उड्डाण पूल

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जे न देखे रवी...
2 Jan 2008 - 9:15 pm

हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिलेली आहे.

या उड्डाण पुलावरून
वाहेल गर्दी एकविसाव्या शतकातली,
त्याही वेळी असतील
आसर्‍याला आलेले वळचणीचे संसार पुलाखाली.
आता हे जणू ठरूनच गेलेले,
अंगणातले नवे फोफावणारे झाड पाहून
जशी यावीत पाखरे
चोचीत काडी घेऊन घरट्यासाठी
तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात
नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली.
नवजात चोचीतला चिवचिवाट
ऐकताना रोज सकाळी
आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर,
पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र
आपण थुंकू पचकन
बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर.

कविता संग्रहः शब्द मनातले
कवी: अतुल व्यं.देशमुख
प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान
© सौ.स्मिता देशमुख

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Jan 2008 - 5:09 am | विसोबा खेचर

तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात
नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली.

हम्म!

आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर,
पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र
आपण थुंकू पचकन
बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर.

क्या बात है!

कविता आवडली...

तात्या.