चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
5 Mar 2021 - 5:21 pm
गाभा: 

आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल.

bengal

या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल.

तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे.

अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे.

वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही.

बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2021 - 3:23 pm | श्रीगुरुजी

इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल, सामाजिक माध्यमे आज नसती तर सरकारी व मुद्रित माध्यमांनी राहुलची प्रतिमा पुरोगामी, विचारवंत, तत्वज्ञ, दूरदृष्टी असलेला बुद्धिवंत अशीच केली असती.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Mar 2021 - 3:30 pm | चंद्रसूर्यकुमार

इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल, सामाजिक माध्यमे आज नसती तर सरकारी व मुद्रित माध्यमांनी राहुलची प्रतिमा पुरोगामी, विचारवंत, तत्वज्ञ, दूरदृष्टी असलेला बुद्धिवंत अशीच केली असती.

जशी राजीव गांधींची प्रतिमा केली गेली होती त्याप्रमाणेच.

मला कधीकधी वाटते की राजीव गांधींच्या काळात सोशल मिडिया असता तर राहुल गांधींऐवजी त्यांचे वडील आद्य पप्पू ठरले असते.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2021 - 3:36 pm | श्रीगुरुजी

नक्कीच. हे प्रकार नेहरूंपासूव सुरू झाले व जवळपास २००९-१० पर्यंत सुरू होते.

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2021 - 5:27 pm | नगरीनिरंजन

राजीव गांधींची इतकी भक्ती करताना मी कोणाला पाहिले नाही बुवा.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2021 - 7:52 pm | श्रीगुरुजी

चष्मा उतरवा. सर्व काही लख्ख दिसेल.

भारत माता कि जय च्या घोषणा बंद करून , सोनिया गांधी आणि तत्सम गांधी परिवाराच्या घोषणा दिल्या जातात ह्याला बहुतेक चाटूकारिता (शुद्ध मराठी शब्द आहे , हात किंवा तळवे चाटण्याविषयी वापरला आहे ) म्हणत असतील बहुतेक ,
आणि हो जसे काय पहिल्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे नवीन पिढीचे असं वाटतंय का तुम्हाला ??
जाऊद्या नंतर कधी तरी ...

अगदी नरसिंहराव, देवगोंड,vp सिंग ह्या देशाच्या पंतप्रधान असलेल्या लोकांना देश हित समजत होते.
मोदी आणि त्यांची तुलना होवूच शकत नाही
इतिहासातील सर्वात सुमार दर्जा चे पंतप्रधान आहेत ते . .
मोदी ह्यांना अतुलनीय हुशार ज्यांना वाटत असतील तर त्याची उदाहरणे द्यावीत.
फक्त फेका फेकी करू नये.

राजेश साहेब शंभरातील नव्याणव भंकस प्रतिसाद देण्याचा तुमचा स्ट्राईक रेट अलौकिक आहे. _/\_

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 5:08 pm | मुक्त विहारि

https://www.loksatta.com/desh-videsh-news/use-cheap-crude-oil-you-bought...

सध्या तरी मी, दुचाकी किंवा चारचाकी, वापरत नाही. आपण जर कमीतकमी इंधन वापरले तर????

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोनही तुल्यबळ पक्ष आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार हे नक्की.

ममता बॅनर्जी या आपणहून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत असे वाटते... कारण जय श्री राम बोलल्यावर त्या अश्या काही रिअक्शन देत आहेत जणू काही त्यांना शिवी दिली... त्यामुळे बहुसंख्य हिंदू लोकं नाराज होत आहेत..
भाजप त्याच आगीत तेल ओतून आपली पोळी शेकून घायचा प्रयत्न करतेय..

हा फक्त एक मुद्दा आहे.. अजुन बरेच मुद्दे आहेत त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि TMC दोघांसाठी प्रतिष्टेची आहे.. काँग्रेस आणि लेफ्ट यात कुठेही दिसत नाहीयेत.

अर्धवटराव's picture

9 Mar 2021 - 3:00 am | अर्धवटराव

भाजप रडीचा डाव खेळतय असं वाटतं. बंगाल इलेक्शनमधे, किंबहुना केरळ, दिल्ली किंवा अगदी हैद्राबादच्या नगरपालिका निवडणुकांमधे रामाच्या नावाने राजकारण करणं योग्य नाहि.
आपल्याकडे राजकारणाचा पोत जात-धर्मावर जातो हे खरं असलं, आणि ममता, ओवेसी वगैरे मंडळींना दुसरी भाषा कळत नसली तरी भाजप जे बाय डिफॉल्ट धर्माधारीत राजकारण करतं ते चुकीचं आहे.
आता निवडणुका जिंकायला एव्हरीथिंग इज फेअर म्हटलं तर मग काहि मुद्दा राहात नाहि.

https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/offensive-facebook-post-...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणारे कुठे आहेत आता?

मतांना किंवा निर्णयांना विरोध जरूर असावा

पण

भाषा संयत असावी

अर्थात, जिथे एखाद्या व्यक्तीच्या शारिरीक व्यंगांवरून, नेतेच टीका करत असतील किंवा आडनावावरून नेतेच एकमेकांची टिंगलटवाळी करत असतील, तिथे सामान्य जनता पण तसेच वागायचा प्रयत्न करणार...

नगरीनिरंजन,

अन्यथा “हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाहीय हे त्यांना कळले असते.

हे साफ तथ्यहीन विधान आहे.

बंगालची फाळणी रद्द झाली ती संपूर्ण भारतातल्या हिंदूंनी ऐक्य दाखवल्यानेच. फाळणी जाहीर केली १९०४ साली. त्याच सुमारास वंदे मातरम हे गीत जन्मलं. ते भारतातल्या सर्व हिंदूंनी ( व मुस्लिमांनीही ) इतकं उचलून धरलं की इंग्रज सरकारला त्यावर बंदी घालावी लागली. तसल्या बंद्यांना न जुमानता आणि १९०६ साली जन्मलेल्या मुस्लीम लीगला जराही धूप न घालता हिंदूंनी सणकून आंदोलनं केली. परिणामी १९११ साली बंगालची फाळणी रद्द झाली. तरीही बंगाल उभा आडवा पेटलेलाच राहिला. म्हणून इंग्रजांना १९१२ साली भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवावी लागली.

हा हिंदू ऐक्याचा विजय आहे.

आ.न.,
-गा.पै.