निसर्गाची अप्रतिम भेट - वालावल । स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip part -२

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
5 Jan 2021 - 8:42 am

कोकण special Bike Road ट्रिप च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्ही सिंद्गुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळच्या एका नैसर्गिक देणगी लाभलेल्या सुंदर खेडेगावात म्हणजेच "वालावल" या खेडेगावात पोहचलो.
पहिल्या दिवसाच्या प्रवास संपवून संध्याकाळी मुक्कामासाठी आम्ही या गावात आलो. हे एक खेडे असल्यामुळे इथे हॉटेल / रिसॉर्ट कमी आहेत. तसेच राहण्यासाठी मोजकेच पर्याय आहेत. त्यापैकी हॉटेल कौस्तुभ आणि या भागातील प्रसिद्ध हॉटेल प्रभूशृष्टी. जर तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर हा बेस्ट पर्याय आहे. पण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या यामुळे आधीच बुकिंग झाले होते. म्हणून आम्ही गावातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिराच्या भक्त निवास मध्येच मुक्काम केला. आपल्या स्व इच्छेने आपण जे देणगी देऊ तेच खोली च भाडं.

लक्ष्मीनारायण मंदिर - स्थानिकांच्या मते जवळपास ३०० ते ४०० वर्ष जुने हे या गावातील एक भव्य आणि सुंदर मंदिर. संध्याकाळी आम्ही मुक्कामाला असल्यामुळे तिथल्या रात्रीच्या भजनाचा हि आस्वाद घेता आला. सकाळी उठल्यानंतर पहाटे मंदिराजवळ असलेल्या तलावांवर धुक्याची दाट चादर पसरलेली, सोबत पक्ष्यांचा किलबिलाट , नारळ पोफळीच्या बाग, मंदिरात आजणारी देवाची गाणी, कोकणातील सकाळ अनुभवण्याचा एक विलक्षण अनुभव आला.

कर्ली नदी आणि नौकाविहार - सकाळी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन वालावल पाहण्यासाठी बाहेर पडलो. गावाच्या बाजारपेठेतून थेट कर्ली नदीच्या किनाऱ्यावर पोहचलो . तिथे महेश कोरगावकर म्हणून काका आहेत ते नौकाविहार साठी घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीची बांबू च्या साहाय्याने चालवली जाणारी होडी घेऊन नदीत असलेल्या बेटा जवळ ते घेऊन जातात . आत फिरताना नदीचा शांत पाणी , आजूबाजूचं घनदाट जंगल एक अप्रतिम वातारणातून जातांना मन प्रसन्न होऊन जात. हा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर जा .

देवी माउली मंदिर - वालावल गावापासून ४ km अंतरावर असलेल्या चेंदवण या गावात देवी माऊलीच मंदिर आहे. भेटलेल्या माहितीप्रमाणे देवी माउली म्हणजेच लक्ष्मीनारायण यांची बहीण असा समजलं जात.

पाताळेश्वर मंदिर - चेंदवण याच गावात असलेलं दुसरा मोठं मंदिर म्हणजे स्वयंभू पाताळेश्वर मंदिर. दोन्ही मंदिरांना खूपच छान नैसर्गिक देणगी लाभली आहे. नक्कीच तुम्ही थोडा वेळ त्या प्रसन्न वातावरणाच्या आनंद घ्याच.

नेरुळ च कलेश्वर मंदिर - कुडाळ वालावल रोडवर असलेलं नेरूर या गावाचं एक भव्य मंदिर - श्री क्षेत्र कलेश्वर मंदिर . या मंदिराच्या समोरच एक मोठा तलाव आहे त्यामध्ये भरपूर कमळाची फुले पाहायला भेटतात .

वालावल या गावाजवळ असलेली हे काही ठिकाणे जेंव्हा कधी जाल तेंव्हा नक्की भेट द्या. अधिक माहिती साठी आपला संपूर्ण विडिओ नक्की पहा -

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Jan 2021 - 11:33 am | कंजूस

आम्हीही लक्ष्मीनारायण मंदिराबाजूच्या खानावळीत जेवलो. ( डॉ करंबेळकर यांची.)राहिलो नाही कारण संध्याकाळच्या गाडीचे (तुतारी एक्सप्रेस.)तिकिट होते.
सुंदर रम्य परिसर. तलाव सुंदर.

कंजूस's picture

5 Jan 2021 - 11:51 am | कंजूस

सुंदर झाला आहे.

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2021 - 1:55 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हीडियो अतिशय सुंदर झालाय. नावेतून त्या बांबूच्या साह्याने प्रवास लैच भारी. अजून येऊ दे अशीच सफर.
आभार.

-दिलीप बिरुटे

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2021 - 1:56 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद ... हो नक्कीच

गोंधळी's picture

5 Jan 2021 - 12:43 pm | गोंधळी

कर्ली नदीचा स्पॉट 👍

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2021 - 1:56 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

Bhakti's picture

6 Jan 2021 - 2:35 pm | Bhakti

हो ना खरच .. कोकणात अशीही सुंदर नदी आहे.. वाह.मस्त व्हिडिओ..

व्लॉगर पाटील's picture

6 Jan 2021 - 6:11 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

चौथा कोनाडा's picture

5 Jan 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या बात, सुंदर !
व्हीडियो तर एक नंबर !

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2021 - 5:48 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

सुबोध खरे's picture

7 Jan 2021 - 7:13 pm | सुबोध खरे

वाह, क्या बात, सुंदर !
व्हीडियो तर एक नंबर !

बा डी स

व्लॉगर पाटील's picture

11 Jan 2021 - 9:32 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

शेखरमोघे's picture

6 Jan 2021 - 4:42 am | शेखरमोघे

सुन्दर प्रवासवर्णन - अगदी वालावलला जाऊन आलच पाहिजे असे वाटायला लावणारे.

एक जरा खटकले : ".......भरपूर कमळाची फुले पाहायला भेटतात". "कोरगावकर" अथवा "डॉ. करम्बेळकर" भेटले हे समजते, "फुले पाहायला भेटणे" खटकते.

व्लॉगर पाटील's picture

6 Jan 2021 - 10:26 am | व्लॉगर पाटील

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद , पुढच्या वेळी पासून काळजी घेऊ

सिरुसेरि's picture

8 Jan 2021 - 2:29 pm | सिरुसेरि

सुरेख प्रवास वर्णन . पुर्वी प्रा. वालावलकर यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली "ग्रेट रॉयल सर्कस " पाहिली होती . तेव्हा पासुन वालावल या गावाचे आदरयुक्त असे कुतुहल होते .

व्लॉगर पाटील's picture

11 Jan 2021 - 9:31 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!