स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
31 Dec 2020 - 9:46 am

स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड

कोकण special Bike Road ट्रिप , पुण्यातून ट्रिप ला सुरुवात केली, कोल्हापूरचा मित्र सागर ने कोल्हापुरात join केलं आणि आम्ही निघालो तळ कोकणच्या दिशेने , ठरलं होत वाटेत दिसतील ते स्पॉट explore करायचं मग काय ३ दिवस , जवळपास १००० km चा प्रवास आणि स्वर्गीय कोकणातील भारी भारी भरपूर स्पॉट्स ..
पहिल्या दिवसाच्या प्रवासातील काही स्पॉट्स आपल्या कोकण ट्रीपच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये
१. रामतीर्थ , आजरा
कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा या गावापासून २km अंतरांवर असलेला रामतीर्थ मंदिर आणि धबधबा . माहिती नुसार प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील प्रवासात त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं होत म्हणूनच या ठिकाणाला रामतीर्थ म्हणतात आणि अप्रतिम निसर्गासोबतच हिरण्यकेशी नदीवर सुंदर धबधबा पण आहे.

२. हिरण्यकेशी मंदिर
अंबोली पासून ५ KM अंतरावर असेलेले घनदाट वनराईत वसलेलं हिरण्यकेशी आणि हिरण्यकेश्वर देवाचा मंदिर . याच ठिकाणाहून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. घनदाट जंगलात असेलेली हि एक शांत आणि प्रसन्न देवराई.
३. महादेवगड पॉईंट
अंबोली गावापासून २ ते ३ km अंतरावर असलेला हा किल्ला . पारपोली घाटाच्या आणि मालवण , वेंगुर्ला , रेडी बंदरातून येणाऱ्या मालाच्या सुरक्षेसाठी सावंतवाडीच्या अण्णासाहेब सावंत यांनी बांधलेला हा किल्ला . इथून अंबोली घाट आणि अथांग पसरलेल्या सह्याद्रीचा विलक्षण नजारा दिसतो .

अधिक माहिती साठी आपला संपूर्ण विडिओ नक्की पहा -

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Dec 2020 - 3:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

इथे दिसत नाहीये
पैजारबुवा,

व्लॉगर पाटील's picture

1 Jan 2021 - 6:20 pm | व्लॉगर पाटील
कंजूस's picture

31 Dec 2020 - 5:55 pm | कंजूस

आजरा आवडलं. पण वालावलचा तलाव, कर्ली काठ दाखवला नाही.

त्याचा दुसरा भाग लवकरच अपलोड करतोय त्या मध्ये ते ठिकाणे येतील नक्कीच , अतिशय सुंदर ठिकाण आहे पुढचा भाग नक्की पहा

गोरगावलेकर's picture

2 Jan 2021 - 9:16 am | गोरगावलेकर

हा भाग अजून पाहिलेला नाही. त्यामुळे माझ्यासाठी सर्वच नवीन

गणेशा's picture

2 Jan 2021 - 12:46 pm | गणेशा

मस्त...
Vedio भारीच..
कधी काळी ह्या भागात केलेली भटकंती आठवली..
तुमच्या धाग्यामुळे पुन्हा जावे असे वाटते आहे..

व्लॉगर पाटील's picture

6 Jan 2021 - 10:26 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!