पुण्यात (अर्थात) विम्बल्डन !

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
12 Aug 2019 - 6:43 am

आधीच क्षमा मागतो कि हि काही पाककृती नाही .. मग इथे का लिहिलंय असा प्रश्न विचारलं.. कारण खाण्याशी संदर्भ आहे म्हणून!

तर सांगायची गोष्ट अशी कि
फळ भाजी इत्यादी मोसमपणाने खाद्योत्सव असतात , आंबे, हुरडा, इत्यादी हे काही नवीन नाही ...त्यावरून एक आयडिया ची कल्पना आली, बघूया कोना उद्योजकाला भावतीय का ते.

डिसेंबर महिन्यात प्रथमच आयुष्यात महाबळेश्वर परिसरात मधुर स्टरबेरीचं आस्वाद घेतला त्या नंतर पुण्यनगरीत बालेवाडी टेनिस ची भारतातील एकमेव अशी जी ऐटीपी टूर्नामेंट असते ती पहिली,,, अर्थात तिथे सगळं झाकपाक मामला , स्टेटस सिम्बल म्हणून पण जनता हजर होती आणि माझा लक्ष खाद्य विभाग कडे गेलं... विविध प्रकार होते आणि अर्थाह्तच किंमत भरपूर आणि मनात विचार आला कि या मोसमात जसे विम्बल्डन ला स्ट्राबेरी आणि क्रीम खासियत किंवा प्रथा म्हणून असते तसे कोणी जर या ठिकाणी " या टेनिस पाहा आणि स्ट्राबेरी आणि क्रीम खा आणि पुण्यात विम्बल्डन अनुभवा ! अशी अस्सल पुणेरी पाटी लावून ठेला उभा केला तर कमाई होऊ शकेल!