काय सांगू नवलाई

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जे न देखे रवी...
30 Dec 2007 - 11:20 am

या कविता मी संकलित केलेल्या असून मूळ कविची माहिती कवितेच्या खाली देण्यात आली आहे.

काय सांगू नवलाई
बाई,जाहले उन्मन
उतरता पाण्यामध्ये
लाज गेलीच वाहून.

आता पदराशी माझ्या
वारा करी हितगुज
वेळी अवेळी वाजते
मनामधे अलगुज.

घर राहिले पाठीशी
तुटे संसार पुरता
काठावर यावे सांग
सखे,कुणा ग करिता!

कविता संग्रहः शब्द मनातले
कवि: अतुल व्यं.देशमुख
प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान
© सौ.स्मिता देशमुख

कविता

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

1 Jan 2008 - 3:08 pm | देवदत्त

छान आहे कविता.

(तुम्ही सांगितल्यानंतर सर्व कडव्यांची जुळणी कळली. काय करणार? अस्मादिक अजुनही कविता प्रकाराच्या क वरच आहेत. :) )