मिसळपाव दिवाळी अंक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Oct 2023 - 10:44 am
गाभा: 

मित्रानो
दिवाळी अंकांची तयारी बहुतेक ठिकाणी चाललेली आहे.
लेखक सगळे सामान सुमान घेऊन लेखांच्या चकल्या जिलेब्या पाडायच्या तयारीत आहेत.
या पार्ष्वभूमीवर मिपाचा दिवाळी अंक कधी येणार आहे याची संपादक मंडळाकडून काहीच उद्घोषणा आलेली नाहिय्ये.
मिपाचा दिवाळी अंक नेहमीच आगळावेगळा असतो. देखणा आणि उत्तमोत्तम मजकूराची भरपूर मेजवानी असा असतो.
यंदाच्या वेळेस दिवाळी अंकात काय असेल याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कारण अजून विषयदेखील माहीत नाहिय्ये.
मिपा दिवाळी अंकात काय काय असावे असे तुम्हाला वाटते ?
माला विचाराल तर माझी अपेक्षा सांगतो.
किमान तीन मस्त रहस्य कथा.
दोन रोमँटीक कथा
एक शास्त्रीय माहितीपूर्ण लेख.
एक नव्या जगाची सफर घडवणारे भौगोलीक प्रवासवर्णन
ऐतिहासीक लेख.
चुरचुरीत आणि फर्मास अशा कविता.
आज्जीचे लेख.
बालकथा
आणि काही भन्नाट किस्से आणि कोडी.
व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे.
संगीताचा खजिना खुला करणारा एक ललीत लेख.

तुम्हाला काय वाटते "काय काय असायला हवे या वेळच्या दिवाळी अंकात?"

प्रतिक्रिया

जुइ's picture

10 Oct 2023 - 7:15 pm | जुइ

वरील यादीबरोबरच खमंग पाकृ असायला हव्यात. यानिमीत्त्याने मिपावरील सिद्धहस्त बल्ल्व आणि सुगरणी पुन्हा झक्कांस रेसिपीस घेवून येतील.

आणि आकर्षक मुखपृष्ठ तिमीर मिटवणारी पणती!

कपिलमुनी's picture

11 Oct 2023 - 7:20 am | कपिलमुनी

क्रीडा / क्रिकेट स्पेशल दिवाळी अंक निघू शकतो..
एशियन स्पर्धा, येणारे ऑलिंपिक वगैरे ..
कहाणी , किस्से ,वर्णन यांची रेलचेल असेल

पाटीलभाऊ's picture

11 Oct 2023 - 11:32 am | पाटीलभाऊ

२-३ विनोदी कथा, मुलाखती, शशक, आरोग्याविषयक लेख...

मित्रहो's picture

12 Oct 2023 - 7:48 am | मित्रहो

वर्ल्ड कप सुरू आहे तेव्हा क्रिकेट विषयी काहीतरी हवे. तसेच आशियाई खेळाविषयी देखील हवे. शंभर पदापर्यंतचा प्रवास मोठा आहे

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2023 - 9:10 am | चौथा कोनाडा

व्यंगचित्रे असतील तर छान !

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अदमासानं भारताच्या पुढील ५ वर्षांतील धोरणात्मक वाटचालीविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! :-)