पाकिस्तानी दहशतवादी "कसाब्"ला काय शिक्षा द्याल?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
18 Dec 2008 - 8:45 am
गाभा: 

समजा तुम्हाला मुंबई दहशतवाद हल्ल्यात पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या कसाब याला शिक्षा देण्याची परवानगी दिली तर ती काय द्याल?

मी:-- प्रथम एक डिक्लेरेशन देऊन त्याला हातात बेड्या घालुन, सोबत ३ सशस्त्र पोलिस संरक्षणात एका वैद्यकिय अधिकार्यासोबत प्रथम ३ तास शिवाजी टर्मिनस वर ठेवलेला आहे असे घोषित करुन तिथे सकाळी १०.३० ते १२.३० असे ठेवेन आणि लोकांना त्याच्यावर हवा तसा हात साफ करायला सांगेन पण तो मरणार नाही याची खबरदारी घेईन. ती तुडवातुडवी झाल्यावर नंतर त्याला लगेच इस्पितळात अडमिट करुन १५ दिवस आराम करायला देईन व नंतर पुन्हा १५-१५ दिवसाच्या अंतराने मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना हात साफ करायची संधी देऊ करेन्..एकवेळ अशी येईल की त्याने "मला गोळ्या घालुन ठार करा, पण असं सारखं सारखं लोकांच्या ताब्यात देऊन वाचवु नका" असं म्हणण्याची पाळी आणेन

तुमच्या काय आयडीया आहेत?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 8:51 am | विसोबा खेचर

माझे व्यक्तिगत मत -

त्याला सत्य आणि अहिंसेचे डोस पाजून, आहेर म्हणून खादीचे कपडे, गांधीटोपी, इत्यादी भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक पाकिस्तानात परत पाठवावे.

धन्यवाद..

तात्या.

अंतरंग....'s picture

18 Dec 2008 - 9:12 am | अंतरंग....

वेड लागले आहे का तात्या तुम्हाला......
त्या डुकराला काय अहींसेचे डोस पाजताय, गेले ते दिवस आता......

मी तर म्हणतो त्याला आपणच पुन्हा आतंकवादी बनऊन पाकीस्तानात पाठवयला पाहिजे एके ४७ आणी ग्रेनेड घेऊन,
आणी ऊडवायला लावायचे पाकिस्तानातली मुख्य ठीकाणं

येवढे लक्शात ठेवा हींसेचा बदला हींसाच, समजले नसेल तर परत विचारा आणी तरीही नाही समजले तर ठाणे मीपा कट्ट्यावर भेटा

-नवनाथ पाटील.

रम्या's picture

18 Dec 2008 - 2:39 pm | रम्या

अहो "दरबार" पंत गेल्या काही दिवसातील मिपा वरील "...गांधीवाद..." संबधीत चर्चा वाचा. तात्यांचं नक्की काय म्हणणे आहे हे समजेल!
काय तात्या बरोबर ना? :)
आम्ही येथे पडीक असतो!

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 9:13 am | सखाराम_गटणे™

>>त्याला सत्य आणि अहिंसेचे डोस पाजून, आहेर म्हणून खादीचे कपडे, गांधीटोपी, इत्यादी भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक पाकिस्तानात परत पाठवावे.

हे डोस त्याची इच्छा नसली तरी काहीही करुन पाजावेत ही णम्र विणंती.

----
सखाराम गटणे

अनंत छंदी's picture

18 Dec 2008 - 9:21 am | अनंत छंदी

बरोबर आहे तात्या तुमचं. त्याला दररोज गांधीवादावरील प्रवचने ऐकवावीत, जर डोस कमी पडतो आहे असे वाटले तर कलंत्रीसाहेबांचे गांधीवादावरील लेख त्याला सतत वाचण्यास द्यावेत. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन होऊन तो स्वतःच पंचा नेसून वैष्णव जन तो म्हणत पाकिस्तानात परत जाईल. :))

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 9:54 am | विसोबा खेचर

जर डोस कमी पडतो आहे असे वाटले तर कलंत्रीसाहेबांचे गांधीवादावरील लेख त्याला सतत वाचण्यास द्यावेत.

अनंतराव, आपले काही चुकते आहे काय? मला वाटतं आपण अहिंसक उपायांबद्दल बोलतो आहोत..

आपला,
मोहनदास मिसळपावकर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनंतराव, आपले काही चुकते आहे काय? मला वाटतं आपण अहिंसक उपायांबद्दल बोलतो आहोत..
वा!

टारझन's picture

18 Dec 2008 - 10:14 am | टारझन

वा!

वा !!!!

मैत्र's picture

18 Dec 2008 - 12:22 pm | मैत्र

+१ सहमत आहे ( या दोन वेगळ्या प्रतिक्रिया आहेत का टार्‍या आणि डॉनभौ .. आमचा व्यासंग जरा कमी आहे)

तात्या - सिक्सर हो.. अगदी सेहवाग. खडे खडे सिक्स ...

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:42 pm | भास्कर केन्डे

तात्या - सिक्सर हो.. अगदी सेहवाग. खडे खडे सिक्स ...
अगदी हेच म्हणतो.
ते सगळे लेखा त्याला बळेच गळी उतरवायचे ... अहिंसेने? =))

निखिलराव's picture

18 Dec 2008 - 12:23 pm | निखिलराव

आहो, शेवटी माणुस आहे , माणसाच्या हातुन चुका होतातचं............
हा..हा..हा.......

भेटवस्तूंत गांधीप्रेमी भाईकाकांची पुस्तके, डीवीडी, सीडीही असल्यास उत्तम!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पिवळा डांबिस's picture

18 Dec 2008 - 9:12 am | पिवळा डांबिस

माझे व्यक्तिगत मत....
त्याला वकील वगैरे देऊन नंतर दोषी ठरू द्यावा...
(त्याचा बयान आहेच...)
मग फाशी द्यावा....

जर फाशी दिला नाही तर योग्य न्याय होणार नाही......
जर वकील देऊन न्यायालयीन प्रोसेस चालवली नाही तर आपल्यांत आणि त्यांच्यात काही फरक रहाणार नाही.....

पांथस्थ's picture

18 Dec 2008 - 9:21 am | पांथस्थ

एकदम धोरणी मत

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

अनिल हटेला's picture

18 Dec 2008 - 9:31 am | अनिल हटेला

त्याला सत्य आणि अहिंसेचे डोस पाजून, आहेर म्हणून खादीचे कपडे, गांधीटोपी, इत्यादी भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक पाकिस्तानात परत पाठवावे.

काळजी नसावी,बहुधा असेच काहीतरी होइन...
फार-फार तर जेलात बसून रोज मुर्ग मुसल्लम तुडवीन आपल्याच छाताडावर बसून....
X-( X-(
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 9:35 am | भास्कर केन्डे

वकील द्यावा व नंतर काही वर्षांनी सडवून फाशी द्यावे... दरम्यान वर सुचवल्या प्रमाणे स्टेशनावर उभा करुन हात साफ करायला लावावे, दररोज सकाळ संध्याकाळ हेड-फोन लाऊन अहिंसेचे तत्वज्ञान ऐकवावे व सोबतच...
दहशतवादी हल्ल्यात ज्या निरपराध लोकांचे जीव गेले त्या सर्वांच्या कुटुंबियांचे हाल त्याला दररोज उघड्या डोळ्याने पहायला लावावे.

हे सगळे झाल्यावर त्याला पश्चताप झालेला असेल तो सगळ्या जगाला दाखवावा व नंतर त्याला फाशी द्यावे.

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 9:52 am | विसोबा खेचर

दरम्यान वर सुचवल्या प्रमाणे स्टेशनावर उभा करुन हात साफ करायला लावावे,

अरेरे! किती घोर शिक्षा ही..! अशी शिक्षा देणार असाल तर मी एक दिवस उपोषण करीन आणि संध्याकाळी तळलेले बदाम अन् खारे काजू खाऊन ते सोडीन..

चला, आता माझी प्रार्थनेची वेळ झाली. शेळीच्या पायाला जखम झाली आहे तिथेही पाला बांधायचा आहे!

तात्या.

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 4:02 pm | विनायक प्रभू

आता शेळीच्या पायाला जखम झाली कशी?
पाला कुठल्या प्रकाराचा.
परत जखम होणार नाही ह्यासाठी समुपदेशनाची गरज आहे का?

टारझन's picture

18 Dec 2008 - 4:13 pm | टारझन

आता त्या शेळीला तरी सोडा की राव !! आय मीन समुपदेशन

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:45 pm | भास्कर केन्डे

आय मीन समुपदेशन
आगा आया आया आया =)) =))

असला विनोद टारजनच करु जाने बॉ... नावाची लाज राखलीत ;)

कोलबेर's picture

18 Dec 2008 - 10:46 pm | कोलबेर

प्रभु सरांचेच ट्रेनिंग आहे हे =))

टारझन's picture

18 Dec 2008 - 10:31 am | टारझन

त्याला सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात , तसेच कलंत्रीसाहेबांच्या लेखांऐवजी त्यांची ट्रिटमेंट द्यावी, ह्यातुन दोन फायदे , अतिरेक्याचे हृदयपरिवर्तन आणि कलंत्रीसाहेबांना काही तरी भरिव कामगिरी करण्याची संधी !! ह्याचा फायदा मिसळपावलाही होईल !

(कृ.ह.घे.)

(गांधीवादाने प्रभावीत) टारात्मा गांधी

कशिद's picture

18 Dec 2008 - 10:38 am | कशिद

त्याला तुनेच केलेला गोली बार दाखवावे ..अणि त्यामुल बिचिराग ज़लीली घर त्य्मुले अनाथ ज़लेल्य कुतुम्बंच चित्रण दाखवावे .

आणि मगत्याचा खटला फास्ट ट्रैक कोउर्तात चालवून त्याला cst स्थानकावर फाशी द्यावी ..

कारन तात्या हिंसेने प्रश्न सुटणार नाही हे मला मान्य, पण अस काही केले पाहिजे की कोणाला हिंसेचा विचार करताना भीती वाटली पाहिजे ....

अस दबदबा अहिंसा निर्माण कर्रू शकली तर अहिन्से च उपयोग नाही तर घाला गोल्या तिचय्यला त्याला ....

अक्षय

घाटावरचे भट's picture

18 Dec 2008 - 4:36 pm | घाटावरचे भट

त्याला मराठी वाचावयास शिकवून नंतर वरील प्रतिसाद रोज ५०० वेळा वाचण्याची शिक्षा द्यावी..... ;)
(ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.आ.सू आ.इ.ई.उ.ऊ.ओ.औ.अं.अ:)

वाटाड्या...'s picture

18 Dec 2008 - 11:23 pm | वाटाड्या...

असेच..वरचा प्रतिसाद दिवसातुन ५०० वेळा उजवीकडुन डावीकडे व डावीकडुन उजवीकडे वाचावयास लावा.....

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

अक्षयराव,

मिपावर प्रथमपासून शुद्धलेखनाचे, प्रमाणभाषेचे वगैरे कुठलेही धोरण अथवा बंधन मी ठेवलेले नाही. का? तर त्या गोष्टींचा कुणालाही धाक वाटू नये आणि ज्यालात्याला मनमोकळेपणाने लिहिता यावे व शुद्धलेखन व प्रमाणभाषेच्या मुद्द्यावरून कुणाही डुढ्ढाचर्याला कुणालाही हिणवण्याची संधी मिळू नये म्हणून!

त्याला तुनेच केलेला गोली बार दाखवावे ..अणि त्यामुल बिचिराग ज़लीली घर त्य्मुले अनाथ ज़लेल्य कुतुम्बंच चित्रण दाखवावे .

अहो पण त्याचा असा वचपा नका काढू! :)

आपण तर साफच काशी करून टाकली आहे! :)

असो..!

चालू द्या, लिवा बिन्दास्त काय हवं ते तिच्यायला! :)

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व..

तात्या.

भास्कर केन्डे's picture

19 Dec 2008 - 10:34 am | भास्कर केन्डे

अहो पण त्याचा असा वचपा नका काढू!
=)) =))

आपण तर साफच काशी करून टाकली आहे!
काय पण चपलख बसलाय राव हा टोला =)) =))

काशिदांनी काशी केली तर बिघडली कुठं. तशी ती कुणालाही करायला कायद्याची मुभा आहे. ;)

मराठी_माणूस's picture

18 Dec 2008 - 11:58 am | मराठी_माणूस

त्याची एक जागतीक पत्रकार परिषद आयोजीत करावी, आणि त्याला सत्य परिस्थिती सर्वासमोर सांगण्यास भाग पाडावे. त्याला कोणि, कुठे आणि कशासाठी प्रशीक्षण दिले हे सर्व जगाला माहीत व्हावे आणि सर्वात शेवटी त्याने जगातल्या सर्व दहशतवादी लोकाना सांगावे की त्याला आता ह्या गोष्टीचा पुर्ण पश्चताप झाला आहे, निरपराध लोकांची हत्या केल्याबद्दल दु:ख होत आहे, स्वत:चे आयुष्य पुर्ण वाया गेल्यासारखे वाटत असुन ज्या लोकांनी त्याला ह्यात ओढले आहे त्याना कठोर शिक्षा करावी. कोणत्याही तरूणानी त्यांच्या आमिषाला बळी पडु नये.

ह्यातुन दोन गोष्टी साध्य होतील , एक म्हणजे सर्व जगासमोर शेजार्‍यांचा बुरखा फाडला जाईल, आणि काही द्वीधा मनःस्थितील तरुण ह्या मार्गा पासुन परावृत्त होण्यास मदत होईल.

ह्या व्यतरीक्त वेळेचा अपव्यय न करता त्वरीत खटला चालवुन कठोर शीक्षा देउन ती तीतक्याच जलद गतीने अमलात ही आणावी. कमीत कमी आता तरी जुन्या चुका न करता आपण हे खुप गंभीर पणे घेतले आहे हे दाख्वुन द्यावे.

अवलिया's picture

18 Dec 2008 - 12:49 pm | अवलिया

निवासी अनिवासी चर्चे प्रमाणेच यावर गरमागरम चर्चा होवु शकते / अपेक्षित आहे.
ज्यांना या चर्चेच्या निष्कर्षावर पैज लावायची असेल त्यांनी माझ्या ख व मधे नोंद करावी.
बेईमानीचा धंदा आम्ही इमानदारीत करतो त्यामुळे कुठलीही फसवणुक होणार नाही.

(बुकी) अवलिया

अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

18 Dec 2008 - 1:15 pm | ब्रिटिश

त्याला विष पाजुन फासावर चडवा,
मशीनगन न तेच्या बॉडीची छलनी करा
विस माल्याच्या टावर वरुन खाली फेका आनी
शंबर ट्रक अंगावरन न्या

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

चिन्कु's picture

18 Dec 2008 - 3:11 pm | चिन्कु

अरे तुमच्या बोलण्याने जर सरकार चालु लागले तर तुम्हाला असे सल्ले देण्याचि वे़ळच का आलि असती ?
जे तुमच्या आमच्या मनात आहे ते कधिही होणार नाही ह्याची काळ्जी घ्यायला हे सरकार समर्थ आहे.
तरी चिन्ता नसावी. जे जे होइल ते ते पहात रहा.
आणि हात चोळत रहा....

अमोल जाधव's picture

18 Dec 2008 - 7:25 pm | अमोल जाधव

त्याला हीमेश आनि आभिजीत सावन्त चि गानि आइकवावीत, कानतुन रक्त येउन येउन मरुन गेला पहीजे.

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:51 pm | भास्कर केन्डे

त्याला हीमेश आनि आभिजीत सावन्त चि गानि आइकवावीत, कानतुन रक्त येउन येउन मरुन गेला पहीजे.
=)) =))

किती क्रौर्य हे!!!!

हे त्याला कळले तर या भयानक शिक्षा भोगण्यापेक्षा तो आत्महत्याच करील. अगदी सोळा आणे सांगतो.

अंतु बर्वा's picture

18 Dec 2008 - 9:09 pm | अंतु बर्वा

>>त्याला हीमेश आनि आभिजीत सावन्त चि गानि आइकवावीत, कानतुन रक्त येउन येउन मरुन गेला पहीजे.

कींवा त्याला रामगोपाल वर्माचा "आग" दिवसातुन पाच वेळा दाखवावा......

हरकाम्या's picture

18 Dec 2008 - 10:35 pm | हरकाम्या

त्या हरामखो राला भुकेल्या वाघसी हापुधे टाका

घाटावरचे भट's picture

19 Dec 2008 - 1:36 pm | घाटावरचे भट

अत्यं तुत्त मप्रति सादआ हे. आप लेविचा रैकू नछा नवाट ले.

आपला अभिजित's picture

18 Dec 2008 - 11:22 pm | आपला अभिजित

आवाक्यात नसलेल्या विषयांवर चर्चा करण्यात काय अर्थ आहे?

नुसते मनोरंजन म्हणून????

सद्य परिस्थितील रजनैतिक बंधने सांभाळून कसाबला आणि पाकिस्तानला कसा धडा शिकविता येइल, यावर चर्चा होउ शकते.
पण केवळ काल्पनिक चर्चेने काय साधणार?

`मिपा'ला ऑर्कुट कम्युनिट्यांचे स्वरूप येऊ नये, अशी अपेक्षा आहे. आणखी एका धाग्यावरही मी असाच अभिप्राय टाकला आहे. काही दिवसांनी `अमक्याला तमके नाव सुचवा' , `वरच्याला उखाणा जोडा किंवा म्हण पूर्ण करा' असे विषय येऊ लागतील!!

तात्या,

तुम्ही तरी अशा विषयांना प्रोत्साहन देऊ नये, असे वाटते.

टारझन's picture

19 Dec 2008 - 3:32 am | टारझन

बरे झाले "आपला अभिजीत" आपल्या मिपाचे ओनर णाहीत .

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

`मिपा'ला ऑर्कुट कम्युनिट्यांचे स्वरूप येऊ नये, अशी अपेक्षा आहे.

थोडीफार मजामस्ती गंमतजंमत ही चालणारच. नुसते बाप मेल्यासारखे गंभीर चेहेरे करून चर्चा करायला हे मनोगत नव्हे!

आपण मिपाची ऑर्कुट कम्युनिट्यांशी सरसकट तुलना करताय! मिपावरचे असे किती उतमोत्तम लेखन मी आपल्याला दाखवू की जे ऑर्कुटवर औषधालादेखील सापडणार नाही?

हे पाहा एक उदाहरण! आपला प्रतिसाद अर्थातच या लेखाला नाही हा भाग वेगळा! अलिकडेच अवलियांनी लिहिलेला हा लेखही आपण वाचलेला दिसत नाही! तिथे प्रतिसाद द्यायला, मनमोकळेपणाने दाद द्यायला आपल्याला वेळ नाही, वर शिवाय मिपाची ऑर्कुटशी तुलना करायला आपण मोकळे!

आज मराठी आंतरजालावर दर आठवड्याला पाहुण्या संपादकाने लिहिलेला संपादकीय हा प्रकार सर्वप्रथम मिपाने आणला, आणि गेले २३ आठवडे हा उपक्रम राबवला गेला/जात आहे त्याबद्दल कधी आपण आवर्जून उल्लेख केलेला मला आठवत नाही!

मिपाची (आपल्या मते!) वैगुण्ये दाखवातला मात्र आपण सदैव तयार!

तेव्हा मिपाचे काय करायचे आणि काय नाही, ते कसे चालवायचे अन् कसे नाही हे मी पाहून घेईन. आपल्या सल्ल्याची/अभिप्रायाची गरज नाही...!

काही दिवसांनी `अमक्याला तमके नाव सुचवा' , `वरच्याला उखाणा जोडा किंवा म्हण पूर्ण करा' असे विषय येऊ लागतील!!

तेव्हाचे तेव्हा पाहू!

धन्यवाद..

तात्या.

आपला अभिजित's picture

19 Dec 2008 - 6:16 pm | आपला अभिजित

सगळे मुद्दे मान्य.
काही आगळीक झाली असल्यास पोटात घ्या तात्या!

प्राजु's picture

19 Dec 2008 - 9:20 pm | प्राजु

अभिजितचे म्हणणे पटते आहे.
मिपाची ओर्कूट कम्युनीट्यांशी तुलना होणे शक्य नाहिये.. पण तरिही.. हे असले धागे काढून काय साध्य होणार?? थोडीफार मौज मजा ठिक आहेच हो पण ती तर आवांतर आणि अतिआवांतर प्रतिसादातूनही तसेच.. "खरं खरं सांगा.. " "मिपाचे जावई आणि सुना" "बुर्जी मिळण्याची, वडापाव मिळण्याची, मिसळ मिळण्याची ठिकाणे" या अशा धाग्यांतून होतेच आहे.. हे आवश्यकही आहे. पण हे "कसाब ला शिक्षा" सारखे धागे कोणी मौज मजेसाठी काढत असेल असे मला नाही वाटत. इथे मौजमजेसोबतच सकस लेखनही तितकेच जोमाने व्हावे.. या तळमळीपायीच अभिजितने हा प्रतिसाद लिहिला असावा असे मला वाटते. थोडा शांतपणे विचार केला तर असे दिसून येते की, गेल्या काही दिवसांत मनमोकळेपणाने वाचता येईल आणि वाचून झाल्यावर एक उत्तम लेख वाचल्याचं समाधान मिळेल.. असे लेखन (एक संपादकीय सोडले तर)खूपच कमी झाले जे पूर्वी खरंच होत होते. नुसते काथ्याकुटच होताहेत.. ..
तात्या, अभिजीतच्या प्रतिक्रियेकडे एक उपदेश म्हणून न पहाता मिपाप्रेमीची कळकळ म्हणून पहावे अशी मिपावर मनापासून प्रेम करणारी .. मिपाची संपदिका म्हणून मी आपल्याला विनंती करते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 1:37 am | विसोबा खेचर

थोडा शांतपणे विचार केला तर असे दिसून येते की, गेल्या काही दिवसांत मनमोकळेपणाने वाचता येईल आणि वाचून झाल्यावर एक उत्तम लेख वाचल्याचं समाधान मिळेल.. असे लेखन (एक संपादकीय सोडले तर)खूपच कमी झाले जे पूर्वी खरंच होत होते.

सहमत आहे, परंतु अश्या फेजेस येतच असतात..चिंता नाही!

सध्या कामधंद्यानिमित्त खरंच सवड नाही परंतु एकंदर परिस्थिती पाहता तात्याला पुन्हा लेखणी उचलावी लागणार असे दिसते आहे!

असो..

तात्या, अभिजीतच्या प्रतिक्रियेकडे एक उपदेश म्हणून न पहाता मिपाप्रेमीची कळकळ म्हणून पहावे

प्राजू, या विषयी तुझ्याशी केव्हातरी प्रत्यक्ष बोलेन..

तात्या.

घाटावरचे भट's picture

20 Dec 2008 - 6:45 am | घाटावरचे भट

तात्याला पुन्हा लेखणी उचलावी लागणार असे दिसते आहे!

उचला उचला. आणि आधी ती लेखणी रोशनीवर चालवा.
(पण तुम्हाला लेखणीपेक्षाही कळफलक उचलावा लागेल असं दिसतंय)

हुप्प्या's picture

19 Dec 2008 - 7:08 am | हुप्प्या

आपल्या हळुवार, तरल मनाला असली अश्लाघ्य शिक्षा वाचून वेदना झालेल्या कळल्या. पण नीच कृत्याला नीच शिक्षा मिळावी. इतक्या भारताच्या अनमोल लोकान्ना यमसदनी पाठवणार्‍याला, असन्ख्य लोकान्चे आईबाप, मुले मारून त्याना निराधार करून त्यान्चे आयुष्य उध्वस्त करणार्‍याला
असाच धडा शिकवावा.
आपण हे नीच कृत्य करून मेलो तर स्वर्ग लाभेल अशी या अतिरेक्यान्ची तर्कदुष्ट श्रद्धा आहे. त्याला तर्कदुष्ट पद्धतीनेच उत्तर द्यावे. मानहानी, अपमान असल्या गोष्टीनी कदाचित असल्या गोष्टीना आळा बसेल. निव्वळ कायदेशीर फाशीने काही होणार नाही. ह्या अतिरेक्यान्ना मरायलाच तयार केलेले असते. नव्या अतिरेक्यान्ना फाशीचा काहीही धाक वाटणार नाही. उलट हुतात्मा होण्याचे, स्वर्गात जाण्याचे साधन वाटते.