मिपा संपादकीय - उद्याचे आकाश.

संपादक's picture
संपादक in विशेष
27 Oct 2008 - 5:51 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

उद्याचे आकाश.

आपसातील नातेसंबधांनी त्रस्त झालेले पालक आणि मी यांची बैठक बर्‍याच वेळा एकाच कारणासाठी होत असते. ती किंवा तो हाताबाहेर चालला आहे.अशा वेळी मी पालकांना विचारतो तुम्ही किती स्वत:च्या हातात आहात ?
पालक झालात म्हणजे सर्वज्ञ झालात असंही नाही.किंवा पालक झालात म्हणजे सर्वस्व झालात असेही नाही.
मुलाकडून शिस्तीची अपेक्षा आहे.
म्हणजे काय लहान मुलानी प्रौढासारखं वागावं काय?
तुमचं मन प्रौढ झालं असेल पण प्रगल्भ झालं असं नाही.
म्हणून न चुकता पहीला प्रश्न मी पालकांना विचारतो ?
तुम्ही स्वतःचं तुमच्या स्व शी नातं किती चांगलं आहे?
जैवीक वय वाढलेलं एक लहान मूल अजूनही तुम्ही असाल तर माफ करा तुमचं मूल तर मूलच आहे.
जर तुमचं तुमच्याशी जमत नसेल तर तुमच्या सहचराशी कितपत जमेल हे नातं?
या जैवीक मिलनातून जन्माला आलेल्या अपत्याबरोबर हे सहजीवनाचं नातं कसं जमणार आहे याचा विचार तुम्ही केला आहे का?
तुमच्या अपूर्ण स्व ला पूर्ण करण्यासाठीचा अट्टाहास आणि त्यातून निर्माण झालेला ताण तणाव ही तुमची खरी समस्या आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
पालक बुचकळ्यात पडतात.
कारण सोपं आहे. लहानपणापासून त्यांचा लॉजीकशी सबंध येऊ दिला जात नाही किंवा फक्त मान्यताप्राप्त सोल्युशनशी जमवून घेणं किंबहुना हे असच असतं या बरोबर राहण्याची तुमच्या मनाची घडी घालून दिली जाते.आता तुम्ही सुद्धा परंपरेनी मुलाला हेच देणार असालं तर संघर्ष अटळ आहे.

विचारा स्वत;ला काही प्रश्नः

१ तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या कौटुंबीक कायदा आणि सुव्यस्था धोरणात उमलू देण्याची संधी दिली होती का?

२ लहानपणापासून किती हास्यास्पद नियमांचा आणि कायद्याचा राग आला होता आणि मन किती रडलं होतं ते आता आठवतं का?

३ खासकरून मुलींनी "मुलीच्या जातीला इतका तोरा चांगला नाही" असं किती वेळा ऐकलं होतं किंवा मुलांनी "फार शेफारला आहे आजकाल "हे किती वेळा ऐकलं होतं?

४ आज्ञाधारक मूल म्हणजेच आदर्श मूल हे किती वेळा बिंबवलं गेलं होतं?

५ कायम देवत्वाचा आव आणणारे असे तुमचे पालक होते का?

(म्हणजे घटकेत नरसिंह तर घटकेत श्रीकृष्ण तर मध्येच टेन कमांडमेंट वाला मोझेस बाबा अशी विविधरुपी दर्शन देणारे पालक)

त्यावेळी तुम्हाला खरं म्हणजे साधेसुधे आई बाबा हवे होते .

६ घरात झांथस किंवा झांटीपी यांच्या कातरीत तुम्ही सापडला होतात का ?

हे दोघं भांडायचे आणि उपाशी रहायचा इसाप.

हे असंच थोड्याफार फरकानी घराघरात होतं आणि प्रत्येकाच्या वाट्याला येतं.

तो विशुद्ध आणि सात्त्वीक जीव या गदारोळात जे शिकला तेच आता पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो आहे.यात गंमत अशी आहे की हे सगळे नकळ्त मनात घर करून बसलं होतं आणि ते आता सत्ता गाजवतं आहे.याची कल्पना कुणालाही नसते.

हे सगळं जन्माला आल्यावर झालेले बदल आहेत आणि त्यानंतरच्या अनुभवसिद्ध बैठकीवर अवलंबून आहेत असं नाही.गर्भावस्थेतल्या सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा हे आपोआप कळत असतं हे शास्त्रज्ञानी आता कबूल केलं आहे.

From sixth month on, the foetus lives an active emotional life. The current data on the Life of fetus:

1. The foetus an hear, experience, taste and on a primitive level,even earn and feel in utero.

2, What the fetal child feels and perceives begins shaping his attitudes and expectations about himself. These atitudes result from the messages he receives from his mother.

3.What matters is the mothers attitude. Chronic anxiety or wrenching ambivalence about motherhood can leave a deep scar on an unborn childs personality. as also joy, elation and anticipation can contribute significantly to emotionalevelopment of healty child..

the fathers feelings are also significant. HoW a man feels about his wife and unborn child is one of the most important factor in determining the success of pregnancy.

मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलाबरोबर आजचंमूल होऊन यशस्वी पालक होणं.

मुलांना आपल्या अंगातल्या दैवी अवतारापासून (अभ्यास नाही केला तर हिरण्य कश्यपू) वाचवणं.

त्यांच्या मनाला होणार्‍या इजांपासून त्यांना जपणं आणि बाहेरच्या जगातल्या हिंसाचारापासून (शारीरीक वा मानसीक) स्वतःचा बचाव करायला शिकवणं.

रोज नव्या लढ्याला सामोरे जाणारे,स्वतःला निराशेच्या गर्तेपासून कसोशीनी दूर ठेवणारे किंवा त्याला बळी पडणारे पालक हे शिवधनुष्य उचलू शकतील का?

आतापर्यंतचं हे निरुपण कदाचीत अविश्वसनीय किंवा अमान्य आणि तर्कविसंगत समजण्याचे सगळ्यांना पूर्ण अधीकार आहेत. पण आहे त्या परीस्थीतीबद्दल दुमत असण्यची शक्यता त्या मानानी कमी आहे. फारच क्वचीत एखादा जागरुक पालक हे नाकारू शकेल पण ते सगळं व्यक्तीसापेक्ष असेल.चला आपण घटकाभर समजू या की पूर्वायुष्याचा आणि आताच्या पालकत्वाचा काहीच संबंध नाही.आणि विचार करू या पालकत्वाच जसे आहे जेथे आहे या धर्तीवर .

उद्याचा सक्षम माणूस तयार करण्याची जबाबदारी पालकांवर आहे.पाल्याच्या शारीरीक आणि मानसीक विकासाची जबाबदारी पण पालकाची आहे.

ही दोन गृहीतके येथे सगळांना मान्य आहेत असे धरून पुढे चलू या.

आव्हानांची यादी अनलिमेटेड आहे. थोडी यादी बनवू या.

१ धावपळीच्या आणि अस्थीरतेच्या आयुष्यात मुलांना देण्याचा वेळ आणि बाहेरच्या आकर्षणापासून वाचवण्याकरता पालकांच्या प्रेमाचा चुंबक ताकदीचा असावा.

२ एका पालकाचा जबाबदारी घेण्याचा नकार.किंवा फक्त विशिष्ट जबाबदारी घेण्याचाच हट्ट.

उदा: मी प्रोव्हायडर आहे तेव्हढे मी करीन बाकीचे तू बघ.

अशी भूमीका आता चालणार नाही.आई तर हवीच आहे पण बाबा पण हवे आहेत.

थोडक्यात आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसीपेशन चा हा मनोव्यापार आहे.

३ पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवन शैलीमधला फरक.वारंवार हा फरक जाणवून देण्याचा हट्ट

उदा: आमच्या वेळेस ....आम्ही लहान असताना...वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने.व्यावसायीक समुपदेशक सुद्धा याला अपवाद नाहीत.जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवू या.तुमच्या मुंजीतली लंगोटी आता तुमच्या मुलाच्या कामाला येणार नाही.हा फरक समजून मनाला आवश्यक तेव्हढे लवचीक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सुफल होईल.

४ बाहेरच्या निर्दय आणि रुक्ष व्यवहाराला आता पाल्याला फार कोवळ्या वयात सामोरे जावे लागते.तुमच्या पाल्याचा दिनक्रम पाहीला तरच हे लक्षात येईल की तुम्हाआम्हाला ऑफीस किंवा इतरत्र ज्या ताण तणावाला सामोरे जावे लागते त्याच ताणतणावाला ही मुलं कोवळ्या वयात सामोरी जातात.त्यांचा सामोरे जाण्याचा रीफ्लेक्स वेगळा असेल त्यामुळे त्याला तुमच्या पारड्यात तोलू नका.
मला म्हणायचे आहे ते एव्हढेच की पालक पोटेंशीअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटीक एनर्जीचे बाण होतात.
आयुष्याचे युद्ध जिंकायला एव्हढी तयारी पुरेशी आहे.

पाहुणा संपादक : विनायक प्रभू.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

27 Oct 2008 - 7:44 am | चतुरंग

एका सनातन विषयाला वाहिलेले संपादकीय!
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, माझ्या वेळेला कसं होतं हे सांगण्यात आत्ताच्या घडीला मूल डोळे आणि कान बंद करुन कानावर पडणारे सगळे वाहून जाऊ देते आहे ह्याकडे लक्ष जात नाही.

आपण कंठशोष करत रहातो. मुलावर हक्क गाजवायला बघतो आणि बंडाची पहिली ठिणगी पडते. मुला-मुलींना लवकरच मित्र मैत्रीण बनवा. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सहनशीलता दाखवलीत तर ७५ टक्के वादाला तोंडच फुटणार नाही हा स्वानुभव (बर्‍याच वादावादीनंतर लक्षात आलेला! ;) )
मुलांना महागडी खेळणी किंवा चैनीच्या वस्तू नको असतात त्यांना हवे असतात ते त्यांच्या अखंड शंकांचे समाधान करणारे, प्रेम करणारे, खेळणारे आई-बाप!

माझे मोठेपण वगैरे सांगायचे म्हणून नाही पण माझ्या मुलाच्या बाबतीतले उदाहरण. मुलाची झोपेची सवय पहिल्यापासून उशिराची. रात्री आम्ही दिवे बंद करुन बेडरुममधे गेलो तरी एकटा (अगदी एक वर्षाचा असल्यापासून) बाहेर हॉलमधे जाऊन खेळत बसणार! तुम्ही याल तर तुमच्याबरोबर नाहीतर एकटा! आपले मूल असे रात्री-बेरात्री जागे आणि आपण झोपलोय असे होऊ शकत नाही. समजावून झाले, रागावून झाले, असहकार पुकारुन झाला, धमक्या झाल्या. महाशय कशानेही बधले नाहीत! काही दिवसांनी मी चक्क त्याच्याशी रात्री खेळायला सुरुवात केली! पत्नी दिवसभराच्या रगाड्याने अतिशय दमून झोपून जाई आणि बाप्-बेटे रात्री २ अन २.३० वाजता चेंडू आणि ट्रेन्/गाड्या असले खेळत असू. मला झोपायला तीन वाजत आणि ऑफिसला सकाळी ८ ची मिटींग मी अटेंड केलेली आहे! असे वर्षभर केले.

पण बाबा माझ्याबरोबर मनसोक्त खेळला ह्या अतीव समाधानाने मुलगा झोपी जाई. त्याच्या आनंदापुढे केलेले कष्ट काहीच नाहीत असे आता वाटते! त्याचे ते दिवस पुन्हा येणार नाहीत आणि माझेही नाहीत! ती शिदोरी हा त्याचा आणि माझा कायमचा ठेवा आहे अशा नजरेने मी ह्या गोष्टीकडे बघतो तेव्हा त्रास होत नाही!

चतुरंग

मनिष's picture

31 Oct 2008 - 3:30 pm | मनिष

आम्ही अजून पालक झालो नाही, पण हा विषय अगदी जवळचा आहे. त्या दृष्टीने शाळा, त्याचे काम करायची पद्धत हे पण जवळून अभ्यासत आहोत. खूप शिक्षकांना त्याचे भयंकर आश्चर्य वाटते - पण आम्हाला खरच आमची मुले ह्या 'टिपीकल' रॅट रेस मधे, शाळांमधे नाही वाढवायचीत; पर्याय शोधणे सुरू आहे.

non-authoritative parenting हे खरच खूप पालकांना उमजायला जड जाते -- कारण आपल्यापैकी बहुतेक जणांचे पालक तसे नव्हते. आदर= दरारा असाच एक गैरसमज आपल्याकडे रूढ आहे; त्यातून बाहेर पडणे अवघड पण आवश्यक. चतुरंग, सर्वसाक्षी - तुमचे खरच कौतुक वातते; आणि ते आम्हालाही जमो ही आशा. 'पालकनीती' हे एक ह्याच विषयाला वाहिलेले उत्तम मासिक आहे. त्यांचे 'आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम' हे संजिवनी कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले असेच एक वाचनीय पुस्तक!

विप्र -- एका छान विषयाचा उत्तम परिचय करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!

सर्वसाक्षी's picture

27 Oct 2008 - 8:42 am | सर्वसाक्षी

प्रभुसाहेब,

मुलाला हाताळताना आई-वडिलांचा मोठा आधार असतो आणि तो असा की जेव्हा आई-बाप रागावतो तेव्हा आजी-आजोबाते शल्य बरे करतात आणि परिणामतः मुलाला बसलेल्या धक्क्याची तीव्रता कमी होते. आपण एकटे नाही आणि आपण चूकही नाही हा आत्मविश्वास मुलाला मिळतो. बाकी आपण आपल्या अपेक्षा व अपुरी स्वप्ने यांचे ओझे मुलांवर नाहक लादत असतो आणि अपेक्षाभंग झाला की आपण तोल गमवतो.

माझा मुलगा म्हणजे भयंकर प्रकार. मात्र माझ्या आईने मला तो लहान असतानाच सांगितले - "नीट पाहा, जे मला दिसले ते तुलाही दिसेल. याच्या डोक्यावर लिहिले आहे , 'स्फोटक पदार्थ - काळजीपूर्वक हाताळा'. त्याला तु उगाच भरडायला जाउ नकोस."
तिला नक्की काय म्हणायचे होते ते मला समजायला मला बराच वेळ लागला. लक्षात आल्यावर मी स्वत:ला बदलायला सुरुवात केली.

दहावीची परिक्षा. नेहेमीच्या दिनक्रमात काहीही बदल नाही. शाळा नसेल तेव्हा उठाला साडे आठ. दुपारी सवड मिळाली तर बेर्डे -सराफचा एक चित्रपट नक्की. घरचा दूरचित्रवाणी रोजच्या इतकाच कार्यरत, त्यावर बंदी नाही.एकिकडे अभ्यास सुरू. पुढे तो खोका, एकिकडे आमचा वावर, याचा अभ्यास कसा होणार? तो म्हणाला 'तुमचा अभ्यास होत असेल शांततेत, मला आवाज लागतो'. मी गप. निकाल लागला. ९१.३३%. चिरंजीवांना न राहवुन म्हटले, बाळा फक्त ६ गुण अधिक असते तर गुणवत्ता यादीत तुझे नाव असते रे... चिरंजिव शांतपणे म्हणाले "मला इंग्रजीमध्ये फक्त ६९ मिळाले आहेत आणि इतके कमी मला मिळणे शक्य नाही, किमान ७५-७७ असायला हवे. असो. मला गुणवत्ता यादीची कधीच पडली नव्हती. ते चार दिवसाचे कौतुक! माझे गणित पक्के होते - आपण ९० % पार करायचे" का, नव्वदच्या वर का? पोराने शांतपणे सांगितले "९० च्या वर प्रवेश थेट मिळतो, ११ वी च्या प्रवेशासाठी भीक मागाला रांगेत उभे राहावे लागत नाही. ते मिळवले. बास."

त्या नंतर मी फक्त त्याचा मित्र झालो. कधीही उपदेश केला नाही. धीर दिला, सल्ला दिला, कौतुक केले पण उपदेश टाळला. त्याच्यावर विश्वास टाकायचा निर्णय पक्का झाला होता. त्याने आय आय टी चा ध्यास घेतला. दोन वर्षे ढोर मेहेनत केली. परिक्षा झाल्या क्षणी त्याने सांगीतले 'आजचा दिवस माझा नव्हता. मला गुणांकन मिळणार नाही'. पचवणे कठीण होते. दोन वर्षे त्याने ज्या निष्ठेने अभ्यास केला ते पाहता त्याच्याहून वाईट मला वाटले. पण आता मी बाप नव्हतो, मित्र होतो. मी शांतपणे त्याला सांगितले की झाले ते झाले आणि त्यात त्याचा दोष नाही कारण प्रयत्नात कसूर नव्हती. मात्र मित्र म्हणून एक सल्ला जरुर दिला, 'जे गेले ते सोड, जे बाकी आहे त्याचा विचार कर. एखाद्या सामन्यात तेंडुलकरही पहिल्या चेंडुवर बाद होतो. चालायचेच.' त्याने निराश होणे परवडण्यासारखे नव्हते, चौथ्या दिवशी एन टी यु सिंगापूर ची प्रवेश परिक्षा होती.

आम्ही परिक्षा द्यायला बंगलोरला गेलो. एक पथ्य मी पाळले. सगळ्या विषयांच्या परिक्षा संपेपर्यंत एकदाही 'पेपर कसा गेला' असे विचारले नाही. त्याची माझ्या सहकार्‍यांची ओळख करुन दिली, मेजवान्या झाल्या. विश्वेश्वरय्या संग्रहालय बघुन झाले. परतताना चिरंजीव खुशीत होते. स्वतः होउन निघता निघता म्हणाला परिक्षा बरी गेली. गणितात ९५ च्या वर जाणार नाही. मात्र स्वच्छतेचे गुण कापले नाहीत तर भौतिकशास्त्रात एकही गुण जाणार नाही. आणि उरले इंग्रजी. सिंगापुरी चिन्यांनी परिक्षा घ्यावी इतके माझे इंग्रजी वाईट नाही. आणि पुढची प्रत्येक परिक्षा त्याने अशीच दिली. आय आय टी गेली. पण एन आय टी, बिट्स, युडीसीटी,एनटीयु सर्वत्र दरवाजे खुले झाले. माझी मैत्री त्याला भावली.

विनायक प्रभू's picture

27 Oct 2008 - 10:19 am | विनायक प्रभू

चतुरंग,सर्वसाक्षी आपणा दोघाना भेटायचा योग कधी येइल ते माहित नाही. जेव्हा येइल तो माझ्यासाठी सुदिन. आपण दोघे ३% पालकामध्ये बसता ज्याना खर्या अर्थाने पालकत्व म्हणजे काय ते कळालेले आहे.
अवांतरः माझ्याकडे आर्.डी.एक्स ची फॅक्टरी आहे. त्यामुळे मला काळजी पूर्वक राहावे लागते. पण धमाल असते.

टारझन's picture

27 Oct 2008 - 1:15 pm | टारझन

प्रभु साहेब !!! आम्ही पालकांच्या फार लक्की आहोत . प्रत्येक वयानुसार योग्य तिथे दाप आणि योग्य तिथे समजावून सांगणे , गरज पडली तिथे मौन धारण करून आमची चुक लक्षात आणून देणे , की जेणे करून "आपल्या पालकांनी सुद्धा काय वेगळे दिवे लावले असतिल का ? " असला विचार डोक्यात कधीच आला नाही. आठवते का आमच्या घरा समोरिल रुपाली ? आई-वडिलांच्या संस्कारामुळे आपसूकच एक दबदबा निर्माण झाला होता. आम्ही जेंव्हा गच्चीत उभे असू, तेंव्हा रुपालीला बाहेर येऊन केस विंचरण्याचा शहाणपणा सुचे.आणि आमची पावले ऑटोमॅटिक घरात वळत.(हे काही लै सभ्यपणाचा आव आणण्यासारखे नाही, पण एका जणाचा आधी झालेला पराक्रम,कॉलनीत कोणत्या गोष्टींना सामोरे जाउ लागावे शकते याची कल्पना आलेली. कारण सामाजिक दृष्ट्या चुकी कायम मुलाची असते, त्यांच्याच चपलीखाली केळाचं साल येतं .. असो) सांगायचा मुद्दा असा, बालपणी थोडा मार, थोडी डोळ्यांतली जरब , पौगंडावस्थेत तर पालकांचा कस लागतोच लागतो, कारण इथे सगळीच मुले बंडखोर मनोवृत्तीत असावीत. काहीही सांगितले की "का?" असा प्रश्न सहाजिक पणे विचारला जातो. आपल्याइथे मात्र अशा प्रश्नांचं उत्तर दिलं जात नाही...चार धपाटे घालून, प्रसंगी त्याहून वाईट, पोराचं पार थोबाड लाल करून दिलं जातं .. आणि त्याचा "का?" अनुत्तरीत राहून १० प्रश्न पैदा करतो.
आपल्याला काही अनुभव नाही पालकत्वाचा, पण आपण पौगंडावस्थेत कसे वागलो काय दिवे लावले आणि पालकांनी कसं हाताळलं आपल्याला हे आठवलं की वाटतं .. च्यायला ही तर तारेवरची कसरत.

प्रभुंच्या लेखात शब्दशः तथ्यता आहे आणि त्यांनी कुठे ही क्रिप्टिक लिहीलं नाही. तरी शंका असल्यास त्यांना व्यनी करून विचाराव्यात. ते पुर्ण प्लेन टेक्स्ट मधे तुम्हाला सविस्तर उत्तर देतिल असा विश्वास आहे. आज पर्यंत लिहील्या गेलेल्या सर्व संपादकियांमधे हा लेख सर्वांत जवळचा वाटला, कारण हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. अलमोस्ट प्रत्येक जण पालकावस्थेत जाणार आहे. प्रभूंच्या या लेखाचा फायदा होइल असे वाटते . अर्थात "कळते पण वळत नाही" असे लोक्स सोडून .. बाकी "खांब सोडणे" जरूरी आहे.

उदा: आमच्या वेळेस ....आम्ही लहान असताना...वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने.व्यावसायीक समुपदेशक सुद्धा याला अपवाद नाहीत.जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवू या.तुमच्या मुंजीतली लंगोटी आता तुमच्या मुलाच्या कामाला येणार नाही.हा फरक समजून मनाला आवश्यक तेव्हढे लवचीक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सुफल होईल.

हा सगळ्यात खवाट प्रकार आहे .. वय वर्षे १४-१८ मधे जर असा प्रकार पालकाकडून झाला तर पाल्य निसटला जाण्याची दाट शक्यता असते.

|| जय हो प्रभूदेवा ||

(स्वगतः च्यायला लाष्ट टायमाला तात्यान् हे सदर बंद करायची घोषणा केली तेंव्हा आमच्या मनात प्रभू राहिला हो... असा विचार आलाच होता)

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

संजय अभ्यंकर's picture

27 Oct 2008 - 1:25 pm | संजय अभ्यंकर

अत्यंत गंभीर विषय, इतक्या सोप्या पद्धतीने समजावलात.
वाचणार्‍या प्रत्येक पालकाने संग्रही ठेवावा असा.

सर्वसाक्षीजी व चतुरंगजीं सारखे पालक बनणे हे मोठे आव्हान आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सहज's picture

27 Oct 2008 - 1:26 pm | सहज

महत्वाच्या विषयावरील एक चांगला मार्गदर्शक लेख.

वेगवेगळ्या वयात व परिस्थीतीत वेगवेगळे मार्ग वापरुन पाल्यसंगोपन करावे लागते. इथे वन शू फीट्स ऑल जमणे नाही. कस्टमाईज्ड सोल्युशन्स. तरी ओव्हरऑल वर सांगीतलेली मार्गदर्शक तत्वे एकदम उपयुक्त आहेत.

ऋषिकेश's picture

27 Oct 2008 - 2:06 pm | ऋषिकेश

अतिशय महत्त्वाच्या विषयावरील एक चांगला अग्रलेख! आवडला.

अजून मला वेळ आहे... पण वेळ आल्यावर कुठे शोधु ;) वाचनखूण घालून ठेविन म्हणतो :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

गेल्या चार पाच महीन्यात मास्तर जे काही लिहीत होते त्याचा सोपीकरण केलेला हा अविष्कार मला आवडला.
तुमच्या मुंजीतली लंगोटी आता तुमच्या मुलाच्या कामाला येणार नाही.
हे उदाहरण फार आवडलं.
पालक पोटेंशीअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटीक एनर्जीचे बाण होतात.
मा. चतुरंग याच्या एका खलील जीब्रानच्या लेखाची आठवण झाली.

आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसीपेशन चा हा मनोव्यापार आहे.
हे कळतं आहे पण वळायला कबूल नाही.
या अग्रलेखाचा उपयोग युजर्स मॅन्युअल ची प्रस्तावना असे म्हणता येईल.
मास्तर ,आईला कडेवर घेणारी बाहुली आवडली.असे सचित्र लेख जरा बरे वाटतात.
अवांतर : आपले इतर लेख सचित्र का नाहीत बरं?

विनायक प्रभू's picture

27 Oct 2008 - 7:36 pm | विनायक प्रभू

माझ्या सर्व लेखांना चित्र टाकली तर लवाटे मास्तर मारतील की.
आणि ह्यावेळेला नाय मिळाला पुढ्च्या वेळेला मिळेल की.(कट्ट्यावरचा घोट)

प्राजु's picture

27 Oct 2008 - 7:56 pm | प्राजु

पालक पोटेंशीअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटीक एनर्जीचे बाण होतात.
या एका वाक्यात संपूर्ण लेखाचा सारांश आहे..

सध्या आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत त्यासाठी आम्हाला नक्की उपयोगी पडेल हा लेख. धन्यवाद प्रभूसर...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

27 Oct 2008 - 10:07 pm | लिखाळ

विप्र,
फार छान लेख. मुलं आणि पालक यांतील संबंध असे असावेत हे आपण खरेच चांगल्या तर्‍हेने सुचवले आहे. अनेक घरांत विषय निघताच आयांच्या डोळ्यांना पाणी आणणारा आणि वडिलांना गंभीर करणारा संवेदनाशील विषय ! आपण लेखात नुसते मुलांशी कसे बोलावे इतकेच सुचवले नसून गर्भसंस्कारा पर्यंत विषय नेला आहेत. लेख खरेच वाचनीय आहे.

मुलं मुख्यतः आई-वडिल यांचे परस्परसंबंध, त्यांचे वागणे बोलणे, आजी-आजोबा यांच्याबद्दलची त्यांची मते आणि आचार, पाहुणे-मित्र यांबरोबरचे वागणे हे सर्व पाहून अनुकरण करत असतात आणि त्याच बरोबर आई-बापाची किंमत करत असतात. याची आई-बापाने जाण ठेवली तर त्यांच्यावरची जबाबदारी खरेच वाढेल पण मुलांचे त्यांच्याशी वागण्याचा घाट सुद्धा याचमुळे बदलेल/बदलत असतो असे वाटते.

उपदेश न करता नुसत्या वागण्याने पालक मुलांत आपल्या विषयी विश्वास निर्माण करु शकतात. पालकांची एक कृती त्यांनी गायलेल्या एका गीतेपेक्षा सरस आणि मुलाच्या जास्त काळ स्मरणात राहणारी असते. अथवा त्याचे व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारी असते. जसे वडिलांनी आजीची सेवा करणे इत्यादी.
--लिखाळ.

नारायणी's picture

27 Oct 2008 - 10:41 pm | नारायणी

"मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलाबरोबर आजचं मूल होऊन यशस्वी पालक होणं." -- हे वाक्य फार आवडलं.

पूर्ण लेखचं मस्त जमला आहे. कुठेही काहीही क्रिप्टीक वाटलं नाही. :)
एका जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्द्ल ईतका सुंदर लेख आम्हाला वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.

बेसनलाडू's picture

27 Oct 2008 - 10:44 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

केशवसुमार's picture

29 Oct 2008 - 6:26 pm | केशवसुमार

प्रभूशेठ,
छान लेख..विचार करायला लावणारा..
(सहमत)केशवसुमार

विनायक प्रभू's picture

28 Oct 2008 - 8:30 pm | विनायक प्रभू

वेळेअभावी ज्या मिपा सदस्याकडे पोचु शकलो नाही त्या सर्वांना दिपावली शुभचिंतन

विजुभाऊ's picture

29 Oct 2008 - 11:33 am | विजुभाऊ

आजचा पालक हा जुन्या आणि नव्या पिढीतल्या वैचारीक संघर्षात दोन्ही बाजूने बडवल्या जाणार्‍या ढोल्क्यासारखा झाला आहे. त्याला मुलांचे ही पटते आणि त्याच वेळेस जुन्या वळणाच्या आई वडीलांचे संस्कारही टाकवत नाहीत.
नवे काही नीट जाणून घ्यायचे असेल तर रजनीषांच्या बोलायचे झाले तर भाषेत अनलर्निंग फार गरजेचे आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विनायक प्रभू's picture

29 Oct 2008 - 5:38 pm | विनायक प्रभू

एकीकडे सनातन द्दुसरीकडे टारझन मध्ये तुम्ही असे म्हणयाचे आहे का?

रेवती's picture

29 Oct 2008 - 7:59 pm | रेवती

मला तरी असंच वाटतयं. घाम फुटतो प्रश्नांची उत्तरं देताना.
पुर्वी आम्हीही प्रश्नं विचारून भंडावून सोडत असू आईबाबांना.
आता माझा मुलगा विचारतो कि त्याच्या काही मित्रांना दोन दोन आया (आईचे अनेकवचन), दोन बाप आहेत. बरेच हाफ बहिण, भाऊ आहेत.
मला हाफ बहिण, भाऊ कधी येणार? (यावर"गप्प बैस रे गधड्या" असं म्हणावसं वाटतं, पण नाही म्हणता येत)
पण काल लक्ष्मीपूजनानंतर त्यानं आपणहोवून देवाला साष्टांगनमस्कार व नंतर आम्हा दोघांना नमस्कार केल्यावर मला जरा धीर आला.;)

आपला लेख आवडला. धन्यवाद!

रेवती

नारायणी's picture

29 Oct 2008 - 8:08 pm | नारायणी

माझी आई,सासु,त्यांच्या मैत्रिणी सगळ्याचं म्हणनं असं आहे की, आपण लहान असताना असे नव्हतो,आजकालची मुलं सांभाळणं जास्त अवघड आहे. त्यामुळेचं "एकचं मुल पुरे" अशी भावना वाढीस लागली आहे.

मुक्तसुनीत's picture

1 Nov 2008 - 9:41 am | मुक्तसुनीत

अतिशय जिव्हाळ्याचा विषय. संपादकीय प्रकाशित झाले तेव्हाच वाचले होते. पण लिहायला वेळ झाला नव्हता.

श्री. प्रभूंनी जे प्रश्न मांडले आहेत त्यांची उत्तरे सत्याला ग्वाही मानून दिली तर त्यांचे स्वरूप कैफियत, कन्फेशन, शिकवा-गिला या स्वरूपाचेच येईल हे नि:संशय.

आतापर्यंतच्या तुटपुंज्या अनुभवावरून मला माझ्यापुरती एक गोष्ट अगदी नक्की पटली आहे : तुमच्या आयुष्यात तुमच्या पालकांइतकी ठळक मोहर कुणाचीच नसते. आणि आपल्या मुलांइतके महत्त्वाचे तुमच्याकरता काहीच उरत नाही. थोडक्यात प्रजनन-संगोपनाचा हा जो धागा आहे ज्याने आपण मागील आणि पुढील पिढ्यांशी बांधले गेलोत, त्या धाग्यात आपले सर्वस्व ओवले गेले आहे , अगदी नि:संशय. आता यात कुणाला क्षुद्रपणा दिसेल. सहजीवनातील प्रवासी (अर्थात, पती/पत्नी/सिग्निफिकंट अदर) , तुमचे व्यावसायिक जीवन , मित्र (किंवा मैत्रिणी) , गुरुजन, आप्तस्वकीय आणि समष्टी यांच्याशी असणारे नाते शून्य काय ? असा प्रश्न कुणीही विचारेल. आणि असा प्रश्न अगदी योग्य आहे. हे सारे अर्थातच महत्त्वाचे आहे. (विशेषतः पती/पत्नी/सिग्निफिकंट अदर ला या संदर्भात न मोजणे विशेष मोठा प्रमाद ठरू शकतो. ) तर मला हे सारे अमान्य नाहीच. मला इतकेच म्हणायचे आहे की, माझे करियर , माझे विवाहपूर्व प्रेम आणि विवाहोत्तर सहजीवन , माझ्या मित्रांशी असलेले दृढ असे स्नेहबंध आणि विश्वास , पुस्तके , कलादि क्षेत्रात मला मिळालेले ज्ञानाचे तुटपुंजे कण या कशाहीपेक्षा आयुष्यावर ज्या व्यक्तीचा प्रभाव पडला, आयुष्याची पहिली दोन दशके ज्या व्यक्तीच्या सहवासाने, त्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयांमुळे आकाराला आली ती व्यक्ती म्हणजे माझे दिवंगत वडील होत. (हा प्रभाव नक्की काय होता, कसा होता, सकारात्मक होता किंवा कसे हा सगळा व्यक्तिगत डीटेल्स चा भाग झाला; ज्यात कुणालाही कसलाही इंटरेस्ट असणार नाही). आणि आज आयुष्याच्या मध्यबिंदूवर उभा असताना एक गोष्ट स्पष्ट आहे : मी , माझे व्यक्तिमत्त्व , माझे निर्णय, माझे वर्तन याचा माझ्या मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम असणार. हा परिणाम करणे /न करणे माझ्या हातात नाही. बाप या नात्याने ते ठरूनच गेले आहे. उद्या मी त्यांना सोडून गेलो किंवा काळाने मला त्यांच्यापासून दूर नेले तरी माझ्या नसण्याचा घटक त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घटक ठरेल. याला इलाज नाही.

मला वाटते, ही फार मोठी बाब आहे; मोठी जबाबदारी आहे. जन्मलेल्या जवळजवळ प्रत्येकाला ती असतेच , पण म्हणून ती छोटी होत नाही. मुले तुम्हाला रोज ऑब्झर्व करतात - त्यांच्याही नकळत. आणि होय, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचे तुमच्या बाबतीत जजमेंट बनत जाते. ती तुम्हाला दिवसादिवसाने जोखत जातात. त्यांचे जजमेंट योग्य/अयोग्य या प्रश्नावर चर्चा होऊ शकते. पण येस , यू आर बीईंग जज्ड बाय देम. जोवर त्यांना इतर पर्याय माहीत नाहीत, तुलना आणि नीरीक्षणाकरता इतर काही उपलब्ध नाही तोवर तर तुम्ही देवासमानच असता : ओम्निशियंट, ओम्निपोटंट. लवकरच हा शेंदूर खरवडून निघायला लागतो. ज्यावेळी शेंदूर निघून जाईल त्यावेळी खालच्या दगडात त्याना थोडे क्यार्‍याक्टर (चारित्र्य या अर्थाने नव्हे !) , थोडा विश्वास , थोडी मैत्री मिळणे महत्त्वाचे आहे. केवळ ठेच किंवा कपाळमोक्ष त्यांना मिळाला तर .... इट्स अ हार्ट-ब्रेकिंग मोमेन्ट. या सार्‍या गोष्टी म्हणजे काय ते श्री. प्रभूंचे लिखाण वेगवेगळ्या (क्रीप्टिक/शिंपल अँड स्ट्रेट-फॉर्वर्ड या दोन्ही तर्‍हांनी )सांगतेच !

विनायक प्रभू's picture

1 Nov 2008 - 9:46 am | विनायक प्रभू

लाखातले बोललात मुक्त सुनितजी.
अवांतरः तुम्ही एकटे का दुकटे का तिकटे.

चन्द्रशेखर गोखले's picture

1 Nov 2008 - 2:05 pm | चन्द्रशेखर गोखले

इतिश्री प्रभुविनयक विरचीते पलकोपनिषद प्रथमोध्याय समाप्त

अथ द्वितियोध्यायः.....! कधी..?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2008 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायकराव आपले संपादकीय वाचले आणि जरासे विचार करायला लागलो की, पालक म्हणुन आपण मुलांकडून जास्तीच्या अपेक्षा करतो. पण स्पर्धाच इतकी जीवघेणी वाढली आहे की, आपला मुलगा-मुलगी स्पर्धेत टिकावा म्हणुन पालकांची धडपड चाललेली असते. पाल्यांचे आणि पालकांचे जमले नाही की, मग समुपदेशनाची गरज भासते असे समुपदेशन दोघांनाही आवश्यक असते असे वाटते. अर्थात अशी अपेक्षा त्यांच्या भल्यासाठी आपण करतो, त्यात वावगे ते काय ? अर्थात त्याचा निरागसपणा दबतो, विचित्र वागतो, अशा प्रश्नांची सुरुवात हळुहळु होतेच असे म्हणावे लागेल. आजकाल लहान मुले-मुली यांना काही ज्ञान बरेच लवकर कळते असेही वाटते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना दमछाक होते. आपले लहाणपण आणि त्याचे लहानपण खूप फरक वाटतो, त्यामुळे आजच्या मुलांबरोबर मुल होणे ही अशक्य गोष्ट वाटते ! असो,

संपादकीय आवडले वेसानल :)

-दिलीप बिरुटे