आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल.
या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल.
तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे.
अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे.
वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही.
बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.
वर्गीकरण
वाचने
46920
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by नगरीनिरंजन
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे.त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर. मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.हिंदू हित वादी
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
किती निरागस आहात तुम्ही!
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
मृत्युवरहत्येवर अत्यंत हीणकस भाषेत शेरेबाजी करणे असल्या उद्योगांना शिक्षा करायची सोडून मोदी त्यांना फॉलो करतात. हा विद्वेष आता अधिकृतच नव्हे तर विभूषण ठरायला लागला आहे. ह्य विद्वेषाने लोकांची मानसिकता बदलते आहे. बाबू बजरंगी व साध्वी प्रज्ञांची उदाहरणे पाहून लोकांना त्यात वावगं वाटतच नाही. पोलिसांच्या देखत आंदोलकांवर बंदूक चालवणार्या उच्चवर्णीय हिंदू मुलाला काहीच होत नाही; जेएनयुमध्ये जाऊन झोडपलं विद्यार्थ्यांना तरी काहीही होत नाही हे कोणी दाखवून दिलं? हे कोणी घडवलं? विद्वेषाला खतपाणी घालून असे रेबीड लोक तयार करण्याचे काम कोण करतंय हे सगळ्या जगाला कळतंय; परंतु उच्चवर्णीय हिंदूंचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ते डिनायल मध्ये आहेत.कसली द्वेषाला मान्यता?
In reply to किती निरागस आहात तुम्ही! by नगरीनिरंजन
सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा
हिंदू जेवढे आता पर्यंत कमजोर आणि असमर्थ झाले नाही नाहीत
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
आपला औरंगजेबाबद्दलचा अभ्यास
In reply to हिंदू जेवढे आता पर्यंत कमजोर आणि असमर्थ झाले नाही नाहीत by Rajesh188
अर्थातच. बीजेपीला पूर्वापार
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
पूर्वी इलेक्ट्रॉनिक
पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते.काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की. आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल
परत एकदा राजीव गांधी
In reply to इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल by श्रीगुरुजी
नक्कीच. हे प्रकार नेहरूंपासूव
In reply to परत एकदा राजीव गांधी by चंद्रसूर्यकुमार
राजीव गांधींची इतकी भक्ती
In reply to परत एकदा राजीव गांधी by चंद्रसूर्यकुमार
चष्मा उतरवा. सर्व काही लख्ख
In reply to राजीव गांधींची इतकी भक्ती by नगरीनिरंजन
वयाने जेष्ठ म्हणून बुद्धीने श्रेष्ठ असा आव
In reply to राजीव गांधींची इतकी भक्ती by नगरीनिरंजन
राजीव गांधी च्या जवळ पण मोदी जावू शकतं नाहीत
राजेश साहेब शंभरातील नव्याणव भंकस
In reply to राजीव गांधी च्या जवळ पण मोदी जावू शकतं नाहीत by Rajesh188
तेल आणि भारत
बंगालच्या विधानसभा निवडणुकीत
पण...
In reply to बंगालच्या विधानसभा निवडणुकीत by बापूसाहेब
अभिव्यक्ती स्वातंत्र्य ??
अभिव्यक्ति स्वातंत्र्य जरूर असावे
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य ?? by सुक्या
“हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाही .... ?