प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
19 Mar 2018 - 1:27 pm

ती आली होती फक्त एकदाच घरी

एक वाटी दूध मागायला

मला वाटले तिला दूध आवडते

म्हणून गेलो म्हशी पाळायला

खरी पंचाईत तेव्हा झाली

जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय

दुध देतच नाही

म्हशींसोबत एक रेडा बघितला

बाप माझ्यावर जाम भडकला

शिव्या देउनी खूप बुकलला

व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते

सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते

इकडे झाला उलट गेम

रेड्याने धरला म्हशीवर नेम

रेडा असा काही चौखूर धावला

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

बाप माझ्यावर भरपूर पिसाळला

सुरु झालं घरी भलतंच महाभारत

कसलं दूध अन कसलं प्रेम ?

सरळ गेलो माघारी

अन म्हशी दिल्या परत

सिद्धेश्वर विलास पाटणकर

काहीच्या काही कवितामांडणी

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

19 Mar 2018 - 4:38 pm | उपयोजक

तुम्ही कविता का करता?

तुमीबी ना राव , काईच्याकाही इचारताय...हि कविता थोडीच हाय ,, हि तर कल्पना हाय ...

ह्ये मंजी असं झालं , कि रजनीला इचारायचं ,, कि बाबा तू पिच्चरमंदी काय करतो आणि तुझं हे असलं काम कोण बघतं ... त्याला ऑस्कर सोडा ,, इतर कुठलाही पुरस्कार नाही मिळाला तरी त्यो काम करणारच .. ब्लेडने गोळी कापून दहाबारा जणांना मेलेलं कधी बघितलंय का हॉलिवूडच्या पिच्चरमंदी ..न्हाय ना .. इथे रजनीचे पिच्चर दाखवा त्यांना .. ऑस्करच बंद करून टाकतील ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Mar 2018 - 5:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यानिमित्ताने तुमचे ज्ञानवर्धन झाले ( म्हैस व्यायल्याशिवाय दुध देत नाही)

पण मी काय म्हणतो...पुढच्यावेळी दुसर्‍या कुणीतरी ताक, दही,गुळ,साखर,चहा,तेल,तुप वगैरे वाटीभर मागितले तर तुम्ही काय कराल?

खिलजि's picture

26 Mar 2018 - 1:15 pm | खिलजि

अरे हे काय बघतोय मी ... चक्क नाव बदललेत " केअशु साहेब " ... तो राजनीकांतचा फोटोपण गायब .. असो ... कुठे दुखावला गेला असलात तर माफी असावी ... पण नाव बदलू नका ... नावावर नितांत प्रेम करा ... या आभासी जगात तुम्हाला नावाशिवाय ओळख नाही ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर