हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
21 Jun 2023 - 12:11 pm

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-for...

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....
कशी पडलीस आकर्षणा गं ?

गाजवून एमपीएससी चमत्कारा ग,
आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग

जरी जाहलीस वनाधिकारी ग,
नाही जाणले श्वापद विकारी ग

सावध हरिणी सावध ग,
करील कुणीतरी पारध ग

तुझी बुद्धी गेली वाया ग,
गेली कूजून सुंदर काया ग

राहीली महाराष्ट्र सेवा ग !
राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Jun 2023 - 12:40 pm | कर्नलतपस्वी

वाईट्ट घटना.

मुक्त विहारि's picture

22 Jun 2023 - 10:28 am | मुक्त विहारि

का रे भुललासी, वरलीया रंगा....

इपित्तर इतिहासकार's picture

22 Jun 2023 - 1:48 pm | इपित्तर इतिहासकार

ते माहिती नाही ,

पण पोरगा पोरगी नात्यात होते, आधी रिलेशनशिप मध्ये होते, तयारी सोबत करत होते, लिव्ह इन मध्ये राहत होते.

मागच्या attempt च्या वेळी पोराने स्वतः ब्रेकअप केला, पण त्यात attempt मध्ये पोरगी वनाधिकारी झाली, अन् पोरगा क्लिअर झाला नाही.

त्यानंतर पोरीच्या घरच्यांनी पोरीचे लग्न ठरवले. पोरगा जाऊन भेटून पण आला आहे त्यांना (पोरीच्या पालकांना) की बुआ थोडावेळ थांबला तर बरे होईल, मी पण अभ्यास करतोय मी पण पोस्ट काढतो मग दोघांचे लावून द्या.

पण आधीचे ब्रेकअप असल्यामुळे पोरीने पण खास इंटरेस्ट घेतला नाही, apparently friendly terms असावेत दोघांचे म्हणुन सोबत गेले ट्रेकिंगला जिथे पोराने पोरीचा काटा काढला अन् फरार झाला...

बाकी असले विषय घेऊन कविता करता येतात ह्याचे मात्र अंमळ नवलच वाटले.

समाजमाध्यमावरुन साभार (लेखक अज्ञात)
---------------------------------------

मला माहीत नाही माझे खालील बोलणे आता योग्य आहे की नाही. पण मला हे बोलणं महत्त्वाचं वाटत आहे म्हणून बोलतो.

घटनाक्रम:
१.मुलगी MPSC मध्ये राज्यात तिसरी आली.
२. सत्कारासाठी पुण्यात आली.
३. मित्रासोबत गढावर फिरायला गेली.
४. तिचा खून झाला.
५. आणि मुलगा बेबत्ता झाला.

माझा अंदाज:
१. बातमीनुसार ती मित्राबरोबर फिरायला गेली आहे हे कुटुंबीयांना माहीत होते.
जर असे कुटुंबीय सांगत असतील तर एकतर त्यांना खरंच माहीत असेल किंवा मेल्यानंतर मुलीची बदनामी होऊ नये म्हणून अस सांगितलं जातं असेल.

२. मुलगी मुलाबरोबर एकटी फिरायला गेली.
याचाच अर्थ तो फक्त मित्रच नव्हता तर तिचा प्रियकर होता.

३. मुलीचा खून का झाला असावा?
अंदाज १:
MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच्या प्रियकराची माहिती घरच्यांना दिली असावी.
मुलगा काय करतो याची विचारणा पालकांनी केली असावी.
कदाचित तो कमी पगाराची खाजगी नोकरी करत असावा किंवा तिच्यासोबतच MPSC ची तयारी करत असावा याची कल्पना मुलीने घरच्यांना दिली असावी.
तुला मिळालेल्या यशामुळे तुला यापेक्षा चांगला मुलगा मिळेल, अस मुलीला पालकांनी समजावलं असेल. आणि मुलगी पण या गोष्टीशी सहमत झाली असावी.
आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.)

अंदाज २:
MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच विचार केला असावा की आपल्याला या मुलापेक्षा आता चांगलाच मुलगा भेटेल.
आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.)

४. मुलाने मुलीचा खून का केला असावा, त्याची काय मानसिकता असेल?
मुलाबरोबर संबंध ठेऊनही मुलगी राज्यात तिसरी आली. याचाच अर्थ हा की मुलगा हा खूप Mature आणि Supportive असावा.
कदाचित तो खूप भावनिक आणि मुलीवर खूप जास्त प्रेम करणारा असावा.
स्वतःला मिळालेल्या यशाला हुरळून जाऊन मुलगी असा निर्णय घेईल याची त्याला कल्पना सुद्धा नसावी.
स्वतःचा प्रेमभंग झाल्यामुळे त्याने हे पाऊल कदचित उचलले असेल.

जर खरंच अस घडलं असेल तर, माहीत नाही किती लोक त्या मुलाच्या भावना समजाऊन घेतील.

आणि खरंच जर असच घडलं असेल तर ती मुलगी पण तितकीच स्वतःच्या मृत्यला जबाबदार आहे, यात काही शंका नाही.

मुली चांगली संधी आणि दुसरा चांगला पर्याय मिळाला तर कधीचं प्रेमाला प्राधान्य देत नाही हे ही तितकंच खरं आहे. निस्वार्थ आणि खरं प्रेम करणाऱ्या खूपच कमी मुली असतील.

फार चुकीचे लिहिलंय.एखाद्याचा जीव घेणारा कसला Mature आणि Supportive....

समाजमाध्यमामधील प्रतिकिया, त्यांच्यात कालानुरुप होणारा बदल पहाण्यासारखा आहे.

१. सुरवातीला श्री दर्शना पवार यांना सहानुभुती होती, त्यांनी चुक केली आणि श्री राहुल हांडोरे हा एक राक्षसी प्रकारचा माणुस आहे. त्याला फाशी व्ह्यायला पाहीजे, चौरंग केला पाहिजे अश्या मागण्या होत्या.
२. जशी अधिक माहिती( त्यांचे रहायचे ठिकाण, एकत्र जायचा फोटो) बाहेर आली तश्या लोकांच्या प्रतिकिया बदलु लागल्या.
३. बर्‍याचश्या लोकांमध्ये श्री राहुल हांडोरे यांना श्री दर्शना पवार यांनी मोठ्या पदी निवड झाल्यानंतर लग्नास नकार दिला अशी वंदता आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चारित्राची चीरफाड होणार हे नक्की.
४. बहुतेक तरुण मुलांमध्ये आणि काही प्रमाणात तरुण मुलींमध्ये श्री दर्शना पवार यांना सहानुभुती मिळणे बंद झाले आहे. लोक फक्त खुनाबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत.

Bhakti's picture

23 Jun 2023 - 11:46 am | Bhakti

बहुतेक तरुण मुलांमध्ये आणि काही प्रमाणात तरुण मुलींमध्ये श्री दर्शना पवार यांना सहानुभुती मिळणे बंद झाले आहे.

म्हणजे ती नकार दिल्यानंतर किंवा देण्यासाठी इतक्या विश्वासाने त्याच्या बरोबर एकटी गेली.आणि तिचा विश्वासघात झाला.
मुलींना आपला समाज अजूनही सुरक्षित नाही तर...
दर्शना तुझ्या आत्म्याला शांती मिळो!
:(

म्हणजे ती नकार दिल्यानंतर किंवा देण्यासाठी इतक्या विश्वासाने त्याच्या बरोबर एकटी गेली.आणि तिचा विश्वासघात झाला.

खरे तर प्रथमदर्शनी विश्वासघात दोघांचाही झालेला दिसत आहे.

बळी गेलेल्या व्यक्तीस सहानुभूती मिळो अथवा न मिळो.

स्वतः वर प्राणघातक हल्ला झाला आणि स्वतः चा / कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या हत्येस वगळता कोणत्याही कारणाने हत्या समर्थनीय होऊ शकत नाही. अगदी आधी हो म्हणून नंतर नाही म्हटले तरी. पुढे लग्न होऊन नंतर देखील दूर होण्याची इच्छा झाली तरी. तथाकथित स्वार्थी उद्देशाने असे केले असेल तरी. काहीही असो.
कायदा हातात घेऊन कोणाचीही हत्या ही हत्याच असते आणि ती सुरक्षित मानवी समाज या संकल्पनेची माती करणारी असते. त्याचे कणभरही समर्थन योग्य नव्हे.

सदर हत्या हि थंड डोक्याने ठरवुन केलेली वाटत नाही.
१. मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली नाही.
२. मोबाईल फोन व इतर खाजगी वस्तु मृतदेहापाशी होत्या. त्यामुळे ओळख पटवणे सहज शक्य होते.
३. श्री राहुल हांडोरे रेल्वेने भारतभर फिरत होते. त्यांच्याकडे कोणतीही योजना नव्हती. प्रवासामध्ये ते फोन करुन घरुन पैसे मागवत होते. त्यामुळे पोलीस सहज मागोवा घेऊ शकतात ते त्यांना अनभिज्ञ होते.
४. ते दोघे गडावर गेले होते, त्यामुळे सदर हत्या अपघात (उदा. पाय घसरुन पडणे इ.) म्हणुन दाखवणे सहज शक्य होते.

रात्रीचे चांदणे's picture

23 Jun 2023 - 8:26 pm | रात्रीचे चांदणे

एका खुन्याला श्री काय, आहोजाहो काय. वरून सहानभुती.

दोन्ही बाजुला 'श्री' वापरले आहे. अजुन तरी श्री राहुल हांडोरे हे आरोपी आहेत, खुनी नाहीत.
https://youtu.be/VPBhrob56ok?t=60 येथे पोलिस अधिकारी 'आरोपींना काढुन घ्या' हे सांगत आहेत.
बाकीचे तुमचे चालु द्या.

इपित्तर इतिहासकार's picture

24 Jun 2023 - 6:32 am | इपित्तर इतिहासकार

तुम्ही आरोपीचे १६४ सीआरपीसी ऐकल्याच्या थाटात बोलू लागले की हो.... त्याचे १६४/ १६१ अन् स्पॉट पंचनामे तोंडपाठ असल्यागत बोलून लोकांना तुमचे चालू द्या म्हणण्यास काय आहेच व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी इत्यादी.

बाकी उरली पोलिसांची भाषा, तर बोली मराठी मध्ये जश्या वऱ्हाडी, अहिराणी ह्या जुन्या बोली आहेत तसे पोलीस प्रशासकीय अन् महसूल प्रशासकीय ह्या भाषा पण असाव्यात इतक्या त्या समजण्यास वेगळ्या आहेत.

लेखी मध्ये तर पोलीस सुट्टीचे अर्ज लिहिताना पण "आम्ही आपल्या परिमंडळ/ परिक्षेत्रात अमुक इतके दिवस पासून कर्तव्य बजावत आहोत, तरीही आम्हाला अर्जित अवकाश रजा मंजूर करणेत्त यावी असे तर्फे आमचे आपणांस नम्र विनंती" वगैरे भाषेत लिहितात.

ते स्वतःला पण आदराने संबोधतात. पोलीस स्टेशन बघावे लागते त्यासाठी जरा जवळून समजून घ्यायला.

मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे. माध्यमखटला( मिडीया ट्रायल ) ह्या गोष्टींचा मला तिटकारा आहे.
बाकी तुमचेही चालु द्या.

इपित्तर इतिहासकार's picture

24 Jun 2023 - 2:50 pm | इपित्तर इतिहासकार

मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे.

ओसामा बिन लादेन वर भारतात एकही केस नाही, किंवा Conviction पण नाही... त्याला पण
"श्री ओसामा बिन लादेन" "लादेन जी" वगैरे संबोधन वापराल का ? तटस्थ राहायचे म्हणुन ?

तटस्थपणा सोयीस्कर असू नये इतकेच ;)

आणि आपण चिंता करू नये मला जे चालवायचे ते अन् तितके मी चालवणारच अगदी तुम्ही "चालू द्या" सांगितले नाही तरी...

धन्यवाद.

हि मृतदेहाची बातमी येईपर्यंत श्री दर्शना पवार आणि श्री राहुल हांडोरे हे लोक भारतात अस्तित्वात आहेत हेही मला माहिती नव्हते. जर ती बातमी आली नसती तर त्यांचे काय झाले तेही कळाले नसते.
त्या दोघांमध्ये काय झाले किंवा होते ते त्यांनाच माहीती असेल. ती मुलगी स्वत:च्या मर्जीने त्याच्याबरोबर गेली होती.
ह्यात तीचे अपहरण, फसवणुक, चोरी, बलात्कार, स्त्री असल्यामुळे अन्याय असे काही झालेले दिसत नाही, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचीही बाब नाही.
श्री दर्शना पवार यांनी कोणतेही समाजकार्य, देशसेवा केल्याचे माझ्या माहितीत नाही. त्यांचे सगळ्यात मोठे कर्तुत्व हे एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होणे हे आहे.
श्री राहुल हांडोरे यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचे मला माहिती नाही.
हे पुर्णपणे खाजगी प्रकरण आहे. त्यामुळे मला कोणतेही मत नाही.
उगाच एमपीएससीची परिक्षा पास झाले म्हणुन रडगाणी गाण्यात काही लोकांना रस वाटत असेल, मला नाही.

ओसामा बिन लादेन वर भारतात एकही केस नाही, किंवा Conviction पण नाही... त्याला पण
"श्री ओसामा बिन लादेन" "लादेन जी" वगैरे संबोधन वापराल का ? तटस्थ राहायचे म्हणुन ?

लादेन किंवा तत्सम लोक हे भारतावर किंवा हिंदु समाजावर हल्ला करतात. त्यांनी खाजगी हल्ले केल्याचे मला तरी माहिती नाही. कृपया तुम्हाला तशी माहिती असल्यास द्यावी.
खाजगी भांडण्/हल्ला आणि संघटीतरित्या केलेला हल्ला यातील फरक तुम्हाला कळत असेलच.

महिरावण's picture

24 Jun 2023 - 3:17 pm | महिरावण

Trump हा आयडी डोक्यावर पडलाय का?

आंद्रे वडापाव's picture

24 Jun 2023 - 7:37 pm | आंद्रे वडापाव

हायपोथेटिकली ,
'डोक्यावर पडणे' या फिनॉमिननसाठी, 'डोके असणे' ही पुर्वअट पूर्ण झालेली असावी लागते.