दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत!

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am


दीपोत्सवा,
आज तरी तुझं इथे स्वागत
अजून तरी इथे फुटतायत फटाकेच - निरपराध मस्तकं नाहीत - म्हणून सहर्ष स्वागत
अजून तरी इथे ठिणग्या उडतायत आतशबाजीतूनच - रोखलेल्या बंदुकांतून नाहीत- म्हणून मन:पूर्वक स्वागत
अजून तरी इथे भिरभिरतायत भुईचक्रच - बाँबस्फोटानंतरची धूळवादळं नाहीत- म्हणून सानंद स्वागत
अजून तरी इथे अंगावर काटा आणतेय गुलाबी थंडीच - मनमानी अटकेची भीती नव्हे – म्हणून हार्दिक स्वागत
अजून तरी इथला प्रकाश उत्सवी दिव्यांचा आहे –
उन्मादी मशालींचा भेसूर उजेड त्याची जागा घेण्यापूर्वी
हे दीपोत्सवा,
तुझं (कदाचित) शेवटचं, सहर्ष, मन:पूर्वक, सानंद, हार्दिक वगैरे स्वागत!!


प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 11:13 pm | पद्मावति

परखड! आवडलीच.

अनन्त्_यात्री's picture

23 Oct 2017 - 9:36 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद!

बाजीप्रभू's picture

23 Oct 2017 - 11:19 am | बाजीप्रभू

कदाचित "शेवटचं

" जरा खटकलं... बाकी छान!!

अनन्त्_यात्री's picture

23 Oct 2017 - 12:00 pm | अनन्त्_यात्री

धन्यवाद !

Mahesh Bhalerao's picture

28 Oct 2017 - 4:33 pm | Mahesh Bhalerao

वा ! अप्रतिम !
शेवट निश्चितच समाजभान जागे करणारा आहे , पण आशा प्रज्वलित आहे तोवर तो वेगळा आशादायी पण करता आला असता असं मलाही कदाचित उगीच वाटतंय !

पैलवान's picture

28 Oct 2017 - 4:48 pm | पैलवान

कडक आणि परखड!!
आणि जबरदस्त!!

एस's picture

28 Oct 2017 - 5:24 pm | एस

गुड वन.

अनन्त्_यात्री's picture

30 Oct 2017 - 10:29 am | अनन्त्_यात्री

महेश भालेराव, पैलवान, एस- प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

पैसा's picture

30 Oct 2017 - 6:25 pm | पैसा

एवढी निराशावादी का?

दिनेश५७'s picture

4 Nov 2017 - 6:35 pm | दिनेश५७

आणि झणझणीत...

अनन्त्_यात्री's picture

5 Nov 2017 - 6:03 pm | अनन्त्_यात्री

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.