कोणती गाडी घ्यावी आहे. सल्ला हवा आहे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Feb 2022 - 12:36 pm
गाभा: 

या मार्च मधे जुनी चार चाकी बदलून नवी घ्यायच्या विचार करतोय.
बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास.
प्रवास फारसा नाही. मात्र महिन्यातून एकदा गावी जाताना ५५० किमी चा प्रवास होतो. ( सलग ३०० किमी)
मुम्बईत महिन्याभरात साधारण तेवढाच प्रवास होतो.
काही ऑप्शन समोर आहेत.
टाटा नेक्सॉन ( पेट्रोल)
ह्युंदाई क्रेटा
महिंद्रा एक्स्युव्ही ३००
रेनॉल्ट कायगर
किया सॉनेट

सध्याची वापरतोय त्या ह्युंदाई अ‍ॅसेंट ने बारा वर्ष खूपच उत्तम सेवा दिली. खरेतर ही गाडी अजूनही उत्तम आणि स्मूथ चालते रिपेअरिंग चा अगदी किरकोळ आहे.
( काढावी असे वाटत नाही पण फक्त फक्त १२ वर्षे झाली या कारणास्तव काढतोय).
वाहनाचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे इच्च्छा असूनही टाटा सफारी वा तत्सम एस यु व्ही घेणे टाळतोय.
ईव्ही च्या बाबतीत अजूनही बॅटरी ची रेंज एका चार्जिंगवर २०० किमी च्या वर मिळत नाहीये.( हीच अडचण आहे)
किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Feb 2022 - 12:46 pm | विजुभाऊ

कोणती गाडी घ्यावी हा सल्ला हवा आहे

क्रेटा पहिली पसंती असू शकते, नाहीतर नेक्सऑन.
क्रेटा एन्ट्री लेव्हल १०.५० लाख होते, हल्ली सहा एअर बॅग्ज आणि भारत ६ सक्तीचे आहेत, त्यामुळे वरचे मॉडेल १७.५० पर्यंत जाते.
व्यवसाय हिशेबात घसारा मिळणे, करात सवलत वगैरे पाहिजे तर चांगलाच उपयोग होईल. नाहीतर आम्ही नोकरदार ग्रॅण्ड आय टेन आनंदाने वापरत आहोत. :)

नव्या वाहनासाठी शुभेच्छा!

आय टेन, आय२० चाम्गल्याच आहेत. पण त्यांच्यी उंची फार कमी आहे. गाडीत बसताना उतरताना ज्येष्ठ नागरीकांना गुढगे वाकवावे लागतात

कपिलमुनी's picture

8 Feb 2022 - 3:46 pm | कपिलमुनी

टाटा नेक्सॉन ( पेट्रोल)
ह्युंदाई क्रेटा
महिंद्रा एक्स्युव्ही ३००
रेनॉल्ट कायगर
किया सॉनेट

क्रेटा साठी बजेट कमी आहे.

एक्स्युव्ही ३०० ही उत्तम आहे पण तिची बूट स्पेस अत्यंत कमी आहे. क्लास मध्ये सर्वात कमी..

कायगर किंवा मग्नाईट या गाड्या टर्बो इंजिन च्या उत्तम आहेत.

खर तर व्हॅल्यू फॉर मनी आहेत पण त्यांचा मर्यादीत सर्व्हिस नेटवर्क आणि कमी रिसेल व्हॅल्यू यामुळे त्यांचा सेल कमी आहे. सर्व्हीस नेटवर्क मुख्यतः शहरात आहे.

सोनेट आणि नेक्सोन या गाड्यांची जोरात स्पर्धा आहे.

सोनेट ची उंची चांगली आहे. डॅश बोर्ड उत्तम आहे. गाडीत फीचर्स उत्तम आहेत. मागच्या सीट ची रुंदी अतिशय कमी आहे. 3 माणसे सहज बसू शकत नाहीत.

नेक्सोन मध्ये उंची कमी आहे. पण मागच्या सीट चा कम्फर्ट मस्त आहे.
शिवाय बूट स्पेस उत्तम आहे. सर्व्हिस नेटवर्क चांगले आहे.

वरील ऑप्शन आणि बजेट नुसार नेक्सोन बेस्ट ऑप्शन आहे.

या बजेट मध्ये एन्ट्री लेव्हल एस क्रॉस येते . नवीन मॉडेल लाँच होईल. ते बघा. मस्त लांब रुंद आणि उत्तम इंजिन असलेली 4 स्टार गाडी आहे.

सौंदाळा's picture

8 Feb 2022 - 4:19 pm | सौंदाळा

वरील ऑप्शन आणि बजेट नुसार नेक्सोन बेस्ट ऑप्शन आहे.
हेच म्हणतो.नेक्सॉन घेऊन टाका विजुभौ. ड्युअल कलर आणि सनरूफ सकट

पेट्रोल- 13.5 जाईल

सुखी's picture

8 Feb 2022 - 4:05 pm | सुखी

Highway वरचा प्रवास असल्यामुळे security features ना महत्त्व देणं गरजेचं आहे. Nexon ही खरोखर चांगली गाडी आहे, आराम अन् safety च्या दृष्टीने.

बाकी मारुती ची ब्रेझा safety साठी चांगली आहे, इतर गाड्यांबद्दल न बोललेलेच इष्ट.

VW skoda नी <२०लाख category मध्ये पाणी वाढवून आमटी पातळ केलीय.

ह्युंदाई, किया यांनी safety च्या दृष्टीने काही चांगली कामगिरी केली नाहीये, तसच सध्या #boycothyundai ही प्रचलित आहे.

महिंद्रा XUV३०० पण एकदा बघुन घ्या.

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 5:16 pm | चौथा कोनाडा

माझ्या समोरच्या युवकाने त्यांच्या कुटूंबियांच्या उंचीच्या दृष्टीकोनातून वरील काही गाड्या पहिल्या.
.... आणि त्यांना उंचीसाठी एक्सुव्ही३००च उत्तम वाटली.
मग त्यांनी मागच्या आठवड्यात एक्सुव्ही३०० घेतली.

कपिलमुनी's picture

8 Feb 2022 - 5:27 pm | कपिलमुनी

बूट स्पेस कमी चालत असेल तर एक्सुव्ही३०० सर्वोत्तम आहे.
पण गावी जाता येता लॉंग ट्रिप साठी बूट कमी पडते असा अनुभव आहे

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 5:59 pm | चौथा कोनाडा

तुलनात्मक .....

कर्नलतपस्वी's picture

8 Feb 2022 - 5:28 pm | कर्नलतपस्वी

उत्तम शेती
मध्यम व्यापार
कनिष्ठ नोकरी तले आम्ही,

उत्तम एटलस सायकल
मध्यम बजाज
कनिष्ठ मारूती वाले
तुम्ही कुटलीबी घ्या पन तेवढं पेढ्याच पुडक जरूर पाठवा.
आगुदरच अभिनंदन करेक्शन टेवतो पघा.

साहेब रिक्षा राहीली....

कर्नलतपस्वी's picture

8 Feb 2022 - 9:13 pm | कर्नलतपस्वी

नोकरी पक्की म्हनुन नाय इचार केला.

विजुभाऊ's picture

8 Feb 2022 - 5:43 pm | विजुभाऊ

हा हा हा ... नक्की कर्नलकाका

१) सुरक्षित .
सुरक्षा देणारी सर्व साधन हवीत.
२) सामान ठेवायला जागा.
३) परवडेल इतके milage.
४) आरामदायी योग्य आकाराच्या सीट्स.
५) कन्फर्ट वाटेल इतकी उंची.
हे असेलच पाहिजे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

8 Feb 2022 - 6:58 pm | रावसाहेब चिंगभूतकर

वाहनाचा वापर मर्यादित असेल तर आहे तीच गाडी कॉन्टिन्यू करायला काय प्रॉब्लेम आहे? तसंही सध्या बऱ्याच गाड्यांचे वेटिंग 1 वर्षाचे आहे. तोपर्यंत पुन्हा नवीन मॉडेल्स लॉंच होतील. आणि दोन एक वर्षाने पहा.

रावसाहेब वर्षभराने या गाडीला सध्या रीसेल किंमत( ती अगदीच कमी आहे म्हणा) ती देखील मिळेल का ते सांगता येत नाही.
गाडी विकावी असे वाटत नाहीयेच. पण २००९ चे मॉडेल आहे . वर्षभरात ग्रीन टॅक्स साठी येईल

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 11:18 pm | चौथा कोनाडा

मग भरायचा की ग्रीन टॅक्स साठी, फायदाच होईल !
जुन्या गाडीचा पुर्ण उपयोग / उपभोग म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचेच !
एक नवी गाडी जन्माला घालण्यापासून त्याचे मटेरियल, निर्माण करण्याची उर्जा, गाडी बांधणीसाठीची उर्जा इत्यादित बचतच बचत !
रिसेल करायचीच कशाला ?
नाही तरी गाडी चांगलीच आहे असे म्हणताय !

सुबोध खरे's picture

8 Feb 2022 - 8:29 pm | सुबोध खरे

पुढच्या एक ते दोन वर्षात बॅटरीच्या किमती कमी होतील आणि चार्जिंग स्टेशन्स पण उपलब्ध होतील.

तुमची २००९ ची गाडी आहे म्हणजे २०२४ पर्यंत त्याचे परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तोवर एकंदर इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पण कमी होईल आणि एकंदर चित्र जास्त स्पष्ट होईल.

आज मितीला सध्या बऱ्याच गाड्यांचे वेटिंग 1 वर्षाचे आहे. यामुळे पूर्वी जसे डीलर घसघशीत डिस्काउंट देत असत तसे सध्या अजिबात मिळणार नाहीत त्यामुळे तुमच्या गाडीची कमी होणारी रिसेल किंमत हा मुद्दा अगदीच गौण आहे.

त्यातून वर्षभराने रिसेलची जितकी किंमत होईल तितकीच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पण कमी होईल तेंव्हा रिसेलची चिंता सोडून द्या.

मुळात तुमची गाडी जर उत्तम चालत असेल तर ती विकून फारसा फायदा होणार नाही. या शिवाय नव्या गाडीचा विमा पण जास्त लागेल.

तेंव्हा मारवाडी हिशेब केल्यास एक दीड वर्ष थांबणे जास्त सोयीस्कर राहील

हे मा वै म.

शाम भागवत's picture

10 Feb 2022 - 7:09 pm | शाम भागवत

जर गाडी सुस्थीत असेल तर कदाचित ती इलेक्ट्रीकमधे बदलण्याची सोयही पुढेमागे येऊ शकते. पूर्वी जुनी ॲम्बेसॅडर (जाड पत्र्याची) विकत घेऊन त्याला डिझेल इजिन बसवून लोकांनी वापरली होती.

सुबोध खरे's picture

10 Feb 2022 - 8:15 pm | सुबोध खरे

गाडी सुस्थीत असेल तर कदाचित ती इलेक्ट्रीकमधे बदलण्याची सोयही

हे कठीण आहे

कारण इलेक्ट्रिक वाहनात गिअर बॉक्स किंवा एक्झॉस्ट पाईप, रेडिएटर सारखे भाग नसतातच.

केवळ बाहेरची बॉडी तीच ठेवण्यात तसा काहीच हशील नाही कारण जुनी झाल्यामुळे बॉडी सडल्याची / गंजल्याची शक्यता जास्त आहे.

काळानुसार सुरक्षा मानके बदलतात. त्यामुळे मुळ गाडीचा ढाचा नवीन मानकांनुसार नसु शकतो.

विजुभाऊ's picture

8 Feb 2022 - 10:14 pm | विजुभाऊ

तु वै म विचारणीय आहे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

8 Feb 2022 - 11:55 pm | रावसाहेब चिंगभूतकर

आणखी एक महत्वाचा पॉईंट. बॅटरी च्या क्षेत्रात धुमशान संशोधन चालू आहे. अंबानींची कंपनी सोडियम बॅटरी वर संशोधन करत आहे. या बॅटरीज निम्म्याने तरी स्वस्त असाव्यात.
https://cen.acs.org/materials/energy-storage/Reliance-buys-sodium-ion-ba...
चिप्स चा तुटवडा आहे. तो प्रॉब्लेम solve व्हायला एक दोन वर्षे जातील.
चार्जिंग पॉईंट्स तयार होतील. बॅटरी ची कॅपॅसिटी वाढेल. 450-500 किलोमीटर ची कॅपॅसिटी हा टर्निंग पॉईंट असेल जेव्हा बहुतांश लोक इलेक्ट्रिक वेहीकल्स बद्दल सिरियसली विचार करायला लागतील. त्या वेळी तुमच्या नवीन गाडीची रिसेल व्हॅल्यू अचानक कमी होईल. माझ्या मते सध्या कुंपणावर बसून वाट पहा. कारण तुमची नवीन गाडी 25 वर्षे तरी चालणार.

श्रीगणेशा's picture

9 Feb 2022 - 2:40 am | श्रीगणेशा

सध्याची गाडी व्यवस्थित चालू असेल तर जितकं थांबता येईल तितकं चांगलं -- आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही.
शिवाय काही वर्षांनी नक्कीच चांगले पर्याय उपलब्ध होतील इलेक्ट्रिक कारसाठी. सध्यातरी इलेक्ट्रिक कारच्या किंमती दहा लाखांच्या पुढेच दिसत आहेत. मागणी आणि स्पर्धा वाढली की किंमतीही बऱ्याच कमी होतील.

कांदा लिंबू's picture

9 Feb 2022 - 4:36 pm | कांदा लिंबू

विजुभाऊ,

माझं मत - Nexon XZ petrol manual घ्या.

बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास.

तुमच्या बजेटमध्ये येईल.

प्रवास फारसा नाही....

११०० किमी प्रतिमाह म्हणजे पेट्रोलचा खर्च वर्षाला एक लाख ते सव्वा लाख येईल.

सलग ३०० किमी...

मी अनेकदा ४००-५०० किमी (१० मिनिटे + अर्धा तास + १० मिनिटे असे ब्रेक घेऊन) सलग चालवली आहे. थकवा वाटत नाही.

किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा.

या सर्व मुद्द्यांवर निक्सन सर्वोत्तम आहे असे माझे मत आहे.

निक्सनची एकच कमी बाजू म्हणजे (उदा. ब्रीझाच्या तुलनेत) मिळणारे कमी मायलेज; पण त्यामुळे फारतर वर्षाला पाच-सात हजारांचा फरक पडेल.

---

बाकी या निमित्ताने झैरात करून घेतो -

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

सिद्धार्थ ४'s picture

12 Feb 2022 - 11:11 am | सिद्धार्थ ४

टाटा पंच बद्दल कोणी सांगू शकेल का? मी माझी पहिली गाडी घेण्याच्या विचारात आहे. टाटा पंच ची गाडी ७ लाखापर्यंत छान वाटत आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 12:05 pm | रावसाहेब चिंगभूतकर

पाहिलेले review गाडी या सेगमेंट मध्ये चांगली आहे असेच सांगत आहेत.

https://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/242888-tata-punc...

https://www.team-bhp.com/news/tata-punch-my-thoughts-and-first-driving-i...

गगन चौधरी यांचा review डिटेल्ड असतो
https://youtu.be/DI8eA9QjWhk

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण +

सिद्धार्थ ४'s picture

15 Feb 2022 - 9:29 am | सिद्धार्थ ४

काल टाटा पंच बुक केली आहे. AMT मॉडेल. दोन महिने वेटिंग आहे.

विजुभाऊ's picture

12 Feb 2022 - 5:22 pm | विजुभाऊ

पंच उत्तमच आहे.
अधीक मोठी बूट स्पेस आणि मागील सीटवर तीन माणसे आरामात बसायला हवीत ही घरातून अट नसती तर मी पंच ला प्राधान्य दिले असते

मुक्त विहारि's picture

12 Feb 2022 - 11:50 am | मुक्त विहारि

माझ्या अंदाजाने, टाटा किंवा महेन्द्र, यांच्या गाड्या, तुमच्या सोई प्रमाणे येतील...

विद्युतवाहने आणि अंतर्गत ज्वलन संयत्र वाहने यांची तुलना
https://www.adlittle.de/sites/default/files/viewpoints/ADL_BEVs_vs_ICEVs...

सुबोध खरे's picture

14 Feb 2022 - 7:20 pm | सुबोध खरे

उत्तम विश्लेषण आहे.

परंतु हा अभ्यास २०१५ चा आहे ( आता तो ७ वर्षे जुना झालेला आहे)

तेंव्हा बॅटरीची किंमत ३०० डॉलर्स होती. २०२० मध्ये हीच किंमत १३७ डॉलर्स झालेली आहे आणि ती २०२३ पर्यंत १०० डॉलर्स होईल.

EV and ICE vehicle price gap to close soon as battery cost is to be about USD100/kWh by 2023:

Read more at:
https://auto.economictimes.indiatimes.com/news/auto-components/evs-to-cl...

सोलर अणुशक्ती आणि वाऱ्यावरील वीज निर्मिती जितकी जास्त प्रमाणात होईल तितका कोळसा आणि तेल जळून केलेली वीज निर्मिती कमी होईल आणि तितका पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल.

येणाऱ्या काळात विजेवरील वाहने अधिकच लोकप्रिय होतील यात शंका नाही.

जसजशी विजेवरील वाहने स्वस्त आणि लोकप्रिय होतील तसतशी जुन्या गाड्यांचा बाजार देखील वाढेल. पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ? आणि त्यायोगे पेट्रोल / डिझेल वरील वाहने वापरणे स्वत होईल काय ?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Mar 2022 - 2:59 pm | अमरेंद्र बाहुबली

जसजशी विजेवरील वाहने स्वस्त आणि लोकप्रिय होतील तसतशी जुन्या गाड्यांचा बाजार देखील वाढेल. पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ? आणि त्यायोगे पेट्रोल / डिझेल वरील वाहने वापरणे स्वत होईल काय ?
ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार नाहीयेत. व्हायचे तर ते आतापर्यंत जश्या सीएनजी गाड्या रस्त्यांवर फिरताहेत तश्या फिरताना दिसल्या असत्या.

तसेच पेट्रोल डिझेल आताही महाग नाहीये. केंद्र सरकारचा प्रचंड कर लिटर मागे ३३ रूपये) त्यानंतर राज्य सरकारचाही जवळपास तेवढाच ह्यामुळे पेट्रोल जिझेलचे भाव प्रचंड आहेत. नाहीतर पेट्रोल/डिझेल वराल वाहणे वारणं आजही खुप स्वस्तच आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2022 - 5:26 pm | चौथा कोनाडा

+१
बरोबर.
मला आठवतंय २००४-२००५ पासून ऑटो ईंडस्ट्री तज्ञ बोंबा मारत होते येत्या ७-८ वर्षात पेट्रोल-डिझेल पुर्ण बंद पडेल पण आता १५+ वर्षए झाली पण प्रमाण फार काही वाढलेलं नाहीय. वीजवाहन घ्यायचे असल्यास पुर्ण विचार करुन घ्यावे अथवा पुढे ढकलावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Mar 2022 - 3:03 am | अमरेंद्र बाहुबली

कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर दिड दोन वर्षात बदलावी लागनारी बॅटरी, तीचा प्रचंड खर्च.

विद्याधर३१'s picture

5 Mar 2022 - 9:10 am | विद्याधर३१

ई व्ही सध्या त्यान्च्या पिकप साठी ओळ्ख्ल्या जातात.
शिवाय ब॓ट् री वोरन्टी ८ वर्श आहे.

सुबोध खरे's picture

5 Mar 2022 - 9:44 am | सुबोध खरे

दर दिड दोन वर्षात बदलावी लागनारी बॅटरी,

उगाच काहींच्या काही

Tata Motors is providing an 8 yrs/1.6L km warranty.

कमी पीकप

The Tata Nexon EV gets a 129 PS motor.

0 to 60 kmph in four seconds, 0-100 kmph under 9 secs

सुबोध खरे's picture

5 Mar 2022 - 9:48 am | सुबोध खरे

Mercedes-Benz E-Class 200 CGI (Petrol) can achieve a speed of 100 km/h in 7.9 sec from standstill

ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार नाहीयेत.

अभ्यास वाढवा

आपण काळाच्या फार मागे आहात

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Mar 2022 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली

सर कंपन्या काहीही दावे करत असल्या तरी ग्राऊंड रिएलीटी पहा. प्रत्यक्ष वापरनार्यांना अनूभव विचारा. ईतक्या चांगल्या असत्या ई. वी तर सीएनजी गाड्यांसारखा ह्यांचा सुळसुळाट झाला असता.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2022 - 6:10 pm | चौथा कोनाडा
सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 10:50 am | सुबोध खरे

पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ?
नक्कीच. कारण त्यांचे अर्थशास्त्र तेलावरच अवलंबून आहे.

पण जशी तेलाची किंमत कमी होईल तशी तेल जाळून निर्माण केलेली वीज पण स्वस्त होईल.

मुळात पेट्रॉल डिझेलवर चालणाऱ्या वाहनात फिरणारे भाग किती तरी जास्त आहेत. ज्यामुळे घर्षणात ऊर्जा फुकट जाते आणि वाहनांची झिजपण जास्त होते.

याशिवाय तेल जाळण्यात ५० % ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात फुकट जाते आणि शिवाय इंजिन थंड ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च होते यामुळेच पेट्रॉल डिझेलवर चालणारी वाहने त्या मानाने किफायतशीर पडणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2022 - 4:40 pm | श्रीगुरुजी

Hyundai I10 Nios व Maruti Celerio यातील कोणती कार चांगली?

सुबोध खरे's picture

4 Mar 2022 - 7:14 pm | सुबोध खरे

Hyundai I10 Nios चे इंजिन १२०० सीसी चे चार सिलिंडर चे आहे त्यामुळे त्याची शक्ती (८२ बी एच पी) नक्कीच जास्त असून जास्त समतोल असल्याने त्याचा पिक अप आणि वजन वाहून नेण्याची क्षमता नक्कीच जास्त आहे. विशेषतः ४ किंवा ५ माणसे असतील तर घाट चढताना जास्त सहजपणे जाईल.

या उलट सेलेरिओ चे इंजिन ३ सिलिंडर चे असल्याने थोडा असमतोल आहे त्यामुळे इंजिनवर ताण जास्त येतो याशिवाय हे १००० सीसी असल्याने त्याची शक्ती ६६ बी एच पी इतकी कमी आहे. साधारण शहरात चालवताना याचा ताण जाणवणार नाही.

परंतु जास्त माणसे नेताना किंवा घाट चढताना किंवा ओव्हरटेक करताना गाडीला थोडा जास्त वेळ लागतो याशिवाय गाडीच्या वातानुकूलनावर परिणाम होतो (विशेषतः चार किंवा पाच माणसे असतील आणि उन्हाळा असेल तेंव्हा).

मुळात सेलेरियोचे वजन १०० किलोने कमी असल्याने आणि इंजिनची क्षमता कमी असल्याने आपल्याला ऍव्हरेज जास्त देईल. याशिवाय मारुतीचे सुटे भाग आणि त्याची सर्व्हिस स्वस्त आहे.

तेंव्हा माझ्या मते आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर माझ्या मते Hyundai I10 Nios च घ्या. कारण मोटार गाडी किमान ४-५ वर्षे तरी कुणी बदलत नाही (आणि बहुतांशी ७-८ वर्षे) तेंव्हा थोड्या पैशासाठी एक तडजोड (compromise) नसावी.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2022 - 8:38 am | श्रीगुरुजी

धन्यवाद डॉक्टरसाहेब!

कपिलमुनी's picture

5 Mar 2022 - 1:38 pm | कपिलमुनी

Hyundai I10 Nios ही celerio पेक्षा सर्व बाबतीत सरस आहे. तरीही मोदींचे व्होकल फॉर लोकल आणि टाटा ने केलेल्या कोविड काळातील देशाला मदती बद्दल कृतज्ञता ठेवून टाटाची टियागो घ्या असे सुचवेन

डिसेंबर २०२० मध्ये NIOS CORPORATE EDITION घेतली ७.३५ लाखात,
Touch Screen,Electric Mirror,१५" Wheel,
Rear AC(जो महाग गाड्यात पण नसतो कधी कधी)
इ features भेटले. गाडीबरोबर अत्यंत आनंदी आहे(८०००km), service अत्यंत चांगली,
पिक अप छान आहे, ५ जन महाबळेश्वर ला जाऊन आलो.
घाटात कोणताही प्रॉब्लेम नाही.
पेट्रोल average १८-२०.
एकंदरीत छान गाडी. जरूर विचार करावा.

विजेवर चालणारी वाहने, सौर आणि पवनऊर्जा तसेच इथेनॉलचा वापर हे पर्याय प्रदूषणकारी नाहीत, हा एक भ्रामक समज आहे.
या वर लोकसत्ता मधील गिरिश कुबेर यांनी लिहिलेला वाचण्याजोगा माहितीपुर्ण लेख, सोप्या शब्दात आणि उदाहरणासहित :

पर्यावरणाचा विवेक!">पर्यावरणाचा विवेक!

कंजूस's picture

15 Sep 2023 - 8:33 pm | कंजूस

परवाच गडकरी साहेबांनी सूतोवाच्य केलंय . त्यातून असा अर्थ काढलाय की डिझेलवर चालणाऱ्या कार एंजिनांवर दहा टक्के अधिक कर घेणार.
बाकी प्रदूषण म्हणजे काय? हवा,पाणी, तसेच पृथ्वी आणि आकाशात काय सोडता ते. अन् काय काढून घेता तेसुद्धा.

सगळी वाहने पाहून मी रेनॉल्ट कायगर पेट्रोल घेतली.
रेनॉल्ट ची सर्व्हीस ही साशंकता आहे. पण मी जेथे जेथे जातो तेथे ती उपलब्ध आहे. कोल्हापूर गोवा सांगली सातारा पुणे मुंबै.
जुन्या गाडीची किम्मतही बरी आली.
गाडीचे रीव्ह्यू चांगले आहेत

वामन देशमुख's picture

15 Sep 2023 - 7:33 pm | वामन देशमुख

एक चांगला रिव्यू लिहा.

वामन देशमुख's picture

15 Sep 2023 - 8:00 pm | वामन देशमुख

एक चांगला रिव्यू लिहावा अशी विनंती.

विजुभाऊ's picture

16 Sep 2023 - 11:46 am | विजुभाऊ

नक्की.
जुनी गाडी देऊन टाकताना वाईट वाटले. खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्या सोबत

गवि's picture

16 Sep 2023 - 12:12 pm | गवि

+१

असे प्रत्येक वेळी गाडी बदलताना होते. विशेषतः कार. आपण त्या मशीनला आपल्या कुटुंबाचा घटक मानू लागतो नकळत.
अनेक प्रवास, सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी त्यातून आनंदाने किंवा तणावात केलेले.

म्हणजे हे एक मशीनच आहे हे मनाला कळत असून देखील आपण मानवी भावना त्यावर आरोपित करतो. घराबाबत देखील असे होते. अगदी नोकरी बदलताना देखील. शेवटी आयकार्ड परत करणे किंवा तत्सम प्रसंगी एकदम जाणवते.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 6:40 pm | अमरेंद्र बाहुबली

मला नोकरी सोडताना कोण आनंदं झाला होता. कधी एकदा एचार ला सर्व वय्तू मारून निघतो नी पळतो. नोटीस पिरेड ही नपुर्ण करता पळून आलथो.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2023 - 8:34 pm | चांदणे संदीप

डिट्टो अनुभव. वडीलांच्या आणि माझ्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं गाडी सोडताना. :(

सं - दी - प

विवेकपटाईत's picture

16 Sep 2023 - 12:29 pm | विवेकपटाईत

माझ्या मुलाकडे टाटा नेक्सन आहे. दिल्ली ते इंदोर , दिल्ली ते अशोक नगर प्रवास अनेक वेळा दहा ते पंधरा तासात केला आहे. गाडी उत्तम आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 6:42 pm | अमरेंद्र बाहुबली

कुठलीही घ्या पण मारूती नका घेऊ. सेफ्टी रेटींग खुप कमीय. जरा कूठे ठोकली की तुमचे आठ दहा तुकडे झालेच.

विजुभाऊ's picture

19 Sep 2023 - 6:32 pm | विजुभाऊ

मी रेनॉ ची कायगर "आर एक्स टी- एम टी " घेतली
त्या सेगमेंट मधे या किमती मधे खूपच मस्त आहे