संगणकासाठी SSD वापरावी की HDD?

Primary tabs

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
30 Jul 2020 - 3:34 pm

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटरच्या स्पीडचा आणि स्टोरेज याचा काय संबंध येतो? पण खरं पाहायला गेलं तर आपल्या कम्प्युटरचे स्टोरेज कुठल्या प्रकारचे आहे यावरही आपल्या कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो. चला तर आज आपण पाहूया स्टोरेजमध्ये नक्की काय बदल केल्याने तुमच्या कम्प्युटरचा वेग वाढू शकतो.

https://stepupmarathi.com/ssd-vs-hdd-comparison-in-marathi/

(SSD vs HDD)अलीकडच्या काळात वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या स्टोरेजची माहिती आपण घेऊया.
आपण आतापर्यंत शक्यतो हार्डडिस्क ड्राइव्ह याप्रकारचा स्टोरेज वापरत आलोय. यामध्ये CD किंवा DVD प्रमाणे धातूचा चकत्यांवर आपला डेटा साठवला जातो. पण यामध्ये समस्या ही हार्डडिस्कवर हा डेटा सेव्ह होत असताना जास्त वेळ घेतो. त्यामुळे आपला कम्प्युटर मंद गतीने चालतो.

जो नियम डेटा साठवण्यासाठी करण्यासाठी तोच नियम डेटा वाचण्यासाठीसुद्धा लागू होतो. म्हणजे आपली हार्डडिस्क जेवढ्या वेगाने राईट करेल किंवा जेवढ्या वेगाने तो रीड करेल तेवढ्या वेगाने आपला कम्प्युटर चालेल. कारण आपले कुठलेही सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम हे त्या त्याच्या हजारो फाईल्स वर काम करत असते आणि आपल्याला मॉनिटरवर तो डेटा दाखवत असते. अशावेळी जेव्हा कम्प्युटरला हार्ड डिस्ककडून डेटा वेगाने मिळतो तेव्हा आपला कम्प्युटर जास्त वेगाने चालतो. पण हाडडिस्कच्या कमी वेगामुळे यामुळे हा डेटा रॅम आणि प्रोसेसरला लवकर मिळत नाही. त्यामुळे तो आपल्याला सादर व्हायला वेळ लागतो आणि आपण म्हणतो की आपला कम्प्युटर कमी वेगाने चालतोय.

एस.एस.डी. काम कशी करते?
अलीकडच्या काळात एस.एस.डी. हे हार्डडिस्क पेक्षा नवीन असलेला स्टोरेज चा प्रकार आहे. एस.एस.डी.चे पूर्ण नाव सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या एस.एस.डी. मध्ये कुठल्याही प्रकारची डिस्क नसते ह्यात डेटा फ्लॅश मेमरी प्रमाणे आय.सी.(IC) किंवा इंटिग्रेटेड सर्किट(Intigrated Circuits) मध्ये स्टोअर केला जातो. परिणाम स्वरूप हा डेटा रीड आणि राईट करण्यासाठी हार्डडिस्क पेक्षा कमी वेळ लागतो. याचा फायदा असा होतो की आपल्या ऑपरेटिंग सिस्टममला डेटा सादरीकरणासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकर उपलब्ध होतो आणि आपल्या कम्प्युटरचा वेग वाढतो.

एस.एस.डी. वापरल्याने सगळ्यात मोठा फरक हा पडतो की आपला कम्प्युटर चालू होण्यासाठीचा(Booting Speed) वेग खूप वाढतो त्याचप्रमाणे जर आपण मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग साठी लागणारे सॉफ्टवेअर वापरत असाल असे की अडॉबी फोटोशॉप, अडॉबी प्रीमियर प्रो, अडॉबी आफ्टर इफेक्टस तर ह्या सॉफ्टवेअरला चालू होण्यासाठी लागणारा वेळ तसेच ऑपरेट करताना येणाऱ्या अडचणी खूप कमी होतात. या याप्रकारची सॉफ्टवेअर एस.एस.डी.वर असल्यास ती हार्डडिस्कच्या तुलनेने खूप वेगाने चालतात.

एस.एस.डी. किती क्षमतेची घ्यावी?
खरंतर किमती पाहता एखाद्या हार्ड डिस्कच्या क्षमतेची एस.एस.डी. वापरणे हे खूप महाग असू शकते. यावर पर्याय म्हणून आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टम आणि आपली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एस.एस.डी. वापरुन आपल्या फाइल्स स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क चा पर्याय वापरू शकता. जर आपण फोटोशॉप किंवा प्रीमियर प्रो सारखी किंवा इतर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरणार असाल तर किमान 256 जीबी क्षमतेची एसडी वापरणे सोयीस्कर ठरेल. जेणेकरून आपली ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर सह त्या सॉफ्टवेअरद्वारे वापरल्या जाणाऱ्या लागणाऱ्या स्क्रॅच डिस्क सुद्धा एस.एस.डी. च्या पार्टिशन मध्ये ठेवता येतील. आपल्याला लागणाऱ्या फोटो आणि व्हिडीओ फाईल्स आपण स्वतंत्र हार्डडिस्क मध्ये साठवून ठेवू शकतो. असे केल्याने आपला स्टोरेज साठी लागणारा खर्च कमी येईल त्याचबरोबर आपल्याला हवा तसा वेगही मिळेल.

आता आपण हार्ड डिस्क आणि एस.एस.डी. यांच्यातील काही फरक पाहूया.
१)हार्ड डिस्क ड्राइव्ह पेक्षा एस.एस.डी.चा वेग जास्त असतो.

२)हार्ड पेक्षा एस.एस.डी. आकाराने तसेच वजनानेही कमी असते.

३)हार्ड डिस्क स्टोरेज क्षमतेच्या मानाने एस.एस.डी पेक्षा महाग मिळते.

४. एस.एस.डी.फाईल ट्रान्स्फर किंवा रीड राईट वेग २०० ते ३६०० mb प्रति सेकंद असू शकतो याउलट हार्डडिस्क तुम्हाला जास्तीत जास्त ४८० mb प्रति सेकंद इतका वेग देऊ शकते. (दोन्हींचे वेग तुमच्या रॅम आणि प्रोसेसरच्या वेगानुसार कमी जास्त असू शकतात).

५. एस.एस.डी. वापरात असल्यास तुम्हाला हार्ड डिस्क पेक्षा खूप कमी वेळा डिस्क डिफ्रॅगमेंटेशन करण्याची गरज भासते.

६. हार्डडिस्कवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो याउलट एस.एस.डी.वर याचा प्रभाव पडत नाही.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

30 Jul 2020 - 3:45 pm | माहितगार

रोचक

प्रशांत's picture

30 Jul 2020 - 3:59 pm | प्रशांत

लॅपटॉप ला आता HDD आहे ती बदलुन SSD टाकायची आहे पण २००८ चे लायसन्स कसे ट्रान्सफर करायचे हे माहिती नाहि.

SSD कोणत्या प्रकारचा CPU असल्यास टाकावी? कमित कमि किती RAM असायला पाहिजे?

इरसाल कार्टं's picture

30 Jul 2020 - 6:00 pm | इरसाल कार्टं

CPU आणि RAM चे बंधन नाही, HDD प्रमाणेच काम करत असल्याने काही विशेष नियम नाहीत.

२००८ चे लायसन्स कसे ट्रान्सफर करायचे हे माहिती नाहि.

याबद्दल आता शक्यता कमी आहे.

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 1:55 am | गामा पैलवान

नमस्कार प्रशांत!

२००८ सालचं लायसन्स म्हणजे तुमच्याकडे विंडोज ८ ओएस होती बहुतेक. ती आता विंडोज १० झाली आहे असं गृहीत धरतो. इथे एक प्रोग्राम आहे : https://www.nirsoft.net/utils/product_cd_key_viewer.html#DownloadLinks

हा उतरवून चालवला की प्रोडक्ट की (product key) मिळते. ती नोंदवून ठेवा आणि नव्या एसएसडी वर विंडोज नव्याने टाकतांना हीच जुनी product key वापरा.

आ.न.,
-गा.पै.

प्रशांत's picture

1 Aug 2020 - 9:19 pm | प्रशांत

धन्यवाद...!

लॅपटॉप वर OEM Key असल्याने विंडोज १० ला अपग्रेड करायला काहि अडचण आली नाहि.

आजच सकाळी SSD २४० GB आणि ८ GB रॅम घेवुन आलो. लॅपटॉप सोबत आलेली DVD वापरुन आधी विंडोज८ टाकले व परत १० अपग्रेड केला. आधी अपग्रेड करायला ५ तास लागले तर आज फक्त ३४ मिनिटं लागली.

- प्रशांत

चौथा कोनाडा's picture

30 Jul 2020 - 5:04 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण !
पुभाप्र.

मदनबाण's picture

30 Jul 2020 - 5:41 pm | मदनबाण

गेले काही वर्ष मी एसएसडी ड्राइव्ह माझ्या डेस्कटॉपसाठी प्रायमरी डिव्हाइस म्हणुन वापरतोय आणि हायब्रीड एचडीडी सेंकंडरी म्हणुन वापरतोय. एसएसडीवर फक्त ओएस ठेवलेली आहे. याच विषयावर इथे एक प्रतिसाद दिलेला आहे.
तसेच वरती मुद्दा क्रमांक ५ दिला आहेत त्यात पुढील प्रमाणे सुधारणा सुचवतो :-
एसएसडी ड्राइव्ह ला चुकुन सुद्धा डिस्क डिफ्रॅगमेंट करु नये, त्याने त्याचे आयुष्य कमी होते किंवा ती बाद होण्याची शक्यता असते, ओएस मध्ये जर ऑटो डिस्क डिफ्रॅगमेंटे ऑन असेल तर एसएसडी ड्राइव्ह बसवण्याच्या आधीच तो पर्याय डिसेबल करावा. एसएसडी ड्राइव्ह ला डिस्क डिफ्रॅगमेंट च्या जागी पर्फॉमन्स ऑप्टीमाइझेशन करावे लागते आणि त्यासाठी एसएसडी बनवणारी कंपनीच सॉफ्टवेअर पुरवते. लाईट जात असतील / लोड शेडींग होत असेल आणि समजा तुम्हाला त्याचा दिवस किंवा कालावधी माहित असेल तर त्या काळात एसएसडी ड्राइव्ह चे पर्फॉमन्स ऑप्टीमाइझेशन करु नये.

@ प्रशांत
एसएसडीचा रॅम आणि प्रोसेसरशी संबंध नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aja Mahi feat. Metz & Trix | RDB Rhythm Dhol Bass

इरसाल कार्टं's picture

30 Jul 2020 - 6:01 pm | इरसाल कार्टं

माझ्या ब्लॉगवरच्या लेखात मी नक्की हि माहिती एडविन.

मदनबाण,

एकदम बरोबर. चुंबकचकतीवर धारिकांचं समुच्चयन केल्यास विदावेग वाढतो (म्याग्नेटिक हार्ड डिस्क वर डीफ्रॅग केल्यास डेटा स्पीड वाढतो).

पण ठोसदशा धारिकालय ( सॉलिड स्टेट डिव्हाईस ) वर धारिकांतला विदा मुद्दाम विखरून ठेवला जातो, जेणेकरून त्याचं आयुष्य वाढेल. हा नग समुच्चयित केल्यास पुनर्लेखन करायच्या महत्त्वाच्या धारिका एके ठिकाणी केंद्रित होऊन फक्त त्या भागाचा अतिवापर होतो. अशाने नगाचं आयुष्य कमी होतं.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2020 - 6:03 pm | चौथा कोनाडा

छान माहिती. मराठी शब्दांचा वापर आवडला !

गामा पैलवान's picture

1 Aug 2020 - 1:48 am | गामा पैलवान

प्रोत्साहानानिमित्त आभार! :-)
-गा.पै.

इरसाल कार्टं's picture

1 Aug 2020 - 8:05 pm | इरसाल कार्टं

शब्दसंग्रह वाढवलात _/\_

केंट's picture

30 Jul 2020 - 5:46 pm | केंट

"खरंतर किमती पाहता एखाद्या हार्ड डिस्कच्या क्षमतेची एस.एस.डी. वापरणे हे खूप महाग असू शकते. यावर पर्याय म्हणून आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टम आणि आपली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एस.एस.डी. वापरुन आपल्या फाइल्स स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क चा पर्याय वापरू शकता. " - या साठी थोडीशी भर , हायब्रिड हार्डडिस्क पण बाजारात उपलब्ध आहेत , ज्या मधे SSD व HDD दोन्ही प्रकार एकत्र असतात, दोन वेगवेगळ्या हार्डडिस्क चा खर्च वाचतो.

मदनबाण's picture

30 Jul 2020 - 6:02 pm | मदनबाण

ज्या मधे SSD व HDD दोन्ही प्रकार एकत्र असतात, दोन वेगवेगळ्या हार्डडिस्क चा खर्च वाचतो.
मी स्वतः सेंकडरीला हायब्रीड वापरत असल्याने यात दोन्ही मध्ये [ एसएसडी आणि हायब्रीड मध्ये ] प्रचंड फरक आहे हे सांगु शकतो. एसएसडी च्या परफॉर्मन्स ची तुलना हायब्रीड बरोबर होउ शकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aja Mahi feat. Metz & Trix | RDB Rhythm Dhol Bass

केंट's picture

30 Jul 2020 - 7:19 pm | केंट

हे ही खर आहे. मी स्वतः OS साठी 250 GB SSD आणी data साठी 1 टीबी SSD वापरतो . PCIe SSD प्रकार पण भारी आहे . Apple आणी Samsung लॅपटॉप मधे हा प्रकार बघायला मिळतो.

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 2:24 am | गामा पैलवान

केंट,

तुमच्याकडे आहे तो संयुक्त नग (hybrid device ) आहे का? मी चक्क बाह्यनग (external usb2 ssd) वापरतो. मस्त चाललाय.

आ.न.,
-गा.पै.

नमस्कार गामा जी ,
हायब्रिड हार्डडिस्क ची लिंक इथे डकवलिये

https://www.amazon.in/Seagate-ST1000LX015-Laptop-Hybrid-Drive/dp/B01LWRT...

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 6:26 pm | गामा पैलवान

माल सुंदर आहे. आवडला. :-)
-गा.पै.

इरसाल कार्टं's picture

30 Jul 2020 - 6:02 pm | इरसाल कार्टं

हेही बघतो. धन्यवाद

सुमो's picture

1 Aug 2020 - 5:24 am | सुमो

आणि नवीन माहिती मिळतीये.

सुमो's picture

1 Aug 2020 - 5:25 am | सुमो

आणि नवीन माहिती मिळतीये.

सुबोध खरे's picture

1 Aug 2020 - 7:33 pm | सुबोध खरे

बहुसंख्य लोकांना १ TB च्या हार्ड डिस्कची गरज नसते.

माझा CORE २ DUO असलेला संगणक क्रॅश झाला तेंव्हा त्याची विंडो एक्स पी प्रणाली जुनी झाली होती ती बदलून विंडो १० टाकली आणि संगणक स्लो सुद्धा झाला होता म्हणून त्यात २५६ GB ची SSD टाकली आहे.

तुम्हाला टेरा बाईट च्या हार्ड डिस्कची गरज नसते त्यामुळे १ टेरा बाईट च्या HDD ऐवजी त्याच पैशात मी २५६ जी बी SSD टाकली आहे आणि संगणक उत्तम चालू आहे.

इरसाल कार्टं's picture

1 Aug 2020 - 8:07 pm | इरसाल कार्टं

पण आपण संगणक घ्यायला गेलो की दुकानदार आपल्याला जास्त स्टोरेजची भूल घालतात आणि नंतर हे सगळं करत बसणं कंटाळवाणं होतं.

तुषार काळभोर's picture

2 Aug 2020 - 12:45 pm | तुषार काळभोर

दहा पंधरा वर्षांपूर्वी गरज होती.
तीपण अगदी 1 टीबी नाहीतर पाचशे जीबी पुरेशी असायची

तेव्हा मिळेल ते एम्पी 3 गाण्यांचे फोल्डर, पिक्चर, व्हिडिओ गाणी, गेम्स, ' स्टडी ' फोल्डर, इत्यादी साठवून ठेवावं लागायचे.

आता वैयक्तिक फोटो सोडून काही साठवायची गरज नसते. तेसुद्धा online असलेले जास्त सुरक्षित असतात. स्टोरेजचा शून्य भरवसा असतो.

i3, 4gb, 500gb / 1tb
यापेक्षा
ड्युअल कोर, 4gb, 120 gb ssd
याचा परफॉर्मन्स जास्त चांगला असेल.

इरसाल कार्टं's picture

2 Aug 2020 - 11:52 am | इरसाल कार्टं

दिवसभर असंख्य वेबसाईट्सवर काम करत असल्याने कि काय माहित नाही, पण माझे दोन्ही पीसी खूप स्लो चालायचे. बूट टाइम तर पाच मिनिटांवर जायचा कधीकधी. फक्त ssd वापरल्याने बूट टाइम १०-१२ सेकंदांवर आलाय.

प्रशांत's picture

2 Aug 2020 - 8:56 pm | प्रशांत

२४० पुरेशी आहे.

२/३ वर्षापुर्वी 1tb पण कमी पडायला लागली होती कारण त्यात भरपुर मुव्हि, टिव्हिशो, गाणे .... होते. पण आता हे सर्व ऑनलाईन मिळते.

२००२ साली मी ४० GB ची HDD घेतली होती तेव्हा अस वाटायचे कि आता परत HDD घ्यावी लागणार नाहि त्या आधी २ GB होती.

तुर्रमखान's picture

2 Aug 2020 - 1:57 pm | तुर्रमखान

खूप वर्षापुर्वी हार्डडिस्क बदलायची होती पण अनेक अधिच इन्स्टॉल्ड असलेल्या प्रॉग्रॅम्सचे सेटअप नव्हते. त्यावेळी एक क्लोन करायची युटिलिटी वापरल्यचं आठवतं. कॉन्फिगरेशनमध्ये दुसरा काहिही बदल नसेल तर या पद्धतिनं चालावं.

केंट's picture

2 Aug 2020 - 10:00 pm | केंट

Conventional हार्डड्राइव मधे डेटा रिकवरी साठी बरेसचे पर्याय उपलब्ध आहेत. SSD technology नवीन असल्याने , SSD मधे काही प्रॉब्लेम आल्यास , फार कमी रिकवरी टेक्नीक्स आहेत. Conventional हार्डड्राइव मधे डेटा रिकवरी साठी Firmware , Loader , Translators, क्लीन रूम प्रोसेस व हेडर प्लेटर रेप्लसेमेंट करता येते, अगदी जळालेली , पाण्यात बुडालेली हार्डडिस्क पण रिकवर होते. पण SSD मधे कंट्रोलर मुळे , Encryption मुळे रिकवरी रेट कमी आहे.

गामा पैलवान's picture

3 Aug 2020 - 6:24 pm | गामा पैलवान

ठोसदशानगाचा सतत प्रतिपाठ ( = ब्याकप) घेणे हाच यावर उपाय आहे.
-गा.पै.

काही महीने पॉवर ऑन केली नाही तर SSD वरचा डाटा नष्ट होउ शकतो.
तसे HDD चे होत नाही.

मराठी_माणूस's picture

4 Aug 2020 - 9:17 am | मराठी_माणूस

धन्यवाद.
हे माहीत नव्हते. विकत घेताना सुध्दा त्यांनी असे काही सांगीतले नव्हते .

शाम भागवत's picture

4 Aug 2020 - 9:30 am | शाम भागवत

बापरे!

सुबोध खरे's picture

4 Aug 2020 - 10:20 am | सुबोध खरे

SSDs will not lose data when run out of power.
The SSD uses NAND Flash as the storage medium, this can prevent SSD from losing data when it is not powered for a long time. Therefore, even if the SSD is not powered for a long time, data loss will not occur.
It is no problem to store data in consumer SSDs for one year without power saving at 30 °C,
https://www.elinfor.com/knowledge/if-uncharged-for-a-year-will-ssd-lose-...

11261#:~:text=SSDs%20will%20not%20lose%20data,data%20loss%20will%20not%20occur.

गामा पैलवान's picture

4 Aug 2020 - 1:04 pm | गामा पैलवान
केंट's picture

4 Aug 2020 - 1:59 pm | केंट

सहमत आहे

नेत्रेश's picture

18 Aug 2020 - 11:23 am | नेत्रेश

हे महत्वाचे आहे. तसेही १ बर्ष न वापरल्याने ती माहीती नष्ट होणार असेल, कींवा जास्त तापमानाच्या प्रदेशत ४ महीन्यात नष्ट होणार असेल तर लोकांना त्याची माहीती असावी.

तुम्ही दीलेला सोर्स फक्त जनरल माहीती देतो, जी प्रत्येक SSD ला लागु पडेल याची गॅरेंटी नाही. वेगवेगळ्या प्रोसेस टेक्नॉलॉजीने बनलेल्या NAND Flash चा रीटेंशन पिरीयड वेगळा असतो. तसेच NAND Flash controller कीती चांगला आहे हे पण महत्वाचे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण घेतलेल्या SSD ची टेक्नीकल माहीती तपासुन पहाणे.

मराठी कथालेखक's picture

6 Aug 2020 - 5:12 pm | मराठी कथालेखक

Windows 7 HDD वर सुद्धा व्यवस्थित चालायची (किंवा अजूनही चालते ) Windows 10 ही बेकार OS आहे म्हणून SSD सारखे खर्चिक पर्याय अवलंबावे लागतात.
Windows 7 ही Microsoft ची अतिशय मस्त OS होती. पण Microsoft ने जबरदती Windows 10 हे माथी मारायला सुरु केली.

प्रशांत's picture

8 Aug 2020 - 9:50 pm | प्रशांत

विंडोज ९५ नंतर ९८ वापरायला लागल्यानंतर हिच OS छान आहे असे वाटत होते.
XP वापरायला लागलो तेव्हा सुरुवातीला वाटायचे कि विंडोज ९८ च सर्वात चांगली होती. पण नंतर (SP1) आल्यानंतर XP बेस्ट वाटायची. सेम विंडोज ७ बाबत.

वर्ष झालं Windows १० वापरतो बेस्ट आहे.

मराठी कथालेखक's picture

8 Aug 2020 - 10:47 pm | मराठी कथालेखक

मी ऑफिसच्या लॅपटॉपवर २ वर्षांपासून विंडोज १० वापरतो पण तरी अजून आवडली नाही..१६ जीबी रॅम ,i5 processor असूनही बूट टाईम भरपूर आणि लॅपटॉप स्लो पण आहे. घरच्या डेस्कटॉपवर विंडोज ७ आहे. हा दहा वर्षे जुना , असेमब्ल्ड पीसी, core 2 duo processor, ४ जीबी रॅम, ओएसची वर्जन पण जेन्युईन नाही तरी वापरायला मजा येते

प्रचेतस's picture

8 Aug 2020 - 11:21 pm | प्रचेतस

सहमत.
विंडोज १० प्रचंड रिसोर्सेस कन्झ्युम करते. एसएसडी असेल तरच विंडोज १० वापरावी अन्यथा नकोच.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2020 - 5:15 pm | चौथा कोनाडा

@मराठी कथालेख@,
मी अजून खिडकी७ च वापरतो :-)

मागासलेपणाचे फायदे :-)

शंकासुर's picture

9 Aug 2020 - 4:55 am | शंकासुर

मी 4 महिन्यांपूर्वीच हाय परफॉर्मन्स गेमिंग लॅपटॉप घेतला.
त्यात अर्थातच ससड + हडड आहे.
मी लॅपटॉपच पॉवर बटण दाबल्या पासून माझी विंडोज10ची लॉगीन स्क्रिन यायला फक्त 5-6 सेकंद लागतात(बूट टाईम).

विंडोज ही ससड मध्ये इन्स्टॉल असल्याने हे शक्य होते.
(अर्थातच 16 जिबी रॅम आणि i7 चा पण त्यात हातभार आहे)

शाम भागवत's picture

9 Aug 2020 - 8:45 am | शाम भागवत

ससड व हडड
दोन्ही शब्द आवडले.
पटकन लिहिता येताहेत. जोडाक्षरे विरहीत.
एकदम सरळ शब्द, अगदी तळवळकर यांचेसारखे.
:)

गामा पैलवान's picture

9 Aug 2020 - 1:58 pm | गामा पैलवान

शंकासुर,

मला वाटतं की UEFI असेल तर प्रवेशदृश्य (लोगिन स्क्रीन) लवकर प्रकटतं. मग ठोसदशानग (ससड) असो वा चुंबकचकती (हडड) असो.

माझ्या जुन्या चुंबकचकतीवर विंडोज १० आहे. अतिशय हळू चालते, मात्र वीजकळ दाबल्यावर प्रवेशदृश्य चटकन दिसतं. तुमच्या बाबतीत अधिक माहिती घेतल्यावरच ठरवता यावं.

आ.न.,
-गा.पै.

अधिक माहिती : UEFI म्हणजे Unified Extensible Firmware Interface - https://en.wikipedia.org/wiki/Unified_Extensible_Firmware_Interface

शाम भागवत's picture

9 Aug 2020 - 8:45 am | शाम भागवत

ससड व हसड
दोन्ही शब्द आवडले.
पटकन लिहिता येताहेत. जोडाक्षरे विरहीत.
एकदम सरळ शब्द, अगदी तळवळकर यांचेसारखे.
:)

फुटूवाला's picture

18 Aug 2020 - 8:04 am | फुटूवाला

गेली सात आठ वर्ष झाली SSD वापरतोय. २५० SSD ज्यावर ओएस आहे. २ टीबी HDD जो स्टोरेज साठी वापरतो. संगणक चालू होताना लगेच होतो. शिवाय मी जे काम करत असतो त्याचा २०जीबी डेटा डेक्सटॉप ला कॉपी करून घेतो जे SSD वर येतं. फोटोशॉप मध्ये फाईल पटापट उघडतात आणि सेव्ह होतात. तेच HDD वर करायला लागलो तर बोटं मोडणे, आळस देणे, मोबाईल तपासणे याला वेळ मिळतो :)

SSD मस्तच

माझ्याकडच्या आय३ संगणकाला ससड बसवावी म्हणून एकाला फोन केला. तर तो म्हणाला हार्ड डिस्क पाॅवर सप्लाय स्लाॅट आहे का ते प्रथम तपासायला लागेल?
“हार्ड डिस्क पाॅवर सप्लाय स्लाॅट“ हा काय प्रकार असतो? तो कसा ओळखायचा?

फुटूवाला's picture

18 Aug 2020 - 7:21 pm | फुटूवाला

मला अनुभव आहे काही प्रोफेशनल लोकांकडून काम करून घ्यायचा. ते किंमत+चार्जेस सांगण्याआधी असे प्रश्न विचारतात. जवळचा कोणी असेल तर करून घ्या. पुण्यात असाल तर व्यनि करून एक खात्रीशीर मोठा डिलर सांगतो. “हार्ड डिस्क पाॅवर सप्लाय स्लाॅट“ एक्स्ट्रा असतो सहसा नसेल तरी पर्याय असतात. जास्त मोठा प्रॉब्लेम नसावा.
यावर्षी किंमत कमी दाखवत आहे ssd ची. २५६जीबी ५-६ हजारच्या घरात मिळतेय. मी घेतली तेव्हा मला ७८००/- ला मिळालेली.
डीव्हीडी रायटर चा वापर नसेल तर त्याची पॉवर केबल ssd ला लावता येते.

शाम भागवत's picture

30 Oct 2020 - 6:23 pm | शाम भागवत

Crucial BX500 1TB 3D NAND SATA 2.5-Inch Internal SSD - CT1000BX500SSD1
हे फायनल करतोय.

₹७८९९ किंमत आहे. सवलत वगैरे धरून ७१४९ ला मिळतीय. ( ₹१३००० मग १२००० मग १०००० अशी घसरत आज हा भाव मिळाला.)
😀

मूळ देश युएसए
उत्पादन सिंगापोर
२७ मे २०२० ला पहिल्यांदा उपलब्ध झाली.

क्लोनिंग करण्यासाठी ससड सीडी रॉमच्या केबलला जोडली. पण आता ससड फक्त 111 जीबी असल्याचं दाखवतोय.
काय करावं कळतच नाहिये.