पहिली रात (देवद्वार)

रामजी's picture
रामजी in जे न देखे रवी...
16 Nov 2008 - 2:44 pm

शुभ्र चांदण्यांची ।
शाल पाघरली ।
रात ही पहिली ।
आली सखे ॥

धुंद त्या क्षणांची ।
पाहतो मी वाट ।
झेलुया गं लाट ।
आवेगाची ॥

मनीचा मोगरा ।
आज बहरेल ।
श्वास हा भेटेल ।
श्वासाला गं ॥

रात ही सरेल ।
देह दुरावेल ।
मन रेंगाळेल ।
तुझ्यापाशी ॥

कविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

16 Nov 2008 - 8:22 pm | मनीषा

मनीचा मोगरा ।
आज बहरेल ।
श्वास हा भेटेल ।
श्वासाला गं ॥
...सुंदर !

आजानुकर्ण's picture

16 Nov 2008 - 10:08 pm | आजानुकर्ण

दार ते लावून
कडीही घातली
रात्र ही मातली
बघ सखे

सुगंधी फुलांनी
शेज ती सजली
जराशी लाजली
नवरीही

मेजावरी होता
दुधाचा गिलास
पूर्ण तो पिलास
घटाघटा

तुझा तो घागरा
आज उतरला ।
श्वास हा भेटला ।
श्वासाला गं ॥

दोघेही जाहले
प्रणयात दंग
उधळीत रंग
भसाभसा

रात्र ना सरावी
देह ना दुरावा
गोंधळ करावा
दररोज

धुंद त्या क्षणांनी
लावली ती वाट
(मोडली ती खाट
लोखंंडाची)

आपला,
(राक्षसद्वार) आजानुकर्ण

प्राजु's picture

16 Nov 2008 - 9:49 pm | प्राजु

कविता अतिशय सुरेख झाली आहे.
अजानुकर्ण,
तुमचीही कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आजानुकर्ण's picture

16 Nov 2008 - 10:10 pm | आजानुकर्ण

अभिप्रायासाठी धन्यवाद.

आपला
(आभारी) आजानुकर्ण

वरील कवितेत काही बदल करून आम्हीही काव्यकट्ट्याच्या आखाड्यात उतरलो आहोत.

आपला,
(पैलवान) आजानुकर्ण