अमेरिकन रस्ते -२ इंटरचेंज

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
30 Aug 2023 - 4:21 am

अमेरिकेतील रस्ते विविध प्रकारचे आहेत. काही रस्ते हे जास्त अंतर कापण्यासाठी असतात आणि तिथे सिग्नल्स अजीबात असत नाहीत. सिग्नल्स नाहीत तर मग क्रॉस ट्रॅफिक कसे असेल ? नवीन गाड्या त्या रस्त्यावर कश्या येतील किंवा ज्यांना त्या रस्त्यावरून बाहेर जायचे असेल ती मंडळी रास्ता कसा सोडतील ?

तुम्हाला मुख्य रस्त्यावरून बाहेर जायचे असेल तर त्याला "एक्सिट" असे म्हणतात. एक्सिट अनेक प्रकारची असतात आणि प्रत्येकाचे आपले असे वैशिष्ट्य असते. हा संपूर्ण विषय ट्रॅफिक इंजिनीरिंग ह्या विषयांत येतो आणि हा विषय सिविल इंजिनीरिंग चा एक भाग आहे.

ज्याला आपण सामान्य भाषेंत एक्सिट म्हणतो त्याला तांत्रिक भाषेंत इंटरचेन्ज असे म्हणतात. इंटरचेन्ज म्हणजे "रस्ता बदल".

इंटरचेन्ज अनेक प्रकारचे आहेत साधारण १५ प्रकारचे आहेत. पण प्रत्येकाचे आपले फायदे आणि तोटे आहेत. खालील घटक लक्षांत घेऊन कुठल्या प्रकारचे इंटरचेंज पाहिजे ते ठरवले जाते.

१. जागा किती उपलब्ध आहे.
२. खर्च किती येईल
३. ज्या दोन रस्त्यांत इंटरचेन्ज पाहिजे त्यावरील ट्राफिक पॅटर्न काय आहे. गर्दीच्या रस्त्यावरून साधारण रस्ता, वेगवान रस्त्यावरून दुसरा वेगवान रस्ता
४. रस्ता बदला साठी वाहनाचा वेग बदलणे बरोबर आहे कि नाही इत्यादी ?
५. जमीन सपाट आहे कि नाही
६. बर्फ पडण्याची शक्यता, पावसाची शक्यता

interchange

कॅलिफोर्निआ मध्ये तुम्हाला बहुतेक ठिकाणी सिंगल एक्सिट हा स्वस्त आणि सामान्य प्रकारचा एक्सिट सापडेल कारण बहुतेक ठिकाणी तुम्हाला अतिवेगवान रस्त्यावरून अति संथ रस्त्यावरच जावई लागते. उलट टेक्सस मध्ये जिथे खूप वेगवान रस्ते आहेत तिथे तुम्हाला ऑल डिरेक्शनल ४ लेग प्रकारचे इंटरचेन्ज सापडतील. सिंगल एक्सिट मध्ये रस्ता सोडणाऱ्या वाहनाला संथ व्हावे लागते आणि रस्ता सोडावा लागतो. उलट ऑल डिरेक्शनल मध्ये तुम्हाला वेग कमी करण्याची अजिबात गरज नाही.

ढोबळ मानाने हे प्रमुख प्रकार असले तरी प्रत्यक्षांत ह्यांत काही बदल करून आणि काळ, स्थळ, बजेट पाहून विविध प्रकारचे इंटरचेज तुम्हाला सापडतील.

युरोप मध्ये सर्रास दिसणारे "circles" अमेरिकेत जास्त दिसत नाहीत. अमेरिकन लोक मूर्ख असल्याने त्यांना circles वर गाडी चालवता येत नसल्याने अमेरिकेत circles जास्त बनवली जात नाहीत असे म्हटले जाते. सिम्प्सन ने एक विनोदी भाग सुद्धा ह्यावर केला होता ज्यांत होमर दिवसभर ट्रॅफिक circle वर अडकतो. ह्याला अमेरिकेत राऊंडअबौट असे म्हणतात. संपूर्ण अमेरिकेत साधारण ५००० राऊंड अबाऊट आहेत. तुलनेने फ्रांस सारख्या छोट्या देशांत सुद्धा १०,००० आहेत.

राऊंडअबाऊट चा एक गरीब भाऊ आहे त्याला रोटरी असे म्हणतात काही लोकांना फरक ठाऊक नसला तरी रोटरी हा स्लो असतो. तर राऊंड अबाऊट अत्यंत वेगाने जाणार्या हेवी ट्राफिक साठी असतो.

interchange

https://www.youtube.com/watch?v=7DOIJn5Xq8U

circle

विविध प्रकारचे इंटरचेन्ज विविध प्रकारच्या ट्राफिक मध्ये जास्त चांगले काम करतात त्याशिवाय प्रत्येक रस्त्यावर अपघात हे होतीलच हे गृहीत धरले पाहिजे आणि त्याप्रमाणे रिकव्हरी किती वेगाने होईल हे सुद्धा लक्षांत घेतले पाहिजे. कधी कधी एखादी लेन बंद करावी लागते, तेंव्हा हा रस्ता कसा काम करेल हे सुद्धा पाहावे लागते.

हे सर्व काही कसे चालते हे पाहण्यासाठी हा सिम्युलेटर मुद्दाम वापरून पहा :

https://traffic-simulation.de/

हे ठिकाण

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Aug 2023 - 1:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

हाही लेख उत्तम. शेवटुन दुसर्‍या चित्रातील राउंड अबाऊट पाहुन पुण्यातील ट्रॅफिक आठवले. असे अनेक राउंड अबाऊट आहेत, जिथे पिक अवर्स मध्ये ४ गाड्या एकमेकांच्या ढु ला तोंड लावुन उभ्या असतात आणि प्रत्येकाला वाटते की दुसरा पुढे सरकला की जागा होईल. आणि तोवर मागचे दुचाकीवाले खच्चुन हॉर्न वाजवत असतात. रच्याकने ईथे हॉर्न वाजवणे अपमान कारक वगैरे अजिबात मानले जात नाही, उलट हॉर्न देउन गाडी कोणाला धडकली तर "काय राव, हॉर्न दिलावता की" अशी बतावणी करता येते. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Oct 2023 - 12:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्या लेखमालेचे पुढे काय झाले?

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Oct 2023 - 12:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्या लेखमालेचे पुढे काय झाले?

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2023 - 5:36 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण लेख ! +१

अशा वाहतुक उपायांबाबर आपला देश यात आता हळूहळू जागा होत आहे !