K-drama सुचवा

Primary tabs

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in काथ्याकूट
11 Oct 2021 - 8:18 am
गाभा: 

(प्रेरणा - अमरेंद्र बाहुबलीचा धागा )

सध्या प्रचंड हाणामारीची squid games ही TV मालिका खूप लोकप्रिय आहे. यात विशेष म्हणजे एक भारतीय कलाकार आहे जो कोरिया मध्ये acting स्कूल मध्ये आहे. कोरियन मालिका मध्ये खाण्याच्या प्रचंड विविधता दाखवतात आणि वेगवेगळे विषय छान हाताळतात.

hometown cha cha cha ही एका समुद्र किनाऱ्यावरील गावातील प्रेम कहाणी आहे.

तुम्ही पाहिलेलं अजून Kdrama सुचवा.

प्रतिक्रिया

राघव's picture

11 Oct 2021 - 10:11 am | राघव

डॉ. रोमँटिक १ & २
विन्सेन्झो

दोन्ही चांगले आणि वेगळ्या विषयांवर आहेत.

राघवेंद्र's picture

11 Oct 2021 - 9:59 pm | राघवेंद्र

धन्यवाद पाहतो

कॉमी's picture

11 Oct 2021 - 10:15 am | कॉमी

फार लहान होतो तेव्हा dd वर घर का चिराग म्हणून एका कोरियन सिरीजचा अनुवाद लागायचा. (इंग्रजी नाव- लाईट ऑफ द पॅलेस का तसेच काहीतरी.)

तेव्हा फार आवडायचे, आता काही आठवत नाही.

हॉटेल दे लूना म्हणून एक मस्त ड्रामा बघितला मी मध्यन्तरी..

खूपच आवडला मला.. म्हणजे त्याची कन्सेप्ट आवडली... पूर्ण बघयला सगळ्यांनाच आवडेल असे नाही.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Oct 2021 - 8:45 pm | रावसाहेब चिंगभूतकर

यात विशेष म्हणजे एक भारतीय कलाकार आहे जो कोरिया मध्ये acting स्कूल मध्ये आहे.

मूर्खपणाचा भाग म्हणजे त्याचे character अली हे पाकिस्तानी character आहे.

ठीक आहे एक पात्र म्हणून पाहायचे

कोरिया मध्ये परदेशी पण कोरियन बोलणारे फार कमी कलाकार आहेत. डायरेक्टर ला खूप प्रयत्न करून अली साठी हा कलाकार मिळाला

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Oct 2021 - 9:51 pm | रावसाहेब चिंगभूतकर

Along with the gods: The Two Worlds
Along with the gods: The last 49 days

Worlds

अग्निशामक Kim Ja-hong (Cha Tae-hyun) आपली ड्युटी करत असताना मरण पावतो आणि त्याला 3 दूतांकडून मृत्यूपश्चात जगात नेलं जातं. त्यांच्यावर त्याला साथ करण्याची आणि त्याच्यावर चालणाऱ्या 7 खटल्यात त्याची वकिली करण्याची जबाबदारी असते. हे खटले 49 दिवस चालतात. जर तो पास झाला तर त्याचा पुनर्जन्म होईल आणि दूतांना त्यांच्या स्वतःच्या पुनर्जन्मासाठी या गोष्टी साठी क्रेडिट मिळेल. जर तो हरला तर मात्र मग ....

दोन्ही चित्रपट एकाच चित्रपटाचे भाग आहेत पण एकानंतर एक रिलीज झाले. As of May 2019, Along with the Gods: The Two Worlds is the third highest-grossing film in South Korean cinema history.

चित्रपट प्राईम आणि नेटफ्लिक्स वर आहेत.

राघवेंद्र's picture

11 Oct 2021 - 9:59 pm | राघवेंद्र

धन्यवाद पाहतो

शुभां म.'s picture

14 Oct 2021 - 8:38 pm | शुभां म.

माझ्याकडे मोठी लिस्ट आहे.
Kigdom - नेटफ्लिक्स ची अजून ऐक गाजलेली झोम्बी हॉरर पोलिटिकल मालिका (historical ) , सादरीकरण , पार्श्व संगीत , उत्तम कलाकार उच्च दर्जाचे
याचे सध्या ३ season आहेत अजून ऐक येईल २०२२ ला
Chief Kim /good Manager - अतिशय उत्तम ऑफिस ,कॉमेडी आणि पोलिटिकल मालिका , Corporate चे खूप सारे धडे देणारी मालिका
Fiery Priest -भयंकर कॉमेडी आणि पोलिटिकल मालिका
Decendents of Sun - अजून ऐक खूप गाजलेली जागतिक मालिका
Jealousy Incarnate - वृत्तपत्रकारिता आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दल असलेलं खुप मोठा गैरसमझ दूर करणारा कॉमेडी मालिका
Arang and Megistrate - जुन्या एका दंतकथेवर आधारित (historical )
Mr.Queen - टाइम ट्रॅव्हल वर आधारित कॉमेडी (historical )
Dr.Romantic , Dr.Romantic २ -( मेडिकल ) उत्तम अभिनय आणि दमदार कथा
Jewel in Palace - कोरियन राजेशाही भोजना वर आधारित उत्तम मालिका
Lets eat ,Lets eat season २, season ३ - जेवणावर आधारित उत्तम मालिका

कोरियन मालिका त्याच्या उत्तम सादरीकरण , कमी भाग , उत्तम कलाकार , संगीत ,पार्श्व संगीत मूळे प्रसिद्ध झाल्या आहेत .
अजून खूप मोठी लिस्ट आहे पण सध्या एवढी खूप झाली

राघवेंद्र's picture

18 Oct 2021 - 5:31 pm | राघवेंद्र

धन्यवाद.
स्टार्ट-अप ही मालीका या विकांताला पाहिली. स्टार्ट-अप चे धडे चांगले दिले आहेत.

कोरियन मालिका यामुळे तर जास्त चाललात फक्त रटाळवाणी प्रेमकथा सादर न करता ते प्रत्येक पात्राच्या लहान सहन गोष्टी त्यांचे संवांद,राहणीमान,व्यावसायिक कार्यपद्धती याचा पुरेपूर अभ्यास करूनच सादर करतात .
सगळ्या historical मालिका याचे उत्तम उदाहरण राजाचे ,राणीचे ,दास -दासी ,दरबारी यांचे पोशाख ,बोलीभाषा ,विधी , घरे ,दरबार सगळ्या मालिकांमध्ये एकाच पद्धतीचे .
Reply १९८८ नक्की पहा , १९८८ चा कोरिया ,त्या वेळेच्या घडामोडी ,राहणीमान खूपच कुशलतेने दाखवला आहे .

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 10:32 am | प्राची अश्विनी

हो खरंय. सद्ध्या चा चा चा पहातेय. त्यातले dental opg ई सुद्धा अगदी पात्रांच्या तक्रारीप्रमाणे दाखवलेत. कुठलाही x ray चुकीचा नाहीय.
हे खरंतर एक minor detail. पण त्याचाही विचार केलाय.