शंका/समाधान.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
3 Dec 2017 - 8:37 pm

शंका/समाधान.
*
या विशाल अवनी वर्ती,
प्रशांत सागर वसतो
त्यास भेटण्या सरिता का
धावते जणू अभीसारीका?
*
त्या लाल कमल पुष्पात
गोड मकरंदाची रेलचेल
आत भ्रमर कैद होतो
रात्री तिथेच का रमतो?
*
गगनात चंद्रमा हसतो
धवल प्रकाश पसरतो
ते मनोहर दृश्य बघुनि
का सागर उफाळतो?
*
ति फुले रंगी बेरंगी
मादक रस गंधाने फुलती.
त्या रान पुष्पा वरती..
का भ्रमर असा घुटमळतो?
*
त्याच्याच नाभी कमलांत
कस्तुरी गंध दरवळतो
तरीही तो कस्तुरी मृग
का शोध घेत फिरतो?
*
असे कितीक गोड प्रश्न
का सतावतात मजला?
या शंकांचे समाधान
कधी होईल का मजला??
*
अश्याच एका कातरवेळी
भेटलास तू सजणा
तनूत वीज कल्लोळली
स्पर्शाने काया मोहरली
*
घेतलेस मज मिठीत
चुंबलेस लाल अधरा
सा~या प्रश्नाची उत्तरे
दिलीस मज तू प्रियकरा

प्रेमकाव्य