आरसा

प्रावि's picture
प्रावि in जे न देखे रवी...
27 Sep 2017 - 12:28 am

अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ?
कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ?
कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय .....
अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय....

देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे ,
अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे ....
दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस ,
अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस .....

शिकलेल्याना 'इनकम टॅक्स' चोरायची सवय ,
अन फ्लॅट पाहिजे , क्लीन पुणे , मुंबई , पवई
कचरा उचलायचा सोडाच , पण करायलाच पाहिजे
अन माझा भारत - युरोप सारखा दिसलाच पाहिजे ...

रस्त्यावर कार चालवताना , चाकं 'झेब्रा क्रॉसिंग ' वर चालतात
चालणारे मरतात , मरू देत -रस्त्यावर तर 'कुत्री 'च मरतात ...
शेजारची 'तरुण' पोरगी , काय घालते , ह्यावर तीला नावं ठेवलीच पाहिजे ..
अन आपण मात्र बंद खोलीत पॉर्न बघत 'हलवलंच ' पाहिजे ...

शेतकरी मारतोय कर्ज घेऊन , पण दुष्काळ कुणी आणला ?
किती जणांनी मिळून पाणी अडवायला गावात 'बांध' घातला ?
बरं.... शेतकऱ्यांना माहित नाय -जमत नाय ,
मग त्या शेतकऱ्याच्या MPSC पास करून अधिकारी बनलेल्या पोराचं काय ???

आईला आपल्या पोराला , बलात्कार करू नये हे शिकवता नाय आलं ...
बापाला आपल्या पोरीला , स्वतःची रक्षा कशी करायची हे शिकवता नाय आलं ...
तरी पण पोलीस काय करतायेत साले - हे विचारायला सगळ्यांच तोंड उघडतात
अन आपला खिसा भरला की - भरलेली लाखांची मूठ सगळेच आवळतात

गव्हर्नमेंट कुणाचंही असो , इथं आपल्याला आपणच धीर द्यायचा ,
थोडी शिस्त अन वैचारिक कक्षा रुंदवायची गरज हाय ,
पण आपल्याला काय - 'पुन्हा एकदा या' असं घसा फाटोस्तर ओरडायचं
कुणी थुंकला की तिथंच थुंकायचं अन कुणी मुतला की तिथंच मुतायचं .....

अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार
कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट बघणार ?
कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' शिव्या द्यायची खोड जात नाय .....
अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय

धोरण