसूलाचं निरिक्षण करून योग्य निर्णय घेतले. इकडे लालुजींना माहिती होतं की गाय चांगली आहे,चारा भरपूर खाते,दूधही देते पण विकून पैसे येत नाहीत. ( रेल्वेला एक रुपया मिळवायला अठ्याणऊ पैसे खर्च होतात.) सुधीरनी प्रवासी वाहतूक भाडे आणि माल वाहतूक दरांत बदल केले. रेल्वे नफ्यात आली.
DTC अशाच कुणी हुशार माणसाकडे देण्याची गरज आहे.

लालू यांनी आकडेवारीत हातचलाखी करून नफा दाखवला. अर्थात हा धुर्तपणा पुढे उघडकीस आलाच.

https://timesofindia.indiatimes.com/india/lalus-railways-turnaround-tale...

White Paper shows railways below par during Lalu era

https://www.thehindu.com/news/national/White-Paper-shows-railways-below-...

कंजूस's picture

9 Nov 2023 - 1:22 am | कंजूस

फुगलेला महसूल
.....

याबाबत लेखापरिक्षकांचा आक्षेप असला तरीही रेल्वेला नफ्यात आणण्याचं श्रेय लालुजी अधिक सुधीरकुमार यांनाच जातं. मग पुढच्या लोकांना गाडी रुळावर ठेवली एवढंच. (२००१ पासून गाडी रुळावरून घसरू लागली होती.)

मुद्दा असा आहे की दिल्लीचं ट्राफीक आणि बेशिस्त वस्ती यांत सुधारणा करण्यासाठी हुशार मंत्री आणि एक कार्यकारी अधिकारी हवा आहे. एकदा का ते जमलं की प्रदूषण कमी होईल.

संगणकीकरण, आंतरजाल माध्यमातून देवघेव किंवा मुलाखती /सभा/भेटी शक्य असतानाही प्रत्यक्ष होणारी अकारण वाहतूक थांबवली पाहिजे.

ऑड इव्हन फॉर्म्युला हा अत्यंत अवघड प्रकार वाटतो. आणि त्याच वेळी त्यातील असंख्य सवलती बघता निरुपयोगी देखील वाटतो. नीट विचार केला तर त्यातून होणारी गैरसोय आणि उभे राहणारे प्रश्न प्रचंड आहेत.

तो बरोबर नाहीच आणि पुढेही निरुपयोगीच ठरेल.

जयपूर,लखनऊ,बिकानेर,आग्रा,वगैरे शहरांकडून स्वतःच्या कारने दिल्लीत येणारे अडचणीत येतील. कारण कार NCR घ्या बाहेर ठेवायची आणि योग्य नंबरची टॅक्सी घेऊन( यांची दादागिरी वाढणार) आत येणार. म्हणजे एका वाहनाला टाळले तर दुसरे येणार.

२) राजकीय पुढारी गटागटाने दिल्लीतील पार्टी चीफला भेटायला येतात. त्यांनी विडिओ कॉन्फरन्स करावी. आता संसदेत काय बोलतात ते सर्व देश बघतो तर यांनी कशाला गुप्त ठेवायचे. घ्या दोन चार पत्रकारांना कॉन्फरन्समध्ये. हे एक उदाहरण.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2023 - 8:23 am | चौथा कोनाडा

किती गंभीर आहे परिस्थिती. करण्यात येणारे उपाय या प्रचंड समस्या पुढे अतिशय किरकोळ ठरतील अशी स्थिती.

प्राचीन काळी पाऊस, वादळ, महापूर, दुष्काळ अशा कारणांनी शहर नष्ट व्हायचे तसेच दिल्लीचे होणार बहुतेक.

दिल्ली सोडणे हाच उत्तम उपाय वाटतो.

लेख वाचून दिल्लीचे कसे होणार ह्या काळजीने माझी झोप उडाली. मी पण एक उपाय सुचवतो. दिल्ली पुण्याच्या जवळ कोथरूड म्हणून एक गाव आहे तिथे हलवावी.

कंजूस's picture

10 Nov 2023 - 11:10 am | कंजूस

होय.

कोथरुडजवळ चांदणी चौक आहेच. तिथे फक्त प्राठा,गोलगप्पे,जलेबी,चाट,समोसे टपऱ्या सुरू करा की झाले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2023 - 11:36 am | राजेंद्र मेहेंदळे

रस्ता पूर्ण बनला नाही तोवरच वेदभवन कडुन वर जाताना एक टपरी, पुढे सर्विस रोडवर २-३ टपर्‍या, आणि पुढे हायवेवर एक निराची टपरी आणिसमोरच्या बाजुला जिथे मुळशीकडुन येणारा फ्लायओव्हर उतरतो त्याच्याखाली एक टपरी लागली आहे ऑलरेडी. त्यांची गिर्‍हाईके एक लेन आडवुन उभे राहतात त्यामुळे ट्रॅफिक अडते.

पहा त्या वेडा महमूद का कोण होता त्याला ह्या प्रदूषणाची आधीच कल्पना होती. म्हणून त्याने राजधानी दौलताबादला हलवण्याचा घाट घातला होता. केव्हढी ही दूरदृष्टी.
राजेंद्रजी
आम्हा पुणेकरांनाही दूरदृष्टी आहे. म्हणून आपण आधीच दिल्लीच्या "चांदणी चौकाची" पुणेरी आवृत्ती साकार करत आहोत. येऊ द्या दिल्ली इकडे.