नविन माहिती... निदान माझ्याकरता तरी... पण खुप महत्वाची आणी आनंदाची बातमी..
प्रत्येकाला हक्क कायद्याने दिला तरी तो मुलांना मिळवून देणे प्रत्येक नागरिकाचे काम झाले आहे. आपल्या भोवताली अनेकदा शाळेत न जाणार्या मुलांना विशेषतः मुलींना आपण भेटतो. त्यांना सक्तीने शाळेत घालणे आता सर्वांना केवळ बंधनकारकच नाही तर त्या मुलांच्या हक्काचे झाले आहे. आपण सर्व नागरिकांनी त्यांना तो हक्क मिळेल याची खातरजमा सुजाणपणे करून घेतली पाहिजे >>
१००% सहमत..
--टुकुल
या कायद्याची अंमलबजावणी सरकार कसे करते यावर सरकारची कर्तबगारी मोजली जाईल. शिक्षकांची उपलब्धता हा एक महत्त्वाचा प्रश्न असेलच त्याचबरोबर शाळांच्या इमारतींचा दर्जा, पुस्तके-वह्यांची उपलब्धता, गणवेशांची अनुपलब्धता आदी अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत.
हा कळीचा मुद्दा आहे..
आठवीच्या परीक्षेला आवाजवी महत्त्व येणे शिक्षणाच्या व्यापार्यांच्या हातातील कोलीत ठरू शकते.
सार्थ भिती!
प्रत्येकाला हक्क कायद्याने दिला तरी तो मुलांना मिळवून देणे प्रत्येक नागरिकाचे काम झाले आहे. आपल्या भोवताली अनेकदा शाळेत न जाणार्या मुलांना विशेषतः मुलींना आपण भेटतो. त्यांना सक्तीने शाळेत घालणे आता सर्वांना केवळ बंधनकारकच नाही तर त्या मुलांच्या हक्काचे झाले आहे. आपण सर्व नागरिकांनी त्यांना तो हक्क मिळेल याची खातरजमा सुजाणपणे करून घेतली पाहिजे
चांगला विचार..!
अभिनंदन ऋषिकेशराव, छोटेखानी परंतु चांगला अग्रलेख...
तात्या.
सामाजिक जाणिवांनी पूर्ण आणि वास्तववादी कवितांचे कवी म्हणून ऋषिकेश मला मिपावर परिचित आहेत.
एक सर्वांगाने उहापोह करणारा त्यांचा संपादकीय लेखसुद्धा तितकाच प्रभावी आणि नेटका आहे! त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
भारताशिवाय इतर देशांनी(देशाच्या राज्यकर्त्यांनी) मूलभूत शिक्षणाचे महत्व फार पूर्वी ओळखले होते. त्याची फळे त्यांना आज उदंड मिळता आहेत. आपण आता मागे राहता कामा नये.!
भारतातल्या "वैविध्यपूर्ण" लोकशाहीत एखादा कायदा होणे आणि तो अमलात आणणे ह्यात बरेचदा खूप अंतर असते (किंबहुना तो नियमच होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!)
त्यामुळे कायदा केल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल हे बघण्याची जबाददारी राजकारण्यांपासून सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकावर आहे. बिना-सरकारी-संस्था, वर्तमानपत्रे, टिव्ही आदी माध्यमातून राज्यकर्त्यांच्या मनात ह्या गोष्टीची जाणिव कायम जिवंत राहिल असे करता येईल!
ह्या येऊ घातलेल्या बदलाची महत्वाची बाजू म्हणजे शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा! संपादकीयात ह्या बाजूबद्दल अजून थोडे विस्ताराने आले असते तर आवडले असते... असो.
जाता जाता: मिपा व्यवस्थापनाचे एक दर्जेदार सदर पुन्हा चालू केल्याबद्दल आभार...
आवडला अग्रलेख.
संपादकीय हे सदर पुन्हा सुरु झालेले पाहून बरे वाटले.
असेच म्हणतो.
***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
कुठल्याही कायद्याची योग्यरितीने अंमलबजावणी करणे खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये आपले सरकार नेहमीच कमी पडते. त्यातून बहुतांशी ग्रामीण भागातील रहीवासी, जंगलवासी, आदीवासी ह्यांच्यामध्ये घरातील मोठ्या / कर्त्या व्यक्तींनाच शिक्षणाचे महत्व नसते, त्यामुळे शिक्षणाबाबत ते मुलांना फारसा आग्रह करत नाही ( अगदी फु़कट असलेतरी ). ह्यासाठी सरकारने सक्तीच्या शिक्षणाला कोणी आडकाठी केली, तर तो गुन्हा ठरवून त्याला योग्य ती शिक्षा / दंड ठरवावा.
दुसरे असे कि, सामाजिक / स्वयंसेवी संस्था (NGOs ) ह्यांचे काम ग्रामीण, जंगल भागात खूप चांगले आहे. काही ठिकाणी सरकारी यंत्रणेला पर्याय म्हणून ह्या संस्था कामे करतात ( उदा. धान्याचे रेशनींग ). सरकारच्या योजना ग्रामीण भागांत पोहोचविण्यासाठी अविरत कष्ट करणार्या व्रती संस्था मी खूप जवळून पाहील्या आहेत, त्यांच्याबरोबर कामही केले आहे. अश्या प्रकारच्या संस्थांना शिक्षणाच्या ह्या कायद्याची अंमलबजावणी होते कि नाही ह्याची देखरेख करण्याचे काम सरकार देऊ शकते.
ह्यावर खूप काही चांगले विचार शिक्षण क्षेत्रातील मातब्बर मंडळी, सामाजिक / स्वयंसेवी संस्था (NGOs ) देऊ शकतील.
"नव्या सुरवातीची सुरवात" हे ऋषिकेशचे म्हणणे संपादकीय सदरासही लागू आहे! ते परत चालू केल्याबद्दल अभिनंदन!
अग्रलेख आणि त्यातील माहीती आवडली. कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे, "प्यार करना आसान है लेकीन निभाना मुश्कील...," असला प्रकार किमान भारतवर्षात आहे असे वाटते. तरी देखील जे कोणी यातील सरकारी सोयीचा फायदा घेतील त्यांना बरेच काही करता येईल असे वाटते.
सर्वप्रथम संपादकीय पुन्हा सुरू केल्याबद्दल तात्यांचे आभार!
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्राथमिक शिक्षणापेक्षा उच्च शिक्षणावर अधिक भर दिला होता, असे वाटते. उदा. आय आय टी, आय आय एम सारख्या संस्थांची उभारणी करण्याबाबत तत्कालीन केंद्र सरकारने पुढाकार घेतला होता. आता ह्या उच्चा शिक्षणाची गरज नव्हती असे नाही; तेदेखिल महत्त्वाचे आहेच पण तरीही सरकारचा प्राधान्यक्रम चुकला होता, असे वाटते.
हा नवीन कायदा कागदावरतरी उत्तम वाटतो पण त्याची अंमलबजावणी कशी होते ते पहावे लागेल.
एका महत्त्वाच्या विषयावर एक चांगले "पुन्हा संपादकीय" लिहिल्याबद्दल ऋषिकेशचे अभिनंदन.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
छोटेखानी अग्रलेख आवडला. नव्वदीच्या दशकात जोमाने राबवल्या गेलेल्या 'साक्षरता अभियाना'च्या फलिताकडे आयटीतल्या डोळे दिपवणार्या प्रगतीच्या झगमगटात थोडे दुर्लक्षच झाले आहे. १९७१ साली बिहारमध्ये फक्त ४% महिला शिकलेल्या होत्या, तर देशभरात १८%. गेल्या चाळीस वर्षांत ही संख्या तिपटीहून अधिक वाढली हा पहिला टप्पा फार महत्त्वाचा. आता या कायद्याची अंमलबजावणी हे पुढचे पाऊल ठरावे.
नवीन कायदा चांगला आणि स्वागतार्ह आहेच, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फार कठीण आहे असे दिसते.
वर ऋषिकेश आणि दत्ता काळे म्हणताहेत की ग्रामीण भागात घरातल्या लोकांनाच शिक्षणाचे महत्व नसते किंवा अजूनही मुलांना कमावण्याचे साधन म्हणून बघीतले जाते. या विचारांशी जरी सहमत असलो तरी त्या-त्या लोकांची मानसिक आणि आर्थीक परिस्थितीच अशी असते की शिक्षणाचा भार हा त्यांना असलेल्या परिस्थितीत पेलावणारा नसतो. आणि समजा त्या-त्या लोकांनी आपापल्या पाल्याला शाळेत पाठवले तरी शिक्षणाचा खर्च ते कुठून करणार हा प्रश्नही आहेच. मला दुरदर्शनवर फार पुर्वी येणारे एक गाणे आठवते... "पढना लिखना सिखो ओ भूख से मरने वालो".... अरे, ज्यांना खायलाच मिळत नाही ते शाळेत तरी कसे जातील? शिक्षणाचा मुलभूत हक्कात समावेश मान्य, पण नुसता हक्क देऊन किंवा प्रत्येक शाळेत जागा आरक्षित करून काय उपयोग? जोपर्यंत आधीच अस्तित्वात असलेल्या मुलभूत गरजांची/हक्कांची (अन्न, वस्त्र, निवारा) व्यवस्थित पुर्तता होत नाही किंवा कोणत्याही एका गरजेची पुर्तता होत नाही तोवर बाकीच्या गरजा/हक्कांवर वाईट परिणाम हा होणारच.
या कायद्यामुळे राखिव निधीतला (जर राखिव असला त्तर) किती निधी राजकारण्यांच्या खिशात जाईल याचा सध्या विचार करतोय.
-अनामिक
राखीव निधीचं राखीव कुरण थोडंफार होईलच. पण या कायद्यामुळे दारिद्र्यरेषेखालची आणखी १०% मुलं जरी शिकली तरीही या कायद्याचा फायदा झाला असं म्हणता येईल. भुकेल्या लोकसंख्येतली १०%+ मुलंतरी भुकेली रहाणार नाहीत अशी आशा बाळगता येईल.
अदिती
समजा त्या-त्या लोकांनी आपापल्या पाल्याला शाळेत पाठवले तरी शिक्षणाचा खर्च ते कुठून करणार हा प्रश्नही आहेच.
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना शिक्षण फुकट आहे. तसेच आश्रमशाळांना १००% अनुदान आहे तिथेही शिक्षण फुकट आहे. आणि त्या शाळांच्या वेळाही मुले / माणसांच्या उपलब्धतेनुसार आहेत.
प्रश्न हा आहे कि, मुळात त्या मुलांचे पालक त्यांना शाळेत धडपणे पाठवंत नाहीत. बर्याचवेळेला घरातील खूप कामे मुलांना करायला लावतात ( उदा. घरातले तान्हे मूल सांभाळणे, चुलीसाठी सरपण आणणे, दळण, दररोजची गोठ्यातली व इतर बारीक-सारीक कामे, इ. ), त्यामुळे मुलामध्ये शाळा बुडवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, आणि काही काळानंतर शिक्षण पूर्ण न करता मूल शाळाच सोडून देते. ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून अंकुश काय ? त्यामुळे मुलाने शिक्षण पूर्ण करावे ह्या करता सरकारने त्यांच्या पालकांनासुध्दा वेठीस धरावे, असे मला वाटते.
अग्रलेख आवडला.
>>प्रत्येकाला हक्क कायद्याने दिला तरी तो मुलांना मिळवून देणे प्रत्येक नागरिकाचे काम झाले आहे.
हाच कळीचा मुद्दा आहे. सुशिक्षित मध्यमवर्ग या बाबत सजग राहील्यास बरेच काही साध्य होऊ शकते.
खेड्यापाड्यात शिक्षण फुकट असले तरी काम करणारे मुल शाळेत पाठवणे आईबापाना परवडत नाही. त्या त्या भागातील शेतीचा हंगाम वगैरे गोष्टी लक्षात घेऊन शाळेच्या सुट्ट्या, शाळेची वेळ ठरवली तर बरेचदा मुले शाळेत जाऊ शकतात. साधे पाणी भरण्यात मुलींचे २-३ तास जातात. तो पर्यंत शाळा सुरू झालेली असते. शाळेत उशीरा गेले की शिक्षा होते मग शाळेची गोडी कुठून वाटणार?
सर्वप्रथम सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार.
ही बातमी घडून दोन दिवस झाले तरी मिपावर यावर चर्चा झालेली दिसेना. तेव्हा यावर लिहायचंच होतं .. पण विषय महत्त्वाचा वाटल्याने (आणि माझं नेहमीचं लिखाणं लोकं किती सिरीयसली घेतील? असं वाटल्याने ;) ) तात्यांना विचारून पाहिलं की या विषयावरचा लेख संपादकीय म्हणून घेता येईल का त्यांनी परवानगी लग्गेच दिली. त्याबद्दल त्यांचे आभार
६ ते १४ वर्षे मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असा नि:संधिग्ध निकाल सर्वोच्च न्यायालयाने मागेच दिला होता. मात्र आता तो भारतीय नागरीकाचा "मुलभूत" अधिकार झाला आहे. लोकशाहीत एखादा अधिकार मुलभूत होणे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. साधा कायदा बदलणे त्यामानाने सोपे असते.. मात्र मूलभूत अधिकारात बदल करणे ही क्लीष्ट व कठीण प्रक्रिया आहे. तसेच ह्या अधिकारांना इतर कायद्यांपेक्षा वरचा मान असतो व प्रसंगी हा हक्क इतर कायदे ओव्हरराईट करतो.
हा अग्रलेख लिहायचा उद्देश केवळ कायद्याची/हक्काची/अधिकाराची ओळख करून देणे हा नव्हता तर सगळ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचाही होता. (आता तो यशस्वी किती झाला हे माहीत नाही). सरकार काही करत नाही म्हणताना वाजपेयी सरकारने आणलेले सर्व शिक्षा अभियान, पुढे मनमोहन सिंग सरकारनी त्याला मुलभूत अधिकारात परिवर्तित करण्यासाठी घेतलेले कष्ट आपण नजरेआड करू शकत नाही. याआधीही हे विधेयक मांडले गेले, त्यावर घनघोर चर्चा झाली. या खेपेला देखील रात्री ११-१२ पर्यंत या विधेयकावर अभिभाषणे झाली-मुद्दे मांडले गेले. तेव्हा माझ्या मते सरकारने त्यांच्या अख्त्यारीतील एक महत्त्वाचे काम केले आहे. आता जबाबदारी आहे ती नागरीकांची. अधिकारची व्यवस्थित अंमलबजावणी करणे हे जितके सरकारचे काम आहे तितकेच किंबहूना अधिकच जनतेचे काम आहे, पर्यायाने आपले सगळ्यांचे काम आहे.
माहितीचा अधिकार जनता वापरू लागल्याने त्याचा फायदा दिसतो आहे. आता आपण हा नवा अधिकार मुलांना मिळवून देऊ शकतो. उदाहरणार्थ, या नव्या अधिकारात शिक्षणसंस्थांना प्रवेशासाठी मुलाखती घेण्यास बंदी आहे. तसेच विद्यार्थी घेण्यासाठी जून उजाडलेला पहायची गरज नाही. आता ज्या संस्था अश्या मुलाखती घेत आहेत, इतर महिन्यात प्रवेश नाकारत आहेत त्यांची तक्रार तुम्ही करू शकता..
श्री.विंजीनेर यांनी मांडलेला शिक्षकांचा व शिक्षणाचा दर्जा हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आणि त्यावर या कायद्यात तरतूद तरी आहे. शिक्षकांना आपला दर्जा सुधारायण्यासाठी ३ वर्षे दिली आहेत. त्यानंतर दर ३ वर्षांनंतर सिक्षकांचे सर्वेक्षण(ऑडिट/इंन्स्पेक्शन) होऊन त्यांची नोकरी जाऊ शकते. या व अश्या शिक्षणाच्या पायाभूत सुविंधांसंदर्भात सरकारने कृतीशील असणे गरजेचे आहे.. तसेच पालकांच्या/नागरीकांच्या जागरूक रहाण्यानेही ह्या गोष्टी सुधारतील असे वाटते. श्री. दत्ता काळे म्हणतात त्याप्रमाणे एन.जी.ओ. व इतर सामाजिक संस्थांची सक्रीय/धोरणात्मक/टिकायुक्त मदत महत्त्वाची ठरणार आहे
श्री. सुनील म्हणतात त्याप्रमाणे कदाचित प्राधान्यक्रम चुकला असेल/नसेल मात्र नंतरच्या सरकारांनीदेखील (ज्यात शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह रावांसारखी काँग्रेसी सरकारे असोत वा जनता पक्षाची बिगर काँग्रेसी सरकारे असोत) कोणत्याही शिक्षणाकडे लक्ष दिलेले नाहि (अगदी उच्चदेखील नाही) राजीव गांधीचे ग्रामशिक्षण अभियान व वायपेयींचे सर्व शिक्षा अभियान ही दोनच लक्षात रहाण्याजोगे प्रयत्न झाले आणि ते जनतेने डोक्यावर घेतले/सफल केले
श्री अनामिक
अरे, ज्यांना खायलाच मिळत नाही ते शाळेत तरी कसे जातील? शिक्षणाचा मुलभूत हक्कात समावेश मान्य, पण नुसता हक्क देऊन किंवा प्रत्येक शाळेत जागा आरक्षित करून काय उपयोग? जोपर्यंत आधीच अस्तित्वात असलेल्या मुलभूत गरजांची/हक्कांची (अन्न, वस्त्र, निवारा) व्यवस्थित पुर्तता होत नाही किंवा कोणत्याही एका गरजेची पुर्तता होत नाही तोवर बाकीच्या गरजा/हक्कांवर वाईट परिणाम हा होणारच.
असा अतिशय प्रॅक्टीकल मुद्दा उपस्थित करतात. हा सोडवण्यास कठीण प्रश्न असला तरी सरकारचे यासाठी प्रयत्त्न दिसतात. याचसाठी मुलांना शाळेत खिचडी सुरू आहे. (व ती बर्याच शाळांमधे नियमीत दिली जाते असे माझे निरिक्षण आहे) शिवाय या कायद्याने ६ ते १४ वयांच्या मुलांचे शिक्षण मोफत आहे. दिवसभर काम करणार्या मुलांसाठी रात्र शाळा आहेत. थोडक्यात शासनाने पर्याय ठेवले आहेत.
स्वातीताईंनी (स्वाती२) प्रॅक्टीकल समस्या अधिक सोदाहण दिल्या आहेत आणि त्यावर काही छान उपायही सुचवले आहेत (जसे पाणी भरण्याच्या वेळा टाळणे).
जसजशी जनजागृती आणि जाहिर चर्चा होतील तसतसे अश्या सुचना ऐकल्या बोलल्या जातील, सरकारवर-समाजावर दबाव-जाणीव वाढेल आणि एक दिवस असा येईल की प्रत्येक मुल हे साक्षर होईल, आणि सुशिक्षित भारताची पहिली पायरी म्हणजे संपूर्ण साक्षर भारत तयार होईल असा सबळ आशावाद करावयास प्रत्यवाय(!) नसावा
जाता जाता: लवकरच भारतीय नागरीकांना "अन्नाचा" मुलभूत अधिकार मिळेल अशी आशा करूया
(मावळता पाहुणा संपादक)ऋषिकेश
स्वातंत्र्यानंतर फक्त ६३ वर्षांनी सुचलेले शहाणपण ...चालायचंच! लोकशाहीत हेच चालायचं - कायदा करायचा तोच मुळी राज़कीय हेतु साध्य करण्याकरिता - तो झाला- कि मग त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही त्याच्याशी कोणाचे काय ?
शिक्षणाबाबतचे लो.टिळकांचे विचार मुळातुनच वाचुन पाहण्यासारखे आहे.
असो.
संपादकीय बंद होऊन आज बरोब्बर १ वर्ष झाले... त्या प्रित्यर्थ हा धागा वर काढण्यात आलेला आहे....
धन्यवाद
अवांतर : यानंतरचे संपादकीय सोमवार दि १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. असे वरिल लेखात म्हटलेले आहे आणि ते चालक / मालक / संपादकांपैकी कोणी तरी म्हटलय.... ज्या कोणी हे म्हटलय त्यानी प्लिज त्यात वर्ष / साल पण अॅड करा हो....
आपला
(बिनडोक) कवटी
संपादकीय आवडले.
असे विषय येथे यावेत असे मनापासून वाटते.
शिक्षणासारख्या विषयातले कार्य अचानक दिसून येत नाही.
दीर्घ कालावधी मध्ये याचे वेगवेगळे परिणाम दिसून येतील.
-निनाद

यासाठी त्यांनी .....हेराफेरी केली. ताळेबंदात चुकीचे आकडे दाखवले.
मॅडॉफ आणी स्टॅन्फर्ड सोडून ह्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल काय? ह्या दोघांचे जे काय झाले ते अगदी अलिकडे झालेले आहे व एकंदरीत त्यांच्या उलाढालीची रक्कम, जी कोसळाकोसळी चाललेली आहे, त्याच्या एक अगदी छोटा हिस्सा बनेल. म्हणून त्यांना सोडून देऊ.
अनेक उदाहरणे आहेत. ऑफ बॅलन्स शीट कर्जे आणि देणी अनेक बँकानी लपवुन ठेवली. सबसिडरी कंपन्यांना कर्जे वर्ग करुन मुळ कंपनीचा ताळेबंद स्वच्छ दाखवला. सिटी बँक हे त्याचे ढळढळीत उदाहरण. हेच इतर वित्तीय संस्थांचे झाले आहे. असो.
--अवलिया
माझ्या अल्प माहितीप्रमाणे व स्वल्प समजानुसार कुठल्याही मोठ्या वित्तीय संस्थेने काहीही बेकायदेशीर केलेले नाही. ह्या सर्व कंपन्यांचे ताळेबंद मोठ्या ४ पैकी एकाकडून तपासले जातात. बेकायदेशीर काही असते तर आतापर्यंत त्याची फेडेरल रिझर्व व इतर सरकारी संस्थाकडून तपासणी झाली असती. तसे झाल्याचे कुठेही ऐकिवात नाही.
बेकायदेशीर कृत्ये करणे वेगळे आणि आहे त्याच कायद्याच्या चौकटीच्या मर्यादेत राहून ,ज्या दिशेत काहीही निर्बंधच अस्तित्वात नाहीत त्याचा फायदा घेऊन नवनवे प्रॉड्क्ट्स करून ते विकणे वेगळे. ह्या संस्थानी हे दुसरे केले. त्यात कायद्याचा भंग केलेला नाही, तेव्हा त्याला 'हेराफेरी' म्हणणे बरोबर नाही.

कायद्याच्या* चौकटीत राहून करणे ही तर सगळ्यात मोठी चलाखी. वरपासून (ग्रीनस्पॅन) ते खालीपर्यंत सगळ्यांचा यात सहभाग आहे.
वर्षाला ४० हजार कमावणार्या कुटुंबाला ४०० हजाराचे घर विकत घेण्यासाठी कर्ज देणे...
कर्जाची क्रिएटिव्ह (खरे तर क्रिमिनल) मांडणी करून पहिली दोन वर्षे अगदी कमी दरात आणि थोड्या रकमेवर व्याज भरण्यास परवानगी देणे.
हे असे कर्ज १००००१% बुडित खात्यात जाणार आहे हे माहित असूनही कंपनीमध्ये सगळ्यांनी कॅश फ्लो चांगला आहे आणि बिझिनेस मॉडेल जिनिअस प्रॉडक्ट आहे असे म्हणणे....
रेग्युलेटर्सनी माना डोलविणे आणि
रेटिंग एजन्सीजनी "अअअ" असे शिफारस देणे...
या कॅश फ्लोवर आधारित हुंड्या (सिक्युरिटीज) जगभरातील इन्व्हेस्टरांना विकून मूळ कर्जदात्यांनी आपले हात रिकामे करून घेणे. वगैरे वगैरे!
त्यात पुन्हा एकदा सिक्युरायटाझेशन केले की ही कर्जे ऑफ बॅलन्सशीट ... त्यातून अर्निंग्ज्स पर शेअरच्या आकड्यांची भलतीच सुधारणा...
एक ना दोन. थोरामोठ्यांचा वरदहस्त असल्याने (गव्हर्नमेन्ट अप्रूव्हड् असल्याने) हा फ्रॉड -- महाघोटाळा -- मॅडॉफच्या थापेबाजीपेक्षाही खतरनाक आहे.
* गेल्या दशकात कायदे अनेकदा बदलले गेले. चौकटीबाहेर जायला कशाला हवे? चौकटच बदला ना! -- एक शेलके उदाहरण सांगायचे झाले तर कमर्शिअल बँकांना सिक्युरिटीजचा धंदा करायला परवानगी देणे आणि प्रत्यक्षपणे सिटीला जगभर साम्राज्य उभे करण्यास सहाय्य करणे. ऑफ बॅलन्सशीट अकाऊन्टिंग हा एक आणखी स्वतंत्र विषय होऊ शकेल.
निव्वळ गणित चुकल्याने ही पाळी आलेली नाही. हे गणित चुकीच्या मार्गाला घेऊन जाणार आहे हे स्पष्ट होते. ते चुकीचे आहे हे समजण्याची अक्कल वॉलस्ट्रीटच्या टोप ब्रेन्समध्ये नव्हती हे पटण्यासारखे नाही. हव्यास आणि भ्रष्टाचार (पॉवर करप्टस् ऍन्ड अबसोल्युट पॉवर करप्टस् अबसोल्युटली) यांच्या प्रभावाखाली भल्याभल्यांनी सोयीस्करपणे दुनियेला टोपी घालायला मागेपुढे पाहिले नाही असे म्हणायला भरपूर वाव आहे.
तूर्तास इतकेच - एकलव्य
फक्त त्याला 'हेराफेरी' म्हणजे 'फ्रॉड' म्हणता येत नाही. जे काही झाले ते तत्कालिन कायद्याचे उल्लंघन करून झालेले नाही. विकासांनी लिहील्याप्रमाणे अनिर्बंध मुक्त अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम आता आपल्याला दिसता आहेत.
कमोडिटीज मार्केटातही हीच गत आहे. तेथेही निर्बंध खूपच ढिसाळ असल्याने तेलाचे भाव सुमारे ७५ डॉ./ बॅरल पासून १५० डॉ./ बॅरलपर्यंत भाव वाढवले गेले, जेमतेम सहा महिन्यात. तेव्हा हा सप्लाय व डिमांड चा परिणाम आहे, असे ऍनॅलिस्ट सांगत होते! मग हे आर्थिक अरिष्ट आले आणी भाव जे कोसळले ते ३५-३६ पर्यंत.
हे गणित चुकीच्या मार्गाला घेऊन जाणार आहे हे स्पष्ट होते. ते चुकीचे आहे हे समजण्याची अक्कल वॉलस्ट्रीटच्या टोप ब्रेन्समध्ये नव्हती हे पटण्यासारखे नाही. हव्यास आणि भ्रष्टाचार (पॉवर करप्टस् ऍन्ड अबसोल्युट पॉवर करप्टस् अबसोल्युटली) यांच्या प्रभावाखाली भल्याभल्यांनी सोयीस्करपणे दुनियेला टोपी घालायला मागेपुढे पाहिले नाही असे म्हणायला भरपूर वाव आहे.
हव्यासाबद्दल काहीही आर्ग्युमेंट नाही, नव्हतेच. सुपीक डोक्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा 'वापर' करून हे इमले रचले, त्यात तेव्हा त्यांच्या कंपन्यांना फायदा मिळत गेला, व त्यांना स्वतःला भरपूर कमिशन्स व बोनसेस. हे इमॉरल होते की नाही हा प्रश्न वेगळा. पण ह्याला भ्रष्टाचार मात्र म्हणणे पटत नाही.
कोणतीही गोष्ट करणे आणि ती सर्वसामान्यांच्या गळ्याला तात लावणारी ठरणार हे माहीत असूनही करणे, हा भ्रष्टाचार नाही तर काय म्हणणार?!
प्रत्येक गोष्ट नियमात बसवणे अशक्य असते. माणसाची नीतिमत्ता हव्यासाने गिळंकृत होते तेव्हा तो भ्रष्टाचारच असतो!!
चतुरंग
एकतर हे सगळे आता जे आपण म्हणतो आहोत ते मागे वळून पाहिल्यावर. आर्थिक पडझडीची बीजे रोवली गेली तेव्हा त्याबद्दल कुणालाच काही म्हणायचे नव्हते, कारण सुबत्ता होती, ती वृद्धिंगत होत होती, सर्व काही आलबेल होते. त्याचे दूरदर्शी परिणाम काय आहेत हे बघणे रेग्युलेटर्सचे काम होते, हे त्यांनी ते केले नाही, त्याची सारवासारव म्हणून नाही, तरी एक त्याचे कारण हे असावे की चांगल्या चालत्या गाडीला खीळ कशाला घाला? त्यातून परत रिपब्लिकनांना निर्बंध वाढवावयास उद्युक्त करणे म्हणजे तमाम भारतीय राजकीय पक्षांना आरक्षणाच्या मागणीपासून दूर करण्यासारखे कठीण आहे.
बर्नानकेपासून सगळे अजूनही बँकांचे नॅशनलाझेशन झाले आहे असे म्हणता येणार नाही असे म्हणत आहेत... बट डू यू बीलिव्ह दॅट? रशियाने जे वास्तव्य स्वीकारायला शेवटच्या श्वासापर्यंत नकार दिला त्याचा अमेरिकन अवतार सध्या जन्माला आलेला आहे. ही अतिशयोक्ति वाटेल पण वास्तवापासून फार दूरही नाही.
१००% सहमत.
माणसाची नीतिमत्ता हव्यासाने गिळंकृत होते तेव्हा तो भ्रष्टाचारच असतो
ह्याच संदर्भात झालेल्या एका चर्चेत मी असे विधान केले होते :"आंधळी व अनिर्बंध हाव". तेव्हा धनंजयांचे त्यावरील उत्तर मार्मिक होते, ते इथे तसेच्या तसे टाकत आहे:"या वाक्याचा अर्थ लागला नाही. आपला फायदा बघून घ्यावा, असा विचार तर सर्वच करतात. त्याची कितपत राशी निर्बंधांच्या पलीकडे आहे हे कसे ठरवणार? सतारीची तार तटकन तुटल्यानंतर कोणीही सांगेल की खुंटा खूपच - अनिर्बंध - पिळला. (हाइंडसाईट २०-२०). दोष देताना हे सांगावे लागते की वादकाला आधीच माहिती असायला हवे होते की "अमुक अमुकपेक्षा तारस्वरात श्रुती लावता येत नाही". नेमका किती फायदा घेतल्यावर दलालांनी "धालो" म्हणायला हवे होते असे आपल्याला वाटते? डोळस हाव म्हणजे कशी असायला हवी होती? या हुंड्यांची (म्हणजे मॉर्ट्गेज बॅक्ड सेक्युरिटी, केडिट डिफॉल्ट स्वॉप, वगैरेंची) किंमत कशी निश्चित करायची याबद्दल डोळस विचार करण्यासाठी सुयोग्य विदा कुठे उपलब्ध होता?"
नीतिमत्तेचे काय आहे, कोण कुणाला सांगणार?
* पायरेटेड सॉफ्टवेयर वापरणे
* पायरेटेड म्युझिक/ चित्रपट ऐकणे/पहाणे
* (भारतात) केबलवाला टी. व्ही.कं. ना गंडवतो आहे हे माहिती असूनही त्याचे सब्स्क्रिप्शन घेणे व त्या टी.व्ही. चॅनेल्सचे कार्यक्रम 'सब्सिडाईझ्ड' दरात बघणे
* इत्यादी, इत्यादी.....
तुमच्याआमच्यासारखा सर्वसामान्य माणूस कायकाय गोष्टी आयुष्यात सहजपणे करत असतो, त्याची ही काही उदाहरणे.
जो कुणी स्वतःच्या छातीवर हात ठेऊन सांगेल की आपण नेहमी नैतिकदॄष्ट्या चोख वागत आलो आहोत, त्याला नीतिमत्तेबद्दल बोलावयाचा अधिकार आहे. मीतरी हे करू धजत नाही.
फक्त त्याला 'हेराफेरी' म्हणजे 'फ्रॉड' म्हणता येत नाही.
का म्हणता येणार नाही हे मला उमगत नाही. असो...

अतिअवांतर - नंगा जब राजा होता है तब नंगे को नंगा कहनेसे दुनिआ डरती है. राजा के डरसे ना ही सही मगर डरती तो है!
संपादकीय उत्तम आहे. पण महत्त्वाच्या विषयांना फक्त हात लावून आल्यासारखे वाटते. मंदीची व्याप्ती, सर्वकष परिणाम आणि काळ ह्याचा अंदाच अजून आला नाही आणि वेगवेगळ्या लो़कांची ह्यावर वेगवेगळी मते आहेत. निरनिराळ्या क्षेत्रांबाबत निरनिराळी अटकळ बांधली जात आहे. जर अमेरीकेला उद्योगांना वाचवायचे असेल, त्यांना फायदा द्यायचा असेल तर त्यांना मिळणारे कुशल मनुष्यबळ स्वस्तात मिळाले पाहिजे - जर 'बाय अमेरीकन' नारा पाळायचा असेल तर हे अवघड आहे - त्यामुळे आऊट्सोर्सिंग ला पर्याय नाही. अमेरीका आता उझबेकीस्तान सारख्या देशातूनही आऊट्सोर्सिंग करते आहे. माझ्या एका क्लायंटचे प्रक्ल्प उझबेकीस्तानमधील तज्ञ ५ ते ७ डॉलर्/तास इतक्या कमी दरात करत आहे. ओबामाला ही वाक्य लवकरच घशात घ्यावी लागतील.
इतर परीणांमांमधे, परकीय विमा कंपन्या भारतात लवकरच आक्रमकपणे हातपाय पसरवतील असा माझा अंदाज आहे. डॉक्टरांचे तसेच हॉस्पीटलचे वाढते खर्च बघता ह्या विमा कंपन्या भारतातील सरकारी धोरणे बदलून लवकरच आरोग्य विमा सक्तीचा करतील असा माझा अंदाज आहे.
भारतातील मंदीचे परीणाम गोंधळात टाकणारे आहेत - एकीकडे सोन्याची भाववाढ, सरकारी नोकरांची पगारवाढ ही महागाई दर्शवते - तर बाकी नोकर्यांची असुरक्षितता आणि कमतरता, व्हाईट गुड्स, वाहन उद्योगातील मंदी ही मंदीचे संकेत आहेत, जरी बांधकाम व्यवसायिक भाव कमी करत नसले तरी त्यांच्याही व्यवसायात मंदी आहे हे कबूल करतात. पण सध्यातरी सगळ्याच सेवा किंवा वस्तू महागच आहेत - जरी महागई निर्देशांक निम्म्याहून कमी झाला तरी. :( हे किती काळ व किती भयानक होईल हे कळत नाही.
नानांचा ह्या विषयाचा व्यासंग आणि ज्ञान अनन्यसाधारण आहे. त्यांनी त्यांचा मंदीचा अंदाज, तिची व्याप्ती आणि काळ यांच्यावर अधिक माहितीसह इथे उहापोह करावा अशी माझी त्यांना विनंती आहे!
>>आर्थिक मंदीमुळे भारतासारख्या देशाच्या निर्यातीला भयानक मोठा फटका बसला असुन वस्त्रोद्योग, चामडे, जडजवाहिर यासारख्या क्षेत्रातील लोकांचा रोजगार गेला आहे. हाच प्रकार आयटी क्षेत्राबाबत घडत आहे.
सहमत.
येथे एक्सपोर्ट कारोबार मध्ये तर हालत एकदम खराब झाले आहे, मोठ मोठ्या कंपन्या अजून कर्मचारी वर्गाला काढायला सुरु केले नाही आहे पण कामाचे दिवस कमी केले गेले आहेत, तास कमी केले गेले आहेत, लोकांना कमी पगार अथवा नोकरीतून कमी ह्यातील एक पर्याय निवडायला दिला आहे.
>शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा हिरो असल्याचे म्हटले आहे.
१००% आहे पण.
सर्व संपेल पण शेती करणे संपणार नाही. जमीनी कडे लक्ष द्या. शेवटी जेवायला दोन वेळची भाकरी तरी पाहीजेच.
>>आणि याच कारणासाठी, १९९१ पासुन राबवलेली धोरणे आणि जागतिकीकरणाला, उदारीकरणाला दिलेले प्रोत्साहन यांचा नक्की कुणाला कसा फायदा झाला याचा लेखाजोखा काढुन त्याप्रमाणे धोरणात सुसंगत बदल घडवुन अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न नव्या सरकारला करावे लागतील.
त्याच बरोबर, जो भ्रष्टाचार सर्व जागी पसरला आहे त्यावर देखील अंकुश लावावा लागेल व छोटे मोठे घोटाळे घडण्यापुर्वीच रोकले पाहीजेत नाही तर, सत्यम सारखा कोणीतरी देशाची इज्जत व अर्थव्यवस्था वेटीला धरु शकतो.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
>धोरणात सुसंगत बदल घडवुन अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न नव्या सरकारला करावे लागतील
हा वाक्यात न पटण्यासारखे काहीच नाही. पण होईलच याची शाश्वती काही नाही.
कुठलेही सरकार आले तर नक्की देशाला फायदेकारक धोरणे होतील हे माहीत नाही पण पक्षाला / पक्षनेत्यांना फायदेकारक व्यवहार मंजुर होतील, हितसंबधी लोक त्यांना/त्यांच्या व्यवसायांना हवे तसे कायदे बनवुन घेतील हे नक्की.
शेती व्यवसाय बळकट केला, निर्यातीस प्रोत्साहन दिले तर सर्वांगीण फायदा नक्की.
संपादकीय लेख आवडला ....
अजुन थोडा विस्तारता आला असता असे वाटते .. :-)
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रगत आणि सुस्थितीतील अर्थव्यवस्थेत, जीडीपीतील सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्रातून येतो. त्या खालोखाल औधोगिक क्षेत्र आणि सर्वात शेवटी कृषी क्षेत्रातून येतो. ह्या आदर्श समजल्या जाणार्या क्षेत्र उतरंडीमध्ये शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा हिरो कसा काय बनतो, ते समजले नाही.
आज कृषी क्षेत्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे (ज्याला झाकलेली-डिस्गाइझ्ड बेरोजगारी म्हणतात). कृषी क्षेत्रातील अवलंबितांची संख्या कमी करून ती औद्योगिक्/सेवा क्षेत्राकडे वळविणे जास्त गरजेचे आहे.
भारतात मूळातच अंतर्गत खप जास्त असल्यामुळे निर्यात कमी झाली तरी अर्थव्यवस्था कोलमडून पडणार नाही. यावर अधिक उहापोह आवडला असता.
थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेचे यशापयश, यावर जर संपादकीयात जरा खोलवर जाऊन टीका-टिपणी झाली असती, तर अग्रलेख अधिक परिपूर्ण वाटला असता.

प्रगत आणि सुस्थितीतील अर्थव्यवस्थेत, जीडीपीतील सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्रातून येतो. त्या खालोखाल औधोगिक क्षेत्र आणि सर्वात शेवटी कृषी क्षेत्रातून येतो.
आता लगेच अगदी कुठचा विदा तपासून बघत नाही, तरीही जपान, जर्मनी व चीन येथील जीडीपी हे प्राम्युख्याने औद्योगिक क्षेत्रांवर अवलंबून आहेत असे म्हणणे चुकिचे ठरू नये. आणी हे देश प्रगत व त्यांच्या अर्थव्यवस्था सुस्थितील* समजण्यासही कुणाची फार हरकत नसावी?
[* आताच्या आर्थिक पडझडी (फानॅन्शिअल त्सुनामी)च्या अगोदर तरी. नंतर अनेक चित्रे बदलतील, तरी हे विधान ह्या तिन्ही अर्थव्यवस्थांना तसेच लागू रहावे].
पूर्णपणे ठोस असा विदा अद्याप माझ्याकडे नाही. मिळाल्यास देईनच पण तूर्तास हे बघा - विशेषतः एका परिच्छेदातील खालील वाक्य -
Services accounted for more than 70 per cent of GDP in six industrialised countries: France, Germany, Italy, Japan, Britain and the United States.

भारतातील सेवा क्षेत्र एकूण उत्पन्नाच्या ५५% उत्पन्न काढते, असे कोठेतरी वाचल्याचेअंधुक आठवते. कदाचित हा आकडा सरकारी नसावा, असा अंदाज आहे.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
सी. आय. ए. च्या वर्ल्ड -फॅक्ट बुकात काही निवडक देशांची ही माहिती मिळाली, ती येथे देत आहे:
देश : जी. डी. पी.(शेतीचा हिस्सा, %) : जी. डी. पी. (कारखानदारीचा हिस्सा, %) : जी. डी. पी. (सेवा- हिस्सा, %)*
जर्मनी : ०.९ :३०.० :६९.०
जपान : १.४ :२७.९ :६६.४
चीन : १०.६ : ४९.२ :४०.२
भारत :१७.२ :२९.१ :५३.७
अमेरिका: १.२ :१९.६ : ७९.२
ब्रिटन : ०.९ :२२.८ : ७६.२
यू. ए. ई. : १.६ :६१.८ : ३६.६
वेनेन्झुएला : ३.६ :३५.३ : ६१.१
*: ह्यातील काही आकडे २००८ सालाचे आडाखे आहेत. पण कल्पना येण्यासाठी हे ठीक आहे.
उत्तम लेख. संपादकियाला शोभणारा.
जपानबद्दल किंवा आशियाई अर्थव्यवस्थांवर अजुन माहीती एखाद्या वेगळ्या लेखात येउ द्यावी अशी मिपाचे अर्थतज्ञ अवलिया यांना इथे मी विनंती करतो.
अवलियासाहेब, अग्रलेख आवडला....
लेखन सुरेख आहे...
पण लेखनात मांडलेल्या पोझिशन्सपैकी काही शंका......
याची जाणीव असुनसुद्धा या (अमेरिकन) कंपन्यांचे बडे पदाधिकारी, संचालक, आपल्या पोळीवर वाढीव पगार, बोनस यांचे तुप ओढुन घेत होते. यासाठी त्यांनी अनेक त-हेच्या करामती केल्या. हेराफेरी केली. ताळेबंदात चुकीचे आकडे दाखवले.
सत्यम, शिवम, सुंदरम!!!
:)
अमेरिकन वस्तुंचीच खरेदी करा, अमेरिकन लोकांकडुनच काम करवुन घ्या असे ते म्हणतात. आयातीच्या मार्गाने वस्तु, सेवा स्वस्त पडत असल्या तरी त्या नाकारा असा त्यांचा (ओबामांचा) आग्रह आहे.
यात चुकीचं काही आहे का?
:)
हेच चीन मधे पण मोठया प्रमाणावर घडल्याने चीनने अमेरिकन धोरणाबद्दल तीव्र नापसंती जाहिर केलेली आहे.
ऍन्ड? आम्ही अमेरिकेला/ पश्चिम युरोपला काहीही निर्यात करणार नाही असं जाहीर करायची चीन या "महासत्तेची" तयारी आहे काय? नसेल तर त्या नापंसंतीला काय किंमत आहे?
चीनचा अमेरिकेशी मोठा व्यापार आहे. चीनची निर्यात अधिक आणि आयात माफक आहे. चीनच्या चमत्कारामागे परकिय गुंतवणुक आणि स्पर्धाखच्चीकरण करुन केलेला निर्यातीचा धडाका हेच होते. आता निर्यात घटताच, दक्षिण चीनमधे हाहाःकार माजला आहे.
चीनमधल्या या चमत्कारामागे ग्रामीण भागांत रहाणार्या शेतकर्यांची आज काय अवस्था आहे?
आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी संरक्षक भिंत उभारणे हा तोडगा नाही असा आजवरचा अनुभव आहे,
वेट अ मिनिट!! ग्लोबलायझेशन अंमलात आल्यापासून माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रसंग आहे की जेंव्हा जागतिक इकॉनॉमी धोक्यात आलेली आहे.....
मग हा आजवरचा अनुभव तुम्ही कूठल्या पूर्वानुभवावरून (आजवरचा अनुभव!!) बांधलांत?
शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा हिरो असल्याचे म्हटले आहे.
तो हिरो तर आहेच! पण त्या हिरोलाही हे सांगण्याची गरज आलेली आहे की तो शेती उत्पादन करून कोणावर उपकार करत नाहिये! शेती हा इतर अनेक धंद्यांप्रमणेच एक धंदा आहे. घेतलेली कर्जे व्याजासहित परतफेड करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि जर तो ही शेती स्वतःसाठी फायदेशीर करू शकत नसेल तर त्याने ती सोडून दुसरे काहीतरी करण्याची जरूर आहे. दरवेळेलेला कर्जे घ्यायची, आणि ती न फेडता सरकारवर दबाव आणून माफ्या घ्यायच्या हा त्याच्या दृष्टीने फायदेशीर मार्ग असला तरी इतर नियमांने इन्कमटॅक्स भरणार्या इतर नागरिकांवर तो अन्याय आहे....
१९९१ पासुन राबवलेली धोरणे आणि जागतिकीकरणाला, उदारीकरणाला दिलेले प्रोत्साहन यांचा नक्की कुणाला कसा फायदा झाला याचा लेखाजोखा काढुन त्याप्रमाणे धोरणात सुसंगत बदल घडवुन अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न नव्या सरकारला करावे लागतील.
या बाबतीत मात्र सहमत!!
:)
कळावे, लोभ असावा.
आपलाच, पिडां
राम राम
सत्यम, शिवम, सुंदरम!!!
बरोबर आहे... इथे सत्यम.
बाकी जगात हरे रामा हरे कृष्णा... त्याचे काय?
सत्यममुळे अर्थव्यवस्था गोत्यात (अजुन तरी) नाही आली, पण अमेरिकन वित्तीयसंस्थामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे हे तुम्हाला मान्यच व्हावे.
यात चुकीचं काही आहे का?
अजिबात नाही. अगदी योग्य.
एन्ड? आम्ही अमेरिकेला/ पश्चिम युरोपला काहीही निर्यात करणार नाही असं जाहीर करायची चीन या "महासत्तेची" तयारी आहे काय? नसेल तर त्या नापंसंतीला काय किंमत आहे?

यावर मी लेख लिहिन वेगळा.. चालेल?
तो हिरो तर आहेच! ....... इतर नागरिकांवर तो अन्याय आहे....
अगदी बरोबर.
बाकी तुमची आमची सहमती होणारच... :)
आपलाच,
अवलिया
सत्यम, शिवम, सुंदरम!!!
तीकडच्या हावरटांची पण एक सुची बनवाना , ज्यांच्या मुळे आज ही वेळ आली आहे.
आणि जर तो ही शेती स्वतःसाठी फायदेशीर करू शकत नसेल तर त्याने ती सोडून दुसरे काहीतरी करण्याची जरूर आहे.
म्हणूनच ते आत्महत्या करत आहेत.
(अवांतरः बाकी अमीरीकनाना ही माहीत नसेल की त्यांची हीरहीरीने बाजु मांडणारे ईतके लोक आहेत ते)
>>म्हणूनच ते आत्महत्या करत आहेत.
हे बघा तो मुद्दा जरा वेगळा आहे.
शेती ही पाऊस व पाण्यावर अवलंबून आहे... विदर्भामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्या काही वर्षापासून पावसाचे / पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे झाले... पण जेवढी सबसीडी शेतीला मिळते तेवढी भारतात कुठल्याही बिझनेसला मिळत नसावी.
पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश पण पुर्णतः शेतीवर अवलंबून आहेतच ना... पण इकडचे शेतकरी नवनवीन प्रयोग करतात शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात व आपण... एकदा तंबाकुच्या मागे लागले.. अथवा उसाच्या मागे लागले की जमीनीचा कस जाऊ पर्यंत त्या काळ्या आईवर अत्याचार करतो व जेव्हा ती योग्य उत्पादन देऊ शकत नाही तेव्हा सरकारला नावे ठेवत.. शिव्या देत बसतो... !
माझ्या घरात सर्व शेतकरीच आहेत.. त्यामुळे हे मी विधान करत आहे.. मागील दोन एक वर्षापासून जरा सुधारले आहेत घरातले त्यामुळे... ट्मॉटो... केळी व इतर उत्पादन घेत आहेत नाही तर.. हाल बुराच होता.. !
बाकी,
अमेरिकेची बाजू... डोळे उघडे ठेवावेत... !
जे तिकडे घडले तेच इकडे घडत आहे.. !
म्हणून म्हणतो.. शेती कडे वळा... पण डोळस पणे... उगाच पैसा मिळतो म्हणून जमीनीचा कस नका घालवू... जर जमीनीचा कस टिकला तर... शेतकरी देखील टिकेल.. !

राजेंच्या प्रतिसादात एक मुद्दा सुटला असं वाटतंय, मुलीच्या लग्नात भंपक प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी कर्जाबाजारी झालेले शेतकरी! सोनं पिकवणारी जमीन या आपल्याच (आपल्याच = भारतीय, कुणी पाश्चात्य नव्हे) हुंडा, मानपान असल्या, खुळचट कल्पना, सामाजिक रितींमुळे गहाण टाकली आणि मग सोडवता आली नाही म्हणून किंवा मिळालेल्या पैशातून मुलीचं लग्नं होईल म्हणून आत्महत्या करणार्या शेतकर्यांचं प्रमाणही बर्यापैकी जास्त आहे. ना पावसाचा दोष ना शेतकी तंत्रज्ञानाचा!
विप्रंच्या खालच्या प्रतिसादाची री ओढते, डोळे उघडे ठेवायचे म्हणजे नक्की काय तेही विस्तृतपणे लिहा.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
१००% सहमत.
कित्येक जणांना मी ओळखतो... घरात पैका नाही पण मुलीचे लग्न आहे म्हनून जमीनी बँकेकडे.. सावकार कडे गहाण ठेवायची व मुलीचे लग्न लाऊन द्यायचे... पण तो पर्यंत विचार करायचा नाहीच की अरे.. ते कर्ज फिटणार कसं.. !
दहावी पास मुलीच्या लग्नात २-३ लाख खर्च करणारे वडील (एपत नसताना) व साला धड कामधंदा नसलेला नवरा मोटरसायकल / सोने ह्यांची मागणी करताना पाहीले आहे... त्यामुळे फक्त सरकारला दोष देऊन फायदा नाही.

अरे तु लिहिलेले जर बरोबर असेल तर सहमतच म्हणणार ना?
तसेच अदितीबाईंनी पण जे म्हटले आहे ते काहिच चुक नाही.
चुका सगळयांच्याच आहेत.
आणि या केवळ भारतातच आहेत असे नाही, जगभरात आहे.
क्रेडीट कार्ड, विनासायास मिळणारी (किंवा दिली जाणारी ) कर्जे, गरज नसतांना केलेले षौक, अवास्तव खरेदी, डामडौल हे शहरी भागातील लोकांचे गुण (!) आहेतच ना?
मुळात मार्केटमधे झालेला अवास्तव पैसा हाच आजच्या समस्येचे मुळ आहे. आणि हा पैसा अचानक कमी होवु लागल्यामुळे मंदी आलेली आहे.

ह्या मुद्द्यात अमेरिकेची बाजू मांडणे म्हणजे काय ते कळले नाही.....
अमेरिकेला जाऊ द्या खड्ड्यात!!!!
घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता आत्महत्या केली म्हणून ती कर्जे उपलब्ध (अप्रत्यक्षपणे) करून देणार्या इन्कमटॅक्स पेयर्सवर काय उपकार केले ते समजले नाही!!!!
शेती हा इतर अनेक धंद्याप्रमाणे धंदा आहे आणि जर घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर इतर धंद्यांप्रमाणे (व्यापार इत्यादी) दिवाळे निघते हे शेतकर्यांनी जाणून घेणे जरूरीचे आहे हे माझे प्रतिपादन आहे.....
आपल्याला त्यात काही वावगे दिसते का?
की उगाच अमेरिका हा शब्द दिसला म्हणुन झोडायचे ही नीती आहे?
ईतर धंद्या मधे मालाचा भाव ठरवण्याचा जो अधिकार उत्पादकाला असतो तो अधिकार शेतकर्याला आहे का ?
(अवांतर : बाजु मांडणे म्हणजे काय ? बर्याच प्रतीसादांचे ते सार आहे )
त्यासाठी अडत बझार आहे... प्रत्येक शहरामध्ये... तालुक्यामध्ये.. तेथे भाव तय होतात ते खरेदीदार-विक्रेता हेच तय करतात.. पण कधी कधी विक्रेत्याची पडती बाजू बघून खरेदीदार.. (व्यापारी वर्ग) गैरफायदा घेतो पण मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात तरी शेतीमालाला खुपच योग्य भाव मिळत आहेच राव.. ! दोघां पैकी एकटा पण अडून राहीला तर मात्र शेतक-यालाच लॉस होतो.. कारण खरेदीदाराने घेतले नाही तर काही ठरावीक काळामध्ये शेतीमाल खराब होऊ शकतो / त्याची पत खराब होऊ शकते.
* बाकी योग्य भाव मिळत नाही म्हणून रडणे ... दंगा करणे हे योग्य नाही.. जेव्हा तुम्ही बिझनेस करत असता तर सर्व गोष्टीचा विचार करुनच तुम्ही आपला माल तयार केलेला असतो ... ! पण प्रत्येकजण उस करु लागला तर उत्पादन जास्त होईल व भाव कमी हे सामान्य गणित. त्यामुळेच म्हणतो आहे प्रयोगशील जो आहे तोच टिकेल.. !

मालाचा भाव ठरवण्याचा जो अधिकार उत्पादकाला असतो
मालाचा भाव ठरवण्याचा "अधिकार" कुठल्याच उत्पादकाला नसतो....
मालाचा भाव हे मार्केट (डिमांड आणि सप्लाय) ठरवतं......
हां, उत्पादक मालाची विक्रीकिंमत ठरवू शकतो पण त्या किंमतीला विक्री होणारच हे नाही ठरवू शकत....
असो, तुम्ही सूज्ञ आहांतच....
तुम्ही लिहिलेल्या लेखातले मुद्दे पटले. पण भारतात ही झळ अजुनही पुर्ण रीत्या पोचलेली नाही असे म्ह्टले जाते. हे 'पुर्ण" म्हणजे साधारण काय असेल ह्याची वाचकांना कल्पना देउ शकाल काय?
पुर्ण काशीत जायची तयारी असलेली बरी.
विप्र आयुष्यातील संकटे हे काय २१ अपेक्षित सारखे सोडवता येतात का?
असा प्रश्न निदान तुमच्याकडुन तरी अपेक्षीत नाही.
जे होईल ते पहाणे आणि तोंड देणे.
काळजी करु नका, काळजी घ्या.
--अवलिया
सुरेख अग्रलेख..!
अजुन थोडा विस्तारता आला असता असे वाटते ..
अनिल हटेलाशी सहमत..
बाकी आपल्या शेयरबाजाराचा विचार करता अजून बॉटम यायचा आहे असं आम्हालाही वाटतं.
तात्या.
बॉट्म ... !
खोली तर संपत आली... ८६७० आज आहे... ह्याच महिन्यात ७५०० चा अंदाज आहे पण अजून खाली जाऊ नये असे मनोमन वाटत आहे, देशा बरोबर सर्वसामान्यांचे पण नुकसान होत आहे ह्यात... देवा गणपती वाचव रे सगळ्यांना ह्यातून.. !

माझ्या नजरेत जागे राहणे चा अर्थ आहे की डोळस पणे पहा.. जरा घाटा सोसा पण पुर्ण नष्ट होऊ नका.. हातातला पैसा जपा.. दोन-तीन वर्ष अशीच कष्टात जाणार आहेत त्यासाठी तयार व्हा.. जेवढे जमेल तेवढे काटकसरीचे जिवनमान स्वतःसाठी निवडा.. !
विषय अर्थातच चांगला आहे. अग्रलेखपण चांगला आहे फक्त अजून माहीती देऊन विस्तारता आला असता असे वाटते. वरील चर्चेत बरेच मुद्दे आलेत त्यामुळे अग्रलेख आणि त्यासंदंर्भातील प्रतिसादांवर माझे मुद्दे असे ढोबळ मानाने लिहीत आहे. नेहमी प्रमाणे खालील मुद्यांना "असे मला वाटते" हे पालूपद आहेच :-)
अमेरिकन अर्थव्यवस्था ढासळण्याचे कारण हे जास्त करून नियंत्रणे नसणे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा त्या अर्थी अतिरेक करणे हे आहे. त्यात अमेरिकन "हर्षद" आणि "केतन" निघालेत पण अशा एखाद्या व्यक्तींमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था भारतातील पण वेठीस धरता येणार नाही. एखादा पोचा पडू शकतो - तो देखील तात्पुरता.
नियंत्रणे नसल्याने अर्थातच बर्याच खाजगी निर्णयांवर नियम पाळायचे बंधन नव्हते. त्यामुळे अतिगोपनियतेत मोठमोठ्या बँका एकमेकींशी व्यवहार करत होत्या. पण ते सगळे हवेतलेच इमले होते (प्रेडीक्शन्स वर आधारीत, पण प्रेडीक्षन्स ना आधार नाही असे काहीसे). हे विशेष करून चालू झाले ते आधी गृहकर्जामधे नंतर अर्थातच विमा कंपन्या, एआयजी सारख्या त्यात गोवल्या. आता हे बरोबर का चूक हा प्रश्न खेळानंतर नियम सांगून फाउल ठरवण्यातला होतो. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही.
असे असले तरी गृहकर्जासंदर्भात बरीच लफडी झाली - मुख्य म्हणजे त्यात विकत घेणार्याची आर्थिक पत बघण्याकडे झालेले सोयीस्कर दुर्लक्ष.
दुसरा भाग म्हणजे एकमेकांची कर्जे विकत घेत असताना बँकांनी वर म्हणलेल्या प्रेडिक्शन्सवर काही ठरवून कुठल्याही भावात घेतले आणि आता सामान्य घरमालकाप्रमाणे पैशाचे प्रश्न उभे राहीले. ह्यावर एकदा एनपीआर ह्या रेडिओवर छान कार्यक्रम झाला होता. दुवा मिळाल्यास कळवेन.
आता सर्व्हीस सेक्टर - सेवाक्षेत्राचा प्रश्नः प्रगत राष्ट्रांमधे सेवाक्षेत्र हे प्रधान क्षेत्र होते हे वास्तव आहे. मात्र अमेरिकेचे प्रश्न हे त्याच्यामुळे तयार होण्या ऐवजी कर्ज घेण्याच्या अतिरेकी वृत्तीमुळे तयार झाले आहेत. मधे प्रसिद्ध झालेले एक या अर्थी वाक्य होते, "आपण(अमेरिकन्स) चायनाकडून गोष्टी विकत घेतो, त्यावर चायना पैसे मिळवते ते पैसे ते आपल्या आर्थिक संस्थांत गुंतवते (परदेशी गंगाजळी) त्या आर्थिकसंस्था त्या पैशातून आपल्याला कर्ज देतात, त्यातून आपण घरे घेतो, मग त्या घरात परत क्रेडिट कार्डचा वापर करून (परत कर्जच) "मेड इन चायना" गोष्टी आणतो, त्यातून चायनाला पैसे मिळतात..." हे नष्टचक्र चालूच राहते.
आता ओबामा म्हणतो की आम्ही बाहेर जाणार्या नोकर्यांवर अर्थात आउट सोअर्सिंगवर बंधने आणू. कदाचीत ते थोडेफार शक्य होईलही. कारण आउटसोअर्सिंग हे बुश (रिपब्लीकन) राज्यात वाढले. पण तरी त्यात अमेरिकन दादागिरी चालू शकेल असे वाटत नाही. कारण आउटसोअर्सिंग बंद करणार पण तुमचे उद्योग मात्र मुक्तअर्थव्यवस्थेचे म्हणजे तुमच्या देशाला प्रोटेक्टीव्ह असून चालणार नाहीत असे म्हणणे हे चालू शकणार नाही. "इट द केक अँड हॅव इटचा अमेरिकन माजरटपणा आता चालू शकेल असे वाटत नाही". पण त्यासाठी आपण (भारत) काय करतोय हे विचारले तर काय दिसते?
भारतात होणारे आउट्सोअर्सिंग कमी/बंद झाले तर त्याला कारण ओबामा, अमेरिकन्स अथवा इथली अर्थव्यवस्था नसणार आहे तर आपली धंदा करण्याची पद्धत, इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षितता, राजकीय आणि खाजगी भ्रष्ट्राचार ही कारणे असणार आहेत आणि त्या सर्वाचा एक परीणाम म्हणजे होणारी फसवणूक जी चांगल्या काळात चालू शकते पण वाईट काळात जेंव्हा कंपन्यापण दात कोरून जगतात तेंव्हा चालत नाही... असे ऐकले आहे की सत्यम मधले अनेक अमेरिकेत नुसते बेंचवर बसून आहेत - अर्थात काहीच काम नाही पण पैसे मिळत आहेत. तीच अवस्था इतर कंपन्यांची असणार...
दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडील आयटी सेवा कंपन्या ह्या केवळ एक्स्पोर्ट कडेच डोळे लावून बसतात आणि स्वतःच्या १ बिलीयन्सच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करतात. जे बाहेरील धंदे पण करत नाहीत!
या संदर्भात अजून एक समस्या म्हणजे अमेरिकन सेवा संस्थांचे स्वतःचे प्रॉडक्टस असतात, पेटंट्स असतात आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्था पैसा निर्माण करतात. आपल्याकडील सेवा कंपन्या ह्या म्हणजे फक्त "बिग एम्लॉयी ऑफ बिगर एम्प्लॉयर" सारख्या वागतात. स्वत:चे प्रॉडक्टस नाहीत की स्वतःच्या देशासाठी सर्व्हीसेस नाहीत. पूर्ण दलाली वृत्ती...
मोठमोठ्या अमेरिकन कंपन्यांनी अप्रत्यक्ष आउटसोअर्सिंग चालू केले आहे - म्हणजे त्यांची ऑफिसेस भारतात आहेत त्यामुळे त्यात ते काहीच बेकायदेशीर करणार नाहीत आत्ताच्या आणि भविष्यातील नियमांप्रमाणे...
सरते शेवटी शेतकर्यांचा मुद्दा - आपला देश शेतीप्रधान राहीला म्हणून काही बिघडत नाही. त्याने मुळात बिघडलेले नाहीच आहे. इतक्या लोकांना सर्वप्रकारची कामे आणि अन्न देण्याची व्यवस्था करावी लागणारच आहे. मात्र त्यासाठी बरेच काही बदलावे लागेल - शेतकर्यांसकट ते सरकार, उद्योग आणि तुम्ही-आम्ही जनसामान्यांपर्यंत...हा वेगळा विषय आहे आणि त्यावर परत कधीतरी अधिक लिहीन...
प्रतिसादही वाचनीय आहेत.
मध्यंतरी शरद पवार यांनी शेतकर्यांना असा सल्ला दिल्याचे आठवते की आता हे क्षेत्र सोडा आणि इतर उद्योगांना लागा. त्यावरून त्यांची थट्टा झाली तरी एक वाटते की मोठ्या शेतकरी कुटुंबांतील व्यक्तींनी जमिनीच्या एका लहानशा तुकड्यांवर आयुष्य काढणे आजच्या घडीला शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा हा सल्ला योग्यच आहे. अशा सर्वांना थोड्या प्रशिक्षणाने सेवा क्षेत्रात कामाच्या संधी मिळू शकतात. आणि भारताला त्यासाठी सगळ्या सेवा निर्यातच करण्याची गरज आहे असे नाही. निर्यातीकडे लक्ष देताना देशांतर्गत संधींकडे दुर्लक्ष होते आहे असे होऊ नये.
या लेखाला दोन वर्षे होऊन गेली. शेअर बाजार त्यावेळेस ८६७० च्या आसपास होता.
आज तोच बाजार त्यावेळच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १७५०० च्या आसपास आहे. तरीही लोक मंदीचे सावट आहे असे म्हणत आहेत.( मध्यंतरी एकदा २१००० च्या आसपास जाऊन आला)
ग्रीस वगैरे देश कर्जबाजारी झालेले आहेत . आपल्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या नक्की कोणाकडे आहेत तेच समजत नाहिय्ये.
लेख लिहुन झाला त्याला दोन वर्षे उलटली. या दरम्यान आपली अर्थव्यवस्था काही सुधारली आहे असे वाटत नाही. तरीही शेअर बाजार अधून उसळी मारतोच आहे.
सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती कोणी समजावून सांगेल का?

भरपूर घोळ दिसतो आहे.
मंडळाची बाजूही ऐकून घेतली पाहीजे. कोणी आहे का बाजू मांडणारं?
मिपावर मिपासदस्यांना माहिती मिळाली. ह्यापलीकडे मिपाकर काही करू शकतात का? तिथे, अमेरिकेत ह्या सर्वाचा प्रसार, पत्रके छापून, केला आहे का? दबावगट निर्माण केला आहे का?
एकूण सर्वत्र एखाद्या संघटणेच्या छत्राखाली एकत्र होण्याबाबत 'सुशिक्षित मराठी माणूस' उदासिन असतो असेच दिसते.
निष्कर्ष म्हणजे मेंदूथकल्याचे लक्षण!
मलाही सुरुवातीला हे सम्मेलन अमेरिकेत का होत आहे हे कोडे पडले होते.
पाणी नक्कीच मुरते आहे. परंतु दोन्ही बाजु विचारात घेतल्यानंतरच काही भाष्य करने ईष्ट होइल.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
आज सकाळमध्ये ही बातमी वाचायला मिळाली:
http://beta.esakal.com/2009/02/04234428/vishwa-marathi-sahitya-sammela.html
मजा अशी, की ज्यांनी ती माहिती पुरवली, ते लगेच खाली लिहितात "की हे सर्व चुकीचे आहे".
मजाच मजा.
-- सर्किट
तो लेख वाचून मी कितीतरी वेळ हसत बसले होते!!
विशेषत: हे वाक्य --->
संपूर्ण परिसर कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो.
उद्या म्हणाल, पुणे हा परिसर महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो!!
http://bhagyashreee.blogspot.com/
ग्रँड सॅनियन नावाचा लाल डोंगर दाखवणार असतील तर मीसुद्धा जायचे ट्रिपवर म्हणतो आहे.
(कुठेसा आहे? बहुधा ग्रँड कॅन्यन नावाची लाल दरी उकरून काढताना मोठ्या प्रमाणात लाल दगड-माती निघाली असेल. त्या लाल दगडामातीचा प्रचंड ढीग = ग्रँड सॅन्यन डोंगर असेल का?)
मी तर 'बेव्हरसेहिल' दाखवता आहेत म्हंटल्यावरच इतका एक्साइट झालो की ग्रँड सॅनियन नावाचा लाल डोंगर दिसलाच नाही. :D
चला तर मग धनंजय शेठ, 'लॉस वेगास' मध्ये भेटूच!! =))
अहो, पेपरात छापताना निदान प्रुफ रिडींग करावं नं? लेख पाठवायच्या आधी लेखकाने आणि छापायच्या आधी सकाळने!
ती नावं बरोबर आहेत की नाहीत हे गुगलवर काही मिनिटात कळतं.. !
कायच्या काय!
मला आलं हसू, म्हणून हसले!!! मी कुठल्या जोकला हसावं हे लोकांनी का म्हणून ठरवावं !
असो, हे फार अवांतर होतंय. माझ्याकडुन मी हा विषय संपवत आहे.
http://bhagyashreee.blogspot.com/
त्यांचे टोपण नाव असेल ते... !
बाकी,
मराठीला तुम्ही लोकांनी चांगलेच गोल्बल केले आहे राव ;)
छान खुप प्रगती पथावर आहात.... खास मराठी सवयी तुम्ही तीकडे जाऊन देखील सोडल्या नाहीत हे पाहू आनंद झाहला !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
खास मराठी सवयी तुम्ही तीकडे जाऊन देखील सोडल्या नाहीत हे पाहू आनंद झाहला !
=)) =)) =)) =)) =))
काय राजे काय हे...........
___________________________________________________

मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......
आपला लेख बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप देवकुळे ह्यांना फॉरवर्ड केलेला आहे.
श्री. देवकुळे ह्यांना विनंतीदेखील केलेली आहे, की त्यांनी ह्या स्थळावरच सदर मुद्द्यांचे खंडन करावे.
(त्यांच्या लेखाच्या अपेक्षेत :-)
-- सर्किट
विनंती मराठीत केली की इंग्रजीत?
काय आहे की बरेच लोक महाराष्ट्रात मराठी शब्द तोंडातुन बाहेर पडणार नाही याचीच दक्षता घेत वावरत असतात अन अमेरिकेत जावुन महाराष्ट्र मंडळे काढतात असे ऐकिवात आहे. म्हणुन विचारतो..
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
प्रा डॉ बिरुटेंनी मला कळवले होते, की "अरे ती मराठी मंडळाची साईट इंग्रजीत आहे" म्हणून ! तेव्हा संबंधित लोकांना ती इमेल पाठवली, तेव्हा ती साईट मराठी ल्यांग्वेजमध्ये झाली. कसे ?
तेव्हापासून मी यम यम बी ये च्या लोकांशी इंग्रजीत (स्वारी, इंग्लिशमध्ये) बोलतो. कसे ?
आणि काहीही झाले, तरी यू नो, द व्ही एम एस एस इज अ प्राईम ग्यादरिंग ऑफ द मराटी स्पीकिंग फोक्स. राईट ?
सो व्हाय आर द बे एरिया पिपल अपोझिंग इट, आय वंडर ;-)
-- सर्किट
:)
असु दे ! खुप दिवसानंतर त्यांचा टॉप गियर लागला आहे !
***
पण सर्केश्वर त्यांचे उत्तर येईल का ?
आले तर ते मराठीतून येईल व ते येथे मिपा वर प्रसिध्द होईल असे तुम्हाला ही वाटते का ?
जे काही घालण्याचा घाट घालता आहे मराठी मंडळाने त्या बद्दल तुमचे मत कुठे आहे ?
उतरांची वाट पाहत आहे.. !

राज,
मिसळपाव हे काही सर्व बातम्या मिळण्याचे स्थळ नव्हे.
इतरत्र बघितले तर सगळ्या बातम्या मिळतील. कसे ?

हा हा हा! फोकलिचा देवकुळ्या कसले खंडन करतोय, या लेखाने त्या बिचार्याची तर साफ बोलतीच बंद होईल! :)
तात्या.
दरम्यान,
ममंबेए कडे वाचनालयात फक्त ५०० मराठी पुस्तके आहेत, असे श्रीपाद म्हणतात. माझ्याकडे त्यापेक्षा अधिक पुस्तके आहेत (किमान चौपट).
पण ते जाऊ द्या.
विमसासं च्या सर्व ऑर्गनायजर्सनी लहानपणापासून वाचलेल्या मराठी पुस्तकांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कशी ठरेल ? जास्त ? कमी ? *इक्वल* ?

त्यांनी मराठी पुस्तके वाचली असतील असे काहीसे म्हणायचे आहे का तुम्हाला?
अहो मराठीचे नाव काढले की भडकणारी माणसे महाराष्ट्रात आहेत ... तुम्ही अमेरिकेत मराठी वाचायच्या गोष्टी करता?
छे छे... असे काही नाही. मराठीत पुस्तके छापली जातात आणि लोक ती वाचतात असे कळले तर ब-याच जणांना फेफरे येते
आणि अशीच मंडळी ऑर्गनायजर्स असतात ....
बाकी आपले सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते... पदरचा पैसा मोडुन मराठी जगवणारे तेच खरे.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
सतरंज्याच उचलायला कार्यकर्ते हवे असतील, तर तासाला डॉलर देऊन सतरंज्याच नव्हे, तर आणखी बरेच काही उचलणारे (आणि वाईपणारे) मिळतात.
ओके. दॅट्स युवर बॉटमलाईन. गेज द रेस्ट ऑफ द एक्स्पेंडिचर्स फ्रॉम धिस !
-- सर्किट
श्रीपादराव,
आपला लेख इतका अप्रतीम आणि मुद्देसूद आहे की सदर लेखाला आम्ही आपली परवानगी न घेता, उत्स्फूर्तपणे या आठवड्याच्या "मिपा - संपादकीय" चा दर्जा देऊन दाद देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर लेखाच्या 'साप्ताहिक संपादकीय' निवडीविषयी आपला काही आक्षेप असल्यास अवश्य कळवा, आम्ही शीर्षकातील 'मिपा संपादकीय' हे शब्द वगळू!
तात्या.
हा लेख काल स्टँन्ड अलोन म्हणून वाचला. मिपावरच्या लेखनस्वातंत्र्याचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने वाचून काणाडोळा केला. इथे कुणालाही काहीही प्रगटन करण्याचा आमच्याइतकाच अधिकार आहे असे आम्ही मानतो. परंतू आज हाच लेख "मिपा संपादकीय" म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे हा प्रतिक्रियाप्रपंच!
लेखकाच्या बाकी मुद्द्यांवर श्री. देवकुळे यांचा प्रतिसाद मागितला गेला आहे. तो आणण्यास आमचे स्नेही बे-एरिया मठाधिपती श्री. सर्किटस्वामी समर्थ आहेतच. तेंव्हा आम्ही त्या प्र(ति)सादाची शांतपणे प्रतिक्षा करू.
परंतू एका मुद्याबाबत मात्र इथे लिहिणे मिपाहिताच्या दृष्टीने आवश्यक वाटत आहे....
काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत.
हा अत्यंत गंभीर आरोप आहे. अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीमधील अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आणणारे हे कॄत्य आहे. एखादा लेख जेंव्हा त्या संस्थळाचे संपादकीय म्हणून प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यातील विधानांच्या सत्यतेची खात्री करून घेणे केंव्हाही योग्य. तेंव्हा मिपाव्यवस्थापनाने या आरोपामागील सत्यासत्यतेच्या पुराव्याची पडताळणी केली असेलच.
मंडळाने जर खरोखरच अशी पत्रे पाठवली असतील तर ते निंद्य आहेच. पण वस्तुस्थिती जर तशी नसेल तर एखाद्या मुळात मराठी पण आता अमेरिकन नागरीक असलेल्या व्यक्तिच्या तक्रारीवरून यात डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (ज्यात एफ्.बी. आय. ही येतं!) इन्व्होल्व्ह होऊ शकते.
तेंव्हा अशी विधाने "संपादकीय" म्हणून प्रकाशित करतांना पूर्ण खात्री करूनच करावी हा इशारा!!
मिपाचा हितचिंतक,
पिवळा डांबिस
साला हे आम्हाला माहितीच नव्हतं. एरवी श्रीपादरावांचा लेख खूपच सडेतोड, मुद्देसूद वाटला म्हणूनच केवळ त्याची संपादकीय म्हणून निवड केली. डांबिसरावांच्या मुद्द्यावर श्रीपदरावांनी अवश्य खुलासा करावा..
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (ज्यात एफ्.बी. आय. ही येतं!)
मला डिपार्टमेंट ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी असं म्हणायचं होतं, चुकून इण्टर्नल लिहिलं पण त्यामुळे बाकी काही फरक पडत नाही...
-पिडां
कला ह्या संस्थेच्या एका कार्यकर्त्याला भारतातून अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा मिळू नये ह्यासाठी यूएससीआयएस ला पत्र पाठवण्यात आले होते, अशी बातमी मीही (एका खात्रीलायक स्रोताकडून) ऐकलेली आहे. नक्की कुणी पाठवले होते, ह्याबद्दल साशंक आहे. परंतु, हे पत्र सदर सदस्याने, लोकमत, मायबोली, मिसळपाव ह्या सर्व स्थळांवर विमसासं ला विरोध करणारा लेख प्रकाशित केल्यावर पाठवण्यात आले होते, हे नक्की.
-- सर्किट
आक्षेप आमचाही नाही. पण सदर लेख हे एकतर्फी लिखाण आहे. दुसरी, बाजू समोर आलेली नाही. त्यामुळे 'मिपा - संपादकीय' चे निकष काय? असा प्रश्न मनात उभा राहतो. अर्थात, 'मालकांची मर्जी ' हा मुद्दा विचारात घेतला आहेच.
कलंत्रीकाका,
हाच खरा कार्यक्रम व्हायला हवा.
हा कार्यक्रम अमेरिकेतही होतोच (स्वानुभवः-) पण संमेलनात नको, असे वाटते. कारण १५० डॉलरचे तिकीट लावून बघण्याइतका इंटरेस्टिंग कार्यक्रम नाही हो तो !
-- सर्किट
पैकी मुद्दा क्र १, २, ३ आर्थिक गैरव्यवहार, किंवा हल्गर्जीबद्दल आहेत. ते योग्य वाटतात.४. हा मुद्दा ठीक वाटतो. मंडळ एक संस्था आहे, राज्यशासन नव्हे. संस्थेने जास्तीतजास्त लोकसंग्रह करण्यात संस्थेचा नावलौकिक होतो, संस्थेचे भले होते. पण लोकांना विश्वासात घेतलेच पाहिजे असे कर्तव्य नाही. (मिसळपावाचा निर्माण तात्यांनी पैसे टाकून, नीलकांत-वगैरेंनी वेळ खर्चून जितका केला, त्याबद्दल आम्हाला अप्रूप वाटते. इथे खूप लोकांना वाव मिळतो. पण सुरुवातीला मिसळपाव बनवणार्यांनी "मराठी जालविश्वाला" विश्वासात घेतले नाही, असे म्हणणे म्हणजे जरा फारच होईलस वाटते.)
५. संस्थेचा जन्मदिवस नेमका काय? हा प्रश्न पडला तर लपवाछपवीच होते आहे, असे वाटत नाही. एवढ्या मोठ्या विद्यापीठातला आमचा विभाग - पण विद्यापीठाने विभाग उघडण्याबद्दल चर्चा केली, की तसा ठराव मांडला, की पहिला प्राध्यापक नेमला, की हंगामी-हंगामी सत्र थांबवून पहिला स्थायी प्रमुख नेमला... जन्मतारीख कुठली म्हणायची त्याबद्दल विभागात एकमत नाही. तरी मागच्या वर्षी विभागाच्या २५व्या वाढदिवसाचा सोहळा झाला. एकमत नाही, म्हणजे गैरविचारांची लपवालपवी आहे असे नाही.
६. कार्यकारणीतले लोक पुस्तके वाचत नसावेत असे लेखकाच्या मनात आले, हा मुद्दा नव्हे. ही विनोदी टिप्पणी आहे. वाचनालय लहान आहे, कारण संस्था लहान आहे, असे वाटते. संस्थेत किती थोडे सदस्य आहेत ते लेखकाने वरती नमूद केले आहेच.
७. वरीलप्रमाणेच - संस्था लहान आहे, म्हणून कार्यक्रमांत हजेरीचा आकडा लहान आहेत.
८. कार्यक्रमाला दुरून येणार्या लोकांनी पर्यटनही करावे, यात मला फारसे वाईट वाटत नाही. वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये भरती होण्यासाठी मुलाखती देत होतो, तेव्हा त्या गावांत थोडेबहुत पर्यटन केल्याचे मला आठवते. कॉलेजच्या माहितीपत्रांत, मुलाखतीसाठीच्या निमंत्रणपत्रांत "आमच्या गावांतली काही आकर्षणे" म्हणून पर्यटनस्थळांबाबत माहितीसुद्धा होती. पुण्याच्या कॉलेजात मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा पुण्यातील नातेवाइकांना भेटलो. एवढे काही पातक केले नाही, असे मला वाटते. लेखकाचा हा मुद्दा मला केवळ क्रोधामुळे दूषित झालेला वाटतो.
९. हा चांगला प्रश्न आहे. पण हा केवळ वर्गणीदार सदस्यांना विचारायचा हक्क आहे. मोठे नाव असलेल्या "चांद-तार्यांना" आणून फुकटात फिरवून जर सोहळ्यात झगमग होणार असेल, तर त्या झगमगाटाबद्दल नेमका किती खर्च करावा? ५ रुपये, ५० रुपये, ५ लाख रुपये? हा नफा-तोट्याबद्दल "बिझिनेस डिसिजन" आहे. फुकट्यांमुळे तिकिटाची किंमत वाढत असेल तर सदस्य नसलेल्यांनी तिकीट विकत घेऊ नये - तक्रारीला काय जागा? मात्र सदस्यांच्या वर्गणीतून पैसे निघणार असतील, तर सदस्यांनी तक्रार करावी. व्यवहार कार्यक्षम नसेल तर आयोजकांना बडतर्फ करावे. पण वर्गणीदार सदस्यांनीच.
१०. हा वारुळाचा वाल्मिकी केलेला आहे. मोठ्या कार्यक्रमांत असली बारीक-सारीक उप-उद्दिष्ट्ये भरपूर असतात. हा विद्यापीठांतील प्राध्यापकांना निमंत्रणपत्रे धाडण्यात नेमका किती खर्च होतो आहे? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!
११. "व्हीसा"बाबत आश्चर्य वाटते. कोणाला स्थायिक-व्हीसा नाकारा असे पत्र सरकारला धाडायचा हक्क कुठल्या निव्वळ सांस्कृतिक संस्थेला कसा आहे, असा प्रश्न मला पडतो. सरकारी ऑफिसात ते पत्र मिळाल्यावर संस्थेचे हसे होईल! पण अशी ढवळाढवळ कोणी केली तर ते पाजी वागणे होय - सहमत.
१२. बरे २५०० या ऐवजी २००-५०० लोक आले. व्यवस्थापन फसले. संस्थेच्या पदाधिकार्यांना हवेत महाल बांधायचे होते - कोसळले. गरीब बिचारे. वर्गणी देणार्या सदस्यांनी त्यांना पदच्युत करावे. नाहीतर बे एरियातल्या हजारो मराठी लोकांनी या २००-३०० सदस्यांच्या मंडळाकडे यथेच्छ दुर्लक्ष करून नवीन भव्य मंडळ काढावे.
१३. हा मुद्दा मुळीच समजला नाही. वर मंडळ तोट्यात जाते आहे, म्हणून दोष दिलेला आहे. इथे गल्लाभरू म्हणून कार्यक्रमाची हेटाळणी केली आहे. हृदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना बोलवायचे नाही, म्हणजे "साहित्यिक" शब्दाचा कीस पाडणे, असे मला वाटते. शुद्ध साहित्यिक, शुद्ध सांगीतिक, शुद्ध नाट्यकला अशी संमेलने भरवायला मोठ्या लोकसंख्येत मराठी लोक लागतील. मराठी मुलुखापासून दूर एकाच जंगी कार्यक्रमात मराठी नाटके-गाणी-साहित्य सर्वांचा सोहळा केला तर काय वाईट? "मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन" असे नेमके नाव दिले नाही म्हणून बिचार्या हृदयनाथांवर का डाफरा?
बाकी बे एरियामधल्या मराठी लोकांच्या हेव्यादाव्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. तरी असे वाटते, की श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी काही वस्तुनिष्ठ मुद्दे मांडले आहेत, ते बाकी क्रोधविवश आणि व्यक्तिनिष्ठ मुद्द्यांपासून वेगळे करायला हवे होते. पण त्यांचा लेख अधिक परिणामकारक झाला असता.
श्री धनंजय यांच्या मुद्द्यांशी सहमत.
लेख वाचताना संख्येबद्दल मला जरा शंका आली. बे एरियात केवळ १००० मराठी कुटुंबे? ह्यूस्टन सारख्या शहरात तसेच कनेटिकट सारख्या छोट्या राज्यात मराठी कुटुंबांचा आकडा पाचशेच्या पुढे नक्कीच आहे. तसेच कनेटिकटच्या मागील काही कार्यक्रमात २५० पेक्षा जास्त लोक काही प्रयत्न न करता येत आहेत. जर साहित्य (तसेच सांस्कृतिक) संमेलनाला तेवढेच लोक येणार असतील तर मला आपल्या मराठी म्हणून घेण्याची कीव करावी असे वाटू लागले आहे. नक्की हे अकडे असेच आहेत का?
ममबेए कडून खुलासा झाल्याशिवाय पडताळणी होणे नाही.
श्रीपाद राव,
मंडळाचा आढावा चांगलाच घेतला आहे. :) काही गोष्टीत सहमत, काहीत माहीती नाही त्यामुळे मुग गिळने हे आलेच.
शिकागो मंडळाचा एक प्रमूख म्हणून मलाही असे सांगावेसे वाटते की एक न्युजर्सी सोडले तर इतर ठिकानी मंडळाचा कार्यक्रमांना फारसा प्रतिसाद लाभत नाही. प्रत्येक कार्यक्रमात तीच ती ठराविक टाळकी असतात. मंडळ भलेही २००० लोक सदस्य आहेत असे सांगत असुदे, प्रत्यक्षात लोक येत नाहीत असाच अनेक वर्षांचा अनूभव आहे. कदाचित देवखुळ्यांनी टोटल ( नॉन ऍक्टीव + सदस्य) लोकांना एकत्रीत करुन तो आकडा दिला पण त्या आकड्याचा प्रत्यक्षात किती फायदा होणार हे त्या दिवशीस दिसेल.
मराठी साहित्य समेंलन हे महाराष्ट्रातच व्ह्यायला पाहिजे असे वाटते. कारण सा संमेलनात पुस्तक विक्री हा एक प्रमुख उद्देश असतो. प्रत्यक्ष लेखकाच्या मुलाखती, भेटगाट हे ही होत असते. इथे अमेरिकेत किती जणं पुस्तक विकत घेऊन त्या साहित्यीकांचा जिवनाला हातभार लावणार आहेत ते देवजाणे. आणी ते ही शक्य नाही कारण पुस्तक हे भारतीय रु मध्ये असतात तर कार्यक्रमात मंडळ हे वर २-५ डॉलर जास्त लावून विकनारे असते, त्यामुळे तिथेही फायदा पाहीला जातो. मागे कुठली तरी ग्रंथ यात्रा ही फेल गेली होती. ( नक्की ती ग्रंथ यात्रा आठवत नाहीये पण पुस्तके विकन्याचा प्रयोग झाला होता). विश्व साहित्य परिषदेत असे होणार आहे की नाही हे माहीत नाही.
धनंजय तुमचा कलाकारांचा मुद्दा बरोबर असला तरी इथे कलाकार जास्त अन साहित्यीक कमी असे दिसतेय म्हणून श्रीपाद रावांनी तसे लिहीले असेल.
देवखुळेंनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे असे काही नाही कारण आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे जे काही होत आहे त्यास आमच्या शुभेच्छा.
महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांवर तिकडे अमेरीकेत मजा करा लेको..! खा लेको आमच्या पैशांनी अमेरीकन मटाराची उसळ आणि शिक्रण!
च्यामारी साहित्य संमेलन तिकडे अमेरिकेत आणी पैशे मात्र महाराष्त्राचे हे का म्हनुन बर
ईकड किति हाल तिकडे मात्र सर्व मालामाल

अमेरिकेतील मंदी घालवण्याच्या अनेक उपायांपैकी हा एक दिसतो.
पूर्वी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे म्हणायची पद्धत होती.
आता कोणाच्या मदतीला धावला म्हणायचे?(अमेरिकेतल्या पर्वताचे नाव माहीत नाही. आमचा भूगोल पहिल्यापासून कच्चाच).
खराटा(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
नमस्कार,
सर्व प्रथम या लेखाला 'मिपा संपादकीय' हा दर्जा दिल्या बद्दल तात्या अभ्यंकरांचे मनापासून धन्यवाद. मिपाकर मंडळींनी दाखवलेल्या समंजस आणी चौकस पणाबद्दल पण त्यांचे धन्यवाद.
या धाग्यावर अनेक प्रकारची मते प्रदर्शीत झालेली आहेत. प्रश्न विचारणे, आवाज ऊठवणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. अशा प्रकारची मते येणार हे मी गृहीत धरलेच होते. आमचे एक गुरुजन नेहमी म्हणायचे कि एखादा नविन विषय शिकल्यावर जर तुम्हाला प्रश्न पडले नाहीत तर त्याची दोनच कारणे असू शकतात, एक तुम्हाला हा विषय पुर्णपणे समजला किंवा दुसरे म्हणजे तुम्हाला या विषयातले काही म्हणता काही कळले नाही. मिपावर प्रश्न नसते आले तर ती या लेखाची फार मोठी हार होती. परंतू मिपाकरांनी माझ्या या विश्वासाला तडा जावू दिला नाही, धन्यवाद.
त्या सगळ्यांची उत्तरे मी निश्चितच देईन. मी स्वतः संगणक क्षेत्रात काम करत नसल्याने मराठी टंकलेखनात (एकंदरीत संगणकाबद्द्लच म्हणाना) मला खास प्राविण्य नाही. हा लेख लिहावयास मला एक आठवडा लागला. त्यातून काही घरगुती अडचणींमुळे मला काल सबंध दिवस वेळ मिळाला नाही. थोड्याच कालावधीत मी या सर्व शंकांचे समाधान करण्याचा जरुर प्रयत्न करेन. आणखी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे मी हा लेख लिहीताना कोणावर ऊगाच गरळ ओकण्याच्या उद्देशाने लिहीला नाही. यात कोणावरही वैयक्तीक स्वरुपाचे आरोप केलेले नाहीत. सगळीकडे मंडळाची कार्यकारिणी असे नमुद केले आहे. हे काही आकसापोटी केलेले लिखाण नसुन जे समोर चालले आहे ते चुकीचे आहे आणी त्याला वाचा फोडली पाहिजे याच हेतूने लिहीले आहे.
धन्यवाद,
श्रीपाद कुलकर्णी
धन्यवाद श्रीपादराव. आपल्याला संगणकाचा फारसा सराव नाही हे समजले. तरीही आपल्या सवडीने येथील काही मंडळींनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर मात्र अवश्य द्या..
आपला,
(पुराव्याने शाबित) तात्या.

---- पिवळा डांबिस साहेब, अहो मी सुध्दा अमेरिकेतच रहातो आणि मी येथील कायद्यांचा देखील अभ्यास केला आहे. या मुद्दयामध्ये जे काही लिहीले आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तात्याराव अभ्यंकरांना मी व्य. नि. पाठवून हे कळवले देखील आहे.
धनंजय,
आता आपल्या हरकतींना/मु्द्यांना ऊत्तरे:
पैकी मुद्दा क्र १, २, ३ आर्थिक गैरव्यवहार, किंवा हल्गर्जीबद्दल आहेत. ते योग्य वाटतात.
४. हा मुद्दा ठीक वाटतो. मंडळ एक संस्था आहे, राज्यशासन नव्हे. संस्थेने जास्तीतजास्त लोकसंग्रह करण्यात संस्थेचा नावलौकिक होतो, संस्थेचे भले होते. पण लोकांना विश्वासात घेतलेच पाहिजे असे कर्तव्य नाही. (मिसळपावाचा निर्माण तात्यांनी पैसे टाकून, नीलकांत-वगैरेंनी वेळ खर्चून जितका केला, त्याबद्दल आम्हाला अप्रूप वाटते. इथे खूप लोकांना वाव मिळतो. पण सुरुवातीला मिसळपाव बनवणार्यांनी "मराठी जालविश्वाला" विश्वासात घेतले नाही, असे म्हणणे म्हणजे जरा फारच होईलस वाटते.)
---- तात्यांनी विश्वजालाला विश्वासात घेतले नाही याची तुलना ईथे करू नका. मिपाचा सगळा खर्च तात्या उचलत आहेत, तसेच मिपा सदस्यांकडुन तात्यांनी सदस्यत्व घेतलेले नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे मिपा हे ना नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर चालणारी आणि अमेरिकेत रजिस्टर्ड झालेली संस्था नाही. त्यामुळे ही तुलनाच चुकीची ठरते. मंडळ आपल्या सदस्यांकडुन वार्षीक सदस्यत्व घेते. तसेच अमेरिकेत ८०(क) या नियमाप्रमाणे रजिस्टर्ड झालेली, ना नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर काम करणारी संस्था आहे. त्याच्या नियमावलीत जे नियम आहेत त्यानुसार जर ते वागले नाहीत तर संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द होवू शकते. आधी म्हटल्या प्रमाणे मी कायद्याचा अभ्यास केला आहे हे लक्षात ठेवावे.

---- एकमत नसणे आणि गोष्ट मुद्दाम लपवून ठेवणे यात फरक आहे असे नाही वाटत? तुमच्या आजीचे वय ८० आहे कि ८५ हे तुम्हाला (आणी तिला देखील) ठावूक नाही ह्याने फरक पडत नाही पण जर तुमच्या मुलीचे वय सध्या ३० आहे आणि तिला पहायला आलेल्या मंडळींना तुम्ही २५ सांगीतले तर? ही फसवणूक नाही का? कोणाच्या का फायद्याची असेना!!

--- संस्था लहान नाही आहे. पण ह्या सगळ्या गैर-कारभारामुळे संस्थेच्या कार्यक्रमांना कोणी जात नाही ही वस्तुस्थीती आहे. तसे नसते तर १९९९ साली झालेल्या संमेलनाला ४००० लोक आले नसते. २००५-२००६ पर्यंत सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होतच होती. त्या नंतर मंडळात जे काही राजकारण चालू झाले कि ज्यांना मनाची चाड आहे तो माणूस तिकडे फिरकेनासा झाला.

--- वरीलप्रमाणेच

---- कसा काय क्रोधामुळी दूषित झाला? मुख्य कार्यक्रमाला नुसती नावापुरती हजेरी लावायची आणी नंतर गावभर उंडारायचे हे बरोबर का? साहित्य संमेलन करता आहात ना मग मुख्य कार्यक्रम मराठी साहित्याशी निगडीत ठेवा ना!! साहित्याशी संलग्न असलेले कार्यक्रम ४-५ आणी नाच-गाणी, फुल्टू धमाल यांची मात्र ३ दिवस रेलचेल असे का?
एक उदारहण देतो: समजा तुम्ही पुण्याच्या कॉलेजात मुलाखतीसोडून गावभर भटकलात असता तर? किंवा १० कॉलेजात न जाता फक्त १-२ कॉलेजातच गेला असतात तर? यात काही पातक केले असे तुमच्या पालकांना नाही वाटणार का? जेव्हा तुम्ही मुळ उद्देशच विसरता त्याला तुम्ही पातक केले असे नाही म्हणणार? पर्यटन जरूर करा, पण आपले मुळ काम सोडुन किंवा त्याला दुय्यम लेखून कराल का?
याही पेक्षा जालीम उदारहण देतो. समजा तुमचे चिरंजीव अभ्यासवर्गासाठी कुठेतरी गेलेत आणी नंतर त्याच्या शाळेतून तक्रार आली की अभ्यासवर्गात अभ्यास न करता तुमचे चिरंजीव तास दोन तास कसेबसे बसून, हजेरी लावून दिवसभर ईकडे-तिकडे उंडारून संध्याकाळी तमाशाच्या कनातीत सापडले. याला काय आपण थोडे-फार पर्यटन म्हणाल? मला वाटतं थोडे-बहूत पर्यटनाचा अर्थ आता आपल्या ध्यानी आला असावा..

---- हा प्रश्न विचारणार्यांनाच धमकावले गेले ना साहेब.

---- अश्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये छोटी उद्देश असतात/असावीत हा मुद्दा मान्य. मुद्दा खर्चाचा आहेच कुठे? एव्हढे पैसे खड्ड्यात टाकता आहात आणखी थोडे गेलेते. पण जेव्हा केवळ प्रसिध्दीसाठी अशा गोष्टी केल्या जातात त्याचे वाईट वाटते. दुसरे म्हणजे आपण काय बोलतो याचे भान ठेवणे आवश्यक नाही का? जेव्हा एखाद्या संस्थेतर्फे आपण बोलता तेव्हा आपली संस्था मराठी लोकांचे प्रतिनिधीत्व करते आहे याचा विसर पडून कसा चालेल? तसे नसते तर जया बच्चन जेव्हा 'हम युपी वाले है हम हिंदीमेही बात करेगे' असे बोलल्या तेव्हा एव्हढा गजहब करण्याचे काय प्रयोजन होते?
आणखी एक उदारहण देतो: समजा तुमच्या कंपनीतील एखाद्या जवाबदार व्यक्तीने सगळ्या कामगारांना भरमसाठ आश्वासने दिलीत आणि ती नंतर पुर्ण केली नाहीत तर 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली' असे म्हणून सोडुन द्याल?

---- असे दुसरे मंडळ काढा असे म्हणणे सोपे आहे साहेब. ज्या लोकांनी या मंडळाची स्थापना केली आणि हे मंदीर उभारले ते काय बडव्यांच्या हाती किल्ल्या देण्यासाठी?

---- आपल्या समजण्यात काहीतरी चुक झाली आहे. मी मंगेशकर आणी ईतर कलाकारांवर डाफरलो नाही तर 'साहित्यिक' या नावावर खपवण्याच्या वृत्तीवर टिका करतो आहे. हा दोष हृदयनाथांवर मंगेशकरांचा कसा?
---- दुसरी गोष्टः "शुद्ध साहित्यिक, शुद्ध सांगीतिक, शुद्ध नाट्यकला अशी संमेलने भरवायला मोठ्या लोकसंख्येत मराठी लोक लागतील. मराठी मुलुखापासून दूर एकाच जंगी कार्यक्रमात मराठी नाटके-गाणी-साहित्य सर्वांचा सोहळा केला तर काय वाईट?" हा प्रश्न आपल्याला पडला आहे. मग अशी स्पेशलाईज्ड संमेलने करायचीतच कशाला. कुठल्यातरी खेड्यात विज नसलेल्या ठिकाणी संगणक विक्री आणि दुरुस्तीचे दुकान काढाल का आपण? समजा काढले आणी नाव ठेवले 'अलाणा-फलाणा काँपुटर - विक्रि आणी दुरुस्ती' आणी तिथे विकायला ठेवला साबणचुरा, पान-तंबाखू, इ. इ. इ. आपल्या पुलंनी म्हटलय ना तस 'नाव काय राजे-भोसले आणी चालवतात पिठाची गिरणी'. काही अर्थ आहे का?
आणि आपण म्हणता तसे सर्वगुण संपन्न संमेलन होतेच की. याच वर्षी आहे फिलाडेल्फियात, येताय का? http://www.bmm2009philadelphia.org/bmm2009/index.htm
त्याला कधी नाही म्हटले. पण सांगताना आव आणायचा की आपण 'साहित्य संमेलन' भरवतो आहोत म्हणून आणि करायची नाच-गाणी. हा ताकाला जवून भांडे लपवण्याचा प्रकार का? हीच मी म्हणतो ती लपवा-छपवी!!
एक उदारहण आपल्याला देतो म्हणजे कदाचीत कळेल. समजा आपल्याला एक १७-१८ वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने एके दिवशी आपल्याकडे 'नृत्याच्या कार्यक्रमा'ला जायचे म्हणून तिकिटासाठी पैसे मागीतले. तुम्ही पैसे दिलेत आणि मागाहून आपल्याला कळले कि तो 'चांदनी डान्स बार' मध्ये जावून पैसे उडवून आला. आता आपण काय करणार? नृत्याचा कार्यक्रमच, फक्त 'बारमध्ये' हा शब्द घालायचा राहीला!! आणि जर आपले चिरंजीव आपल्याला म्हणाले की तुम्ही फक्त 'नृत्याचा कार्यक्रम' या शब्दाचा किस पाडता आहत तर?

---- या लेखात कुठलाच मुद्दा वैयक्तीक आरोप करणारा किंवा रागाच्या भरात लिहीलेला नाही. आपल्याला यात राग/क्रोध कुठे दिसला? मला जर या लेखात एखादे जरी उदारहण दाखवले तर बरे होईल साहेब. नाही पुढच्या वेळेस लिहीताना कोणालाही दुखावणार नाही या बेताने तरी लिहीन. अहो आपल्या पुलंनी म्हटलेच आहे एखाद्याची हजामत केली तर त्याला स्वच्छ दाढी केल्या सारखे वाटावे वस्तर्याने ईजा होवू नये. काय पटते का?
=======================
आता काही नवीन मुद्दे.
तात्यांनी म्हटल्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार या संमेलनासाठी २५ लाख रुपये देणार आहे आणि हे मंडळ निर्लज्ज पणे घेणार आहे. अरे काही जनाची नाही तर मनाची. भारतातून पैसे आणून ईथे चंगळ करण्याचा एव्हढा का अट्टाहास? खरं म्हणजे एन. आर. आय. लोकांनी भारतातल्या लोकांसाठी काही करावे ही अपेक्षा असते/आहे. या २५ लाख (आणी हे मंडळ करणार आहे तो खर्च वेगळाच) रुपयात महाराष्ट्रात कितीतरी गावात बोअरवेल बांधता येतील. कित्येक ठिकाणी शाळा सुरु करता येतील. किंवा आणखी काही विधायक कार्ये करता येतील.
आणी एव्हढाच जर मराठी साहित्या विषयी कळवळा असता तर भारतातील एखाद्या ग्रंथालयाला भरीव मदत करता आली असती किंवा असे आणखी बरेच उपक्रम आहेत की ज्यांना मदत करता येईल. कलाने मराठी पुस्तकांचा प्रकल्प चालू केला आहे त्याला मदत करता आली असती. याच कला या संस्थेने या पुर्वी 'लेखक आपल्या भेटीला' या सारखे उपक्रम बे एरिया मध्ये राबवले होते, त्याला मंडळाने किती हातभार लावला? शुन्य. कला सारख्यासंस्थेने मराठी सहित्य, नाट्य, संगीत या साठी नुकसान सोसून प्रकल्प राबवले. आणी याच साठी कलाच्या श्री. मुकुंद मराठे यांनी या संमेलनाला विरोध केला. पण दुर्दैवाने त्यांचे सांगणे अरण्यरुदनच ठरले. आजही कला सारखी संस्था नुकसान सोसून हे प्रकल्प चालवते आहे. या संस्थेला विश्वासात घेवून जर हा कार्यक्रम आ़खला असता तर मला नक्की खात्री आहे की हे साहित्य संमेलन खरोखरच दॄष्ट लागण्या सारखे झाले असते. परंतू विश्वासात घेणे तर सोडाच पण साधे सांगण्याचे देखील कष्ट मंडळाला घ्यावेसे वाटले नाही. अहो बरोबरच आहे तसे केले असते तर हवे तसे नाचायला नसते ना मिळाले.
या सगळ्या उदाहरणा वरून काही गोष्ट लक्षात येतातः
१. या मंडळाला साहित्याविषयी कसलाही कळवळा नाही. केवळ खोटे बोलून प्रसिध्दीसाठी धडपड चालू आहे.
२. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी करण्याचा या मंडळाला कोणताही अनुभव नाही.
३. बे एरियात अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची कोणतीही आवश्यकता नाही.
माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि ही माहिती आपल्याला जे जे कोणी मराठी लोक माहिती असतील (ज्यांना मराठी साहित्य/कला या बद्दल आस्था आहे असेच लोकं मी गॄहीत धरतो आहे) त्यांना पाठवा. न जाणो यातून महाराष्ट्र शासनाला जाग आली तर निदान यापुढे अश्या कार्यक्रमांसाठी निधी देताना ते विचार करतील.
आणखी एक विनंती आहे, आपल्याला जर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली / प्रश्न विचारावेसे वाटले तर निश्चीतच विचारा परंतू कृपया करून ते मुळ मुद्द्याला धरून असतील याची काळजी घ्या.
लोभ आहेच तो वाढावा ही ईच्छा..
-- श्रीपाद कुलकर्णी
माझे तर काही प्रमानात समाधान झाले आहे बघू बाकीचे काय लिहतात ते !
धन्यवाद कुलकर्णी साहेब.
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
खरं तर आत्तापर्यंत हा संपादकीय लेख व त्याला पडलेले वेगवेगळे प्रतिसाद मी "निरपेक्ष" भावनेने वाचत होतो.
माझे संभेलनाबद्दल "झाले काय आणि नाही काय, सगळे एकच " असे मत होते, पण ह्या लेखात विवीध मुद्द्यांच्या शब्दशः कीस पाडल्याने व सर्व शंकानां व्यवस्थीत उत्तरे देणारा श्रीपादरावांचा विस्तॄत प्रतिसाद पाहिल्यावर मलासुद्धा ह्या "राजकारणात" रुची वाटु लागली आहे.
आता अजुन व्यवस्थीत अभ्यास करुन माझे मत मांडेन ..!
तरी सध्यापुरते, जर नुसत्याच प्रसिद्धीसाठी पैशाचा अपव्याय घडावुन व सामान्य जनतेच्या करतुन २५ लाख रु. घेउन हे संभेलन होणार असेल व त्यातुन काहीच "चांगले" घडणार नसेल तर संबंधित वरिष्ठांनी ह्याचा पुनर्विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती ...
"देवकुळे साहेबांचे" उत्तरही वाचायला आवडले असते पण आता ते शक्य नाही असे दिसतेय ..
तुर्तास, लेख लिहणार्या श्रीपादसाहेबांचे व विस्तॄत चर्चा करणार्या समस्त मिपाकरांचे आभार व अभिनंदन ..!
------
छोटा डॉन
श्रीपादसाहेब,
सुरुवातीला मलाही हे साहेत्यसंमेलन महराष्ट्रापासुन वेगळे का होत आहे ते कळत नव्हते. मराठी साहेत्य सम्मेलन हे महाराष्ट्रात्च व्हायला हवे या मताचा मी आहे. मी देवकुळे साहेबांच्या उत्तराची वाट पहात होतो परंतु आपल्या मुद्देसुद प्रतीसादानंतर बर्याच शंका कमी झाल्या. धन्यवाद. मंड्ळाला मराठी सम्मेलनासाठी अगदीच काही करायचं होतं तर महाराष्ट्रात होनार्या सम्मेलनाला भरगच्च मदत करुन त्याला अगदी भव्य दिव्य करता आलं असतं. असो. इथले सम्मेलन कसे होते, किती लोकं येतात हे काही दिवसात समजेलच.
आषाढीला विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरातच जायला हवं, इथे कितीही मोठे मंदीर बांधले तरी ते समाधान कुठे.

Mitrano aaNi MaitriNino, now to English; not that my Marathi is bad, but its just easy to type in English. And fonts don't show well on a MAC.
The author of this article seem to have lot of bias against the Mandal, or even every program organized. The data given by the author seems to show that the author has inside information about Mandal. Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal and hence taking the anger on this misal pav. The author seems to have misal but no pav.
As an independent audience, I am not interested in what shenanigans the organizers are playing to make this event possible, I think we are following our Marathi tradition of pulling the legs. I have seen and participated in many conventions of other Indian languages and other professional ones. I don't think drop in participation has anything to do with Mandal. When you watch a movie you don't care what actors or directors have done to make the production. You just care about the product.
The author seem to be a Sahityik and I would recommend spending the energy on positive efforts rather than spoiling the mass psyche.
I feel this is a historic occasion, a change, and we can choose to sit on the sidelines, or even throw rubbish at the organizers; or try to help in every small way possible. You choose your side.
Just the mere fact that we will be surrounded by 40 sahityiks is raising excitement in my spine. How do I care if few people are coming for free. When there is a Sahityasammelan in India, we had invited Praatibha Tai Patil, as a president, we can dig deeper and can find her relation to the Sahitya. So if we are getting few political figures to increase the seriousness, the clout, why get so upset with it?
Why raise concerns about Mandal finances and what is its relation to the event?
Well, since I can not help for the event, at least I will give my best wishes; hopefully I am not on the wrong side. Hope all of us who have contributed to this article come forward and help the cause.
Cheers,
ज्ञानेश्वर साहेब,
आपली मते आम्हाला समजली. तुमच्या मतांचा आम्ही आदरही करतो. परंतु तुमच्या मताशी आम्ही सहमत होउ शकत नाही.
now to English; not that my Marathi is bad, but its just easy to type in English
यावरुनच मराठीविषयी वाटनारी तुमची तळ्मळ आम्हाला समजली. tumachi mate amhala ashi vachayala avadali asati.

आपल्याला मराठी टंकलेखन नाही करता येत हे समजण्यासारखे आहे, अहो पण वाचता येते ना? मी या लेखात काय लिहीले आहे हे पुन्हा एकदा निट वाचावे. बरं हे उत्तर म्हणजे मंडळाकडून आलेला प्रतिसाद समजायचा का? कारण मी यात अगदी स्पष्ट लिहीले आहे की या मुद्यांना मुद्देसुद उत्तर लिहावे म्हणून, पण लेखातील एकाही आक्षेपाला आपण एका ओळीचे देखील उत्तर दिलेले नाही. तात्यांनी लिहिलेल्या मुद्याला तरी उत्तर आहे का?
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नाव श्रीपाद कुलकर्णी आहे, या नावावरून तरी मी पुरूष (ईंग्रजीत ज्याला MALE म्हणतात ना!) आहे हे आपल्या लक्षात येत नसेल तर मराठी साहित्य संमेलन भरवण्या ऐवजी मराठी शिशू वर्ग चालू करण्याची गरज आहे. मंडळ चालवते म्हणतात मराठीचे वर्ग! नाही तर आपण "Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal" असे लिहीले नसते. की या चार ओळींच्या आगापिछा नसलेल्या उत्तरातून तुम्हाला कोणा दुसर्याच व्यक्तीवर शरसंधान करायचे आहे? नाही जर तसे असेल आणी जर आपली बाजू सत्य असेल तर येऊ द्या की लोकांसमोर. अहो मी काही मंडळ किंवा मराठीच्या विरुद्ध नाही. माझा विरोध आहे तो फक्त संमेलनाला आणी तो देखील का याचे सगळे मुद्दे मांडलेत की मी.
आपले आणखी एक म्हणणे आहे की हे एक historic occasion आहे. अहो इतिहास काय हो कसाही निर्माण करता येतो. सत्यम काँपुटर्स ने नाही का इतिहास घडवला!! तसाच हितेन दलालने देखील घडवला होता. हर्षद मेहता, चार्ल्स शोभराज, रंगा/बिल्ला, रामन राघव यांनी पण घडवला. पण कसा आणी काय ह्याला महत्व नाही का?
बरं जर मंडळ इतके उदात्त कार्य करते आहे तर अमेरिकेतील एकाही मंडळाच्या वेब साईटवर किंवा बृहन-महाराष्ट्र मंडळाच्या वेब साईटवर या साहित्य संमेलनाचा साधा उल्लेखही नसावा हे आश्चर्य नाही का? पण खरी गोष्ट अशी आहे कि या पैकी एकाही संस्थेला हे संमेलन अमेरिकेत पळवून आणणे आवडलेले नाही. त्याच प्रमाणे बे एरियामध्ये रहाणार्या आणी ज्यांचा साहित्याशी संबंध आहे अशा एकाही व्यक्तीला इथे संमेलन होणार आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, असे कां?
आणी अहो ह्या तुमच्या उत्तरात तुम्ही डोंगर पोखरून उंदीर पण नाही हो काढलात. फार तर एक गांडूळ काढला असेल. आणी हो गांडूळाला कणा नसतो बरं, त्यामुळे त्याच्या मणक्यातून तुम्ही काय ती म्हणता ना तसली शिरशिरी वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नाही!!
आपण असे ही म्हटले आहे कि या लेखाचा लेखक सहित्यिक असावा. वा! वा!! काय पण जबरा की काय ती म्हणतात ना तसली निरीक्षणशक्ती!! अहो माझ्या आधीच्या उत्तरात स्पष्ट लिहीले आहे की मी कायद्याचा अभ्यास केला आहे म्हणून.
चला बघू परत एकदा हा लेख निट वाचा आणी मग काय ती तुमची शिरशिरी वगैरे येते का बघा! आणी हो पुढच्या वेळेला उत्तर लिहीताना जरा निट वाचून मग लिहा. (हे लिहायचे नव्हते पण काय करणार परिक्षेला जाताना लहान मुलांना असे सांगायची पद्धत आहे ना)
जाता जाता आणखी एक: हा लेख जर तुम्हाला मॅकवर दिसत नसेल ना तर सर्कीट साहेबांना एकदा विचारा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर मॅक वर सगळे काही निट दिसते, याच मिपावर त्यांनी या पुर्वी या बद्दल आपले मत इतरत्र मांडले आहे. की ही देखील एक लोणकढी...
श्रीपाद कुलकर्णी
++++++++

मॅकवर सर्व युनिकोडित मराठी संकेतस्थळे व्यवस्थित दिसतात. नव्हे, गेली तीन वर्षे आम्ही फक्त मॅकच वापरून मराठी संकेतस्थळांना योगदान देत आलेलो आहे. (कोण रे तो, उचापती म्हणाला ?)
जाता जाता एकः आपला अभ्यास बघता, आपले खरे नाव श्रीपाद कुलकर्णी नाही, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. इतकी आतली माहिती असणारे बे एरियात सुमारे ४ लोक आहेत (सध्याची कार्यकारिणी वगळता.)
-- सर्किट
आपले खरे नाव श्रीपाद कुलकर्णी नाही, ...ह्यावर माझा ठाम विश्वास आहे
१०००% सहमत.
तरी सुद्धा मांडलेले सगळे मुद्दे मला पटले आहेत. नावात काय आहे असं संत रामदास म्हणूनच गेले आहेत.
Just the mere fact that we will be surrounded by 40 sahityiks is raising excitement in my spine.
अहो पण स्वत:च्या पैशांनी कण्यात हव्वी तेवढी एक्साईटमेन्ट भरा की! नाय कोण बोल्तो?
पण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या २५ लाखांवर स्वत:चे कणे ताठ ठेवण्यात काय प्वॉईंट आहे? लेको तुम्ही तिकडे खोर्याने कमावता! मग आमचे २५ लाख का वापरता?
तात्या.
>> Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal and hence taking the anger on this misal pav. The author seems to have misal but no pav.
अहो श्रीपाद कुलकर्ण्यांनी उत्तरादाखल दिलेल्या प्रतिसादात नमूद केलंच आहे की कोणावर गरळ ओकण्याच्या हेतूने हा लेख लिहीला नाही. वाचा जरा प्रतिसाद नीट. म्हणे historic occasion .
बा़की तात्यांच्या (महाराष्ट्रातील जनतेचे २५ लाख) मुद्याशी १०० % सहमत. एवढा सोस आहे संमेलन भरवण्याचा तर स्वत:च्या जोरावर मंडळाने का नाही उभारले पैसे ? कशाला हात पसरले महाराष्ट्र शासनासमोर?

उत्तम!
तुम्ही जर तो पुरावा तात्यांबरोबर शेअर केला असेल तर मग आमचं काही म्हणणं नाही.
आम्ही तात्यांना दिलेला इशारा हा फक्त आणि फक्त मिपाचं हित जपण्यासाठी होता. मंडळाची बाजू घेण्यासाठी वा तुमच्यावर टीका करण्यासाठी नव्हे हे कृपया ध्यानात घ्यावे ही विनंती.
आपला नम्र,

तात्या, या मुद्द्यावर तुमच्याशी पहिल्यापासून सहमत आहोतच!
:)
कुलकर्णी साहेब,
तुमचा लेख आणि नंतरचा उहापोह वाचून बर्याचश्या शंका फिटल्या.
मुकुंद मराठ्यांचे आणी 'कला' चे काम मी जवळून अनुभवले आहे आणि 'कला'शी सोयरीक जोडल्यामुळे 'कला' च्या हितशंत्रूंकडून असहकार आणि टिकाटिप्पणी झाली तेही न विसरण्यासारखे. मुकुंद मराठे आणि 'कला' यांनी आपल्याकडून खूप मेहनत केली होती आम्हाला मदत करण्यासाठी त्या पार्श्वभूमीवर हा असहकार आणि टिका अस्थानी होती.
पण तरी हा लेख म्हणजे थोडंसं वरातीमागून घोडं आहे असं वाटतं.
मुळात इथल्या साहित्यप्रेमीला आणी होतकरू साहित्यिकाला वंचित करून त्यांच्याच करातून येणार्या रकमेवर स्वतःचे अमेरिका दौरे करू बघणार्यांना मुळात अमेरिकेतून मराठ्यांचं म टा मधलं पत्र वगळता विरोध झाला नाही ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही.
इथल्या विरोधाला नजरेआड करायचे हे पहिल्यापासून ठरलेले असल्यासारखेच असावे असं वाटत होतं.
तेव्हा तुमचा लेख अत्यंत योग्य आणि मुद्देसूद असला तरी आता त्याचा काय उपयोग असं वाटल्याशिवाय रहात नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अरे खेकड्या मित्रांनो, जसा चुल्हा तव्या वर,
आधी हाताला चटके, तेंव्हा मिलते भाकर!
अरे खेकड्या मित्रांनो, किती चिखल फेकताहो,
जरी मंडळ वाईट, पहिले संमेलन सही होणार!
अरे खेकड्या मित्रांनो, मी जरी असे ईजिनियर,
मेक वर बसणार, मराठीची पुजा करणार!
अरे खेकड्या मित्रानो, किती जरी प्रेक्शक येणार,
साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार!
अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार,
शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!
अरे खेकड्या मित्रांनो, किती कागाळ्या करणार,
मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार!
अरे खेकड्या मित्रानो, ग्रंथ किती ठेवणार,
तुम्ही प्रकाषक असो, आम्ही गुगल बघणार!
अरे खेकड्या मित्रानो, जरी अंकुष, प्रशांत येणार,
आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार!
अरे खेकड्या मित्रांनो, आजी मामा पाहू येणार,
जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार!
अरे खेकड्या मित्रांनो, किती चर्चा करणार,
मराठी माणुस पुढे जावो, आम्ही पाय खेचणार!
अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार,
मैत्रिचा हात पुढे करो, आम्ही खोडा घालणार!
अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार,
जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार!
>>साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार!
काय करणार इक्ता खर्च करून अमेरिकेपोत्तूर येणं परवडत न्हाय खिशाला.
>>शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!
आवो आमच्या म्हाराष्ट्रात लई लई गुणी लोक हायत ज्यांच्यासाठी शास्नाकडे पैसं न्हायीत पण तुम्हा अमेरिकावाल्या धनिकांच्या बोडक्यावर घालायला हायीत.. पोट दुखंल नाहीतर काय!!
>>मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार!
म्हंजी नक्की काय?
>>जरी अंकुष, प्रशांत येणार,आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार!
आगं बाबौ.. अंकुश (ष नव्हे काय!) आणि प्रशांत ह्ये कोन? नट हायीत म्हायती होतं. साहित्तिक बी हेत का? द.मा., फ.मु. अजून कोनीबी आना घरची भांडी आमची आम्हालाच घासावी लागतात की वो? तसं तर तुमच्या अमेरिकेमंदी पण धुण्याभांड्याला बाई नसतीच!
>>जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार!
कवी घरी आल्यावर कोन कंच्या ग्लासात डुंबणार तेची फिकीर करा राव!
>>अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार,

काय पन विनोदी बोलता तुम्ही...
>>अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार,
जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार!
त्ये गांधीवादी कुटं गेलं हे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार,
शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!
अहो पण शासनाचे पैसे म्हणजे आमचेच पैसे ना? मग ते महाराष्ट्रात राहणार्या आम साहित्यप्रेमींसाठीच खर्च झाले पाहिजेत ना?
पोटात दुखेल नायतर काय भांचोत?
आणि ज्ञानेश्वरा, तू कसल्या रे मराठीच्या गप्पा मारतोस? तुला लेका अजून तुझा आयडी नाय मराठीत करता आला! :)

चला, म्हणजे मंडळ वाईट आहे हे तुलाही मान्य आहे तर! :)
आपला,
(मराठी भाषेचा प्रसार करू अश्या केवळ गप्पा न मारता अंतरजालावर तिचा प्रसार आणि प्रचार करणारा!) तात्या.
सर्वप्रथम मला हे लिहायला हवे की, माझे प्रस्तुत मत एक सामान्य मराठी भाषक /वाचक या नात्याने आहे. त्यात संमेलनाच्या बाजूने किंवा विरोधी अशी भूमिका घेण्यात मला बिलकुल राजकीय किंवा इतर कुठला स्वार्थ नाही. गेले काही महिने चाललेला वाद-विवाद मी वाचतोय. ते लिखाण आणि हा धागा वाचून मला जे वाटले तेच लिहितो आहे.
ज्ञानेश्वर यांच्यासारखे , संमेलन-कर्त्यांच्या वतीने जे बोलत आहेत त्यांच्या बाजूचा एक मोठा कमकुवत पैलू मला हा दिसतो की , त्यांच्याकडे प्रतिवाद करायला ठोस मुद्दे दिसत नाहीत. खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही.
थोडक्यात असे, की मिसळपावच नव्हे तर अनेकानेक वृत्तपत्रे , संस्था , व्यासपीठे यांच्यावर , या संमेलनाला विरोध झाला आहे आणि ही आजची गोष्ट नव्हे. यापैकी कुठल्याही आघाडीवर , देवकूळे आणि पार्टीने संवाद साधला आहे , आरोपांचे खंडन केले आहे, काही सफाई दिली आहे असे माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकास माहिती नाही. (मराठी आंतरजालावरच्याना , या उत्तरदायित्त्वाच्या अभावाच्या या घटनेवरून काही गोष्टींची आठवण येऊ शकेल ..)
ज्ञानेश्वर यांच्यासारख्या लोकांकडे अभिनिवेश आहे पण त्यांच्या तात्त्विक किल्ल्याला जी भगदाडे पडलेली आहेत त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि या भगदाडांना "झारीतल्या शुक्राचार्यांनी पाडलेली छिद्रे" असे समजून मोकळे होतात. किंबहुना , आता ही गोष्ट स्पष्ट आहे की , "तात्विक बाजू" या गोष्टीचा , या मंडळीना फारसा थांगपत्ता नसावा. त्यांनी कनेक्शन्स जुळवली आहेत , मंत्री-संत्री , कला-क्रीडादि क्षेत्रातली मंडळी , ट्रॅव्हल एजन्ट्स, व्हिसा ...सर्व सर्व तय्यार आहे. मात्र ज्या लोकांकरता हे करायचे त्या लोकांकरताचे उत्तरदायित्त्व धाब्यावर बसलेले आहे. माझी स्मृती मला दगा देत नसेल तर , २६ नव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यानंतर रत्नागिरीचे संमेलन रद्द झाले. सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते.
संमेलनकर्त्यांपेकी कुणी मिपावरच काय , कुठल्याही व्यासपीठावर येऊन काही एक भूमिका , काही मुद्देसूद उत्तरे देण्याची अपेक्षा व्यर्थ आहे हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी, मुंबईत अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्यांना मंडळ श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यासाठी त्यांना धीरगंभीर आवाजाचे कुणीतरी हवे आहे, म्हणून माझ्याकडे विचारणा झाली होती. परंतु पहिल्या दिवशी मी संमेलनात अनुपस्थित असल्याने मला जमणार नाही, असे कळवले. इथे कुणाचा आवाज धीरगंभीर असेल, तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा.
-- सर्किट
रीतसर खिशाला चोट देऊन तिकीट काढले आहे (१५० डॉलरचे). त्यामुळे संमेलनाला हजर राहणारच आहे. फक्त पहिल्या दिवशी कामानिमित्त परगावी असल्याने जमणार नाही.
च्यायला, नेमके तुम्ही कुठल्या पार्टीतले ते (नेहमी प्रमाणेच) कळेना झालंय राव!
चालायचेच !
:-) :-)
-- सर्किट
जर का कुणी पक्षनिरपेक्ष भूमिका घेतली असेल तर (निदान अशा बाबतीत तरी) हे स्वागतार्ह मानायला हवे. "जर तुम्ही आमच्याबरोबर नसाल तर तुम्ही आमच्या विरोधातच असला पाहिजे" असा, निर्बुद्ध "झिरो सम" खेळ खेळणारे टेक्सास रांचला गेले परत.
थोडासा ठोकताळा करायचाच झाला तर :
साहित्य संमेलन अमेरिकेला होते हे चांगले का ? अशा प्रकारचा पायंडा पडणे योग्य का ? : हो.
देवकुळे आणि कंपणीने हे मिशन एका स्वयंसेवी आणि विश्वस्त भूमिकेतून केले असल्यास त्यांच्या उपक्रमशीलतेची , श्रमांची , प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे का ? : हो
मात्र हे करताना या मंडळींनी अनेकविध पातळ्यांवरचा विधिनिषेध , उत्तरदायित्व यांचे दर्शन घडवले असे म्हणता येईल का ? : मोठ्या प्रमाणावर सांगायचे , तर नाही.
याकरता २५ लाख रुपये बुडीत खात्यातल्या महाराष्ट्र सरकारकडून घेतले असले तर ते बरोबर का ? : नाही.
२६ नव्हेंबरच्या घटनानंतर , जेव्हा या संमेलनाचे भावंड रद्द केले जाते तेव्हा हे संमेलन भरवणे योग्य का ? नाही.
तेव्हा , माझ्या दृष्टीने , गोळाबेरीज करताना , अनिष्ट बाबींचे पारडे वरचढ ठरते असे दिसते.
आता संमेलन होणार हे तर अटळ आहे. मग देवकुळे नि कंपनीला थोडेसे परिमार्जन कसे करता येईल ?
- २५ लाख रुपये परत देणे (घेतले असल्यास !). किंवा त्याचा विनियोग महाराष्ट्रात समाजोपयोगी कार्याला करणे.
- संमेलनाचे सूप वाजल्यानंतर तरी, कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर काही स्पष्टीकरणे देणे.
- संमेलनातून काही आर्थिक फायदा झाला असेलच तर , साहित्योपयोगी/समाजोपयोगी कार्याला हे पैसे देणे.
-
खिशाला 'चोट' देणे म्हणजे काय हो?
खिशाला चाट लावणे ऐकले होते, 'चोट देणे' हे काही नविन आहे का? :D
आजकाल मिपावर शब्दांना चोट हा प्रत्यय लागला की चांदण्या पडत आहेत. तसली तर काही भानगड नाही ना? ;)
अनेक शक्यता :
१. सर्वाधिक शक्यता : फ्रॉईडीयन स्लिप् (मागे कुणीतरी "देवखुळे" असे म्हणून केली होती तशी) . म्हणजे मजे खरोखरी म्हणायचे होते ते "चुकून" म्हणून जाणे ;-)
२. मराठी " खिशाला चाट देणे" आणि हिंदी "पैसेकी चोट खाकर" या दोन भाषांचा गंगाजमनी मनोहारी संगम. =))
३. दादाकोंडके सदृष काहीतरी भयभीषण कोटी - जी आपण सर्व पामरांस झेपणार नाही अशी !
खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही.
असे स्पष्ट म्हणायला कशाला हवे ? मिसळपावाच्या चालकांना त्यांचा इमेल आयडी माहिती आहेच की ! आणि त्यांना मिसळपावाच्या चालकांचा मोबाईल नंबर माहिती आहे.

नुसते कवी कशाला ..... इतके स्वच्छ आणि सरळ छान छान कलाकार आहेतच, ग्लास कसा पुरेल ..... टाक्या लागतील.
या संमेलनाला जो खर्च होणार आहे, तेव्हढा खर्च बे एरिया मराठी मंडळाने महाराष्ट्र शासनाला द्यावा नंतर 'Dyaneshwar' सारख्या लोकांनी गप्पा माराव्यात.
मंडळाने आधी स्वतः सगळा खर्च करतो, कौतिकराव (फुकटे) पाटील यासह अनेकांना फुकट वारी घडवतो अशी प्रलोभने दाखवून संमेलनाला मान्यता मिळवली आणि आता लटपटी खटपटी करून महाराष्ट्र शासनाकडूनच जनतेचे पैसे लाटण्यात यश मिळवले आहे.
आता संमेलन होतेच आहे तर जे काही करायचे ते स्वतःच्या पैशांनी करा, आम्हा करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारुन गल्ला भरू नका एवढेच बे एरिया महाराष्ट्र मंडळाला सांगणे आहे.
बीएमेमनेही त्यांच्या उपक्रमांसाठी सरकारकडून मदत पदरात पाडून घेणे गैर आहे.
या लुटीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे वाटते.
बरेच दिवस होउन गेले ह्या लेखाला पण संमेलन झाल्यानंतर कोणी इथे टिप्पणी केलेली दिसत नाही. संपादकीय लेखाला असे वार्यावर सोडणे बरे नाही. सर्किट ह्यांना काही उत्तर आले का देवकुळेंचे? एकंदर संमेलनाचे कार्यक्रम (दिवसभरातले... संध्याकाळी किंवा रात्रीचे नाहीत) बघून संमेलन चांगले झाले असे वाटते. धर्माधिकारी आणि बाकी व्यक्त्यांचे विचार फार मुद्देसुद होते.
ह्या लेखातील बरेचसे मुद्दे खोडले गेलेत असे वाटते. जाणकार लोकांनी ह्यावर प्रकाश टाकावा....
अफाट जगातील एक अडाणि.

विषय महत्त्वाचा. संदेश योग्य. पण अग्रलेखाला लागणारी मुद्देसूद आणि ठाशीव बांधणी झाली नाही.
बर्याच ठिकाणी (सांस्कृतिक नव्हे! सैद्धांतिक) आक्षेप घेण्याजोगी वाक्ये आहेत.
भारतीय कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता देण्यासाअठी आस्तित्वात आली असे इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
इतिहासाचार्य केतकर की राजवाडे?
पशुपक्ष्यांत नर कधी मादीवर आक्रमण करून तिच्यावर हक्क गाजवताना दिसत नाही.
असे नक्की म्हणता येत नाही.
पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही.
काँट्रोव्हर्शियल
बारीक कीस...

१. पुस्तक राजवाड्यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा विषय यज्ञसंस्कृतीच्या आधीच्या काळापासून स्त्री पुरुष शरीरसंबंधात घडलेले बदल असा आहे. त्यात 'कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता......' अशा अर्थाचे विवेचन नाही.
२. 'कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता ....' असे मत कोणत्याही लेखकाने मांडले असले तरी ते फारच धाडसी विधान आहे.
भारतीय कुटुंबसंस्था ही संपत्तीचे संक्रमण वारसांमध्ये व्हावे यासाठी वारस ठरविण्याचे नियम ठरविताना निर्माण झाली आहे.
यात पुरुषप्रधान विचारसरणीतून योनीशुचितेच्या बाष्कळ कल्पना रूढ होवून स्त्रियांना नियंत्रित केले गेले.
"भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" हे पुस्तक वि. का. राजवाडे यांचे आहे, केतकरांचे नाही. पण या सद्रुश विशयावर केतकरांनी अप्रतिम कादम्बरी लिहिली आहे, "ब्राम्ह् णकन्या".
लेखाचा विशय समर्पक आहे.
विषय महत्त्वाचा आणि स्फोटक, तसाच बर्यापैकी "टाबू" असलेला (अर्थात मिपावर नव्हे!). काही ढोबळ चुका वर काहींनी दाखवून दिल्या आहेतच पण एक अग्रलेख म्हणून थोडा विस्कळीत वाटला.
संभोग शब्दाची फोड आणि दोन्ही शब्दांना असलेले महत्त्व, हे विवेचन विशेष आवडले. डॉ विठ्ठल प्रभू यांच्याशी बोलण्याचा एकदा योग आला होता, तेव्हा ते म्हणाले होते, "Sex doesn't lie btween two legs; it lies between two ears". ह्या वाक्याची आठवण आली.
वेगळ्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल विजुभौंचे अभिनंदन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मुक्तक म्हणुन ठिक. परंतु विषय नीट मांडला नाही.
अग्रलेखाचा हा विषय होवु शकत नाही, कारण ह्या विषयातील विश्लेषण अथवा विचार हे अग्रलेखाच्या मांडणीत येवु शकत नाहीत. तरी पण दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे. असे असले तरी, अग्रलेखाचे शीर्षक पोलीस टाईम्स अथवा तत्सम गल्लाभरु वर्तमानपत्राला साजेसे, अर्थातच आवडले नाही. त्यापेक्षा अधिक प्रतिभेचा उपयोग करुन प्रगल्भ शीर्षक निवडीस वाव होता. राग नसावा.
प्रत्येक वाक्यात अथवा परिच्छेदात, लेखकाने आपल्याला हवा तसा अर्थ लावलेला आहे, त्यामुळे चुकीच्या कल्पना अधिक विकृत करुन मांडल्या आहेत. लेखक म्हणतो, "पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे", जर असे असेल तर अशा पद्धतीने असुरक्षित असलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी (किमान एक) लेखकाने काय प्रयत्न केले याचा खुलासा नाही. त्यामुळे सनसनाटी लिहायचे, संस्कृती आणि आचार विचार यांच्यावर आगपाखड करायची, पुरोगामी असल्याचा टेंभा मिरवायचा, ही आजकाल चलनात असलेली फॅशन लेखकाने चांगली उचलली आहे याबद्दल वाद नाही. अर्थातच, हे करतांना प्रत्येक पुरोगाम्याचे होते तेच लेखकाचे झाले आहे, पुढून झाकले तरी मागुन उघडे पडते अशा रितीने लेखकाचे अनेक गोष्टींचे अज्ञान किंवा लेखकाने केलेली सोयीस्कर अर्थमांडणी वाक्यागणिक दिसते. तपशीलात जाण्याची गरज नाही.
कुठलेही संबंध असोत मग ते नवराबायको असो की आईमुलगी अथवा बापलेक वा मित्रमित्र, अति परिचय आणि निकटता, उबग आणतच असते. परंतु त्यांचा त्याग एका फटक्यासरशी होत नाही. कुठलेही नाते हे फुलझाडासारखे असते. निगराणी ही करावीच लागते.
पुढील लेखनास शुभेच्छा !!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
सहमत आहे विषय भरकटत नेला अग्रलेखाचा हा विषय होवु शकत नाही, कारण ह्या विषयातील विश्लेषण अथवा विचार हे अग्रलेखाच्या मांडणीत येवु शकत नाहीत. ...हे करतांना प्रत्येक पुरोगाम्याचे होते तेच लेखकाचे झाले आहे, पुढून झाकले तरी मागुन उघडे पडते अशा रितीने लेखकाचे अनेक गोष्टींचे अज्ञान किंवा लेखकाने केलेली सोयीस्कर अर्थमांडणी वाक्यागणिक दिसते. तपशीलात जाण्याची गरज नाही.
सर्वात जास्त खटकलेले वाक्य... "लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे"
या विषयावरील लेख "लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित" करण्याची गरज नव्हती. चंद्रकांत काकोडकर, अरुण साधू इत्यादीना समर्पित केला असता तर ठिक होते.
लेखाचा नेमका विषय कळला नाही.
स्त्रियांची सुरक्षीतता / स्त्री वरील शारीर अत्याचार?
स्त्री ची आर्थिक स्वायत्तत्ता?
नवरा बायको तील संबंध सुधारण्या साठी काही टिप्स...
वरील प्रत्येक मुद्दावर स्वतंत्र लेख होउ शकेल..
अग्रलेखाचा नेमका विषय कळल्यास, योग्य प्रतिक्रिया देता येईल.
नक्की विषय कामजीवन आहे की "संसारात पारीजातकाचा शिडकावा" हे तितकेसे कळले नाही. काहीशी प्रोफॅमीली, त्यातुन धर्मसंमत वैवाहीक जीवन अपेक्षीत अशी लेखाची पार्श्वभुमी वाटते.
स्वातंत्र्य, समान हक्क, निर्णयप्रक्रियेत स्थान/मिळुन निर्णय घेणे, आदर, प्रेम, निष्ठा, कदर, पर्सनल स्पेस, कामाची त्यातल्या त्यात न्याय्य वाटणी, दोघांची तडजोडीची तयारी, अक्कल, स्वभाव व अजुन इतर असे अनेक घटक सुखी संसारात येतात. व यातील बर्याचश्या गोष्टींचा कामजीवनावर बरा-वाईट परिणाम होतो असे वाटते.
आजच्या समानतेच्या व स्वातंत्र्याच्या काळात सेक्सला फक्त सेक्स समजुन इतर धाग्यातुन वेगळा काढणे स्त्री व पुरुष दोघांना जमत असावे.
तात्या गाण्याचे क्लासेस काढा. श्री. मंडळी शिकायला येतील. सडा पडत राहील.
विप्र्.सडेकर.
अवांतरः असुरक्षित स्त्रीयांसाठी काहीही करायचे असेल तर संपर्क साधा. सर्व कामे येथे करुन दिली जातील. असा बोर्ड तुम्ही रंगवुन घ्या विजुभौ.
सम-भोगाच्या संपादकियात बरीच विषमता आहे.
सुरुवातीला अर्ध्याहून जास्त विवेचनात स्त्री ह्या दुर्बल (मानल्या गेलेल्या) घटकाची मानसिक, भावनिक आणि शारीरीक कुचंबणा केंद्रस्थानी ठेवून विचार मांडले आहेत. 'संवेदनशील पुरुषांचीही प्रसंगी कुचंबणा होत असते' ह्या वास्तवाला स्पर्शही केलेला नाही.
आजकालच्या दूरदर्शन मालिका पाहिल्या तर त्या सर्व, 'स्त्रियांची कारस्थाने' ह्या वर्गवारीत मोडणार्याच असतात असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.
'सेक्स' हे जेंव्हा एखाद्या स्त्री कडून 'हत्यार' म्हणून वापरले जाते, किंवा 'स्त्री देहाचा' बाजार मांडला जातो तेंव्हा ह्या सम-भोगाच्या उदात्त भावनेला काळीमा फासला जातो. त्यात स्वेच्छा आणि अगतिकता असे दोन प्रकार मांडले तरी कृतीचे समर्थन होत नाही.
टचः हा टी सर्वात महत्त्वाचा.
हे वाक्य तर फारच चुकीचे आणि उथळ आहे. माझ्या मते स्त्री-पुरुषातील प्रेमसंबंधात शरीर हे प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक माध्यमांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे तर अजिबात नाही. 'प्रेम' ही भावना सर्वात महत्त्वाची. शरीर संबंधाला, सम-भोगाला महत्त्व जरूर आहे. पण ते प्रेम-संबंधातील सर्वस्व नाही.
प्रेम नसेल तर शरीरसंबंधही रुक्ष होउन जातो. त्यात समाधान लाभत नाही.
विषय चांगला निवडला पण त्या संदर्भातील सर्व मुद्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही.
निष्कर्ष म्हणजे मेंदूथकल्याचे लक्षण!
"सं"म्हणजे सम नव्हे. सं या उपसर्गाने संपूर्ण, सर्वांगाने, सगळ्यांचे असा काहीतरी अर्थ होतो. एरवी बिघडले नसते पण अशा मानलेल्या अर्थाचा विषयाचा विस्तार करण्यासाठी आधार घेतला म्हणून हा खुलासा.
तसेच "काम"याचा अर्थ फक्त संभोगापुरता संकुचित घेऊ नये. त्याची व्याप्ती सर्व इच्छा, जे जे हवेसे वाटते, तितकी मोठी आहे. हे चार पुरुषार्थ म्हणजे माणसाने आयुष्यात काय काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन आहे.
धर्म = सर्व कर्तव्यांची पूर्ती
अर्थ = सर्व गरजा भागतील याची व्यावहारिक दक्षता
काम = सर्व इच्छांची पूर्ती
मोक्ष = (वरील सर्व ऐहिक बाजू सांभाळून मग) ईश्वराची उपासना किंवा पारलौकिक बाबतीतल्या कर्तव्यांची पूर्ती किंवा सुखाची व्यवस्था (ज्याला जो हवा तसा अर्थ घ्यावा).
हे चारी ज्याने करून दाखवले त्याने पुरुषार्थ केला असे म्हणतात.
विषय मोठा व्यापक आहे. सर्वांची मते वाचल्यानन्तर पुढचे बोलेन. प्रतिसादाना फाटे फुटले नाहीत हे महत्वाचे.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
अग्रलेखातील नवराबायकोने एकमेकाना समजून घ्यायचे तीन 'ट' कार आवडले !
विषय खूप चांगला आहे. अजूनही आपल्याकडे 'सेक्सवर ' तितके मनमोकळेपणाने बोलले जात नाही. त्याही बाबतीत कोणी तरी एकानेच बोलायचे आणि दुसर्याने केवळ ऐकायचेच असा काहीसा संवाद असतो. अर्थात स्त्रीला दुय्यम स्थान वगैरे असा विचार जपणारा अविकसीत / अशिक्षीत प्रदेश बराच असल्यामुळे वरील विषयाच्या बाबतीत विचारांची बरीच गुंतागुंत अजूनही आहे.
पुरुषाला शरीरसम्बन्ध हे शारीरीक मानसीक ताणतणाव मोकळे करण्यासाठीचे साधन वाटत असते तर स्त्रीला भावनीक गुंतवणूक वाटत असते.
सही रे !
बाकी अग्रलेखाची मांडणीत आपण यशस्वी झालात का ? याचे उत्तर शोधण्यापेक्षा. चार चौघात न बोलता येणार्या विषयाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले अभिनंदन !!!
इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. होते गडबड कधी-कधी :) लिखते रहो !!!
-दिलीप बिरुटे
मिपाच्या अग्रलेखाची जी काही समाजोपयोगी, प्रामाणिक आणि मूळ विषयाला भिडण्याची परंपरा आहे त्या परंपरेलाच छेद मिळाला आहे असे वाटते.
आता मूळ विषयाकडे, निसर्गातः शरीर, मनाची ठेवण आणि जिवनाकडे बघण्याची पद्धत यामध्ये स्त्री आणि पुरुषयामध्ये आमुलाग्र असा फरक आहे. त्यामुळे एकाच्या दृष्टीकोनातून जर या विषयाचा विचार केला तर गृहितके १०० % चुकतीलच.
दत्तकाच्या कामशास्त्रातील एका नियमाप्रमाणे, दोन डोळ्याचा अनुराग आणि संवाद याचा अंतिम शेवट हा तिसर्यानेत्राच्या छेदनात व्हावा तर वात्स्यायन मात्र परत शरीरालाच महत्त्व देत असतो. आधुनिक फ्रॉइड मात्र शरीराच्या या मुळ गरजेला मनाच्या कोठल्यातरी आजाराचा भाग आणि प्रतिक्रिया समजत असतो. ( संक्षिप्त अशा वाचनावर आधारीत असे माझे हे मत प्रदर्शन आहे.)
मात्र लेखाची सुरूवात थोडी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्याने केल्यासारखी वाटली.
संभोगासारख्या संववेदनशील विषयावर लिहिण्याच्या प्रयत्नाचे कौतुक वाटले.
ट्च : प्रेम भावनेमध्ये टच हा मह्त्वाचा असतोच पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले आहे तसा नव्हे. प्रेमामध्ये ट्च या शब्दामध्ये खूप काही सामावलं आहे. केवळ पारिजातकाचा सडा शिंडकावणारा टच नव्हे. धीर देणारा, समजून घेणारा, कौतुक करणारा... ट्च या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे.
सम्भोग हा शब्द सम + भोग या दोन शब्दानी मिळुन बनलेला आहे.
याचे विश्लेषण दिगम्भा यांनी दिलेच आहे. पण आपण लावलेला अर्थही चांगला आहे.
लेख किंचित विस्कळीत वाटतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
गेल्या शतकाच्या मध्यापर्यन्त लग्नपत्रीकेत सरळ सरळ लग्न या ऐवजी "शरीरसम्बन्ध" असा उल्लेख असायचा.
आपले पुर्वज फारच पुढारलेले होते म्हणायचे. याचेच पुढचं उदाहरण म्हंजे लग्नातील "लवंगा तोडणे" हा विधी. मला तर जबरी मजा आली त्यावेळेला.
विजुभाऊ कंडोमवर पण लिहा डिट्टेलमधे. जमले तर फोटोपण टाका बुव्वा.
स्त्रीला धर्माच्या बाबतीत दुय्यम स्थान असते. धर्म याचा अर्थ समाजकारण रीत व्यवहार अशा अर्थाने. अर्थाच्या बाबतीत स्त्री कमावणारी नसेल तर तीला कित्येक घरांत भुईला भार अशीच वागणुक दिली जात असतें नवर्याच्या पगारात खर्या अर्थाने स्त्रीचा अर्धा वाटा असतो हे कितीजण मान्य करतात? नवर्याने त्याला मिळणार्या पगारातून खर्च किती करायचा हे नवरा ठरवतो पण कमावत्या स्त्रीला मिळणार्या पगारातुन तीने स्वतःसाठी किती खर्च करायचा हे किती स्त्रीयाना स्वतः ठरवता येते? घरात घेतल्या किती निर्णयात स्त्रीचा विचारघेतला जातो?
कुटुम्बात नवर्याने कमावुन आणणे आणि त्या बदल्यात बायकोने त्याला शरीरसूख देणे म्हणजे संसार हेच त्यांच्या मनावर लहानपणासून कळतनकळत बिम्बवले जाते.
स्त्रीने दिलेला नकार हा पुरुषाला पर्सनल रीजेक्षन( व्यक्तीगत रीत्या झिडकारणे) वाटते तर याउलट पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही.
नवराबायको च्या नात्यात स्त्रीला किती प्रमाणात समानतेची वागणूक मिळते. कित्येक ठीकाणी तर स्त्रीला गृहीत धरूनच व्यवहार होतात.
:O कुठल्या शतकातले संसार पाहून हा लेख लिहीलाय? :?
परिस्थीती फार बदलली आहे विजूभाउ. मुलांची अवस्था आता वाईट होत आहे. अशिक्षीत वर्गात असले प्रकार (कदाचीत) होत असतीलही, पण सुशिक्षीत / मध्यमवर्गीय घरांत असलं काही होताना मी तरी बघितलं नाही. आजू बाजूला बघितलेल्या जोडप्यांवरून केलेली ही काही निरिक्षणे-
- नवरा टिपीकल (वेल सेटल्ड, जास्त पगार, स्वतःचे घर, जबाबदार्या नकोत) हवा असतो, पण स्वतः ला टिपीकल बायको व्हायचे नसते.
- घराच्या इन्स्टॉलमेन्टस भरताना आणि खर्च जमवताना नवर्याचीच फाटते. कधी ऐकलंय का - एखाद्या मुलीने मुलाला म्हटलं की आपण दोघे समान आहोत ना मग तू घरातली अर्धी कामं कर मी घरासाठी अर्धे पैसे (१८-२० लाख) देते. समानता सोयिस्कर असते तेंव्हाच हवी असते.
- घराची सजावट / रंग ह्या सगळ्याचे निर्णय बायकोच घेते.
- आधी ज्या कारणांसाठी नवरा आवडायचा आता तीच कारणं जाचक वाटू लागतात.
- नवर्याने कुणा बरोबर रहायचे, किती वेळ बाहेर रहायचे हे सगळं ठणकाऊन सांगितलं जातं.
- नवर्याने पगाराचा हिशोब मागितल्यावर त्याच्याकडे ब्रम्हहत्या केल्यासारखे बघितले जाते.
- स्वत: नवर्याच्या १/४ पगार कमवून 'मी सुद्धा काम करून दमते' हे ऐकवलं जातं. तसंच मलाही माझं करियर महत्वाचं आहे हे ऐकवलं जातं.
- नवरा घरकामात मदत करत नाही ह्या कारणास्तव डिवोर्स झालेला मी पाहिला आहे. (तरी घरात धुण्याभांड्याला बाई आहे.)
- आई वडिलांना त्यांची एकुलती एक मुलगी जड नसल्याने ती नवर्याला कायम फाट्यावर मारायला तयार असते.
- स्वत: च्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी नवर्याला दिवसचे दिवस 'उपास' घडवले जातात.
- नवर्याने कोणते कपडे घालावेत, काय खावं हे स्वत: ठरवतात आणि त्याने फक्त मंगळसूत्र घाल असं सांगितलं की ते स्वातंत्र्यावरचं आक्रमण वाटतं.
हा लेख केवळ स्त्री-पुरूष यांच्यातील लैंगिक संबंधांवर आहे. लैंगिक संबंधांचे पुरुष-पुरूष, स्त्री-स्त्री असेही तितकेच सुंदर अविष्कार असू शकतात. यासंदर्भात मराठीत फारशी चर्चा होत नाही. कदाचित यावर बरेचजण नाके मुरडतील, पण अल्पसंख्येत जरी असले (लोकसंख्येच्या साधारण ३%), तरी असे संबंध निसर्गात निश्चितपणे आढळतात. अशा संबंधांना आणि विवाहांना बर्याच पश्चिमी देशात आणि अमेरिकेतील काही राज्यांत कायदेशीर मान्यता आहे. भारतातही असे संबंध असतात, पण प्रामुख्याने ते गुप्त आणि समाजाच्या भीतीपोटी सर्वमान्य असा स्त्री-पुरूष विवाह करून त्या बाहेर ठेवले जातात. मराठीत विजय तेंडुलकरांनी सर्वात प्रथम 'मित्राची गोष्ट' मधे ह्या विषयाला हात घातला. अलिकडे सचिन कुंडलकरचे 'छोट्याशा सुट्टीत' हे नाटक, आणि मंगला आठलेकरांचे 'हे दु:ख कुण्या जन्माचे' हे सर्वेक्षणात्मक पुस्तक याप्रकारच्या संबंधांवर अधिक प्रकाश टाकतात.
१) संभोगाचा पहिला अर्थ शरीर संबंध
२)दुसरा अर्थ : सम- भोग. या अस्तित्वातली प्रत्येक प्रक्रिया ही दोन विरूद्ध आकर्षणामधले मिलन आहे. खरी भूक लागली असताना जेवणे ही भूक (ॠण पोलॅरिटी) आणि अन्न (धन पोलॅरिटी) यांचे मिलन आहे (इन्टर प्ले). संगीत ही शंतता आणि स्वर या दोन विरोधी आकर्षणा मधील नृत्य आहे. त्याच प्रमाणे शारिरीक मिलन ही स्त्री या ऋण आणि पुरूष या धन आकर्षणामधले मिलन आहे. ही दोन्ही आकर्षणे जितकी सम तितका प्रक्रियेत आनंद. निसर्गानी ही प्रक्रिया पुनर्निर्मिती साठी निवडलेली आहे. माणसानी मात्र तिचा समाज, नाती, बंधने, स्त्री ला आधर, पुरूषाचे वर्चस्व, नैतिकता अश्या अनेक पैलूनी पूर्ण गोंधळ केला आहे. त्यामुळे जीवनात अनेक टेंन्शन्स निर्माण झाली आहेत. खरं तर गरज दोन्हीकडे सारखीच आणि पूर्णपणे नैसर्गीक आहे.
३) तिसरा अर्थ अध्यात्मिक आहे. त्याचा भर भोगावर नसून भोगणार्यावर आहे. जर तुम्ही सगळे भोग नीट उपभोगले तर तुम्हाला सगळे भोग सारखाच आनंद देतील, सगळे भोग सम होतील असा त्याचा अर्थ आहे.
पहिल्या चरणा पासून तिसर्या चरणा पर्यंतचा प्रवास ही जीवनाची सर्थकता आहे.
कालच "दीपक चोप्रा" यांचं "द पाथ टू लव्ह" पुस्तक वाचत होते ज्यात त्यांनी संभोगास एक निर्मीतीशील प्रक्रिया (क्रिएटीव्ह अॅक्ट) देखील म्हटले आहे. यामधे त्यांनी हे नमूद केले आहे की अनेक अनुभव या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाच्या कुवतीनुसार येऊ शकतात उदा . - वेळेचा विसर पडणे, उत्कटता (एक्स्टसी), हृत्कमल विकसीत होणे, जोडीदाराबरोबर एकतानता, डिलाइट्फुल लाफ्टर, अहं चा विसर पडणे, चिंतामुक्ती, खेळकरपणा, संपूर्ण सुंदर असा शरणभाव, एक संपूर्णता, ब्लेसिंग, आनंद, अपरिमीत प्रेम , समाधान, शांती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
संभोगाचि मजा जर लुटायचि असेल बायकोला संभोगा व्यतिरिक्त च्या काळात अतिशय सन्मानाने वागविणे महत्वाचे आहे...
असे केले तर स्त्री संभोगाच्या वेळी फुलते..
चावट गप्पात सहभाग घेते..{डर्टी टॉक]....अश्या वेळी तिला एक व्होर म्हणुन घेणे
तिला आवडते..व तुमच्या काम फॅंटसीचि ति पण एक भाग बनते...
व संभोग एक आनंददायी बाब बनते....
पण सारे संपल्यावर ति परत एक नॉरमल स्त्री बनते व तिला सन्मानाने वागवणे भावते...
रोचक लेख, रोचक शिर्षक आणि तितकेच रोचक प्रतिसाद. प्रतिसादांचं वैषिष्ट्य म्हणजे आपण संपादकिय सदरात प्रतिसाद देत आहोत असे समजुन दिलेले आहेत.
विजुभाउ कधीकधी अफलातुन लेखन करतात खरे.
-(आवाज आला क्का ?) फुस्स

राजु यांच्या सत्यमप्रमाणे अजुन किती कंपन्यांचे असत्य बाहेर येईल हा येणारा काळच सांगु शकेल. पुढील एक दोन वर्षे सगळ्याच मोठ्या कंपन्यांचे ताळेबंद अजुन काटेकोरपणे तपासले जातील. निकाल जाहीर झाले की बाजार अजुन खाली जाईल अशी अटकळ आहे . त्यामुळे यापुढे शेयरबाजारात गुंतवणुक जरा दमानंच. एक असेही म्हणता येईल की दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकदारांसाठी ही एक संधी असेल. यावर आधीक प्रकाश अवलिया, एकलव्य आदी प्रभुतींनी टाकावा.
राजु यांनी अमेरिकेतील संभाव्य अटक टाळण्याकरता इथे शरणागती पत्करली असे या बातमीत म्हणले आहे.
समयोचित लेख.
भरमसाठ वेगाने वर वर जाणार्या कंपन्यांबाबत संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, ही तशी चांगली गोष्ट नाही. पण सत्यम घोटाळ्याने, अशाच काही नामवंत कंपन्यांकडेही संशयीत नजरेने पहावे, अशी परिस्थिती आली आहे, हे खरे!
हर्षद मेहता प्रकरणानंतर सेबीची स्थापना झाली (चुभूद्याघ्या), तरीही घोटाळे काही थांबले नाहीत. हे असे का व्हावे?

भारतातील आय टी क्षेत्राकडे अविश्वासाने पाहिले जात आहे हे जरी खरे असले तरी त्याने बिझिनेसवर परिणाम होईल असे वाटत नाही. याक्षणी बोटे दाखविली जात असली तरी त्यामागे वेगवेगळ्या आकसांचाही भाग आहे हे नाकारता येत नाही. (आमची तशी अखिल भारतीय प्रवक्ते म्हणून सुप्त ख्याती आहे... त्यामुळे राजूबाबाच्या कृपेने बर्याच जणांकडून "अरे काय रे हे?" अशी "विचारपूस" झाली. आम्हीही शिव्या घ्यातल्याच पण फुशारकीचा भाग म्हणून नव्हे पण अमेरिकन भस्मासुरापुढे सत्यम किस झाड की पत्ती हेही बडवून झाले.)
बेल-आउटची बोंब भारतातही उठणार/ उठते आहे यांत संशय नाही. निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे (किंवा त्याशिवायही) कदाचित प्रांतीयवादाचे रंगही सत्यमच्या बुडित खात्याला लागतील. सत्यमला वाचविण्याचा फार धडपडाट करू नये असे आम्हाला वाटते. विस्तार टाळतो.
संपादकीयाची मांडणी चांगली आहे. आभार!
- एकलव्य
सत्यम च्या गैरप्रकाराचा उत्तम वेध घेतला आहे. विषयाची मांडणी आणि भवितव्याची दखलही योग्य प्रकारे घेतलेली आहे.
खरे तर याला `गैरव्यवहार'ही म्हणता येत नाही. कारण यात स्वतः भ्रष्टाचार न करता, कंपनीचा फुगा फुगवून गुंतवणूकदारांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न झाला आहे.
मी सुद्धा ४४६ रुपयांनी सत्यम चे शेअर्स घेतले होते. आता ते भंगाराच्या भावात विकावे लागणार, बहुतेक!
आयटीच्या दुष्काळातील हा १३ महिना ठरला !!!
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
आजच्या ईकॉनॉमिक टाईम्स च्या खालील लेखा मधे असे म्हटले आहे की हे २००३ पासुन चालु होते आणि अगदी उघड पणे चालु होते.
http://epaper.timesofindia.com/Daily/skins/ET/navigator.asp?Daily=ETM&login=default
मग कोणत्याही तज्ञाच्या हे कधीच लक्षात का आले नाही ? कींवा आले असेल तर तसे निदर्शनास का आणुन दीले नाही
अवलीयाने अजून विस्तारीत लिहावे अशी अपेक्षा होती.
भविष्यात अजूनही काही कंपन्यांचे गैरव्यवहार बाहेर येऊ शकतात.
आम्हास आधीच ठाऊक होते म्हणणारे, आधीच का नाही अशी प्रकरणे बाहेर आणत?
नंतर "गौप्यस्फोट" करण्यात काय हशिल आहे?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
अग्रलेख आवडला. अजून थोडे विस्ताराने लिहाल असे वाटले होते - विशेषतः असा घोटाळा कसा होऊ शकतो? कंपनीतली बडी मंडळी हे कसे करु शकतात (गुन्ह्याची कार्यपद्धती)?
सामान्य माणसांना/गुंतवणूकदारांना हे थेट समजणे तसे अवघडच पण नियंत्रण करणारेही कसे गंडवले जाऊ शकतात? ऑडीटर्स कसे सामील असतात? ह्याबद्दल थोडा उहापोह वाचायला आवडला असता.
(अजून एक लेख लिहावा अशी विनंती).
चतुरंग
अग्रलेख आवडला.
चतुरंगांच्या मताशी सहमत आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
चतुरंग आणि लिखाळच्या मतांशी सहमत.
ही सगळी भानगड कशी जमवली असेल त्यावर प्रकाश टाकला तर आनंद होईल.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मांडणी, मथळा सगळेच उत्तम.
पण चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे आणखी एक लेख लिहा.
आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात. आवडतात वाचायला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
> पाठोपाठच युनोने सत्यमवर बदमाषीचा आरोप करत आठ वर्षे काळ्या यादीत टाकले.
"पाठोपाठच वर्ल्डबँकेने सत्यमवर बदमाषीचा आरोप करत आठ वर्षे काळ्या यादीत टाकले." असे हवे होते...
- नाटक्या
शेअरबाजार आणि त्यातले उतार-चढाव ह्या बाबत माझे बरेच अज्ञानच आहे.
पण संपादकिय लेखातून जरा जास्त स्पष्टीकरण, विश्लेषण अपेक्षित होते. लेख जरा, 'पेपरमधील बातम्यांचे संकलन' अशा अंगाने झाला आहे असे वाटते. सर्वसामान्य माणूस कंपन्यांचा ताळेबंद, ऑडिटर्सची विश्वासार्हता ह्यावर अवलंबून शेअर्स खरेदी करतो. पण इतकी काळजी घेऊनही भागधारकांना तोंडघशी पडावे लागत असेल तर ह्या पुढे कुठली काळजी गुंतवणूकदारांनी घ्यावी? सत्यमच्या ऑडीटर्सच्या अखत्यारीत येणार्या इतर कंपन्यांचे शेअर्स ठेवावेत की विकावेत? ऑडीटर्सचा ऑडिटींग परवाना रद्द का केला जाऊ नये? करतात का? शेअर्सचा व्यवहार हा एक जुगार असला तरी सुरक्षित जुगार खेळता येऊ शकतो का? असेल तर कसे? इत्यादी प्रश्नांवर उहापोह अपेक्षित होता.
असो. अजूनही एखाद्या स्वतंत्र लेखात वरील चर्चा, उहापोह, विश्लेषण, समुपदेशन शक्य आणि गरजेचे आहे.
निष्कर्ष म्हणजे मेंदूथकल्याचे लक्षण!
पेठकर काकांशी सहमत आहे. समयोचित लेख पण संपादकाचं मत जाणवलं नाही.
बहुतेक भाग यामध्ये रस घेणार्या आणि थोडं फार टाइम्स व इकॉनॉमिक टाइम्स वाचणार्याला माहित असला पाहिजे.
विशेषतः नियंत्रक आणि लेखापाल यावर जे शेवटच्या परिच्छेदात म्हटलं आहे ते थोडं विस्ताराने संपादकांच्या मतासह मांडावं अशी नानांना विनंती.
सर्व वाचकांचे आभार. अनेकांनी अधिक काही मुद्यांवर प्रकाश टाकावा असे प्रतिसादात, खरडीत, व्यनीत म्हटले आहे. जशी विस्तृत माहिती समोर येईल त्यानुसार, तसा लेख मिपावर टाकण्याचा प्रयत्न मी करेन.
पुनश्च एकवार सर्वांचे आभार.
-- अवलिया

चांगला लेख.
प्रतिमा नक्की कुणाच्या मनात तयार होत असते ते सुद्धा पाहायला पाहिजे. पण आपण म्हणता तसे या प्रतिमा सार्वत्रिक आहेत असे समजू.
बंगाल्यांबद्दल माझी प्रतिमा भलतीच वेगळी आहे.
>अंतीमतः आपण बहुजनांचाच एक भाग आहोत, हे वास्तव स्वीकरणेच योग्य, असे वाटते.
हे योग्यच आहे. (मी स्वतःला अभिजन समजत नाही.)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
ज्या पध्दतीची मांडणी आहे त्यावरुन वाटते लेखाचा विस्तार वाढवला असता तर बर्याच मु्द्दयांविषयी - संयमित, तार्कीक आणि परिपुर्ण असा - उहापोह करता आला असता
पण जेवढे आहे ते छानच आहे.
- (मराठि माणसाच्या प्रतिमेचा आणि प्रतिभेचा अभिमान बाळगणारा) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
पण लेखाची लांबी खूपच कमी वाटली.
मराठी माणसाची प्रतिमा... हा विषय खरंतर किचकट आहे.
याला काही अंशी, इतिहास, बर्याच प्रमाणात आपले राज्यकर्ते आणि काही प्रमाणात मराठी मुलुखात येऊन स्थायिक झालेले अमराठी हेही जबाबदार आहेत.
लेख अजूनही विस्तारीत करता आला असता.
बंगाली लोकांबद्दलची प्रतिमा, तामिळ लोकांबद्दलची प्रतिमा .. ही माझ्यासाठी काही वेगळीच आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
पण आपला लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर स्थायिक न व्हावे लागणे, रोजगाराची उपलब्धता स्वतःच्या प्रदेशात असणे आणि याच बरोबर मराठी माणसाची अल्पसंतुष्ट (चांगल्या शब्दांत समाधानी) वृत्ती, आपण बरे आपले काम (घर, पोरे) बरे ही अलिप्त वृत्तीही जबाबदार असावी.
त्यातून लोकांनी मराठी अभिजनांची ठळक प्रतिमा निर्माण केलेली आहे. कोणताही ६०-७० च्या दशकातला चित्रपट घ्यावा. नायक-नायिका यांची शर्मा, वर्मा, दास, गुप्ता, खन्ना, कपूर यांच्याशिवाय आडनावे आढळत नाहीत परंतु बाई या शब्दाचा अर्थ मात्र कामवाली (आणि तीही मराठी) असा नक्की आढळतो. रामूचाचा हा घरचा नोकर काकांसारखा असतो पण बाई मात्र झाडू-पोता मारणारी. आता कोणी म्हणेल, चित्रपट मुंबईत घडत असेल तर कामवाली मराठीच असणार. हे सत्य असले तरी नायक, नायिका, त्यांचे मित्रमंडळ, शेजारी-पाजारी, पोलीस इन्स्पेक्टर, खलनायक हे सहसा मराठी नसतात. (अपवादः ऋषीकेश मुखर्जींचे काही चित्रपट , दिवारमधला प्रमुख खलनायक सामंत [ज्याला चित्रपटातच अधूनमधून सावंत म्हटलं जातं] असे काही मोजके. गेल्या दशकात बर्यापैकी मराठी भाषक पात्रे चित्रपटात निर्माण झाली असे वाटते.)
बहुजनांची प्रतिमा तयार करणे सहसा सोपे असते. ते काम त्या समाजातील,सांप्रदायातील, गटातील किंवा इतर समाजातील,सांप्रदायातील, गटातील मंडळी करू शकतात परंतु अभिजनांची प्रतिमा ही त्या समाजाला स्वतःलाच निर्माण करावी लागते. अगदी, मधुर भांडारकरच्या कॉर्पोरेटमध्येही दोन बिझनेस टायकून्स अमराठी असतात, त्यांचे टॉप एक्झेक्युटिव्ज अमराठी असतात पण एका ट्रेनीचे मध्यम वर्गीय फाईवस्टार हॉटेलला घाबरणारे आई-बाप मराठी असतात.
वरील उदाहरणे फक्त चित्रपट या एकाच प्रसिद्धी माध्यमातील आहेत. ज्या प्रमाणे पंजाबी म्हणजे दिलदार, आनंदी, श्रीमंत. बंगाली म्हणजे रसिक, कलाप्रेमी. दाक्षिणात्य म्हणजे हुशार, धार्मिक, आपल्या लोकांना सांभाळून घेणारे आहे तशी मराठी माणसाची प्रतिमा दुर्दैवाने हलकी कामे करणारे, अल्पसंतुष्ट, मध्यमवर्गीय किंवा भ्रष्ट नेते आणि गुंड अशीच निर्माण केली जाते. (भिकू म्हात्रे, रघुनाथ शिवलकर इ.) जशी पात्रे निर्माण होतात तशी त्यांची अभिव्यक्ती. भिकू म्हात्रे रात्री पु.ल. किंवा जी.ए. वाचतो हे कदापि दाखवले जाणे शक्य नाही. हळवा बंगाली मात्र रविंद्रनाथ ठाकूरांवरच जगत असतो आणि दणकट-दिलदार पंजाबी घरी आलेल्या पाहुण्याला पतियाळा ग्लासातून लस्सी पाजत असतो.
आता सहसा प्रसिद्धी माध्यमांशी संबंध नसलेल्या आमच्या लहान गावात मराठी माणसांची प्रतिमा बघा -
खालील किस्सा एका गुजराथी आणि एका दाक्षिणात्याकडून ऐकावा लागला आहे.
ते: "असे कसे तुमचे मराठी लोक? इतर सर्व भाषकांनी नवरात्रीच्या नऊ दिवशी एक एक रात्र वाटून मंदिरात फुकट जेवण ठेवले, कार्यक्रम केले. मराठी लोकांची (मंडळाची) पाळी आली तेव्हा कोणी आलेच नाही. दोन कुटुंबे होती, तीही आरती नंतर निघून गेली."
माझे उत्तरः "च्यामारी! विक-डेजना घर-दार, पोरं सोडून रात्रीबेरात्री देवळात काय करतात ही माणसं?"
पण प्रातिनिधिक प्रतिमा: मराठी लोकांनी देवळासाठी काही केलं नाही. ऐपत नाही की इच्छा नाही ते कळत नाही. मात्र आम्ही बघा! आम्ही गरबा केला. मिठाई वाटली. पूजा केल्या, जेवणं घातली, कार्यक्रम आयोजित केले वगैरे वगैरे.
(आता अशा प्रतिमा निर्माण व्हायला व्यक्तिशः माझी काहीही हरकत नाही. उगीच धार्मिक वगैरे प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आपलं घर बरं ही प्रतिमा मला आवडेल. इतर भाषकांना त्याचा त्रास होऊ नये अशी आशा आहे.)
माझं मत याबाबतीत असं आहे की, अशा प्रतिमांचा मला फायदा किंवा नुकसान झालेले नाही. फारतर कधीतरी कोणीतरी खवचटपणा करायला या प्रतिमांचा उपयोग करते असा अनुभव आहे. जसे,"क्या तुम मराठी लोग, तुमको खाने-पिने, पैसा खर्च करने का तरिकाही नहीं आता|" असे उद्गार ऐकले आहेत त्यावरताण खवचटपणा मला करता येतो. "क्यों किसी मराठीसे शादी करनी है क्या? नही करनी तो तुम्हारा क्या जाता है| हम लोगोंको जैसा जिना है वैसे जियेंगे|"
प्रतिमा असणे, घडणे आणि घडविणे हा मोठा गुंतागुंतीचा विषय आहे. चर्चिल यांचे There is no such thing as public opinion. There is only published opinion. हे वाक्य काही अर्थाने येथेही लागू पडते.
असो! लेखाचा विषय आवडला.... आणि लांबीबद्दल म्हणाल तर माझ्यासाठी आजतरी एकदम परफेक्ट!!
- एकलव्य
विषय इंटरेस्टींग आहे. ह्या धाग्यात मुळ लेखाबरोबर प्रतिसाद वाचण्यात देखील उत्सुकता आहे.
गंमत आहे खरी. एखादा परप्रांतीय, त्यातुन जो थोडाफार शिकला आहे त्याला मराठी माणूस ही प्रतिमा वर लेखात उल्लेख केल्याप्रमाणे वाटली तरी "महाराष्ट्र" म्हणाल्यावर एक स्थैर्य, संधी, प्रगत, पुरोगामी, शांतताप्रिय, स्थलांतरास योग्य असे राज्यच डोळ्यासमोर येत असावे असे वाटते. :-)
बाकी स्टिरीओटाइपचा शिकार कोण नाही? सर्व देशात, समाजात हे कमी जास्त असणारच. बहुदा हे एक मानवी स्वभाववैशिष्ट्य म्हणले पाहीजे.
लेख आणि विषय आवडला. वर एकलव्याने म्हणल्याप्रमाणे लांबी एका अर्थी परफेक्ट वाटली पण कुठेतरी लेख म्हणून त्रोटक वाटला. अधिक विचार वाचायला आवडले असते.
मराठी माणूस एकंदरीत (सरासरी) "शो ऑफ" कमी करतो ही वस्तुस्थिती आहे. वर अनेक कारणे आणि उहापोह झाला आहे ज्या संदर्भात मला सहमत आहे असेच म्हणावे लागेल. मात्र समाज म्हणून आपली प्रतिमा बदलावी लागेल असे वाटते. समाज मुद्दामूम म्हणत आहे कारण त्यात माझ्या लेखी "प्रातिनिधीक आणि बहुजन" असे दोन्ही एकत्रीत येतात. आपले प्रातिनिधीक हे बहुजनांपेक्षा वेगळे नसतात हि वस्तुस्थिती आहे. म्हणजे विविध क्षेत्रातील प्रातिनिधीक बघा: स्वातंत्र्यापुर्वीचे आणि नंतरचे पुढारी (अगदी टिळक आगरकरांपासून ते यशवंतराव, एस एम जोशी, ना.ग. गोरे, मृणाल गोरे, पवार, ठाकर्यांपर्यंत..), स्मीता पाटील,लता-आशा, पु. ल., गदीमा., (ज्ञानपिठ विजेते) खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर, तसेच वाडेकर-गावस्कर-तेंडूलकर, दया पवार, आमचा बाप अन आम्ही लिहीणारे नरेंद्र जाधव इत्यादी इत्यादी.. यांना कधी जर माहीत प्रतिमेने माहीत नसलेल्या व्यक्तीने बाजारात भाजी घेताना किंवा ८:५२ची लोकल पकडताना पाहीले, तर ते त्या तमाम माणसात वेगळे वाटणार नाहीत इतके ते साधे आहेत. अगदी माधुरी दिक्षितची प्रतिमा वेगळी धरली तरी तिने मध्यमवर्गीय मराठमोळेपण तसेच ठेवले असे अनेकदा वाटते...
शेवटी या प्रतिमा कोण तयार करते? - प्रसिद्धी माध्यमे आहेतच पण तथाकथीत विचारवंत... म्हणजे असे की मराठी माणसाची निगेटीव्ह प्रतिमा तयार करण्यात कधी कधी अ-मराठी (विशेष करून बंगाली) इतिहास संशोधकांचा पण हात आहे असे म्हणता येईल का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
बर्याचदा परप्रांतात/परदेशात जेंव्हा आपण मराठी/भारतीय म्हणून पाहीले जातो तेंव्हा आपले वागणे हेच जणू काही मराठी माणसाचे/भारतीयाचे वागणे आहे असे (त्या त्या संस्कृतीशी) अनोळखी असलेल्या व्यक्तीस वाटून त्यातून "वन पॉईंट एक्स्ट्रापोलेशन" होऊ शकते - जे कधी कधी चांगले असू शकते तर कधी कधी वाईट...
देवळात अथवा इतरत्र स्थानीक भारतीयांच्या कामात मराठी मंडळाने मदत करावी असे मला वाटते. कारण भारताबाहेर जेंव्हा आपण रहातो तेंव्हा आपण एकत्र असावे असे वाटते. अर्थात ते दोन हाताने टाळी वाजत असेल तर... म्हणजे असे की ९९ साली बॉस्टन भागातील लक्ष्मीच्या देवळात गणेशोत्सवासाठी मराठी माणसांनीपण मदत करावी अशी इच्छा असल्याचे समजले. ते देऊळ हे बर्यापैकी दाक्षिणात्य प्रभावाखाली असल्याने, मराठी माणूस (आणि इतर अ-दाक्षिणात्य) अपवादाने त्यात स्वतःला सामावून घेयचा. अर्थात देवळात दर्शनाला वर्षाकाठी त्याच जायचा (कारण जवळच त्यावेळचे एकमेव उडीपी भवन होते ;) ). पण त्याला कारण जसे दाक्षिणात्यांनी त्यांच्याच "स्टाईल्स" ठेवल्या आणि त्यांना तसेच ठेवायचे होते, हे होते तसेच मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे देखील आहे... असो. तर तेंव्हा मी मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस गणेशचतुर्थीस मराठी माणसांना विनंती केली आणि संपूर्ण जेवण हे मराठी समाजाने केले. "गणपती बाप्पा मोरया" वगैरे ऐकायला आले. "सुखकर्ता, दु:खहर्ता" म्हणायला लागल्यावर तमाम दाक्षिणात्य भाविक चमकले वगैरे वगैरे.. मात्र नंतर परत कधी बोलावणे आले नाही.... आता गंमत अशी झाली आहे की त्याहूनही मोठे स्वामीनारायण मंदीर दुसर्या भागात बांधले गेले आहे. तिथे सर्व देवांचे छान मोठे देऊळ पण केले आहे आणि कुणालाही वेलकमींग आहे. आता परत मध्यंतरी लक्ष्मीच्या देवळात गेलो तर तेथे गणपतीच्या देवळाबाहेर "सुखकर्ता दु:खहर्ता" ही आरती मोठ्या वॉलपेपरवर छापून चिकटवलेली, तर लक्ष्मीच्या देवळाबाहेर "ओम जय लक्ष्मी माता" ही हिंदी आरती!
शेवटी जाता जाता एक गंमतशीर अनुभवः अमेरिकेत विद्यार्थीदशेत म्हणून आल्यावर, आजूबाजूस सर्व गुजराथीच होते (रुममेट्ससहीत). त्यांतील काही असेच गप्पा मारताना मला म्हणाले, "तुम्ही मराठी माणसे कसे एकमेकांना धरून असता आणि एकमेकांना मदत करतात", मी एकदम अवाक होऊन (आणि माझी थट्टातर होत नाही ना ह्याची खात्री करून) विचारले कुठे? (वास्तवीक मला कधीपासून म्हणायचे होते): तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बडोद्यातील मराठी समाज असा एकमेकांना खूप धरून आहे आणि मदत करतो वगैरे. पुढे ते असे म्हणाले, "नाहीतर आम्ही गुजराथी... एकमेकांत नुसते भांडत बसतो!"
विकासरावांशी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहे.
मात्र :)
पण त्याला कारण जसे दाक्षिणात्यांनी त्यांच्याच "स्टाईल्स" ठेवल्या आणि त्यांना तसेच ठेवायचे होते, हे होते तसेच मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे देखील आहे...
यात काहीही वावगे वाटत नाही. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय पूजापद्धती वेगवेगळ्या आहेत. जर मंदिरासाठी प्रामुख्याने दाक्षिणात्यांनी पुढाकार घेतला असेल तर पूजापद्धती त्यांच्याप्रमाणे असाव्यात हा त्यांचा आग्रह योग्य आहे. अन्यथा पूजेचे समाधान लाभणार नाही (किंवा देव कोपेल वगैरे)
मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे न पटण्यासारखे आहे. इतर कोणत्याही समाजाइतकाच मराठी माणूस देवभोळा आहे.
तर तेंव्हा मी मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस गणेशचतुर्थीस मराठी माणसांना विनंती केली आणि संपूर्ण जेवण हे मराठी समाजाने केले. "गणपती बाप्पा मोरया" वगैरे ऐकायला आले. "सुखकर्ता, दु:खहर्ता" म्हणायला लागल्यावर तमाम दाक्षिणात्य भाविक चमकले वगैरे वगैरे.
कदाचित सुखकर्ता दुःखहर्ता नंतर पुण्यात गणपतीसमोर डॅन्स होतो तसा मराठी बांधव चालू करतील की काय अशी त्यांना भीती वाटली असावी. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
आपला
(देवभक्त) आजानुकर्ण
आजानुकर्ण यांच्या मताशी मी सहमत आहे.
एक असाच अनुभव म्हणजे लंडनमधली देवळे. इस्ट हॅम या तमीळ बहुसंख्य असलेल्या भागात तसंच एक देऊळ होतं पण त्यांच्या पद्धतीने रचना व पूजा इत्यादि होत्या. देऊळ अतिशय स्वच्छ, नीटनेटकं होतं. तमीळ असून तोडकं मोडकं हिंदी नाहीतर इंग्रजी मध्ये संभाषण होतं. स्वामी नारायण मंदिराबद्दल काय बोलावं! विलक्षण सुंदर, स्वच्छ. आणि अतिशय प्रेमळ गुजराथी आग्रह!!
लंडनच्या महाराष्ट्र मंडळात गणपतीच्या दहा दिवसात दर्शनाला जाण्यासाठी दिलेल्या क्रमांकांवर दिवसातल्या ठराविक दोन तासात संपर्क करून दिलेल्या वेळेनुसार जायचं असतं ! गर्दी होते आणि प्रवेश मिळत नाही!! लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला ७५ वर्षे आत्ताच झाली. एकंदरीत अनास्था या इतर भाषिकांबरोबर तुलना केल्यास फार जाणवते. तिथे कोणी तुम्हाला तुमची भाषा कोणती विचारत नाही. आम्ही राहत असलेल्या छोट्याशा गावात नवरात्रिला गुजराथी लोक आवर्जून बोलवायचे. नवीन गाव - रस्ते माहीत नाहीत, कार नाही तर घरी घ्यायला सोडायला यायचे. तिथे बाजूला न बसवता सर्व पूजा आणि कार्यक्रमात सामील करून घ्यायचे.
फार प्रकर्षाने फरक वाटतो. मराठी ग्रुप असा असणं आधी अवघड आणि असल्यास असं वागणं तर खुपच दुर्मिळ आहे.
गुजराथी, तमीळ आणि पंजाबी यांचं एकमेकांना धरून राहणं बघण्यासारखं आहे.
दिवाळीच्या दिवशी किंवा शनिवारी मीटिंग्जना वेंब्ले पार्क भागात आणि स्वामी नारायण मंदिरात त्यांनी एकी आणि संस्कृती कशी जपली आहे ते पाहून मराठी वागण्याचा विचार मनात येतो. आपल्याला सदाशिव पेठी असण्याचाच अभिमान फक्त.
http://www.mmlondon.co.uk/ आणि http://www.mandir.org/ फरक स्पष्ट आहे.
चांगल्या मुद्द्याबद्दल सुनील यांना धन्यवाद पण विषय अजून मांडायला हवा होता.
मराठी माणसाची माध्यमांतील प्रतिमा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन विकास प्रकाश जोशी या विद्यार्थ्याने (किंचित आग्रही भाषेत) लिहिलेला हा http://ibnlive.in.com/cfs/blog/52676/2071 लेखही वाचनीय आहे.
सुनीलरावांचा लेख आवडला.
आपला
(दुवादाता) आजानुकर्ण
अग्रलेखाचा विषय भयंकर आवडला.. हा विषय (साचेबद्ध) "अग्रलेख" ह्या संकल्पनेपुढे त्रोटक वाटतो तरी वाचकांच्या मनातील प्रश्नाला/भावनेला पुढे आणण्याचे काम चोख बजावतो त्यामुळे हा "क्रिस्प" अग्रलेख आवडला :)
हा विषय माझ्यामनात अनेकदा डोकावतो...
आताच कुर्गच्या ८ दिवसांच्या ट्रेकला गेलो होतो. राष्ट्रीय ट्रेक असल्याने तिथे भारतातील विविध प्रांतातील लोक एकत्र होते. किंबहूना मला असे ट्रेक आवड्याचे एक कारण दरवेळी अश्या ट्रेकनंतर कमी होणारा साचेबद्धपणा हे आहे. ते असो. तर ह्या ट्रेकला एक पुण्याचा काहिश्या जेष्ठ (साधारण पन्नाशीच्या) असा १० जणांचा ग्रुप होता. परंतू ते सबंध ट्रेकमधे कोणाशीही ३ वाक्यांच्यावर बोलले नसतील.. मात्र एकमेकांत भन्नाट टाईमपास चाललेला होता.
सुरवातीच्या एकदोन दिवसांत नवखेपणामुळे असेल म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं.. मात्र त्यांचे हे "रिझर्व्ह्ड/नवखं?/कुचकं?" वागणं शेवटपर्यंत टिकून होतं... शेवटी उगाच "ही मराठी माणसं इतक्या लांब येऊनहि इतरांशी मिक्स होत नाहित तर पर्वतीवरच का ट्रेक करत नाहित " वगैरे टोमणे ऐकायला मिळाले. ज्याला आम्हि योग्य प्रत्युत्तर दिलं हे सोडून द्या पण एक प्रतिमा उगाच तयार झाली..
याच ट्रेकमधे एक गुजराती गृहस्थ होते त्यांची तर मस्त थियरी होती.. ती आठवली म्हणून देतोयः
कोणताहि (इथे मराठी) माणूस एकटा असताना वेगळा असतो तेव्हा तो फक्त तो असतो.. जेव्हा अनेक व्यक्तींचा समुह बनतो तेव्हा त्यांचा मसावि काढला जातो व तो माणूस त्या मसाविला चिकटलेले गुणधर्म वापरायला लागतो.. जसे चार जण जमले व त्यांचा मसावि "मराठी" निघाला की तो माणूस मराठी होतो व मराठी माणसासारखा वागु लागतो .. मात्र जेव्हा चार भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील लोक जमतात तेव्हा तो "भारतीय" होतो व भारतीया सारखे वागु लागतो.. तेव्हा तो ती व्यक्ती नसतो तर समुह असतो
या अग्रलेखाने बरेच विचार चाळवले आहेत.. बरेचरे स्वैर आहेत.. सुचतील तसे देत जातोच :)
-(वैचारीक)ऋषिकेश
प्रतिमा करण्यावरून अथवा जी काही केली गेली आहे, ती जपण्यावरून माझे स्वतःचे निरीक्षण येथे नोंदवतो.
मी गेली अनेक वर्षे जालावरील, भारतीय चित्रपट संगीतांशी संबंधित असलेल्या ग्रूप्समध्ये वावरत आहे. मला हे ठळकपणे जाणवले की बंगाली आपला बाब्या/ बाबी कितीही सुमार असले तरी त्याला/तिला खूपच जपतात. उदा. शान हा अत्यंत सुमार गायक आहे, (डोळे मिटून ऐकावे, सहज जाणवेल). पण त्याच्या गायनाबद्दल कुण्याही बंगाल्याने कधीही काहीही किंचीतही तक्रार केली असल्याचे माझ्या वाचनात नाही, मग हेमंत'दा', किशोर'दा', मन्ना'दा' असे अनेक 'दा' अथवा गीता दत्त, ज्युतिका रे ह्या सगळ्यांची तर बातच सोडा. म्हणजे त्या व्यक्तिंच्या गुणांच्या बाबतीत त्यांची अस्मिता का कोण ती साहजिकच आड येते, हेच लोक आमच्या लता, आशा, रफी वगैरेंच्या चुका काढण्यास तत्पर. पण त्यांना का दोष द्या, आमच्या लता, आशा ह्यांच्या असलेल्या/ नसलेल्या चुका दाखवावयास आमचेच अनेक मराठी वीर पुढे असतात. ह्यातील काहींना मग मी खाजगी पत्रांद्वारे हे दर्शवून दिले. काहींना हे पटले , काहींना नाही.
असेच एक उदाहरण एका अलिकडेच लिहू लागलेल्या मर्हाठी चित्रपट विषयक तज्ञ्याचे. ह्या गृहस्थांनी लोकसत्तेच्या पुरवणी अंकात पानभर लेख मुघल- ए- आझमवर लिहीला. त्यात त्याच्या यशात निर्माता दिग्दर्शक, संवाद लेखक व दिलीपकुमार ह्यांचे कसे हात होते ह्याबद्दल त्यांनी खूपच विस्ताराने व अधिकारवाणीने लिहीले. 'मग मी दिलीपसाहेबांना विचारले...' असली सगळी वाक्ये टाकत. पण त्यात एक अनुल्लेख मला पार खटकला. त्यांना मी तसे ई- मेल ने विचारले. त्यात मी त्यांना लिहीले "ह्या प्रदीर्घ लेखात ह्या चित्रपटाच्या अपार यशात ज्या व्यक्तिंचा हातभार लागला आहे, त्यांचे उल्लेख करतांना लताबाईंचे नाव अजिबात घेतलेले नाहीत. लताबाई- आपल्या लताबाई!! का, इथे खास मर्हाठी बाणा आड आला?' अर्थातच अनेक मोठ्या व्यक्तिंबरोबर सहजतेने घसट करणारे ते ज्येष्ठ वगैरे लेखक माझ्या ह्या निषेधाची कसली दाद घेतायत?
तेव्हा आपणच सार्वजनिक स्थानी आपल्याच मानाचे स्थान असलेल्या व्यक्तिंना खाली खेचण्यात मग्न असू, आणी इतरेजन त्यांच्या त्यांच्या अगदी सुमार- टुकार जनांना पुढे ढकलण्यात मग्न असतील, तर आपली कसली प्रतिमा, अन कसले काय!
नेहमी सारखे अभ्यासपुर्ण संपादकीय.
बंगाली आणी तामिळांची दिलेली उदाहरणे आवडली. मला वाटते यात गुजराथी देखील अधिक प्रमाणात येतात ( ज्यांची मुंबईत लोकसंख्या लक्षणीय आहे ).
इथे दिलेल्या सर्व प्रतिक्रिया ही अभ्यासपुर्ण
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लेख चांगला आहे. पण अग्रलेख म्हणण्यास फार त्रोटक आहे.
मुद्दे चांगले वाटले.
प्रसारमाध्यमांनी मराठी माणसाची चितारलेली प्रतिमा आहे ती - भांडकुदळ आणि अल्पसंतुष्ट नोकरपेशी माणसाची.
थोड्याफार प्रमाणात हे खरं आहेही
काय ही प्रतिमा संपूर्ण मराठी माणसाची प्रातिनिधिक मानता येईल?
ढोबळ मनाने राशी भविष्याप्रमाणे मानायचे झाल्यास होय.
अपवाद आहेत पण कमी
अल्पसंतुष्ट चेतन
अवांतरः ठेविले अनंते तैसेची रहावे (अशिच् आपली वृत्ति आहे का?)
वेगळ्या विषयावरचा हा अग्रलेख आवडला. मागे नवलकरांच्या पत्रकार कन्येने यावर एक विस्तृत लेख लिहिला होता, त्याची आठवण झाली. बाकी, अशा गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हेही ज्याचे त्याने ठरवायला हवे. पूर्वग्रह बदलणे अशक्यप्राय असल्याने त्याला द्यायचेच झाले तर कृतीतून उत्तर दिलेले योग्य.
भाषक पातळीबरोबरच हे पूर्वग्रह म्हणा किंवा पिजनहोलिंग म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसते. याची चुणूक हवी असेल तर गूगलमध्ये शोध घेताना ऑटो-कंप्लीटचा पर्याय निवडा, आणि मुख्य शोधपृष्ठावर व्हाय डू इंडियन्स/फ्रेंच/अमेरिकन्स/जॅपनीज काय हवे ते टंका. गूगल जे पर्याय सुचवते, ते लोकप्रिय शोधांवर आधारित. ते वाचले तर आपण सगळेच कसे इतरांविषयीच्या हजारो गैरसमजुतींचे, दोन पाय फुटलेले होल्डॉल आहोत हे ध्यानी येईल :).
लेखाचा अजून विस्तार करता आला असता.
मराठी माणसाची प्रतिमा पर्यटक म्हणून चांगली आहे असे मला वाटते आणि तश्याप्रकारची मते अमराठी लोकांकडूनसुध्दा कळाली आहेत. मी डलहौसीला गेलो असताना, मला तिथला एक हॉटेलवाला सांगत होता कि, इथे येणार्या लोकांमध्ये बहुदा गुजराथी, बंगाली आणि मराठी लोकांची संख्या जास्त असते. हेच मत मला हिमाचल प्रदेशच्या काही भागातही सांगितलं गेलं. सांगणार्यांच्या मते इतर मंडळी उदा. दाक्षिण भारतीय, राजस्थानी ( मारवाडी ), पंजाबी, उ.भारतीय हे फक्त तिर्थक्षेत्राच्याच ठिकाणी पर्यटन करतात.
कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा ठराविक साचे (स्टिरिओटाइप्स) बनतात तेव्हा त्यामागे काही ऐतिहासिक सत्य , परंपरा या गोष्टी असतात, पण त्यांचा भाग अगदी नाममात्र असा असतो. न बदलणारे स्टीरिओटाइप्स घडण्यामागे "सतत बदलत असणार्या वास्तवाबद्दल बांधून ठेवलेली झापडे" हेदेखील प्रमुख कारण असते.
हा न्याय मराठी माणसाच्या प्रतिमेबद्दलही लागू होईल असे मला वाटते. मराठी माणसाच्या धंद्यात नसण्याबद्दलच्या , "रिस्क" न घेण्याबद्दलच्या , एकूण भारतीय व्यवस्थेमधल्या दुय्यम स्थानाबद्दलच्या ज्या मिथ्यकथा प्रसृत केल्या जातात त्याला खरा छेद दिला जाऊ शकतो याबद्दलच्या डेटाची (विदा) रीतसर छाननी करून. अर्थात, असा विदा बहुदा सहजासहजी मिळणारा नसावा.
राहता राहिली गोष्ट हिंदी सिनेमाबद्दल. त्याच्यातून प्रसृत केल्या जाणार्या गोष्टींना कितपत सत्य मानायचे ?

एका वेगळ्या वास्तवाची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. सामन्य माणूस हॉस्पिटलाची पायरी चढल्याशिवाय त्याला हे अनुभव येत नाहीत. आणि हॉस्पिटलात जायचे म्हटल्यानेच अर्धी लोकं धीर सोडतात त्यामुळे त्यांना या मुद्द्यांवर विचार करायला सवड अथवा तसे करायची इच्छा होत असेल की नाही शंकाच आहे. एकूणच महागडे उपचार म्हणजेच चांगले उपचार (त्यात 'सुई टोचल्याशिवाय माणूस बरा होत नाही' हा समज पण आला), हा जो काही गैरसमज लोकांच्या मनात आहे तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता धूसरच दिसते. परंतु आपल्या लेखाने आपण या प्रबोधनास सुरुवात केली आहे, याबद्दल आपले आभार.
एकूणच महागडे उपचार म्हणजेच चांगले उपचार (त्यात 'सुई टोचल्याशिवाय माणूस बरा होत नाही' हा समज पण आला), हा जो काही गैरसमज लोकांच्या मनात आहे तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता धूसरच दिसते.
मुलांना इंजेक्शनची भीती घालणारे पालक आणि त्याला मुलाने औषध घ्यावं म्हणून त्याला हो हो म्हणणारे प्रामाणिक डॉक्टर हे मात्र मला नीटसं पचलेलं नाही.
"काहीही झालेलं नाही आहे तुला, थोडी काळजी घे, आणि अगदी फारच त्रास झाला तर ये परत!" असं सांगणारे डॉक्टर जास्त विश्वासार्ह वाटतात, अगदी गाडीचा मेकॅनिकही. अर्थात "परीस्थिती गंभीर होत आहे, पुढे काहीतरी करायला पाहिजे" हे पण तेच डॉक्टर क्वचित सांगतात आणि आपल्या शरीराकडून तसाच फीडबॅक येत असतो, तेव्हा विश्वास खोटा नाही याची खात्री पटते.
आजचे संपादकही "काही झालेलं नाही तुला" या प्रकारातलेच डेंटीस्ट असल्याचा स्वानुभव!
हे सगळं ऐकून बघून माहीत झालं आहे आता, पण त्या माहितीचं एकत्रिकरण आवडलं.
सुदैवानं बरेचसे डॉ. घरातलेच असल्याने फारशी पिळवणूक वाट्याला आली नाही तरी
तसे नेहमीच होईल असे सांगता येत नाही. माझ्या मुलाच्या बालदम्यासाठी मात्र दिलेली औषधे
आम्हाला पटले नसतानाही दोन वर्षे दिली (नेब्युलायझर वगैरे चांगले वाटले). मुलांच्याबाबतीत
डॉ. म्हणतात तसे न करणे ही रिस्क घ्यायला नको वाटते (त्यावेळी डॉ.नी काही औषधांची
जाहिरात केल्याचे आठवते.) बाकीची औषधे हळूहळू कमी करत नेऊन
(हे मुलाच्या डॉ. ना सांगितले होते) आता दोन वर्षापासून आयुर्वेदीक औषधे देत आहोत.
बराच गुण आला आहे, अर्थात मुलगा मोठा झाल्यावरच हा बदल केला होता.
रेवती
माझ्या एका मित्राची लॅब आहे. प्रत्येक डॉक्टरचा कट तो वेळ्च्या वेळी पोहचवतो हे मला माहित होते. पण परवा दुसर्याएका मित्राने (याचा औषधांचा व्यापार आहे )एक नवीन मोबाईल आणला होता.चांगला महागातला. त्या मोबईलच्या बॉक्स कडे पाहुन त्याला विचारले काय रे नवीन मोबाईल. तो म्हनाला हो पण माझ्यासाठी नाही एका डॉक्टरला द्यायचा आहे. त्यावर त्याने जी माहीती दिली ती एकुण वाईट वाटले. आजकाल औषधे कोणती रेफर करायची यासाठी सुधा डॉक्टर पैसे घेतात हे एकुन खरेच वाईट वाटले.
.....व्यथीत बन्ड्या
'कट प्रॅक्टिसचं' हे भूत आता संपूर्ण जगच गिळंकृत करु पहात आहे. अमेरिकेतलंच आत्ता नजरेसमोर असलेले वास्तव हेच आहे. गरज नसताना महागडी औषधे, कॅट स्कॅन, एमाराय, तपासण्या मग त्यांचे अवाढव्य खर्च भागवण्या करता मेडिकल इन्श्योरन्स आणि त्या इन्शोरन्सचे पगारातून कापून घेतले जाणारे भरमसाठ मासिक हप्ते अशा दुष्ट चक्रात अमेरिकेतले सर्व नोकरदार अडकलेले आहेत. अमेरिकेत पेशंट्स्नी डॉक्टरांना विविध केसेस मधे 'सू' करण्याचं (खटला भरण्याचं) प्रमाण इतकं जास्त आहे की डॉक्टर्स हे 'डिफेन्सिव प्रॅक्टिस' करतात. अमेरिकेतल्या वार्षिक हेल्थकेअर खर्चात १०० ते १७८ बिलियन डॉलर्स इतका अतिरिक्त खर्च ह्या डिफेन्सिव मेडिसीन वर होत असतात (हा दुवा पहा - हे आकडे २००५ मधले आहेत).
डॉक्टरांकडून नाडले गेलेले/किंवा त्यांच्या चुकांचे बळी ठरलेले पेशंट्स, त्यांना आपल्या जाळ्यात खेचून जास्तितजास्त भरपाई मिळवून द्यायला बसलेले लॉयर्स आणि हे सगळे झेंगट टाळण्यासाठी आपल्यावरची जबाबदारी टाळून पेशंट्सना तपासण्यांसाठी दारोदार फिरवणारे डॉक्टर्स हे अगदी सर्रास दिसणारे चक्र आहे. किंबहुना ती एक व्यवस्थाच बनलेली आहे. अमेरिकन हेल्थकेअर साठी वार्षिक किती खर्च होतो ह्यासंबंधी हा दुवा पहा, भारताच्या वार्षिक राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ दुप्पट ती रक्कम आहे हे पाहून डोळे फिरतात!!
हेच लोण आता आपल्याकडेही हातपाय पसरत आहे.
फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हळूहळू लोप पावत गेल्याने आपला तोटा झालाय/होतोय ह्यात वाद नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाला 'अंतर्बाह्य' ओळखणारा/री डॉक्टर काका किंवा काकू ही संकल्पना आपल्याला मानसिक आधार देणारी होती. त्यात असलेला विश्वास, आत्मियता ह्याची जागा कोरड्या व्यवहाराने कधी घेतली हे कळलेच नाही. ग्राहक संरक्षण कायदा लागू केल्याने डॉक्टर्स असुरक्षित होणारच.
त्याचा वापर तारतम्याने व्हावा, त्यातली कलमे ही मानवी संबंधांना समजून घेणारी असावीत आणि डॉक्टर हा सुद्धा एक माणूस आहे आणि तो चुका करु शकतो हे जाणून त्याभोवती विचारपूर्वक गुंफलेली असावीत अशी अपेक्षा चूक ठरु नये. तसेच पेशंट हा आपल्याकडे आलेला बकरा आहे आणि ह्याला पुढल्या सहा महिन्यात व्यवस्थित कापून त्याचा बँकबॅलन्स काही हजारांनी हलका केला नाही तर आपण चुकलो असे डॉक्टरांनीही समजू नये. परस्परविश्वास हा मूलभूत असतो त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात हे समजून घेणारे पेशंट्स आणि डॉक्टर्स असतील तर ती सर्वांसाठीच सामाजिक आरोग्याची बाब ठरेल.
चतुरंग
वैद्यकी हा आजकाल एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे इतर व्यवसायात रुढ असलेल्या गोष्टी, फसवणुक, चुकीची माहीती वगेरे या आल्याच. वास्तवीक मेडीकल ला प्रवेश घेतानाच त्यामागाचा उद्देश 'बक्कळ पैसा कमावणे' एवढाच असतो. नंतर मग डॉक्टर, स्पेशालिस्ट, लॅब असे नेटवर्क जमले की नको असनार्या किंवा गरज नसताना काही टेस्ट करायला रुग्णाला भाग पाडले जाते. लोकांनाही ह्या गोष्टीची जाणीव असते परंतु 'अडला नारायण ...' उक्ती प्रमाणे लोकही तो खर्च करतात. त्या रिपोर्ट चा नंतर काय उपयोग होतो ते देवालाच ठाउक.
एखादा डॉक्टर फ़ी का घेतो? तर त्याने पेशंटला बरं करण्याची जी जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी ५ ते १० वर्षे केलेल्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे जी जोखीम पत्करलेली आहे, त्या प्रमाणात तो त्याचे मानधन आकारणार
या आपल्या विधानाशी मी असहमत आहे. माझ्या मते कुठलाही डॉक्टर पेशंट ला बरे करण्याची जबाबदारी घेत नाही. पेशंट चे काहीही झाले तरी त्यात डॉक्टरांच्या मते त्यांची काहीही चुक नसते. अगदीच निष्काळजी पणा झाला तरी कायद्याच्या कचाटयात कुठलाही डॉक्टर सापडल्याचे मी तरी पाहीलेले नाही. वकील जसे केस लढायचे पैसे फी म्हनुण घेतो, केसचा निकाल काय लागेल याचे त्याला काहीही घेणे नसते तसेच डॊक्टर रुग्णाला बरे करण्यासाठी जे करतो त्याचे पैसे घेतो. पेशंट बरा होइल की नाही, कधी बरा होइल याचे त्याला काहीही सोयरसुतक नसते. डॊक्टरी पेशा हा उदात्त व्यवसाय आहे हे कधीच कालबाह्य झाले आहे. आज तो एक व्यवसाय आहे. फक्त व्यवसाय.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
लेखाचा विषय अगदी आपल्या जवळचा आहे.
भारतात असे पर्यंत जे जे काही डॉक्टरांचे अनुभव आले ते तरी चांगले होते. पुण्यामध्ये मात्र गांव भागात एक आयुर्वेदीक डॉक्टर आहेत. अतिशय नामांकित आहेत. २००४ साली त्यांच्याकडे एकदा औषध घ्यायला गेले तर माझ्या १५ दिवसाच्या औषधांची फी ७५० रू. लावली त्यांनी. मी एकदम आवाकच झाले होते. पण त्याच डॉक्टरांकडे काही काळ शिकाऊ म्हणून काम केलेल्या डॉक्टरांनी मात्र उत्तम उपचार कमी खर्चात दिले...
इथे अमेरिकेत गेल्या महिन्यात थ्रोट इन्फेक्शन होऊन ताप आला होता. तेव्हा इथल्या डॉक्टरांनी ८०० मिग्रॅ. ची एक या प्रमाणात आयब्युप्रोफेन दिवसातून ३ वेळा घ्यायला सांगितले. २ गोळ्या पोटात गेल्यावर माझी जी काही अवस्था झाली होती.. त्यानंतर मी त्या गोळ्यांना हातही नाही लावला. कारण ऍडव्हिल च्या डबीवर २०० एम्जी च्या गोळ्या २४ तासात जास्तीत जास्त ६ च घ्या असं लिहिलेलं असतं. .. ते वाचलं मी. आणि त्या प्रोस्क्राइब करणार्या डॉक्टरची किव आली.
मास्तर, डॉक्टरी पेशातला प्रामाणिकपणा संपत आला आहे का.. अशीच शंका आली आपला हे लेख वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एकंदर अग्रलेखावरुन वाटते आहे की डॉक्टरमंडळींनी मनावर घेतले तरच काही तरी फरक पडू शकतो. औषधकंपन्या, विमाकंपन्या यांनी आरोग्यव्यवस्था जवळजवळ हातात घेतली आहे म्हणायला हरकत नाही. [निदान परदेशात/पाश्चात्य देशात] किंचीत आशा आहे असे वाटते.
निदान डॉक्टरांनी रुग्णाला उपलब्ध पर्याय [स्वस्त ते खर्चीक] सांगीतले पाहीजेत. मग भले त्यांचे मत एका विशिष्ट पारड्यात टाकले तरी.
तसेच आरोग्य खात्याने / म्युनिसीपाल्टीने / सेवाभावी संस्थेने प्रत्येक शहरातील प्रमुख इस्पीतळातील [सरकारी, खाजगी], लॅब मधील विशिष्ट चाचण्यांचे दर दिले पाहीजेत. उदा. एका वेबसाईटवर अशी माहीती असली तर रुग्ण स्व:ता ठरवु शकतील कुठल्या ठिकाणी जायचे.
सामान्य लोकांना लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे किमान ह्या कारणावरुन तरी प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरुक होउन कमीतकमी वेळा डॉक्टरकडे जायची वेळ आणावी. अलोपाथी बरोबर इतर वैद्यकिय शाखातील उपचारांचा वापर करुन पहावा.
मास्तर अग्रलेख महत्वाच्या विषयावर आहे म्हणुन आवडला देखील व सामान्य लोकांच्या हातात फारसे काही नाही हे वाचुन वाईटही वाटले :-(
याच महिन्यातली गोष्टं... माझा मित्र त्याच्या आईची सर्जरी आहे म्हणून पुण्याला गेलाय. सर्जरी झाल्यावर एक आठवडा आय.सी. यु. मधे ठेवलं होतं.. त्यानंतर प्रोग्रेस बघुन रूम मधे हालवणार होते. आठवड्याच्या शेवटी प्रोग्रेस पॉझीटीव होता, पण रूम अवेलेबल नाही या कारणाने पुढचे आठ दिवस पेशंट आय. सी. यु. मधेच. नंतर कळलं कि हे लोक रूम अवेलेबल असली तरी आय. सी. यु मधुन पेशंटला हालवायला डिले करतात... आय. सी. यु.ची फी लै जास्त असते ना... जेवढे दिवस पेशंट तिथे जास्तं तेवढाच हॉस्पीटलचा फायदा. या लोकांना आपल्या हॉस्पीटलची कपॅसीटी माहीत नसते का? मग असलेल्या जागेपे़क्षा जास्त पेशंट का दाखल केले जातात?
*******
रेफरल फी सारखंच मेडीसीन प्रिस्क्राईब करायलासुद्धा डॉक्टरांना मेडिकल कंपन्यांकडून प्रलोभनं दिली जातात (नेहमीच पैशांच्या स्वरूपात असते असे नाही... कधी गिफ्ट्स तर कधी काही...)... एम. आर. लोकांचे महिण्याचे टारगेट पुर्ण व्हायला नको? .... मग डॉक्टर कमी किमतीत मिळणारे (सेम केमीकल्स असले तरी) सोडून महागडे औषधं प्रिस्क्राईब करतात. आणि आपण प्राणांशी गाठ असल्याने पैशासारख्या शुल्लक गोष्टीचा विचार करत नाही (हे त्यांनाही ठाऊक असतं आणि म्हणूनच त्यांच फावतं).
*******
सगळं दिसतं हो समोर होताना... पण करणार काय? ज्या टेस्ट करायला सांगितल्यात त्या केल्याशिवाय पेशंटला काय झालंय त्याच निदान डॉक्टर लोक करतच नाहीत. कोणत्या टेस्ट खरंच गरजेच्या आहेत ते कसं कळणार, आणि कळून तरी काय फायदा, जर टेस्ट केल्याशिवाय निदानच होणार नसेल तर?
-अनामिक
आणि माझ्या मनाच्या जवळचा.
पण या समस्येवर तोडगा अनेक दिशांनी यावा लागेल, असे वाटते.
रुग्णाने सुजाण ग्राहक व्हावे हे एका बाजूने महत्त्वाचे आहेच.
पण वैद्यकाची बाजारपेठ ही मुक्त बाजारतत्त्वाला मात करणारी आहे (मार्केट फेल्युअर). अशा बाबतीत रुग्ण आणि डॉक्टर यांच्या दोघांपेक्षा वेगळा, तटस्थ पण सद्-इच्छुक नियंत्रक (रेग्युलेशन) असणे जरुरीचे आहे. हा तृतीय पक्षी नियंत्रक म्हणजे मुक्त बाजारपेठेतील विमा कंपन्या असण्याचा प्रयोग काही देशांत (मुख्यतः अमेरिकेत) झाला आहे, पण त्याचा हवा तसा फायदा झालेला दिसून येत नाही. (आप-बचावात्मक वैद्यकव्यवसाय [डिफेन्सिव्ह मेडिसिन] अमेरिकेत एक समस्या बनला आहे, त्याची विस्तृत चर्चा वर चतुरंग यांनी केलेली आहे.) नियंत्रक सरकारी असण्याचे प्रयोग काही देशांत (उदाहरणार्थ : भारत) सपशेल फसले आहेत, तर काही देशांत काही प्रमाणात कामचलाऊ आहेत (उदाहरणार्थ : कॅनडा).
डॉक्टरांच्या प्रशिक्षणात सामाजिक जाणीव असायला हवी हेसुद्धा धोरण संपादकीयात सांगितल्याप्रमाणे राबवायला हवे.
पण कुठलेही एकच धोरण राबवल्यास हवा तो फरक पडणार नाही, असे वाटते.
बारावीमधली मुले अभियांत्रिकीला जावोत, व्यापारक्षेत्रात जावोत, किंवा वैद्यकक्षेत्रात जावोत - सामान्यपणे भविष्यातील उदरनिर्वाह/लाभ या दृष्टीने विचार करून निवड करणार. अभियांत्रिकीचा विचार करताना त्या व्यवसायातील लाभाचा विचार करतील, पाच मिनिटांनी वैद्यकाचा विचार करताना मात्र सामाजिक जाणीव जागृत होईल, अशी अपेक्षा कशी करावी? अवघ्या समाजातच सामाजिक जाणीव पेरली तर बरे.
फक्त ग्राहक सुजाण होऊन चालणार नाही, कारण कित्येक गावांत पर्याय काय असतो?
फक्त नियंत्रण कडक करून चालणार नाही, कारण ग्राहक/व्यावसायिक बाजार सुजाणपणे/सचोटीने करणार नसतील तर नियंत्रक भ्रष्ट होण्यास ते आमंत्रणच आहे.
ग्राहक-व्यावसायिक-नियंत्रक तीन्ही बदलायला पाहिजेत.
- - -
आता सैद्धांतिक मुद्दा :
"रिफरल फी" या प्रकाराला माझा सैद्धांतिक विरोध नाही. सामान्य-चिकित्सक (जनरल प्रॅक्टिस) डॉक्टर हा रुग्णांची वाहातुक सुरळित करतो - ज्यांना विशेषज्ञाकडे जायची गरज नाही, त्यांना तसे सांगतो, ज्यांना विशेषज्ञाकडे जायची गरज आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. या सेवेत जो वेळ खर्च होतो, त्याचा मोबदला कुठल्या तरी प्रकारे मिळायला पाहिजे. माझ्या मते तो रुग्णाने थेट द्यावा - म्हणजे या वाटाड्याचे आर्थिक कंत्राट-कर्तव्य रुग्णाच्यासाठी राहील. पण अशा बाबतीत रुग्णाला सेवा पुरेशी वाटत नाही - जो डॉक्टर खुद्द उपचार (तोही जालिम हवा! - म्हणजे खेड्यामध्ये इंजेक्शन, सलाईन...) करत नाही, तो काही मूल्य देण्यासारखी सेवा करतो असे कित्येक रुग्णांना पटत नाही. (असा माझा तरी अनुभव होता. पण मला सरकारी पगार होता, म्हणून करदाता मला त्या सेवेसाठी मोबदला देत होता.) अशा परिस्थितीत खाजगी दवाखान्यांत हा मोबदला रुग्णाने आडमार्गाने देण्याशिवाय पर्याय राहात नाही. (म्हणजे अंतिम उपचार करणार्या, किंवा लॅबटेस्ट करणार्या डॉक्टराच्या फीवरचा अधिभार=रिफरल फी.) यात तोटा असा होतो, की वाटाड्या डॉक्टरचे प्राथमिक कंत्राट-कर्तव्य रिफरल फी देणार्या विशेषज्ञाकडे असते, रुग्णाकडे नाही.
हा फार गुंतागुंत असलेला प्रकार आहे व शहरी विभागात बाजारभावाप्रमाणे इतर सेवा-धंदा प्रमाणे याची रक्कम ठरली जाणार. हळुहळू विमाकंपन्या, कामगार कायदा अश्या साधनातुन एक आरोग्य व्यवस्था येणार. [जशी आता दिसते आहेच]
राहता राहीली ती गरीब लोकांकरता, ग्रामीण लोकांकरता वेगळी योजना बनणे [फुकट नाही पण जरा स्वस्त]. यात सरकार /करदाता व विमाकंपन्या या हातभार लावणार. औषधकंपन्यांना कडून सवलतीच्या दरात औषधे घेणे व देशातील सर्व खाजगी डॉक्टरांना [वर्षातुन एक महीना असे] या विशिष्ट आरोग्य केंद्र व इस्पीतळात सक्तीची सेवा [जशी नॅशनल सर्व्हीस - Conscription] करायला लावणे. किंवा आहे त्या इस्पीतळात , क्लीनिकमधे तेच डॉक्टर हीच सेवा उपलब्ध करुन देणार.
थोडक्यात काही लोकांकडून जास्त पैसे, काही लोकांकडून कमी. एकंदर विमाकंपन्या यात आल्याशिवाय खरे नाही.
हा एक सामाजीक प्रश्न आहे व सगळ्यांनी [रुग्ण, डॉक्टर, विमाकंपन्या, सरकार, औषधकंपन्या] जबाबदारी वाटून घेतल्याशिवाय इतर उपाय नाही.
यात तोटा असा होतो, की वाटाड्या डॉक्टरचे प्राथमिक कंत्राट-कर्तव्य रिफरल फी देणार्या विशेषज्ञाकडे असते, रुग्णाकडे नाही.
अगदी खरे. यामुळेच तर हळूहळू संपूर्ण व्यवसायाचे नाव बदनाम होते.
चांगल्या विषयावरचा लेख, आवडला.
संपादकीय विचार करायला लावणारे
भरमसाठ डोनेशन भरुन वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या या तरुण डॉक्टरांकडून वैद्यकीय क्षेत्राचा धंदा न केल्यास नवल !
दुर्दैवाने फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट ही इतिहासजमा होत आहे.

सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील अग्रलेख.
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात लाखो रुपये भरून घेतलेल्या शिक्षणाचा व्यापार हा होणारच. केवळ अभ्यासक्रमात नीतीमत्तेचे चार धडे घालून फारसा फायदा नाही. वर धनंजय यांनी सुचवल्याप्रमाणे, रुग्ण आणि डॉक्टर यांतील नियंत्रकाचे काम करणार्या संस्थेवरील जबाबदारी फार मोठी आहे. आणि ही जबाबदारी केवळ सरकारच (फक्त जबरदस्त इच्छाशक्ती तेवढी हवी) समर्थपणे पार पाडू शकेल. बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचारात हा एक फार मोठा मुद्दा होता, हे आठवत असेलच. अमेरीकेत विमा कंपन्यांनी वैद्यकीय व्यवसायाची पार वाट लावली आहे त्यामानाने ब्रिटनमध्ये (सरकारी नियंत्रणामुळे) परिस्थिती इतकी आटोक्याबाहेर गेलेली नाही.
तात्विकदृष्ट्या रेफरल फीमध्ये गैर काही नाही. मात्र वारंवार एखाद्या डॉक्टरकडून, रुग्णांना "तुम्हाला काही झाले नाही" हे सांगण्यासाठी भरमसाठ खर्चाच्या तपसण्या करण्यासाठी रेफरन्स जात असतील, तर ते नक्कीच अयोग्य आहे.
सामान्यतः लागणार्या जवळपास सत्तर (चुभुद्याघ्या) औषधांची एक यादी सरकारने बनवली होती. आणि ती औषधे जेनेरीक नावांनीच विकावीत असा आदेशही निघणार होता. मात्र झारीतील शुक्राचार्यांमुळे तो अद्याप निघाला नाही, असे समजते. बांगलादेशसारखा देशही जे करू शकतो, ते आपल्याला का जमू नये?
उत्तम अग्रलेखाबद्दल भडकमकर मास्तरांचे आभार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अमेरीकेत विमा कंपन्यांनी वैद्यकीय व्यवसायाची पार वाट लावली आहे त्यामानाने ब्रिटनमध्ये (सरकारी नियंत्रणामुळे) परिस्थिती इतकी आटोक्याबाहेर गेलेली नाही.
एका अमेरिकेतल्या मित्राकडून कळाले की त्याच्या डेन्टिस्टच्या दुकानाच्या आतच एक वकील केबिन मांडून बसलेला असतो आणि डेन्टिस्टाकडे जायच्या आधीच वकिलाच्या खोलीत जाऊन जर डेन्टिस्टाने माझी वाट लावली त्यावर कोणते खटले दाखल करता येतील आणि कशी भरपाई मिळवता येइल त्यावर चर्चा होते म्हणे...
... काय ऐकावे ते नवलच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
सुंदर अग्रलेख.
मास्तर तुम्ही म्हणताय ते पटतयं खरं. पण हा प्रकार फक्त तेव्हाच लक्षात येतो जेव्हा बिल बरेच... होते. बाकी वेळा हे कळत ही नाही. शिवाय आज काल डॉक्टर रिस्कही कमी घेतात त्यामुळे बर्याच टेस्ट कराव्या लागत असाव्यात.
तरी पेशंट आपलं ऐकतात, आपण सांगू तीच पावडर घेतात.. म्हणजे बघा केवढा बिझनेस या लोकांना मात्र फाट्यावर मारलं पाहिजे.
अवांतरः मी असेही काही लोक पाहिलेत की ज्यांना मुद्दामुन काहितरी छोटमोठ अजारपण हवं असतं
चेतन
सुंदर अग्रलेख........ भडकमकर मास्तरांचे आभार!
"अवांतरः मी असेही काही लोक पाहिलेत की ज्यांना मुद्दामुन काहितरी छोटमोठ अजारपण हवं असतं"
== अश्या लोकांना नक्किच सुख टोचत असणार..
मास्तर तुमची तळमळ आणि काहीही कारणाशिवाय फक्त गल्ला भरण्यासाठी कट याबद्दलची चीड स्पष्ट जाणवते आहे.
पण हा समाजातल्या इतर सर्व क्षेत्रासारखाच भ्रष्टाचार आहे जो पकडता ही येत नाही आणि तितका उघडही नाही.
काही इतर प्रतिक्रियांप्रमाणे केलेला खर्च परत मिळवण्याचाही प्रकार आहे. पण तो सरळ चार्ज न करता गैरमार्गाने घेतला जातो आहे.
हे राजकीय पद मिळवताना पैसे खर्च करणे आणि ते मिळवण्यासाठी कंत्राटे / उद्योगपती यांच्या मार्गाने वसूल करणे इतकेच गंभीर मात्र आहे.
एक प्रश्नः यु के मध्ये सरकारी दवाखाने (एन एच एस) मध्ये औषध द्यायला प्रचंड टाळाटाळ करतात. सर्दी / ताप / डोकेदुखी/ उलट्या / जुलाब ( डायरिया सदृश) काही व्हायरल ताप ज्याला भारतातले आपले अगदी फॅमिलि डॉक्टर सुद्धा अँटिबायोटिक्स देतात त्याला ते काहीही औषधच देत नाहीत. तीन तीन ताप असताना लहान दोन तीन वर्षाच्या मुलांनाही काही उपचार करत नाहीत. यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत. माझा स्वतःचा आणि अनेक मित्र मैत्रिणिंचा अनुभव आहे. आणि यु के मध्येच हे फार घडतं.. माहितगारांनी प्रकाश टाकावा...
यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत.
हे वाक्य कळाले नाही,...

यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत.मला असं म्हणायचं होतं की औषधे न देण्यामागे काही शास्त्र आहे का? माझ्या मित्राच्या मुलाला खूप ताप होता सर्दी होती. (वय -२ वर्षे) पण त्यांनी औषध दिले नाही. लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते असं त्या एन एच एस मधल्या डॉक्टर / नर्सेस ने सांगितलं. हे खरं आहे का? मग त्याचा अर्थ भारतात औषधांचा अवास्तव मारा होतो का?
असं कधीच होत नाही की काही छोटं मोठं दुखणं आहे आणि तुम्ही औषध घेणं टाळता. आपल्या कडे केमिस्ट सुद्धा बिनधास्त औषधे देतात. काहीही होत असेल तरी साधे उपाय करा ऍलोपॅथीचं औषध घेऊ नका असं कोणीच सांगत नाही. काही ना काही औषध हे दिलंच जातं.
डिफेंन्सिव्ह ट्रीटमेंट - काही इतर परिणाम होऊ नयेत म्हणून लहान आजार, जास्त ताप किंवा अशा कारणांसाठी काहीच औषध द्यायचे नाहीत. जबाबदारी टाळण्याचा प्रकार.
एक प्रश्नः यु के मध्ये सरकारी दवाखाने (एन एच एस) मध्ये औषध द्यायला प्रचंड टाळाटाळ करतात. सर्दी / ताप / डोकेदुखी/ उलट्या / जुलाब ( डायरिया सदृश) काही व्हायरल ताप ज्याला भारतातले आपले अगदी फॅमिलि डॉक्टर सुद्धा अँटिबायोटिक्स देतात त्याला ते काहीही औषधच देत नाहीत. तीन तीन ताप असताना लहान दोन तीन वर्षाच्या मुलांनाही काही उपचार करत नाहीत. यामागे काही शास्त्र आणि आपल्याकडे अवास्तव औषधांचा मारा होतो की ते काही परिणाम होउ नये म्हणून एक प्रकारची डिफेंन्सिव ट्रीटमेंट आहे की काहीच उपचार करायचे नाहीत. माझा माझा स्वतःचा आणि अनेक मित्र मैत्रिणिंचा अनुभव आहे. आणि यु के मध्येच हे फार घडतं.. माहितगारांनी प्रकाश टाकावा...
»
सर्दी/ताप/डोकेदुखी/जुलाब/उलट्या ह्यावर लागलीच औषध न देणे हे योग्य वाटते. सर्दीला तसेही रामबाण औषध नसतेच.
अतिशय जुनाट वारंवार होणारी सर्दी असेल तर डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे उत्तम अन्यथा सर्वसामान्य स्वरुपाची सर्दी आपोआपच आठवड्याभरात आटोक्यात येते.
ताप आलेला असला तर फक्त ताप कमी करण्यासाठी टायलेनॉल्/ऍडविल अशी ओवर दि काऊंटर औषधे असतात. त्यानेही ताप रहात नसेल तर मात्र पुढील उपचार करणे योग्य. मुलांचा ताप वाढला की आई-वडील घाबरुन जातात आणि डॉक्टरांनी लगोलग औषधे दिली नाहीत तर त्यांना अस्वस्थपणा येतो.
फार जास्त ताप येऊन मूल ग्लानीत जात असेल तर ताप उतरवण्यासाठी चक्क थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात (आम्ही हा उपाय आमच्या मुलाबाबत तो लहान असताना बर्याचवेळा केलाय).
त्यानंतर डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात ती द्यावीत.
अँटीबायोटिक हे व्हायरल इन्फेक्शनवर देत नाहीत ते फक्त बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर देतात.
जुलाबावरही लगेच औषध लागू पडत नाही पोटातले इन्फेक्शन जाईपर्यंत जुलाब होत रहातात. वरुन सतत साखर-पाणी, चहा, मेडीकेटेड पॉप्सिकल्स (बर्फाच्या कांड्या असतात - सीवीएस फार्मसी सारख्या दुकानात मिळतात - जुलाबातून जाणारी विटामिन्स आणि मिनरल्स त्यातून मिळतात आणि पाणीही मिळते मुलांना त्या आवडतातही). पोटातले इन्फेक्शन गेले की जुलाब आटोक्यात येतात. फार जास्ती जुलाब असतील तर औषधाबरोबरच मुलांच्या कपाळावर थंड दुधात भिजवलेल्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात त्याने उत्तम उपचार होतो.
(डिसक्लेमर - वर सांगितलेले काही उपचार हे आम्ही आमच्या मुलाबाबत आम्ही यशस्वीरीत्या कोणताही अपाय न होता वापरलेले आहेत. तरीही आपापल्या जबाबदारीवरच ह्याचा वापर करावा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात टाळाटाळ करु नये.)
चतुरंग
या माहिती साठी खूप आभार.
पण याचा अर्थ हा की या गोष्टींसाठी आपण जसं भारतात डॉक्टर कडे धाव घेतो आणि ते चार औषधे देतात ते बरोबर नाही.
अँटीबायोटिक हे व्हायरल इन्फेक्शनवर देत नाहीत ते फक्त बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर देतात. हे अनवधानाने आणि थोडी माहिती नसल्याने लिहिलं. पण व्हायरल इन्फेक्शन ने ताप आला असेल तरी लवकर औषधोपचार केले जात नाहीत. तुम्ही सांगितल्या प्रमाणे काही औषधे चार दिवस घेऊन जर ताप /आजार कमी होत नसेल तर पाहू असं एन एच एस मध्ये सांगतात. लहान मुलाला तीन तीन ताप असेल तरी चार दिवस औषध न देणं हे न समजण्या सारखं वाटलं.
समजुतीतून आपण तापावर औषध अपेक्षितो पण ताप हे शरीरात काहीतरी चुकीचे घडते आहे हे दर्शविणारे लक्षण आहे. उपचार लक्षणावर होऊन फारसा उपयोग नसतो. मूळ दुखण्याचे कारण सापडायला थोडा वेळ लागतोच आणि त्याप्रमाणे उपचार केले जाऊ शकतात. दरम्यानच्या काळात ताप अतिशय जास्त (जसे २ किंवा ३ किंवा अधिक) होऊ नये म्हणून उपचार गरजेचे असतात आणि ते सर्वसाधारणपणे कोणतेही डॉक्टर्स सांगतातच. कितीही ताप असला तरी काहीच करु नका असे कोणी सांगत असेल असे वाटत नाही, जर असेल तर दुसर्या डॉक्टरांकडे जाणे उत्तम!
चतुरंग
चांगले संपादकीय.
समाजातल्या नैतिकतेची दरडोई साधारण घट सर्व व्यवसायात परावर्तीत होते आहे तशी वैद्यक क्षेत्रातही. शिक्षण आणि वैद्यक-सुशृषा हे व्यवसाय उदात्त आहेत अशी समाजाची धारणा असावीच असे मला वाटते.
सकाळ मधील फॅमिली डॉक्टर अंकात गरज फॅमिली डॉक्टरची या लेखात अनेक सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांना लेखिकेने स्पर्ष केलेला दिसतो.

मास्तर... उत्तम संपादकीय लेखाबद्दल अभिनंदन...
कट प्रॅक्टिस, अनावश्यक टेस्ट इ. मुळे उपचारांचा खर्च भरमसाठ वाढला आहे अगदी नक्की.
आमच्या एक स्नेही इथे अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून ह्याची दुसरी बाजू समजते ....''वकील' ह्या प्राण्याने इथल्या डॉक्टरांना अक्षरशः हैराण करून सोडलंय !!
मास्तर,
संपादकिय लेख अशा विषयावर लिहिला आहात की, प्रत्येकाला ह्या गोष्टीचा थोड्या फार प्रमाणावर अनुभव आलेला असतोच.
डॉक्टरांवर विश्वास ठेवुनच पेशंट सर्व टेस्ट करतो, आपला खिशा कापला जात आहोत याची त्यावेळी कदाचित जाणीव ही नसते कारण मानसिकता वेगळी असते.
डॉक्टर आणि पेशंट हे नाते अजुन सुदृढ व्हावे ही देखिल एक गरज आहे. :)
सरकारी दवाखाने बंद होत गेले आणि खाजगी दवाखानेवाल्यांचे खरे स्वरुप समोर यायला लागले.
पूर्वी (५० वर्षापूर्वी) जन्म दवाखान्यात होत असत आणि मृत्यु मात्र घरीच होत असत. आज ८० वर्षाच्या रुग्णास ही जगवण्याच्या सबबीखाली २/३ महिने उपचार करुन शक्य तितके जास्त पैसे उकळले जातात.
कोठेही औषधाचे / तपासणीचे बील मागितले असता जास्त बिल करुन हवे का असेही विचारले जाते.
सर्वच व्यावसायिकांना एका रात्रीतच श्रीमंत व्हायचे असल्याकारणे हे प्रकार होत आहेत आणि होत राहतील.
पूर्वी जसे न्यायालयाची पायरी चढु नये असे म्हणत तसे कालांतराने दवाखान्याची पायरी चढु नये असे शिकविले जाईल.

लेख आवडला. मला तरी वाटते की, या प्रसारमाध्यमांवर एकदा तरी जबरदस्त कारवाई व्हायला हवी. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.
प्रसारमाध्यमांची गरज आहेच पण त्यांनीही जबाबदारीने वागायला हवे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर

सहमत आहे! एकदा तरी मजबूत कायदेशीर बडगा दाखवून दोनचार उथळ अन् गल्लाभरू वाहिन्या साफ बंद पाडल्या पाहिजेत..!
असो,
छोट्या, लेख आवडला रे!
तात्या.
इनोबा व तात्यांशी सहमत आहे.
यां वाहिन्यांना बातम्या देण्याचे निकष लावले पाहिजेत. काही असे,
१. एकच बातमी किती वेळा दाखवणार याचे तारतम्य असावे. (नवीन बातम्या मिळत नसतील तर २४ तास चालवु नका)
२. कोणतेही चित्रीकरण दाखवण्यासाठी काही नियम असावेत, ज्यातुन देशहिताचा तसेच जनसामान्यांच्या मनःस्वास्थाचा विचार व्हावा. एक्साईज इन्स्पेक्टर जसा कंपन्यात जाउन बसतो तसा या वाहिन्यांसाठीच्या सेन्सॉर बोर्डातला एक मेंबर तिथे हजर असावा, त्याच्या परवानगीनेच कार्यक्रम (व्हिडीओ चित्रीकरणे) प्रक्षेपित व्हावेत.
३. या वाहिन्यांसाठी एखादे कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल असावे, ज्याचे सर्टिफिकेशन/ लायसन दर ठराविक काळाने प्राप्त करणे या वाहिन्यांसाठी बंधनकारक असेल.
अजुन असे बरेच मुद्दे यावेत.
डॉनचा लेख आवडला, संयत आहे कुठेही वहावत गेलेला नाहीये. मुंबईच्या हल्ल्यांनंतर आता जरा संकेतस्थळांवरचाही जनक्षोभ शमल्यासारखा आहे तेव्हा शांत डोक्याने अशा चर्चा फ्रुटफुल होतील. या कारणामुळे विषयाची निवड आवडली असे म्हणावे वाटते.
आनंदयात्री यांच्याशी पुर्णपणे सहमत !
तसेच दाखवण्यात येणारे प्रत्येक स्थिरचित्र अथवा चलचित्र हे कधी / कोणत्यावेळी / किती तारखेला व कुठे संग्रहीत वा संकलीत केले आहे हे दाखवणे बंधनकारक असावे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
पहिला मुद्दा विशेष पटला! किती वेळा त्याच त्याच बातम्या. २४ तास चालवण्यासाठी काहिही करतात.
२६/११ च्या वेळी तर वेगवेगळ्या वेळी दुसरे टायटल्स देउन राजदीप/ बरखा / प्रणव रॉय हे तीच वाक्यं जशीच्या तशी परत परत बोलत होते.
बाकी वाहिन्यांच्या आधी इंडिया टी व्ही वर बंदी घातली पाहिजे.
आता केबल वर चांगले चित्रपट पहायला मिळत नाहीत, क च्या आणि तत्सम मालिकांनी वैताग आला आहे.
असंख्य न्यूज चॅनेल्स आणि शेकडो रिऍलिटी शोज बस्स...
लाइव्ह, रिअऍलिटी, एक्स्लुजिव, याचं वेड लागलं आहे ...
मैत्र भाऊ,
कृपया टी.वी. पाहू नका.
मी कित्येक आठवडे टि.वी. पहात नाही.
आंतरजाल, पुस्तक वाचन इ. छंद जोपासा. भले होईल.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
आमच्याकडे टीव्हीच घेतलेला नाही त्यामुळे पहाण्याचा प्रश्नच येत नाही!
टीव्ही आणि इंटरनेटमुळे पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे इतर छंद जोपासणे आपण विसरुन गेलोय!
तरी मी इंटरनेटचे महत्त्व मान्य करतो. निदान तुम्ही काय बघायचे हे तरी तुम्ही बर्यापैकी ठरवू शकता!
तुम्हाला जवळजवळ सर्व वाहिन्या आजकाल इंटरनेटवर उपलब्ध असतात हव्या त्या बातम्या पाहू शकता. सिनेमे बघायचे असतील तर नेटफ्लिक्स सारखे अकाऊंट उघडून जालावरुनही बघता येतात.
(चकटफू बघायचे असले तर हिंदी सिनेमे 'भेजाफ्राय.नेट' सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत ;))
अगदी क्रिकेटचे सामनेसुद्धा उपलब्ध असतात. काहीच अडत नाही.
चतुरंग
टीव्हीवरची चॅनल्स हवी असली तर तोही पर्याय नेटच्या माध्यमातून उपलब्ध आहे एवढंच सांगायचं होतं. येताजाता टीव्ही चालू करुन चॅनल सर्फिंग जसं सहज शक्य होतं तसं नेटचं होत नाही हा एक मुद्दा टीव्हीची आवड/व्यसन कमी करत न्यायला उपयोगी पडतो. (नेटचंही व्यसन लागू शकतं हा मुद्दा आहेच पण मग कुठेतरी तारतम्य हवंच हे ही मुळात खरंच आहे.)
चतुरंग
छोटे डॉन,
संपादकीय छान आहे. शीर्षक आणि विचार आवडले.
आनंदयात्री आणि प.रा. च्या मतांशी सहमत.
अजून एका प्रतिसादात अदिती म्हणते की समांतर माध्यमांचा लोकांनी जास्त वापर करावा जसे इंटरनेट, वृत्तपत्रे इ. हे सुद्धा बरोबर आहे.
आपल्याकडची प्रसारमाध्यमे पोक्त होण्याची फार गरज आहे. लोकांच्या मनावर काय संस्कार होत आहे याचा त्यांनी विचार करावा.

तुमच्या विचारांशी सहमत आहे.
लवकरात लवकर काहितरी ठोस कार्यवाई करण्याची गरज आहे. काहि चॅनल्स तर अतिशय कहर आहेत !
वागळे नावाचा जो एक प्राणि मराठि लोकमत चॅनल चालवतो त्याला कोणी तरी आवरायला हवं.
"प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"
हा प्रश्न विचारतानाही, तू तुझं डोकं शांत ठेवलं आहेस आणि अतिशय संयमित भाषा वापरून लेख लिहिला आहेस. त्याबद्दल अभिनंदन.
या प्रसारमाध्यमांची लायकी कशी आणि काय असते याचं "फिर भी दिल है हिंदुस्थानी" या चित्रपटात अतिशय मस्त चित्रण केलं आहे. कोणत्या गोष्टीचा बाऊ किती करायचा आणि कशाला जास्ती महत्व द्यायचं याच ताळतंत्र कसं सोडलं जातं हे या चित्रपटात दाखवलं आहे.
"डी एस पी च्या कुत्र्याला विंचू चावला.." अशा प्रकारच्या बातम्या संध्यानंद सारख्या पेपरमधून वाचताना .. हा पेपर केवळ भेळ खाण्याच्याच लायकीचा आहे ही भावना होते. त्याचप्रमाणे "अभिताभ को सर्दी लगी" अशी बातमी न्युज चॅनेल वर पाहिली कि, हे चॅनेल केवळ कॉमेडीशो साठीच आहे असे वाटते.
सरकारने, या न्युज चॅनेलसाठी काही पॅरामिटर्स ठरवून ठेवलेले असावेत किंवा नसतील तर ते ठेवावेत. अति तिथं माती म्हणतात तसे.. त्या वाहीन्यांच्याही लक्षात येणार नाही की, कधी आपला गाशा गुंडाळला गेला.
असो.. लेख उत्तम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
माझ्या मते प्रसारमाध्यमे म्हणजे आपल्याकडे असलेल एक ब्रम्हास्त्रच आहे...त्याचा योग्य वापर झाल्यास योग्य परिणाम साधता येऊ शकतो...पण हे अस्त्र दुधारी आहे त्यामुळे त्याचा योग्य वापर महत्वाचा नाहीतर ते स्वतःवरच उलटुन येऊ शकते!!
डॉनराव मस्त लिहले आहेस...
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
छोट्या !
संपादकीय चांगले लिहिले. आता सरकारने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणले आहे, त्याचेही काही मुद्दे इथे आले असते तर
संपादकीय अजून बहरले असते असे वाटते.
अर्थात प्रसारमाध्यमांबद्दल जे विचार मांडले आहे ते उत्तमच !!!
सध्यातरी प्रसारमाध्यमे व आपण म्हणजे तुझ माझं जमेना, तुझ्यावाचुन करमेना झालं आहे.
होईल हळू हळू सुधारणा. पाश्चात्य देशातील प्रसारमाध्यमे देखील काही सर्वगुणसपंन्न नाहीत. एकतर आपल्या आदर्श, नैतिकतेच्या व्याख्या अजुन सेट होत आहेत. चालायचेच. कुठलीही गोष्ट पारखुन घेणे इतकेच. एकच माध्यम असण्यापेक्षा अनेक बरी. प्रत्येक प्रसारमाध्यमांचा अजेंडा काय आहे हे तपासुन पाहीले पाहीजे.
आणी अर्थातच रिमोटकंट्रोलचा वापर करण्यास कचरु नये :-)
आणी अर्थातच रिमोटकंट्रोलचा वापर करण्यास कचरु नये
या वाक्याशीतर अगदी १००% सहमत; तसंच आंद्या आणि तात्यांशीही!
शिवाय हल्ली इंटरनेटमुळे बातम्या पहाण्यासाठी टी.व्ही.च पाहिजे अशीही सक्ती नसते. तेव्हा पर्यायी माध्यमांचाही वापर वाढावा.
डॉन्या, उत्तम, संयत आणि समयोचित लेख.
आणखी एक थोडासा गौण मुद्दा सुटला असं वाटतं: बातम्या वाचणारे आणि घटनास्थळी असणारे बरेचसे पत्रकार उगाच तारसप्तकात बोंबलून बातम्या देत असतात ते फारच डोक्यात जातं. शांत आणि सौम्य बातम्या वाचल्या तर ऐकतानाही ते बरं वाटतं. चर्चा होतानाही तेच जाणवतं, दोन बाजूचे लोकं ओरडायला लागले तर मधल्या पत्रकाराने त्यांना शांत करावं का स्वतःचा आवाज टिपेला न्यावा?
जबरदस्त !!!
अग्रलेख खरचं मस्त झालाय अगदी प्रसारमाध्य्मामध्ये छापुन येण्यासारखा.
अभिनंदन
एक प्रश्नः प्रसारमाध्यम याचा अर्थ फक्त बातम्या देणारे असा होतो का?
अवांतरः प्रसार माध्य्मांप्रमाणे वर्षोनवर्षे चालणार्या सासु-सुनांच्या मालिकांवर सुध्दा बंदी आणावि क? ;)
अतिशय संयमी संपादकीय.
आजकालच्या वृत्तवाहिन्या अन् त्यांचे वार्ताहर पाहीले की यांना पत्रकारीता येते का हा प्रश्न पडतो. प्रसारमाध्यमे वा वृत्तवाहिन्या यांचा समाजावर वचक असायला हवा परंतु आज वृत्तवाहिन्यांचे रुपडे पाहील्यावर यांना वृत्तवाहिन्या म्हणावे की करमनुकीचे कार्यक्रम देनार्या वाहीन्या हा प्रश्न पडतो. सकारत्मक पत्रकारीतेपेक्षा अगदीच तारतम्य न बाळगता कुठल्याही भिकार बातमीला 'ब्रेकींग न्युज' म्हनुन देताना किंवा भसाड्या आवाजात विचीत्र अंगविक्षेप करत काहीतरी बरळ्ताना हे लोक बातमीचा मुळ हेतुच दुर करतात. नंतर उरतो तो केवळ पांचट्पना. तोच आजकाल चालु आहे.
अशा या वाहीण्यांवर बंधने यायलाच हवी. नाहीतर लोकांना प्रबोधना ऐवजी तमाशा पहावा लागेल.

छान लेख,
२४ x ७ न्युज वाहिन्याचि खरच गरज आहे का?दिवसातुन फक्त दोन तास न्युज वहिन्याना दिले तरि चालतिल.४/५ वर्षापुर्वि न्युज वहिन्या नव्ह्त्या तरि आपण आन्न्दने जगत होओच ना?मला असे वाटते कि ह्या वहिन्यावर आता थोडे दिवस पुर्ण बन्दि घातलि पाहिजे.
छान लिखाण
योग्य मुद्दे आणि योग्य शब्द.
आणि हो पण सगळेच असे नाहीत.
काही सन्माननीय कार्य्क्रम अपवाद आहेत.
ते कार्यक्रम या लढाइत बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आणि मुळात म्हणजे बदल स्वतःत करायला हवा.
आपण बघतो म्हणून वाहिन्या चालतात ना
मग आपण का बघायचे
एक कलर्स आले जरा वेगळे केले ६ महिन्यात आले ना टोपवर
आणि हळुहळू क्रेझ कमी होतीय क मालिकांची
मग आपण बदलु ना स्वतःला
आपण काही म्हणले तरी इंडीया टीव्ही बघणारी माणसे आहेत म्हणुन ती चालते ना
आणि हो अतातायीपणे पत्रकारिता केली तरी बरखा दत्त ला आपण चांगले म्हणतोच ना
माझे म्हणणे आहे आप्ण स्वतःबदलु या आणि हो आपण बदललो की पत्रकारिता नक्की बदलेल
कार्अन तो एक धंदा आहे आणि धंद्यात्र फक्त नफा बघतात
त्यांचा नफा आपल्या हातात आहे मग आपण का करु द्यायचा त्याना
जरा विचार करा
आणि हो अशी खरमरीत टिका करणारा हा ब्लॉग
http://www.batamidar.blogspot.com
आणि मीडीयाची पाठराकण करणारा हा लेख
http://www.loksatta.com/lokprabha/20081219/cover.htm
डॉन साहेब,
अतिशय घणाघाती पण संयमीत संपादकीय. आम्हा "मुकी बिचारी कुणी हाका" जनतेच्या भावनांना वाचा फोडल्याबद्दल आभार!
आपण नेहमीच म्हणतो की " जे जे उत्तम, उदात्त ते ते घ्यावे " असे असताना ही प्रसारमाध्यमे मग तेवढ्याच गोष्टी धाब्यावर का बसवतात ?
आपण ही उक्ती येथेच केवळ विसरतो असे नाही. कपडे, खाण्या-पिण्याच्या सवयी, दैनंदिन वागणूक, स्वच्छता, अशा अनेकानेक बाबीत आपण पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी न शिकता वाईट सवयींचे केवळ अंधानुकरण करत आहोत. आता हेच पहा ना... पाश्चात्य देशांत जंक फूड विरोधात सरकार कडून केवढे जनजागरण केले जाते, शाळांच्या अवारात जंक फूड विकायला बंदी असते, पिझ्झासारख्या चीजवाल्या खाद्यपदार्थांपासून दूर रहायचे उपदेश डॉक्टर लोकांसोबत सरकारी यंत्रणा सुद्धा करत असतात. मुलांना लवकर झोपून लवकर उठण्याच्या सवयी तर हमखास लावल्या जातात. आपल्याकडे मात्र या सगळ्या गोष्टीत वेगळे चित्र दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली नको त्या सवयी आपण पाश्चात्यांकडून उचलत आहोत. याच समाजाचा भाग असणारे अनिर्बंध प्रसारमाध्यमे सुद्धा तेच करत आहेत असे वाटते. अशा उच्छादाला पायबंद घालायलाच हवा.
आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.
त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये झालेला फरक दररोज जाणवत नाही.
माध्यमांकडून वृत्त मिळवून मत बनवणे, हे विचारी सुशिक्षित माणसाला कठिण आहे. पु. ल. देशपांडे यांच्या "अंतू बरवा" मध्ये "हे जे काय अमेरिकेचे आणि रशियेचे चालले आहे..." रत्नांग्रीच्या पेपरातील अग्रलेखाची खिल्ली उडवली आहे. आजकालच्या टिनपाट तज्ञांचे बहुधा असेच आहे.
टिळकांचे, अत्र्यांचे अग्रलेख उत्तम होते, म्हणून इतिहासाने त्यांची खातर घेतली. म्हणून तेच आपल्याला लक्षात आहेत. आमच्या जुन्या वाड्याच्या माळ्यावर मला "जगद्धितेच्छू" वर्तमानपत्राची एक प्रत (१८८०-१८९० काळातली तारीख होती) मिळाली होती. त्यात (त्या दिवशी तरी) सनसनाटी बातम्यांशिवाय काहीच नव्हते. १०० वर्षांनी आजचे बहुतेक वार्ताहार "जगद्धितेच्छू" सारखे विसरले जातील, पण काही चांगले वार्ताहार, अग्रलेखक "केसरी"सारखे लक्षात राहातील.
बहुधा पूर्वीच्या काळातही लोकांना पाखडून पाखडून धान्य वेचावे लागत असे. आजही आपण तसेच वेचावे, हे तत्त्व छोटा डॉन यांचा उत्तम अग्रलेख वाचून पुन्हा पटते. छोटा डॉन यांचे अग्रलेखाबद्दल अभिनंदन.
पूर्वीच्याकाळी लोक धान्य पाखडुन खडे वेचत असत.. आता पाखडून पाखडून धान्य वेचायची वेळ आली आहे ;)

अग्रलेख चांगला आहे.
मात्र, प्रसारमाध्यमांना बातम्या प्रसारीत करताना थोडा संयम बाळगुन, समंजसपणा दाखवुन, योग्य तेच आणि तितकेच दाखवावे, स्वतःच्या पदरचे काही त्यात घुसडण्याची घोडचुक करु नये, ही अपेक्षा प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता धूसरच!
मी बातम्यांसाठी टीही पहात नाही. छापील वृत्तपत्रेदेखिल सहसा नाही. त्यापेक्षा इंटरनेटवर विरुद्ध मते असलेली अनेक वर्तमानपत्रे वाचणे अधिक सोयिस्कर पडते. कारण असे म्हणतात की, कोणत्याही गोष्टीला तीन बाजू असतात - एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू.
म्हणूनच, विरुद्ध मते असलेली वृत्तपत्रे वाचलीत, तर सत्य त्यादोघांमध्ये कोठेतरी असते याची जाणीव होऊ लागते.

अग्रलेख आवडला होताच. आज पुन्हा वाचला अधिक निवांतपणे.
प्रसारमाध्यमे ही दिवसेंदिवस अधिकाधिक उथळ होत चालली आहेत ह्यात शंका नाही. लोकशाहीचा मनसोक्त गैरवापर कसा करावा ह्याची अहमहमिका चालू असावी अशा थराला हे चाळे पोचलेले दिसतात.
सूज्ञ लोकांनी जनमताचा रेटा वाढवून प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणले पाहीजेत
http://mib.nic.in/ हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दुवा.
इथे संपर्क करुन आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवता येतील. सुरुवात करायलाच हवी.
चतुरंग
लेख छान आहे. पण शेवटी फक्त लेख लिहूनच नी चर्चा करूनच आपण नी आपल्यासारखे(ह्यात मीही आलेच) गप्प बसतो.
एक म्हणजे प्रसारमाध्यमे आणि प्रसार वाहीनी ह्याना कायदेशीर नियम सरकारने लागू केले पाहीजेत.
पेपर असो वा टीवी टाळक्यात सणक जाते ११/२६ नंतर विचार केला की ज्या पद्धतीने त्यांनी मुर्खपणा केला. टीवीची सोयच नाही. वेळकाळ नसताना नको ते कार्यक्रम, लहानांच्या प्रोग्रॅममध्ये ऑब्जेकशनल विषय नी प्रकार. आणि सतत वहाण्यार्या टाकावू मालीका. अरे काय दर्जा आहे ह्या गोष्टींचा? काय ज्ञान वा संदेश देता/पाजळता तुम्ही?
मग आमच्यासारखे काय करू शकतो, योग्य त्या व्याक्तीला पत्रे लिहून सामूहीक निषेध करून तो कार्यक्रम बंदच पाडायचे प्रयत्न ठीक राहील असे मला वाटते.

अग्रलेखाच्या अपेक्षा पूर्ण करणारा लेख.
भारताबद्दल बोलायचं तर समाजाच्या सर्व थरांना हतबद्ध करणार्या घटना म्हणजे मंदी आणि दहशतवादी हल्ला. राजकीय आणि सामाजिक पातळीवर आपण किती निर्नायकी झालो आहोत याचा प्रत्यय आपण घेत आहोत.
यातुन योग्य तो बोध घेउन जर परिस्थिती बदलली आणि सुधारणा झाली तर या घटना "ब्लेसिंग इन डिसगाईज"ठरतील.
- अभिजीत
या वर्षातील दोन ठळक आणि एकदम महाप्रलय वाटाव्यात अशा घटनांची दखल अग्रलेख घेतो..
भारत आणी अमेरीकाच काय पण संपूर्ण जगाला जाग आल्याची जाणीव झालीये...
सहमत....
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मुंबईवरचा हल्ला, जागतीक आर्थीक संकट ह्या दोन घटना येणार्या काळात अर्थव्यवस्था तसेच सुरक्षाव्यवस्था या दोन्ही व्यवस्थेत काही आमुलाग्र बदल, जागतीक सामंजस्य घडवुन आणतील अशी अपेक्षा आहे.
अग्रलेख आवडला.
उत्तम. खूप आवडला.
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)
अग्रलेख आवडला ! सदानकदा सिस्टीमला जवाबदार धरतांना त्या सिस्टीमचे आपणही एक भाग आहोत म्हणजेच आपण आपली नागरी कर्तव्य पार पाडली तर सर्वांनाच सामान्य माणसांच्या भावनांची दखल घ्यावी लागते हा लेखातील संदेश भावला !!!
केवळ अप्रतिम अग्रलेख !
विकासराव, अग्रलेख आवडलाच.
या युद्धस्वरूप घटनेला आता तीन आठवडे होतील. पण जनसामान्य शांत राहीला असला विसरत नाही आहे आणि हीच एक मोठी भारतासाठीची आशा आहे.
हे वाक्य फारच आवडलं, खरंच आशादायी वाटलं.
थोडं वेगळं: अतिरेक्यांनी मुद्दामच ब्रिटीश, अमेरीकन आणि इस्रायली नागरिकांची, पर्यायाने त्या देशांची खोड काढली असेल तर त्यांनीही (बॉसेसनी) परिणामाचा विचार केला नसेल का? का त्यांना या देशांचीही भारताबरोबर खोड काढायची होती. (खोड काढणे हा खूपच कमी परिणामकारक शब्द आहे.)
विकासरावांकडून अग्रलेखाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करणारा अग्रलेख.
म्हणुनच ह्या वर्षातील कडवट अनुभवा हे नजिकच्या आणि लांबच्या भविष्यासाठी "अदृश्य आशिर्वाद" ठरतील असे म्हणावेसे वाटते.

अग्रलेख मस्त झालायं
दोन्ही घटनांचा आढावा चांगला घेतलाय.
मुंबईसंदर्भात बोलण्याचे कारण इतकेच की "स्पिरीट ऑफ मुंबई" म्हणत मुंबईकरांचा फाजील अहंकार सुखावायचा आणि नंतर नाधड माध्यमे काम करणार आणि सरकार तर काय बोलायलाच नको!
याच संदर्भात

आशावाद चांगला आहे. पण येणारा काळच् ठरवेल की हे खरं होइल की पहिल्या वाक्याप्रम्नाणेच् येथेही घडेल.
असो
(आशावादी )चेतन
उत्तम लेख.
चित्र खुप आशादाई दिसत आहे परंतू समाज सर्व काही लवकर विसरतो ह्याची अडचण आहे पण असे होऊ नये हीच इच्छा.
जे तेज समाजाने दाखवले आहे काही आठवड्यापासून तेच तेज जर नेहमी राहीले तर सरकार व पोलिस खाते ह्यांची डोकी ठीकाण्यावरच राहतील.
अग्रलेख चांगलाच आहे, अदृष्य आशीर्वादाची संकल्पनाही आवडली, परंतु..
तर येत्या नववर्षात नुसतेच मागील पानावरून पुढे न जाता , अनुभवातून शहाणे होऊन योग्य मार्गावर प्रवास करायला लागू अशी खात्री वाटू लागली आहे.
हे विधान सरकारी पातळी संदर्भात केले असल्यास चांगलेच आहे परंतु बर्याचदा अनुभवातून शहाणपण न येता सगळे स्वप्नरंजनच ठरते.. काही कालावधी लोटल्यावर पुन्हा पुन्हा अतिरेकी हल्ले होतच आहेत, निरपराध माणसे मरतच आहेत. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दडपण आणण्याचा एक फार्स केला जातो परंतु पाकिस्तान त्याला कधीच जुमानत नाही आणि भारतावर अतिरेकी हल्ले करणार्या संघटनांवर त्यांच्या देशात मदत/आश्रय सर्व काही दिले जाते आणि भारतावर अतिरेकी कारवाया सुरूच राहतात..
वरील विधान वियक्तिक पातळीवर घ्यायचे झाल्यास अनुभवातून मी कसा काय शहाणा होणार? मी फार फार तर बसमध्ये, लोकलमध्ये बसताना आसपास कुठली अनोळखी बॅग/पिशवी दिसत नाही ना, इतकेच पाहू शकतो. पण भर खचाखच गर्दीच्या वेळेस तेही अशक्य आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस लोकलमध्ये धडपणे उभे रहायचेच वांधे असतात. शिवाय परवा व्हीटीला झाला तसा अंधाधुंद गोळीबार पुन्हा केव्हाही, कुठेही होऊ शकतो. अश्या परिस्थितीत मी अनुभवातून शहाणं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं?
जागतिक मंदी हा त्या मानाने अधिक चिंतेचा विषय नाही. ती आज ना उद्या नक्की उठेल आणि परिस्थिती सुधारेल अशी आशा तरी करू शकतो, काटकसर वगैरेचा वापर करून, दोन टाईम फक्त डाळभातच खाऊन राहून किमान जिवंत तरी निश्चित राहू शकतो.
पण दहशतवादाचे काय? त्याकरता पाकिस्तानाशी युद्ध करून इस पार या उस पार असा सरळ फैसला करण्याचा आता हा हाय टाईम आला आहे. एवीतेवी आज प्रत्येक भारतीय नागरीक दहशतीच्या छायेखालीच जगतो आहे त्यापेक्षा पाकिस्तानशी युद्ध करून तो देश नेस्तनाबूत करणे हाच एकमेव उपाय आहे. अर्थात, त्यात भारताचेही काही प्रमाणात नुकसान होईल, मुंबई, दिल्ली इत्यादी प्रमूख शहरांवरही हमले होऊ शकतात! पण तसेही एवीतेवी बॉम्बस्फोटामुळे अन् अंधाधुंद गोळीबारामुळे नागरीक मरतच आहेत की! आज तरी ते सुरक्षित कुठायत?
असो,
तात्या.
"अमेरिका एके अमेरिका" हा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यातच ९१ सालची परदेशी गंगाजळीची चणचण आणि नंतरच्या काळातील हर्षद मेहता, केतन पारीख आदींची शेअर बाजाराला आणि पर्यायाने सामान्यांना वेठीस लावणार्या कारावायांमूळे आपण आधीच शिकलो होतो. एकंदरीत आपल्यावरील अमेरिकेचे वैचारीक प्रभुत्व थोडे कमी होऊन (चांगल्या अर्थी होऊ शकेल असे) स्वतंत्र आपण किमान विचार करू लागलो आहोत.
चोक्कस विकाससेठ! :)
अर्थातच त्यांना जनतेचे विराट दर्शन झाले असल्याने
हे वाक्य कंसात असले तरी फार आशादायक आणि महत्त्वाचे ठरावे. या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय समाजाने ज्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे (नेत्यांचं सोडा हो तसंही प्रगल्भ वगैरे शब्द ते शाळेतच विसरले होते) व शांततामय आंदोलनांतून पोलिस यंत्रणांवर अतिरिक्त ताण न देता सरकारला ज्या ठामपणे मेसेज पोहोचवला आहे त्याला तोड नाहि. जनतेचा दबाब सरकारांनी बर्याच कालावधीनंतर अनुभवला असावा.
तीन आठवड्यानंतरही वृत्तपत्रांत हाव विषय ऐरणीवर आहे हा ही आशेचा किरण आहेच
आता-आतापर्यंत समाजातहि "मला काय त्याचे / मी तर सुरक्षित आहे ना .. झाले!" ही भावना होती त्यामुळे सहाजिकच सरकार त्याच भावनेच्या नेत्यांचे होते. मात्र या घटनेनंतर जास्तीत जास्त जनता मतदानाला बाहेर पडून त्यांचे प्रतिनिधी निवडून देतील, तितकी संसद प्रगल्भ होईल व न जाणो येणारे सरकार हे जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत व सजकतेत झालेल्या बदलांचे प्रतीक असेल असे वाटते (आमेन! :) ) असं काहि झालं तर मात्र अदृश्य आशिर्वाद हे अग्रलेखाचे शीर्षक चपखल बसेल.
अग्रलेख आवडला हे वे सां न
-(गोंधळलेला) ऋषिकेश
रोगाच्या परिणामावरच बरीच चर्चा झाली. रोगाचे मूळ कारण म्हणजे अमेरिका हेच आहे, जगात कोणताही देश नष्ट होऊ नये, कोणतीही व्यक्ति नष्ट होऊ नये असे मला वाटते परंतु नष्टच करावयाचे असल्यास अमेरिका हा देशच नष्ट करावयाला हवा.
व्हिएतनाम, इराण, अफगाणीस्थान, रशिया या देशांना नष्ट करणारा देश कोणता? या जगात शस्त्राच्या खरेदीसाठी लढाया लावणारा देश कोणता? जागतिक बॅकेंच्या नावाखाली अफ्रिका खंडाला देशोधडीला लावणारा देश कोणता? असे प्रश्न विचारले तर एकच उत्तर येईल ते म्हणजे अमेरिका.
स्वता:चेच स्वार्थ पाहणारा देश म्ह्णजे अमेरिका. याला योग्य उत्तर म्हणजे त्या देशाला वगळून अर्थव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची सवय कोठेतरी ठेचली पाहिजे.
भारतातील अतिरेकी कारवाया या खरोखरच काळजीचे कारण आहे. माणसाच्या अंतकरणातील माणुसकी आणि सुप्त असलेला बंधुभाव कधीतरी जागा होईल आणि भारत-पाक या देशात परत सौहार्दाचे वातावरण परत येईल असा भाबडा जरी असला तरी आशावाद माझ्या मनात आहे.
असो. विकास यांनी खुपच चांगला अग्रलेख लिहिला आहे. अभिनंदन.
स्वता:चेच स्वार्थ पाहणारा देश म्ह्णजे अमेरिका >> ह्यात एक देश म्हणून वाईट काय? काहीही नाही. प्रत्येक देशाने आपले कसे चांगले होईल हे पाहीलेज पाहीजे, जो तसे पाहत नाही त्याचा नाश अटळ आहे.
सवय कोठेतरी ठेचली पाहिजे >>
एका गांधीवाद्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षीत नाही. कलंत्री साहेब. :) म्हणजे तूम्ही इतर ठिकानी सांगता तो गांधीवाद पण स्वत चिडल्यावर प्रतिक्रिया देता ती अशी असा दूहेरी गांधीवाद का?
माणसाच्या अंतकरणातील माणुसकी आणि सुप्त असलेला बंधुभाव >> इथे माणूस म्हणजे कोण? हा प्रश्न येतो. जर 'ते म्हणजे पाक' ह्या माणसाच्या व्याखेत बसतच नसतील तर माणूसकी आणि बंधूभाव कसे जागृत होणार?
(अरेच्च्या मलापण राग आला तर? अहो, मी गांधीवादी वगैरे काही नाही.)
अमेरिकेचे धोरण दुटप्पी आहे हे कारण माझ्या रागाचे आहे. दुसरे असे की अमेरिका युद्धखोर आहे आणि जगाच्या अशांततेचे हेच एक कारण आहे.
भारतीय उपखंडाबद्दल मला प्रेम आहे आणि जेथे प्रेम आहे तेथे माणुस तर्कवादी कसा होऊ शकेल?
आजच्या काळातही आर्थिक दृष्ट्या अमेरिकेचा कारभार सर्वात मोठा आहे, त्या तुलनेत भारताचा कारभार अजूनही ५% पेक्षा कमी आहे. आपली सार्क देश एकत्र आली तर भारत २०२० ऐवजी त्याअगोदरच महासत्ता होऊ शकेल. त्याचबरोबर उपखंडातील विषमताही कमी / दुर होऊ शकेल.
मला हे संपादकीय अदृष्य आशावादासारखे वाटते. हा आशावाद भाबडा ठरु नये ही सदिच्छा.
ये रे माझ्या मागल्या हे अदृष्य भय मात्र टांगत्या तलवारीसारखे आहे
प्रकाश घाटपांडे
थोडक्यात "अमेरिका एके अमेरिका" हा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यातच ९१ सालची परदेशी गंगाजळीची चणचण आणि नंतरच्या काळातील हर्षद मेहता, केतन पारीख आदींची शेअर बाजाराला आणि पर्यायाने सामान्यांना वेठीस लावणार्या कारावायांमूळे आपण आधीच शिकलो होतो. एकंदरीत आपल्यावरील अमेरिकेचे वैचारीक प्रभुत्व थोडे कमी होऊन (चांगल्या अर्थी होऊ शकेल असे) स्वतंत्र आपण किमान विचार करू लागलो आहोत. >>>
विकास, प्रथम तूम्ही चांगला लेख लिहीन्याचा प्रयत्न केला ह्या बद्दल अभिनंदन.
पण तूमच्या वरिल वाक्यात विरोधाभास आहे. भारत ९१ च्या आधी पर्यंत सोशॅलीझम च्या जोखडत अडकलेला होता. परकिय गंगाजळी कमी होणे हे त्याचेच एक लक्षन होते. बाकी अनेक गोष्टीही आहेत. अटल बिहारी नंतर खर्या अर्थाने भारतीय अर्थकारनाला जागतीकीकरन लाभले. काँग्रेसनेच आधी मिक्स्ड इकॉनॉमी आणली व नंतर ती ओपन करन्याचे श्रेय लाटले ह्याकडे दुर्लक्ष व्हावयास नको.
"केतन पारेख वा हर्शद ने जे काही केले ते योग्य न्हवतेच पण त्यांचमूळे आपण शिकलो व आत्ताचा मंदीचा फटका आपल्या कमी बसला" हे जे तूम्ही मांडताय ते पटत नाही कारण हा प्रश्न तूम्ही फक्त शेअर मार्केटची उलाढाल व काही मोठे नाव असा एवढाच लिमीटेड पाहताय. मंदीच्या बाबतीत सबप्राईम ने जे काम केले आहे ते भारतात कधीही होऊ शकनार नाही कारण आपल्याकडे कर्ज वैयक्तीक पत पाहून पण तरीही सर्वांना एकच रेट लावून दिले जाते. पण अमेरिकेत तसे नाही. हा विषय थोडा वेगळा आहे पण त्याचा तूम्ही आढाव्यात उल्लेख केला म्हणून लिहावे वाटले.
तसेच समाजवाद चांगला व भांडवलशाही वाईट हा सुरु लेखाच्या आरंभी व मध्यात जाणवतोय. आज भारत पुढे पडतोय ते ह्या न्यूओ कॅपीटलीझम मूळेच. आणि जर तूम्ही आर्थीक आकडेवारी पाहीली तर "भारत स्वतःच बाजारपेठ" हे तत्व इ स २००१-२ पासूनच आहे. ह्यात नविन काही नाही. आत्ताचे जे हाउसिंग बबल भारतात तयार झाले त्याची सायकल २००२ मध्ये सुरु झाली होती. ईंडिजीनीयस ग्रोथ असे आपण ज्याला म्हणतो ती आपली जास्त आहे, ह्यात परकियांचा व इ स २००६ पासून आय टी कंपन्याचा सहभाग कमी आहे. कारण भर इन्फ्रावर जास्त आहे. गेल्या काही वर्षातील आर्थाक आकडेवारी हे सांगेन.
आजच्या जगात, सर्व देशांची त्यांना स्वतःला तसे वाटले नाही तरी आर्थाक बाबतीत एकमेकांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत.
दुर्दैवाने आयन रॅन्ड ह्या लेखिकेने कैक वर्षांपुर्वी ऐटलास श्रगड असे पुस्तक लिहीले होते, त्या घटना अमेरिकेत आज अस्तित्वात येताना दिसत आहे. इच्छूकांनी ते पुस्तक जरुर वाचावे.
आधी लिहील्याप्रमाने लेख चांगला लिहायचा प्रयत्न आहेच फक्त वरिल गोष्ट, 'अर्थशास्त्रीय' दृष्टीने पाहतोय त्यामूळे मतभेद, इतकच.
केदार,
सर्वप्रथम धन्यवाद. तुमच्या मुद्यांसंदर्भात मला काय म्हणायचे होते ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो:

हा लेख लिहीत असताना माझ्या डोक्यात पक्षिय राजकारण नव्हते. तसेच आधी काय चुका झाल्या, कोणी कधी किती केल्या ते पण नव्हते. फक्त आपण अमेरिकेच्या प्रभावाखाली त्यांचाच मार्ग स्विकारत जर थोडेफार अंधानुनय करत असलो (माझ्या लेखी करतोच आहोत) तर त्याला आता आळा बसेल असे वाटते.
तसेच समाजवाद चांगला व भांडवलशाही वाईट हा सुरु लेखाच्या आरंभी व मध्यात जाणवतोय.
अहो माझे इथले वाद वाचलेत का? :-) समाजवादाच्या बाजूने मी लिहीतो असे का वाटले? अमेरिकन भांडवलशाहीतील दोष दाखवले/टिका केली याचा अर्थ समाजवाद चांगला म्हणतोय असे होत नाही. एक गाढव म्हणून दुसरा आपोआप घोडा कसा काय होईल? भांडवलशाही आणि सरकारी कमितकमी नियंत्रणे याचा अतिरेक झाल्याने काय होते हे दिसते या संदर्भात माझे लिखाण होते. आणि समाजवाद नको याचा अर्थ समाजभेद (सामाजीक दरी वाढली तर) चालेल असा अजिबातच अर्थ असता कामा नये.
आज भारत पुढे पडतोय ते ह्या न्यूओ कॅपीटलीझम मूळेच.
तेच अमेरिकेस वाटत होते. आजच्या बातम्या पाहील्यात का? आज अमेरिकन वित्तसंस्थेवरील विश्वास हा जगभरच्या वित्तसंस्थांच्या नजरेतून उडाला आहे. तरी अमेरिका असल्याने चालू शकेल. विचार करा उद्या असे भारतात झाले तर पुढारलेले देश कसे वागतील. शिवाय लोकसंख्या, त्यातील आर्थिक दरी याचा सर्व विचार केला तर परीणाम काय होऊ शकतात. अमेरिकेस असलेली "luxury" आपल्याला नाही आहे असे वाटते. त्यामुळे आपल्याला आपला मार्ग शोधणे गरजेचे आहे. नुसते निओकॅपीटॅलीझम म्हणत अमेरिकन अनुनय केला तर आपल्यावर होणारे परीणाम गंभीर असू शकतात.

हे १००% मान्य आहे.
सर्वप्रथम सर्व प्रतिक्रीयांना धन्यवाद. लेख सुचला तसा लिहीला असल्याने त्यात जर काही तृटी असल्या तर त्या माझ्या वेळेअभावी मर्यादा होत्या.
मला मूळ मुद्दा इतकाच सांगावासा वाटत होता की एकंदरीत स्थितीस्थापकत्व वृत्तीस कोठे तरी या दोन्ही घटनांनी धक्का पोचवला. त्याचे काही चांगले परीणाम नक्कीच होऊ शकतात असे किमान आत्ता तरी वाटते. भारतातील घटने संदर्भात एक प्रमुख कारण असे आहे की तरूण पिढी जास्त आहे आणि कायम अपेक्षा ही तरूण पिढीकडून जास्त असते. जस जसे वय वाढते तसे आधीच्या अनुभवातून आलेला एकतर कडवटपणा नकारार्थी करतो अथवा "हू केअर्स" अशी भावना आणतो.
घाटपांडेसाहेब अथवा चेतन म्हणतात तसा हा निव्वळ आशावाद आहे का? - तर मला आशिर्वाद आणि आशावाद हे नक्की हातात हात घालून जाऊ शकतात असे वाटते. तरी देखील हा आशावाद अदृश्य नको तर डोळस असावा असे वाटते. माझी किमान अपेक्षा तरी डोळस आशावादाचीच आहे.
तात्या म्हणतातः हे विधान सरकारी पातळी संदर्भात केले असल्यास चांगलेच आहे परंतु बर्याचदा अनुभवातून शहाणपण न येता सगळे स्वप्नरंजनच ठरते.. काही कालावधी लोटल्यावर पुन्हा पुन्हा अतिरेकी हल्ले होतच आहेत, निरपराध माणसे मरतच आहेत.
हे खरे आहेच. तरी देखील या वेळेस जरा वेगळे घडले आहे...सामान्य माणसांपेक्षा, निरपराध असले तरी उच्चवर्गावर वार झाला आहे. शिख दहशतवाद जसा एका विशिष्ठ वेळे नंतर उखडण्यात आला तसेच काहीसे तेव्हढे सोप्या पद्धतीने नाही पण या संदर्भात होण्याची शक्यता आहे. कारण आता सरकारला पर्याय नाही. आणि जे सरकार ऐकणार नाही त्या सरकारला पर्याय मिळेल...स्वतः शिकून सावध रहाण्याची गरज नक्कीच आहे. शिख अतिरेकाच्या वेळेस अनेक ठिकाणी रेडीओ बाँब फुटून माणसे मेली पण नंतर त्यातून शिकलीच. सहन करण्याची आणि निर्विकार राहू शकण्याची म्हणून जी काही मर्यादा आहे ती आता समाजाने एकत्रीत (कलेक्टीव्हली) ओलांडली की बदल घडतात. अहो असा विचार करा. धर्माला नुसती ग्लानी आली म्हणून देव लगेच जन्म घेत नाही, जेंव्हा "अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेत असे" . आपले देव असे अगदी अती होऊ पर्यंत वाट पहातात तर त्यांच्या भक्तगणांकडून लगेच अपेक्षा कशी करता येईल. पण आताची अवस्था मात्र "भारी" झाली आहे.
बाकी सविस्तर होऊ शकतात म्हणून प्रतिसाद कलंत्रीसाहेबांना आणि केदार यांना त्यांच्या लेखाखाली देतो.
बाकी, पुनश्च धन्यवाद!
विकास - आपले लिखाण मुद्देसूद असते आणि बहुदा वाचनातून सुटत नाही. हा लेखही आज वाचला... शक्य झाले तर तपशीलात प्रतिसाद देईन याक्षणी मात्र फक्त धावती तिरंदाजी -
विषय अवघड आहे हे मान्य असले तरीही मांडलेले आडाखे ढोबळ आणि वरवरचे वाटले. अभ्यासाची जोड अनेक ठिकाणी देता येईल असे वाटले. जाता जाता काही मुद्दे -
भारतीय अर्थव्यवस्था अमेरिका एके अमेरिका या सूत्रावर फारशी आधारित आहे असे नाही. जगाच्या एकूणच अर्थव्यवहारावर अमेरिकेचा पगडा आहे भारतावरही तो आहे इतकेच. खरे तर जगातील काही मोजक्या इकॉनॉमींपैकी भारत एक आहे की ज्याची पडझड अमेरिकन उलथापालथीवर तुलनेने कमी प्रमाणात अवलंबून आहे.
रशिया एके रशिया असे न राहता भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला (उर्वरित जगाच्या दृष्टीने सर्व सूत्रे आणि नियम धाब्यावर बसवून)अणुसहकार्याचा करार ही अनेक अर्थाने नव्या जगाची नांदी आहे. अवांतर - येथेही अमेरिका एके अमेरिका आजतरी नाही. इतर युरोपीय राष्ट्रे अगदी गेल्या आठवड्यात रशिया हे सगळेजण आता भारतात अणुभट्ट्या काढण्यासाठी पुढे सरसावतील.
टाटांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान स्वातंत्र्योत्तर काळातही अगदी भरीवच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून एकच समूह निवडायचा म्हटले तर आजही टाटाकडेच पहावे लागेल. मुंबईच्या एका घटनेने त्यांचे डोळे उघडले असे म्हणता येणार नाही.
हर्षद मेहता ऍन्ड कंपनी ही चहाच्या पेल्यातील वादळे झाली. शिक्षण म्हणायचे तर ९१चा आपण दिलेला दाखला आणि एशिअन क्रायसिसचे धडे मोलाचे होते असे म्हणता येईल.
मुंबईतील हल्यांमुळे आमचे सरकार काही शिकले असेल याची खात्री वाटावी किंवा चिह्ने दिसावीत असे काहीही दिसलेले नाही. आमच्या मराठी सरकारच्या नेतृत्वाचा सावळा गोंधळ शरमेने मान खाली घालावा असा होता. परदेशी नागरिक असले काय किंवा नसले काय त्याने ह्या सरकारला ढिम्म फरक पडत नाही.
९/११ नंतर जग आज परत एकत्र आले आहे असे मला तरी दिसत नाही. नॉट मेनी केअर फॉर व्हॉट हॅपन्स इन इन्डिआ.
आपली सदिच्छा चांगली आहे... पण देअर आर हार्डली एनि ब्लेसिंग्ज.
ज्या कारणाने टाटा उद्योग समुह स्वातंत्र्यपूर्वकाळात उभा राहीला आणि स्वातंत्र्योत्तर हळू हळू आचरणात आणण्याचे विसरून गेला त्या टाटा उद्योग समुहाला पण आता बदलत्या काळातील राष्ट्रीय स्वार्थ कळले असले तर आश्चर्य वाटायला नको!

ज्या प्रसंगी सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा विसरून एकत्र उभे राहायचे आहे त्या वेळी ही फूट पाडणारी भाषा वापरणाऱ्या अग्रलेखाला प्रसिद्ध करावे याचे फार वाईट वाटते.
ज्या प्रसंगी सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा विसरून एकत्र उभे राहायचे आहे
हा विचार नेहमी हिंदूच करतात.. अहो साधी क्रिकेटची मॅच जर पाकिस्तानने जिंकली तर भेंडीबाजारात, नळबाजारात फटाके वाजवले जातात ही वस्तुस्थिती आहे!
असो,
अग्रलेखातल्या बर्याचश्या मुद्द्यांशी मी व्यक्तिश: सहमत आहे...
तात्या.
इतिहासातील सोयीस्कर दाखले घेऊन हिंदू-मुस्लीम अशी फूट पाडणाऱ्या अग्रलेखाने खालील मुद्देही विचारात घ्यायला हवे होते.
शिवाजीचा स्वीय सहाय्यक मौलाना हैदर अली हा होता. सागरी तळांवर सैन्याचे नेतृत्त्व सिद्दी संबाळ याने केले. मदारी मेहतर याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता महाराजांना आग्र्यातून सोडवण्यास मदत केली. पेशवाईमध्ये तोफखाना सांभाळण्याची परंपरा इब्राहिम गारदी याच्याकडे होती. जेव्हा इतर मराठे सरदार आणि उत्तरेतील हिंदू राजे हे प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या अब्दाली-नजीबखानाला मदत करत होते तेव्हा हेच गारदी लोक मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ राहिले.
याउलट जावळीचे शिंदे, खंडोजी खोपडे यापासून ते औरंगजेबाच्या सैन्याचे नेतृत्त्व करणारा मिर्झाराजे जयसिंग हे कोण होते हे पाहा.
अपवाद प्रत्येकच ठिकाणी असतात..
परंतु माझ्या माहितीप्रमाणे तरी अलिकडच्या काळात जो अमानवी दहशतवाद घडला त्यातील बहुतांशी आरोपी फक्त अन् फक्त मुसलमान होते, पाकिस्तानी होते..ही वस्तुस्थिती आहे!
मुंब्र्याच्या किंवा माझगाव परिसरातील मुस्लिमांच्या/बांग्लादेशींच्या अनधिकृत वस्त्यांचा आरडीएक्स लपवण्याकरता वापर झालेला आहे...
अर्थात, मतांच्या राजकारंणामुळे सगळ्याच गोष्टींकडे काणाडोळा केला जातो हा भाग वेगळा! मुंबईत परवा घडलेल्या दहशतसत्राला, 'एवढ्या मोठ्या शहरात अश्या लहानसहान घटना ह्या व्हायच्याच..!' असं म्हणून आबा पाटील मोकळे होतात! खुर्चीची हाव अन् मतांचं राजकारण, समस्त हिंदूं नेत्यांचा नेळभटपणा, आपल्या फिल्मी लेकासोबत अन् राम गोपाल वर्मांसोबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी ताजची एक फिल्मी पिकनिक काढून तिथे शहिद झालेल्यांची राख विझण्याआधीच क्रूर चेष्टा केली..!
असो, मतांच्या राजकारणाची अनेक कारणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत...!
सदर अग्रलेखात हिंदूं-मुस्लिम मुद्दा जरूर आहे परंतु त्यात हिंदूंचा नेळभटपणाच अधिक अधोरेखीत केला आहे व तो पटण्याजोगा आहे असे मला वाटते..असो.
जोपर्यंत या हल्ल्याला आपण विशिष्ट चष्म्यातून पाहणार आहोत तोपर्यंत तो प्रश्न सुटणे अवघड होणार आहे.
हे अतिरेकी मुसलमानांवरील तथाकथित अन्यायाचा बदला घेण्याचे सोंग घेत असले तरी त्यांचा हेतू भारतात अराजक माजवणे, दोन धर्मांमध्ये फूट पाडणे असाही आहे हे स्पष्ट आहे. त्यांनी हल्ला करताना लोकांच्या चड्ड्या काढून हिंदू आहे की मुसलमान हे तपासले नाही. ह्या हल्ल्याला हिंदूंवरचा हल्ला मानणे ही हिंदुत्त्वाची राजकीय दुकानदारी करणाऱ्या पक्षांचे म्हणणे आहे हे समजून घ्या. त्यांना ह्या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवायचा आहे ज्याला आपल्यासारख्या सुशिक्षित नागरिकांनी विरोध करायला हवा.
मुंब्रा किंवा माझगाव परिसरातील अनधिकृत वस्त्यांचा यासाठी वापर झाला असेल तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. किंबहुना या अनधिकृत वस्त्या येथे कशा उभ्या राहिल्या हे तपासून त्याला जबाबदार सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. पण हे अतिरेकी मुसलमान होते म्हणून भारतातले सर्व मुसलमान हे अतिरेकी आहेत सिद्ध करण्याचा प्रयत्न आपल्या देशाच्या एकात्मतेच्या अंगलट येईल. (पुन्हा एकदा विचारतो एपीजे अब्दुल कलाम किंवा इलाही जमादार यांना आपण कोण मानता? मुंबईच्या हसन गफूर यांनाही अतिरेकी मानता का?)
किंबहुना या प्रसंगात मुंबईत येऊन नाटकबाजी करणारे मोदी, सर्वपक्षीय सभेवर बहिष्कार घालणारे अडवाणी, काहीही बरळणारे आबा पाटील आणि नाच्याप्रमाणे वागणारे विलासराव हे सर्वच किती मूर्ख आहेत हे त्यांनीच दाखवून दिले आहे.
आजच्या काळात सर्वच राष्ट्रे युद्ध कसे टाळता येईल हेच पाहत असतात. भारताचे सैन्यदल वंगप्रांतात आणि सिंधू देशात जातील असे मात्र घडणार नाही. तरीही आपल्या तिनही देशाचे ऐक्य घडावे असे मलाही वाटते. त्यासाठी बरेच मार्ग आहेत.
क्लिंटन साहेबांचे वाचन भरपूर आहे असे दिसते, त्यांनी असे अखंडत्व येण्यासाठी पुरक आणि प्रेरक असलेल्या सर्वच साहित्याची यादी द्यावी अशी विनंती.
नथूरामाच्या अस्थी अजूनही ठेवल्या आहेत अशी माहिती मिळाली. हिंदू तत्वज्ज्ञानाप्रमाणे माणसाची मूक्ति अस्थिविसर्जनाने होते. नथुरामाला त्याच्या शिक्षेचे प्रायश्चित्य अजूनही फेडावे लागते. परमेश्वर त्याच्या अस्थिला लवकरच मुक्तता देवो.
माझ्या अस्थि या सिंधू नदी स्वतंत्र भारतात आल्यानंतर विसर्जित कराव्या असे सांगणार्या नथूरामला कदाचित मुक्ती मिळालिही नसेल. पण तसे असेल तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याला मुक्ती मिळावी असे मला वाटते आहे.
पुण्याचे पेशवे
आता जग जिंकण्याची वेळ आली आहे. नुसते युद्ध करूनच हे साध्य होणार नाही. चारही पुरूषार्थांचा उपयोग केला पाहिजे.
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
लेख वाचनिय आहे.
मी गांधीला जितका मनतो जितका हिटलरला सुध्दा. या लोकांनी त्या काळात जे योग्य वाटले ते केले. सद्यपरिस्थिती मध्ये ते भले चूक किंवा बरोबर असेल पण त्यांनी जे काही केले ती काळाची गरज होती...
आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आज भारत एक महासत्ता म्हणुन उदयास येतो आहे, तो महासत्ता बनण्यात अडथळे निर्माण करण्याचे कार्य़ बरेच दिवसापासुन शत्रु करत आहे. मुंबई वरील हल्ला हा देखिल त्याच्याच एक भाग आहे. शुत्रुला हवे आहे की भारताने युध्द करावे, त्या मध्ये शत्रुची हार निश्चितच आहे, पण त्याचे राजकारण करुन तो जिवंत राहु शकतो.....
पण सध्या गरज आहे ती स्वसंरक्षणाची आणि जेव्हा महासत्ता बनु तेव्हा पहिले काम पाकिस्थानला जगाच्या नकाशातुन नेस्तबुत करणे.
सिंधु नदी आज ना उद्या भारतात परत येणारच आहे.
(युध्दाची तयारी करत असलेला)
सत्यवादी.
आज थोड्याफार फरकाने आज सगळ्यांच्याच मनात हेच विचार असतील .
असही वाटतं कि लोकशाहीच्या नावाने सामान्य लोकांची फसवणूक तर होत नाहीयेना ... प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही कुरापत होईल मग आपण त्यांचा प्रतिकार करु असं का? ते आपली कुरापत काढायला धजावणारच नाहीत अशी जरब आपण का निर्माण करु शकत नाही? (आपल्याकडे तेव्हढी क्षमता नक्कीच आहे ). प्रत्येक घटनेचे राजकीय परिणाम काय होतील याची चिंता करणे जरुरीचे आहे का?
सी. एन. एन. वर काही पाकीस्तानी पत्रकारांची मुलाखत बघीतली ... ते म्हणतात कि या अतिरेक्यांचा पाकिस्तान सरकारशी काही संबंध नाही ... म्हणजे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानातील लो़क वेगळे आहेत का? पाक सरकारचे त्यांच्या नागरिकांवर काही नियंत्रण नाही का? आणि पाक नागरिकांनी केलेल्या कृतीची जबाबदारी पाक सरकारवर नाही का?
दरवेळी १००-२०० निरपराध भारतीय (मग ते कुठल्याही धर्माचे किंवा राजकीय विचारसरणीचे असोत) मरतात ... आणि आम्ही काय करतो ? ---फक्त निषेध .. फारच झालं तर कोणाचा तरी राजीनामा ... यातून काय साध्य होत? यातून आपली वैचारिक दिवाळखोरी आणि कृतीशून्यता फक्त दिसते .
अफजल खान वधाचे उदाहरण अगदी योग्य आहे ... कुणी विद्वान म्हणतात कि शिवाजीने खानाला भेटीला बोलाउन दगा केला .. तसं असेल तर असं म्हणणार्यांनी 'जशास तसे ' हा न्याय आहे हे समजून घ्यावे.
"हिंदू समाजाचे एक सुदैव आहे की ज्या ज्या वेळी पाणी नाकातोंडाशी येते त्या त्या वेळी एखादा चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी, संभाजी यासारखे महान योध्दे जन्माला येतात "
पण दरवेळी पाणी नाकातोंडात जायची वाट कशाला बघायची ?
आपल्या इतिहासातून खरच खूप काही शिकण्यासारखे आहे. मला वाटतं राजकीय नेता होउ इच्छी णार्यांना एक आभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट ठेवावी आणि त्यात शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस इ. चे चरित्र (आणि चारित्र्य..) तसेच त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृती यांचा आभ्यास करायला सांगावे.
---- पण ही वेळ भांडणाची नाही . आपल्याच लोकांवर दोषारोप करुन आपण आपलीच आब्रु (जगाच्या) चव्हाट्यावर टांगतो आहोत.
कौरवाच्या घोषयात्रेच्या वेळी चित्ररथ गंधर्वाने त्याना बंदी बनवले होते. धर्मराजाने अर्जुन- भीम यांना त्यांच्या मदतीला जायला सांगीतले , तेव्हा त्यानी विचारले दुर्योधनाने वेळोवेळी आपल्यावर इतके अन्याय केले तर त्याला मदत कशाला करायची? तेव्हा धर्म म्हणाला ... आपल्यात जे वैर आहे ते आपण कायम लक्षात ठेउच तेव्हा ते १०० विरुद्ध आपण ५ असू , पण बाहेरचे जर आपल्या कोणाला त्रास देत असतील तर आपण १०५ असू ... मला वाटतं आपण हे सुद्धा लक्षात ठेवायला हरकत नाही .
पण..
प्रक्षोभक वाटतो आहे.

मनिषा, भारत सरकारचं भारतीय नागरिकांवर किती नियंत्रण आहे? पुण्यामध्ये उच्चविद्याविभूषित कुटुबातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर जेव्हा एखाद्या संस्थेचा हस्तक निघतो तेव्हा तो भारतीय नागरिकच असतो.. आणि त्याच्या घरच्यांना याची कल्पनाही नसते. भारतातीलच काही लोक या अतिरेक्यांचे हस्तक असतात . किती लोकांना याची कल्पना असते? मी पाकिस्तानची बाजू घेत नाहीये. पण.. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानातील लोक नक्कीच वेगळे आहेत. कदाचित पाकिस्तान सरकारचा या सगळ्याला पाठिंबा असू शकेल.. पण पाकिस्तानी सामान्य माणसाचा कितपत पाठिंबा असेल याची शंका आहे.
राहिला प्रश्न मुस्लिम दहशतीचा.. तर एकदा ब्रेन वॉशिंग केल्यावर पाकिस्तानातीलच काय पण भारतातील मुस्लिम तरूणही जिहादच्या नावाखाली रक्तमांसाचा खेळ खेळायला तयार होतो. कारण धर्म ही एकमेव गोष्ट आहे जिच्या नावाखाली माणुस (खास करून मुस्लिम) स्वतःचा जीवही तळहातावर घेऊन फिरतो. हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं. आणि त्यांच्या कार्याने ज्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला ते लोक त्यांचे पाईक झाले. ज्यांना त्यांची विचार सरणी पटली त्यांनी त्यांचे अनुकरण केले किंवा स्वतःला त्यांच्या कार्यात झोकून दिले.
या २१-२५ वर्षांच्या तरूण मुलांचंही जिहादच्या नावाखाली असंच ब्रेन वॉशींग होत नसेल का.. की हे या अतिरेक्यांच्या दहशतवादाच्या कार्यात स्वत:ला अर्पण करत असतील? फाळणीनंतर दहशतीचा मुद्दा जास्ती प्रखर झाला आहे. जरी ही दहशत इ.स. ७०० पासून असली फाळणीनंतर हे प्रकरण चिघळय गेलं. आणि तेव्हा मुख्य मुद्दा होता काश्मिर. आणि भारत सरकारची केवळ निषेध करण्याची भूमिका याला खतपाणी घालत गेली. आणि मग एकदा घराची किल्ली मिळाली की, कुठे काय आहे हे पहायला आणि मोडून काढायला किती वेळ लागतो?
एक मात्र नक्की, यात जर पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असेल आणि आय एस आय ने मदत केली असेल यात.. ..तर पाकिस्तानी सामान्य नागरिक विनाकारण जागतिक द्वेषाला बळी पडणार आहे.
इथे कोणी असा विचार अजिबात करू नये की, मी महाराजांची , गांधीजींची तुलना अतिरेक्यांशी करते आहे. अजिबात नाही.. .. माझा तसा हेतूही नाहिये. मी फक्त सामाजाची मानसिकता ही त्या त्या काळच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या हेतूमुळे कशी बदलते का?? किंवा त्या व्यक्तिंच्या कार्यानुरूप असते का..? या प्रश्नाचे उत्तर स्वत:ला आणि मिपा करांना विचारायचा प्रयत्न करते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी फक्त दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा विचार करते आहे.
फक्त भारतालाच टार्गेट करायचे असते तर ताज आणि ओबेररॉय मधल्या युके आणि युएस च्या लोकांच्या रूमचे नंबर विचारून त्याना कशाला मारले?? त्यांना सोडून द्यायला हवे होते ना. पण तसे नाही केले. एकूणच सर्वच जगावर दहशतवाद माजतो आहे आणि भारत प्रत्युत्तर करण्यात कमी पडतो आहे हेच खर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं.
???????????
हे वाक्य वाचून हसावं की रडावं तेच कळलं नाही!

इतर दोघांबद्दल मला माहीत नाही, परंतु वरील वाक्यातील शिवरायांच्या उल्लेखाला माझा तीव्र आक्षेप आहे!
शिवरायांनी जे केलं ते ठराविक एका काळाशी निगडीत नसून त्यांनी जे केलं तो माझ्या मते एक त्रिकालाबधित मानदंड आहे! त्यांचं कार्य हे कुठल्याही काळाच्या, युगाच्या परे आहे! पार आहे, पल्याड आहे!
असो, मी या विषयात पुढे वाद घालू इच्छित नाही..!
तात्या.
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं
ज्युंची क्रुर हत्या , त्यांचा अमानुष छळ हे कोणत्या अँगल नी योग्य?
महाराजानी आणि गांधींनी असे काय केले की त्याना तुम्ही हीट्लर च्या पंक्तीत बसवले
पाकिस्तानी सामान्य माणसाचा कितपत पाठिंबा असेल याची शंका आहे.
कदाचीत तुम्ही म्हणताय ते खर असेलही पण पकिस्तानी जनता म्हणजे कोण जे या दहशतवादाला विरोध करतात ते मूठ्भर लोक म्हणजे पाकिस्तानी जनता आहे का?
बहुतांश लोकांच्या पाठीब्याशिवाय हे असले प्रकार घडू शकत नाहीत हे माझे तरी ठाम मत आहे.
लेख उत्तम थोडासा भडकावू असेलही पण अग्रलेखाच्या विचारसरणिला साजेसा अभिनंदन
सुस्पष्ट चेतन
तु पुण्यातल्या उल्लेख केलेल्या केस चा संदर्भ मला माहीत नाही पण ज्या अर्थी तु उल्लेख केलास त्या अर्थी ती उघडकीस आलेली आहे म्हणजेच सरकार ने हस्तक्षेप केला आहे . आपल्या कडे अशा कारवायां करणार्यांना सरकारी धाक नक्कीच आहे म्हणुन तर सद्ध्या "मालेगाव" प्रकरण चालु आहे. कोणीही हिदू देशाबाहेर अतिरेकी कामं करताना पकडलेला माझ्या माहितीत नाही . आपण कोणाला सक्तीने धर्मांतर करायला भाग पाडत नाही (आता नाही आणि इतिहासात सुद्धा नाही) आपल्या देवळांमधुन हत्यारे सापडत नाहीत . आपल्या धर्मात धर्मासाठी मरण ही संकल्पना आहे ... पण धर्मासाठी कोणाचा जीव घ्यायची शिकवण नाही . भारतात कितीही करप्शन असेल पण भारत सरकार कुठल्याही अतिरेकी संघटनेची पाठराखण करत नाही ..
पण पाक च्या बाबत सगळं वेगळच आहे ... त्या देशाचं , आणि तिथल्या सरकारचं अस्तित्वच मुळी या धर्मवेडावर अवलंबून आहे. सर्व पाक नागरिक भारत द्वेष्टे नसतीलही ... पण बहूसंख्य आहेत
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या काळाची प्रतिकं नसून त्या काळात त्यांच्या आजूभाजूला जी परिस्थिती होती / जे घडत होतं त्याची प्रतिक्रिया होती ... (तसं हिटलर आणि गांधी हे समकालीनच नव्हते का?)
"या २१-२५ वर्षांच्या तरूण मुलांचंही जिहादच्या नावाखाली असंच ब्रेन वॉशींग होत नसेल का.. "
नक्कीच होतं ... त्यांच्या मदरसांमधे ह्याच गोष्टी धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली शिकवल्या जातात ... मुशर्रफ च्या काळात अमेरिकेच्या दबावामुळे या प्रकाराला बंदी घातली होती .. पण ज्या गोष्टी तो पर्यंत उघडपणे होत होत्या त्या आता चोरी-छिपे होतात .
भारत दरवेळी अतिरेकी किंवा गुन्हेगार लोकांची लिस्ट पाक कडे देतो ... त्यांच्या तेथिल वास्त्व्याचे पुरावे देतो पण आजपर्यंत कोणालाही भारताच्या हवाली करण्यात आले नाही ... आणि अगदी अंगाशी आले कि कांगावा करणे हे तर नेहमीचेच आहे
"पाकिस्तानी सामान्य नागरिक विनाकारण जागतिक द्वेषाला बळी पडणार आहे." --- ओल्याबरोबर सुकं जळणारच .. पण या निरपराध पाक नागरिकांना सहनुभुती दाखवण्याच्या नादात अतिरेकी मोकळे सुटुन केवळ भारतातच नाही तर जगभर किडामुंगी सारखी माणसं मारतायत ..
"सामाजाची मानसिकता ही त्या त्या काळच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या हेतूमुळे कशी बदलते का?? किंवा त्या व्यक्तिंच्या कार्यानुरूप असते का..? " ---समाजाची मानसिकता ही खूप व्यापक संकल्पना आहे ... ती घडायला जसा खूप मोठा काळ लागतो तशी ती बदलायला सुद्धा खूप मोठा काळ जावा लागतो आणि त्यासाठी अनेक घटक (उदा. धर्म, अर्थ, शिक्षण, इतिहास, राजकारण, समाजकारण इ.) एकत्रित पणे जबाबदार असतात असे मला वाटते .
मुद्दे पटले.जे पटले नाहीत त्याची चर्चा करणार नाही.
इतिहासापासून आपण काहीच शिकलो नाही खरे आहे.
राजकीय नेभळटपणा हा जुना आजार आहे .
आतंकवादाला हिंदू आणि मुस्लीम असा रंग देउ नये हे खरेच.पण आतापर्यंतचे जवळजवळ सगळेच हल्ले हे मुस्लीम आतंकवाद्यांनी केले असल्यामुळे तो रंग येणे अपरीहार्य आहे असे वाटते.आतंकवाद देशांतर्गत समस्या पण आहे .चिथावणी बाहेरून येते पण खतपाणी इथेच मिळते हे पण वास्तव आहे.
या निमीत्ताने एक सशक्त चर्चा व्हावी.
अग्रलेख आवड्ला. पाहुण्या संपादकाने विविध संदर्भाचा चपलख वापर करत त्यांना वाटलेला विचार त्यांनी योग्य पद्धतीने मांडला आहे. लेखन प्रक्षोभक वाटत असले तरी ' दै. सामना'चे रोखठोक बर्याचदा असेच असते त्यामुळे त्यावर विशेष लक्ष देण्याची गरज नाही असे वाटते.
-दिलीप बिरुटे
आतापर्यंतचा सर्वात चांगला अग्रलेख. कसलाही ढोंगीपणाचा आव न आणता क्लिंटनने मुसलमान समाजाला अगदी योग्य झोडपले आहे. सर्वच विचार आवडले आणि पटले.
प्रतिसाद संपादित. भारतातील कोणत्याही एका समाजाला उद्देशून वेडेवाकडे लेखन करणे टाळावे. धन्यवाद, -चित्रा
आशावादी शेवटापर्यंत प्रवास करणारा अग्रलेख आवडला. अभिनंदन.
त्यातील प्रत्येक मुद्दा पटो वा ना पटो या घडीला प्रत्येकाने आपल्याला जमतील, पटतील त्या मार्गाने लढा देणे चालु करण्याची गरज आहे. योग्य-अयोग्य यावर चर्चा करण्यापेक्षा कृती महत्त्वाची. तेव्हाच अग्रलेखात म्हटल्या प्रमाणे ही इष्टापत्ती ठरु शकेल
बाकी
पण महिन्याभरात पहिले पाढे पंचावन्न म्हणत आपण भारतीय एकमेकांशी भांडण्यात मश्गुल होऊन जाऊ
सध्या येणार्या बातम्या बघता हे महिनाभराचं भाकीत सपशेल चुकुन काहि तासांवर आलेलं बघून वाईट वाटतंय.
-(गोंधळलेला) ऋषिकेश
१. भारतात बाबरी मशीद पाडावानंतर इस्लामी दहशतवाद फोफावला.
- ठीक. पण चीन, चेचन्या,स्पेन, फ्रान्स, युके, सोमालिया, इंडोनेशिया या देशात बाबरी मशिदी कुठे होत्या?
- असाच न्याय लावायचा तर जगातील प्रत्येक असंतुष्टाने दहशतवादी व्हायला हवे. आणि जगात 'संतुष्ट' कोण आहे? (डिश टिव्ही जाहिरातीतले सोडून)
- चला, बाबरी मशीद आपण पुन्हा बांधून देऊ. मुस्लिम समाजाची बिनशर्त माफी मागू. त्यांच्या न्याय्य मागण्याही पूर्ण करू. बास?
पण त्यानंतर एकही दहशतवादी, देशद्रोही कारवाई कोणत्याही धर्माकडून होता कामा नये. ही जबाबदारी त्या समाजाच्या धार्मिक नेत्यांची. अन्यथा त्या धर्माच्या सर्व अनुयायांना देशात दुय्यम नागरिकांचा दर्जा देण्यात येईल. करार म्हणजे करार!
-'आपला धर्मच तेवढा बरोबर, इतरांचा चुकीचा' इतपत धार्मिक कट्टरता प्रत्येक धर्मात आहे. त्या-त्या धर्माबाहेरील लोकांना आपल्या धर्मात ओढण्यासाठी प्रयत्नही प्रत्येक धर्माकडून होतात. हे थांबले पाहिजे. ज्याला जो धर्म स्विकारायचा असेल त्याने तो स्वखुशीने स्विकारावा किंवा कोणताच धर्म स्विकारू नये. पण 'जो आपल्या धर्मात येत नाही त्याला ठार करावे' असे कोणत्याही धर्मात सांगितले असेल तर त्या धर्मातील लोकांनी ती काळ्या दगडावरची रेघ न समजता त्यांच्या धर्मशास्त्रात कालपरत्वे योग्य ते बदल करून त्या धर्माला अधिक 'मानवी आणि समकालीन' बनवावे अशी अपेक्षा बाळगणे चूक आहे काय?
-मुस्लिमांतर्गत विश्वातही दहशतवादी कारवाया आणि युद्धे होतात. त्याला 'शिया आणि सुन्नी' वादाचे दृश्य स्वरूप मानावे लागते. इतर धर्मातही असे विरोधी विचारसरणीचे संप्रदाय आहेत. पण त्यांमध्ये असा रक्तलांच्छित वाद आजच्या काळात तरी होत नसावा.
तर, या रक्तपिपासू वृत्तीचे मूळ शोधून त्याचे निर्दालन झाले पाहिजे. ('जे खळांची व्यंकटी' प्रयत्नाने सांडवू.)
१.अ. 'मुस्लिम संस्कृती' सुसंस्कृत नाहीच. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत.
-मुळात अत्यंत क्रूर आणि रानटी अरब टोळ्यांना सुसंस्कृत आणि समंजस बनवण्यासाठी (शांतीचा मार्ग) निर्माण झालेला हा धर्म आहे हे विसरून चालणार नाही. (त्या धर्माला) विरोध करणार्याला ठार केले नाही तर तो आपल्याला ठार करेल ही रास्त भीती 'धर्म उद्गात्यांना' होती. म्हणूनच त्यांच्या मूळ शिकवणीत 'तुम्ही आमचे मित्र नाहीतर आमचे शत्रू' या न्यायाने काही सूत्रे दिलेली आहेत. शत्रू म्हणजे केवळ ठारच करायचा लायकीचा! असे समिकरण होते. मग तो प्रत्यक्ष बाप/भाऊ असला तरी.
त्या धर्माचे अनुयायी नसतानाही इतरेजन शांततेने नांदू शकतात ही कल्पनाच त्याकाळी नव्हती. परंतु या धर्माचा इतर संस्कृतींशी संबंध आल्यावर त्यांच्या लक्षात आले की असेच काही नाही. म्हणूनच तर भारतात 'जिझिया' कर देऊन का होईना पण इतर धर्मिय जिवंत राहू शकले.
शिवाय एकदा हा धर्म स्थिर झाल्यावर इराणी आणि भारतीय संस्कृतींसह अनेक संस्कृतींचे त्यावर संस्कार होत गेले आणि 'धर्म टिकवण्यासाठी हत्या' हा विचार मागे पडला. त्या धर्माची एक संस्कृती निर्माण झाली. तत्त्ववेत्ते, गणिती,स्थापत्यशास्त्री, लेखक, कवी इ. व्यापक पाया निर्माण झाला.इतर धर्मांच्या तुलनेने हे खूपच वेगाने घडले.धर्म समंजस होत गेला.
आज 'इस्लामी दहशतवाद' पुन्हा त्या धर्माला अरब टोळ्यांच्या काळात घेऊन जाऊ पहात आहे. याला त्या धर्मातील विचारवंतांनी पायबंद घातला पाहिजे आणि इतर धर्मांनी त्यांना मदत केली पाहिजे.
२. इतिहासाला विसरून निर्मळ दृष्टीने जगाकडे पाहिले पाहिजे.
-सर्व पक्षांनी तसे करणे अपेक्षित आहे की फक्त समंजस पक्षांनी?
३. अपवादाने नियम सिद्ध होत नसला तरी अपवाद आहेत हे विसरून चालणार नाही.
-प्रश्नच नाही. मी तर म्हणतो 'देशद्रोही' हे त्यांच्या-त्यांच्या धर्मांना लांच्छन आहेत.
साप म्हणून भुई धोपटायला नकोच! पण जे खर्या अर्थाने राष्ट्रप्रेमी आहेत त्यांनी स्वतःहून सुरक्षा यंत्रणेची मदत करण्यास पुढे आले पाहिजे. चला, सगळ्या बांगलादेशीय आणि पाकिस्तानी लोकांना भारतातून एकगट्ठा हाकलून देऊ. त्यांच्या बाजूने कुणीही कोल्हेकुई करायची नाही, त्यांना पाठीशी घालायचे नाही. तसे करणार्यास कठोर शिक्षा! हे तरी 'अमुकतमुकधर्मवादी' विधान नाही ना? कुठून तरी सुरुवात केली पाहिजे ना?
-चला, एक प्रचंड विदागार बनवू - ज्यात प्रत्येक व्यक्तीचा आगापिछा (पत्ता, नातेवाईकांची नावे-पत्ते) असेल. आधुनिक तंत्रज्ञान वापरून (भारतातील आणि शक्य असेल तर जगातील) प्रत्येक व्यक्तीला जबाबदार (अकाऊंटेबल या मराठी अर्थाने) बनण्यास भाग पाडू. व्यक्तीस्वातंत्र्य आणि अनागोंदी यांच्यात पुसट सीमा आहे. ती आपण पक्की करू. या उपायाला तरी कोणाच्या 'धार्मिक' हक्कांवरचे आक्रमण म्हणता येणार नाही.
४. हिंदूंचा नेभळटपणा नाही.
-मान्य आहे. 'हिंदू' आजच्या काळात तरी बहुसंख्येने 'समकालीन' आहेत. चर्चमध्ये लग्न लावण्याइतपत ते पुढारलेले आहेत. निदान आजपर्यंत तरी 'हिंदू'च मुस्लिमांना समजून घेण्याची भाषा करत आहेत. याला नेभळटपणा म्हणता येणार नाही.
-पण इतर धर्मांनी खुशाल आक्रमण करायचे आणि फक्त हिंदूंनी समजावून घ्यायचे यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या तर मात्र अधिकाधिक हिंदू आक्रमक बनत जातील. त्यावेळी दोष हिंदूंनाच देऊन कसे चालेल?
-निदान या अतिप्रसंगानंतर तरी 'सर्वधर्मसमभाव' या भारताच्या घटनेतील महत्त्वाच्या शब्दाला खरा अर्थ प्राप्त होईल असे वर्तन (मतपेटीवर डोळा ठेऊन किंवा असंतोषाची भीती बाळगून) एकतर्फी धार्मिक कारवायांकडे कानाडोळा करणार्या राजकीय पक्षांकडून सुरू होईल तर बरे.
५. संभवामि युगेयुगे|
-ही विचारसरणी योग्य नव्हे. आजच्या काळात तर मुळीच नाही. नेहमी एखाद्या अवताराची वाट पहात परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायलाच पाहिजे असे नाही.
-पाकिस्तान आणि बांग्लादेश भारताच्या सीमेत समाविष्ट होतील ही अपेक्षा पूर्णपणे चुकीची आहे. इतकेच काय पण आझाद काश्मिर आणि अक्साईचीनही भारताला सहजासहजी परत मिळेल असे नाही.
वास्तववादी अपेक्षा एवढीच की 'देशासाठी योग्य काही करताना कोणत्याही धर्माला कसलीही तोशीश लागता कामा नये' ही विचारसरणी सर्वांनीच सोडून दिली पाहिजे. यात अगदी रस्त्यावरही देवळे, मशिदी हालवण्यापर्यंत सारे काही आले. नाहीतर 'आल्ला मालिक'!
नमस्कार मिसळपाव गावकर्यांनो,
मी थोड्या वेळापूर्वी पुण्याला परत आलो आणि आता मला माझे उत्तर लिहायची सवड मिळत आहे. थोड्या वेळापूर्वी लिहायला सुरवात करणार होतो पण अचानक दुसरे काम आल्यामुळे लॉगिन करूनही पुढे लिहिता आले नाही. असो.
मी सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या आहेत. आपल्या चर्चेतील सहभागाबद्दल धन्यवाद. मी प्रत्येक प्रतिसादाला वैयक्तिक उत्तर न देता माझे सर्व मुद्दे एकत्र मांडत आहे.
सर्वात पहिला मुद्दा म्हणजे भारतावर मोठे संकट आलेले असताना समाजात फूट पाडणारी भाषा वापरल्याचा आरोप झाला आहे. त्यावर माझे एकच उत्तर आहे ते म्हणजे सावरकरांचे वाक्य-- 'आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना आणि विरोधाल तर उच्छेदून हे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही'. कोणीही माणूस घरी कोणत्या वेगळ्या देवाला मानतो म्हणून त्याला ठार मारा ही हिंदू संस्कृती अजिबात नाही. उलट 'आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति' असे आपण म्हणतो. भगवद्गीतेतही भगवान कृष्णाने लोकांसाठी कर्मयोग आणि भक्तीयोग असे मार्ग सांगितले आहेत. हे दोन्ही मार्ग ईश्वराकडे जायचे वेगळे मार्ग आहेत यापैकी आपल्याला जो मार्ग पटतो तो आपण निवडायचा.
असे असताना जे मुस्लिम ' आमच्याबरोबर येत असतील' (उदा. माजी राष्ट्रपती कलाम, परमवीरचक्र विजेते अब्दुल हमीद वगैरे) त्यांना विरोध करायचे कारण काय? आमच्याबरोबर येणे या म्हणण्याचा अजिबात गैर अर्थ काढू नका. आमच्याबरोबर येणे म्हणजे सक्तीचे धर्मांतर नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर मी अमेरिकेत ५.५ वर्षे एक विद्यार्थी म्हणून होतो. त्या देशाने मला खूप काही दिले. शिक्षण आणि संशोधनासाठी मला जे जे काही हवे होते ते दिले, इतकेच नव्हे तर विद्यार्थी असताना माझ्या राहणीसाठी भरपूर पैसे दिले.कधी काळी स्वतःची गाडी असावी हे स्वप्न माझे अमेरिकेत पूर्ण झाले.मला अमेरिका सोडून का यावे लागले यामागची कारणे जरा वेगळी आणि वैयक्तिक आहेत. त्या कारणांचा उल्लेख इथे करायची गरज नाही. पण सांगायचा मुद्दा म्हणजे आजही माझ्या मनात त्या देशाविषयी कृतज्ञताच आहे. मी अमेरिकेत असताना माझी परिने त्या देशासाठी जे जे काही मला करता येईल तेच मी केले. त्या दृष्टीने मी 'अमेरिकनांबरोबर जात होतो'. मला त्या देशात कोणीही धर्म बदलायला सांगितला नाही. त्याच पध्दतीने भारतातील मुस्लिमांकडून आणि सर्वांकडून अपेक्षा अशी की त्यांनी स्वतःला शक्य असेल त्या पध्दतीने आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लावावा निदान पाकड्यांना कोणत्याही पध्दतीची मदत करू नये. आमच्या छत्रपतींचे स्वीय सचिव आणि आग्रा प्रकरणात जीवाची बाजी लावणारे आणि इतर अनेक हे धर्माने मुस्लिम होते. त्यांनाच कलामसाहेबांप्रमाणे विरोध करायचा प्रश्नच नाही. अशा मुस्लिमांविषयी कोणालाही काहीही म्हणायचे नाही. पण मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जर १९४६ च्या निवडणुकींमध्ये बहुतांश मुस्लिम जागांमधून पाकिस्तान हा एककलमी कार्यक्रम राबवणारे मुस्लीम लीगचे उमेदवार निवडून गेले असतील तर याचा अर्थ त्या मुस्लिमांनी आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला आहे असा होतो. हा देशद्रोह नाही का? ज्यांनी ज्यांनी मुस्लीम लीगला मते दिली त्यांना पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे अशी मागणी केली तर त्यात काय चुकले? अशापध्दतीने लीगला मते देणे म्हणजे 'विरोध करणे' आणि त्याला आपण दुर्दैवाने उच्छेदले नाही. तसेच गैर मुस्लिमांच्या कत्तली करून आपण गाझी बनून जन्नतमध्ये जाऊ आणि आपल्याला ७२ अप्सरांचा उपभोग घेता येईल असा विचारसुध्दा मनात आणणारा माणूस अत्यंत धोकादायक आहे आणि त्याने कोणत्याही दहशतवादी कृत्यात भाग घेण्याआधीच त्याला जन्नतमध्ये पाठवावे अन्यथा आपला नंबर दहशतवादी हल्ल्यात लागणार नाही यासाठी प्रार्थना करायची तयारी ठेवावी. तेव्हा 'आलात तर तुमच्या सह' या मुद्द्यावर माझे मत हे आहे.
दुसरे म्हणजे हिंदू सैन्य पाकिस्तान आणि बांगलादेश कबजात आणेल आणि आपण इतके सामर्थ्यशाली होऊ की तेथे विरोध करणार्यांना एकतर त्यांच्या जन्नतमध्ये किंवा कायमचे देशोधडीला लाऊ हे स्वप्न पूर्ण व्हायला किती वेळ लागेल माहित नाही. कदाचित ५० वर्षे, कदाचित २०० वर्षे, कदाचित २००० वर्षे! पण पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रे आमच्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या स्थापन केलेली आहेत असे म्हटले तर काय चुकले?समजा माझ्या घराची एक खोली गुंडाने बळकावली आहे. ती आज परत घेणे मला शक्य नाही. पण म्हणून मी विसरून जाऊ की माझ्या घरात ती एक खोली होती?कदापि नाही. एक ना एक दिवस जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ती खोली मी कबजात घेणारच आहे. अगदी शेकडो वर्षे गेली तरी चालतील पण तरीही मी ती खोली विसरणार नाही आणि तोपर्यंत माझे स्वातंत्र्य अपुरे असेल असे माझे मत आहे.
पॅलेस्टाईनमधील 'देवाने दिलेल्या' जमिनीवर ज्यूंच्या इस्त्राएल देशाची स्थापना व्हावी म्हणून ज्यू लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न राष्ट्राची स्थापना व्हायच्या आधी ५०-६० वर्षांपासून सुरू केले होते. त्यासाठी त्यांची 'झिओनीस्ट काँग्रेस' स्थापन झाली होती. १९३७ काँग्रेसपुढे प्रस्ताव आला की पॅलेस्टाईन सोडून आणखी थोडे पश्चिमेला इस्त्राएल या ज्यूंच्या 'होमलँड' ची स्थापना व्हावी. त्यावर डेव्हिड बेन गुरिओन यांचे उत्तर आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे. ते म्हणाले की गेली २००० वर्षे आम्ही ज्या जमिनीचा ध्यास धरला आहे त्या जमिनीविषयी कोणतीही तडजोड आम्ही स्विकारणार नाही. पॅलेस्टाईनची फाळणीसुध्दा आम्हाला मंजूर करावी लागली तर ती एक तात्पुरती व्यवस्था असेल. अन्यथा आम्हाला आमच्या पुढील पिढ्या माफ करणार नाहीत! (हेच डेव्हिड बेन गुरिओन पुढे इस्त्राएलचे पहिले पंतप्रधान झाले). हे बोलणे किंवा मुळात इस्त्राएलची स्थापना हे नैतिक दृष्ट्या कितपत योग्य होते हा वेगळा मुद्दा झाला. पण सांगायचे म्हणजे ज्यू लोकांचे ध्येय स्पष्ट होते. त्यासाठी २००० वर्षे गेली तरीही कोणतीही तडजोड स्विकारायला ते तयार नव्हते.
आणि आपण ६० वर्षे नाही झाली की विसरूनच जातो की ती जमिन आपली आहे. ६० वर्षे सोडूनच द्या अगदी १६ ऑगस्ट १९४७ ला ती जमिन आपली आहे हे कोणाच्या लक्षात असेल का?याउलट आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे 'हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान' ही घोषणा चालते (विशेषतः दंगलींच्या वेळी) असे वाचनात आले आहे. १९४७ मध्ये पूर्व बंगाल, सिंध, बलुचिस्तान, पश्चिम पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत आपल्या हातातून गेला. १९४८ मध्ये पाकव्याप्त काश्मीर गेला. सरदार पटेलांचे खंबीर नेतृत्व नसते तर १९४८ मध्ये हैद्राबाद सुध्दा गेला असता! अरूंधती रॉयसारख्यांचे म्हणणे आहे की २००८ मध्ये काश्मीर खोर्याला स्वातंत्र्य देऊन टाकावे. आसामातील परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील २० वर्षांत त्या राज्याचे काय होईल सांगता येत नाही. असे एक एक करून आपल्या भारतमातेचे लचके तोडणार का आपण? बोला.
बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की ज्या देशाची इंचभर जमिनही शत्रूच्या ताब्यात आहे तो देश कायम युध्दमानच राहिला पाहिजे. सध्याच्या काळात आपण सतत युध्दमान राहू शकलो नाही (ते शक्यही नाही) तरी आपला मोठा भूभाग शत्रूच्या ताब्यात आहे हे लक्षात तरी ठेवणार की विसरून जाणार?
मान्य आहे की मार्ग सोपा नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे (मुळचा श्लोक आठवत नाही पण अर्थ आठवतो). त्यात म्हटले आहे की हळूहळू चालून मुंगी हजार योजने चालून जाऊ शकेल पण जागेवरून हललाच नाही तर गरूड एक पाऊल सुध्दा पुढे जाणार नाही. आपल्याला कधीतरी सुरवात करायला हवी की नाही?
आणि या मार्गात लष्करी बळ महत्वाचे आहेच. पण त्याहूनही अधिक महत्वाचे आहे भारताला सर्व क्षेत्रांमध्ये बलशाली बनवायचे. अर्थकारण, अभियांत्रिकी, संशोधन, वैद्यकिय क्षेत्रांमध्ये भारत हे अग्रेसर राष्ट्र व्हायला हवे. शेवटी जगात बलिष्ठांचीच किंमत केली जाते आणि दुबळ्यांची नाही हे लक्षात घ्यायला हवे. याच बळाच्या जोरावर चीनने तिबेटमध्ये काहीही केले तरी कोणी काही म्हणू शकत नाही. याच बळाच्या जोरावर अमेरिका इराकवर इतर कोणाचीही पर्वा न करता आक्रमण करू शकते. याच बळाच्या जोरावर चीन तियानानमेन चौकात लोकशाही समर्थक विद्यार्थ्यांवर खुशाल रणगाडे घालू शकते.इस्त्राएल पॅलेस्टिनींची दडपशाही करते तरीही त्यांचे का चालते? कारण अमेरिकेत ज्यू लोकांची आर्थिक ताकद प्रचंड आहे. त्याचप्रमाणे भारताचा सर्व क्षेत्रांमध्ये वर्चस्व असला पाहिजे.असा दरारा असेल तरच भविष्यकाळात (कधी ते सांगता येत नाही) आपण सिंधू नदी भारतात परत आणू शकू. कारण असे वर्चेस्व असेल तरच जगाची भारताला काही विचारायची हिंमत राहणार नाही. त्यासाठी खूप काही करायला हवे असे नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात व्यवस्थित योगदान दिले तरीही एक ना एक दिवस जगात भारताचे वर्चेस्व निर्माण होईल. माझे स्वतःचे सांगायचे झाले तर मी अमेरिकेत असताना पी.एच्.डी. घेऊन भारतात परत येऊन एक संशोधक म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रात काम करून माझे योगदान येण्याचा निश्चय केला होता. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. सध्या मी दुसर्या एका खटपटीत आहे आणि त्या क्षेत्रात माझे योगदान द्यायचा माझा प्रयत्न असेल. त्या क्षेत्रात माझा प्रवेश झाला की मी मिसळपाववर जाहिर करेनच. (बहुदा पुढील ६ महिन्यांत)
मी माझ्या मुळच्या आणि आताच्या लेखातील मते वेगवेगळी पुस्तके वाचून स्वतः त्यावर विचार करून बनविलेली आहेत. आणि जे माझ्या बुध्दीला पटले नाही ते मी कधीच मान्य केले नाही (उदाहरणार्थ हिंदू संस्कृतीतील कर्मकांडे). संतुलित वाचन होण्यासाठी मी जसे सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचले तसेच रोमिला थापर यांची पुस्तके सुध्दा वाचलली आहेत. तसेच अमेरिकेतील आमच्या विद्यापीठातील ग्रंथालयातून एस्.आर. बक्षी, ग्रँड डफ यांची मध्ययुगीन भारतावरील पुस्तके वाचली आहेत. तसेच भारताच्या फाळणीवर, स्वातंत्र्यलढ्यावर, इस्त्राएल्-पॅलेस्टाईन प्रश्नावर आणि दुसर्या महायुध्दावर मी पुस्तके वाचली आहेत. आणि आणि या सगळ्यांमधून माझी मते मी बनवली आहेत. श्री. कलंत्री यांनी माहितीचे स्त्रोत मागितले म्हणून मुद्दामून लिहित आहे.
या सर्व मुद्द्यांवर वैयक्तिक पातळीवर न जाता चर्चा करायला मला आवडेल.
माझा प्रतिसाद बराच लांबलचक झाला आहे याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्यांचे आभार.
धन्यवाद
---विल्यम जेफरसन क्लिंटन
माझे म्हणणेही हेच आहे.."घरात झुरळं झाली तर त्यांना मारायलाच हवं. आणि पुन्हा होऊ नयेत .. येऊ नयेत यासाठी वेळच्या वेळी प्रतिबंधक उपायही करायला हवेत. पण आपल्या घरात झुरळं त्रास देतात म्हणून संपूर्ण गावभराच्या झुरळांना मारत सुटायचं याला काय अर्थ आहे. आणि ते शक्य आहे का?" दुसर्यांच्या घरात झुरळं येतात ते जर योग्य प्रतिबंध करत असतील तर आपणही नको का करायला?"
माझ्या देशाच्या शांततेचा भंग करणारा पाकिस्तानच नव्हे तर कोणताही देश.. अगदी चीन, बांग्लादेश किंवा दुसरा कोणताही देश.. हा माझा शत्रूच आहे. कर्मधर्म संयोगाने या यादित पाकिस्तानचे नाव सर्वात वरती आहे आणि तो देश मुस्लिम आहे म्हणून संपूर्ण मुस्लिम धर्माबद्दल असं बोलणं मला पटत नाही. किंवा इस्लाम वाईटच आहे हे म्हणणं मला मला पटत नाही. पाकिस्तान हे जर मुस्लिम राष्ट्र नसतं तरीही माझा तो शत्रूच असता कारण माझ्या देशाचा तो शत्रू आहे.
मी आधीच म्हंटले आहे की, महाराजांची किंवा म. गांधींची तुलना मला कोणाशीच करायची नाही. या व्यक्ती या त्या त्या काळात लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणार्या होत्या. आणि त्यातून .. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊनच वीर तानाजी, बाजी प्रभूं सारखे योद्धे जन्मले. ज्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव असतो आपण तिच्या विचारांचं आचरण करतो हे जर खरं असेल तर नकळत्या वयात जर इस्लाम हा धर्म केवळ आणि केवळ जिहादसाठी आहे आणि आपल्याला तेच करायचं आहे असं जर एखाद्या बालकाच्या मनावर बिंबवलं जात असेल तर जो कोणी बिंबवणारा गॉडफादर असेल त्याच्या विचारांनी ते बालक प्रेरित होणार नाही का? हाच प्रश्न मला विचारायचा आहे इथल्या चर्चेत भाग घेणार्यांना. म्हणजेच काय तर इस्लामचा चुकीचा अर्थ ते घेत आहेत असा होतो का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
पण सर्वाच्या डोळ्यात अंजन घालणारा नक्कीच आहे.महाभारतात पांडव कौरवांकडे फक्त जगण्यासाठी पुरेशी भुमी मागत होते .परंतु ती न मिळाल्याने पुढचे सर्व महाभारत घडले. आपला लेख व प्रतिक्रिया खुपच माहितीपुर्ण आहेत्.धन्यवाद
वेताळ
"१.अ. 'मुस्लिम संस्कृती' सुसंस्कृत नाहीच. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत.
-..........परंतु या धर्माचा इतर संस्कृतींशी संबंध आल्यावर त्यांच्या लक्षात आले की असेच काही नाही. म्हणूनच तर भारतात 'जिझिया' कर देऊन का होईना पण इतर धर्मिय जिवंत राहू शकले.
शिवाय एकदा हा धर्म स्थिर झाल्यावर इराणी आणि भारतीय संस्कृतींसह अनेक संस्कृतींचे त्यावर संस्कार होत गेले आणि 'धर्म टिकवण्यासाठी हत्या' हा विचार मागे पडला. त्या धर्माची एक संस्कृती निर्माण झाली. तत्त्ववेत्ते, गणिती,स्थापत्यशास्त्री, लेखक, कवी इ. व्यापक पाया निर्माण झाला.इतर धर्मांच्या तुलनेने हे खूपच वेगाने घडले.धर्म समंजस होत गेला."
कुठ्ल्या ... नंदनवनात आहात ? इस्लाम हा मुळातच क्रूर आहे याचे मूळ मदीना काळापासून अवतरलेल्या आयातीत आहे, त्यांच्या संस्थापकाने स्वतः दिलेले अन्य धर्मीयांचे अभय मागे घेतले व कत्त्ली चे आदेश दिले.
जिझिया ची सवलत फक्त पुस्तक धारी म्हणजे ज्यू व ख्रिस्तींनाच आहे. आपणा मूर्तीपूजकाना दोनच पर्याय .... इस्लाम किंवा ... क्रूर मरण...
जोवर सारे जग गांधीवादी होत नाही तो पर्यंत सावरकर वादच या देशाला तारेल.
मा. क्लिंटनसाहेब,
सात्विक संतापाने पण मनापासुन आणि जखमी अंतःकरणाने लिहिलेला अग्रलेख आवडला. गुळ्मुळीतपणाचा लवलेश नसलेला पण प्रक्षोभकही नाही.
या देशात गेल्या ६० वर्षांचा विचार केला तर केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. त्यांना गांधींचे फारसे प्रेम नसले तरी त्या नावाचा वापर करायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. जवळपास ३ पिढ्यांना सशस्त्र क्रांती व महान हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास लपवुन केवळ आमच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असा प्रचार केला गेला आहे. कळस म्हणजे २ वर्षांपूर्वी एन सी ई आर टी अभ्यासक्रमाच्या पुस्तकात काही क्रांतिकारकांचा उल्लेल्ख 'दहशतवादी' असा केला गेला होता. अर्थातच यावर सरकारने बेशरमपणे सारवासारवी केली.
'दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल' अशा गौरवल्या गेलेल्या महात्म्याने जर उपर्या शत्रुला आपल्या महान अहीसेने देश सोडुन जायला भाग पाडले तर याच भूमित जन्मलेल्या व याच देशाला मायभूमी म्हणणार्या मुस्लिमांना ते विघटना पासून का बरे रोखु शकले नाहीत? कींवा फाळणीत हिंदुंवर अत्याचार करण्यापासुन परावृत्त का करु शकले नाहीत? बरे या फाळणीमुळे भयानक कत्तली होतीले हे त्यांना माहीत नव्हते? त्या रोखायला त्यांनी काय केले? आणि हे सगळे अट्ळ होते तर एकदा धर्माधिष्ठित विभाजन झाल्यावर मुस्लिमांना अनुनय कौन इथे ठेवुन घेण्याची व त्यांना अल्पसंख्यांक म्हणुन अवास्तव महत्व द्यायची काय गराज होती?
सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात. अगदी मान्य आहे. पण आतापर्यंत कंदाहर, कश्मिर, ते कालच्या हल्ल्यापर्यंत हात असलेले सर्व अतिरेकी मुस्लिम होते हे सत्य आहे आणि ते स्विकारायला काय हरकात आहे? या सत्याचा उच्चार केल्यावर तथाकथीत निधर्मी अस्वस्थ का होतात? दहशतवादाला जात धर्म नाही. उद्या हिंदु अतिरेकी जर असे अंदाधूंद गोळीबार करत रेल्वे स्थानकावर घुसले तर त्यांना गोळ्या घातल्या म्हणुन एकही हिंदु नाराज होणार नाही, निषेध दूरच राहीला. जेव्हा पाकिस्तानने शिखांपैकी काहींना चिथावुन खलिस्थानच्या मागणीसाठी प्रवृत्त केले व जेव्हा दहशतवाद माजला तेव्हा पंजाबात त्या फुटीरता वाद्यांना गोळ्याच घालाव्या लागल्या व त्यासाठी कुणाही हिंदुनी नापसंतीसुद्धा व्यक्त केली नाही.
पाकिस्तानच्या बाबतीत आपण अत्यंत बोटचेपे धोरण स्विकारीत आलो आहोत. अनेकदा आपण युद्धात जिंकुनही वाटाघाटीत हरलो. पकिस्तान्च्या प्रत्येल आगळीकीकडे केलेला काणाडोळा म्हणजे देशासाठी युद्धात प्राण दिलेल्या सैनिकांशी प्रतारणा आहे.
श्री. क्लिंटन,
अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद.
मात्र खालील दोन संकल्पनांचे अर्थ समजले नाहीत.
हिंदू राष्ट्रः"आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना आणि विरोधाल तर उच्छेदून हे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही"
हा देश हिंदू राष्ट्र होईल म्हणजे नक्की काय होईल? हिंदूंचे येथे काय स्थान असेल. आणि हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयांचे येथे काय स्थान असेल? मुसलमान राष्ट्रांमध्ये जसे शरीयतचे पालन होते तसे इथे काय होणार? (मनुस्मृती की आता आहे तीच राज्यघटना?)
आमची जमीनः
पाकिस्तान आणि बांग्लादेशाची जमीन आमची आहे असे आपण म्हणता? येथे आमची म्हणजे कोणाची?
नमस्कार,
कालच्या माझ्या प्रतिसादात काही मुद्दे राहून गेले होते. त्या आणि इतर काही मुद्द्यांचा परामर्श आज करत आहे. सर्वप्रथम माझ्या अनुपस्थितीत मला मांडायचे मुद्दे मांडल्याबद्दल तात्यांना धन्यवाद. मते पटणार्या सर्वाना धन्यवाद. मते न पटलेल्या आजानुकर्ण यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याचा परामर्श आजच्या प्रतिसादात करणारच आहे. सर्वांचा नामोल्लेख करत नाही पण मिसळपावच्या माध्यमातून एक सशक्त चर्चा घडवून आणण्यात सर्वांचा महत्वाचा वाटा आहे.तेव्हा मी पाहुणा संपादक या नात्याने सर्वांचा आभारी आहे.
आजच वर्तमानपत्रांमध्ये वाचले की अतिरेक्यांना हल्ला करून, मृत्युचे थैमान घालून कराचीला परत जायचे होते. म्हणजे आपण ३-४ तासांत सिंहगडावर जाऊन परत यावे त्यापध्दतीने त्यांना रक्ताचे पाट वाहवून परत जायचे होते. हे सगळे कशामुळे होऊ शकते? कारण एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून आपण शत्रूच्या मनात भिती निर्माणच करू शकलो नाही. दहशतवादाविरूध्द पॊटापेक्षा जहाल कायद्याची आवश्यकता असताना पोपटपंची चालते की पोटा (त्यापूर्वीच्या वटहुकुम स्वरूपात असताना) संसदभवनावरील हल्ला थांबवू शकला नाही तेव्हा त्याची काही गरज नाही. मला अशा मंडळींना एक प्रश्न विचारायचा आहे. कायदा बयाच अंशी एखाद्या औषधाप्रमाणे असतो.घरी औषधाचा साठा आहे म्हणून रोग व्हायचा थांबत नाही पण रोग झाल्यावर औषध आपल्याजवळ असणे गरजेचे असते.अशा लोकांच्या घरी एखादे अत्यंत प्रभावी किटकनाशक आहे म्हणून त्यांच्या घरी झुरळे यायची थांबतात का? घरी आलेल्या झुरळांवर किटकनाशके फवारणे गरजेचे असेल तर ती आपल्या साठ्यात असली पाहिजेत. कायद्याचे काम अशा किटकनाशकापेक्षा वेगळे आहे का?तरीही पॊटाचे नाव घेतले की यांच्या कपाळावर आठ्या आल्याच म्हणून समजा. अशा अनेक इतर प्रकारचे भ्रम समाजात असतील, आपले ध्येय नक्की नसेल तर आपण काय शत्रूच्या मनात भिती निर्माण करणार? महंमद अफझलला फाशी न देण्यामागे मुस्लिम समाचाची मते गमावण्याची भिती असेल तर ते कसले द्योतक आहे? १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेक्यांचा इरादा अत्यंत भयंकर होता. फिजीमध्ये झाले त्याप्रकारे पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळ आणि खासदार ओलीस ठेऊन आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा नाहीतर पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना ठार मारून देशात अराजक माजविण्याचा त्यांचा उद्देश होता. इतक्या गंभीर गुन्ह्याची आखणी करण्यात मोठा वाटा असलेल्या मोहंमद अफझलला फासावर लटकवले तर त्यामुळे मुस्लिम मते जातील अशी भिती वाटत असेल तर याचा अर्थ काय घ्यावा? तरीही पाकिस्तानी अतिरेक्यांचे दफन भारतात करून भारतभूमी मलिन करण्यास काही मुस्लिम संघटनांचा विरोध असेल तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा. औरंगजेब महाराष्ट्राच्या भूमीत मेला आणि २५ वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्याचे थडगे महाराष्ट्रात खणले गेले यामुळे खुल्ताबादची जमिन मलिन झाली असे एक महाराष्ट्रनिवासी आणि भारताचा नागरिक म्हणून व्यक्तीश: मला वाटत नाही. तरीही अतिरेकी दफन विरोधामुळे का होईना ज्या मुस्लिमांना हा देश आपला वाटतो आणि जे मुस्लिम आपल्याबरोबर यायला तयार असतील त्यांचे स्वागतच आहे.
एक प्रश्न काल विचारला होता की प्रस्तावित हिंदू राष्ट्रात इतर धर्मीयांचे स्थान काय असेल/ असावे असे मला वाटते. त्यावर उत्तर एकच-- भगवद्गीतेने सांगितल्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांना असावे. पण त्याचबरोबर इतर धर्मियांची कत्तल करून जन्नतमध्ये लवकर जाता येईल अशी विचारसरणी असलेल्या कोणालाच त्यात स्थान नसावे. त्याचबरोबर न स्त्री: स्वातंत्र्यं अर्हति किंवा वेद ज्या शूद्राच्या कानी पडतील त्या शूद्रांच्या कानात खिळे ठोकावेत (किंवा तत्सम काहीतरी भयंकर प्रकार करावा) असे म्हणणारी मनुस्मृती पण नको.पण हा देश हिंदूंचा आहे आणि इतरांना पूर्णपणे त्यांचा धर्म पाळायचे स्वातंत्र्य आहे आणि गुण्यागोविंदाने राहून देशाच्या प्रगतीस हातभार लावल्यास हा देश इतरांचाही होऊ शकतो याचे भान सर्वांना असावे. लिंकनने म्हटले 'With malice toward none, with charity for all....' त्यात आणखी एक ’with appeasement of none' जोडून कारभार व्हावा. आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे हिंदूंनी विज्ञान हा धर्म पाळावा म्हणजे भोंदूगिरी, अनावश्यक कर्मकांडे यांना कायमची रजा मिळावी. अर्थात हे माझे स्वत:चे मत आहे. हा महत्वाचा प्रश्न चर्चेत आणल्याबद्दल आजानुकर्ण यांचा धन्यवाद.कारण आपले ध्येय नक्की काय हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ हवे. नाहीतर समजा सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण झाली आणि पुढे काय हे माहित नसल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.आमच्या छ्त्रपतींनी सैन्याला स्पष्ट सांगितले होते की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. त्यापुढील वाक्य महत्वाचे आहे. महाराज म्हणतात ’असा कारभार न केल्यास रयतेला वाटेल हे कसले हिंदवी स्वराज्य यापेक्षा मोंगल बरे’. त्याचप्रमाणे हे कसले हिंदू राष्ट्र यापेक्षा जिहादी दहशतवाद परवडला असे समाजातील कोणालाही वाटले (विशेषत: गरीब आणि मागासवर्गीयांना) तर तो आपला दहशतवाद्यांनी मुंबईत केला त्यापेक्षा मोठा पराभव ठरेल. म्हणूनच माझ्या पहिल्या लेखात शेवटच्या परिच्छेदात समतापूर्ण व्यवस्थेचा उल्लेख मी केला. मान्य आहे की जातीव्यवस्थेचा पाडाव करणे हे मोठे आव्हान आहे. पण एक समाज म्हणून कधीना कधी आपल्याला याचे उत्तर शोधून काढावेच लागणार आहे.
दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?त्याविषयी नि:संदिग्ध उत्तर ती जमिन आम्हा हिंदूंची.मान्य आहे की आपल्या समाजात अनेक दुर्गुण आहेत पण हिंदू म्हणून म्हणवून घ्यायला आपल्याला लाज का वाटते?ज्या भूमीत वेदांची रचना झाली ती जमिन हिंदूंची नाहीतर कोणाची?आमच्या समाजात दोष आहेत म्हणून आमची जमिन स्वत:च्या घशात घालायचा इतर कोणालाही अधिकार नाही. एखादा माणूस सतत जुगार खेळतो आणि इतर अनेक दोष त्याच्यात आहेत म्हणून त्याचे घर बळकावणे समर्थनीय ठरेल का?
आणखी काही राहिलेले मुद्दे---
१) हो नथुराम गोडश्यांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाकडे तरी आहेत. नथुरामने स्वत:च्या अस्थी सिंधू नदी स्वतंत्र भारतात येईल तेव्हा त्यात विसर्जित कराव्यात अशी इच्छा प्रकट केली होती असे पंचावन्न कोटींचे बळी (किंवा गांधीहत्या आणि मी) या पुस्तकात वाचल्याचे आठवत आहे.
२) हिंदू समाजाच्या नाकातोंडात पाणी शिरेपर्यंत थांबावे लागते हे आपलेच दुर्दैव.पण एक गोष्ट मात्र खरी की लोकांमध्ये जागृती होत आहे. १९४७ मध्ये आपला ३०% भूभाग जाऊन सुध्दा, काही लाखांची कत्तल होऊनसुध्दा ५५ कोटींची पाकिस्तानला दक्षिणा देणार्या गांधींना लोक डोक्यावरच घेत होते. माझा त्यावेळी जन्म झाला नव्हता पण फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्यावर मी जे काही वाचन केले आहे त्यात त्या कारणावरून देशभरात संतापाची लाट पसरली असे मात्र कुठेही वाचले नाही.माहिती तंत्रज्ञान त्याकाळी प्रगत नव्हते म्हणूनही असेल कदाचित. तरीही त्या मानाने मुंबईत २००-२५० लोकांचे बळी पडल्यावर मात्र देशातील वातावरण आपण सगळे बघतच आहोत.
३) मी अमेरिकेत गेल्यानंतर मला भारतात सहजासहजी मिळणार नाहीत अशी अनेक पुस्तके विद्यापीठाच्या ग्रंथालयात वाचायला मिळाली आणि भारतात असताना पूर्वी कधिही बघितले नव्हते इतके ’फास्ट इंटरनेट कनेक्शन’ मिळाले. त्यामुळे मी आंतरजालावरील अनेक चर्चा व्यासपीठांमध्ये चर्चेत भाग घेतला आहे. अशाच एका चर्चेत माझ्या परिचयात अमेरिकेतील एक मराठी सद्गृहस्थ आले. त्यांना मी भेटलेलो नाही कारण ते माझ्यापासून बरेच लांब राहत होते. त्यांचा इस्लाम या विषयाचा खूपच अभ्यास आहे.त्यांनी प्रख्यात विचारवंत नोम चोम्स्की यांना लिहिलेल्या ई-मेलना स्वत: चोम्स्कींनी उत्तरे देऊन चर्चा केली आहे.हिंदुत्व या विषयावर इतकी तळमळ असलेली दुसरी व्यक्ती बघायला मिळणे अवघड आहे. त्यांच्याशी माझा ई-मेलवर संपर्क असतो. मी त्यांना मिसळपाववर येऊन सागरलहरींच्या चर्चेत भाग घेण्याविषयी विनंती करेन. पण ते स्वत: लिहितील की नाही याविषयी मी खात्री देऊ शकत नाही. ते जर मिसळपाववर आले तर ते सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.ते जर मिसळपाववर आले नाहीत तरी कोणाला इच्छा असेल तर माझ्याशी व्य.नि वर संपर्क साधावा.मी त्यांचे काही ई-मेल त्यांचे नाव आणि ई-मेल पत्ता न देता जरूर फॉरवर्ड करू शकेन.त्यांची हरकत नसेल तर त्यांचे नाव आणि ई-मेल पत्ता सुध्दा मी व्य. नि. ने देऊ शकेन. स्वत: नोम चोम्स्कींनी त्यांच्या ई-मेलची दखल घेऊन चर्चा केली म्हणजे त्यांच्या लिखाणातील मुद्देसूदपणा आणि प्रभावीपणा याची कल्पना येऊ शकेल.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
उत्तराबद्दल धन्यवाद. जर हिंदू राष्ट्र (किंवा फॉर द्याट म्याटर बौद्ध किंवा जैन किंवा शीख राष्ट्र) होऊनही आपल्या आता आहे त्याच राज्यघटनेनुसार कारभार चालणार असेल तर आपल्या राष्ट्राला काय लेबल लावले जाते याची मला फिकीर वाटत नाही.
दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?त्याविषयी नि:संदिग्ध उत्तर ती जमिन आम्हा हिंदूंची.मान्य आहे की आपल्या समाजात अनेक दुर्गुण आहेत पण हिंदू म्हणून म्हणवून घ्यायला आपल्याला लाज का वाटते?ज्या भूमीत वेदांची रचना झाली ती जमिन हिंदूंची नाहीतर कोणाची?
ह्याच जमिनीत बुद्धाचा जन्म झाला म्हणून ती बुद्धांची नाही का? ह्याच जमिनीत तीर्थंकरांचा जन्म झाला म्हणून ती जैनांची नाही का? ह्याच जमिनीत ग्रंथसाहिबाचा जन्म झाला म्हणून ती शीखांची नाही का?
आणि आता तिथे जे लोक राहत आहेत त्यांचे काय करायचे? काही लाख बांग्लादेशी भारतात आले म्हणून भारतात फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या आहेत. हे आख्खे देशच भारतात आले तर त्यांचे काय करायचे?
आम्ही तर असे ऐकले आहे की मानव सुसंस्कृत व धार्मिक वगैरे होईपर्यंत ही भारताच्या दक्षिण भागातली सर्व जमीन आदिवासींचीच होती. त्यांचा कोणताही धर्म नाही. (ट्रायबल म्हणूनच त्यांना ओळखले जाते) त्यांचे काय करायचे? [संदर्भः कातकरी विकास की विस्थापन]
अफजल गुरुला शिक्षा झालीच पाहिजे. मी तर म्हणतो गुन्हेगार कोणीही असो त्याचा जात धर्म विचारात न घेता शिक्षा झाली पाहिजे. बाबरी मशीद पाडण्यास जबाबदार असणारे लोक, मुंबईत स्फोट घडवणारा दाऊद, श्रीकृष्ण आयोगाने ठपका ठेवलेले दंगली भडकावण्याचे आरोप असणारे बाळ ठाकरे आणि अबू आझमी, ओरिसा, कर्नाटकात चर्चवर हल्ले करणारे लोक, श्रीलंकेतील दहशतवादावरून तामिळनाडूत दहशत पसरवणारे एलटीटीई, गुजरातमध्ये सरकारी दंगली करणारे नरेंद्र मोदी हे गुन्हेगार असतील तर सर्वांनाच शिक्षा ही झालीच पाहिजे.
आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे हिंदूंनी विज्ञान हा धर्म पाळावा म्हणजे भोंदूगिरी, अनावश्यक कर्मकांडे यांना कायमची रजा मिळावी.
संपूर्ण चर्चेत आणि लेखात हेच लाखमोलाचे वाक्य आहे. रामजन्मभूमी झाकी है, काशी मथुरा बाकी है वाले हे जेव्हा शिकतील तो सुदिन.
अर्थात सावरकरांनी हा उपदेश हिंदूंना केला आहे म्हणून त्यांनाच उद्देशून लिहिले आहे. गैरसमज नसावा.
लेख आणि त्यावरील चर्चा दोन्ही आवडले. स्पष्ट शब्दात मांडलेली परखड मते आणि त्यावरची सशक्त चर्चा दोन्ही गोष्टी मिपाकरांची मते प्रगल्भ होत असल्याची निदर्शक वाटतात.
एकच प्रश्न -
(फक्त नथुराम गोडसेचे कृत्य मनाला पटत नाही! गांधींसारख्या व्यक्तीला मारुन टाकणे हे सर्वथा गैर आहे. त्यामुळे ह्या लेखात त्याची भलावण झाली असे मला वाटते. मला वाटते ते बरोबर आहे का? आणि तसे असेल तर त्यामागची भूमिका काय आहे?)
चतुरंग
>> गांधींसारख्या व्यक्तीला मारुन टाकणे हे सर्वथा गैर आहे
मारुन टाकणे वाईट; पण जे झाले ते बरेच झाले म्हणायचे.
सतत आमरण उपोषणाच्या धमक्या देऊन एका व्यक्तीने राष्ट्रसमाजास किती वेळा ब्लॅकमेल करायला हवे होते ?
जो जो आसेतुहिमाचल पसरलेल्या भारताला आपला मानतो त्याचा हा देश आहे. तसे म्हटले तर पारशी लोक आताच्या इराणमधून भारतात आले. त्या अर्थी ते बाहेरून आले. पण ते या मातीत इतके मिसळून गेले की ते वेगळे आहेत असे वाटतच नाही. भारताच्या भूमीत त्यांच्यावर कसलीही सक्ती झाली नाही. तर त्या समाजातून जमशेदजी टाटा आणि इतर टाटा परिवारातील उद्योगपती, होमी भाभांसारखे वैज्ञानिक देशाला मिळाले.मुंबईतले बरेचसे पारशी लोक गुजराथी बोलतात.माझा जन्म ठाण्यातील आहे. एस.टी. कार्यशाळा परिसरात आमचे काही ओळखीचे लोक आहेत. त्यांच्या इमारतीत एक ज्यू कुटुंब राहते. तसेच मी ज्या मराठी शाळेत शिकलो त्या माझ्या शाळेतील वर्गात एक ज्यू मुलगा होता. इस्त्राएलच्या राज्यघटनेप्रमाणे जगातील कोणीही ज्यू तिथे जाऊन त्या देशाचा नागरिक म्हणून राहू शकतो. तरीही ते तिकडे गेले नाहीत.याचे कारण म्हणजे ’या देशाने आम्हाला इतके दिले आहे की त्या देशाला सोडून आम्हाला जावेसेच वाटत नाही’. जैन, बौध्द आणि शीख मंडळी ही इथलीच आहेत. अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच. भारत देश अशा सगळ्यांचा आहे. अशा लोकांनी झरत्रुष्टाची पूजा केली काय किंवा इतर कोणाची त्याचा काहीही संबंध नाही. म्हणणे एकच की या देशातील प्रत्येकाने ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत हे मान्य करावे कारण तीच मूळ हिंदू परंपरा आहे. आपलाच मार्ग योग्य हे म्हणणे वाईट आणि आपला मार्ग दुसरा पाळत नाही म्हणून त्याला ठार मारा हे म्हणणे तर त्याहूनही वाईट आणि त्याकारणासाठी खरोखर हत्या करणारे सर्वात वाईट.
अवांतर: बौध्द आणि जैन धर्माची स्थापना ही हिंदू धर्मातील पशुबळींसारख्या अनेक अनिष्ट रूढींच्या विरोधात झाली. तसेच सुरवातीच्या काळात शीखांमध्ये हिंदूंमधील कडवे लोक हिंदू धर्माचे मोंगलांपासून संरक्षण करायला सामील झाले होते. तेव्हा बौध्द, जैन आणि शीख हे हिंदूंपासून वेगळे धर्म आहेत असे पुन्हा पुन्हा ठासून सांगण्यामागे इंग्रजांचे ’डिव्हाईड आणि रूल’ हे धोरण तर नसेल?कारण हिंदू परंपरेत अगदी शैव-वैष्णवांपासून आनंदमार्गींपर्यंत असे कित्येक वेगळे पंथ-संप्रदाय आहेत. त्या सगळ्यांमध्ये थोडे फार फरक आहेतच.पण ते सर्व ’देवाकडे जायचे अनेक मार्ग आहेत. त्यातील आपल्याला पाहिजे तो मार्ग आपण निवडावा’ या सर्वात मूलगामी हिंदू परंपरेचे पालन करतात. मागे राजकारणाचा भाग म्हणून स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशननेही ’आम्ही हिंदू नाही’ असे म्हटलेच होते की!
मग भारत देश कोणाचा नाही (माझ्या मते)? जे आमच्या देवाला मानले नाहीत तर तुमच्या कत्तली करू किंवा असे करून जन्नतमध्ये जायला मिळेल असे मानणारे लोक. किंवा मूर्तीपूजकांचा नाश करणे आपले धर्मकर्तव्य आहे असे म्हणणारे लोक.मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या मुस्लिमांनी पाकिस्तान हया एक कलमी कार्यक्रमावर निवडणुका लढविणाया मुस्लीम लीगला मते दिली त्यांनी आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला होता आणि अशा लोकांचा भारत देश नक्कीच नाही.
मी स्वत:ला एक बुध्दिजीवी म्हणवतो आणि जे माझ्या बुध्दीला पटते तेच स्वीकारतो. मी स्वत: पूजापाठ किंवा इतर कर्मकांडे मानत नाही.पुण्यात गेली ९-१० महिने राहत असूनही मी दगडू शेठ गणपतीच्या दर्शनाला आजपर्यंत गेलेलो नाही.पण महाराजांचा लाडका सिंहगड बघायला मात्र जरूर गेलो.खरं सांगायचं तर सद्यस्वरूपातील गणेशोत्सवालाही माझा पाठिंबा नाही. किंबहुना देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. माझ्यासारख्या माणसाला अयोध्देत मंदिर झाले काय किंवा झाले नाही काय, फारसा फरक पडणार नाही. पण त्याच बरोबर मला एक गोष्ट माहित आहे की या देशातील जनता धार्मिक आहे.अन्यथा अगदी काळूबाईसारख्या जत्रेला लाखांची गर्दी झाली नसती.पंढरपूर आणि पुरीच्या जगन्नाथ यात्रेची तर बातच करू नका.मंगळवारी मुंबईच्या सिध्दीविनायकासमोर खूप मोठी लाईन असते याचीही मला कल्पना आहे.तेव्हा अशा जनतेसाठी राममंदिर पाडून बाबरी मशीद असणे म्हणजे त्यांच्या हक्कांवर गदा आणणे असे मला वाटते.तसेच बाबरासारख्या परकिय आक्रमकाने आमच्या देशातील मंदिर पाडून दुसरे काही उभारले हा सल मला आहे.मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देशात मंदिरे पाडून मशिदी अनेक ठिकाणी उभारल्या पण ती सर्व ठिकाणे परत मागण्याची गरज नाही. देशात शांतता हवी आहे ना मग आम्ही इतर सर्व ठिकाणांवरील हक्क सोडतो तुम्ही आम्हाला फक्त तीन ठिकाणे द्या. आम्हीपण तडजोड करतो तुम्हीपण करा असे म्हटले तर त्यात काय चुकले?तुमच्यासारख्या अयोध्दा आंदोलनावर टिका करणायांपैकी एकाने तरी मुस्लिमांना ’तुम्ही रामजन्मभूमीवरील हक्क सोडून द्या’ असे आवाहन केले आहे का? नाही ना? ते का? की अयोध्दा आंदोलनावर जो अधिक जहरी टिका करतो तो जास्त धर्मनिरपेक्षतावादी ठरतो म्हणून ही सर्व टिका आहे?
मागे मी इतिहासकार रामचंद्र गुहांना एक प्रश्न ई-मेलवर विचारला होता. हिंदू ऐकून घेतात म्हणून सर्व लोकांची लेक्चरबाजी चालते की त्यांनी प्रभू रामचंद्राच्या नावे अयोध्देतील नगरपालिकेचे ’बर्थ सर्टिफिकेट’ आणावे. पण अशी मंडळी येशु ख्रिस्ताचे बेथलेहेम नगरपालिकेचे बर्थ सर्टिफिकेट का मागत नाहीत? ’व्हर्जिन मेरी’ येशुला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणीच का विचारत नाही?ईस्टरच्या दिवशी येशूचे पुनरुथ्थान होऊन तो स्वर्गात गेला याला काय पुरावा आहे? तसेच महंमद पैगंबराला देवदूत गॅब्रिएलने मक्केजवळील गुहेत कुराण सांगितले याला काय पुरावा आहे? कशावरून श्रीनगरच्या हजरतबल मशिदीतील केस महंमद पैगंबराचाच आहे?हे सर्व प्रश्न कोणीच विचारत नाही कारण तो एक श्रध्देचा भाग आहे.पण हिंदूंनी म्हटले की तेथे रामाचा जन्म झाला होता तर मात्र तो श्रध्देचा भाग ठरत नाही तर त्याचे पुरावे मागितले जातात. हा दुजाभाव का? बोला, आहे काही उत्तर?रामचंद्र गुहांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचे टाळले होते. तुम्ही उत्तर देणार?
रामचंद्र गुहांना विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे समजा काही गुंडांनी तुमच्या घरावर हल्ला केला आणि तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीची मोडतोड केली आणि त्याजागी दुसरे काहीतरी उभारले. तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?जोपर्यंत तुमच्या प्रिय गोष्टीची स्थापना परत होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला टोचणार नाही?की ज्या पध्दतीने तुम्ही हिंदू समाजाला सांगता की रामजन्मभूमीवरील हक्क सोडावा त्याप्रमाणे तुम्ही ती गोष्ट सोडून देणार?आणि उद्या गुंडाने आणखी दुसरी गोष्ट तोडली तरी त्याचा विषाद तुम्हाला वाटणार की नाही?की आपले जे जे काही असेल ते सोडून द्यायची तुमची तयारी असणार?तसे नसेल तर हिंदू समाजाने सर्व काही सोडून द्यावे असे कोणत्या अधिकारात म्हणता?गुहांनी या प्रश्नाचे पण उत्तर दिले नाही. ते तुम्ही देणार?
स्वातंत्र्य मिळूनही इतक्या वर्षांनंतर रामजन्मभूमी मुक्त होत नाही आणि हिंदू ऐकून घेतात म्हणून नेहमी हिंदूंनाच लेक्चरबाजी करणे आणि अशा दुटप्पीपणामुळे हिंदू समाजाचा अंत पाहिला गेला. आंदोलनातील प्रत्येकाने मुस्लिम समाज सहकार्य करायला तयार असेल तर पंचक्रोशीबाहेर एक एक वीट नेऊन बाबरी मशिदीचे स्थलांतर केले जाईल असेही सांगितले पण तरीही त्याविषयीही कोणतेही सहकार्य झाले नाही. त्यातून रोष वाढत गेला आणि त्यातूनच बाबरी मशिद पडली. या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरेवर घाला घातला गेला हे तुणतुणे सतत वाजवायचे याला अर्थ नाही. कोणत्याही धर्मनिरपेक्षतावादी माणसाने मुस्लिम समाजाला सहकार्य करा असे का सांगितले नाही? आणि अजूनही अयोध्या, काशी आणि मथुरा आंदोलनाला लेक्चरबाजी करायची!
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांड घडले. हत्याकांड पूर्णपणे सुनियोजित होते हे स्पष्ट होते. जर का त्याचा एक पुरावा हवा असेल तर अग्नीशमन दलाच्या गाडया वेळेवर पोहोचू नयेत म्हणून रस्त्यावर अडथळे उभारले होते हा एक पुरावा पुरेसा आहे. इतर पुरावेही आहेत उदाहरणार्थ रेल्वे इंजिनचा व्हॅक्युम पंप तोडून गाडी थांबवली गेली.याचा अर्थ गाडी सिग्नलला उभी असताना कोणीतरी इंजिनखाली पटकन गेले आणि पंप तोडला म्हणजे गाडी हलू शकणार नाही असे म्हटले तर काय चुकले? एवढे पुरावे असूनही चहासाठीच्या सुटट्या पैशाच्या वादावरून गाडी पेटविण्यात आली असे निरनिराळे तर्क लढवले गेले. चहासाठीच्या असे कितीसे पैसे लागणार होते? दहा रुपये? वीस रुपये? त्याहून तर जास्त नाहीत ना. मग म्हणून ५८ लोकांना जाळून ठार मारणे समर्थनीय होते का? आणि सर्वात धक्कादायक म्हणजे २७ तारखेला सर्व दूरचित्रवाणीवरील न्यूज वाहिन्यांवर दुसर्या दिवशी सादर केल्या जाणार्या अर्थसंकल्पाविषयी चर्चा चालू होती. गोध्रा हत्याकांडाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. का? कारण मरणारे हिंदू होते म्हणून?कोल्हापुरच्या दैनिक पुढारीमध्ये १० मार्च २००२ रोजी (किंवा त्या आठवड्यातील रविवारी) बहार पुरवणीत यावर एक लेख प्रसिध्द झाला होता. त्यातही हाच मुद्दा मांडला होता. त्यातील काही वाक्ये आठवत आहेत तशीच इथे देतो: "मुस्लिमांच्या केसाला धक्का लागला तर आकाशपाताळ एक करणारे धर्मनिरपेक्षतावादी लोक गोध्रा हत्याकांडानंतर शांत होते जसे काही काही घडलेच नव्हते. अगदी २७ तारखेला गुजरात काही किरकोळ घटना वगळता शांत होता पण २८ तारखेला अहमदाबादमध्ये जळून कोळसा झालेली प्रेतं आणली तेव्हा किती भयंकर प्रकार झाला होता याची कल्पना सगळ्यांना आली.आणि ही घटना दूरवरील काश्मीरमध्ये नाही तर गुजरातमधील अहमदाबादपासून जवळच असलेल्या गोध्रामध्ये झाली होती. सर्वांनी हिंदूंच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले. आणि अशावेळी आता आपला वाली कोणी नाही तेव्हा घरी बसून मरण्यापेक्षा मारता मारता मरावे अशी धारणा झाली. गुजरातला जातीय दंगलींचा इतिहास आहेच. त्यातून संसदेवरील हल्ल्यामुळे मुस्लिम समाजाविरूध्द पार्श्वभूमी तयार झाली होती. त्यात गोध्रा हत्याकांडाची काडी लागली आणि दंगलीचा भडका उडाला". लेखातील सर्व काही मुद्दे देणे शक्य नाही. इच्छुकांनी शक्य झाल्यास तो लेख मुळातून वाचावा ही विनंती.
तेव्हा बाबरी मशिद पाडणे किंवा गुजरात दंगली यासारख्या दुर्दैवी घटनांना ही पार्श्वभूमी असते. तरीही धर्मनिरपेक्षतावाद्यांना हिंदूंना शिव्या घातल्या नाहीत तर चैनच पडत नाही. तेव्हा घातल्या नरेंद्र मोदींना शिव्या की आपण किती मोठे धर्मनिरपेक्ष हे सिध्द होते. सर्व दोषींना त्यांचा धर्म न बघता शिक्षा व्हावी हे एक तत्व म्हणून ठिक आहे. पण मुस्लिम समाजातील दोषींना बाबरी पाडणे इत्यादी अनेक पडद्यांमागे लपविले जाते आणि झोडपताना केवळ हिंदूंनाच का झोडपले का जाते? आणि अशा दुटप्पीपणामुळे हिंदूंमधील कट्टर मंडळींना आपोआपच लोकांचे समर्थन मिळते. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमागे हेच कारण आहे.
तेव्हा अनावश्यक कर्मकांडांना रजा द्यायच्या आड लोकांच्या श्रध्दांवर प्रहार करू नका ही विनंती. त्यातून तुम्हाला अपेक्षित असा बदल तर होणारच नाही तर त्याच्या बरोबर उलटा परिणाम होईल.
--- विल्यम जेफरसन क्लिंटन
चांगले मुद्दे.
जे जे धर्म इतर धर्मांचे असणे मान्य करतात आणि इतर धर्मियांना आपल्यात घेण्यासाठी बळजबरी-ब्रेमवॉशींग करत नाहित ते एकोप्याने नांदतात. भारताच्या भूमीवर असेच व्हावे. सर्वधर्मसमभाव हा धर्माचाच भाग असावा.
-- लिखाळ.
बांग्लादेश-पाकिस्तानमधील जमीन भारतात आल्यावर काय करायचे हे आपण सांगितलेच नाही. असो.
जो जो आसेतुहिमाचल पसरलेल्या भारताला आपला मानतो त्याचा हा देश आहे. तसे म्हटले तर पारशी लोक आताच्या इराणमधून भारतात आले. त्या अर्थी ते बाहेरून आले. पण ते या मातीत इतके मिसळून गेले की ते वेगळे आहेत असे वाटतच नाही.
हेच मत माझे इथल्या मुसलमानांबद्दल आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानमधून अनधिकृतपणे येणारे मुसलमान हे गुन्हेगार आहेत. त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्या. मात्र मुसलमान या मातीत मिसळून गेलेले नाहीत हे पटण्यासारखे नाही. मी अशा गावात वाढलो की जेथे हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मीयांची संख्या लक्षणीय असून कधीही दंगल झाली नाही. प्रत्येक गणेशोत्सवात मुसलमान लोक आनंदाने सहभागी होतात आणि हिंदू लोक शमादाराला नवस बोलतात. हा पाहा शमादाराचा फोटो.
भारताच्या भूमीत त्यांच्यावर कसलीही सक्ती झाली नाही. तर त्या समाजातून जमशेदजी टाटा आणि इतर टाटा परिवारातील उद्योगपती, होमी भाभांसारखे वैज्ञानिक देशाला मिळाले.मुंबईतले बरेचसे पारशी लोक गुजराथी बोलतात.
मुसलमानांनाही एपीजे अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ, अझीम प्रेमजींसारखे उद्योगपती दिलेले नाहीत का? कित्येक शास्त्रीय, फिल्मी गायक, कलाकार मुसलमान होते. आमच्या गावातले मुसलमान मराठी बोलतात. तामिळनाडूमधले तामिळ आणि केरळमधले मुसलमान मल्याळी भाषा बोलतात. गुजरातमधले मुसलमान जे फाळणीच्या काळात पाकिस्तानात गेले ते तिथेही गुजराती बोलतात.
जैन, बौध्द आणि शीख मंडळी ही इथलीच आहेत.
इथले मुसलमान बाहेरून आलेले नाहीत. त्यांनी काही कारणास्तव धर्म बदलला असेल पण त्यांची जीवनशैली भारतीयच आहे. अरबस्तानातील नाही.
अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच.
अर्थातच पण एकरूपतेपेक्षा आपले (म्हणजे माझ्यासकट सर्वांचे) लक्ष वेगळे काय दिसते याकडेच आहे.
भारत देश अशा सगळ्यांचा आहे. अशा लोकांनी झरत्रुष्टाची पूजा केली काय किंवा इतर कोणाची त्याचा काहीही संबंध नाही. म्हणणे एकच की या देशातील प्रत्येकाने ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत हे मान्य करावे कारण तीच मूळ हिंदू परंपरा आहे. आपलाच मार्ग योग्य हे म्हणणे वाईट आणि आपला मार्ग दुसरा पाळत नाही म्हणून त्याला ठार मारा हे म्हणणे तर त्याहूनही वाईट आणि त्याकारणासाठी खरोखर हत्या करणारे सर्वात वाईट.
हेच म्हणतो. किंबहुना मुसलमानांप्रमाणेच हिंदूंमधील शैव आणि वैष्णवांमध्ये अशा हत्या झाल्या आहेत. हिंदूंमध्येच तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना अगदी कालपरवा खैरलांजीपर्यंत जीवंत जाळले होते. हिंसा हे कोणत्याही एकाच धर्माचे व्यवच्छेदक लक्षण नाही. दुसऱ्याला हीन लेखून होणारी हिंसा वाईटच. मग ती हिंदूंची असो वा मुसलमानांची
अवांतर: बौध्द आणि जैन धर्माची स्थापना ही हिंदू धर्मातील पशुबळींसारख्या अनेक अनिष्ट रूढींच्या विरोधात झाली. तसेच सुरवातीच्या काळात शीखांमध्ये हिंदूंमधील कडवे लोक हिंदू धर्माचे मोंगलांपासून संरक्षण करायला सामील झाले होते. तेव्हा बौध्द, जैन आणि शीख हे हिंदूंपासून वेगळे धर्म आहेत असे पुन्हा पुन्हा ठासून सांगण्यामागे इंग्रजांचे ’डिव्हाईड आणि रूल’ हे धोरण तर नसेल?
हे इंग्रज सांगत नसून बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयच सांगत आहेत.
कारण हिंदू परंपरेत अगदी शैव-वैष्णवांपासून आनंदमार्गींपर्यंत असे कित्येक वेगळे पंथ-संप्रदाय आहेत. त्या सगळ्यांमध्ये थोडे फार फरक आहेतच.पण ते सर्व ’देवाकडे जायचे अनेक मार्ग आहेत. त्यातील आपल्याला पाहिजे तो मार्ग आपण निवडावा’ या सर्वात मूलगामी हिंदू परंपरेचे पालन करतात.
हेच म्हणतो.

हा टोला मला की सावरकरांना? प्रश्न हा आहे की सावरकरांनी विज्ञानवादी व्हा, कर्मकांड करू नका असे म्हटल्याचे तुम्ही सांगितले जे मला पूर्णपणे मान्य आहे. बाबरी मशीदाच्या मुद्दामध्ये कर्मकांड आहे, विज्ञानवाद आहे की स्वतःचा अहंकार शमविण्याचा कंड?
चटकन दिसले म्हणून लिहित आहे..
> हेच मत माझे इथल्या मुसलमानांबद्दल आहे. आजानुकर्ण
>>अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच. भारत देश अशा सगळ्यांचा आहे. >> क्लिंटन
आपण दोघे एकच म्हणालात.
-- लिखाळ.
येशु ख्रिस्ताचे बेथलेहेम नगरपालिकेचे बर्थ सर्टिफिकेट का मागत नाहीत? ’व्हर्जिन मेरी’ येशुला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणीच का विचारत नाही?ईस्टरच्या दिवशी येशूचे पुनरुथ्थान होऊन तो स्वर्गात गेला याला काय पुरावा आहे?
असे निव्वळ प्रश्नच नाही तर त्याची खिल्ली उडवलेली अनेक कार्यक्रमातुन टिव्हीवर मी बघीतलेली आहे. पाश्चात्य देशामध्ये कडवे ख्रिस्ती लोक भरपूर प्रमाणात असले तरी ख्रिस्ती धर्माची विटंबना वाटेल इतकी जाहीर खिल्ली उडवताना पाहिले आहे.
असो..
गोध्रा मध्ये जे घडले निश्चितच माणुसकिला काळिमा फासणारे होते. त्याचे समर्थन कुणीही केल्याचे पाहण्यात नाही. त्यातल्या 'अपराध्यांना' योग्य ते शासन झालेच पाहिजे, पण म्हणून गुजरात मधील आम जनतेला वेठीस धरुन भिषण मृत्यू देण्याचे जस्टीफाय होते का? सुक्या बरोबर ओले जळणारच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का? उद्या त्यातीलच एखादा जळलेला वा आपल्या कुटुंबीयांना डोळ्यासमोर जळताना बघीतलेला एखादा बुद्धीभ्रष्ट होउन कुठल्यही थराला जाऊ शकतो. इतका सारासार विचार देखिल आपण करु शकत नाही का? पाकिस्तानातुन आलेल्या भाडोत्री अतिरेक्यांना हत्यारे पैसा भरपुर मिळत असला तरी स्थानिक लोकांची साथ असल्या शिवाय इतका सुसज्ज हल्ला करता येणे शक्य नाही. त्यांना हे बुद्धीभ्रष्ट झालेले लोक आयते उपलब्ध कोण करुन देते?
गुजरातमध्ये जे अमानुष कृत्य घडले त्याचा ससंदर्भ रिपोर्ट इथे वाचा. तुम्ही ह्या हल्ल्यांचाही भ्याड हल्ले म्हणून निषेध कराल का? धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांची कत्तल करणारा जमाव एकाच जातीचा. भले तो बजरंग दलचा असो वा सिमीचा असो.
कुठलाही अतिरेक हा तितकाच वाईट असतो. हिंदू काय मुसलमान काय आणि ख्रिश्चन काय सगळ्यांचे कडवे नेते आज जगाला किती मोठी किंमत द्यायला लावत आहे हे रोज दिसत आहे. धर्मनिरपेक्षवादी मात्र ना इकडचे ना तिकडचे असल्याने दोन्ही कडून भरडले जातात. मुसलमानांना वाटत राहते की हे फक्त आम्हालाच धर्म निरपेक्षतेचे डोस देतात तर कडव्या हिंदुना वाटते आमचाच कडवेपणा ह्यांना दिसतो. दोन माणसांचे जोरात भांडण चालु असताना बर्याचदा सोडवायला आलेलाच मार खातो तशी काहीशी परिस्थिती
तेव्हा बाबरी मशिद पाडणे किंवा गुजरात दंगली यासारख्या दुर्दैवी घटनांना ही पार्श्वभूमी असते.
ह्याच तालावर ट्रेन ब्लास्ट करणे ताजमध्ये अतिरेकी घुसणे ह्या दुर्दैवी घटनांना पार्श्वभूमी असते असेही म्हणता येईल. हे तुमच्या लक्षात येत नाही का?पार्श्वभुम्या गेल्या गदर्भाच्या **त ह्या सर्व घटना निंदनीय आणि हीन आहेत. जिथे जिथे सामान्य माणसाला वेठीस धरण्यास कारणीभूत होणारी कोणतीही द्वेषमूलक विचारसरणी ही हीनच
कोणाही निरपराध माणसाच्या कत्तलीचे समर्थन करायचे नाही. गुजरात दंगली निषेधार्ह होत्या. गोध्रा हत्याकांडाचे समर्थन कोणी केले नसले तरी माझा आक्षेप आहे तो धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या ढोंगीपणावर. जर तुम्ही गोध्रा झालेच नाही अशा पध्दतीने गुजरात दंगलींचा मुद्दा वारंवार चघळणार असाल तर नरेंद्र मोदींना आयतीच संधी मिळते आणि ते पुढे काही घडलेच नाही या पध्दतीने गोध्राचा मुद्दा काढतात. आणि अमेरिकन व्हिसा प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत सांगितले होते की नरेंद्र मोदींविरूध्द आरोप असले तरी एकही आरोप सिध्द झालेला नाही म्हणून अमेरिकेचा मोदींना व्हिसा नाकारायचा निर्णय समर्थनीय नाही. आणि त्यांचाच काँग्रेस पक्ष मोदींवर शरसंधान करतो यावर माझा आक्षेप आहे.
अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यावरील (सप्टेंबर २००२) फ्रंटलाईन पाक्षिकातील एक वाक्य बघा-- "Terrorist acts like the one unleashed at Akshardham are futile and misguided; they are also tragically inevitable. Unless the Gujarat riot victims are able to see at least some hope of securing justice through the law and the democratic process, more such horrors will, without doubt, visit India." ( http://www.frontlineonnet.com/fl1921/stories/20021025007001200.htm ) जर अक्षरधाम मंदिर हल्ल्याला गुजरात दंगलींची पार्श्वभूमी असेल तर दंगलींना गोध्र्याची पार्श्वभूमी आहे. आणि असे करत मागे गेले तर सर्वप्रथम हल्ला ज्यांनी सुरू केला त्यांनाच जबाबदार धरले जावे. आणि आंतरजालावरील वेगवेगळे दुवे देण्यापूर्वी हा पण एक दुवा बघा " http://www.rediff.com/news/2003/oct/21franc.htm " तेव्हा हिंदूंना लेक्चरबाजी करू नका.
तेव्हा नरेंद्र मोदींसारखे कट्टर लोक पुढे येऊ नयेत असे वाटत असेल तर समस्येच्या मुळाशी जायला हवे. आजही आपण मुस्लिम समाजाने अयोध्येवरचा आपला दावा सोडावा असे म्हणत नाही. तो जर दावा त्यांनी सोडला आणि अशा काही इतर पावले उचलली तर दोन्ही समाजात असलेला वैरभाव नाहिसा होणार आहे निदान कमी तरी होणार आहे. देवबंदने दहशतवादाचा निषेध केला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण बाहेरून येणारे दहशतवादी सदाशिव पेठेमध्ये राहायला येत नाहीत. ते मुंब्रा किंवा नागपाड्याला जातात्.तेव्हा अशा संभावित दहशतवाद्यांविषयी एकदाही पोलिसांना माहिती का दिली गेली नाही?तसे होत नाही म्हणून सर्व प्रश्न आहेत. आपल्यापैकी कोणालाच पुराणातील वांगी उकरून काढण्यात रस नाही.औरंगजेबाने किंवा महंमद गझनीने काही केले म्हणून सद्यकालीन कोणालाही शिक्षा द्यायची नाही. पण तीच मनोवृत्ती पुढे चालू ठेवणार असतील तर मात्र प्रखर विरोध आहे. एक गोष्ट नक्की आहे की फाळणी त्यांनी मागितली आणि अनेक वर्षांपासून असलेल्या अविश्वासात भर पडली. तो अविश्वास दूर व्हावा म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे होते ती पाहिजे त्या प्रमाणात उचलली गेली नाहीत. उलट बीड, कोल्हापूर सारख्या ठिकाणांमधून दहशतवादी कारवायांमध्ये स्थानिकांची भरती झाली. अगदी १९ लाखांचे पॅकेज असलेली सुखवस्तू सॉफ्टवेअर इंजिनयर मंडळी मध्यंतरी पुण्यातून दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पकडली गेली. ती का? आणि आता प्लीज हिंदूंना उपदेशाचे डोस पाजू नका. वीट आला आहे या लेक्चरबाजीचा! इतर कोणीही अनेक महत्वाच्या गोष्टी विसरलं तरी हिटलरला शरमेने मान खाली घालायला लावतील अशी हिंदूंची हत्याकांडे झाली आहेत ती मला तरी विसरता येणे शक्य नाही. That's it. Period.
तसेच गणेशोत्सवात मुस्लिम आणि दर्ग्यांवरील उरूसांमध्ये हिंदू सामील होत असतील तर ती एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याचे स्वागत व्हायलाच पाहिजे.ते मुस्लिम नक्कीच आमच्या देशाशी एकरूप झालेले आहेत आणि ते आमच्यापैकीच एक आहेत. पण मुस्लीम लीगला मते देणारे नाही.मला वाटते याबद्दल मी माझा मुद्दा मांडला आहे.
सावरकरांनी स्वतः पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेवर कविता लिहिली होती. सहा सोनेरी पाने पुस्तकात ते सोमनाथ मंदिर पाडले त्याविषयी मोठ्या तळमळीने लिहितात. आणि तेच सावरकर म्हणतात की देवाने मला संकटातून बाहेर काढले तर मी सत्यनारायण करणे मूर्खपणाचे आहे कारण पहिल्यांदा तोच सत्यनारायण आपल्याला संकटात ढकलतो. तेव्हा वैयक्तिक जीवनात विज्ञाननिष्ठ असलेल्या सावरकरांनी लोकांच्या श्रध्दांवर प्रहार केला हे मला तरी पटत नाही. तेव्हा तो टोला सावरकरांना नक्कीच नव्हता. माझ्या दैवताला-- सावरकरांना टोला मारण्याऐवजी लकडी पूलावरून नदीत उडी मारणे मी पसंत करेन.
बाबरीसंदर्भातील माझी मते हा इतर कोणासाठी अहंकार सुखावणे असेल पण माझासाठी तो आपल्या राष्ट्राच्या अभिमानाचा प्रश्न आहे.
पाकिस्तान्-बांगलादेश भारतात आणून अखंड भारत परत बनविण्यासाठी इस्त्राएल जशी पॅलेस्टिनींना वागणूक देते तशी द्यावी लागली तरी चालेल पण ती जमिन आमची आहे हे आपण कधीही विसरू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
भारतात परत आणूच. तिबेट आणि सियाचेनही आणू. नेपाळ तर आपलाच - त्याला आधी घशात घालू. श्रीलंकाही आपलीच - रावण नाही का होता रामायणात... श्रीलंकेला खिशात घालू. द. आशियाई राष्ट्रेही आपलीच संपत्ती, त्यांनाही झोळीत घालू.
मग, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेकडे डोळे वळवूया.
माझा हा प्रथमच प्रतिसाद आहे तसेच पहिलेच लेखन (मिपवरिल सुद्धा) तरि समजुन घ्यावे हि विनन्ति..
शम्पदकिय प्रक्शोभक वाटन्याचे कारणच काय?
चिन मध्ये ओलिम्पिच च्य दर्म्यान झालेल्या तिबेटिन्वरिल अन्न्यायबाबत जगात फ़क्त नारजिचा सूर उमटल. पण चिन बद्दल वावगे बोलन्याचि कुनचिहि हिम्मत झलि नाहि कारन काय, तुम्हि आमचे मित्र आहत तोपरयन्त थिक. नहितर तटस्थ/त्रयस्थ रह, पन आमच्या शत्रुला प्रत्यक्श अप्रत्यक्श मदत करल तर तुम्हि सुद्धा शत्रुच आणि मग त्याचे परिणम भोगा.
झ्य राष्ट्राचा जन्मच मुळि भरतद्वेशावर झाला आहे त्यान्च्यकडुन चन्गल्या सम्भधंचि भाबडी अपेक्शा का करवि (पाकिस्तन्च्या एकाहि रश्त्र्प्रमुख भरत द्वेश/कश्मिर प्रश्नचि भलावण करुनच निवदुन्क जिन्कु शकतो हे कटु आसले तरि सत्य आहे.
कायद्यातिल फाशिच्या शिक्शेची तर्तूदच मुळि असा गुन्हा केल्यास जबर शिक्षा हौ शकते हा सन्देश समाजात पोहोचवा आणि समाजाने कायद्यचि चौकट पाळवि हा आहे.
बाकी जेश्ठ सदस्यांसमोर माज़े विचार मान्डावे वातले म्हणुन ह प्रतिसाद प्रपन्च.
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

नविन माहिती..
कायदा
आवडला
In reply to आवडला by यशोधरा
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद
In reply to आवडला by यशोधरा
अगदी हेच
In reply to आवडला by यशोधरा
असेच
वा!
आवडला
बोधप्रद लेख
एक नवी सुरूवात
In reply to एक नवी सुरूवात by सहज
+१
In reply to +१ by आनंदयात्री
+२
नव्या सुरवातीची सुरवात
उत्तम अग्रलेख
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
महत्वपुर्ण
नवीन कायदा
In reply to नवीन कायदा by अनामिक
लेख आवडला
अनामिक, खेड्यात शिक्षण फुकट आहे.
अग्रलेख
उत्तम लेख
उत्तम लेख.
धन्यवाद
उशिरा सुचलेले ....
हॅपी बर्थ डे
In reply to हॅपी बर्थ डे by कवटी
+१
In reply to +१ by ऋषिकेश
+२
In reply to +२ by अवलिया
+३
In reply to +३ by मदनबाण
+४
अचानक