सुरतेचे मौल्यवान सामान घेऊन जाताना - समारोप भाग ९

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
4 Jun 2023 - 1:56 am
गाभा: 

९

सुरतेचे मौल्यवान सामान घेऊन जाताना
समारोप भाग ९

९

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेकोत्सवदिना निमित्ताने महाराजांना मिलिटरी कमांडरांच्या वतीने वंदना

भाग ९
समारोप
पुरावे आणि साधनांचा विचार करून मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून हा आलेख सादर केला आहे. आम्ही म्हणतो तसेच घडले असा दावा नाही. मात्र एकंदरीत मोहिमांचा आवाका आणि लष्करी चातुर्य याची ओळख वाचकांना, गड प्रेमींना, इतिहासाबद्दल आस्था असणाऱ्यांना व्हावी या उद्देशाने केलेले लेखन आहे. यात भर घालायला किंवा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या तर आभारी राहीन. मात्र वाद निर्माणकरून खोड्या काढलेल्या लेखनास प्रतिसाद दिला जाणार नाही.

वाचकांच्या विचारासाठी सादर

१. सुरतेहून ६ ऑक्टोबर १६७० रोजी महाराज तांडा बरोबर घेऊन निघाले. त्याच दिवसात मुगलांचे बातमीदार ही बातमी दौलताबादमधे राहणाऱ्या शाहजाहा मुअज्जम याला सांगायला रोज ५० (३० मैल) ते ६० (४० मैल)किमी वेग धरला तर आणि साखळीच्या बातमीदारांकडून तातडीचा निरोप पाठवला असे मानले तर १२ किंवा १३ ऑक्टोबरला ३५० किमी अंतरावर असलेल्या दौलताबादेत हल्ला झाल्याची बातमी कळल्यावर २१३ किमीवरील बऱ्हाणपुरला असलेल्या दाऊदखान सरदाराला सैन्य जमवून तेथून २५७ किमी वरील चांदवडला जाऊन सैन्य कारवाईला निघाला असे असे मानले पाहिजे. चांदवडच्या भागात बंदोबस्तासाठी जायला पाठवलेला निरोप १५ ऑक्टोबरला मिळाला असे मानले तर तो तर मग दाऊदखान चांदवडला किल्ल्याच्या पायथ्याशी सैन्य जमवून कांचनबारीकडे जाऊन १६ ऑक्टोबरच्या रात्री एका दिवसात २५० किमी अंतर काटून गेला असा निष्कर्ष काढावा लागतो.
ऐतिहासिक घटनात दाऊदखान औरंगाबादला शाहजाद्याला भेटून (दौलताबादला) मगा चांदवडला गेला असे मानतात. अंतरांचे आणि दिवसांचे गणित घातले तर त्यात काही तरी गडबड आहे असे जाणवते.
२. ऐतिहासिक कागदांवरून शिवाजीमहाराज पुन्हा समुद्रमार्गाने सूरतला निघाले असे मानतात. (संदर्भ - शककर्ते शिवराय खंड २ पान १९२-१९३. लेखक - विजयराव देशमुख) मग मुगलांची सैन्य तयारी कानावर आल्याने महाराज बागलाणात घुसले अहिवंतगड, अचलगड, मार्कंडगड, रवळा जावळागड जिंकून बऱ्हाणपुराकडे सरकले. तिथे जायच्यावाटेवर दाऊदखानाशी सामना होताहोता वाचला.
महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली साल्हेरच्या किल्ल्याच्या आसपास लढायला ठेवले आणि ते वऱ्हाडातील कारंजाला येऊन थडकले. (Late in November 1670) तेथून नंतर परतीच्यावाटेवर महाराज ४००० हजार बैलांवर प्रचंड सामान लादून बरोबर घेऊन परत बागलाणात आले. त्यांचे आणि मोरोपंत पिंगळे याच्या बरोबरचे असे एकूण २० हजार सैन्य एकत्र येऊन साल्हेर किल्ला जिंकले. तेंव्हा (जाने १६७१)पौषमास संपत आला होता.(Ref - Shivaji: His life and times - Chp 12: Offensive against Mughals. Page 428-429. by Gajanan B Mehendale) आणि संदर्भ: शककर्ते शिवराय खंड २ पान १९५. लेखक - विजयराव देशमुख)

वरील अंतरांचा विचार करता...

१. सप्टेंबर १६७० मधे सूरतला जाताना घोडदळ आणि पायदळ एकत्रकरून १५ हजार सैन्य घेऊन निघाले होते. त्यांनी कुठे कुठे जाऊन साहसी मोहिमा केल्या. ते पाहू.
A.राजगड ते सूरत अंतर - ४३६ किमी
B.सूरत ते कुंजरगड ते राजगड किंवा रायगड अंतर - ७२८ किमी
C.रायगड ते नागाव बंदर अंतर - ९० किमी
D.नागाव/रायगड ते साल्हेर पुन्हा सुरतवर हल्ला करायला अंतर - ५२८ किमी
E.साल्हेर (हा भाग नंतरच्या मोहिमांसाठी अंतर मोजायला सोईचा मानला तर)
ते कारंजा अंतर - ४७९ किमी
F.कारंजा ते साल्हेर (४००० बैलावर लादलेले मौल्यवान सामान बरोबर घेऊन) परतीचे अंतर - ४१९ किमी
G.साल्हेर ते रायगड अंतर - ४७४ किमी
एकूण - ३१५४ किमी अंतराच्या मोहिमा सप्टेंबर ते जाने १६७१ साधारण ४ महिन्यात
१२० दिवस = मधे ना विश्रांती ना लढाईच्या घटना असे मानले तर २६ किमी दररोज. .

यानंतरही मोहिमांतून बागलाणची भूमी धगधगती होती. अनेक गड मिळत होते. जात होते. इथे फक्त सूरत आणि कारंजा येथील मौल्यवान सामानाच्या संबंधित मोहिमांची एकत्रित मांडणी केली आहे.
शिवाजी महाराजांकडे दैवी शक्ती होत्या असे मानले तरी त्यांच्या बरोबरचे १० हजार पेक्षा जास्त सैनिक मावळे, घोडे, त्यांची राखण करणारे, भोजनव्यवस्था, हजारो मालवाहक जनावरांची व त्यांचे नोकरवर्ग वगैरे विचारात घेता ते मानवी कुवतींच्या परिघात काम करणारे असावेत. इतक्या दूरच्या मोहिमांची आखणी, मुगल आणि अदिलशाहीच्या सैन्य शक्तीला टक्कर देण्यासाठी सज्जता वगैरे धोके विचारात घेतले जावेत.

साधारण कल्पना यायला माहिती सादर

१. मध्ययुगीन लोक एका दिवसात किती अंतर चालत होते?

९.१
 
२. घोड्यांची गती

९.२

३. मालवाहक प्राण्यांच्या भार क्षमता व कामाच्या दराचा अंदाज

९.३

समाप्त

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

4 Jun 2023 - 4:35 am | शाम भागवत

२०१९ मधले लिखाण आठवत नव्हते. आज सगळे भाग परत एकदा वाचून काढले. ह्या मोहिमा कशा आखतात? त्याची तयारी कशी करतात वगैरे बाबत काहीच कल्पना नसल्याने सगळेच स्वप्नवत वाटत होते. शिवाजी महाराजांवरील प्रेमामुळे तुम्हाला इतका अभ्यास व संशोधन करणे जमले असावे. तसेच लिखाणामधे ४ वर्षांचा खंड पडला असला तरी तुम्ही लिखाण पूर्ण केले त्याचे कारणही शिवाजी महाराजांवरील प्रेम हेच असावे असे वाटते.
आपल्या अभ्यासाला व परिश्रमाला
🙏

शिवाजी महाराजांकडे दैवी शक्ती होत्या असे मानले

ह्याला कोणता पुरावा आहे का?
कारण मला कोणत्याही हाडामासाच्या लोकांना देवत्व बहाला द्यायला आवडत नाही. तसे करणे म्हणजे त्या महापुरुषाचा पराभव करुन अंधश्रध्दा तयार करण्यास खतपाणी घालणे असे होय.
(अभ्यासु लोकांसाठी : श्री आंबेडकर यांचा महापुरुषांचा पराभव हा लेख वाचावा.)

शशिकांत ओक's picture

6 Jun 2023 - 9:48 pm | शशिकांत ओक

'मला' कोणत्याही हाडामासाच्या लोकांना देवत्व बहाला द्यायला आवडत नाही.

हा आपला अभिप्राय आहे. ज्यांना तसे वाटत असेल तेही ठीक.
शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग पाहून काहींना त्यांना भवानी मातेचा आशीर्वाद प्राप्त होता असे मानणारे आहेत ते ही ठीक..
' असे मानले तरी' नंतर पुढे लिहिताना इतरांना तशा शक्ती प्राप्त नव्हत्या तरीही मोहिमेत यश मिळविले जात होते. हे लक्षात यावे.

शिवाजीराजांनी आग्र्यावरुन केलेली सुटका ही मालिका तुम्हाला वेळ असेल तर सुरु करावी ही विनंती.
तसेच प्रत्येक लेखांखाली संदर्भ दिले तर अभ्यासु लोकांना अधिक वाचन करता येईल.

शिवाजी राजांनी आग्र्यावरुन केलेली सुटका ही मालिका तुम्हाला वेळ असेल तर सुरू करावी ही विनंती.
तसेच प्रत्येक लेखांखाली संदर्भ दिले तर अभ्यासु लोकांना अधिक वाचन करता येईल.

मिपावर ते पूर्वी सादरही केले होते. नंतर त्यात भर घालून ते ईबुक क्रमांक ११५ चे आहे. ईबुक्स विकत घ्यायची सोय पण आहे. मिपावर जाहिरात करतोय असे वाटू नये म्हणून मी या इथे ती लिंक दिलेली नाही.
मिपा सदस्यांनी तशी विचारणा केली तर आणि मिपा च्या कक्षेत बसत असेल तर ती लिंक सादर करता येईल.

मिपावर ते पूर्वी सादरही केले होते. नंतर त्यात भर घालून ते ईबुक क्रमांक ११५ चे आहे. ईबुक्स विकत घ्यायची सोय पण आहे. मिपावर जाहिरात करतोय असे वाटू नये म्हणून मी या इथे ती लिंक दिलेली नाही.

समजले नाही. कृपया स्पष्टीकरण द्यावे.