सिनेमे

कॉमी's picture
कॉमी in काथ्याकूट
25 Mar 2022 - 10:05 pm
गाभा: 

(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)

गुड टाईम (२०१७)

कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.

त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.

या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.

खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

26 Mar 2022 - 12:41 pm | कुमार१

छान.

मी वाईल्ड टेल्स हा स्पॅनिश चित्रपट प्राइमवर पाहिला आणि त्यावर स्वतंत्र लेख इथे लिहिला आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2022 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्स. सिनेमाची ओळख आवडली. नक्की पाहीन. आभार.
सध्या मराठीतला 'पांघरुन' शोधतोय. पावनखिंड -कंम्पलीट. दुःखाचे श्वापद- डन. झुंड-बाकी.

-दिलीप बिरुटे

या धाग्यावर उल्लेख असलेला आणि तुम्ही माहिती दिलेला
ड्यून-१ प्राईमवर पाहिला.दुसर्या भागाची प्रतिक्षा.

Bhakti's picture

26 Mar 2022 - 3:26 pm | Bhakti

मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)

अभिनयक्षेत्रात चमकण्यासाठी बेटी ही तरुण मुलगी हॉलिवूड मध्ये आपल्या काकूच्या घरी आली असते. काकू सध्या घरीं नसतेच- काकू सुद्धा अभिनेत्रीच असते. घरामध्ये बेटी येते तेव्हा घरी आधीच एक तरुण मुलगी असते. ती तिच्या काकूपासून लपून घरी घुसली असते. प्रेक्षकांना आधी दाखवण्यात आले असते की ती मुलगी एका अपघातात सापडली असते, आणि त्याआधी तिला मारण्याचा प्रयत्नसुद्धा झाला असतो. पण आत्ता त्या मुलीला काहीही आठवत नसते, स्वतःचे नाव सुद्धा आठवत नसते. ती पोस्टरवरचे नाव बघून स्वतःचे नाव रिटा आहे असं बेटीला सांगते. मग बेटी आणि रिटा रिटाच्या ओळखीचा तपास करतात- असे सुरुवातीचे कथानक आहे.

दोघी प्रमुख अभिनेत्या खूप सुंदर आहेत- आणि त्यांनी त्यांचे काम पण मस्त केलंय. खासकरून नाओमी वॉट्स ने साकारलेले बेटीचे पात्र. बेटी इतकी सद्गुणी आणि दयाळू का आहे ह्याची उकल शेवटी छान केली आहे.

वरकरणी सरधोपट वाटणारी गोष्ट असली तरी शेवट अत्यंत उलथापालथ करणारा आहे. शेवटामुळे सिनेमा सर्वसाधारण क्राईम ड्रामा न राहता वेगळ्याच सिनेप्रकारात जातो.

हा सिनेमा पूर्ण समजण्यासाठी आणि सगळ्या बाजू नीट समजण्यासाठी शेवट माहीत असल्यावर सिनेमा परत एकदा पाहावा लागेल. तोपर्यंत काही प्रसंग असंबंधीत वाटू शकतात

मनिष's picture

2 Apr 2022 - 11:20 am | मनिष

कुठे पाहता येईल?

कॉमी's picture

4 Apr 2022 - 12:11 am | कॉमी

मी वसंतराव

आज बघितला.

सिनेमॅटोग्राफी एकदम सुरेख आहे. पुणे, नागपूर, उत्तरपूर्व सीमा आणि विशेष म्हणजे लाहोरचे वातावरण अगदी सुरेख दर्शवले आहे. कालसुसंगत दारे, कुलपें हे सुद्धा आवडले (तुंबाड फिल्स).

संवाद लिखाण चांगले आहे. पण ह्या जॉनरामधल्या सिनेमांमध्ये जाणवतो (उदा- काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व) तसा कृत्रिमपणा इथे अधेमध्ये जाणवतो. अमेय वाघच्या दीनानाथ मंगेशकरांचे सुरवातीचे काही संवाद ऐकल्यावर ट्रेलरमध्ये काय काय घालता येईल असा विचार करूनच सगळं लिहिलंय काय असं वाटलं, पण पुढे खरंच छान प्रसंग लिहिलाय, ज्याने अमेय वाघचे पात्र सगळ्यात जास्त स्मरणीय वाटले (त्याचे आणि वसंताच्या आईचेपण.)
काही ठिकाणी संवाद जास्तच ड्रामॅटिक झाल्यावर हसू आले- उदा. वसंताच्या पहिल्याच कार्यक्रमानंतर काही क्रिटीक येऊन म्हणतात- तुमच्या गायनाला आम्ही कधीच समाजमान्यता मिळू देणार नाही (!). कदाचित तो काळ वेगळा असेल- पण आज हे अत्यंत अनाकलनीय वाटलं. त्यानंतरच थोड्या वेळात शाळेत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो- तिथे मुलं खुश होऊन टाळ्या वाजवतात. मग तिथे असा काहीतरी डायलॉग आहे की संगीत तज्ञांपेक्षा पेक्षा मुलांना आवडणे हे जास्त महत्वाचे. तिथेही हसू आले. पण तरीही बराच संयम राखला आहे.

संगीत सौभद्रच्या प्रयोगादरम्यानचा एक जोक लिहिला आहे तो मात्र अफलातून. भरपूर हसू आले.

बेगम अख्तर, वसंताचे मामा यांची पात्रं चांगली लिहिलीयेत. काही मिनिटांसाठीच लावणी गाणाऱ्या एका बाईंचे पात्र आहे- ते अतिशय सुंदर वाटले, खूप छान प्रसंग लिहिलाय. पुलंच्या पात्राचा एका पॉईंट नंतर कंटाळा आला. पुलंचे पात्र सिनेमात बर्याच वेळ जरी असले तरी ते 'क्लिकबेट' म्हणून लिहिलेय का अशी शंका आली. वसंताच्या आईचे पात्र सर्वोत्तम रंगवले आहे.

पटकथा चांगलीये- म्हणजे एका अख्ख्या आयुष्यातून तीन तासाचा आर्क/व्यक्तिप्रवास काढणे आजिबात सोपे नसणार. पण त्यातूनही कथानक छान काढले आहे. संसार वि. गायन संघर्ष कमीत कमी रडारडीत चांगले रंगवले आहे.

अभिनय- सर्वांनी perfectly adequate अभिनय केला आहे. अधे मध्ये गाताना लीप सिंक गडबडले आहे असे काही क्षणांना वाटले. अमेय वाघचे काम आवडलेच- हा तसा अनपेक्षित बोनस म्हणायचा. राहुल देशपांडेंचे काम सुद्धा छानच आहे.

एक ट्विस्ट टाईप काहीतरी सिनेमाच्या शेवटाला आहे ते अगदीच बोगस वाटले. शाळेत निबंध लिहायचो तसं वाटलं- "...आणि झाड बोलू लागले" टाईप. यापुढे काही लिहीत नाही, स्पॉयलर होईल.

संगीत- शेवटी या संगीताचा टार्गेट आडियन्स मी नाही, तरी काही ठिकाणी संगीत चांगलं भिडलं. लावणी तर खूपच सुंदर.
एकूण चांगला सिनेमा आहे. Worth a watch.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2022 - 12:47 pm | चौथा कोनाडा

+१

आंद्रे वडापाव's picture

5 Apr 2022 - 5:53 pm | आंद्रे वडापाव

मी "कौन प्रवीण तांबे ?" बघितला हॉटस्टारवर ..
मस्तये ... प्रवीण तांबेचा संघर्ष पाहून, स्वतःचीच शरम वाटते (म्हणजे त्याच्या जागी आपण असतो थिओरिटिकली , तर आता पर्यंत १००० वेळा क्वीट केलं असतं मी )
राहुल द्रविडचे पात्र १-२ मिनिटाचेच , पण नो नॉन्सेन्स गाय ... आणि जात वैगरे आकस न ठेवता , सरळ अंगीभूत गुणामुळे चान्स देणे, हे द्रविडचे गुण भावून जातात ..

कॉमी's picture

5 Apr 2022 - 8:25 pm | कॉमी

बघायचा आहे.

तुषार काळभोर's picture

6 Apr 2022 - 1:10 pm | तुषार काळभोर

या प्रतिसादानिमित्ताने माहिती वाचली. प्रेरणादायी म्हणावं की दुर्दैवी, ते कळेना.

तर्कवादी's picture

5 Apr 2022 - 7:18 pm | तर्कवादी

गुड टाईम (२०१७)

कुठे बघता येईल ? हिंदीत उपलब्ध आहे का ?

कॉमी's picture

5 Apr 2022 - 8:25 pm | कॉमी

सिनेमा हिंदीमध्ये नाही मिळायचा. सिनेमा फक्त यूएस मध्येच रिलीज केला होता असे विकिपीडिया वर समजते.

सिनेमा नेटफ्लिक्स वर आहे.

गुड टाईम भलताच आवडला, आणि कुठंतरी वाचलं कि गुड टाईमचे वितरक- A24चे वितरक नेहमी व्यवसायासाठी अतिशय उत्तम सिनेमेच निवडतात. सिनेमे नेहमीच हटके असतात, आणि बऱ्याचदा खूप मोठी स्टार कास्ट किंवा सुपरीचीत नावे जोडले नसलेले सिनेमे असतात. (Indie films- इंडिपेंडन्ट सिनेमाचे लघुरूप)

त्यांच्या सिनेमांची यादी पाहता, फक्त काहीच सिनेमे मी पाहिले होते- गुड टाईम, हेरेडिटरी, द रूम, द विच, द लाईटहाऊस. ह्यातले कोणतेही सिनेमे भंकस वाटले नव्हते- सगळे नाविन्यपूर्णच होते. हेरेडिटरी, गुड टाइम्स तर खूपच आवडलेले. द विच, द लाईटहाऊस आणि हेरेडीटरी तिन्ही भयपट आहेत. भयपट पाहायला आवडतात, आणि चांगल्या भयपटांचा कायम दुष्काळ जाणवत असतो, म्हणून भयपट म्हणून दर्शवलेला मिडसोमर बघितला.

कथेचा सेटप असा आहे- डॅनी नावाची तरुणी नुकत्याच एका धक्क्यातून गेली असते- तिची बहीण, आई आणि वडील एकदमच काही कारणाने निर्वतले असतात. त्यामुळे ती उध्वस्त झाली असते. तिचा बॉयफ्रेंड, ख्रिश्चन- हा द्विधा मनस्थितीत असतो. डॅनीची बहीण बायपोलर असते. त्यामुळे डॅनीला पूर्वीही तिची सतत काळजी वाटत असते आणि ती ख्रिश्चनचा आधार घेत असते. ख्रिश्चनच्या मित्रांना हे चुकीचे वाटत असते, आणि डॅनीने ख्रिश्चनवर असे ओझे टाकू नये असे वाटत असते. (ते दोघे तीन वर्षांपासून एकत्र असतात, तरीही !) आणि डॅनीला सुद्धा हे जाणवत असते आणि अपराधीपणाची टोचणी लागत असते. कुटुंबाच्या मृत्यूनंतर तिला कोणीतरी आधार देण्याची गरज वाटतच असते, पण ख्रिश्चनकडें आधार घेण्यास अपराधीपणा वाटत असतो.

ख्रिश्चनचा मित्र जॉश स्वीडनमध्ये त्याचा थिसिस पूर्ण करायला जाणार असतो. त्यांचा पेले नावाचा स्वीडिश मित्र असतो- त्याच्या हार्गा नावाच्या गावी जाऊन त्याची पॅगन (नॉर्स देवतांची आराधना करणारी) कम्युनिटी पाहून त्यावर थिसिसचा एक भाग लिहायचा असा त्याचा प्लॅन असतो- सोबत ख्रिश्चन आणि मार्क नावाचा आणखी एक मित्र सुद्धा जाणार असतात. हि खूप दिवसांपासून प्लॅन केलेली ट्रिप असते तरी ख्रि. ने डॅनीला काहीच कल्पना दिली नसते. आणि मग अपराधी वाटून तो तिला यायचे आमंत्रण देतो (मित्रांना न विचारताच!)- आणि डॅनी स्वीकारते.

यापुढील संपूर्ण सिनेमा स्वीडन मध्ये- हार्गा या कम्युनिटपाशी होतो. हि खूप जुनी कम्युनिटी असते. आणि ९० वर्षांतून एकदा होणारा, देवांना धान्य आणि मांस देण्यासाठी आभार मानायचा कार्यक्रम त्यावर्षी होणार असतो. त्यानंतर हार्गा बद्दल काही डिस्टर्बिंग गोष्टी हळूहळू अमेरिकन गटाच्या समोर येतात. हा भाग हॉरर म्हणून गणला जाऊ शकतो- पण माझ्यादृष्टीने ह्या सिनेमातला सायकॉलॉजिकल थ्रिलर भाग अतिशय कसबीचा आहे. एक शोकमग्न मुलगी आणि तिचा performative बॉयफ्रेंड यांच्या नात्यामधले awkward tension अगदी सुरेख पकडले आहे.

सिनेमा दिसायला आणि ऐकायला अतीव सुंदर आहे. स्वीडनचे निसर्गसौन्दर्य अतिशय मस्त पकडले आहे. सोबतीचे संगीत सुद्धा सिनेमाच्या एक एक टप्प्याला अनुकूल आहे.

हा सिनेमा नेहमीचा भयपट नाही, काहींना भयपट वाटणार सुद्धा नाही. पण मला नक्कीच भयपट वाटला. जम्प स्केअर एखाद्या दुसऱ्या वेळेसच वापरले आहेत.

८/१०
(हेरेडीटरी च्या दिग्दर्शिकाचाच सिनेमा आहे.)
(अमेझॉन प्राईम वर पाहू शकता.)

कॉमी's picture

16 Apr 2022 - 8:46 am | कॉमी


एका देवभक्त ख्रिश्चन परीचारिकेचा एका मरणासन्न बाईशी संबंध येतो. हि बाई देवावर विश्वास ठेवत नसते, नर्सच्या दृष्टीत काही "पापकर्म" करत असते. नर्स स्वतःला देवाने बाईंचा स्पिरिच्युअल उद्धार करायला पाठवले आहे असे समजत असते. मग तिच्या व्यक्तिगत आयुष्यात वैगेरे ढवळाढवळ करायला सुरु करते.

शेवट एकदम झकास जमलाय-अपेक्षित तोच असला तरी सुरेख घेतलाय. सिनेमा म्हणावा तर धार्मिक विचारांचा पगडा या विषयावर आहे किंवा म्हणलं तर मानसिकरित्या अस्थिर व्यक्तीवर आहे.

नेटफ्लिक्स वर पाहू शकता.

द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन सिनेमा पाहिला.
एकटी आई आणि तिचा लहान मुलगा - बाबाडूक नावाच्या भूत/राक्षसाची गोष्ट वाचतात. हळूहळू त्यातल्या गोष्टी त्यांच्या घरात जाणवू लागतात...

If it's in a word, or if it's in a book
you can't get rid of the Babadook.
A rumbling sound and three sharp knocks
ba Ba ba... Dook Dook Dook
That's when you'll know that he's around.

सिनेमा भयपट असला तरी काही मस्त रूपकं आहेत. पूर्ण सिनेमा बाबाडूकच्या ऐवजी अप्रिय आठवणींपासून सुटका मिळवण्यासाठी आहे असे म्हणता येऊ शकते :)

I'll wager with you. I'll make you a bet.
The more you deny the stronger I get.
You start to change when I get in,
the Babadook growing right under your skin

सिनेमा आवडला- नेटफ्लिक्स वर आहे.

तुषार काळभोर's picture

25 Apr 2022 - 5:33 pm | तुषार काळभोर

12
शनिवार-रविवार सेव्हिंग प्रायवेट रायन पाहिला. पहिल्यांदाच. सेव्हिंग प्रायवेट रायन विषयी नेहमीच ऐकत आलो होतो. पण इतकी वर्षे मी फक्त सुरुवातीची काही मिनिटे (नॉर्मंडी किनार्‍यावर उतरताना होणारी लढाई) पाहत होतो.
शनिवारी ठरवून पाहायला सुरुवात केली. सुमारे पावणेतीन तासांचा चित्रपट असल्याने, शेवटचा तास जो जास्त उत्कंठावर्धक आहे, तो रविवारी सकाळी पाहिला. टॉम हॅन्क्स आहेच. पण त्यावेळी नवे असणारे आणि नंतर मोठे झालेले इतरही चेहरे आहेत. मुख्य म्हणजे मॅट डेमन. शिवाय विन डिजल आहे. xxx आणि F&F मालिकेआधीसुद्धा तो राउडीच होता.
युद्धाचं चित्रीकरण भयानक आहे. ते वास्तवाला धरून असल्याचं वाचलंय.

बाय द वे, सन्नीचा* हा सीन सेव्हिंग प्रायवेट रायनच्या शेवटच्या भागावरून प्रेरित असल्याचं जाणवलं :)

कॉमी's picture

25 Apr 2022 - 7:35 pm | कॉमी

मस्त सिनेमा आहे.
१९१७ हा सुद्धा आवडलेला युद्धपट आहे. पूर्ण सिनेमा वन शॉट आहे- विचार करून थक्क झालेलो. नंतर समजले की दिसताना वन शॉट असला तरी वेगवेगळे चित्रीकरण एकत्र जोडलेले आहेत.

तुषार काळभोर's picture

25 Apr 2022 - 9:20 pm | तुषार काळभोर

आधी अवांतर :
वन शॉट ही ट्रिक असली तरी आपण ट्रिक चा विचार न करता वन शॉट चा आनंद घ्यायचा.

१९१७ भारीच पिक्चर आहे. दिग्दर्शक Sam Mendes. त्याचे स्कायफॉल, स्पेक्टर आणि १९१७ आवडलेले आहेत. पण त्याचा पहिला पिक्चर अमेरिकन ब्युटी अजूनही पाहिला नाही.

कॉमी's picture

28 Apr 2022 - 5:27 pm | कॉमी

ईट फॉलोज

खतरनाक सिनेमा. आवडला!
जे नावाची टिनेज मुलगी तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत सेक्स करते- आणि त्यानंतर तिला त्याच्याकडून समजते, कि त्याच्याकडून एक शाप आता तिच्याकडे ट्रान्सफर झाला असतो. एक बहुरूपी मारेकरी तिच्या मागे लागणार असतो- जो फक्त तिलाच दिसेल, आणि कोणत्याही रुपात येऊ शकेल. तिचा प्राण घेतल्यावर तो मारेकरी पुढील व्यक्तीकडे- म्हणजे त्या बॉयफ्रेंड कडे वळेल- असेच पुढे पुढे. त्या बॉयफ्रेंडला सुद्धा असाच कोणाकडून तरी प्रसाद मिळाला असतो.

तो मारेकरी अगदी हळू असतो- पण सातत्यपूर्ण असतो. त्याची लक्ष्याकडे वाटचाल २४*७ चालू असते. त्याला मारणे किंवा नष्ट करणे शक्य नसते.

जे कडे पर्याय आहेत- पळत राहणे, किंवा शाप ट्रान्सफर करणे- आणि ट्रान्सफर्ड व्यक्ती जास्तीत जास्त वेळ जगेल अशी अपेक्षा करणे.

हॉरर, थ्रिलर- चांगले कॉकटेल आहे.

नेटफ्लिक्स वर आहे- पण जिओ ब्लॉकड आहे भारतात. VPN वापरा किंवा पेशन्स असेल तर 123movies वापरा.

मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना!

ह्याच आठवड्याच्या सुरुवातीला अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मिपाकर प्रा.डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले, तर काल दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी मिपाकर ज्योती अळवणी ह्यांची पहिली वहिली हॉरर वेब फिल्म 'Epilouge' (एपिलॉग) च्या मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या उपक्रमास हार्दीक शुभेच्छा!

मुहूर्त

कॉमी's picture

28 Apr 2022 - 7:04 pm | कॉमी

ज्योती अळवणी यांचे अभिनंदन!
कुठे पाहता येईल ?

टर्मीनेटर's picture

20 Aug 2022 - 11:39 am | टर्मीनेटर

माफ करा कॉमी, मी विसरून गेलो होतो.
३ आठवड्यापूर्वी सहनिर्मात्यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर पण ही वेबफिल्म अपलोड केली आहे. ही त्याची लिंक -

https://youtu.be/s-663jmnfbo

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Apr 2022 - 7:12 pm | ॲबसेंट माइंडेड ...

ज्योतीताईंचे अभिनंदन.

Bhakti's picture

28 Apr 2022 - 7:43 pm | Bhakti

ज्योतीताईंचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2022 - 3:38 pm | अमरेंद्र बाहुबली

अभिनंदन ज्योतीताई.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2022 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंद्न...!

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

4 May 2022 - 4:38 pm | कॉमी

इट कम्स ऍट नाईट (२०१७)
A24 सिनेमा.
प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स

मुख्य संकल्पना आहे-
एक लहानसे कुटुंब- नवरा बायको आणि त्यांचा टिनेज मुलगा- त्यांच्या आजोबांना रोग झाला म्हणून जड मनाने मारून टाकतात. बाहेर पॅन्डेमिक चालू असतो. नक्की काय रोग आहे आणि बाहेरच्या जगाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. केवळ रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग वाढू दिला तर माणूस मरतो, का झोंबी होतो- आपल्याला काही कळत नाही. पण रुग्णाला जगू द्यायचे नाही आणि ताबडतोब संपवायचे अशी पॉलिसी या कुटुंबाची तरी असते. आणि ते सुद्धा बाहेरच्या जगाबद्दल भीती बाळगून राहत असतात. कारण बाहेर जरी इतर लोक असले, तरी कुटुंबाकडे असलेल्या अन्न आणि पाण्याच्या साठ्यासाठी ते हल्ला करतील अशी भीती असते.
जेव्हा कधी कुटुंबातले लोक बाहेर जातात तेव्हा दिसते की सगळी जागा जंगला सारखी असते- यावरून समजते कि हा रोग सुरु होऊन काही वर्षे तरी झालीयेत.

पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक कुटुंब येते- आणि त्यांच्यासोबत रहायला लागते. दोन कुटुंबांमधला एकमेकांवरचा विश्वास अगदी पातळ दोऱ्याने बांधला असतो. एकेमकांचे रिसोर्स वापरणे हा एकच कॉमन उद्देश असतो. त्यांच्या नात्यामधले वाढत जाणारे टेन्शन आणि त्याची परिणीती- असा सिनेमाचा प्रवास आहे.
सिनेमा चांगला आहे. एका प्रकारे प्रेडिक्टेबल असला तरी प्रभावकारक मांडणी असल्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही. शेवट अगदी ओपन एंडेड आहे- बऱ्याच प्रकारे झालेल्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. काही स्पष्टीकरणांमध्ये सिनेमाच्या नावाचे सुद्धा महत्व आहे.
सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल.

जॉर्डन पिलचा (गेट आउटचा दिगदर्शक) Us म्हणून सिनेमा सुद्धा पहिला, इतका खास वाटला नाही. पिलचा नोप म्हणून सिनेमा येत आहे- थेटर मध्ये पाहायचे ठरवले आहे. पिलचा गेट आउट भारी सिनेमा आहे.

प्रचेतस's picture

5 May 2022 - 7:13 am | प्रचेतस

मस्त परिचय.
भारतामध्ये हा सिनेमा प्राईमव्हिडीओवर बघता येईल. एकंदरीत तुम्हाला भयपटांचे आकर्षण आहे असे म्हणता यावे.

कॉमी's picture

5 May 2022 - 8:41 am | कॉमी

भयपट खूप आवडतात. पण आता काँज्युरिंग टाईप सिनेमांनी इतकी भीती वाटत नाहीये, जरा हटके असेल तर मजा येते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 May 2022 - 3:18 am | हणमंतअण्णा शंकर...

तुम्ही यातले काही सिनेमे पाहिले असतील तरीही इतरांना उपयोगी होयील म्हणून लिस्ट देतो..

१. The Witch (2015)
उत्तम छायाचित्रण, साटल्य.

२. It Follows (२०१४)
एखादे मल्टीलेवल मार्केटिंग असावे तसे पसरत आणि झिरपत जाणारे भयतत्त्व. अत्यंत वेगेळे आणि उत्तम छायाचित्रण.
यातले 'ईट' म्हणजे नेमके कशाला संबोधित करते यावर खूप मतमतांतरे आहेत. काही म्हणतात की इट म्हणजे 'ते' ग्लोबल वार्मिंग, लैंगिक रोग असल्या गोष्टींचे प्रतीक आहे. बाकी यावर दिग्दर्शक म्हणतो - मला 'ते' म्हणजे काय आहे आणि ते कुठुन येते यात अजिबात स्वारस्य नाही. हे स्वप्नातलं लॉजिक आहे. आणि जेव्हा तुम्ही भयस्वप्नात असता तेव्हा तुम्ही भयस्वप्न तर्काने उकलू शकत नाही. जरी तुम्ही उकलायचा मुद्दामहून प्रयत्न केला तरी. "I'm not personally that interested in where 'it' comes from. To me, it's dream logic in the sense that they're in a nightmare, and when you're in a nightmare there's no solving the nightmare. Even if you try to solve it.".

३. The Lighthouse (२०१९)
विच नंतरची एगर्स ची हॉरर/अनोळखी विधा फिल्म. पुन्हा जबरदस्त छायाचित्रण. एगर्स हा खूप पुढे जाणार दिग्दर्शक म्हणून.

४. Tetsuo: The Iron Man
बॉडी-हॉरर प्रकारल्या वेडगळ सिनेमांची सिरीजच आहे Tetsuo. ही फिल्म म्हणजे वेडगळपणाचा कळस आहे.

५. House (1977): माझी अजून एक आवडती जपानी फिल्म.
फिल्म चा ट्रेलर..
थोडक्यात - जपानी लोकांना जॉज या स्पीलबर्गच्या सिनेमाला तोडीस तोड उत्तर देण्याची खुमखुमी आली. एका जाहिरात दिग्दर्शकाने फिल्मचा कोणताही अनुभव नसताना ही फिल्म बनवली. कथा त्याच्या लहान मुलीची. असली सगळी भट्टी जमून आल्यावर जे काही रसायन तयार झालं ते एकाच वेळी विनोदी, भितीदायक आणि बिझार. सर्वार्थाने भयंकर तरीही न विसरता येण्याजोगी फिल्म.

६. Hereditary (२०१८)

७. The Thing (1982).
ही खूप दुर्लक्षिली जाणारी फिल्म आहे. परंतु ती आता कल्ट झालेली आहे.

८. Human Centipede
(आगाउ सूचना: शक्यतो वाट्याला जाऊ नका)
माणसं एकमेकांना तोंड ते गांड अशी जोडून गोमेसारखी शतपाद एंटिटी तयार करण्याविषयी ही फिल्म सिरीज आहे.

खूप अजून फिल्म आहेत परंतु मला कंटाळा आलेला आहे म्हणून शेवटची एक देऊन थांबतो.

९. ही फिल्म. भयंकर हा एकच शब्द पुरेसा आहे. कथावस्तू, आणि फिल्म स्वतः देखील.

कॉमी's picture

7 May 2022 - 8:22 am | कॉमी

Tetsuo, House आणि Human Centipede नाही पाहिले. पण यादीतले बाकीचे सगळे सिनेमे भन्नाट आहेत, त्यामुळे हे नक्कीच पाहणार.

शेवटचा सिनेमा मात्र फार भयंकर आहे. तो एकदा प्रयत्न करून सोडून दिला, पुन्हा काय धाडस होणार नाही.

सुरसंगम's picture

5 May 2022 - 9:07 pm | सुरसंगम

मग तुम्ही वेलकम होम बघितला असेलच.

कॉमी's picture

5 May 2022 - 10:03 pm | कॉमी

नाही पाहिला अजून.

आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त भयपट म्हणताहेत लोक.
तेही एकही विद्रुप मुखवटा आणि उगाचंच भयभीत करणारे पार्श्वसांगित न वापरता.
फक्त्त पुढे काय होईल या उत्कंठेपाई लोक जाम घाबरतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2022 - 3:03 pm | अमरेंद्र बाहुबली

कुठला ईंग्रजी की हिंदी? युच्युबवर दोन दिसताहेत.

पॉपकॉर्न's picture

7 May 2022 - 12:26 pm | पॉपकॉर्न

कोणत्या भयपटाबद्दल आहे हे?

कुमार१'s picture

6 May 2022 - 4:45 pm | कुमार१

परिचय छान चालू आहेत.
आवडले

सुरसंगम's picture

6 May 2022 - 9:20 pm | सुरसंगम

हिंदी जो मुळात तेलगूचा डब झालाय.

जेम्स वांड's picture

7 May 2022 - 5:29 am | जेम्स वांड

डॉक्युमेंट्रीज बद्दल लिहिलेले चालेल का हो कॉमी ?

कॉमी's picture

7 May 2022 - 8:23 am | कॉमी

लिहा कि वाण्ड भाऊ.

जेम्स वांड's picture

7 May 2022 - 8:58 am | जेम्स वांड

हे फक्त डॉक्युमेंट्रीजला वाहिलेले ओटीटी चॅनल सुरू होण्याच्या आधी एपिक चॅनल वर त्यांचे कैक कार्यक्रम प्रक्षेपित केले जात होते, त्यात डॉक्युमेंट्री चे विषय बघूनच मजा आली होती जवळपास ३ डॉक्युमेंट्री मी बघितल्या होत्या

१. टुरिंग टॉकीज व्यवसायावर असलेली :-

टुरिंग टॉकीज व्यवसाय कसा सुरू झाला, कसा भरभराटीला आला अन कसा लयाला जातोय ह्यावर अप्रतिम चित्रण असलेली डॉक्युमेंट्री होती, विशेष म्हणजे पूर्ण भारतात टुरिंग टॉकीज घेऊन फिरणाऱ्या पार्टी ह्या बहुसंख्य सातारा जिल्ह्यातीलच असतात त्यांचे कुटुंब अन गावनिहाय भारतात फिरण्याचे प्रांत, रिल्स डिस्ट्रीब्युटर्स इत्यादी सगळे फिक्स असे. त्यांचे ट्रक पण मजेदार असत, सहसा सोलापूर किंवा सातारा, सांगली बाजूला असणारे दहा चाकी पुढे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न वगैरे लिहिलेले ट्रक, सॅटेलाईट प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीमुळे / इंटरनेट/ मोबाईल क्रांतीमुळे धंद्याला आलेले मरण, नवीन पिढीचा निरुत्साह (धंदा करण्याच्या बाबतीत) अन जुन्या दिवसांच्या आठवणीत रमलेली भावुक जुनी खोडे असा मानवी भावनांचा मेळा वाटली होती ती डॉक्युमेंट्री

२. कटीयाबाज -

उत्तर प्रदेशात विजेचे आकडे टाकणारे, ती वीज वापरणारे आणि तिची मागणी ह्या समांतर अर्थव्यवस्थेवर असलेली डॉक्युमेंट्री, कटियाबाज म्हणजे स्वैर मराठीत आकडीबहाद्दर, कोणाच्या घरी लग्न आहे मौतमाती तेरावे चौदावे आहे पाहुणे गोळा होणार आहेत अश्या प्रसंगी कटियाबाजला बोलवले जाणार, तो मोठा बांबू घेऊन अवतरणार आणि जीवावर खेळून आकडे टाकून वीज पुरवठा जोडून देणार, त्याचे पैसे घेणार, त्यात काही वीज विभाग कर्मचारी पण हात ओले करून घेणार. सरकारी पातळीवरून कटियाबाज लोकांना आवरण्याचे आवाहन, त्यात असणारी स्थानिक समीकरणे, करायला काही नाही, शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत म्हणून कटियाबाजीला लागलेल्या पोरांची व्हर्जन्स, काही चिकटून मेलेल्या पोरांच्या कथा इत्यादी आहे त्यात, करुण रसाला चिकटून असलेली पण एक संवेदनशील डॉक्युमेंट्री.

३. वेटलँड्स ऑफ मुंबई -

भांडुप उदंचन केंद्र अन कांदळवन, हिरानंदानी गार्डन्स, पोवई लेक, नवी मुंबई, मिठी नदी इत्यादी दलदली क्षेत्रे, तिथे येणारे परदेशी पक्षी पाहुणे, त्यांचे मुंबईच्या इकोलॉजीवर पडणारे प्रभाव, तापमानात होणाऱ्या वाढीमुळे त्यांच्यावर पडणारे असर, संवर्धनाचे प्रयत्न, स्थानिक कोळी-आगरी गट आणि वेगवेगळ्या एनजीओज मिळून करत असलेले काम, असे एक सकारात्मक उत्तम चित्रण होते त्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्या बाबतीत आत्ता इतकेच आठवते खरे.

टुरिंग टॉकीज , मराठी चित्रपट पण होता , गजेंद्र अहिरे दिग्दर्शित
एक "प्रायोगिक / वास्तववादी " निर्माता आपला चित्रपट लोंकांपर्यंत पोचावा म्हणून अश्या टुरिंग टाकीज ची साथ घेतो असे काहीसे कथानक , कलाकार सुबोध भावे, किशोर कदम

चौकस२१२'s picture

4 Sep 2024 - 6:12 am | चौकस२१२

आर्थिक झोल / घोळ यावरील माहितीपट/ शोध पत्रकारिता

गोल्ड माफिया ,https://www.youtube.com/watch?v=evWEuVR1XIs

स्टार्ट अप मध्ये एलिझाबेथ होम्स आणि रमेश बलवान या जोडीने नुसताच आर्थिक घोळ घातला नाही तर व्यद्यकीय उपकरणांचं बाबतीत हा घोळ असल्यामुळे लोकांचं जीवा वर पण बेतले
https://www.youtube.com/watch?v=to2GSibbrv0
या शिवाय ६० मिनिट मध्ये पण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे

दुबई गँगस्टर पॅरॅडिस ???
https://www.youtube.com/watch?v=i823AhR8zKQ&t=19s

कॉमी's picture

15 Aug 2022 - 8:55 pm | कॉमी

२०१८ मध्ये थायलंडची १२ मुलं आणि त्यांचा तरुण कोच थाम लुआंग नामक लांबलचक गुहेत गेलेले, आणि मान्सूनच्या अचानक आगमनामुळे गुहेत झपाट्याने पाणी जमा झाले आणि त्यांचे बाहेर पडणे अशक्य झाले. गुहेमध्ये काही ठिकाणी पूर्ण छतापर्यंत पाणी होते.

त्यांना बाहेर काढण्यासाठी नेव्ही सिल्स, थायलँडची जनता तसेच इतर अनेक देशातले स्वयंसेवक दिवसरात्र झटू लागले. सर्व जगाचे लक्ष मुलांच्या रक्षणावर होते.

त्यांच्या रेस्क्यू मिशनची चित्तथरारक सत्यकथा सिनेमात घेतली आहे. कुठेही अतिरिक्त नाट्यकरण केले नाहीये, संयत पणे घटना उलगडली आहे.

अगदी पाहण्यासारखा सिनेमा !
अमेझॉन प्राईम वर आहे.

ही चित्तथरारक स्टोरी मी फॉलो करत होते... मुले आणि कोच सुरक्षित बाहेर आल्यावर खरंच आनंद झाला होता.
नक्की पाहीन ही मुव्ही !

कुमार१'s picture

3 Sep 2022 - 6:53 pm | कुमार१

अगदी पाहण्यासारखा सिनेमा !

>>>> +१११११
सुन्दर !

पर्णिका's picture

17 Aug 2022 - 4:25 am | पर्णिका


(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)


Chris Evans ची Gifted (2017) बघितली नसेल तर नक्की पहा. मला आवडली होती ही मुव्ही. :D

कॉमी's picture

20 Aug 2022 - 11:09 am | कॉमी

नक्की बघेन. रोचक वाटतोय सिनेमा.

तुषार काळभोर's picture

4 Sep 2022 - 12:41 am | तुषार काळभोर

दुपारी जोकर पाहिला. एका दुर्लक्षित आणि अतिसामान्य मुलाचा प्रवास जोकर पर्यंत कसा होतो, ते दाखवलंय. प्रचंड कौतुक ऐकलं होतं. पिच्चर नक्कीच त्या कौतुकास पात्र आहे.

आता कठपुतली पाहिला. २* ते ३.५* रिव्ह्यू आहेत. चांगला ते वाईट असे रिव्युज आहेत. सव्वा दोन तासाचा चित्रपट किमान पावणे दोन तास खिळवून ठेवतो. शेवटचा अर्धा तास तितकासा उत्कंठावर्धक नाही वाटला.

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 8:10 am | प्रचेतस

अगदी.
मीही काल रात्रीच कटपुतली पाहिला. शेवट अगदीच कैच्याकै आणि तर्कास न पटणारा आहे.
तुकाशेठ, सिरीयल किलर्सवर काही बघायचे असल्यास डेक्स्टर सिरीज बघा असे सुचवेन.

कॉमी's picture

4 Sep 2022 - 9:44 am | कॉमी

Dexter एकदम झकास आहे. पहिले चार सिझन अतिशय जबराव बनवलेले आहेत. शेवटच्या काही सिझन्समध्ये जरा गाडी गडबडलीये.

मी नवीन रिबूट वाला नवीन नववा सिझन सुद्धा पाहिला, तो पण इतका काही खास वाटला नाही.

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 10:12 am | प्रचेतस

नवीन रिबूटवाला नववा सीजन प्राईमवर नसल्याने पाहिला नाही.
आता नेटफ्लिक्सवर वॉकिंग डेड चा ११ वा सीजन सुरू झालाय त्याचे आठच भाग आलेत ते संपवले आणि आता व्हायकिंग्स सुरू केलीय, पहिले चार एपिसोड बघून झाले.

कॉमी's picture

4 Sep 2022 - 10:17 am | कॉमी

१. सेव्हन- ब्रॅड पिट + मॉर्गन फ्रिमन + केव्हीन स्पेसि
ब्रॅड पिट आणि फ्रिमन "सात पापांवर" आधारित खून करणाऱ्या खुन्याचा तपास करत असतात.

२. नाईटक्राऊलर- हा खरतर सिरीयल किलिंगवर नाहीये, पण तश्याच मानसिकतेवर आहे.
"नाईटक्राऊलींग" म्हणजे रात्री रस्त्यावर फिरून गुन्ह्यांचे चित्रण करणे, किंवा गुन्हा झाल्यावर चित्रण करणे आणि न्यूज चॅनेल्सना विकणे. इथे एका तरुण नाईटक्राऊलरची गोष्ट आहे. तो "योग्य" फुटेज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो.

३. स्विनी टॉड (फ्लीट स्ट्रीट वरचा शैतान नाव्ही)-
स्वतःवर आणि बायकोवर केलेल्या अत्याचारांचा सूड घेण्यासाठी एक तुरुंगातून परतलेला नाव्ही आपले दुकान पुन्हा उघडतो. हा सिनेमा एक संगीतिका (म्युझिकल) आहे. जॉनी डेप + ऍलन रिकमन + हेलेना कार्टर अशी कास्ट.

४. वि निड टू टॉक अबाउट केव्हीन- हा सगळ्यात अस्वस्थ करणारा सिनेमा आहे. होम्सकूल शूटर मुलाच्या आईच्या दृष्टिकोनातून कथा आहे.

५. सायलेन्स ऑफ द लॅमब्स आणि हॅनिबल.

६. अमेरिकन सायको-
हा सगळ्यात वेगळा सिनेमा आहे. एका अत्यंत नार्सिसिस्ट व्यक्तीची कथा आहे. हा सिनेमा काही जागांवर भयंकर आहे आणि इतर ठिकाणी वेगळ्याच प्रकारचा विनोदी आहे. सिनेमातले अनेक प्रसंग मिम्स म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 10:24 am | प्रचेतस

सेव्हन खूपच जबरदस्त आहे.
वरील यादीत झोडियाक हवा होता.
आल्फ्रेड हिचकॉकचे सायको आणि फ्रेंझी हे पण खूप जबरदस्त.

तुषार काळभोर's picture

4 Sep 2022 - 2:41 pm | तुषार काळभोर

सिरियल किलरच असं नाही. कसलाही गुन्हा आणि त्या गुन्ह्याची उकल. असे एज ऑफ द सीट सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आवडतात.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 9:59 am | जेम्स वांड

अन् आज पहाटे उठून सोनी ब्राविया ७५ इंच गणपती खरेदी सतकर्णी लावली सकाळी सकाळी फेलोशिप ऑफ द रिंग पाहून

&#129315 &#129315 &#129315 &#129315

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 10:08 am | प्रचेतस

अररारारारा, खतरनाक.

तुषार काळभोर's picture

4 Sep 2022 - 2:43 pm | तुषार काळभोर

बाबौ!! टीव्हीच्या बाबतीत बडा है तो बेटर है, हेच खरं!

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 6:42 pm | जेम्स वांड

आपून आपल्या बाईडीला अने आपुनच्या बापुसच्या बाईडीस सेम बोलला होता पर तेनी काय ऐकते नाय, आपुन एक नल्ला ४३ इंच १०८० घेऊनश्यानी आला मंग साला सीरियल लावून देल्ला तर दोनी बाईडी लोग फुल जोर थी चिल्लापुकार करतेसी बोलते कलर डल हाय नी, पर भावसाहेब आपून बी नॉटी हाय नी, तेनला बसवाचा अगोदर आपून ब्राईटनेस फुल झीरो करून आपुनच्या बावाजीला आंख मारली होती नी.

बायडी लोक फुल कल्ला करून टिव्ही वापस घेऊनश्यानी गेल्ली बंने, अन् तेनला बोलली आमचं मरद अने हेंचा दिक्रा जे टिव्ही बघून गेल्ला ए वन भेजो नी.

इतका सगला केला तवा डोलियाला ४के मंदी आवडता पिक्चर भेटते भावसाहेब.

कॉमी's picture

6 Sep 2022 - 8:06 am | कॉमी

असं फशिवताय व्हय

कॉमी's picture

6 Sep 2022 - 2:35 pm | कॉमी

जॉर्डन पिलचा तिसरा सिनेमा नोप पाहिला.

आधीचे दोन-

१. गेट आउट- प्रचंड आवडला. थ्रिलर ! खुर्चीवर गोठवून टाकेल असा सिनेमा !

२. अस (Us)- गेट आउट मुळे खूप जास्त अपेक्षा होत्या, पूर्ण नाही झाल्या. पण, सिनेमा वेगळा होता, मेंदूला खाद्य पुरवणारा होता, त्यामुळे जॉर्डन पिल पुढे काय करतो ह्याबद्दल उत्सुकता टिकून राहिली.

नोप-

कॅलिफोर्निया जवळच्या वाळवंटात हेवुड हॉलिवूड होर्सेस नावाची रँच असते. इथे अनेक पिढ्यांपासून हेवूड कुटुंब सिनेमासाठी घोड्यांना हाताळण्याचे, घोडे पुरवण्याचे काम करत असते. आणि, मानवी इतिहासात पहिली चित्रफीत तयार झाली ती होती 'ब्लॅक मॅन ऑन अ हॉर्स' (हे खरेच आहे). तो ब्लॅक मॅन ह्या हेवूड कुटुंबाचा पूर्वज असतो. तेव्हापासूनच हे कुटुंब सिनेमा-घोडा व्यवसायात असतात.

एके दिवशी अचानक आकाशातून काही गोष्टी खाली पडतात. त्यात एक नाणे ओटीस सिनियर हेवूड, म्हणजे कुटुंबप्रमुखाच्या डोज्यावर वेगाने आदळते आणि ते मरतात. सरकारी यंत्रणांकडून विमानातून ह्या गोष्टी पडल्या असल्याचे कारण दिले जाते, जे खरेतर ओटीस ज्युनिअर उर्फ ओजे ला पटत नाही.

आता पूर्ण व्यवसाय पाहणे ओजे आणि त्याची लहान बहीण एमराल्ड 'एम' वर आले असते. पण सीजीआय जमान्यात धंदा बसत चालला असतो, एकेक ठरत घोडे विकायची वेळ आली असते.

सोबतच, फार्मवर विचित्र गोष्टी घडत असतात. काही घोडे नाहीसे झाले असतात, आणि ओजेला एक दिवस एक प्रचंड उडती तबकडी दिसते. तो आणि त्याची बहीण एलियन शिपचे शूटिंग करून श्रीमंत होण्याचा प्लॅन करतात. त्यावर पुढे सिनेमा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2023 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेटा आउट पाहिला. भन्नाट. लंबर एक.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2024 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोपही पाहिला. पण गेटआउट लैच भारी होता. अस पाहीन. पण तुम्ही त्याबद्दल काही खास लिहिलं नाही म्हणून टाळतोय. :)

-दिलीप बिरुटे

अस मला तितका आवडला नाही. पण कल्पना वेगळी आहे, डोक्याला खाद्य मिळते. एकदा पाहायला हरकत नाही.

ह्या दिग्दर्शकाचे आणि त्याच्या मित्राचे स्किट असतात. युट्यूबवर Key and Peele म्हणून चॅनल आहे. मस्त धमाल व्हिडिओ आहेत. ते अवश्य बघा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2023 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल Infinite Storm पाहिला. सुंदर चित्रपट आहे वास्तवावर आधारित म्हणून पाहतांना तर, अजूनच सुंदर वाटला. ओढवून घेतलेल्या दु:खातही माणूस आनंदी होतो ? नक्की बघायला हवा असा सुंदर सिनेमा.

Infinite Storm' Based on A True Story

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2023 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्य कथेवर आधारित साहसविरांची शिखरगाथेची कथा रोमांचक अशीच आहे. सिनेमा जबरदस्त आहे. आवडला. अशा कथांवर साहसाच्या कथांवर सिनेमे असतील तर सुचवा.

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

15 Dec 2023 - 9:47 pm | कॉमी

The Handmaiden (Amazon prime)
पार्क चान वुक म्हणून साऊथ कोरियन दिग्दर्शकाचा सिनेमा पाहिला. Erotic-thriller. (ह्या दिग्दर्शकाचा oldboy नावाचा सिनेमा पण जगप्रसिद्ध आहे.)

ओकजू म्हणून एक तरुण कोरियन मुलगी एका श्रीमंत जॅपनीज माणसाकडे त्या माणसाच्या दिवंगत बायकोच्या बहिणीच्या मुलीची सोबती (handmaiden) म्हणून नोकरीला लागते. ती मुलगी (लेडी अगासी) आणि ओकजु जवळपास समवयस्क असतात. ओकजु अनाथाश्रमात वाढलेली असते, तर लेडी अगासी तिच्या काकाच्या (म्हणजे, तिच्या आईच्या बहिणीच्या नवऱ्याच्या) क्रूर छायेत. अगासीशी लग्न केल्याशिवाय काका खरोखर श्रीमंत होणार नसतो. तो उपभोग घेत असणारी संपत्ती अगासीचा ट्रस्टी म्हणून उपभोगत असतो. त्याला जुनी पुस्तके, चित्रं जमा करण्याचा छंद असतो. म्हाताऱ्याचे त्याच्या नातीच्या वयाच्या अगासीशी लग्न करण्याचे प्लॅन असतात. अगासीचा चित्रकला शिक्षक काऊंट तिच्यावर लाईन मारत असतो. हा काऊंट एकदम देखणा असतो आणि स्वताला पोरी पटवण्यात एक्स्पर्ट समजत असतो.
ओकजू आणि अगासी मध्ये चांगली मैत्री होते, पण मग समजते की ओकजू ही काऊंटची पार्टनर असते. काऊंट खरेतर काऊंट वैगरे काही नसतो, तर एक आर्ट चोर, फॉर्जरी करणारा असतो. ओकजु पण एका चोर, फोर्जरी करणाऱ्या सिंडिकेट मधून आली असते. ती अगासीशी जवळीक करून अगासीला काऊंटच्या प्रेमात पाडायचे म्हणून आली असते. एकदा अगासीशी लग्न केले की तिला वेडी ठरवून संपत्ती हडपायचा काऊंटचां प्लॅन असतो. मोबदला म्हणून ओकजूला अगासीचे सगळे कपडे, दागिने आणि वर पैसे मिळणार असतात. (इथे गंमत आहे. सुरुवातीला सीन आहे, ओकजू जपान्याच्या घरी चालली असते तेव्हा तिची अनाथाश्रमातील बहिण "तुझ्याऐवजी मी जायला हवे होते ग..." असे ओक्साबोक्शी रडत असते. तेव्हा ओकजूच्या वाटचे खडतर काम तिच्या ऐवजी आपल्याला मिळावे असे ती म्हणते आहे असे वाटते. नंतर तोच सीन परत दाखवला आहे तेव्हा ती पैसे आणि दागिने आपल्याला मिळायला हवे होते म्हणून रडते आहे समजते.)
पण स्वार्थी ओकजू आणि भाबडी अगासी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढेही अनेक ट्विस्ट आहेत. Erotica म्हणून उत्तम, आणि कथा सुद्धा एकदा बघण्यासारखी नक्की आहे.

तुषार काळभोर's picture

16 Dec 2023 - 2:23 pm | तुषार काळभोर

जबरदस्त ट्विस्ट असलेला चित्रपट आहे. 2006 मध्ये संजय दत्त आणि जॉन अब्राहम चा जिंदा पाहिला होता. तसा वाईट चित्रपट नव्हता, पण कथेच्या मुळाशी असलेलं कारण भारतीयीकरण करताना अगदीच पांचट केलं गेलं. म्हणजे या कारणासाठी कोणी असा का वागेल, असं वाटलं होतं.
पुढे काही वर्षांनी ओल्डबॉय बघितला तेव्हा तो प्रचंड धक्कादायक वाटला होता.

कॉमी's picture

24 Dec 2023 - 12:09 pm | कॉमी

The Wicker Man पाहिला. मिडसोमर आणि ह्याच्या कथेत खूप साम्य वाटले.
एक पुराणमतवादी ख्रिश्चन पोलीस इन्स्पेक्टर एका हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी समरआयल म्हणून छोट्याश्या बेटावर जातो. ते बेट हे संपूर्ण एका लॉर्ड समरआयलच्या मालकीचे असते. बेटावरील लोकं त्याच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत नसतात. हरवलेली मुलगी ज्या बाईंची मुलगी असते ती सुद्धा ही कोण मुलगी माहीत नाही असे म्हणत असते. पण त्या पोलिसाला काहीतरी काळेबेरे आहे असे वाटत असते. पुढे त्याला हे पण समजते की त्या बेटावरील लोक पेगन धर्म पाळत असतात, आणि त्याच्या दृष्टीतून "अश्लील" गोष्टी करत असतात. पुढे रहस्य उलगडते. सर ख्रिस्तोफर ली लॉर्ड समरआयलच्या भूमिकेत आहेत. लॉर्ड ऑफ द रिंगज मध्ये सारुमान असणारे ली त्यांच्या गंभीर आवाजाने ओळखता येतात.

कॉमी's picture

1 Jan 2024 - 9:55 am | कॉमी

Anatomy of a fall पाहिला. फ्रेंच सिनेमा आहे. एका माणसाचा घरात वरच्या मजल्यावरून पडून मृत्यु होतो. काही कारणांमुळे त्याच्या बायकोवर संशयाची सुई वळते. तिथे असणारा एकमेव साक्षीदार म्हणजे त्या दोघांचा लहान आंधळा मुलगा असतो. (त्याचे आंधळे असणे कथेत फार काही योगदान देत नाही, हे खटकले.)

कोणतेही नाते कॉम्प्लेक्स असते, आणि त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी संपूर्णतः नात्याची ओळख होणे गरजेचे आहे. त्यातल्या एखाद्या तुकड्याला उचलून तुम्ही जज करू शकत नाही हा मुद्दा सिनेमात मांडला आहे. कोर्ट रूम ड्रामा आहे. मुख्य अभिनेत्रीने खूप मस्त अभिनय केला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2024 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Anatomy of a fall बघतोय.दोन तीन पॉज करुन ठेवलाय. तपास सुरुय.
सुरुवातीचा संथपणा म्हणा की माझा मुड म्हणा अजून चित्रपट पूर्ण होईना. :(

एलदा सलग पाहीनच.

-दिलीप बिरुटे

चित्रपट पाहिला की तो कुठे पाहिला हे पण लिहित चला म्हणजे दरवेळी कुठे पाहिला हा प्रश्न विचारायला नको.

तुषार काळभोर's picture

2 Jan 2024 - 7:29 am | तुषार काळभोर

धोपट मार्गा सोडु नको...

कॉलेजमध्ये डाय हार्ड ४.० पाहिला होता. आधीचे तीन नव्हते पाहिले.
सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊन ट्रॅफिक आणि गर्दीत भर घालायची इच्छा नव्हती. गुरुवारी पहिले तीन आणि शुक्रवारी चौथा पाहिला. तोपर्यंत ऍक्शनचा ओव्हरडोस झाल्याने पाचवा टाळला.

ही यादी. शेवटचा पाहिला नाही.
Die Hard (1988)
Die Hard 2 (1990)
Die Hard with a Vengeance (1995)
Live Free or Die Hard (2007)
A Good Day to Die Hard (2013)

ता. क. (भारतात १२०-१४० रुपये भाड्याने एक चित्रपट उपलब्ध आहे. आणि ४००-६०० रुपयांना विकत मिळतो. प्राईम, ऍपल टिव्ही आणि युट्यूबवर आहे.)

इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स बघितला. हा १९७८ सालचा सिनेमा आहे, मूळ १९५६ सालच्या ह्याच नावाच्या सिनेमाचा रिमेक. हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या एका बाईंना अचानक आपला नवरा वेगळाच वागतो आहे असे वाटू लागते. इतका वेगळा की हा आपला नवरा नाहीच ह्याची तिला खात्री पटते. ती हेल्थ डिपार्टमेंट मधल्या तिच्या मित्राला ह्याबद्दल सांगते, आणि तो तिला एका सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जातो. तिथे तिला समजते की अशी इतरही लोकं असतात ज्यांना आपल्या जवळचे एकदम विचित्र झालेत असे वाटत असते. आणि ही सगळी "वेगळी" लोकं अगदी संशयास्पद असतात. ही खरेतर अनोळखी असलेली लोकं एकमेकांशी बोलत असतात, त्यांचे काहीतरी संगनमत चालले असते. प्राईम व्हिडिओ वर आहे.

भारी सिनेमा आहे. सुरुवातीच्या भागात पॅरानॉइया मस्त दाखवला आहे. रोजमेरिज बेबी हा सुद्धा असाच सिनेमा होता ज्यात मुख्य पात्राला काहीतरी भयंकर कट चालला आहे असा सुगावा लागला असतो पण इतरांच्या वागणुकीमुळे ते पात्र आणि प्रेक्षक म्हणून आपणही शेवटपर्यंत शंकाग्रस्त राहतो की हा अतार्किक पॅरानॉइया आहे की खरेच काही गंभीर कारस्थान आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jan 2024 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली

वर ऊल्लेखलेले गेट आऊट नी ओल्डबाॅय पाहीले. गेटआऊट खरंच मास्टरपीस आहे. ओल्डबोय चं प्रतिशोध घेण्याचं कारण अंगावर काटा आणणारं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2024 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

12 th fail आणि Three of Us नदोन्ही सिनेमे वेगळे आणि आवडले. खरं तर दोन्ही सिनेमांवर तपशिलवार लिहायला पाहिजे असं वाटलं. एकीकडे युपीएससी एमपीएस्सी च्या विद्यार्थ्यांची धडपडीची कथा तर, दुसरी नितांत सुंदर अशी गझल. कोंकणातील सुंदर परिसर आणि पाय-यांवरुन निथळणा-या पाण्याप्रमाणे हळुवारपणे खोलवर आठवणी उतरत, निथळत जाव्यात तसा नितांत सुंदर सिनेमा. मजा आली. कलास.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2024 - 8:37 pm | अमरेंद्र बाहुबली

कुणीतरी अकरावा समुद्र (ओशन इलेवन) सिनेमा पहायला लावला होता. अतिशय खराब सिनेमा निघाला. वेळ बुडाला. श्वाशंक रिडीम्पशन तुरूंगाचा सिनेमा अप्रतिम होता.

तुषार काळभोर's picture

26 Jan 2024 - 8:03 am | तुषार काळभोर

रोजचा बसमध्ये येण्या जाण्याचा वेळ सत्कारणी लागेल.
प्राईम - आँखो देखी २०१४
(दिग. रजत कपूर, अभि. संजय मिश्रा)
Drama
पन्नाशीतला एक गृहस्थ. एक घटना घडते, आणि तो ठरवतो की फक्त आपल्या डोळ्यांना दिसेल तेच खरे मानायचे. लोक आधी त्याला वेड्यात काढतात, मग त्याचे अनुयायी बनतात.

रघू रोमिओ २००४
(दिग. रजत कपूर, अभि. विजय राज)
Dark Comedy
कोठे पाहायला मिळेल, ते अजून कळले नाही.
एक बारमध्ये काम करणारा वेटर. बारमध्ये काम करणारी एक मुलगी. टिव्ही मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री. त्या मुलीला वेटर आवडतो. वेटरला अभिनेत्री आवडते. वेटर अभिनेत्रीचे अपहरण करून त्या मुलीच्या घरी ठेवतो. तिच्या मागे असलेले गुंड.

प्राईम मिथ्या २००८
(दिग. रजत कपूर, अभि. रणवीर शौरी, नसीरुद्दीन शाह)
Dark Comedy
एक डॉन. एक बॉलिवूड मध्ये एक्स्ट्रा अभिनेता जो डॉनसारखा दिसतो. विरोधी गँग खऱ्या डॉनच्या जागी एक्स्ट्राला बसवते. पण एका अपघाताने तो डॉनचे कुटुंब आणि शत्रू स्वतःचे समजायला लागतो. खरं काय, खोटं काय... कसं ओळखणार...

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2024 - 2:07 pm | चौथा कोनाडा

आँखो देखी पाहिला .... ठाकठीक वाटला .. शेवटाला ग्रेट बिट फीलिंग आलं नाही !
धन्यु तुषार काळभोर !

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jan 2024 - 5:31 pm | अमरेंद्र बाहुबली

@काॅमी, गेट आऊट सिनेमा पाहीला, आवडला, पण पहील्या सीनचा अर्थ लागत नाहीये. कुणाला तरी गाडीत कोंबून किडनॅप एक जण जातो. त्या सिनचा नी ऊर्वरीत सिनेमाचा संबंधं काय??

इंग्रजी सिनेमे कुठे ओटीटीवर असले तर पाहता येत नाहीत. पण ते कोणत्या कादंबरीवर आधारित आहेत हे कळल्यास बरे होईल. पुस्तकं मिळण्याची शक्यता असते.
गेट आउट बद्दल उत्सुकता वाढली आहे.
.....
सिनेमासाठी घोड्यांना हाताळण्याचे, घोडे पुरवण्याचे काम करत असते याबद्दल. असाच एक सिनेमा माझ्या लहानपणी आला होता तो पाहायला मिळाला नाही. काही रानटी घोडे पकडून आणणारे असतात. त्यातला एक घोडा गायब होतो त्यास पुन्हा थोड्या दिवसांनी पकडून आणल्यावर गायब होतो. मग मात्र त्यास पकडल्यावर पाळत ठेवतात. एक लहान मुलगा रात्री कुंपणाबाहेर येऊन शिट्टी मारतो तेव्हा हा त्याचा घोडा कुंपणावरून उडी मारतो आणि तो मुलगा घोड्यावर बसून जातो असा सिनेमा होता.

एक सिनेमा खूप आधी बघीतला होता पण आता नाव आठवत नाहीये. कुणास माहित असल्यास सांगावे.
सिनेमा सलादिन च्या क्रुसेडच्या कालखंडातला. एका छोट्या किल्ल्यावर सलादिन च्या सैन्यानं केलेलं आक्रमण एक गोरा सैनिक किल्ल्यातल्या लोकांना घेऊन परतवून लावतो. युद्धाचं शूटींग अप्रतीम आहे!

बाबांनी एक सिनेमा सुचवला होता मागे, १९७७ चा "द कार". सुपरनॅचरल हॉरर. मी नाही पाहिला अजून पण भारी होता म्हणतात.

आंद्रे वडापाव's picture

1 Feb 2024 - 9:53 am | आंद्रे वडापाव

k

राघव's picture

1 Feb 2024 - 7:57 pm | राघव

धन्स! :-)

कंजूस's picture

3 Feb 2024 - 5:15 am | कंजूस

होय, द कार चांगला होता.

प्रचेतस's picture

3 Feb 2024 - 8:36 am | प्रचेतस

स्पीलबर्गचा ड्युएल एकदम भन्नाट आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे. एकदम थरारक.

आंद्रे वडापाव's picture

3 Feb 2024 - 9:24 am | आंद्रे वडापाव

कथा अतिशय वेगळी तरी , कथाबिज पाहून
"राशोमान" ची आठवण व्हावी ...

आंद्रे वडापाव's picture

3 Feb 2024 - 9:28 am | आंद्रे वडापाव

सॉरी

चुकून मी "The Last Duel"

या चित्रपटा चा उल्लेख समजून वरील कॉमेंट केली..

इग्नोर करू शकता...

सॅमबहादूर पाहिला. आवडला. विकी कौशलने भूमिका उत्तम वठवली आहे. मधले एक गाणे खूप आवडले.
युद्ध कसे जिंकले, स्त्रॅटेजी दाखवणे ह्यावर आणखी भर द्यायला हवा होता असे वाटले.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 9:59 am | अमरेंद्र बाहुबली

भारतीय युध्दपट मी पाहत नाही, अतिशय पांचट असतात. मागे कुणीतरी खफवर शेरशहा पहायला लावला होता, अतिशय भंगार सिनेमा होता, हिरो दात काढत भर युध्दात भिंतीआडून पाकिस्तानी सैन्याशी गप्पा मारत असतो, मशीनगन समोरून दुसर्या सैनीकाला ओढत नेतो तरीही कुणालाच गोळी लागत नाही, असले अत्याचार मले सैन नै होत. तो शहेनशहा सजेस्ट करनारा मिपाकर सापडला तर त्याच्यावर मी केस ठोकणार आहे.

Reality based युद्धपट पाहायचा असेल तर the downfall

YouTube वरती आहे
https://m.youtube.com/watch?v=YzSMFWKCHhg

हिटलरचा रोल अप्रतिम केला आहे. त्याच्या क्लिप्स अनेक जागी memes म्हणून वापरतात.

चौकस२१२'s picture

16 May 2024 - 11:10 am | चौकस२१२

+ सहमत ,, एकतर प्रेम कहाणी तरी घुसडलेली असते किंवा अतिरजीत तरी

बर फार कमी वेळा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा संस्थेचे नाव घेतले जाते ( अब्रुनुकसानी चा दावा लागू नये म्हणून कदाचित ) मग काहीतरी काल्पनिक नाव दिले जाते मग मजा निघून जाते , सत्य घटनेवर चित्रपट आहे समजा आणि त्यात राज्याचा मुख्यमंत्री दाखवयायचाय तर काल्पनिक राज्य कशाला? खरे नाव घ्या ना
खरे तर भारतीय समाजजीवना/ राजकारणात / आर्थिक वयहारात इतका माल मसाला आहे कि जास्त वास्तव पूर्ण कलाकृती बनवता येईल
( अर्थात गेली काही वर्षात बाजरी ( कमर्शियल ) चित्रपटात वास्तविकता आलेली आहे नाहीच असे नाही ( पूर्वी हिरो इन्स्पेक्टर असला तरी लांब केस ठेऊन अस्ययाचा , मुंबई चाय उन्हळ्यात सुद्धा सूट घालून )

स्ट्रॅटेजी दाखवतांना रॉ ची मेहनत देखील दाखवावी लागली असती. तसं केलं तर तो स्वतःच एक स्वतंत्र चित्रपट होईल. म्हणून तसं केलं नसावं.

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2024 - 10:13 pm | चौथा कोनाडा

बरोबर ! सहमत १०१%

सौन्दर्य's picture

8 Feb 2024 - 6:55 am | सौन्दर्य

'शंभरावं स्थळ' हा लघुपट युट्यूब पाहिला.

एखाद्या मुलाकडून नकार आला तर तावातावात ओळखदेख नसताना त्याच्या घरी जाऊन नकाराचे स्पष्टीकरण विचारायला कोणी मुलगी जाईल हेच पटत नाही. "नाही म्हंटले तर नाही म्हंटले, गेलास उडत, मी दुसरा पाहीन" अशीच सर्वसाधारण मानसिकता असते. त्यामुळे लघुपट इतर बाबतीत चांगला असला तरी तार्किकदृष्ट्या मला पटला नाही. कलाकारांनी काम छानच केले आहे.

चौथा कोनाडा's picture

17 May 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा

स्पष्टीकरण विचारायला कोणी मुलगी जाईल हेच पटत नाही.

सिनेमा / फिल्मस मध्ये अशा सिनेलिबर्टी दिसतातच
(पण असं म्हणतात की अशी घटना कुठंतरी घडलेली असते / किंवा घडण्याची शक्यता असते)

सौन्दर्य's picture

8 Feb 2024 - 6:56 am | सौन्दर्य

'शंभरावं स्थळ' हा लघुपट युट्यूबवर पाहिला.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2024 - 2:28 pm | अमरेंद्र बाहुबली

ईट फोलोस पाहीला. इतका काही खास वाटला नाही. मिस्ट्री सोल्व झाली असती तर चांगला वाटला असता.

सॉल्व असे होणार नव्हतेच ना. जे मागे लागले आहे ते पुन्हा कधी ना कधी येणार हेच तर खरी भीती आहे. जे काही सोल्यूषन आहे ते तात्पुरते आहे. ती अनामिक गूढ शक्ती आहे ती तुम्ही कितीही जागा बदलल्या तरी अविरतपणे पाठलाग करत राहील.

हॉरर, सायको थ्रिलर, साय-फाय यांच्या वाटेला मी सहसा जात नाही.
मला साध्या हल्क्या-फुलक्या, कॉमेडी, सामाजिक ड्रामा किंवा बायोग्राफिकल मूवीज जास्त आवडतात.

माझ्या all time favourite movies (before 2000)

It Happened One Night (1934)
Casablanca (1942)
It's a Wonderful Life (1946)
Lean on Me (1989)
My Cousin Vinny (1992)
A Few Good Men (1992)
Groundhog Day (1993)
The Shawshank Redemption (1994)
Courage Under Fire (1996)
Life Is Beautiful (1997)
You've Got Mail (1998)

कॉमी's picture

8 Feb 2024 - 5:32 pm | कॉमी

तुमच्या यादितले जे मी पाहिले आहेत ते सगळे आवडलेले सिनेमे आहेत.

कॉमी's picture

21 Feb 2024 - 10:00 pm | कॉमी

District 9
साऊथ आफ्रिकेत जोहानसबर्ग वर एके दिवस एक अवाढव्य स्पेसशिप येते. ते काही वर्ष तसेच राहते, त्याची दारे उघडत नाहीत. शेवटी माणसच वर शिपपर्यंत जाऊन दार फोडून आत जातात. तिथे लक्षावधी खंगलेले एलियन असतात. त्यांना खाली आणले जाते. तिथे त्यांना quarantine करण्यात येते. काही वर्षांत तिथे एलियन्सचा घेट्टो तयार होतो - डिस्ट्रिक्ट ९.
वीस वर्षे जातात, आणि आता लोकल लोकं आणि प्रॉन्स असे नाव पडलेले एलियन, ह्यांच्यात भांडणं चालू झाली असतात. त्यामुळे सरकार एलियनना जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात असते. त्यासाठी सर्व्हे करायला एक टीम डिस्ट्रिक्ट ९ मध्ये गेली असते. तिथे त्यातल्या एका माणसाचा योगायोगाने महत्त्वाच्या एलियन टेक्नॉलॉजीशी संबंध येतो, आणि त्या माणसाचे आयुष्य बदलते.

उत्तम ॲक्शन पट. चांगली करमणूक झाली. Hulu वर आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2024 - 10:03 pm | अमरेंद्र बाहुबली

डब्ड आहे का??

कॉमी's picture

21 Feb 2024 - 10:15 pm | कॉमी

हुलू वर दिसला नाही, पण चक्क युट्यूबवर कोणीतरी हिंदीत टाकलेला दिसतोय. गुगल केल्यावर सापडेल.

तुषार काळभोर's picture

22 Feb 2024 - 6:46 am | तुषार काळभोर

+१
अतिशय मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत इस्क्वेअर मध्ये पाहिला होता. तेव्हा सायन्स फिक्शन पाहण्याच्या उद्देश्याने गेलो होतो. टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर.
२०१० च्या दशकात फाउंड फुटेज प्रकारे चित्रित केलेल्या चित्रपटांची लाट आली होती.

कॉमी's picture

22 Feb 2024 - 9:16 am | कॉमी

टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर.

अगदी. अपार्टहेडचे स्पष्ट रूपक आहे. अमेरिकेच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स वर पण टिप्पणी आहे म्हणता येईल.

कॉमी's picture

3 Mar 2024 - 10:16 pm | कॉमी

ड्यून २
ड्यून २ बघितला. सिनेमॅटिक मास्टरपीस. खरेतर ड्यून कादंबरी पडद्यासाठी अवघड आहे. पाहिला सिनेमा किंचित धिमा होता, कारण पहिल्या पुस्तकातले सगळे मटेरियल कव्हर करायला दोन सिनेमे लागणार होते. पहिल्या सिनेमात पार्श्वभूमी तयार केली गेली. ह्या सिनेमात मिथक सुरू होते. ड्यून मालिकेची प्रमुख थीम आहे - संपूर्ण लोकसंख्येला पेटवू शकणारा नेता खूप हानिकारक ठरू शकतो. ही कल्पना विस्ताराने मांडण्यासाठी इस्लामशी समांतर असा काल्पनिक धर्म आणि त्या धर्माचा मसिहा पॉल अर्टेडीस उर्फ मु'आदीब आणि त्याच्या वंशजांची जीवनकथा ह्या मालिकेत येते. अतिशय थरारक सिनेमा. पहिला बघितला नसेल तर पहिला बघून मग हा आवर्जून बघणे सुद्धा वर्थ इट आहे हेमावैम.
आता ड्यून मसायाची वाट बघणे आले. (पुढचा भाग.)

आंद्रे वडापाव's picture

6 Mar 2024 - 12:47 pm | आंद्रे वडापाव

सध्या "शोगुन" ही मध्य युगीन जपानच्या काल्पनिक धर्तीवर आधारित मालिका बघतोय...

३ रा एपिसोड आलाय ...

३ ऱ्या एपिसोड मध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनातील (आग्र्याहून सुटका, पन्हाळगडचा वेढा ) याच्याशी कमालीचे साम्य असलेले,
प्रसंग आढळले ...

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Mar 2024 - 8:00 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी डब आहे का??

कॉमी's picture

7 Mar 2024 - 4:48 pm | कॉमी

पहिला एपिसोड बघितला.

कॉमी's picture

13 May 2024 - 9:24 am | कॉमी

गॉडझिला-मायनस वन बघितला. जबरी आहे.
Toho ही जापनीज कंपनी गॉडझिला, काँग इत्यादी पात्रांची मालक आहे. त्यांनी हॉलिवूडला (मॉनस्टरव्हर्स साठी) सिनेमांची परवानगी दिली आहे तरी त्यांचे स्वतःचे सिनेमे सुद्धा येत असतात. शिन गॉडझिला आणि २०२३ चा गॉडझिला मायनस वन हे टोहोचे मॉडर्न गॉडझिला सिनेमे आहेत. हॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा कथेवर जास्त भर देणारे सिनेमे आहेत.

मायनस वन - दुसऱ्या विश्वयुद्धातल्या पराभवानंतर जपान अनेक बाबीत देशाच्या इतिहासातील सर्वात खालील पातळीवर होता - शून्य पातळीवर. ह्याच परिस्थितीत गॉडझिला टोकियो वर चालून येतो - म्हणून गॉडझिला मायनस वन.

शिकिशिमा हा एक तरुण कामिकाझे पायलट असतो - शत्रूच्या जहाजावर धडकून विस्फोटात ठार होणे ही त्याची ऑफिशियल जबाबदारी असते. तो शेवटच्या क्षणी मागे फिरून एका बेटावर उतरतो. तिथे असलेले जपानी सैन्य कर्मचारी त्याच्याकडे आपले कर्तव्य चुकवणारा म्हणून बघत असतात. खोल समुद्रात राहणारे मासे मृतावस्थेत मोठ्या प्रमाणावर त्या बेटाच्या आसपास तरंगू लागतात आणि ह्या कॉलिंग कार्डच्या पाठोपाठ खुद्द गॉडझिला अवतरतो. मोक्याच्या वेळेस गॉडझिलाकडे बघून विमानातला शिकिशिमा स्तब्ध होतो, आणि त्याच्यासमोर बेटावरील जवळपास सगळे गॉडझिलाकडून मारले जातात.
युद्ध संपते. शिकिशिमा बॉम्बिंग मध्ये उद्ध्वस्त टोकियोत परत येतो. घर, आई वडील - काही शिल्लक नसते. "सरव्हायव्हर्स गिल्ट"ने त्याची मनस्थिती विदीर्ण असते. आपण ड्युटी चुकवणारे कामिकाझे पायलट आहोत, आपल्या मुळे अनेक लोकं गॉडझिलाकडून मारली गेली हे विचार त्याला पोखरत असतात. निव्वळ योगायोगाने त्याला एका परिवाराची जबाबदारी मिळते, आणि तो युद्धात अमेरिका आणि जपानने समुद्रात पेरलेल्या अगणित सुरुंगांना शोधून निष्फळ करण्याची धोकादायक नोकरी घेतो. नवीन कामात आणि घरात थोडी स्थिरता येत असते तोच त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खोल समुद्रात गॉडझिलाशी संपर्क होतो. गॉडझिला टोकियो वर चालून येणार हे समजल्यावर शिकिशिमाचा भूतकाळ परत त्याला छळू लागतो.
व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर मिळालेला. खरेतर व्हिज्युअली सिनेमाचे कमी बजेट जाणवते पण कुठेही वावगे वाटत नाही. कथेतली पात्रं मस्त लिहिली आहेत. पाहण्यासारखा सिनेमा.

(बघण्यासाठी दोन पर्याय - अमेझॉन प्राईम vpn करून जपान. किंवा पायरसी. तिसरा पर्याय सध्या उपलब्ध नाही.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक मानसिक थकवणा-या काळानंतर निवांतपणे नेटफ्लिक्सवर 'लापता लेडीज' सुंदर सिनेमा बघितला. चित्रपट मनोरंजन करतो आणि एक चांगला संदेशही देतो. अभिनेत्यांचा अभिनय, कथा, छायाचित्रण सुरेख. आवडला सिनेमा.

नेटफ्लिक्सवर 'हिरामंडी' चा भाग एक संपवला. भव्य दिव्य सेट, छायाचित्रण, नृत्य, आणि स्वातंत्र्य संग्रामाची कथेचा पाया रचणारी सुरुवात उत्सकता लागली आहे. दुस-या भागाला सुरुवात केली आहे.

-दिलीप बिरुटे

खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कौतुकाबद्दल धन्यवाद काका. ;)

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

15 May 2024 - 8:14 pm | कॉमी

लापता लेडीज बघायचा प्लॅन आहे.

>>>खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद..

सहमत आहे. एकदा निकाल लागला की या काळातील अनुभवाविषयी आवश्यक ती काळजी घेत लेख लिहावा अशी विनंती.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

छान बिरुटे सर

Bhakti's picture

15 May 2024 - 7:27 pm | Bhakti

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2024 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिरामंडीच्या तिस-या भागापर्यंत पोहचलो. सालं कंटाळा येऊ लागलाय.
बघतो अजून पुढे काय होतं ते......

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

21 May 2024 - 7:27 am | चित्रगुप्त

एकादे जबाबदारीचे आणि कष्टाचे काम व्यवस्थितपणे पार पाडणे ही मोठीच समाधानाची बाब असते. त्याबद्दल अभिनंदन. या अनुभवावर नक्की लिहावे ही विनंती. तुमचे लेख बरेच दिवसात वाचायला मिळालेले नाहीत.

चौथा कोनाडा's picture

28 May 2024 - 6:06 pm | चौथा कोनाडा

या अनुभवावर नक्की लिहावे ही विनंती.

१०१ /- सहमत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2024 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्ती आणि अबा धन्स.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2024 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'सोसायटी ऑफ द स्नो' रग्बी संघातील खेळाडू आणि मित्राचं विमान निर्जन बर्फाळ उंचपर्वत रांगात कोसळतं महिन्या-दोन महिन्यातील भावना आणि जगण्याचा संघर्ष सुरु होतो.

अडकले आणि शेवटी सुटले असे सिनेमे आवडतात सिनेमा मधे संथ वाटतो, कंटाळा येतो. पण सूटका होईपर्यन्त पर्यन्त पाहावे लागते. :/

-दिलीप

वामन देशमुख's picture

21 May 2024 - 12:49 pm | वामन देशमुख

सध्या मार्वल स्टुडिओचे सिनेमे पाहतोय.

म्हणजे आधी सगळे असे काही पहिले नव्हते. एक-दोनच पहिले होते. आणि अपत्ये, भाचरे-भाचऱ्या, पुतणे-पुतण्या वगैरे लोक त्याबद्धल जी चर्चा करतात त्यात मला पुरेशी माहिती नसल्यामुळे काहीसे बाजूला पडल्यासारखे होत होते. हवे तर FOMO म्हणा! पण सध्या थोडा वेळ आहे म्हणून पंधरा दिवसांपासून जसा वेळ मिळेल तसे पाहतोय. पाच-सात पाहून झालेत.

त्यांतली मला सर्वात आवडलेली व्यक्तिरेखा म्हणजे टोनी स्टार्क.

रच्याक, ते सिनेमे पाहण्याचा हा क्रम बरोबर आहे का?

Chronological as per Story Lines

  1. Captain America: The First Avenger (1940s)
  2. Captain Marvel (1990s) (Mid-credit scene takes place after Avengers: Infinity War)
  3. Iron Man (2008)
  4. Iron Man 2 (2010)
  5. The Incredible Hulk (2010)
  6. Thor (2011)
  7. The Avengers (2012)
  8. Iron Man 3 (2012)
  9. Thor: The Dark World (2013)
  10. Captain America: The Winter Soldier (2014)
  11. Guardians of the Galaxy (2014)
  12. Guardians of the Galaxy Vol. 2 (2014)
  13. Avengers: Age of Ultron (2015)
  14. Ant-Man (2015)
  15. Captain America: Civil War (2016)
  16. Black Widow (2023) (Events take place after Captain America: Civil War)
  17. Black Panther (2016)
  18. Spider-Man: Homecoming (2016)
  19. Doctor Strange (2016-2017)
  20. Thor: Ragnarok (2017)
  21. Ant-Man and The Wasp (2017) (Post-credit scene occurs during Avengers: Infinity War)
  22. Avengers: Infinity War (2018)
  23. Avengers: Endgame (2018-2023)
  24. Spider-Man: Far From Home (2024)

क्रम चुकलेला असल्यास किंवा काही राहून गेलेले असल्यास सुधारणा करून द्यावी ही विनंती.

कॉमी's picture

21 May 2024 - 7:30 pm | कॉमी

ह्या क्रमात नका बघू. Published order म्हणजे जसे रिलीज झाले त्या क्रमाने बघणे सर्वोत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2024 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'लंपन' सोनी लीव् वर आठ भागातली मराठी मालिका. 'लंपन' माझ्या पिढीला माहिती नाहीच. 'वनवास, शारदा, पंखा आणि झुंबर हे चारही कथासंग्रह अभ्यासक्रमात शिकवायला नव्हते म्हणून वाचले नव्हते. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या 'लंपनच्या गोष्टी' छोट्या पडद्यावर आल्या आहेत. लंपन बघायला सुरुवात केली आणि 'म्याड' झाल्यासारखा हसत बसलो. आपलं हे वाचायचं राहून गेलं. सध्या पुस्तक वाचायची सवय राहिली नाही, हे शाळेतील दप्तरात भरलेल्या 'शहात्तर गोष्टी' सारखं पुन्हा पुन्हा स्वत:शी बोलत राहिलो.

'लंपन' प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र, आई-वडिलांचे घर सोडून बेळगावाकडील रम्य निसर्ग परिसरात आजी-आजोबाकडे शिकायला आलेला. आजोबा पुरातत्त्व विभागाचे संशोधक. काठी घेऊन तड-तड़ करीत नातवामागे एकशे बेचाळीस वेळा धावणारी प्रेमळ आजी. मोठाले आणि काण्या डोळ्याचा भयंकर वाटणारा पण प्रेमळ नोकर बाबूराव. शाळा, संगीत, शाळेतील दोस्त आणि सुमी-त्रा त्याचे म्हणून पाहिले तरी हजार वेळा तो प्रसंग आपलाच घडतोय असे वाटणारे आपल्यातला लंपन.
'लंपनचं' भावविश्व, त्याचं मनोगत,त्याचा निरागसपणा, आई-वडिलांच्या आठवणी- प्रेम, नदी, फुलपाखरू, कौलारु घर, कंदील आणि निरागस नदीकाठावर बसलेला दात बाहेर आलेला दहा-बारा वर्षाचा स्वत:शी बडबड करणारा लंपन.

'सोनी लीव' वर दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी लंपनचं भावविश्व आतिशय सुदंर उभं केलं आहे आपण 'म्याड' झाल्यासारखे सारखं सलग पाहात राहतो. लंपनची भूमिका करणा-या मिहीर गोडबोले आपलं मन 'एकोणतीस हजार' वेळा जिंकून घेतो. मालिका संपता-संपता लंपनच्या मैत्रिणीसारखे आपण 'हजारवेळा' व्याकुळ होतो. प्रकाश संत यांचा 'लंपन' एकदा जरी बघितला तरी, पुस्तक न वाचताही 'शंभर वेळे'चा आनंद नक्की मिळतो. लंपन नक्की पाहा.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

26 May 2024 - 10:00 pm | Bhakti

खुपचं सुंदर रसग्रहण केले आहे!
आज पाहिली ही सिरीज..
#लंपन
मनातल्या निरागस बडबडीची साखळी बांधणारा प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र.आईपासून दूर आल्यामुळे किंचित हिरमुसलेला पण आजी,आजोबा,सुमि-त्रा ,ढीगभर दांडगे मित्र,गावतले चार दोन घरोबा यात आपल्यासाठी आनंदाच्या गोष्टी साकारत राहतो.
अगदी पहिल्याच भागात मार्जार अवतार हे बोक्याच्या खुसखुशीत वर्णन ऐकून मेंदूची प्लास्टिसिटी खाडकन जोडली गेली आणि वनवास कादंबरी फार पूर्वी वाचली होती हे आठवलं.
कारवारी मराठी भाषेतला गोडवा,पोषाखतला जुनसर दिखामदारपणा, बारवेत फुललेली कमळे गुंडेमठाचा घनदाट रस्ता, शाळेतला घंटेच्या तालावरचा दंगा सारं काही मनाला गारवा देणारा आहे.लंपनच्या निमित्ताने घरात २१२२१ वेळा फिसकन,गडबडा हसलो आहोत.
अगदीच 'म्याड' झाल्यानंतर नववारीतली आजीची आठवण येऊन गावकडे जायचा बैलगाडीचा प्रवास पुन्हा डोळ्यासमोरून तराळून गेला.तुम्हांला खोटं वाटेल पण माझी लेक (वय ९) यातल्या मधूर गीतांनीही भुरळून गेली आणि "काय सुंदर गाणं आहे" अशी दाद सहज देऊन गेली.लेकीला असं काहीतरी ओरग्यानिक देण्याची सतत धडपड असते.
मालगुडी डेज कधीही लावून ते मी करत असते.आता लंपनही गवसला आहे.पुढच्या सीजनच्या प्रतिक्षेत...
-भक्ती

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा पाहायला सुरुवात केली तेव्हा चकचकीत उडता पंजाबी हिरो ,मिष्टी सुंदर हिरोईन,मध्येच त्यांच्या आजी आजोबांची जुनी अधुरी प्रेम कहाणी, दोन्ही कुटुंबांचा हिरो हिरोईनच्या प्रेमाला विरोध टिपीकल प्लोट वाटला.यावर चांगली जिलेबी टाकणार होते रिव्ह्यूचा.

पण जेव्हा हिरोईन हिरो एकमेकांच्या घरी राहून एक प्रयोग करायचा ठरवतात.तेव्हा खुप इंटरेस्टिंग होतो सिनेमा.एकदम फ्रेश स्टोरी एक पुरुष म्हणून तो नृत्य करू शकत नाही? पुरूष स्त्रीयांना बायको' tag मधून मोकळीक कधी देणार?असे आणि खुप प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात सिनेमा पुढे सरकत जातो.मस्त होत जातो सिनेमा,करण जोहर खरंच कधी अफलातूनपणे विचारात पाडतो.
अरजित सिंगच्या वे कमलेया गाण्याने ह्रदयात जागा मिळवली आहे.
वे कमलेया, मेरे नादान दिल
दो नैनों के पेचीदा सौ गलियाँ रे
इनमें खो कर तू मिलता है कहाँ
तुझको अम्बर से पिंजरे ज़्यादा प्यारे
उड़जा केहने से सुनता भी तू है कहाँ
गल सुणले आ..

ता क.अभिमानाची गोष्ट ही की ,यातल्या कथक गाण्यातले काही नृत्य भाग माझ्या मैत्रिणीच्या बहिणीने जास्वंदीने तिच्या गुरूसह बसवले आहेत :)

आंद्रे वडापाव's picture

4 Jun 2024 - 7:28 pm | आंद्रे वडापाव

जास्वदीं यांच्या "गुरूने" गाण्यातले काही नृत्य भाग बसवले आहेत (जास्वदीं च्या मदतीने ) ?

Bhakti's picture

4 Jun 2024 - 9:23 pm | Bhakti

हो बरोबर.

सावि's picture

6 Jun 2024 - 9:06 pm | सावि

लापता लेडीज

किरण राव दिग्दर्शिका आहे, म्हणून बघावा कि नाही या संभ्रमात होतो, पण दुसरा कुठला पर्याय न सुचल्याने, - लापता लेडीज चित्रपट बघितला.

२००१ च्या काळातील २ स्त्रियांची कथा, चुकामुक होऊन वेगळ्या ठिकाणी पोचल्या मुळे तयार झालेली परिस्थिती अतिशय सुंदर प्रकारे दाखवली आहे. २ वेगवेगळे रुपातले पुरुष आणि त्यांचे विचार, वेगळ्या प्रकारचे वुमन एम्पावरमेंट, चांगले आणि वाईट मिळणारे लोक आणि अनुभव, संशयास्पद हालचालीतून होणारे छोटेसे रहस्य, आणि त्या रहस्याचा मन प्रफुल्लित करणारा उलगडा !

रवी किशन आणि छाया कदम हे दोनच ओळखीचे कलाकार, आणि बाकीच्यांनी सुद्धा छान वास्तविक अभिनय केला.

एक शांत सुंदर हळू हळू हसवत, मध्ये मध्ये मनाला डिवचत असा आवडलेला चित्रपट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2024 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त टीपी झाला पाहिजे.

-दिलीप बिरुटॅ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2024 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन दिवसांपूर्वी ओटीटीवर मराठी ’चुंबक’ सिनेमा बघितला. साहील जाधव, संग्राम देसाई आणि स्वानंद किरकिरे या तिघांचा हा सिनेमा. कथानक साधंसं. स्वानंदचा ’प्रसन्न”चा अभिनय नंबर एक. लॉटरी, फसवा फसवी, प्रामाणिकपणा, भन्नाट जमलंय सर्व. सिनेमा आवडला.

-दिलीप बिरुटे

दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे पाहिले. पहिला फोर्ड वि फरारी. केन माईल्स आणि कॅरोल शेलबी ह्या जोडीची गोष्ट आहे. ह्या दोघांनी फोर्डच्या गाडीवर काम करून फरारीस नमवण्याचा कसा प्रयत्न केला ह्यावर सिनेमा आहे. ह्यात मग माईल्सचा विचित्र स्वभाव, फोर्ड मधले ब्युरोक्राटीक अडथळे वैगेरे वैगेरे गोष्टी येतात. ख्रिश्चन बेल आणि मॅट डिमन असून सुद्धा सिनेमा ठीक ठीक वाटला. उगाच खेचला आहे असे काही ठिकाणी वाटले.

रश हा दुसरा सिनेमा. ह्यात निकी लौडा म्हणून ऑस्ट्रीयन रेसर आणि जॅक हंट ह्या ब्रिटिश रेसर मधली चुरस दाखवली आहे. अत्यंत calculating असणारा निकी आणि आतातायी जेम्स हंट ह्यांची पात्रे छान रंगवली आहेत. सिनेमा खूप आवडला. एकमेकांविरुद्ध स्पर्धा करताना स्वतःचे प्राण अधिकाधिक धोक्यात घालणाऱ्या हया रेसर्सच्या खऱ्या कथेत ड्रामा ओतप्रोत भरला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2024 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली

कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ पूर्ण केलाय.
अमरेंद्र बाहुबली, हे बघितले नसतील तर नक्की बघा -
1. The departed- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजीत मूवी एक्सप्लेशन पाहिलं आवडलं. मला लिओनार्डो दी कार्पिओ आणी मॅट डेमन ह्याच्यातला फरकच कळत नव्हता त्यामुळे सिनेमा समजत नव्हता.
2. Gone girl- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजी एक्सप्लेशन शोधतोय युट्यूबवर. आज संपवेन.
3. Memento- हा आपला गजनी असल्याचे पहिल्या काही मिनिटातच समजल्याने बंद केला.
4. 12 angry men- हा डालो करून ठेवलाय.
5. Doctor Strangelove (or how I learned to stop worrying and love the bomb)- हिंदीत मिळाला नाही यूट्यूब एक्सपेलनेशन पाहिलं हिंदीत. छान होता.
6. Prisoner- हया नावाचे बरेच सिनेमे होते. २०१३ चा पाहिला लहान मुलीच्या किडनापिंग चा. आवडला.
7. Nightcrawler- डालो केलाय
8. Django unchained- डालो केलाय.
9. The Thing- मस्त सायफाय. आवडला.
10. Rosemary's baby- मस्त मस्त आणी मस्तच. भारी भयपट.
हया व्यतिरिक्त द सायलेंस of द लांब्स पाहिला. आवडला.

कॉमी's picture

18 Aug 2024 - 11:30 pm | कॉमी

तुम्हाला सिनेमे आवडले हे ऐकून आनंद झाला.

गझनी मेमेंटो वरून बेतला असला तरी memento ची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. वरवरची संकल्पना सोडल्यास दोन्ही सिनेमे पूर्ण वेगळेच आहेत.

आणखी काही recommendation -
The big short
Eyes wide shut
Spotlight
The princess bride
The Witch

Bhakti's picture

18 Aug 2024 - 11:03 pm | Bhakti

Fantastic Beasts हा हॅरी पॉटर मालिकेचा प्रीक्वल आहे.
१.Fantastic Beasts and Where to Find Them
२.Fantastic Beasts: The Crimes of Grindelwald
हे दोन भाग पाहिले.तिसरा भाग उद्या पाहते.
३.Fantastic Beasts: The Secrets of Dumbledore
आणि मग हॅरी पॉटरचे पारायण करावे लागेल का ,😀
या संस्थळावर सगळी टाईमलाईन सांगितली आहे.
https://edrawmind.wondershare.com/movie-tips/fantastic-beasts-timeline.h....

हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी आहेत, तितके हे जमले नाहीत असे वाटले. तरी ह्यातला पहिला सिनेमा छान आहे. पण पुढे मात्र ग्रीन्डलवाल्ड आणि डम्बलडोर ह्यांच्या युद्धाची गोष्ट हया फ्रंचाईज मध्ये उगाच घुसवली असे वाटते. हॅरी पॉटर पुस्तकांत त्यांच्या युद्धाबद्दल काही संदर्भ आहेत त्यानुसार हि लढत अगदी ग्रँड असते. त्यावर सिनेमा काढायचा असता तर सरळ डम्बलडोरना मुख्य पात्र बनवून काढायला हवा होता. तर त्याऐवजी न्यूट हया फँटॅस्टिक बिस्ट मधल्या हिरोवर फोकस ठेऊन डम्बलडोर- ग्रीन्डलवाल्ड युद्धाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न फसला आहे असे वाटले. तिसरा सिनेमा तर अगदीच कसातरी होता.

हो हॅरी पॉटर अधिक सरस आहे,पण मला हेही सिनेमे आवडले!

बार्बी' पण पाहिला.खरच कमाल झाला आहे सिनेमा.मलाही असंच वाटायचं बार्बी ही स्त्रियांनी कसं सुंदर,रेखीव असावं याचं सिम्बॉल आहे.कधीतरी रागच यायचा.पण जर मुलींच्या आयुष्यातून बार्बी वगळून टाकली,आता स्त्री जशी आहे तशी सोशिक,पेट्रीआर्चीत अडकलेली अशीच दाखवली तर खूप काही गमावलेलं असेल.बार्बीचं स्थान स्त्रीयांसाठी अढळ आहे,एक स्वतंत्र व्यक्तीमत्व? 😇

कॉमी's picture

2 Sep 2024 - 9:07 am | कॉमी

छान सिनेमा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2024 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंदाहार विमान अपहरण प्रकरणावर असलेली IC814 ही सहाभागांची मालिका नेटफ्लिक्सवर आहे. अपहरण झालेले प्रवासी, विमानातील पायलट, राजकारण, रॉ च्या घडामोडी आणि प्रवाशांचा जीवघेणा कोंडमारा. नातेवाईकांचा संताप, सरकारने, प्रवाशांच्या सुखरुपतेसाठी पत्करलेली शरणागती.

मालिकेची ष्टोरी माहिती असल्यामुळे कधी एकदा शेवटाकडे जाऊ असे मालिका पाहतांना मधे मधे व्हायला लागते. :/ सर्वच घडामोडी मालिकेत दिसत नसल्या तरी, विमानातल्या महिला ष्टाफ. पायलट आणि शेवटी विमानातून उतरतांना उडालेला पायलटचा भावनेचा कल्लोळ कंठ दाटून आणतो.

पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, मनोज पाहवा, यशपाल शर्मा, कुमुद मिश्रा, अरविंद स्वामी, दिव्येंदू भट्टाचार्य मजबूत अभिनय. विजय वर्माने साकारलेला विमानाचा पायलत तर अहाहा..! क्या कहने.

IC814 ही एकदा बघायला हरकत नाही.

-दिलीप बिरुटे

नन आणि मुंजा हे दोन्ही सोकॉल्ड भूतांचे पिक्चर पाहिले.अजिबात भीती वाटली नाही;)
मुंजा पाहताना तर खूप हसू येते .
तसाच कोरियन डब्बड 'मून' चित्रपट पाहिला.यांची प्रेरणा बॉलीवूडच असावा,१०१ योगायोगात वेळेत हिरो चक्क वाचतो आणि जिवंत पृथ्वीवर येतो ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Sep 2024 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

हाणामाऱ्या समूह ऊर्फ फाईट क्लब पाहिला. क्लास आहे. मस्तच.

१) मायकेल डग्लस आणि शॉन पेन यांच्या मुख्य भूमिका असलेला "द गेम " कुठे मिळण्यास नक्की पाहावा, म्हणाल तर भयपट म्हणलं तर वास्तव
२) " नाईन क्वीन्स " हा यूरोपीय चित्रपट भाषा आठवत नाही " हैस्ट" ( झोल. गंडवणे इत्यादी) या पद्धतीत पण ऍक्शन वली हैस्ट नाही ( जशी द इइटालियन जॉब मध्ये होती तशी )

३) "बीइंग जॉन मॉलकोविच" , एडवर्ड नॉर्टन ची मुख्य भूमिका, "विचित्र पट "