गाभा:
नमस्कार,
कुटुंबा बरोबर हिवाळी सहली वर जायचा विचार सुरु आहे. लक्षद्वीप/अंदमान इथं खुप सुंदर समुद्रकिनारा आहे, असे समजले. तर या २ ठिकाना बद्दल थोडं मार्गदर्शन हव आहे. सोबत 6 महिन्याच बाळ आसनार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का ? तसेच गरज पडली तर लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध असतील का?
एकंदरीत सहलीचं नियोजन करण्यासाठी थोडं मार्गदर्शन हवं आहे
प्रतिक्रिया
9 Sep 2023 - 9:10 pm | गवि
लक्षद्वीप हे मुख्यतः प्रवाळ बेट आहे. अंदमान हा नॉर्मल जमीन डोंगरदऱ्या वगैरेचे प्रमाण अधिक असलेला तुलनेत बऱ्याच मोठ्या आकाराचा द्वीपसमूह आहे.
समुद्राचे सौंदर्य दोन्हीकडे काहीसे वेगवेगळे पण दोन्हीकडे सुंदरच बघायला मिळेल.
लक्षद्वीप येथे तुलनेत राहणे खाणे आणि वाहनांचे कमी ऑप्शन मिळतील. अंदमान अधिक सुविधायुक्त आहे.
लक्षद्वीप ड्राय स्टेट आहे. अंदमान तसे नाही (जर तुम्हाला ते आवश्यक असेल तर).
अंदमानला जंगले, किनारे, मड व्होलकानो, समुद्री खेळ, विविध लँडसकेपस असे अधिक वैविध्य मिळेल. पण मनुष्य वस्ती तुलनेत अधिक असल्याने लक्षद्वीप सारखा निवांत एकांत कदाचित कमी असेल
अंदमानचे पारडे कौटुंबिक सहलीच्या बाबतीत जड ठरते असे मत.
11 Sep 2023 - 2:15 pm | चौथा कोनाडा
+१०१ छान माहिती !
पर्फेक्ट सल्ला !
11 Sep 2023 - 2:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
व्य नि केला आहे.