पंजाबी सामोसा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Oct 2008 - 4:56 pm

तमाम जर्मनांचे बटाट्यावर फार प्रेम आणि इथे उत्तरेतून आलेली मंडळी बरीच,ती ही,हॉटेल व्यवसायातील! त्यामुळे इथे सामोसा लोकप्रिय व्हायला वेळ नाही लागला. आमचे मित्र ख्रिस आणि सुझानही सामोसा प्रेमी..काल दिवाळीनिमित्त ते दोघं जेवायला आले होते. त्यांची ही खास फर्माईश!

साहित्य -
८,१० उकडलेले बटाटे, ७,८ हिरव्या मिरच्या,१इंच आलं,३ टी-स्पून धने
१.५ टी-स्पून जीरे,३,४ दालचिनीचे तुकडे,२,३ लवंगा,२,३ वेलदोडे
८,१० काळी मिरी,०.५ टी-स्पून आमचूर,१ वाटी उकडलेले वाटाणे
३०० ग्राम मैदा,७५ ग्राम तूप+२ टी-स्पून तूप,१ टी-स्पून मका-पीठ(कॉर्न फ्लोअर)
१टी-स्पून लिंबाचा रस,मीठ चवीनुसार,कोमट पाणी,तेल तळणीसाठी,
कोथिंबीर
कृती -
आले+मिरची पेस्ट करा,धनेजीरे,मिरे, दालचिनी,लवंगा,वेलदोडे इ.मसाला भाजून न घेता कच्चेच भरड वाटा,अगदी थोड्या तेलावर परतून घ्या,त्यात आले मिरची चे वाटण घाला,बटाटे बारीक चिरा व ते यात घाला,वाटाणे घाला,मीठ घाला,भाजी परतून घ्या,आमचूर टाकून गॅस बंद करा व चिरलेली कोथिंबीर घाला.
२ चमचे तूप+ मका पीठ फेसून घ्या.पेस्ट तयार होईल.
मैदा चाळून घ्या,त्यात १ चमचा मीठ घाला,७५ग्राम तूप गरम करून घाला, लिंबाचा रस व कोमट पाणी घालून सैलसर भिजवा.या मैद्याचे ६ गोळे करा.एका गोळ्याची पोळी लाटा,त्यावर फेसलेली पेस्ट लावा व गुंडाळी करा.त्याचे ७,८ बारीक काप करा,(बाखरवडी सारखे) ते ट्विस्ट करा,व त्यातील ४,५ गोळे एकावर एक ठेवून लांबट पोळी लाटा,मध्ये कापा,कापलेल्या बाजूचा भाग अजून थोडा लाटा,त्याच्या दोन्ही अंत्यबिंदूना वर उचला,त्रिकोणी आकार देऊन बोटांच्या पोकळीत धरा,भाजी भरुन तोंड बंद करा, असे सर्व समोसे करा,कोरडे पडू नयेत म्हणून ओलसर फडके वरून घाला.(करंज्याना घालतो,तसे.)
मध्यम आचेवर तळा.
चिंच गुळाच्या चटणीबरोबर दाताखाली एक हिरवी मिरची घेत खा..

प्रतिक्रिया

मीनल's picture

27 Oct 2008 - 5:22 pm | मीनल

मस्त दिसताहेत.
जर्मन लोकांना कार्टोफिन (बटाटे) खूप आवडतात.
त्यांना आपला पांढरा ठोकळा, दूध न घालता चहा ही आवडतो.
मी जर्मीनीत होते तेव्हा मी हेच करत होते.

तूझे सामोसे मात्र खासच.
मीनल.

त्यावर पोर्सेलीनची डीश.गुलाबी रुमाल ,स्वस्तीकासारखे विराजमान समोसे.
नेहेमीप्रमाणे सुंदर प्रेसेंटेशन.
मसाला भाजून न घेता कच्चेच भरड वाटाकोरडे पडू नयेत म्हणून ओलसर फडके वरून घाला.(करंज्याना घालतो,तसे.)

चिंच गुळाच्या चटणीबरोबर दाताखाली एक हिरवी मिरची घेत खा..

या अशा अनेक सुचना पाककृतीचा आनंद वाढवतात.

प्राजु's picture

27 Oct 2008 - 7:41 pm | प्राजु

आधी खाल्लेल्या प्रत्येक समोस्याची आठ्वण झाली...
ही पाकृ आता लवकरच प्राजुघरी होणार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

27 Oct 2008 - 8:19 pm | रेवती

त्रास डोळ्यांना.;) करूनच बघते विकांताला.
अवांतरः उत्तरप्रदेशी भाजी करून त्याचा फोटू काढलाय. पाठवायला हवा स्वातीताईला. :)

रेवती

मनीषा's picture

28 Oct 2008 - 1:32 pm | मनीषा

फोटो आणि पाककृती ....
स्वातीताई तुमच्या पाककृती एक से एक असतात .. मी त्या घरी केल्यास चांगल्या होतात याचे श्रेय तुमच्या अचूक मार्गदर्शनाला .

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 1:35 pm | विसोबा खेचर

स्वातीवैनी,

तुझे सामोसे साले आपला दिल चिरून गेले! फारच सुरेख दिसताहेत. शिवाय अगदी प्रोफेशनल वाटावेत इतपत सफाई ते करण्यात दिसते आहे! जियो...!

आपला,
(समोसा-कचोरी प्रेमी) तात्या दुबे.

ऋषिकेश's picture

28 Oct 2008 - 1:42 pm | ऋषिकेश

लै भारी! तोंडला पाणी सुटले
-(खादाड) ऋषिकेश

सुनील's picture

28 Oct 2008 - 3:24 pm | सुनील

समोश्याची पाकृ छान.

समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो. (आम्ही नकाशे बनवितो!).

समोस्यातील मसाल्यात थोडी बडी शेपही चव वाढवून जाईल असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

28 Oct 2008 - 3:53 pm | छोटा डॉन

समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो. (आम्ही नकाशे बनवितो!).

=)) =))
असेच म्हणतो, लाटायचे सोडा आम्ही जर भाजायला गेलो तरी तव्यावर टाकताना पोळीची घडी पडते व ती सोडवता सोडवता आमची वाट लागते ...
आम्हाला सुद्धा आदर आहेच ...

बाकी पाककॄती व त्यापेक्षा फोटो झक्कास ...
आज रात्री "मदन" कडुन सामोसे पार्सल न्हावेच लागतील ...
बाकी स्वातीताई नक्की बोलवेलच सामोसे खायला ... :)

(हावरट) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नंदन's picture

29 Oct 2008 - 1:20 pm | नंदन

सुनीलरावांशी सहमत :). फोटोपण मस्त आलेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

28 Oct 2008 - 3:42 pm | सहज

>>समोस्याला व्यवस्थित आकार देणारे आणि प्रत्येक पोळी वर्तुळाकार करणार्‍यांबद्दल आम्हाला अतिशय आदर वाटतो.

सुनीलरावांशी सहमत.

फोटो कातील आहेत.

चतुरंग's picture

28 Oct 2008 - 4:06 pm | चतुरंग

तोंडात बरीचशी जमा झालेली लाळ गिळून गप्पच रहातो झालं!
कारभारणीला येत्या वीकांताला करायला सांगतो आणि कळवतो.
बाकी सामोसे एकदम तब्बेतीत दिसताहेत, एकदम गुटगुटीत, खरेखुरे पंजाबी! :)

चतुरंग

यशोधरा's picture

29 Oct 2008 - 2:44 pm | यशोधरा

पाहताच सामोश्यांचा घाणा, कलिजा खल्लास झाला!! ;)

स्वातीताई, किती अन्येव करतेस गं असली चित्रं टाकून!! :)

शाल्मली's picture

29 Oct 2008 - 6:05 pm | शाल्मली

सही दिसताहेत सामोसे..
फोटूही मस्तच.. मजा आहे ख्रिस आणि सुझानची आणि डॉन्याची आणि केसुंची पण..
कधीही मनात आलं की स्वाती ताईकडे हजर :)
तुझं 'स्वाती ताई' हे नाव बदलून 'सुगरण ताई' ठेवावं अस वाटतय ;)

--शाल्मली.

लिखाळ's picture

29 Oct 2008 - 6:20 pm | लिखाळ

सामोसे मस्तच.. आता करुन पाहावे घरी..
डॉन्याची मजा आहे :) खाताना आठवण ठेव रे म्युन्स्टरकरांची !

>तुझं 'स्वाती ताई' हे नाव बदलून 'सुगरण ताई' ठेवावं अस वाटतय <
एकदम सहमत !

--लिखाळ.

छोटा डॉन's picture

29 Oct 2008 - 6:25 pm | छोटा डॉन

>> सामोसे मस्तच.. आता करुन पाहावे घरी..
+१, सहमत आहे ...
सामोसे मस्तच .. आता खावे जाऊन स्वातीताईच्या घरी म्युनस्टरकरांची आठवण काढत ... ;)

बाकी नाव बदलायची आयडीया बेश्टच !!!
बाकी त्या समरांभाची पार्टी होईल ना ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2008 - 2:38 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो, धन्यवाद!
डॉन्या, केसु परत आले जर्मनीत की करु हं आपण सामोसा पार्टी,:)
रामदासजी, टेबलक्लॉथ बद्दल आमच्या फार नाजुक भावना आहेत, आमची ७८ वर्षाची जर्मन आजी -तिने आम्ही जेव्हा नवीन घरी शिफ्ट झालो तेव्हा स्वत: भरतकाम करून हा टेबलक्लॉथ दिला, त्यामुळे तो फक्त सणावाराला,विशेष प्रसंगीच वापरतो.
रेवती, फोटूची वाट पाहत आहे.
प्राजु,चतुरंग.. समोसे केले की सांगा हं कसे झाले ते.
शाल्मली,लिखाळ केव्हा येता फ्राफुला, सामोसे खायला?
सुनील, बडिशेप चव नक्की वाढवेल,पुढच्या वेळी ट्राय करते.मी कचोरीत बडिशेप घालते ,आता सामोश्यात घालून पाहते.
मीनल,मनीषा,ऋषिकेश,नंदन,यशो,सहजराव आणि तात्याभावोजी,:)
सर्वांना धन्यवाद,
स्वाती