५. मिपाकर संदीप चांदणे यांची कन्या धाकटी कन्या मानसी (वय ४ वर्षे) हिचे एक चित्र.
.
.
५.अ मिपाकर संदीप चांदणे यांचा भाचा आरव (वय ५ वर्षे) ह्याचे एक चित्र..
.
.
५.ब मिपाकर संदीप चांदणे यांची जेष्ठ कन्या मुग्धा (वय ७ वर्षे) हिची काही कणीक शिल्पे.
.
.
.
.
.
.
.
.
ह्या पालीने दोन सीन्स क्रिएट केले घरात.
झाले असे की, एका रविवारी मुग्धाची आत्तू येणार होती भेटायला. तर मुग्धाचा सकाळी उठल्यापासूनच आत्तूला घाबरवण्याचा प्लॅन सुरू होता. तिने बाबाला तसे हळूच कानात सांगितले सुद्धा. बाबाने 'येस्स' म्हटल्याबरोबर तिची तयारी सुरू झाली. खरं बाबाला याची कल्पना नव्हती की, पहिल्यांदा त्याच्यावरच ह्याचा प्रयोग होणार आहे.
सीन १) बाबा अंघोळ करून बेडरूममध्ये येतो. घालायची कपडे आधीच बेडवर टाकून ठेवलेली असतात त्यातला शर्ट घालण्यासाठी उचलतो तर शर्टखाली पाल. तो एवढ्या मोठ्याने दचकून मागे सरकतो की मागच्या कपाटाला धडकून कपाटावरच्या दोन चार वस्तू त्याच्या टाळक्यात. की लगेच बाजूला उभ्या तीन कार्टूनांचा दंगा सुरू! बाबाही मग ती खोटी पाल उचलून त्यांच्या दंग्यात सामील होतो.
सीन २) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुग्धाची आत्तू घरी येते. हाश्श हुश्श करून सोफ्यावर बसते. मुग्धाच तिला ग्लासात पाणी आणून देते आणि आत्तू पाणी पीत असतानाच हळूच तिच्या मागे जाऊन सोफ्यावर उभा राहून वरून पाल तिच्या मांडीवर टाकते. आत्तू फुर्रर्र करून पाण्याचा फवारा समोर बसलेल्या आजोबांच्या अंगावर उडवते.
बोनस सीन ३) आजी किचनमध्ये असते. ती ह्या आवाजाने हॉलमध्ये येऊन मुग्धाच्या पाठीत एक जोरदार धपाटा घालते. मग तिचे रडे थांबवण्यासाठी बाबा तिला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन जातो.
प्रतिक्रिया
15 Feb 2021 - 3:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
पालीचा किस्सा भयंकर आवडल्या गेला आहे
कणकेचा या पेक्षा दुसरा कोणताही सदूपयोग असूच शकत नाही.
इतर कणीक शिल्पेही आवडली.
मधे मधे उभ्या आडव्या काड्यांचा अधार दिला तर कणकेचा दोन मजली वाडा / बंगला सुध्दा बांधता येईल
आरव आणि मानसीची निरागस चित्रेही आवडली
पैजारबुवा,
15 Feb 2021 - 4:01 pm | पियुशा
पाल प्रकरणाने धुमाकूळ घातलेला दिसतोय अगदी, सगळ्या कलाकृती, चित्रं खूप खूप आवडली सांगा बच्चे कंपनीला :)
15 Feb 2021 - 4:36 pm | विश्वनिर्माता
हाहा
छान किस्से
15 Feb 2021 - 4:39 pm | Bhakti
कणीक शिल्पे आणि गमती भारी आहेत.
15 Feb 2021 - 4:39 pm | चौथा कोनाडा
मस्त कलाकृती ! +१
पालीचा धुमाकूळ .... खतरनाक !
15 Feb 2021 - 6:23 pm | सौंदाळा
चित्रे, कणिकशिल्पे आणि पालीचा किस्सा सगळेच एकापेक्षा एक भारी
17 Feb 2021 - 12:05 am | गणेशा
मस्त.. आणि पाल प्रकरण पण भारीच..
लहान लहान गोष्टीत खूप मोठ्ठा आनंद असतो...:-))
17 Feb 2021 - 3:47 pm | बबन ताम्बे
पालीचा किस्सा भारीये !
24 Feb 2021 - 10:06 pm | Ajit Gunjal
मस्त भारी किस्सा
Marriage Anniversary Wishes in Marathi