एक कविता

Primary tabs

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
7 Dec 2017 - 3:49 pm

अरे ,
उधार माग ,
देतो ना चार करकरीत नोटा
कधी देणार परत असं न पुटपुटता ...
अरे,
हिशोब माग ,
देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत ,
पण उंबरठ्यावर अडकण घालून ,
एक गाणं दे ,
एक गाणं दे
असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला
कसं माघारी पाठवायचं ??

कवितागाणे

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Dec 2017 - 6:14 pm | प्राची अश्विनी

एक कविता की एक गाणं?
अर्थातच आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2017 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवट खासच.

-दिलीप बिरुटे

एस's picture

10 Dec 2017 - 12:09 am | एस

रोचक.

खूपच भारी रामदासकाका..