साहित्य :
जिलेटिन 25 ग्रॅ.
स्ट्रॉबेरी (साल काढलेली)
दूध 1 कप,
पिठीसाखर 50 ग्रॅ.
व्हेनिला आइसक्रीम 200 ग्रॅ.
घट्ट क्रीम 1/2 कप
4 स्ट्रॉबेरी सजविण्यासाठी.
कृती :
कोमट पाण्यात जिलेटिनला थोडावेळ ठेवावे (१०-१५ मिनिटे). स्ट्रॉबेरी, दूध, साखर,क्रीम आणि आइसक्रीमला मिक्सरमधून काढून घ्यावे. जिलेटीनला मंद आचेवर शिजवून घ्यावे. जेव्हा हे पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा मिल्कशेकच्या मिश्रणात जिलेटीन टाकून मिक्सरमधून काढावे.
तयार मिश्रणाला ग्लासमध्ये टाकावे व फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवावे. वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करावे.