पनीर स्ट्फ्ड ब्रुसेल स्प्राउट्स

यश राज's picture
यश राज in पाककृती
21 Dec 2019 - 4:40 am

सध्या नाताळाचा हंगाम असल्याकारणाने इकडे बाजारात वेगळाच उत्साह दिसतोय, वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरु आहे.
नाताळ हा ख्रिस्ति लोकांचा मोठा सण, या दिवशी कुटूंबातील सर्व लोक एकत्र येतात, प्रार्थना करतात व एकत्र जेवण करतात. माझा ब्रिटिश सहकारी मला सांगत होता की येथील लोक सहसा रोज स्वयंपाक करत नाहीत तर तयार पदार्थ खातात मात्र नाताळच्या दिवशी हमखास सर्व जेवण घरीच बनवतात.
या जेवणामध्ये उकड्लेल्या भाज्यांसोबत ब्रुसेल्स स्प्राउट्सचा समावेश असतोच असतो.

ब्रुसेल्स स्प्राउट्स साधारणतः कोबीवंशीय भाजी आहे. दिसायला अगदी चिमुकल्या कोबीसारखीच, आत मद्धे अगदी छोटे पापुद्रे, चव म्हणाल तर थोडी शेंगदाणे मिश्र पत्ताकोबी सारखी. भरपुर जीवनसत्व व फायबर असणारी भाजी.

या वेळेस बाजारात ब्रुसेल्स स्प्राउट्स मुबलक उपलब्ध असल्यामुळे साहजीक खरेदी झाली व त्याबरोबर विचार केला की थोड्या वेगळ्या पद्धतीने पाकक्रुती करुया.

चला मग कृती कडे वळूया.

साहीत्य.

- ब्रुसेल स्प्राऊट्स साधारण पाव कीलो.
- परतण्यासाठी तेल.
- चिमुटभर हिंग

सारणासाठी-
- १ वाटी पनीर किसुन घेतलेले.
- चमचाभर आमचुर पावडर
- लाल तिखट.
- हळद
- मिठ

ग्रेव्हीसाठी -
- १ मोठा कान्दा
- १ मोठा टोमॅटो
- आल्याचा तुकडा
- लसुण, हिरवी मिरची.
- लाल तिखट.
- हळद
- मिठ
- गरम मसाला,मोहरी,जिरेमो
- चमचाभर साखर.

कृती:

आगोदर सारण तयार करुन घ्या.
किसलेले पनीर, आमचुर पावडर, लाल तिखट, चिमुटभर हळद व चमचाभर मिठ एकत्र करुन बाजुला ठेवुन द्या.

ब्रुसेल्स स्प्राऊट्स आधी स्वच्छ धुवुन घ्या व कापडाने पुसुन घ्या, वरचा पापुद्रा काढून घ्या.

Test

काळजीपुर्वक स्प्राऊट्चे चार भागात चिरा करुन घ्या जेणेकरुन सारण देठापर्यंत व्यवस्थित बसेल.

Test

कापलेल्या भागात पनीरचे सारण घट्ट दाबुन भरा.
test

एका पसरट पॅन मध्ये परतण्यापुरते थोडे तेल गरम करुन घ्या, चिमुट्भर हिंग टाका व सगळे स्प्राऊट्स काळजी पुर्वक तपकीरी होईपर्यन्त परतुन घ्या.

Test

टिपः हे परतलेले स्प्राऊट्स स्टार्टर म्हणून देखिल छान लागतात.

आता ग्रेव्ही कडे वळूया.

कांदा,टोमॅटो अगदी बारीक वाटून घ्या व नंतर आले,लसूण व हिरवी मिरची पण वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल तापले की मोहरी,जिरे तडतडून घ्या, नंतर आले,लसूण व हिरवी मिरची पेस्ट टाका व परतुन घ्या. थोड्या वेळाने बारीक वाटलेले कांदा,टोमॅटो टाकुन परता. मिश्रणाला थोडे तेल सुटायला आले की मग स्प्राऊट्स टाका व काळजीपुर्वक ढवळा. वरुन थोडा गरम मसाला व मिठ टाका व साधारणतः ४ ते ५ मिनिटे झाकण ठेवा. चिमुट्भर साखर घाला व परत एकदा काळजीपुर्वक ढवळा.

गरमागरम पनीर स्टफ्ड ब्रुसेल्स स्प्राऊट्स तयार.

Test

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:11 am | मुक्त विहारि

धन्यवाद. ..

इथे, कोकणात, ही भाजी मिळत नाही. ..

पाककृती आवडली. ..

यश राज's picture

21 Dec 2019 - 6:22 pm | यश राज

धन्यवाद मुवि..

ही भाजी बहुदा थंड प्रदेशात पिकते त्यामुळे कदाचित भारतात उपलब्ध नसावी.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:16 pm | मुक्त विहारि

हा मसाला वापरुन, भरली सिमला मिरची किंवा भरली ढेमसे पण करता येऊ शकेल....

यश राज's picture

21 Dec 2019 - 9:49 pm | यश राज

पनीर भरलेली शिमला मिरची चवीला मस्त लागते.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 10:10 pm | मुक्त विहारि

त्यामुळे आता नकोसे झाले आहे.

त्यामुळे पनीरच्या ऐवजी खिमा किंवा उकडलेल्या अंड्याचा कीस वापरून करीन.

आणि तसेही, खिमा भरून केलेली सिमला मिरची किंवा ढेमसे
चविष्ट लागतात.

तुम्ही मांसाहार करत असाल तर, वरील दोन्ही पदार्थ करुन बघा....

नूतन सावंत's picture

6 Jan 2020 - 9:28 am | नूतन सावंत

मुवि,तुम्ही कोबी लावा आणि ते टेनिया बॉलएव्हढे झाले की करा ही पाककृती.आज मी करणार आहे भारतीय अवतारातला ब्रुसेल्स स्राऊटस्.

श्वेता२४'s picture

21 Dec 2019 - 8:49 pm | श्वेता२४

ही भाजी पाहिली नव्हती. फोटु मस्त. कधी मिळालीच ही भाजी तर या पद्धतीने करुन बघेन

यश राज's picture

21 Dec 2019 - 9:50 pm | यश राज

धन्यवाद श्वेता

मदनबाण's picture

22 Dec 2019 - 11:34 am | मदनबाण

नविनच भाजी समजली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2019 - 12:48 am | अत्रुप्त आत्मा

छान.