निघून गेली रात्रपरी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
18 Oct 2008 - 11:51 am

प्राजक्ताच्या बुंध्यापाशी
पाउस पाडून शुभ्रकेशरी
सुगंध सांडून अशीकशी
निघून गेली रात्रपरी

दवबिंदूंची नक्षी रेखुनी
तरुलतेच्या शालूवरी
दहीवराने तृणा माखुनी
निघून गेली रात्रपरी

उषाराणीच्या कोमल गाली
सोडून गेली रंग जरतरी
कांचनात मिसळून लाली
निघून गेली रात्रपरी

मदनाक्षीची नीज जपोनी
कुंतलास ती विखरी
मिलनाची कसक ठेवूनी
निघून गेली रात्रपरी

चांदणे शिंपीत गेली
रात्रभर गगनात जरी
करुन उषेला मंत्रखुळी
निघून गेली रात्रपरी

कविता

प्रतिक्रिया

रामदास's picture

18 Oct 2008 - 12:02 pm | रामदास

सुंदर कविता.
मिलनाची कसक ठेवूनी
निघून गेली रात्रपरी.
हे आवडलं खास.

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Oct 2008 - 2:10 pm | चन्द्रशेखर गोखले

सुंदर मनोहरी कविता

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Oct 2008 - 2:10 pm | चन्द्रशेखर गोखले

सुंदर मनोहरी कविता

विसोबा खेचर's picture

18 Oct 2008 - 5:39 pm | विसोबा खेचर

अरूणराव,

केवळ अप्रतीम काव्य! वाचून खूप प्रसन्न वाटले!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2008 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली.

दत्ता काळे's picture

19 Oct 2008 - 12:15 pm | दत्ता काळे

दवबिंदूंची नक्षी रेखुनी
तरुलतेच्या शालूवरी
दहीवराने तृणा माखुनी
निघून गेली रात्रपरी

व्वा ! फार सुंदर

मदनबाण's picture

19 Oct 2008 - 12:30 pm | मदनबाण

फारच सुंदर कविता..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अरुण मनोहर's picture

20 Oct 2008 - 1:47 pm | अरुण मनोहर

सर्व वाचकांचे आभार.

पावसाची परी's picture

20 Oct 2008 - 2:44 pm | पावसाची परी

दवबिंदूंची नक्षी रेखुनी
तरुलतेच्या शालूवरी
दहीवराने तृणा माखुनी

हे खास आवडले

अरुण मनोहर's picture

21 Oct 2008 - 5:32 pm | अरुण मनोहर

असाच स्नेह राहू द्या.

संदीप चित्रे's picture

21 Oct 2008 - 7:45 pm | संदीप चित्रे

सकाळीच एकदम सुरेख कविता वाचायला मिळाली :)

>> प्राजक्ताच्या बुंध्यापाशी
>> पाउस पाडून शुभ्रकेशरी
>> सुगंध सांडून अशीकशी
>> निघून गेली रात्रपरी

कवितेची सुरूवातच खूप खूप आवडली !

>> मदनाक्षीची नीज जपोनी
>> कुंतलास ती विखरी
>> मिलनाची कसक ठेवूनी
>> निघून गेली रात्रपरी

क्या बात है ! मदनाक्षी डोळ्यांसमोर आली :)