सूरतेहून मौल्यवान सामान घेऊन जाताना कांचनबारीतील संघर्षानंतर भाग ८

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
4 Jun 2023 - 1:03 am
गाभा: 

८.०

८.००

भाग ८

कांचन बारीतील संघर्षानंतर
दि १७ ऑक्टोबर १६७० रोजी शिवाजी महाराज कांचनबारीत इखलास खानाच्या तोफखान्याला नादुरुस्त केल्यावर घाटातून उतरून दाऊद खानाच्या सैन्याला वर्तुळाकार वेढा घातला असावा. दाऊदखानाचा आपल्याकडील सरदार आणि त्यांचे सैनिक यांतील संपर्क तुटला असावा. शिवाजी महाराजांच्या सैन्याला कसे तोंड द्यायला हवे याच्या आज्ञा देता येईनात. मागावून येणारी रसद, नव्या दमाचे शिपाई, यांचा संपर्क तुटला. आता दाऊदखानाला तोफा आणि धनुष्यबाण-भाले असे लांब पल्ल्यावरून फेकून शिवाजीच्या सैन्याला पळवून लावायचे शक्य होईना. दाऊदखानाच्या भांबावलेल्या सैनिकांना पुन्हा एकत्र करून पुढच्या आज्ञा द्यायला वेळ लागेल असे पाहिले असावे. आणखी वेळ काढला तर आपल्या सैनिकांला भेदरवून, जखमी करून पळायला लावायला संधी मिळेल असा अंदाज बांधून महाराजांनी गोल वेढा उठवल्याचा निशाणांचा इशारा आपल्या सैनिकांना केला असावा. शिवाजी महाराज पुढे त्यांच्या मागे सरसेनापती आणि अन्य महत्त्वाचे सरदार आपापले मावळे घोडेस्वार कांचनबारीचा प्रदेश सोडून निघाले. सातबारीच्या घोडप किल्ल्याच्या पायथ्याकडून डोंगररांगांना उजवे ठेवत टेकड्या ओलांडून ते पुढे जात राहिले असावेत.

8.1

8.2

तोवर कळवणपासून मारकंडा घाटातून चढून वणी गावापाशी १६ ऑक्टोबरचा संपूर्ण दिवस चालता राहून वणीच्या पेठेत जनावरांसाठी चारापाणी व रात्री विश्रांती घेऊन उतारावरून येताना बाबापुरला मालवाहकांचा तांडा आपल्या संथ गतीने येत असावा. १७ तारखेचे दुपारचे ३ वाजले असावेत. कळवण ते वणी आणि नंतर दिंडोरी मार्गावरून नाशिकला वगळून पालखेडकडून पिंपळगाव (बसवंत) या वाटेने तांडा न्यायला वाटाड्यांनी सुचवले असावे. लमाणी तांडे मालकांना सिन्नरनंतर आणखी पुढे चालवत आणायला जादा पैशाची बोली झाल्यावर ते कुरकुरत तयार झाले असावेत. दिंडोरी गावाजवळ कडवा नदीच्या पात्रापाशी तांडा रात्रीसाठी थांबला असावा. काही तीन हल्ले परतवले गेले...

८.३

वणी बाबापूर जवळ दाऊदचे सरदार भिडले चकमक १
या ठिकाणी तांड्याला अडवणे शक्य झाले नसेल कारण तो आधिच पुढे गेला असावा. आणि काही रेंगाळलेली जनावरे आणि त्यांच्या मागे संरक्षक सैनिक यांच्याशी भिडण्यात काहा अर्थ नाही असे दिसताच दाऊद खानाने आपल्या सैनिकांना मागे परतून कडवा नदीच्या काठावर तांडा चारापाणी आणि विश्रांती करत असेल तिथे धरून आपल्या कब्जात घेणे शक्य होईल असा विचार करून तांड्याला कळू न देता पुढे सरकत राहिला असावा.
दिंडोरी - कडवा नदीपाशी दाऊद खानाशी चकमक - २

८.४

शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दाऊदखान येऊन धुमाकूळ घालून मालवाहक जनावरांना व त्यांच्या लमाण तांडे मालकांना बंदी करून परत फिरायला लावेल म्हणून नदीपासून दूर संरक्षक गोलाकार सैन्याचे एकात एक कडे करून ते वाट पहात असावेत. खुद्द शिवाजी महाराज लमाण तांडेवाल्याशी सलोख्याने काहीही झाले तरी आम्ही तुम्हाला व तुमच्या जनावरांवर हल्ला होऊ देणार नाही. तुम्ही आमच्या दगा बाजी केलीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकून तेंव्हा बऱ्या बोलाने आमच्या बरोबर राहून पुढे जाणे हेच तुम्हाला करावे लागेल. काही कारणाने तुमच्या जनावरांना इजा झाली तर त्याची नुकसान भरपाई आम्ही करून देऊ. असे बोलून त्यांना चुचकारून तर धाक दाखवून एकत्र ठेवायला वारंवार बोलून समजावत होते. त्या लमाणींच्या भाषेतील मुखिये आपापसात बोलून एकाएकी सैरावैरा पळून जाऊ नका. फुकट मराल. असे बजाऊन सांगताना महाराज पहात असावेत.
पालखेडपाशी ३ ( हे पालखेड पहिले बाजीराव आणि निजाम यातील संघर्षाचे नव्हे)

८.५

सायंकाळची वेळ, दमलेल्या जनावरांना चरायला सोडून तांड्यातील लमाणी आराम करत असतील. तेव्हा लांबवरून धुळीच्या लोटांमुळे महाराजांचे घोडदळ सैनिक दाऊदखानाच्या सैन्याला जवळ न येऊन देता तांड्याला मागे ठेऊन लांब विखरून जाऊन गोलाकार फेर करून दाबुन धरून ठेवले असेल. तोवर पायदळ तुकड्यांनी तिथे पोहोचून मुगल सैन्याला विस्कळीत करून पळवून लावलेअसावे. सकाळपासून मजल दर मजल करत आलेले मुगलांचे घोडदळ विना पाणी - जेवणाच्या अभावी थकव्याने वाट मिळेल तिकडे निघून गेले. कांचनबारीतील लढाईत वाट अडवायला गेलेला दाऊदखान पडून व नंतर वार लागून जखमी झाल्याने तो औषधपाण्यासाठी नाशिकच्या ठाण्याकडे गेला.
महाराजांनी मुगलांच्या सैनिकी संचलनाची, लढाईच्या तंत्राची बारीक माहिती करून घेऊन आपले रणतंत्र बनवले असावे. प्रथम मुगलांच्या सैनिकी संचलनाची ओळख करून घेतली तर कांचनबारीतील हुलकावणी व नंतर झालेल्या चकमकीतून झालेल्या त्यांच्या जबरदस्त हानीची कारणे समजून घ्यायला सोईचे होईल.
वणी - दिंडोरी च्या वाटेवरील झालेल्या संघर्षांत मुगल सेनेच्या वाताहतीमुळे महाराज उत्साहित झाले असावेत. मुगलांच्या सैन्याला पुन्हा जोमाने लढायला तयार करायला नंतर तीन ते चार महिन्याचा कालखंड लागला असावा. त्या दरम्यानच्या वेगवान घडामोडींच्या तपशीलातून महाराजांच्या आधीच्या समरापेक्षा ह्या मोहिमा बदलत्या रणतंत्रामुळे जास्त धीट, प्रहारशील आणि मुगलांच्या संघर्षाची मानसिकता (विल टू फाईट) नष्ट करायला कारणीभूत झाल्या असाव्यात हे जाणवते. खुद्द महाराजांच्या आणि प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंद राव मकाजींच्या सारख्या धडाडीच्या सेनानायकांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने वेगवेगळ्या दिशांनी केलेल्या चढाया, जिंकलेले किल्ले आणि ४३० किमी अंतरावर कारंजा (लाड) या बाजारपेठेत जाऊन कदाचित सुरतपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू हस्तगत करता आल्या असाव्यात. इतक्या लांब पल्ल्याची मोहीम हाती घेण्याचे धाडस उत्पन्न व्हायला काय तात्कालिक घटना घडल्या असाव्यात.

ढेपाळलेले मुगल सैन्य आणि महाराजांना मिळवलेला ऐवज राजगडावर नेण्यासाठीची लगबग

८.६

कळवण ते कुंजीरगड १८० किमी
वणी दिंडोरी मार्गावरील जोरदार झडपांमुळे दमलेल्या मुगल सैन्याला विश्रांती व औषधोपचारघेत तळावर अडकून पडावे लागले असेल. पिंपळगाव (बसवंत) मार्गाने नाशिकमधील मुगलांचा तळ चुकवला तर तांडा सिन्नरच्या चढावरून संगमनेरच्या जकातनाक्याआधी अकोलेच्या वाटेला प्रवरानदीच्या काठाने कोतुळपाशी आल्यावर महाराजांना वाटाड्यांच्या माहितीतून कुंजरगडाची रचना आणि तिथे असलेले भुयारवजा नैसर्गिक बोगदा आपल्या किमती सामानाला लपवून हप्त्या हप्त्याने कोकणातील घाटातून न्यायला शक्य आहे असे कळल्यावर महाराजांनी लमाणांना पैसे चुकते करून देऊन ते दूर गेल्याचे पाहून आपल्या सैनिकांना मोत्यांची पोती, जड-जवाहिरांच्या पेट्या, रोकड पैशाच्या विविध देशातील चलनी नाण्याच्या गोण्या व इतर किमती माल डोक्यावर वाहून कुंजरगडाचा अत्यंत अवघड चढ चढून ते सामान भुयाराच्या पोकळीत लावून त्याला दोन्ही बाजूंनी बांधकाम करून सील केले असावे.
८.९
८.८

८.९

८.१०

८.११

कुंजरगडाच्या नैसर्गिक रचनेचा फायदा घेत महाराज आता बरेच हलके सामान घेऊन मुरबाडच्या वाटेने पेण वरून कोकणात शिरले असावेत.

८.१२

तिथून ते नागावला (अलिबागजवळ) पोहोचले असावेत. तिथे त्यांनी तोपर्यंत दमणहून येणारी १० जहाजे पाहिली. मालधक्क्यावर तो माल उतरवायला शेकडो कोळी लावले. तोवर नोव्हेंबरचा १७ दिनांक आला असावा असावे मानतात. तिथून ते रायगडावर (कदाचित नव्या राजधानीच्या जागेत विभागांची मांडणी व जुळणी यांची पहाणी केली असावी.) किंवा आधी रायगडाला जाऊन नागावला आले असावेत. असे ही म्हणता येईल.

८.१३

सन १६७०च्या आधीपासून राजगडावरून राजधानी रायगडावर हलवायची आज्ञा मिळाल्याने राजगडावरून थोडे थोडे करून एक एक विभागाचे सामान आणि त्या संबंधीची नोकरमंडळी, कुटुंबे यांना राहायची व्यवस्था करायला सुरवात झाली असावी. जून महिन्यात मोसमीपावसाच्या तडाख्याआधी आधी सगळे विभाग, रसद, बाजार, तात्पुर्ती राहायची घरे याची व्यवस्था करायचे हुकुम महाराजांनी सुरतला जाताना दिले असावेत. पुढील काही वर्षांत रायगडावर थाटाच्या राज्याभिषेकासाठी सुरतेहून आणलेला किमती माल वापरायला लागणार होता. शानदार राजसिंहासन, त्याला सोन्याचे आवरण, दरबारातील गालिचे, झुळझुळीत पडदे, शामियाने यासाठी जहाजावरून आणलेले भपकेबाज कापडचोपड आणि लाकडे त्यातून कलापूर्ण निर्मिती करणारे कुशल कारागीर यांना जहाजातून आणले गेले होते. त्यांना रायगडाच्या पायथ्याशी वसाहत करून देण्याचे हुकुम महाराजांनी दिले.
...
कुंजरगडावरून महाराज कोकणात परतायच्या आधी मुगलांच्या आणखी पेठांवर डल्ला मारायसाठी चर्चा केल्या गेल्या. वाटाडे आणि सरदारांशी खलबते करून जायला लागणारे अंतर आणि तिथे पोहोचायच्या वाटेवरील धोके आणि वेळ याचा सविस्तर आढावा घेऊन असे ठरले की औरंगाबाद, सिल्लोड, खामगाव, बाळापुर याठिकाणी मुगलांचे मोठे तळ आहेत.
त्यांना न कळू देता उदगीरच्या आसपास असलेल्या आपल्या सैन्याने नांदेड दिग्रस असे करत करत २८८ किमी जाऊन विदर्भातील कारंजे व्यापारी पेठ गाठायची.

८.१४

तिथला भुईकोट किल्ला हल्ला करून लुटायला सोपा आहे. तटबंदी जुनाट आणि भगदाडांची आहे. त्या ठिकाणचा किल्लेदार नुकताच बदलून आला आहे. त्याचा वचक कमी आहे. ३ शे पेक्षा कमी सैनिकांना पेठेचे रक्षण करायला जमणार नाही ते पळून जातील. हे काम सरसेनापतींच्या नेतृत्वाने व्हावे असे ठरले. शिवाजी महाराज स्वतःः येत आहेत अशी बातमी आधी पासून कळायची सोय करावी लागेल.

८.१६

८.१६

मुगल सरदारांना, इंग्रजांना, पोर्तुगीजांना महाराजांच्या आरमाराचा धाक वाढवलेला वाटावा म्हणून आरमाराचे सराव करायला गुजरातच्या किनाऱ्यांपाशी आपली अनेक गुराब नेली गेली असावीत.

८.१७

कारंजा व्यापारी पेठेत शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी धुमाकुळ घातला. ३ ते ४ दिवसात जे सामान त्यांच्या हातात आले त्याचे मुल्य १ कोटी होते त्यात नक्त जवाहर, सोने रुपे उंची कापड ४००० मालजनावरांवर लादून नेला गेला. ५३१ किमीच्या दीर्घ वाटेत मुगलांकडून आणि विजापुरकरांकडून सैन्य हालचाली होण्या आधी मिळवलेला माल रायगडाच्या पायथ्यापाशी येऊन पोचला असावा.
.....
पुढे चालू भाग ९ समारोप

प्रतिक्रिया

न्यूज नेशन हिन्दी
आधी हकीकत आधा फसाना... या सीरियल मधे शोध कादंबरीतील कथानकाचा भाग येतो.
https://www.youtube.com/live/joDBOiMSl2g?feature=share

छान माहिती. जर जमले तर शिवाजी महाराजांचे युध्दतंत्र ह्यावर जास्त भर द्यावा हि विनंती.

एकंदरित वर्णन रोचक आणि अभ्यासपूर्ण वाटले. अर्थात बारकाईने वाचत, नकाशे बघत बघत नीट समजून घेण्याची चिकाटी आणी रुची ज्यांचेकडे असेल त्यांनाच नीट आकलन होईल. मजसारख्यांना ते जरा अवघडच आहे.
एक प्रश्न असा पडला की या विविध लढायांचे तात्कालीन वा नंतरच्या काळातील लेखकांनी काही वर्णन करून ठेवले होते का ? त्याबद्दल कोणती माहिती आज उपलब्ध आहे ? पूर्वीच्या इतिहासकारांनी काय लिहीलेले आहे ? काही पोवाडे वगैरे उपलब्ध आहेत का ? असल्यास त्यांचाही समावेश लेखात करता आल्यास चांगले होईल. संदर्भसूची दिल्यास अभ्यासकांच्या उपयोगी पडेल.
एकदम नवीन वाचकासाठी प्रत्येक भागाच्या सुरुवातीलाच संपूर्ण मोहिमेचा थोडक्यात गोषवारा देणे उपयुक्त होईल असे वाटते.

शशिकांत ओक's picture

6 Jun 2023 - 2:47 pm | शशिकांत ओक

तात्कालीन वा नंतरच्या काळातील लेखकांनी काही वर्णन करून ठेवले होते का ? त्याबद्दल कोणती माहिती आज उपलब्ध आहे ? पूर्वीच्या इतिहासकारांनी काय लिहीलेले आहे ? काही पोवाडे वगैरे उपलब्ध आहेत का ? असल्यास त्यांचाही समावेश लेखात करता आल्यास चांगले होईल. संदर्भसूची दिल्यास अभ्यासकांच्या उपयोगी पडेल.

भाग ९ मधे मेहेंदळे आणि विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे संदर्भ दिले आहेत.
हे सादरीकरण मिलिटरीच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर प्रकाश टाकते.
त्या मुळे कागदपत्रात सांगितले गेलेला घटना क्रम आणि प्रत्यक्षात नकाशावर दिसणारीअंतरे रस्ते, वाटड्यांचे मतभेद, हजारो सैन्याला खानपान सेवा, जनावरांना चारा पाणी, रसद पुरवठा साखळ्या वगैरेचा अंदाज करून लेखन सादर केले आहे.
सैनिकांचा पायी चालण्याचा वेग, जथ्था करून जातानाचा वेग, मालवाहतूक करणार्‍या जनावरांच्या क्षमता वगैरे मधून वाचकांनी त्या वर आधारित भाष्य करायला विनंती करतो.
नकाशा दर्शन मधून प्रेरणा घेऊन त्या भागातील गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी मंडळातर्फे प्रत्यक्ष त्या गडांचा अभ्यास करून माहिती सादर करायला विनंती करतो.
जिथे शक्य असेल तेव्हा मला आपल्या बाईक मोहिमांवर सामिल व्हायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

9 Jun 2023 - 7:40 am | शशिकांत ओक

आपल्याला हे सर्व लेखन ईबुक माध्यमातून वाचायला हवे असेल तर 9881901049 वर संपर्क साधावा
नाहीतर इथे... https://alkaoaksebookshoppy.online/

आपल्या पैकी कोणी कुजरगडाला भेट द्यायला जाणार आहेत का? मला ही सामिल व्हायलाआवडेल.