कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??

राहुल करंजे's picture
राहुल करंजे in तंत्रजगत
22 Apr 2018 - 1:50 pm

नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

22 Apr 2018 - 2:23 pm | अभ्या..

हावो, मला पण सांगा.
शॉर्टलिस्टड टाटा टियागो डीझल एक्सझेड किंवा सेलेरिओ सीएनजी.
सीएनजी ची किफायत प्रचंड आवडली आहे पण सोलापुरात सीएनजी पम्प नाही आणि बरेच जण त्त्याचे तोटे सांगताहेत. पिकअप आणि पॉवर नसते, इंजिन घीसले जाते ल्युब्रिकेशन होत नाही म्हणून.

जेम्स वांड's picture

22 Apr 2018 - 7:46 pm | जेम्स वांड

गाडी सीएनजी मिळणार नाही बहुतेक, किंबहुना बाहेरून तिला सीएनजी किट लावून घेणे पण बेकायदेशीर असावे.

अभ्या..'s picture

22 Apr 2018 - 8:16 pm | अभ्या..

अपना डबल पासिंग है अभि.
१३ और १४.

जेम्स वांड's picture

22 Apr 2018 - 8:27 pm | जेम्स वांड

चालतंय! नाहीतर उगाच कलाकारांची गाडी सिझ होयाची..

Laughing smiley face Laughing smiley face

डिझेल गाडीच घ्या. CNG नको. बाकी मॉडेल तुम्ही ठरवा.

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2018 - 8:10 pm | टवाळ कार्टा

आठवड्यातून एकदाच दोनदाच चालवणार असाल तर डिझेलपेक्षा पेट्रोल कार घ्या....जवळपास 1.5 लाखाने स्वस्त असेल

अल्टो
सेलेरिओ
इंडिका
टीआगो
स्विफ्ट

हा माझा क्रम

गवि's picture

22 Apr 2018 - 8:24 pm | गवि

पण पुढे पहा:

मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते

त्रिकोण बराच मोठा आहे. म्हणून डिझेल चांगली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 May 2018 - 2:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

की मुद्दामच उल्लेख टाळलाय?

टवाळ कार्टा's picture

3 May 2018 - 11:10 pm | टवाळ कार्टा

ती तर ब्येश्ट आहे

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2018 - 9:10 pm | प्रसाद गोडबोले

जास्त ड्रायव्हिंग नसेल तर शक्यतो चार चाकी गाडी घेवुच नका . नसत्या कटकटी च फार होतात .

ट्रॅफिक सगळीकडेच झाल्याने शहरात कोठेही गाडी न्यायला नको वाटते . पार्किंगचे टेन्शन डोक्यात रहाते, शिवाय चिंधीचोर लोकं गाडीचा लोगो चुरुन नेतील की काय असाही विचार असतो. कोपर्‍यावर आर. टी . ओ. त्याचा न्याय्य हक्क वसुल करायला टपलेला असतो . आपल्याला कायदा नीट माहीत नसतो म्हणुन हे लोकं काहीही कारणं काढुन चिरिमिरी वसुल करतात. लायसन्स गाडीची कागदपत्रे इन्शुरन्स पीयुसी ह्यातील एक लायसन्स सोडला तर काहीच ओरीजीनल सोबत बाळगणे कायद्याने सक्तीचे नाही, आर.टी.ओ. ने रीतसर नोटीस दिली तर ते १५ दिवसांच्या मुदतीत जमा करायचे असते ! पण हे लोकं आपल्याला हा नियम सांगत नाहीत , सांगितला तरी आपण त्या भानगडीत पडायला नको म्हणुन २००-५०० ची चिरीमिरी लाऊन सुटतो ( पण आपल्या मनातील चु आणि बाळबोध देशप्रेमी किडा कुठेतरी "आपण लाच दिली " म्हणुन आपल्या मनाला चावत रहातो. )

टोलबुथवर वट्ट टोल वसुल करतात पण त्याच्या पुढेच गेल्यावर रस्त्याचे काम चालु असल्याने सगळं धन्य असतं . मला ३ वर्षात पुणे ते सातारा ह्या रस्त्यावर एकदाही " डायव्हर्जन / खड्डे नाहीत" असे दिसले नाहीये ! उजव्या लेन मधुन चालणार्‍या ट्रकांवर कारवाई करत नाहीत पण छोट्या गाड्यांवर काहीही शुल्लक कारण लाऊन परत चिरीमिरी !

गाडीच्या इन्शुरन्स काढतना इन्शुरन्स कंपन्या वाढीव आकडे सांगतात . इन्शुरन्स कंपनी देखील एक व्यापारी कंपनी आहे आणि त्यांच्याशी बारगेनिंग करता येते हे दिव्य ज्ञान मला प्राप्त जाल्यावर मी दोन वर्ष इन्शुरन्स प्रीमीयियम जवळपस २०-ते ३०% कमी करुन घेतला. ( तरीही जात्स्च भरला असे मला वाटते) , इन्शुरन्स क्लेम करताना मात्र तो नाकारायला ह्या कंपन्यांकडे खंडीभर कारणे असतात !

तसाच प्रकार गाडीच्या मेन्टेन्अन्स बाबतीत. पहिल्या ३-५ सर्व्हिसेस फ्री हे धाधांत असत्य आहे, धडधडीत खोटारडेपणा आहे! आपल्याला त्या गाडीच्या मेकॅनिकल अ‍ॅस्पेक्ट्स माहीत नसतात त्यामुळे काहीही कारणे दाखवुन हे लोकं पैसे उकळतात . मला पहिल्या सरव्हिसिंग्ला जेवढे लेवर चार्जेज लावलेले त्याच्या तिप्पट लेबर चार्जेस तिसर्‍या सरव्हिसिंग ला लावलेले , सेम काम असताना देखील ! " जर्मन गाडी म्हणुन जर्मनीवरुन बोलावलेत काय मेकॅनिक ?" असं म्हणुन मॅनेजरशी बोलाल्याशिवाय एक पैसा देणार नाही असं सांगितलं तेव्हा मेकॅनिक " काहीतरी चुक झालीय साहेव कॅल्युलेशन मध्ये दुरुस्त करुन आणतो" असे म्हणुन बिल करेक्ट करुन आला ! माझ्याकडे पहिल्या सरव्हिसिंग चे बिल नसते तर त्याने वट्ट पैसे उकळले असते. आणि हे सारं झालं पैशाच्या बाबतीत , काम खरंच तेवढे करत असतील का ही शंकाच आहे !

पुण्यातील पंक्चर वाल्यांचे फ्रॉड तर जगप्रसिध्द आहेच ! लोकं शे पाचशे रुपायांसाठी इतका खोटारडेपणा इतकी अनैतिकता करायला तयार होतात हे पाहुन माझ्या मनातील जोकर हसतो , उद्या कधी पुण्याचे गॉथम करायचे झाल्यास रिक्रुटमेन्ट करणे जास्त अवघड जाणार नाही !

सो नेट नेट जर ड्रायव्हिंग कमी असेल तर शहरातील प्रवासाकरिता ओला / उबर / रिक्षा परवडते , लांबचा प्रवास असल्यास गाडी भाड्याने घेणे परवडते , शिवाय आपल्याला चालवायचे काम करावे लागत नाही ! शिवाय एकाला रोजगार दिल्याचे पुण्य मिळते हा बोनस !

आर्थिक बाजुने पाहिल्यास
गाडीची किंमत + सरकारी टॅक्सेस + पेट्रोलखर्च + इन्शुरन्स + मेन्टेनस+ पीयुसी+ चिरीमिरी + टोल+ पार्किंग चार्जेस - गाडीची रीसेल किंमत असे गाडीचे वॅलुएशन केल्यास मला गाडी तब्बल २०रु प्रतिकिलोमीटर पडली ! ( ह्या कॅल्क्युलेशन मध्ये कोठेही टाईम वॅल्यु ऑफ मनी चा विचार केलेला नाही , तो केल्यास तर २५ रुपये पर किलोमीटर च्या वर जाईल ! )

थोडक्यात काय तर तात्पर्य म्हणजे तुमचे ड्रायव्हिंग जास्त नसेल तर गाडी घेणे परवतत नाही . माझा मते गाडी घेण्यासाठी तुमचे ड्रायव्हिंग ३ वर्षात किमान १ लाख
ते दीडलाख किलोमीटर अर्थात दरमहिन्याला ३००० ते ४००० व्हायला पहिजे , त्यापेक्क्षा कमी ड्रायव्हिंग असल्यास गाडी रेंट करणे सोयीस्कर , गाडी घेवुन नसते सव्यापसव्य करण्यात काहीही हशील नाही !!

-
मार्कस ऑरेलियस

अभ्यासनीय. आणि विचार करणेबल सल्ला !
माझाही अनुभव थोडाफार असाच आहे. पण रोजचे ७०-८० रनिंग आणि टाईम शेड्यूल जाम टाईट त्यामुळे पर्याय नाही :(

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 9:26 am | सुबोध खरे

हे आपले तर्कशास्त्र आर्थिक बाबतीत अगदी अचूक आहे. पण हे त्यांच्या सौ ना पटेल काय?
स्वतःची गाडी असावी. कारण आपली प्रतिष्ठा त्याच्याशी निगडित असते. हा सर्व सामान्य विचार असतो.
स्त्रिया भावनिकतेने विचार करतात.

माझी पेट्रोल इंडिका ११ वर्षे झाली तरी मी बदलली नाही( कारण ११ वर्षात ४०,००० किमी सुद्धा झालेले नाहीत)
पण बायकोची एक दिवस आड भुणभुण चालूच असते गाडी केंव्हा बदलायची. गाडी जुनी झाली आहे म्हणून. मी तिला सांगतो "मी पण" जुना झालो आहे. पाहिजे तर बदलून घे.
लग्नाला २५ वर्षे झाली आहेत त्यामुळे बायकोकडे दुर्लक्ष कसे करायचे तेही मी चांगला शिकलो आहे.

संजय पाटिल's picture

23 Apr 2018 - 10:17 am | संजय पाटिल

लग्नाला २५ वर्षे झाली आहेत त्यामुळे बायकोकडे दुर्लक्ष कसे करायचे तेही मी चांगला शिकलो आहे.
थोडं सविस्तर सांगितलत तर बर्‍याच जणांना उपयोग होईल...

मी तिला सांगतो "मी पण" जुना झालो आहे.

अगदी पटलं. तुमच्या सौ. फक्त विनंती (तुमच्या शब्दात भुणभुण) करतात आणि प्रत्यक्ष निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता, याचा अर्थ तुमचा काळ लै जुनाच झाला की.. ;-)

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 11:31 am | सुबोध खरे

मी बायकोला सान्गतो तू गाडी चालवणार असशील तरच नवी गाडी घ्यायची. ती फारच गरज पडली तर गाडी चालवते त्यामुळे हे झेंगट गळ्यात अडकवण्यास ती तयार नाही.
बाकी माझी गाडी बाहेरून थोडीशी गंजायला लागली आहे एवढे सोडले तर काहीच प्रश्न नाही. १५ दिवस बंद असली तरी एकद चावी फिरवली तरी चालू होते. एप्रिलच्या गर्मीतहि पाच मिनिटात गाडी थन्ड होते असा ए सी आहे. आणि त्याचे सस्पेन्शन अजूनही उत्तम आहे. ऍव्हरेज शहारत १२ आणि महामार्गावर १७ पर्यंत मिळतंय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे येणारे रुग्ण माझी पदवी पाहून येतात माझी गाडी पाहून नाही. त्यामुळे नवीन गाडी घ्यावी यासाठी असा कोणताही सज्जड मुद्दा नाही.
मुंबई ठाण्यात कुठेही फिरण्यासाठी मी ओला उबर वापरतो. स्वतःच्या गाडी पेक्षा १००-१५० रुपयेच महाग पडते पण पार्किंग शोधणे आणि गाडी कुठेही उभी केली तर तिला चिंता लावला जाईल किंवा उचलून नेली जाईल याची भीती नाही.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ऑटो बाहन (autobahn) वर गाडी चालवायला जन्माला आलो आहोत असे समजणारे दुचाकी चालक, आपल्या सासर्यांनी आपल्याला लग्नात रास्ता आंदण दिला आहे असे समजणारे चारचाकी चालक आणि आपल्या तीर्थरुपांनी आपल्याला पिढीजाद मालमत्ता दिली आहे असे समजणारे पायी चालणारे लोक यातून रस्ता काढून गाडी चालवायचे मानसिक आणि शारीरिक कष्ट वाचतात. याचीकिंमत पैशात करता येणार नाही.

अभिजीत अवलिया's picture

23 Apr 2018 - 7:59 pm | अभिजीत अवलिया

कारला ११ वर्षे झालीत म्हणजे लवकरच तुम्हाला नवी कार घ्यावीच लागेल. कारण १५ वर्षे झाली की रेजिस्ट्रेशन रद्द होते. पुन्हा वाढीव रोड टॅक्स देऊन आणि फिटनेस टेस्ट पास करून गाडी वापरण्यापेक्षा स्क्रॅप करणे योग्य होईल. त्यातच केंद्र सरकारने सर्व जुन्या वाहनांना देखील १ एप्रिल २०१९ पासून एअर बॅग आणि ABS अनिवार्य केले आहे. तुमच्या जुन्या गाडीत ते नसेल तर पूर्ण डॅशबोर्ड बदलून ते बसवावे लागेल तो खर्च वेगळाच.
बाकी तुम्ही मुंबईत राहता त्यामुळे तुमची स्थिती खूपच बरी म्हणावी लागेल. गर्दीने रस्ते ओसंडून वाहणाऱ्या बेशिस्त पुण्यात रोज गाडी चालवून माझा स्वभाव चिडचिडा होऊ लागला आहे असे वाटतेय. १५ दिवसापूर्वी तर दोन गृहस्थ (त्यांची स्थिती बघून पूर्ण ढोसलेली दिसत होती) एकमेकांशी मस्ती करत जात होते. मी त्यांच्या जवळ पोचतच होतो तर एकाने दुसऱ्याला सरळ ढकलुनच दिले. तो आला सरळ माझ्या गाडीसमोर. माझ्याकडे विचार करायला एक सेकंद पण न्हवता. ब्रेक मारून पण त्याला धडकणे टाळता आले नसते. धडकलो असतो तर तो १००% मेला असता. मागून दुसरी कोणतीही गाडी येत न्हवती त्यामुळे अक्षरश: भयानक कट मारून त्याला वाचवला.

असो. आता मुद्द्याचे बोलायचे तर,
@राहुल करंजे साहेब,
तुमचे बजेट तुम्ही सांगितलेले नाही. पण कमी म्हणजे ५ लाख समजले तर टाटा टिआगो पेट्रोलचा विचार करावा असे सुचवेन. किंवा रनिंग जास्त असेल (महिना १५०० किमी पेक्षा जास्त) तर डिझेल गाडी घ्यावी. तुमचे लॉन्ग ड्राईव्ह असते त्यामुळे CNG वगैरेंच्या भानगडीत तर पडूच नये. पूर्ण डिकी ते CNG किट खाऊन टाकेल. मुंबई पुणे सोडले तर अन्य ठिकाणी CNG तितकासा सहज उपलब्ध होतो का हा देखील एक प्रश्न आहेच.

प्रसाद गोडबोले's picture

23 Apr 2018 - 9:03 pm | प्रसाद गोडबोले

गर्दीने रस्ते ओसंडून वाहणाऱ्या बेशिस्त पुण्यात रोज गाडी चालवून माझा स्वभाव चिडचिडा होऊ लागला आहे असे वाटतेय.

संपुर्ण अनुमोदन ! स्वतःची गाडी असली की मनस्ताप होतो हेच जर बस मध्ये असलो किंव्वा ऑफीसच्या कॅब मध्ये असलो तर बसखाली येवुन कोणी मेलं तरी आपल्याला फरक पडणार नाही ! कॅबमध्ये देखील आपण अलिप्त राहु शकतो ! अ‍ॅक्सीडेन्ट झालच तरी आप्ल्यावर रिस्क नाही !
अलिप्तपण महत्वाचे . बस मध्ये बसलो कि निवांत डोळे मिटुन घ्यावेत . मग आता टृअ‍ॅफिक लागो , की अ‍ॅक्सीडेन्ट होवो कि पोलिसाने थांबवो , किंव्वा गाडीला स्कॅच पडो किंव्वा कोणी ठोको , काय वाट्तेल ते होववो, आपल्याला घेणेदेणे नाही ! कानात इयरफोन लाऊन बारावा अध्याय ऐकायला सुरुवात करावी ...

एर्‍हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां ।
रथु काई खटपटा । करितु असे ? ॥ १२२ ॥

नाखु's picture

23 Apr 2018 - 9:14 pm | नाखु

हा सल्ला महिन्यांपूर्वी दिला असता तर माझे चार पैशे वाचले असते की रे !!!!

वाहन आहे पण मुदलात गंडलेला नाखु पांढरपेशा

गाडी वापरण्यापेक्षा स्क्रॅप करणे योग्य होईल.

गाडी कबाड म्हणून विकताना खूप खबरदारी घ्यावी लागते नाहीतर स्क्रॅप म्हणून विकलेली गाडी कुठे यूपी बिहारात पाठवून वापरायला घेतली आणि तिकडे काही लोच्या झाला तर मूळ मालक गोत्यात येतो. विकण्यापूर्वी ईंजिन आणि आणखी एक जागी वेल्ड केलेली नंबराची पट्टी काढवून घेऊन ती आरटीओत जमा करणे वगैरे प्रकार असतात असे ऐकले आहे. कृपया याविषयी तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन करावे.

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2018 - 3:08 pm | टवाळ कार्टा

"मी तिला सांगतो "मी पण" जुना झालो आहे. पाहिजे तर बदलून घे." याच्यापुढे "हे वाक्य स्वतःच्या जबाबदारीवर वापरावे" असा वैधानिक इशारा पण लिहा की =))

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:13 pm | सुबोध खरे

ट का शेट
लग्नाला २५ वर्षे झाली कि तुम्हाला महित असतं कि आपल्याला हिच्यापेक्षा चांगली मिळणें कठीण आहे.

आणि बायकोला माहिती असतं कि २५ वर्षे प्रशिक्षण देऊन तयार केलेला नवरा सोडून नवीन नवरा शोधून त्याला "परत प्रशिक्षण देऊन तयार करायचं" कर्म कठीण आहे त्यापेक्षा आहे तोच "चालवून घेणं" जास्त सोपं असतंय.

शिवाय you cant teach old dog new tricks.

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:15 pm | सुबोध खरे

बायका हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून वटसावित्रीचं व्रत करतात त्याचे गमकहि हेच आहे.
"नवऱ्यावर प्रेम वगैरे" सगळं मुलामा असतो.

अतिशय उत्तम प्रतिसाद.

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2018 - 3:06 pm | टवाळ कार्टा

पर किलोमिटर खर्च कसा शोधला त्याची एक्ष्चेल मिळेल का?

सचिन बोकिल's picture

13 Jun 2018 - 12:04 am | सचिन बोकिल

मार्कस...खरं आहे तुमचं म्हणणं ... डोक्याला फालतू ताप असतो

गणामास्तर's picture

23 Apr 2018 - 1:42 pm | गणामास्तर

सगळ्यात पहिल्यांदा एक ठरवा कि गाडी गरज म्हणून घेत आहात कि हौस म्हणून.रोजच्या रोज शहरातच फिरत असाल आणि बाहेरचे रनिंग जास्त नसेल तरच सीएनजी गाडी परवडेल.
सीएनजी गाडीला पीक अप आणि पॉवर मिळणार नाही इतकाच प्रॉब्लेम आहे बाकी इंजिन त्रास देते वगैरे सगळ्या भपाऱ्या आहेत.
पण जसे तुम्ही म्हणालात कि तुम्हाला पर्यटन आणि लॉंग ड्राईव्ह साठी गाडी हवीये तेव्हा डिझेल वा पेट्रोल गाडीचं घेतलेली उत्तम. पर्यटनासाठी फिरताना बूट स्पेस वापरायला मिळणे फार महत्वाचे ठरते जी तुम्हाला सीएनजी कारमध्ये मिळणार नाही. मी हायवेवर आणि लॉंग ड्राईव्हसाठी डिझेल गाडी सुचवेन.
स्वस्तात मस्त डिझेल कार हवी असेल तर टाटा टियागो चांगला पर्याय आहे ,बाकी बजेट वाढवाल तसे खूप पर्याय पण वाढतील.
लॉंग ड्राईव्ह आणि पर्यटनासाठी तुम्ही भाड्याच्या गाड्या वापरल्या तर प्रति किमी पैसे + हॉल्ट + पार्किंग चार्जेस + टोल हे सगळे पैसे तुम्हाला द्यावेच लागतात.
कुठलीही गाडी घ्यायच्या आधी भरपूर चौकशी करा , टेस्ट ड्राईव्ह घ्या, नेटवर रिव्ह्यूज वाचा आणि मनातल्या सगळ्या शंकांचे निरसन करून मगच बुक करा. पण एकदा कार घेतली कि परत तिचा प्रति किमी कितीला पडली हा हिशोब करत बसू नका. यांच्याऐवजी कॅब परवडली असती वगैरे विचार तर मनात येऊ पण देऊ नका. शेवटी कार हि एक सोयीची गोष्ट पण आहे आणि त्यासाठी आपण चार पैसे मोजतोय असे गृहीत धरून चाला.

(फुकटचा सल्ला : तुम्ही दाढी केल्यावर ब्लेडच्या पाकिटावर तारीख नोंदवून ठेवणाऱ्यातले नसाल तर बिनधास्त डिझेल कार घेऊन टाका :) )

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 2:03 pm | सुबोध खरे

कार हि एक सोयीची गोष्ट
हे खरं असलं तरी आज झुमकार सारखे पर्याय उपलब्ध आहेत आणि मी ते वापरून पाहिले आहेत.
मागच्या वर्षी ६ ऑक्टोबर ते ९ कोटोबर या कालावधीत मी कोडाईकॅनालला गेलो होतो (लग्नाला २५ वर्षे झाल्याबद्दल साजरे करण्यासाठी). मुंबई कोईमतूर विमानाने गेल्यावर विमानतळाच्या बाहेर मी झूम कार ताब्यात घेतली ६ महिने जुनी डिझेल स्विफ्ट.
चार दिवस माझ्याकडे ती कार होती कोईमतूर विमानतळ ते कोईमतूर विमानतळ यात ३२० किमी पर्यंतचे डिझेल फुकट (८० किमी रोज) केवळ दोघेच या जवळ जवळ कोऱ्या कार मध्ये होतो. एकंदर खर्च रुपये ६२००/- फक्त. हा पर्याय आता मुंबई पुणे सारख्या शहरात उपलब्ध आहे.
आता च चेक केलं मुंबईत ४ दिवस २४ ते २७ एप्रिल ४१० किमी मारुती स्विफ्ट साठी रुपये ६१५० फक्त ज्यात ४१० किमी मोफत. वरच्या एका किमी ला १२ रुपये.
तेंव्हा बाहेर घेऊन जायची सोय आहे हे पण कारण आता रद्दबातल ठरते. स्वतःची कार हवी आणि चालवायची हौस आहे एवढे कारण कार विकत घेण्यासाठी पुरे. बाकी सर्व कारणे उपयोगी नाहीत.

गणामास्तर's picture

23 Apr 2018 - 2:21 pm | गणामास्तर

तेंव्हा बाहेर घेऊन जायची सोय आहे हे पण कारण आता रद्दबातल ठरते. स्वतःची कार हवी आणि चालवायची हौस आहे एवढे कारण कार विकत घेण्यासाठी पुरे. बाकी सर्व कारणे उपयोगी नाहीत.
म्हणूनच माझ्या प्रतिसादात पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं कि कार गरज म्हणून घेत आहात कि हौस ते ठरवा. परंतु बाकीची कारणे उपयोगी नाहीतच असे म्हणता येत नाही.
बाकी झुमकार वगैरे सगळं ठीक आहे पण ते प्रत्येकासाठी सोयीचे आहे असे वाटत नाही,वाटल्यास त्यांच्या अटी सविस्तर वाचून पाहा.
तुम्ही २५ वर्षातून एकदा ४ दिवसांसाठी ३२० किमी कार वापरणार असाल तर खचितच तुम्ही नवीन कार घेणे योग्य नाही.
पण मग आमच्यासारख्या वर्षाला चाळीसेक हजार रनिंग करणाऱ्यांनी काय करायचं ?

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2018 - 9:15 pm | कानडाऊ योगेशु

झूम कारचा सध्या मला वाईट अनुभव आला आहे. डिल संपल्यानंतर दोन दिव्सांनी १० हजार रू. डॅमेज चार्जेस लावले गेले आहेत. सध्या फोनाफोनी चालु आहे. पण नसता मनस्ताप गळ्यात पडला आहे. कुणाला ह्यातुन कसा मार्ग काढावा ह्याबाबत काही अनुभव आहे काय?

डोके.डी.डी.'s picture

28 Apr 2018 - 10:58 am | डोके.डी.डी.

मी सध्या फलटण ला नोकरी करत आहे. वर्षातून 5 ते 6 वेला गावी जाणे येणे होते. महिन्याला रनिंग 400 किमी होईल. मीही 5 लाखाच्या आत गाडी घेण्याचा विचार करत होतो. पण या चर्चा बघून घेऊ नये असे वाटत आहे.

अभ्या..'s picture

28 Apr 2018 - 11:27 am | अभ्या..

हा ना राव, मारक्याचे आणि सुबोध सरांचे प्रतिसाद वाचून माझीही चलबिचल होतेय. गाडी नकोच असा माईंडसेट बनत आहे.

अभ्या..'s picture

28 Apr 2018 - 11:32 am | अभ्या..

हा ना राव, मारक्याचे आणि सुबोध सरांचे प्रतिसाद वाचून माझीही चलबिचल होतेय. गाडी नकोच असा माईंडसेट बनत आहे.

तसाच हिशोब करत बसलं तर स्वतःच्या घराऐवजी भाड्याचं घर, घरी स्वैपाकाऐवजी खानावळीचा डबा, घरच्या बागेऐवजी बदलत्या रेंटल कुण्ड्या, लैंडलाइन फोनऐवजी लागेल तेव्हा बाहेर जाऊन पब्लिक फोन (असतो का हल्ली ?!), असं बरंच किफायतशीर आणि लॉजिकली करेक्ट* जगता येईल.

* योग्य चॉइस केल्यास वरील सर्व गोष्टी घरी करण्यापेक्षा बाहेरुन भाड़ेतत्वावर घेतल्यास लॉन्ग टर्ममधे स्वस्त आणि कमी व्यापाच्या असतात असं कागदावर मांडून सांगता येईल.

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2018 - 10:35 pm | प्रसाद गोडबोले

हा ना राव, मारक्याचे आणि सुबोध सरांचे प्रतिसाद वाचून माझीही चलबिचल होतेय. गाडी नकोच असा माईंडसेट बनत आहे.

ख्या खया ख्या !

अभ्याशेठ , तुम्ही डॉक्टरांचे आणि गणामास्तरांचे ऐका , हौस म्हणुन गाडी घेत असाल तर जरुर घ्या कारण डॉक्टर म्हणाले तसे हौसेला मोल नाही . गाडी च्या निमित्तामुळे आनंद होत नाही असे नाही , फक्त माझ्या लेखी त्यासाठी घ्यावा लागणारा उपद्व्याप वर्थ नाहीये इतकेच !

तुम्ही गाडी घ्या , आम्ही आनंदाने तुमच्या आनंदात सहभागी होवु !

माझे मत अत्यंत वैयक्तिक आहे, मी गाडी नको म्हणतोय कारण मला आता कोणतेच सव्यापसव्य, नसत्या कटकटी नको वाटतात . दुष्काळ संपल्यावर , सुगीचे दिवस आल्यावर तुकोबांनी आपल्या वाटणीची कर्जाची कागदपत्रे , अर्धी खते इंद्रायणीत का बुडवली हे मी आता "समजु" शकतो ! आधीही कळत होते , आता वळायलाही लागले आहे इतकेच ! :)

सुबोध खरे's picture

28 Apr 2018 - 12:48 pm | सुबोध खरे

कार आपण हौस म्हणून घेऊ शकता कारण हौसेला मोल नाही.
अन्यथा ५ लाखाची गाडी घेतली तर महिना १२,०००/- हप्ता ( विम्याची रक्कम धरून) पाच वर्षासाठी होईल. म्हणजे एकंदरीत ७ लाख २० हजार.
पाच रुपये किमी(१६ ऍव्हरेज) प्रमाणे ४०० किमी चे महिन्याला २००० रुपये अधिक. म्हणजे एकंदर २४००० किमी ला १ लाख २० हजार अधिक.
एकंदर हिशेब केलात तर २४००० किमी ला ८ लाख ४० हजार रुपये येतात. म्हणजे ३५ रुपये प्रति किमी ला. बाकी येणारा मेंटेनन्सचा खर्च धरलेला नाही. (यात ४ वर्षात एकदा बॅटरी बदलायला लागते).
पहा हिशेब करून

सुबोध खरे's picture

28 Apr 2018 - 12:39 pm | सुबोध खरे

* योग्य चॉइस केल्यास वरील सर्व गोष्टी घरी करण्यापेक्षा बाहेरुन भाड़ेतत्वावर घेतल्यास लॉन्ग टर्ममधे स्वस्त आणि कमी व्यापाच्या असतात असं कागदावर मांडून सांगता येईल.
अतिशय चुकीची तुलना आहे.
महिन्याला रनींग ४०० किमी असेल तर ताशी ४० किमी वेगाने आपण फक्त १० तास कार मध्ये असाल. त्यात चालवण्याचे कष्ट, पेट्रोलचा खर्च आणि विम्याचा हप्ता मिळवला तर ती गोष्ट नक्कीच किफायतशीर नाही.
राहत्या घराची गोष्ट संपूर्णपणे वेगळी आहे.
मी सध्या माझे दोन बेडरूमचे (५६० चौ फूट) घर भाड्याने देऊन ३ बेडरूमच्या प्रशस्त घरात (११५० चौ फूट) भाड्याने राहत आहे. दोन वर्षांपूर्वी मी प्रथम ज्या घरात भाड्याने गेलो तेंव्हा त्या घराच्या मालकाची दुबईतील नोकरी गेली. त्यामुळे मला तडकाफडकी घर रिकामे करून (आताचे) नवे घर शोधावे लागले. भाड्याच्या घरात आपल्या सोयीचे फर्निचर सजावट काहीही करता येत नाही आणि अशी डेमोक्लीसची तलवार टांगती राहतेच. हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने आता मी स्वतःचे घर घेण्याचे ठरवले आहे.
भाड्याच्या कार बद्दल अशी स्थिती येत नाही.
खानावळीचा डबा हा "तुमच्या चवीचा" कधीच नसतो. मला आईच्याच हातच्या पोळ्या लागतात असा भावनात्मक विचार करणारा मी नाही परंतु लष्करात २३ वर्षे घालवल्यावर घरचं जेवण काय याची किंमत मला नक्कीच चांगली समजली आहे.
लँडलाईन पेक्षा बाहेरचा फोन हा अतिशय त्रासदायक ठरू शकतो विशेषतः आडवेळेस.
हि तुलना ओला उबर यायच्या अगोदर कदाचित बरोबर ठरली असती. पण सध्या बोलावल्यावर ३-५ मिनिटात ओला उबर येत असल्याने आणि शहरी वाहतूक अधिकच जटिल होत असल्याने स्वतःची कार न घेता नक्कीच चालू शकेल. पण इतर तुलना अस्थानी आहेत.

अभ्या..'s picture

28 Apr 2018 - 2:16 pm | अभ्या..

हिशोब तर करणाच पडेगा,
पण सुबोध सर, एक अजून इस्शू आहे तो म्हणजे कम्फर्ट. बाईकशी कम्पेअर करता कार ड्रॅयव्हर जास्त कम्फर्टेबल असतात असे दिसते. बाईक चालवताना, स्पेशली हायवेवर सतत अलर्ट राहणे अवघड होते. बाईकवर बॅलन्स, स्पीड, ट्रॅफिक आणि रेझिस्टन्स असे सांभाळताना प्रचंड अलर्ट राहावे लागते. कार द्रायव्हिंगचे कसे? कितपत कम्फर्ट असतो आणि कसा? सपोज 4 अथवा 3 तासाचा प्रवास एक्स्प्रेस हायवेवर करणे कितपत सेफ? तेच सिटीत दिवसभर चालवणे?

सुबोध खरे's picture

28 Apr 2018 - 9:27 pm | सुबोध खरे

दुचाकी आणि चार चाकीची तुलना केलेली नाहीच आणि होणारही नाही .

सुरक्षितता हि चार चाकीत नक्कीच कितीतरी जास्त आहे.

शिवाय धूर, धूळ, घाण, ऊन, थंडी आणि पाऊस या सर्वापासून संरक्षण शिवाय वातानुकूलित असते.

दुचाकी हि गर्दीच्या रस्त्यावर आणि शहरात सोयीची आहे इतकेच.

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2018 - 10:26 pm | कानडाऊ योगेशु

सही प्र्श्न पुछेला है?
कार घेण्याआधी मी बाईकवरुन ऑफिसला जात असे. रोज साधारण ३० किमी चा प्रवास होत असे पण इकडे बेंगलोरमधेय इन्फ्रास्ट्क्चर डेवेलपमेंटच्या नावाखाली रोज काही ना काही कन्स्ठ्रक्शन होत असते त्यामूळे डोळ्यांना सारखा त्रास होत असे. पाणी येणे जळजळ व पाठदुखीचे दुखणे ही मागे लागले होते. पण कार घेतली व रोज कारने प्रवास करतो त्यानंतर हे प्रोब्लेम्स कधी आले नाहीत. बेंगलोर सारखा सिटीत बाईकपेक्षा कार कधीही सुरक्षित आहे. कधी कधी अधुन मधुन बाईकवर ऑफिसला जातो तेव्हा हा फरक प्रकर्षाने जाणवतो. फॅमिली असेल तर प्रवासासाठी कार असणेच उत्तम.

घरचं जेवण काय याची किंमत मला नक्कीच चांगली समजली आहे.

कार ठेवण्यातले / चालवणयातले व्याप जसे ध्यानी घेतले तसेच घरी जेवण बनवण्यातले व्याप (जे जनरली पुरुषांना पडत नाहीत ते) ध्यानात घेतलेले दिसत नाहीत असं निरीक्षण नोंदवतो.

शिवाय

भाड्याच्या घरात आपल्या सोयीचे फर्निचर सजावट काहीही करता येत नाही

तत्समच पॅरेलली, ओला उबरमधेही / भाड़ाटैक्सीमधेही हवे ते खाणेपिणे, ते सांडेल याची भीती न बाळगणे, हव्या त्या एक्सेसरीज/ फ्रेशनर / हैंगिंग्स इ. लावणे, ठणाणा ओरडत अंताक्षरी खेळत जाणे, हवं तिथे हवा तेवढा ब्रेक मारून थांबणे, खाजगी घरगुती चर्चा करत जाणे वगैरे खूप काही करण्यावर मर्यादा पडतात. ओला उबर जनरली पॉइंट टू पॉइंट असतात. तीनचार ठिकाणी एका फेरीत आणि प्रत्येक ठिकाणी अनिश्चित काळ वाट बघून (उदा. आधी बँक, तिथे काम झालं की वेगळीकडे कपड़ेखरेदी, तिथे ऐनवेळी आल्टर करुन द्यायला एका तासाने परत या असं महटल्यावर तिथेच रेस्टोरेंटमधे तासभर नाश्ता, असे प्लान्स ओला उबर वेटिंगमधे ठेवून किंवा दर सेगमेण्टला नवी बुक करुन पार पाडणं अवघड असतं. आणि घरगुती कामाची मोहीम 99% वेळा अशाच प्रकारची असते.

शिवाय भाडयाच्या सेल्फ ड्राईव्ह कारसाठी बरंच सिक्युरिटी डिपोझिट आणि अपघात डैमेज झाल्यास ठराविक इन्शुर्ड रकमेच्या वरचा सगळा भुरदंड वापरणाऱ्याला बसतो. याचा फायदा घेऊन असे सेवादाते अनेकदा नॉर्मल वेअर टेअरचे ख़र्चही आपल्याकडून काढतात.

ही दुसरी बाजू फक्त दाखवतोय.

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2018 - 9:23 pm | कानडाऊ योगेशु

शिवाय भाडयाच्या सेल्फ ड्राईव्ह कारसाठी बरंच सिक्युरिटी डिपोझिट आणि अपघात डैमेज झाल्यास ठराविक इन्शुर्ड रकमेच्या वरचा सगळा भुरदंड वापरणाऱ्याला बसतो. याचा फायदा घेऊन असे सेवादाते अनेकदा नॉर्मल वेअर टेअरचे ख़र्चही आपल्याकडून काढतात.

वर लिहिलेले आहे पण इथे विषय निघाला आहे म्हणुन परत लिहितो आहे. वर्षभर मी झूम कारचा व्यवस्थित वापर करत होतो पण सध्या त्यांनी सगळी सिस्टीम ऑटोमेटेड केली आहे. कार द्यायला वा घ्यायला कुणी अटेंडंट नसतो आणि ह्याचा फटका मला बसलाय. कार सरेंडर केल्यानंतर दोन दिवसांनी रात्री १२ वाजता मेसेज आला कि तुमची १०हजाराचे बिल अजुन भरणे बाकी आहे. झोप उडाली. कस्टमर केअर शी बोललो तर कळले फ्रंट व रिअर बंपर डॅमेज चार्जेस लावले गेले आहेत. सध्या दर एक दिवसाआड फोनाफोनी चालु असते. विकतचे दुखणे गळ्यात पडले आहे. बरे स्वतःची कार असुन सुध्दा केवळ वेगवेगळ्या कार्स चालवायला मिळाव्यात म्हणुन मी झूमकारचा वापर करत होतो पण सध्या तर घी देघा लेकिन बडगा नही ह्या उक्तीचा अनुभव घेत आहे.

सुबोध खरे's picture

28 Apr 2018 - 9:32 pm | सुबोध खरे

कार हातात घेण्याच्या अगोदर आपण त्याचे चारही बाजूनी आतून बाहेरून मोबाईलवर फोटो काढले नव्हते का?
अटेंडंट नसेल तर कार घेणे हे धोक्याचेच आहे. मी जेंव्हा घेतली तेंव्हा कारला असलेले बारीक बारीक खड्डे अटेंडंट ला दाखवले होते. त्यानेही फोटो काढले तसे मीही काढले होते. त्यामुळे नंतर हा प्रश्न आला नाही.
असो हि गोष्ट ट्विटर फेसबुक सगळीकडे टाकून आग लावा. तुमचे पैसे नक्की माफ किंवा कमी होतील. प्रणाली स्वयंचलित केली असेल तर गाडी व्यवस्थित आहे याचेही खात्री कोण देतंय? तेही तपासून पहा.

सुबोध खरे's picture

28 Apr 2018 - 9:33 pm | सुबोध खरे

पैसा तर एकहि भरू नका. झोप त्यांची उडाली पाहिजे तुमची नव्हे.

अनुप ढेरे's picture

28 Apr 2018 - 10:28 pm | अनुप ढेरे

भरपुर हायवे ड्रायविंग असेल तर कारला पर्याय नाही. पण शहरात कार चालवणे, हपिसाला यायला जायला विशेषतः, ही शिक्षा वाटते.

कपिलमुनी's picture

28 Apr 2018 - 10:33 pm | कपिलमुनी

गाडी घेऊन टाक !
सध्याच्या दिवसात गरजेची असते ;)

सुबोध खरे's picture

30 Apr 2018 - 3:49 pm | सुबोध खरे

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

शेजाऱ्याने घेतली की

ह घ्या.-)))--

सुबोध खरे's picture

30 Apr 2018 - 3:49 pm | सुबोध खरे

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

शेजाऱ्याने घेतली की

ह घ्या.-)))--

अभिजीत अवलिया's picture

30 Apr 2018 - 8:31 pm | अभिजीत अवलिया

फोर्ड ने हल्लीच लाँच केलेल्या फ्रीस्टाईल गाडीचा विचार देखील करावा.
पेट्रोल ५.५० ते ७.५० लाख आणि डिझेल ६.५० ते ८.५० लाख ह्या रेंज मध्ये येतेय.
स्पेसिफिकेशन्स मला तरी चांगले वाटतायत.

टवाळ कार्टा's picture

3 May 2018 - 10:52 am | टवाळ कार्टा

सिंगल असलात तर स्वतःची गाडी (चार्चाकी) असणे फायद्याचे असते हे ध्यानात ठेवा ;)